लहानपणी शाळेत असताना वाचनालयात ''कवी प्रदीप'' यांच्यावरील एक अगदी छोटेखानी पुस्तक वाचलं होतं.
दोनेक वर्षांनी शाळेत राष्ट्रभाषा निबंध स्पर्धेत; आवडते कवी/विचारवंत/व्यक्तिमत्व; मी
''कवी प्रदिप'' यांच्यावर निबंध लिहिला होता.
एरवी मी कविता आणि कवी यांच्यापासुन चार हात दुर राहतो.कारण ''तो आणि ती''.. विरह..शृंगार..Nostalgia..या अशा कविता माझ्यासारखा निरस प्राणी सहनच करू शकत नाही.गुदमरायला होतं.
पण कवी प्रदीप यांच्या पहिल्याच शाब्दीक भेटीमुळे त्यांच्या कविता..चित्रपट गीते.. यांच्याशी नाळ जुळली.
राष्ट्रभक्ती..आध्यात्म..यथार्थवाद..
दुरदृष्टी..सामाजिक भान हे यांच्या गीतांमध्ये स्पष्टपणे जाणवतं.
''तेरे द्वार खडा भगवान
भगत रे भर दे रे झोली...''
उज्जैनमध्ये जन्मलेले प्रदीप यांची कारकार्द कर्मधर्मसंयोगाने मुंबईत आल्यावर तिथेच घडली.
1940मध्ये 'बंधन' चित्रपटासाठी त्यांनी ''चल चल रे नौजवान..'' हे गाणं रचलं आणि न भुतो न भविष्यति असा इतिहास घडला.
जेव्हा हे गाणं चित्रपटात दाखवल्या गेलं तेव्हा लोकांच्या आग्रहास्तव हे गाणं चित्रपटगृहात पुन्हा दाखवण्यात आलं नंतरच पुढे चित्रपट सुरू केला गेला.
महान अभिनेता व व्यक्तिमत्व बलराज साहनी तेव्हा लंडन BBC ला होते तेव्हा त्यांनी तिथुुन हे गीत प्रसारीत केलं होतं.
पंजाब सिंध प्रांतातील तरूणांनी तर याला राष्ट्रगीताचा दर्जा मिळावा म्हणुन आंदोलन केलं होतं.या गाण्यामुळे इंग्रज हैराण झाले होते.
काही दिवसांनी एस.मुखर्जी यांच्या 'किस्मत' या चित्रपटासाठी त्यांनी
आज हिमालय की चोंटीसे फिरसे हमने ललकारा है!दूर हटो ए दुनियावालो हिंदुस्तान हमारा है..!''
लोक चित्रपटगृहात या गाण्यावर अक्षरश: नाचायचे असं वर्णन आहे.
या गाण्यावरही इंग्रजांनी बंदी आणली पण तोवर हे गाणं देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचलं होतं.
1947 मध्ये स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांनी लिहिलेलं
''हम लाए है तुफान से कश्ती निकालके इस देश को रखना मेरे बच्चो संभालके..''
माझं आवडतं गाणं आहे.
''आओ बच्चो तुम्हे दिखाए झांकी हिंदुस्तान की इस मिट्टीसे तिलक....हे गाणंही त्यांचंच.
त्यांचे गाणे त्यांच्याच आवाजात ह्रदयाला स्पर्श करतात.
50 वर्षानंतरही त्यांची गाणी आजही प्रचंड relevent वाटतात.
बदलणाऱ्या..बदललेल्या मानवी मुल्यांवरील त्यांची गाणी अंतर्मुख करून सोडतात.
''आज के इन्सान को यह क्या हो गया
इसका पुराना प्यार कहा खो गया!
चारो ओर दगा ही दगा...
रोती है सलमा रोती है सीता..
आज हिमालय चिल्लाता है कहा पुराना वो नाता है
हमने अपने वतन को देखा
आदमी के पतन को देखा
आज तो बहनो पर भी हमला होता है
दुर किसी कोने मे मजहब रोता है!''
त्यांच्याच आवाजातलं ''पिंजरे के पंछी रे तेरा दर्द न जाने कोई.. '
तसंच
''मुखडा देख ले प्रानी जरा दर्पन में..तेरे जीवन मे..
कितना पुन्य है कितना पाप देखले दर्पन मे..
खुद को धोखा दे मत बंदे अच्छे नही कपट के धंदे..
सदा न चलता किसी का नाटक दुनिया के आंगन मे''
तसंच ''कोई लाख करे चतुराई करम का लेख मिटेना ना भाई!!''
हे त्यांच्याच आवाजातील माझे सगळ्यात आवडते गाणे..
1962 च्या चीन युद्धामध्ये शहीद झालेल्या सैनिकांसाठी त्यांनी एक गीत लिहीलं.
आणि 29 जानेवरी 1963 ला दिल्लीत सैनिकांच्या स्मरणार्थ कार्यक्रमात लता मंगेशकरांनी ते गायलं असता पंडीत नेहरूंच्याही डोळ्यात अश्रु आले होते.
आजही ते गीत अनेकांना गहिवरवतं.
ते गीत होतं ''ये मेरे वतन के लोगो.. जरा याद करो कुर्बानी....''
बदलत्या काळातही अर्थाजनासाठी त्यांनी आपल्या गीतांशी तडजोड केली नाही. चित्रपटांसाठी उथळ गाणी रचली नाहीत.शेवटी हळहळु चित्रपटगीते लिहीणं बंद केलं.
अत्यंत साधी राहाणी..विचारांमध्ये कलाकृतीमध्ये भक्ती..देशभक्ती..शौर्य..आध्यात्म.
यामुळे कवी प्रदीप, श्री सुधीर फडके(बाबुजी) आणि ग.दी.माडगुळकर यांच्यात मला नेहमी साम्य जाणवतं.आणी त्यामुळेच हे तिघेही फार पुजनीय वाटतात.
कवी प्रदीप यांची गाणी त्यांच्या खर्ज असलेल्या आवाजात मोबाइलमध्ये कानात वायरी अडकवुन ऐकताना मी वेगळ्याच जगात पोहचतो.
11 डिसेंबर 1998 ला या महान कवीची लेखणी नेहमीसाठी थांबली.
त्यांच्याच आवाजात त्यांचं गाणं एखाद्या संध्याकाळी किंवा रात्री ऐकताना खुप अंर्तमुख करतं
''टुट गयी है माला मोती बिखर चले
दो दिन रहकर साथ जाने किधर चले.....''
आज पुण्यतिथीला कवी प्रदीप यांना श्रद्धांजली.
-अभिजित पानसे
No comments:
Post a Comment