Thursday 24 August 2017

गणू तुझा माझ्यावर भरोसा नाय काय नाय काय

गणू तुझा माझ्यावर भरोसा नाय काय नाय काय!

गणूच्या भव्य मूर्तीचा डौल डौल डौल डौल
डौलदार मूर्तीला लावतो केमिकल केमिकल
केमिकल चा परिणाम खोल खोल खोल खोल
गणू नको खोलू तू आमच्या #नवसाला पावणाऱ्या मार्केटिंगची पोल पोल पोल पोल

गणू माझा बुद्धीबलावर भरोसा काय नाय काय नाय
गणूच्या मंडळाची वट भारी भारी
आहे मंडळ आभारी आभारी
आवाजाचा मोठ्ठा डेसीबल डेसीबल
पंडालात वाजते गाणे देसीगर्ल देसीगर्ल
नागीण डान्स टाकतो मी ढोसून व्हिस्की देशी
अगं अगं देशी गणूला कुठे नेशी

गणू तुला माझ्या #नागीण डान्सवर भरोसा नाय काय नाय काय

गणू पुढच्या वर्षी तू लवकर ये काय ये काय
गणू माझा तुझ्यावर भरोसा काय नाय काय नाय!

हाय काय अन नाय काय!

-Abhijeet Panse
गणू माझा तुझ्यावर भरोसा नाय काय नाय काय
गणूच्या मूर्तीचा भव्य डौल भव्य डौल
डौलदार मूर्तीला लावतो केमिकल केमिकल
केमिकल चा परिणाम खोल खोल खोल खोल
गणू नको खोलू तू आमच्या नवसाला पावणाऱ्या मार्केटिंगची पोल पोल
गणू माझा बुद्धीबलावर भरोसा काय नाय काय नाय
गणूच्या मंडळाच्या आवाजबलाचा डेसीबल डेसीबल
मंडळात वाजते गाणे देसीगर्ल देसीगर्ल
नागीण डान्स टाकतो मी पिऊन व्हिस्की देशी
अगं अगं देशी गणूला कुठे नेशी
गणू तुझा माझ्या नागीण डान्सवर भरोसा नाय काय नाय काय

गणू माझा तुझ्यावर भरोसा नाय काय नाय काय
पुढच्या वर्षी लवकर ये काय ये काय
हाय काय अन नाय काय


Thursday 17 August 2017

स्त्रियांचा कामदेव सोमण मिलिंद

ते म्हणतात "इंटरनेट इज फुल ऑफ ब्रिलिअंट पिपल हु स्टक इन व्रांग जॉब!"
पण हे खऱ्या आयुष्यातही लागू होतं. आणि जे हे लवकर ओळखून पुढचा योग्य निर्णय घेतात ते वेगळ काही करून नाव कमवतात.मिलिंद सोमण ही त्यातलाच.4  नोव्हेम्बर 196 लास्कॉटलंडला ग्लासगोत मध्यम वर्गीय कुटुंबात जन्मलेल्या ,इंजिनिअरिंग केलेल्या मिलिंद सोमणने लवकर काळाचे पावलं ओळखून इंजिनिअरिंग सोडून, मुळचीच सुडॉल देहबांधा असल्याने मॉडेलिंग क्षेत्राकडे वळला आणि प्रचंड यशस्वी झाला.
तत्कालीन सुपर मॉडेल आणि त्याची कथित प्रेयसी "मधू सप्रे" सोबत अजगरासमवेत "न्यूडावस्थेत" मिलिंद सोमण सोबत केलेल्या फोटोशूटने त्या दोघाना प्रदीद्धी आणि वादग्रस्तता दोन्ही दिले.अर्थात मॉडेलिंग करिअरमध्ये ते नवीन नसतात आणि एका प्रकारे ते पथ्यावरच पडतात.
त्या फोटोशूटमुळे त्याच्यावर प्राणीप्रेमी संघटनेने,आणि एका सामाजिक संस्थेने केसही केली होती.

पण खऱ्या अर्थाने मिलिंद सोमण घराघरात आणि तरुणींच्या हृदयात शिरला तो "काटे नही कटते ये दिन ये रात"फेम सिंगर "अलिशा चिनॉय" च्या "मेड इन इंडिया" अलबम द्वारे!!!

मॉडेलिंग च्या करिअर ची एक्सपायरी डेट फार कमी असते.त्यामुळे पुढे लवकरच मिलिंद सोमण ने सिनेसृष्टी कडे मोर्चा वळवला.तथापि शिरस्त्याप्रमाणे त्याला हिंदी सिनेमांसाठी रोल्स मिळू लागलेत.पण अभिनय आणि रॅम्प वॉक मध्ये "रॅम्पपट्टी" ते "सिल्वर स्क्रिन" चा फरक असतो.अभिनय हे फोटोशूटपुरतं खाण्याचे काम नाही हे सिद्ध झालं. सोमण सिनेसृष्टीत चालला नाही.तरीही अग्निवर्षा, आणि शेकडो वेळा बघितला तरीही प्रत्येक वेळी प्रेमात पाडेल असा दिगदर्शन,अभिनय,कास्टिंग सर्वार्थाने परिपूर्ण असलेला "भेजा फ्राय" सिनेमात मिलिंद सोमणचे रोल्स लक्षणीय होते.
तामिळ,इंग्लिश, मराठीतला  "गंध" हा सिनेमे केलेत.16 डिसेंम्बर,"कॅप्टन व्योम" सारखे बालिश प्रकार ही केलेत.

पण पुन्हा खऱ्या अर्थाने मिलिंद सोमणने आपलं वेगळेपण आणि क्लास सिद्ध केल ते 20 मे 2012 ला 30 दिवसात 1500 किमीची "ग्रीन्याथॉन" रेस पूर्ण करून!यामुळे लिमका बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नाव आलं.2012 मधेच "फक्त स्त्रियांसाठी"  असलेली "पिंक मॅरेथॉन" मिलिंद सोमण च्या नेतृत्वाखाली झाली! यासाठी मिलिंद सोमनशिवाय आणखी कोण योग्य ठरणार होतं!!

पण ग्लॅमर क्षेत्रातील चकचकाट बाजुला सारून घाम,रक्त,गाळून सारून स्वतःला पुन्हा वेगळ्या पद्धतीने सिद्ध केलं ते मिलिंद सोमण ने 2015 मधील "आयर्न मॅन चॅलेंज"
यामुळे मिलिद सोमण ने सर्वार्थाने देशभरातील लोकंच आदर मिळवला सोबतच एक आदर्श प्रस्थापित केला.
आयर्न मॅन चॅलेंज ही "ट्रायथ्यालॉन" असते.यात 3.8 किमी स्विमिंग,180.२ किमी सायकल चालवणे आणि 42.2किमी धावणे अनुक्रमे न थांबता अंतर्भूत असते.
हे पूर्ण करण्यास मिलिंडला त्याच्या पहिलाच प्रयत्न असूनही फक्त 15 तास 19 मिनिट्स लागलेत!आणि मिलिंद सोमण ने पुन्हा नाव कमावले!

तरुणांनाही लाजवेल असा फिटनेस, ऍंड्युरन्स आणि स्टॅमिना तो आज पन्नाशीतही राखून आहे!आणि म्हणूनच अजूनही तो तरुणीच नाही तर स्त्रीयांचाही "हार्टथ्रोब" आहे!!

टेक अ बो मिलिंद सोमण फ्रॉम मराठी पिझ्झा!!