खोल समुद्रातील हिमनगाच्या वरील दृश्य छोट्या भागावरून त्याची खोली रुंदी , त्याचा आवाका ठरवू नये. नाहीतर त्याचा टायटॅनिक होतो. हिमनगाचा वरील टोक , भाग जितका दिसतो त्याहून कित्येक पटीने तो खाली मुळात प्रचंड मोठा असतो. अगदी हेच उदाहरण क्रिकेटर्स ,चित्रपट कलाकार यांच्यासंबंधीही दिसून येतं. विद्या बालन सुरवातीला टीव्ही सिरियल्स, म्युजीक अल्बम्स मध्ये काम करायची. पण तिचं कौशल्य त्याहून प्रचंड होतं हे तिने दाखवून दिलं.
तसंच आनंद तिवारी हे नाव लोकांमध्ये तितकं परिचित नाही. पण तो ही जणू एक हिमखंडच आहे. त्याला आजवर चित्रपटांमध्ये
छोट्या भूमिका ,जाहिराती करताना बघितलय. पण त्याचं टॅलेंट , पोटेन्शिअल तितकंच मर्यादित नाही हे आता कळतंय.
तो एक उच्च प्रतीचा आजच्या काळातील भाषेचा , बदलती मानसिकता , परिस्थिती , टेक्नॉलॉजीचा प्रचंड वाढलेला वापर ,त्याचा मनोव्यापारांवर, नात्यांवर , नात्यातील खोली , संवादावर होणाऱ्या परिणामांची जाणीव असलेला लेखक , दिग्दर्शक आहे. अभिनेता म्हणून तो उत्स्फूर्त आहेच.
वेब सीरिज च्या जगात "आनंद तिवारी" हे एक खूप सन्माननीय नाव आहे. आनंद तिवारीने वाय फिल्म्स ची लोकप्रिय वेब सीरीज " बँग बाजा बारात" दिग्दर्शित केली आहे. ही सीरिज लोकप्रिय झाली ते त्यातील बदललेल्या नात्याचे परिमाण ,संवाद ,उडालेला गोंधळ याचे अचूक चित्रण केल्यामुळे . याचे क्रेडिट सुमित व्यास आणि आनंद तिवारीला जातं. या दोघांनी मिळून ती
सीरिज लिहिली आहे. पण तिचे दिग्दर्शन मात्र आनंद तिवारीने केलंय.
"ऑफिशियल चुक्यागिरी" ही सुद्धा अशीच एक लोकप्रिय वेब सीरिज .या सीरिज चा निर्मातासुद्धा आनंद तिवारी आहे.
शिवाय त्याने या नेट सीरिज मध्ये अभिनयसुद्धा केला आहे. गणेश हे कॉर्परेट जगतातील हायपर, खडूस अधिकाऱ्याचे मराठी पात्र खूप चांगले वठवले आहे.
आनंद तिवारी हा मूळचा रंगभूमीवरचा कलाकार आहे.
रंगभूमीचा कलाकार हा अस्सल टेस्ट प्लेयर सारखा असतो. उच्च टेस्ट प्लेयर हा परिपूर्ण असतो. तो क्रिकेटच्या कुठल्याही प्रकारात यशस्वी होऊ शकतो.कारण त्याचे बेसिक्स पक्के असतात. त्याच प्रकारे रंगभूमीचा कलाकाराला अभिनय, दिग्दर्शन ,लेखनादी सर्व पैलूंचे आघाडींचे बऱ्यापैकी ज्ञान असते. तो अभिनयाच्या सर्व प्रकारात छाप सोडू शकतो.आनंद तिवारी हा तर मुरलेला स्टेज कलाकार! त्याला "लॅम्प पोस्ट "या विख्यात नाटकासाठी अवॉर्ड ही मिळालेला आहे. तसेच "वन ऑन वन "या प्रसिद्ध नाटकासाठीही तो ओळखला जातो.
गो गोवा गॉन चित्रपटातील त्याचं सॉफ्टवेअर इंजिनीअरचं साधंनिरागस पात्र अगदी अप्रतिमरित्या त्याने रंगवलं आहे. उत्स्फूर्त शाब्दिक विनोदामुळे ते एक मनाला भावणारं पात्र त्याने साकारलं आहे.
उडान ,काईट्स या चित्रपटांमध्येही त्याच्या महत्वाच्या भूमिका आहेत.
गो गोवा नंतर मला सगळ्यात जास्त तो आव
डला दीबाकर बॅनर्जीच्या डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी या चित्रपटातील त्याची अजित बॅनर्जी च्या भूमिकेत!! तत्कालीन बंगाली माणसाची भूमिका त्याने सुशांतसिंग राजपूत सोबत अप्रतिमरित्या साकारली आहे.
आनंद तिवारीचा जन्म माटुंगा ला डॉक्टरांची पार्श्वभूमी असलेल्या सर्व साधारण घरात झाला. अभिनयाची आवड असल्याने तो शाळा कॉलेज मध्ये नाटकात काम करू लागला. गणपती , देवी नवरात्रातातील नाटकांमध्ये तो लहानपणी काम करायचा.शिवाजी मंदिर ही त्याची कर्मभूमी आणि प्रायोगिक भूमी होती.
तो अभिनयातच नाही तर दिग्दर्शनामध्येही स्वतःला चाचपत होता. 2012 च्या तरल भावनेला स्पर्श करणारा , भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा या चित्रपटाचे नाव त्यात नक्की असेल असा अत्यंत सुंदर कलाकृती असलेला 'बर्फी' या चित्रपटाचा तो अनुराग बासू चा सहाय्यक दिग्दर्शक होता.
पुढे त्याने सई परांजपे फिल्म्स सोबत ही दिग्दर्शनचे काम केलेत. आणि सर्व बाजुंनी , पैलूंनी तो परिपूर्ण होत गेला.
आज तो वेब सीरिज या उभारत्या
आंतरजालीय विश्वात स्वतःचं अस्तित्व निर्माण करतोय.
"पर्मनंट रूममेट्स " या अत्यंत लोकप्रिय वेब सीरिज मध्ये सुमित व्यासने साकारलेल्या मिकेश चौधरीच्या पात्राच्या 'तिवारी ' नावाच्या मित्राचे नाव तोंडी असतं. जो मुळात संपूर्ण सिरीजमध्ये दिसत नाही.तो तिवारी म्हणजे जणू हा आनंद तिवारीच असावा!!
सुमित व्यास आणि आनंद तिवारी हे दोघेही अत्यंत चांगले मित्र आहेत. दोघेही सोबत तसेच एकमेकांच्या कलाकृतीत लिखाण, दिग्दर्शन , अभिनय ही करतात. आनंद च्या "बँग बाजा बारात सीरिज " मध्ये सुमित व्यास ने डीजे चा न ओळखू येणारी अशी अगदी छोटी भूमिका केली आहे. तसेच आनंद तिवारीच्याच न ओळखू ओळखू येणारी अशी अगदी छोटी भूमिका केली आहे. तसेच आनंद तिवारीच्याच ऑफिशियल चुक्यागिरी या नेट सीरिजमध्ये कॉर्परेट क्षेत्रातील फक्त आवाज ऐकू येणारा ,ड्रोन च्या माध्यमाद्वारे संवाद साधणाऱ्या बॉस ची भूमिका केली आहे.
सुमित व्यासने काम केलेल्या 'नेबर्स' या शॉर्ट फिल्म ची निर्मिती , दिग्दर्शन आनंद तिवारीने केलंय . शिवाय " हेअर कट" या वेगळ्या आणि चांगल्या शॉर्ट फिल्मचेही दिग्दर्शन त्याचेच आहे.
"सेक्स चॅट विथ पप्पू न पापा " वेगळ्या वेब सीरिजमध्येही आनंद तिवारीने काम केलंय.
एक निरागस चेहऱ्याचा, गोड हास्य असलेला, समंजस व्यक्ती असलेला हा अभिनेता , दिग्दर्शक ,लेखक वेब सीरिज क्षेत्रामध्ये चांगल्या कामाची भर घालतोय!!!
सो लगे रहो आनंद भाई!!
No comments:
Post a Comment