Saturday 23 December 2017

पहिला भारतीय चायनामन कुलदीप! चायनामन नॉट चायना मेड

चायनामनबॉलर

 "बिलांसी नागीण निघाली नागोबा डोलाया लागला.." गाण्यावर जणू नाचत शरीराला ओळोखे पिळोखे देत  चायनामन बॉलिंग करणारा 'पॉलअडम्स' आम्ही पाहिला तेव्हा पहिल्यांदा चायनामन बॉलर हे नाव कानी पडलं होतं. ते नावच इतकं आवडलं होतं की शाळेत क्रिकेट खेळताना प्लास्टिक बॉलवर विकेट पडली तरी चायनामन बॉल टाकला म्हणायचो!

मुळात चायनामन बॉल..बॉलर म्हणजे काय काही वर्षे कळलं नाही. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा ब्रॅड हॉग हा चायनामन बॉलर बघितला. पण त्याच्यात आमच्या पॉल अडम्सची शारीरिक नजाकत, नागीनडान्स नव्हता!

चायनामन बॉलर म्हटला की डोळ्यासमोर फक्त पॉल अडम्स च यायचा. येतो.

पण आज टीम मॅनेजमेंट आणि कॅप्टन अजिंक्य रहाणेने  ,विराट कोहली जागी बॅट्समनला न घेता चायनामन बॉलर "कुलदीप यादव" ला टीममध्ये घेऊन संरक्षणात्मक खेळी न करता एक अटॅकिंग सकारत्मक पाऊल उचलले यासाठी त्यांचे अभिनंदन!
आणि त्यामुळे कुलदीप यादव भारताचा पहिला चायनामन बॉलर ठरला आहे!!

1930 मध्ये वेस्ट इंडिज च्या "एलिस अचोंग" नावाच्या मूळचा #चीन चा असलेला डावखोऱ्या मनगटी स्पिनरने इंग्लड च्या वॉल्टर रॉबिन्सला ऑफ स्टंप वरून आत येणारा बॉल टाकला तेव्हा आश्चर्यचकित झालेल्या अंपायर ने त्याला उत्स्फूर्तपणे ब्लडी चायनामन बॉलर म्हटले होते! तेव्हापासून अपारंपरिक लेफ्टी, मनगटी स्पिन बॉलिंग करणारा (काहीसा लेग ब्रेक) चायनामन बॉलर म्हणून ओळखला जाऊ लागला!!

आज कुलदीप यादव ने जबरदस्त चायनामन बॉलिंग करून 4विकेट्स घेऊन स्वतःची निवड सार्थ ठरवली.
ग्लेन मॅक्सवेल ला गुगळीवर ज्या प्रकारे आऊट केलं ती विकेट तो विसरणार नाही!!

"Chinaman not chinamade"

-अभिजित पानसे

No comments:

Post a Comment