*चलो बुलावा आया है
वैष्णवीदेवी प्रवास वर्णन भाग 2*
माझ्या सखीला-रक सॅकला उचलुन पाठीवर घेत दिल्लीच्या भुमीवर पहिलं पाउल ठेवलं.
आणि ''जिवाची दिल्ली'' करण्यास सज्ज झालो.
अनुराग घ्यायला येणार होता. तो येईपर्यंत मी दिल्ली मेट्रो स्टेशनला पोहोचुन नेहमीप्रमाणे आजुबाजुचं निरीक्षण करू लागलाे. हे शहर अनेक गोष्टींसाठी कुप्रसिद्ध आहे. हे बातम्यांमधून कळत असतं.
त्याचा संबंध आजुबाजुच्या वातावरणात दृश्यात काही मिळतो का हे शोधण्याचा बालिश प्रयत्न करू लागलो.
एकदाचा अनुराग आला.भेटण्याच्या आनंदात एकमेकांना अभक्ष शिव्यांचे आदान प्रदान..मिठ्या मारणाचा सोहळा पार पडला आणि आम्ही 'रोहिणीला' जायला निघालो.
मेट्रोच्या पहिल्याच भेटीत प्रेमात पडलो. पण लोक मात्र मख्ख चेहऱ्याने प्रवास करताना दिसलेत. यामानाने मुंबईची लोकल खूप जिवंत वाटते. मुंबई स्पिरीटच ते!
त्यावेळी फक्त दिल्ली कोलकात्यामध्येच मेट्रो ट्रेन होती.
फक्त फेब्रुवारी महिन्यातच राष्ट्रपती भवनातील गार्डन सामान्य नागरीकांसाठी खुलं असल्यामुळे अनुरागचा तिकडे जाण्याचा बेत होता.
पण हे गार्डन, उद्यानात जायचं म्हटलं की एरवीही माझ्या चेहऱ्यावर आठ्या उमटतात.म्हैसुरचं वृंदावन गार्डन असो वा काश्मीरचे मुघल उद्याने मला कंटाळाच येतो.
म्युझियम्स,किल्ले,लेणी,किंवा ऐतिहासीक वास्तु,मग ते सुस्थितीत असो वा भग्नावस्थेत,तेथे मी तासनतास एकटा रमु शकतो.वेगळ्याच विश्वात जातो.
त्यामुळे मी अनुरागपुढे पुराना किल्ला,लाल किल्ला कुतुब मिनारची यादी समोर ठेवली.
हे ऐकताच त्याने मला गच्चीवर नेलं आणि तिथे गेल्यावर मी जोरदार ओरडलोच..
कारण त्याच्या गच्चीवरुन समोर दुर कुतूब मिनार दिसत होता.
मी कितीतरी वेळ ते दृश्य पाहत राहिलो.
त्या दिवशी अनुरागसोबत कुतूब मिनार..लाल किल्ला..चांदनी चौक..लोटस टेंपल बघुन आलो.आणि दुसऱ्या दिवशी जम्मूचं रिजर्वेशन तत्काळमध्ये करण्याचं ठरलं.
कोणाला हाताला सहा बोटं असतात,वर्तमानपत्रात कधी दुतोंडी साप वगैरे जन्माला आलेला दिसतो.
तसंच मला कधी कधी तिव्रतेने वाटतं की विधात्याने माझ्या पोटात मला दोन तीन जठरं का नाही दिलीत!!
अशीच भावना मला चांदनी चौकात पराठा गल्लीतुन आणि इतर भागात फिरताना झाली होती.
सकाळ आली ती अनुरागच्या तब्येतीचं दुखणं घेऊन आली. त्यामुळे त्याचं येणं रद्द झालं.
मला मात्र मनात एकटं जाण्याच्या विचारानं हुरहुर जाणवू लागली.
जम्मू काश्मीर म्हटल्यावर डोळ्यांसमोर आतंकवादी कारवायाच येऊ लागल्या. पण घरून निघतानाच मनाशी निश्चय केला होता वैष्णो देवीला जायचेच.
सकाळी १० ते १२ पर्यंत सुरू असणाऱ्या तत्काळ साठी लोक पहाटेपासून रांगेत लागतात. आणि आम्ही दुपारी साडे अकरा वाजता स्टेशनला जायला घराचा उंबरठा ओलांडला.
१२ फलाटं ओलांडून पहाडगंज भागाकडील तत्काळचं ऑफीस खूप प्रयत्नांती एकदाचं सापडलं.
आत वेळ संपल्याने तिथे कोणतीच रांग नव्हती. आत पोहोंचल्यावर कळलं की मी xerox copy विसरलोय.
मग पहाडगंजचं जंग जंग पछाडल्यावर एकदाची xerox copy काढली.
पुन्हा ऑफीसात आलो तर जवळचा पेन हरवलेला..!!
मग कोणी पेन देता का हो पेन..या वेंधळ्या पेंद्याला पेन देता का विचारत
शेवटी एकदाचा फॉर्म भरून झाल्यावर तो द्यावा तर 'लंच टाइम हो गया' म्हणत तो गिळायला निघून गेला.
तेव्हा निराशेने मी जायचचं रद्द केलं. आणि जवळच्या कॅनॉट प्लेसला जायला आम्ही निघणार होतो.
पण थोड्याच वेळात तो अधिकारी आला आणि नकार ऐकण्यासाठीच मी खिडकीपाशी जाऊन भरलेला फॉर्म उदास मनाने आत ढकलला.
मनात म्हटलं आज जर तिकीट मिळालं नाही तर वैष्णो देवीचीच इच्छा नाही की मी दर्शनाला यावं. तसंही देवीची इच्छा असली तरच जाता येतं असं म्हणतात.
अशी स्वतःची खोटी अयशस्वी समजूत काढू लागलो.
आणि दुसऱ्या दिवशी परतीचं तिकीट काढायला लवकर येण्याचं ठरवलं.
आता रेल्वे अधिकारी दुपारी 2 वाजता फॉर्मवर 'तत्काळ' बघितल्यावर अंगावर खेकसणार याची खात्री होती.
एवढ्यात त्या खिडकीच्या पलीकडुन अधिकाऱ्याच्या मुखातून तीन शब्दसुमनं सांडलीत आणि मी ती माझ्या कर्णांजलीत अलगद झेलली -'एकही बचा है!'
मला आश्चर्याचा मोठा धक्का होता तो धक्का!!
खिडकीतून एक गोंडस तिकीट बाहेर आलं.ते पाहून अनुरागलाही खूप आश्चर्य वाटलं! आणि मी आनंदाने उद्गारलो "चलो बुलावा आया है माताने बुलाया है!"
(क्रमशः)

No comments:
Post a Comment