30 ऑगस्ट 2017
विनोदी वृत्ती असणे वेगळे आणि कुठेही फिदीफिदी करणे वेगळे ..कोट्या करणे वेगळी गोष्टआणि फक्त आपल्या अजागळ व्यक्तिमत्वचे अवेळी काटे टोचणे वेगळी.
कधी, कुठे ,कोणावर, तर कधी स्वतःवर हसायचं याचं 'तारतम्य' असणे याला विनोदी 'बुद्धी' म्हणतात. जसा कॉमन सेन्स असणे कॉमन नसतो तसंच ही बुद्धीही असणे अनकॉमन आहे.
कुत्सितपणे बोलणे आणि कोणाच्या जीवावर, मालमत्तेची हानी होऊ घातलेल्या संकटावर, त्यातील त्यांनी दाखवलेल्या 'स्पिरिट' वर कुत्सितपणे हसणाऱ्यांची दयाही येउ शकत नाही.
आपले फालतू शहरी पर्सनल स्कोर सेटल करण्यासाठी आयपीएल फायनल सारख्या टुकार गोष्टीवरुन कोट्या विनोद समजण्याजोगे पण स्वतः काठावर रिकामे बसून बुडणाऱ्यांवर हसणे, त्यांच्या #स्पिरीट ची टर उडवणाऱ्यांचं स्वतःचं स्पिरिट ..आत्मा किती अर्धमेला झालाय हे दिसून येतं.
इतरांच्या "सर्वायवल स्पिरिटवर" हसणाऱ्या अश्या अर्धमेलेल्या स्पिरीटांना स्पोर्टमन स्पिरिट म्हणजे कशाशी खातात कळणार नाही.
निसर्ग अत्यंत बेभरवशाचा असतो. उद्या हे लोक अश्या नैसर्गिक संकटात अडकले तर!
तरीही हे आकाशातील बापा यांना माफच कर जरी त्यांना माहिती आहे ते काय करत आहेत.
- Abhijeet Panse

No comments:
Post a Comment