Tuesday 20 June 2017

वारीची चंद्रकोर, रमजान महिना, निर्गुण निराकार ईश्वर

* दिवेघाटातील सगळ्यात कठीण दिवस , नैसर्गिकरित्या तयार झालेली #चंद्रकोर आणि #रमजानमहिना! *


वारीचा आजचा तिसरा दिवस, संपूर्ण प्रवासातील सगळयात कठीण दिवस..मोठे अंतर.. घाटाचा प्रवास..एकादशीचा उपास..
पुण्याहून निघालेली माऊलींची पालखी दुसऱ्या दिवशी सासवडला बंधूंचे दर्शन घेणार असते.

पण उपाशी पोटी घाटाची चढण कसोटी बघणारी असते..
नवखा तरुण वारकरी ताणात असतो..
शरीरानेच वृद्ध अनुभवी वारकरी नवख्या तरुणाला #माऊलींवर विश्वास टाक म्हणतो, म्हातारा लहान नातीला खांद्यावर बसवून चालू लागतो, म्हाताऱ्या डोक्यावर तुळसी वृंदावन डोक्यावर घेऊन सगळ्यात समोर गेलेल्याही असतात..

तरुण नवखा वारकरी हे बघून ओशाळतो..फक्त #स्पिरिचुअलट्रेकिंग म्हणूनच आणि सोशल मीडियावर सतत चेक इन करणारा तो फोटोज टाकण्यासाठीच आलेला असतो..भक्ती वगैरे काही नसते..

लूक योग्य साजेसा यावा मिळावा म्हणून कपाळावर उभं गंध लावतो, कानात इअरफोन्स घालून मोठया आवाज वाढवून गाणे ऐकत अधून मधून मोबाईलने फोटो काढत, शूट करत चालू  लागतो..
स्वतःचं आधुनिकत्व दाखवत , इतर वारकर्यांनमध्ये मनाने  मिसळत नाही..तोंडाने माऊलीचं नाव घ्यायला लाज वाटत असते.

सूर्य ढगात लपंडाव करत असतो..घामाच्या धारा लागलेल्या असताना अचानक आभाळातून पर्जन्य धारा बरसू लागतात..

दिवेघाटात पालखी येते..शिस्तीने रस्त्याच्या एका बाजूने वारी जाऊ लागते..रस्त्यावरची पुण्याहून निघालेली, पुण्याकडे जाणारी वाहनातील लोकही कौतुकाने भक्तीने नमस्कार करतात..

घराच्या मागील गल्लीत जाण्यासाठीही गाडी काढणाऱ्या तरुणाची घाटात छाती फुलू लागते..
म्हातारे म्हातारी नाम घोषात, आजूबाजूची सृष्टी ..वारकरी नामघोषात मग्न असतात..

तरुण वारकऱ्याच्या तोंडीही नकळत नाम येऊ लागतं.
कानातील एअर प्लग्स काढून ठेवतो..
आजूबाजुला सृष्टी हिरवीगार झालेली असते..मोबाईलने अधून मधून वारीचेफोटो काढत , सुरकुत्यांचं जाळं पसरलेल्या एखादया जख्ख म्हाताऱ्या वारकऱ्या सोबत   सेल्फी काढत सोशल मीडियावर टाकत राहतो..
घाटात एकाठिकाणी सहज वरती जाऊन अंमळ  विश्रांती घ्यायला आणि "बेटर व्यू" साठी नुकत्याच घेतलेल्या डीएसएलआर ने फोटो काढायला जातो..

वरून जे दृश्य दिसतं त्यामुळे त्याच्या अंगावर शहारे येतात..वरून अंतरावरून बघतांना मानवी चंद्रकोर झालेली असते..वर #ताऱ्याप्रमाणे तळ्याचं टिम्ब ही दिसतं..मुलगा निसर्गाच्या, निर्गुण निराकार ईश्वराच्या दर्शनामुळे चाट पडतो..अष्टसात्विक भाव उचंबळून येतात..

सेल खिश्यात टाकतो आणि नाम गजरात स्वतःला हरवू  लागतो..
पांडुरंग..पांडुरंग..विठ्ठल विठ्ठल...

पालखी सासवडला पोहचते..तोवर तो वेगळा न राहता मनाने सर्व वरकाऱ्यांपैकी एक झालेला असतो.

-अभिजीत पानसे

Sunday 18 June 2017

गदर , एक क्रिकेट मॅच कथा

गदर ,एक क्रिकेट मॅच कथा"

कोहली :- "किस शारजा कप की बात कर रहे हो तुम! उस शारजा कप की जिसमे तुम लोग चिटिंग, बॉल ट्याम्परिंग करके जितते थे!


सरफराज, पाक मीडिया:-  तुम्हारी हिम्मत कैसे हुई ये सब बोलने की ! एक पाकिस्तानी खिलाडी को आप अपने आयपीएल मे खेलने का मौका देते नही!
हम लोगो का मौका मौका बोलके मजाक बनाते हो! आप इंडिया वालो को देखके हमारा खून खॉंलने लगता है!
इंशाह..बॉईज प्लेड वेल टुडे!"



कोहली:- क्या तुम लोगोने तेंडुलकर को बौन्सर डालके उसका खून नहीं बहाया था! क्या तुम लोगो ने हमे वर्ल्ड कपमें माँ बहन की गालिया नहीं दी थी!!??
सरफराज वह एक जूनून था जो गुजर चुका! अब मैं एक कॅप्टन के हैसीयत से खेलने आया हु!अपने देश के लिये ट्रॉफी जितने आया हु!
मैं नफरत भुला चुका हु आप भी भुला दिजीए!! 🙏🏼



सरफराज (चिडून कडवटपणे ) :- नफरत भुला दु! वो भी तुम इंडियावालोयोसे ! मेरा बस चले तो मैं तुम्हें हर मॅच मे दस विकेट से हरा दु!
इंशाह ..बॉईज प्लेड वेल टुडे!



(आता प्रचंड संतापलेेला जोरदार आवाजात)कोहली :- कीन इंडियावालो को दस विकेट से हरायेंगे आप लोग! दुनिया जानती है एक कुंबले ने तुम्हारे दस विकेट लिये थे!
हमने आपको मोस्ट फेवर्ड नेशन का नजराना दिया है!
दुनिया जानती है हमने आपको आयसीसी टुर्नमेंट मे सबसे ज्यादा हराया है!

अपने देस मे मॅच खिलाने की हैसियत नही और बात करते हो चॅम्पियन्स ट्रॉफी जितने की!

अगर आज ये कोहली , धोनी, शर्मा, और गब्बर बिथर गये ना तो सौ बनाके आपके छक्के छुडा देंगे!
हमारा भारत आयसीसी टुर्नमेंट में जिंदाबाद था जिंदाबाद है जिंदाबाद रहेगा!

भारत जिंदबाद इंडिया जिंदबाद
हिंदुस्थान जिंदबाद!

-अभिजीत पानसे

Saturday 17 June 2017

"फादर्स डे"

Fathers Day

हा वृक्ष वरवरून बघता टवटवीत वाटतो.बहरेलेली पानं चमकातेहेत.
पण ह्याचं 'खोड' आता वयोमानानुसार पोखरलं जातय.

पण हे तो त्याच्या त्याच्यापासुन दुर गेलेल्या फांद्या..पानांना जाणीवही होउ देत नाही.कितीही दुर..उंच गेलेल्या शेवटच्या पानालाही जीवनरस पोहचवतोय..

कुठलंही झाड असो ते मजबुत उभं राहतं ते त्याच्या पक्क्या खोडामुळेच!

फुलं..पानांना वाटतं आपल्या अन्नाला..यशाला कारक आम्हीच!आम्ही आमचं ''फोटोसिन्थेसिस'' करतो..स्वत:चं अन्न स्वत: मिळवतो..पण त्यांना सिन्थेसिस च्या 'लायकीचं' बनवणारा असतो तो वृक्षाचं 'खोड'!

मजबुत उभा राहुन आपल्या मुळांद्वारे रसवहन करून आपल्या पानं..फुलांना वाढवणारा 'तो' असतो.

फांद्या..पान..फुलं ह्यांचं अस्तित्वच मुळात 'खोडावर' अवलंबुन.

आताही हा वृक्ष आपल्या मुला बाळं रूपी फांद्या पानांचा भार वाहुन त्यांना बहरवतो आहे.स्वत: पोखरल्या जातोय पण आपलं काम..प्रेम मात्र शांतपणे करतो आहे.

पण आपलं लक्ष जातं ते वरती..स्तुती केली जाते पान फांद्यांची.& Trunk  always remains unsung hero!

मला हा वृक्ष सोनमर्गला दिसला.त्याच्या खोडाला पाहताच क्षणी एकच Unsung Hero आठवला बाप नावाचा माणुस!दोघेही अगदी सारखेच!वृक्ष रूपी आपल्या घराला.. मुलंबाळं रूपी त्याच्या फांद्या..फुलं पानांना जगवणारा..मोठं करणारा.

स्वत: पोखरल्या जात असुन आपल्या मुलांना त्याची झळ ही पोहोचु न देणारा बाप नावाचा माणुस..वृक्षरूपी घराचा मजबुत खोड.

सर्वांच्या वडिलांना..तसंच सिंगल मदर असलेल्या वडिलांचा रोल निभवणाऱ्या सर्व आयांना समर्पीत.

Happy Fathers Day.

-अभिजीत पानसे.

Friday 16 June 2017

मी स्वतः अनुभवलेला उडत्या पंजाबचा ड्रग्स चा विळखा

पंजाब ड्रग्स पाकिस्तान छुपं युद्धं

  मी पुर्ण भात नाही पण शीतं पाहिली आहे.गेल्या फेब्रुवारी महिन्यात आरू-पहलगामला स्किइंगसाठी गेलो होतो.
चंदिगडचा निधान सिंग नावाचा आणि एक भुवनेश्वरचा मुलगा मुलगा माझे रूम मेट होते.

हा निधान सिंग वकिल होता.त्याचे वडिल आर्मी मध्ये मोठ्या पोस्टवर.हा स्वत: नॅशनल लेवल वर फुटबाॅल प्लेयर..अंगावर चायनीज टॅटु काढलेला.. स्वभावानेही एकदम कुल डुड होता..म्हणजे अजुनही आहे.

पहिल्याच दिवशी निधानसिंग ने उघडपणे सांगितलं की तो चेन स्मोकर आहे.आणि बाहेर अलाउड नसल्याने रूममध्येच स्मोक करत जाणार!

रात्री त्याने त्याची महाश्वेेता फुंकणी बाहेर काढली तेव्हा तो म्हणाला ''यारो मै हॅश भी लेता हु!प्लीज माईंड मन करना!''

आणि त्याने त्याच्या रकसॅकमधुन एक डबी काढुन एक हिरवट काळ्या रंगाचा स्ट्राॅबेरीच्या आकारा इतका एक भरीव गोळा काढला.त्याचा थोडासा भाग खरवडुन सिगरेटमधे टाकला आणि धुपाटणं सुरू केलं.

मला पहिले ते कळलच नाही तेव्हा त्यानेच थोडक्यात माहिती सांगितली.''भाई ये चरस है!मै और मेरे दोस्त लोग 9th से लेते आ रहे!''

विड्याच्या पानाचे शौकीन जसे जेवण झाल्यावर पान,काथ,चुना..मांडुन साग्रसंगीत पान तयार करतात..तसा हा रात्री आम्ही जेवुन आलो की तो त्याची 'किट' काढुन बसायचा.त्यात त्याचे खुप सारे सिगरेट्स पाॅकिट्स..तीन लायटर्स होते...मग  गादीवर पेपर टाकुन सिगरेट मधली तंबाखु काढायचा..गोळीतुन चरस खरवडुन तीत भरणं..तर कधी कागदाची पुंगळीत चरस घालुन झुरके घ्यायचा..त्याची ही अग्नीसाधना..वायुभक्षण आम्ही दोघ हसतं पाहात राहायचो.
त्याला ब्रम्हानंदाची टाळी लागायची.

रात्री तापमान उणे जात असल्याने रोज रात्री खाली बुखारी रूममध्ये तो सोडुन सर्व जमायचे. बुखारी बंद झाल्यावर आम्ही अकरा वाजता वर गेलो की आमचीही खोली कमी अधीक बुखारीची खोलीच झालेली असायची.खोलीभर चरसचा धूर झालेला असायचा!

हा डॅशिंग , डोक्याने स्मार्ट असलेला मुलगा अनेक गोष्टींसोबत ड्रग्सचाही एनसायक्लोपिडीयाच होता.!तेव्हा त्याच्या बोलण्यातुन पंजाब खरंच ड्रग्सच्या विळख्यात आहे जाणवलं.

अॅक्सेसिबिलिटी खुप सोपी आहे तिथे!

तो सांगायचा सर्वात जास्त लोकप्रिय ड्रग आहे ते केमिकल ड्रग्स! 'हिरोइन'.
तिथले लोकं त्याला ''सिट्टा''..चिट्टा म्हणतात.

हाय सोसायटीपासुन मिडल क्लास ते अगदी कामगार मजुर..काॅलेज स्टुडंट्स..टिनेजर मुलं मुली सर्व या सिट्ट्यासाठी आसुसले असतात..मग त्याचीच पुढे सवय लागते.

त्याचं प्रमुख कारण त्याने सांगितलं की केमिकल ड्रग.. सिट्टा  घेतल्यावर सतत अनेक सेक्शुयल आॅरग्याझम्सचा आनंद मिळतो.
तो म्हणायचा
''ड्रग्स लेने के बाद हम लोग टिव्ही देखते है..तब लगता है के जो  दिखाई दे रहा वो हम ही कर रहे है!क्रिकेट और फुटबाॅल मॅच देखतेे हुए,और पाॅर्न देखते हुए हम लेते है!और मॅक्स लोग तो ड्रग्स करने के बाद पाॅर्न देखते है! भें... लगता है खुद ही  कर रहे है!''

संगतीचा असर होतो म्हणतात.मी आजवर एकदाही कधी स्मोकिंग केलं नाही तरिही मी आणि तिसरा भुवनेश्वरचा  रूममेट आम्ही ठरवलं की गंमत म्हणुन शेवटच्या दिवशी चरसेचा एक कश मारुन बघु!

पण  7 व्या दिवशीच निधानसिंग जोरदार खाली पडल्यामुळे त्याचा गुडघा इंज्युअर्ड झाला त्यामुळे तो परत गेला.
आणि आमच्या खोलीत चरसेचे वारे खेळणं बंद बोउन फक्त शीत वारे खेळु लागले.

पुढे पाच सहा दिवसांनी माझाही गुडघा वाईट रित्या दुखावला गेला म्हणुन मीही एक दिवस आधीच एकटा परत निघालो होतो तेव्हा माझ्यासोबत;  दिल्लीला राहणारी ग्वाल्हेरची एक मुलगीही सोबत आली.(नाव सांगत नाही कारण ती माझ्या फ्रेंड लिस्ट मध्ये आहे.)

स्किइंगवेळी मैत्री झाली होतीच पण आता परतीच्यावेळी सोबत दोन दिवस राहिल्याने खुप चांगली ओळख झाली.कदाचित त्यामुळेच;जम्मुला पोहचल्यावर तिने बिनधास्तपणे तिच्या पर्समधुन सिगरेटपाॅकिटातुन सिगरेट काढुन फुंकणं सुरू केलं.तिनेही सांगितलं की ती हॅश घेत असते क्वचित.तिच्या रूमिज पंजाबी आहेत.त्याही ड्रग्स घेतात.रात्री हॉटेलमध्येही तिने तिच्या पर्समधून अगदी तशीच काळपट हिरवी गोळी काढली आणि काही वेळ हँश स्मोक केलं.

वैष्णोदेवीचा रात्री ट्रेक करताना तर तीच्या एका वाक्यावर मी खुप हसलो.तिचे पाय दुखायला लागले तेव्हा म्हणाली ''आय विश आय हॅड हॅश टुनाइट..चलने मे आसान हो जाता!''

हे सगळं माझ्यासाठी प्रथम धक्कादायक होतं.पण यावरूुन अंदाज आला की पंजाब..दिल्ली ह्या भागातील यंग लोकांमध्ये ड्रग्स सेवनाचं प्रमाण खुप आहे.

उत्तरेकडील पंजाब हा माझा सगळ्यात आवडता भाग!कुठल्याही गावी फिरा वेगळाच मस्त earthy फील येतो.हिरवीगार शेतं..मोठ्या मनाचे मोकळी माणसं.पंजाबी पेहरावातील केस वरती बांधलेले लहान
मुलं बागडाताना पाहिली की मला नेहमी ते लहानपणीचे भगतसिंग,मिल्खासिंगच..वाटतात.

पण सर्वात महत्वाची पंजाबची ओळख आहे ती पुरूषार्थ,शाौर्यासाठी!!देशप्रेमासाठी!पंजाबातील प्रत्येक घरातील किमान एक व्यक्ती तरी सैन्यात असतोच असं अतिशोयक्तिने म्हणतात.

पण आता पंजाबी तरूण ड्रग्सच्या नशेतच आत्ममग्न होतोय.आणि हेच खरं #छुपं_युद्ध आहे!
हे छुपं युद्ध पाकिस्तान खेळतोय.

सामरिक दृष्ट्या पंजाब अत्यंत महत्वाचा आहे.ते देशाचं प्रवेशद्वार आहे.

पंजाबी सैन्याकडुन पाकिस्तान नेहमीच टरकुन असतो.लोंगेवाल्याला मोजक्या सैनिकांसोबत पाकड्यांना पाणी पाजणारा मेजर कुलदीपसिंगला ते कसे विसरणार!!

पंजाबी माणुस देशावर प्रेम करतो हे ओळखुन पाकिस्तानने पंजाब प्रांतात ड्रग्स पाठवुन तरूण पिढीला पोखरून टाकायला सुरवात केली.

1971मध्ये पुर्व पाकिस्तान भारताने वेगळा करून त्याचा बांग्लादेश केल्याने तो राग मनात धुसफुसत आहेच.त्यामुळे भारताचा कणा असलेला पंजाब प्रांतातील काही अशांत,असमाधानी लोकांना फुस लावुन वेगळ्या 'खलिस्तान'ची चळवळ सुरू झाली.मग सुवर्ण मंदीर हत्याकांड..इंदिरा गांधींची हत्या..हे सर्व घडत गेले.
यातील सर्व घटना एकमेकांशी जुळलेल्या आहेत.आणि आता ड्रग्सचा फसवा आणि विषारी विळखा....हे छुपं युद्ध पाकिस्तान खेळतय.

नक्किच आपल्या देशातील सिस्टममधल्या सडका भागही यात शामील आहेच.ती तर आपली नेहमीचीच शोकांकीका असते.

प्रत्येक शहरात,गावात उघड किंवा छुपा रेड लाईट एरिआ असतोच..दारूबंदी असलेल्या राज्यात...जिल्ह्यात..दारू ही मिळत असतेच.त्याचप्रकारे उत्तर दक्षिण..मध्य भारत..संपुर्ण देशातच ड्रग्स कमी अधीक प्रमाणात मिळत असतातच.

पण प्रामुख्याने; धनधान्याने..शौयाने समृद्ध असा 'आपला' पंजाब प्रांत
आणि पर्यायाने देश पोखरला जातोय याचं एक भारतीय म्हणुन वाइट वाटतं.

-Abhijeet Panse


'सरकारने आता या वारीवर बंदी आणायला हवी"

''सरकारने आता या वारीवर बंदी आणायला हवी''

"सरकारने आता या वारीवर बंदी आणायला हवी''!
"दुसऱ्याच्या गावात जाऊन त्यांच्या गावात घाण का करावी''?
 ''श्रद्धा ही अंतर्वस्राइतकी वैयक्तिक गोष्ट असावी तिचं वारीद्वारे प्रदर्शन करण्याची काय गरज''?
 ''वारकऱ्यांनी पंढरपुरला जाउन स्वत:ची उर्जा वाया घालवण्यापेक्षा गावात तलावे विहिरी बांधावीत..श्रमदान करावं.'' वगैरे..

दरवर्षी पावसाळ्यात अचानक बेडकांचं पीक निघतं आणि जिकडे तिकडे त्यांचं #डराॅव_डराॅव सुरु होतं त्याप्रकारे दरवर्षी वारी आली की या #कुपमंडुकांचं त्याविरोधात सोशियल मिडियावर घरात लोळत आणि न्युज चॅनल्सवर असलं डराँव डराँव सुरू होतं.

सगळयात गंमतीची गोष्ट म्हणजे ह्या बेडकांपैकी कोणीही स्वतः पंढरपुरात पैदा झालं नसतं वा पंढरपुरात राहत नसतं अस्सल मुंबईकर मुंबई च्या कधीही वाईट म्हणणार नाही मुंबईला नावं ठेवणारे बाहेरचेच असतात हे #पुलं.नी म्हटलंय. त्याचप्रकारे मुळचा पंढरपुरकर वारीच्या नावाने बोटं मोडीत नाही. आमच्या गावात येऊन आमच गाव खराब का करता असा जाब वारकऱ्याला विचारत नाही.आषाढी कार्तिकी वारी बंद व्हावी अशी इच्छा करत नाही.

एरवी वर्षभर आपण आपलं घर रोजच नीट,स्वच्छ व्यवस्थित ठेवतोच.पण वर्षातुन एकदा,दोनदा घरी पाहुणे आलेत,सोबत लहान मुलं असलीत तर ते दोन तीन दिवस घरात पसारा होतोच.चादरी चुरगळतात..घरात अन्नपदार्थ विखुरणं..दंगामस्तीने व्हाॅल्युम वाढतो..रोजचा दिनक्रम,घराची शिस्त,काटेकोरपणा,यांना दोनदिवस सुट्टी मिळते.एरवी रोजची शिस्त आणि शांतताही या उत्साहात व उत्सवात विरघळुन जात संपुर्ण घर #चार्ज्ड_अप होतं.घरातील माणसांसकट निर्जीव भिंतीसुद्धा हे उत्साहाची स्पंदने शोषुन रिफ्रेश होतात.

अशावेळी घरातील पाहुण्यांमुळे लोकांची संख्या वाढल्याने होणारा पसारा, काही कराव्या लागणाऱ्या तडजोडी ह्यांचं काहीही वैषम्य वाटत नाही. पाहुणे गेले की आपलंच घर असल्याने आनंदाने पुन्हा घर नीट आवरलं जात. रोजचा दिनक्रम सुरु होतो.  पाहुण्यांना ''पुन्हा पुढच्या वर्षी या..येत रहा अधुन मधुन'' म्हटलंच जातं.

त्याचप्रकारे या वारीच्या काळात संपूर्ण पंढरपूर चैतन्यमय झालेलं असतं. जिकडे तिकडे #नामाचा_गजर, कुठे कीर्तने, प्रवचने सुरु असतात.
#ग्रासरूट_लेवल वर हार,फुले, प्रसाद,खाद्यपदार्थ,लाॅजिंग बोर्डिंग पासुन  तर लाॅकर्स, जोडे चपला ठेवण्यापर्यंत व्यवसाय चालतो.त्यामुळे #वारी ही पंढरपुरच्या 'सिस्टमचा' अविभाज्य भाग आहे.

पंढरपूरचा रहिवासी पंढरपूरच्या वारीला स्वतःच्या गावची शान समजतात.कारण वारीमुळेच जागतीक पातळीवर गावाचं नाव गेलं आहे.गावात दुसरं नवीन मोठं  बस स्टँन्ड तयार झालय, प्रमुख रेल्वेने जोडल्या गेलंय.. इंजिनिअरिंग काॅलेज आलं आहे.महाराष्ट्रातील सर्वोत्तम इंजि. काॅलेजेस पैकी पंढरपुरचं इंजिनिअरिंग काॅलेज एक आहे.
पंढरपुर गाव न राहता ते सुखसोयींनीयुक्त शहर झालं आहे. ग्रास रूट ते लार्जर स्केल वारीचा प्रभाव प्रचंड आहे.

पंढरपुरकर वारकऱ्यांचं  मनापासून स्वागत करतो. गावाला आपलं घर मानतो.पर्यायाने, नैसर्गिक न्यायाने कुठेहीे लोकसंख्या वाढल्याने  कचरा, अस्वच्छता होणारच हे त्याने स्वीकारलेलंच असतं.
शेवटी घर असो व गाव, पाहुणे आलेत किंवा काही दिवसांसाठी लोकसंख्या वाढली तर तडजोडी या कराव्याच लागतात. आणि साधा भोळा #मराठीमाणूस आनंदाने या तडजोडी करतो.

हां आता घरात पाहुणे आल्यावर ज्यांच्या कपाळावर आठ्या पडतात, "किती पोळ्या खाल?" असं जे विचारतात, ज्यांना घरात पाहुणे आलेले आवडत नाहीत.
मी, माझं घर, माझं कुटुंब आणि रोजचा दिनक्रम इतकंच ज्यांचं आयुष्य आहे त्यांना, ह्या  संकोचित वृत्तीच्या कुपमंडुकाना स्वतःला विचारवंत म्हणवून घेण्याचा आटापिटा करणारे, सोशियल अवेरनेसच्या #अर्ध्या_हळकुंडाने_पिवळी  होणारी , उथळ पाण्याला खळखळाट असणारी मंडळीच वारी बद्दल बरळतात.

वारकऱ्यांना श्रमदानाचा सल्ला देणाऱ्यांनी स्वत: आयुष्यात किती #श्रमदान केलं असतं? किती तलावं बांधलेत?किती विहिरी खणल्यात?

मुळात वारीबद्दल नकारात्मक बोलण्याचा अधिकार पंढरपुरात न राहणाऱ्या, स्वत:च्या कातडीला उन्ह,पाउस थंडीची थोडीही बाधा न होउ देता घरात बसुन फुकटचे प्रबोधन करणाऱ्यांना नाहीच!तो हक्क फक्त पंढरपुरात राहणाऱ्याला, वारीचे फायदे तोटे,वारीमुळे होणाऱ्या अस्वच्छतेची झळ पोहचणाऱ्या सामान्य नागरीकालाच आहे!
पण बोंबा ठोकताच उपरेच!!

वारीच्या काळात लोकं शहरात,नदीवर,कचरा,घाण  करतात.पण कुठलिही यात्रा म्हटली की लोकसंख्येमुळे हे होणारच!ही तर नैसर्गीक गोष्ट.
हजयात्रेत यापुर्वी तंबुमध्ये आग लागुन शेकडो लोकं मृत्युमुखी पडले आहेत.हज यात्रेबद्दल कोणीही हे ढोंगी विचारी बोलताना दिसत नाही.

सूर्यनारायणाचं कर्क संक्रमण होऊन दक्षिणायण सुरू  झालं.. काळे मेघ भरून आलेले पाहताच मोर पिसारा फुलवून नाचु लागला.. आषाढातील पर्जन्यधरा कोसळू लागल्या..पक्ष्याने पेरते व्हा म्हणण्यास सुरवात केली.. नांगरलेल्या जमिनीस मातृत्व लाभले आणि प्रत्येक वारकरी चे डोळे त्याच्या आराध्य विठ्ठलकडे लागलेत.

 स्वतः #श्रीरामाने सागरात टाकलेला #दगड बुडाला पण त्याच्याच वानरभक्ताने दगडावर ''#राम'' लिहून टाकलेला दगड मात्र तरला ते म्हणतात ना रामपेक्षाही त्याच्या #नामात जास्त शक्ती आहे त्याचप्रकारे कदाचित पांडुरंगाचेही चैतन्य हे या वारीमुळे आणि या ''वारकऱ्यांमुळे'' कायम असावं व वाढत असावं.

दरवर्षी विठ्ठलाच्या पायी डोकं टेकवुन त्याचे डोळे लागतात पुढच्या वर्षीच्या वारी कडे.
वारकरी विठ्ठलाला ''#येतो_देवा_पुढच्या_वर्षी!'' म्हणत असताना त्या पांडुरंगाचेही डोळे लागत असेल पुढच्या वर्षीच्या वारीकडे! पांडुरंग ही भावनिक होऊन वारकऱ्याला म्हणत असावा
''ये लवकर पुढच्या वर्षी मी वाट बघतोय''!!

-अभिजीत पानसे



Tuesday 13 June 2017

आणि नव्या वर्षाचा सूर्योदय झाला होता.."

आणि 2017चा सुर्योदय झाला होता..*

आई-बाबांच्या विरोधाला न जुमानता मी काल थर्टीफर्स्टच्या पार्टीला मित्रांसोबत गेलो.
पण या ओल्ड जनरेशनला आमचं सेलिब्रेशन कळतच कुठे?

बाबांच्या हुकुमाप्रमाणे नाखुषीनेच रात्री लवकर घरी आलो व झोपलो.

पहाटेच्या सुमारास मला एक स्वप्न पडले...

मी घनघोर रात्री काळोखात....

नाही! कदाचीत तोही पहाटेचा काळोख असावा!!
एका अरण्यात मी एकटाच फिरत होतो.
मनात भितीचा लवलेशही नव्हता.
चंद्राच्या दुधाळ प्रकाशात मी आपल्याच मस्तीत धुंदीत रानवाटा पालथ्या घालत होतो.मनसोक्त एकटाच  हिंडत होतो.

आणि...तेवढ्यात

अचानक मागून एक खर्जातला पुरूषी आवाज आला!

''व्हेअर आर यु रोमिंग यंग मँन?''

मी दचकुन मागे वळलो.

थोड्या अंतरावरून एक  पांढुरकी आकृती माझ्या रोखानेच पुढे येत होती.

माझ्या पोटात भितीचा गोळा उठला.

ती आकृती माझ्या दृष्ट्रीपथात आली.

एक वय झालेला वृद्ध,जरीकाठी धोतर,शुभ्र कुर्ता,चेहऱ्यावर म्हातारपणीच्या सुरकुत्या पण, तरीही तेजस्वी मुखमंडल होतं.पिकलेले केस आयुष्यातील सर्व अनुभवांचे साक्षी होते.डोळ्यांमध्ये आयुष्याची आपली संपुर्ण कारकीर्द यशस्वी झाल्याचे अपूर्व समाधान झळकत होते.

मी स्वत:ला काही क्षण हरवुन बसलो.

''काय यंग मँन!!''
कुठे भटकतोय इकडे? नवीन वर्षाचे स्वागत करायचे सोडुन तू एकटा इकडे काय करतोय?''
जवळ येत त्यांनी प्रेमळपणे विचारले.

त्यांच्या प्रश्नाने मी एकदम भानावर आलो.मनातील मघाची भिती आता नाहिशी झाली होती.आणि नेहमीप्रमाणे मला पुन्हा तारूण्याच्या आणि इतर अभिमानाने घेरले.त्यामुळे मनात त्या वृद्धाबद्दल नाराजीचा भाव आला.
मनात म्हटलं मघ्येच हा म्हातारा कशाला भेटला?पण आश्चर्य वाटले.हा वृद्ध माणुस आमच्या पिढीसारखाच बोलतोय!

चल चालुया सोबत थोडा वेळ!''तो वृद्ध म्हणाला आणि मी नाराजीनेच त्यांच्यासोबत निघालोसुद्धा.

मनात म्हटलं'' शिट यार हा म्हातारा मध्येच कशाला भेटला!फार बोअर करणार!आमची पिढी तुमची पिढी, न्यु यिअर की गुढीपाडवा..यावर लेक्चर देणार!

मी मुद्दामच खोटं हसत खोचकपणे विचारलं,''काय ओल्डी! इतक्या रात्री!जंगलात!भिती वगैरे नाही वाटत?''

मघाच्याच प्रसन्न मुद्रेने ते बोलले,''अरे मित्रा रात्रीचंच जंगल बघण्यात मजा असते ना!
पहाटेच्या या गडद काळोखानंतरच सूर्योदय होतो ना! आणि आम्हा म्हाताऱ्यांना कसली भिती!
हे बोलतानाही त्यांच्या मुखावरील पुर्णत्वास जाणारं शांत स्मित कायम होतं.

मी उपहासाने पुन्हा म्हटलं,''हे ओल्डी मला वाटतं तुमच्या घरची सगळी मंडळी,नातवंडे सगळेजणं न्यु इअर सेलिब्रेशनमध्ये बिजी असतील!तुम्हाला पटत नाही म्हणुन तुम्ही इकडे रागारागाने किंवा दु:खाने फिरायला आलात की काय?''

ते मोकळे हसले,''अरे बेटा मी निरपेक्ष आहे.मी कधीच कुणाकडुनही दुखावलो जात नाही!
आणि तुला कोणी सांगितलं मला हे न्यु यिअरचे सेलिब्रेशन आवडत नाही! हे आय एम अे मार्डन ग्रँडपा बेटा!अँड आय डोन्ट बिलीव्ह इन जनरेशन gap!''आणि दिलखुलास हसलेत.

त्यांचं ते मोकळं स्वच्छ हास्य निष्पक्ष बोलणं ऐकुन माझी नाराजी कुठल्या कुठे पळुन गेली आणि मला माझ्याच वागणुकीची लाज वाटु लागली.

जंगलात कुठेही न थांबता आम्ही  भटकत होतो.त्या गडद शांततेत खाली पडलेल्या  झाडांच्या असंख्य वाळलेल्या पानांतुन चालताना होणारा आवाज कानाला सुखावत होता.

आमच्या गप्पा अगदी मस्त रंगल्या होत्या.

मला हे आजोबा अगदीतरूण विचारांचे वाटले.ते अगदी मित्रत्वाच्या नात्याने बोलत होते.शब्दात अवजडता नव्हती.आम्ही अनेक विषयांवर गप्पा केल्या.
अगदी भारतीय मुलींची ऑलिंपिकस मधील चांगली कामगिरी,भारतीय क्रिकेट टीमचं यश, तर अगदी सर्जिकलस्ट्राईक ते डिमनीटायझेशन पर्यंत..शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या तर भारत पाकिस्तान संबंध..

पण त्यांच्या प्रत्येक उत्तरात,बोलण्यात मला तटस्थपणा,त्रयस्थपणा जाणवत होता.कुठलाही विचार मत ते थोपवत नव्हते.जणुकाही फक्त द्रष्ट्याच्या भुमिकेत होते.

शेवटी ते म्हणाले,''बेटा हा तर काळाचा महिमा आहे!वी आर बाउंड टु चेंज विथ द टाईम फाॅर बेटर!''

त्यांना नवीन वर्षाच्या त्यांच्या काही संकल्पांबद्दल विचारले असता म्हणाले,'' मी कधीच कोणताही संकल्प करत नसतो.फक्त त्या त्या क्षणात पूर्णपणे जगतो..राहतो.!
आणि कुणास ठाउक कदाचित पुढच्या वर्षी मी राहणार देखिल नाही!''

त्यांच्या या शेवटच्या वाक्याने माहित नाही का मला एकदम  गलबलुन आलं...असं कुठलं नातं आमच्यात निर्माण होत होतं!!

जंगलातुन फिरता फिरता आम्ही आता एका माळरानावर आलो.

''मग कसं गेलं वर्ष 2016?'' आजोबांनी विचारलं.

''खुप वाईट गेलं हो हे वर्ष! सगळीकडे अपयशी ठरलो!तसंही मला ज्योतिषांनी सांगितलच होतं की हे 2016वर्ष माझ्यासाठी वाईटच जाणार!

त्या आजोबांनी तडक उत्तर दिलं,''कुठलंही वर्ष कधीच कोणासाठीही वाईट नसतं!काळ काय कोण्या ज्योतिष्याच्या अंकांच्या आज्ञेत आहे काय?
काळावर कोणाचंही आधिपत्य नसतं!तो स्वत: त्याचा अनभिषिक्त सम्राट असतो!ज्योतिषी,अंकशास्त्री भलेही आपल्या अंकाची वजाबाकी-बेरीज,आराखडे काढुन वर्षफल सांगत असेल पण, 'कर्म तर तुमच्या हातात असतं ना!ते तुम्ही करता योग्य केलं का? करता का? ते योग्य केलं तर प्रत्येक वर्ष चांगलच जाणार!त्यामुळे वर्षाला वाईट म्हणण्यात काय अर्थ आहे?
ते तर माझ्यासारखच निरपेक्ष असतं!''
शेवटलं वाक्य ते जरा मिश्कीलतेने हसुन म्हणाले.

पुन्हा पुढे म्हणाले ''न्यु ईअरचं सेलिब्रेशन आटोपल्यावर तुम्ही थोडं आत्मचिंतन करा!मी यावर्षी कोणत्या चुका केल्यात आणि निर्णय घ्या की,या पुन्हा होणार नाहीत!स्टाॅप ब्लेमिंग अदर्स अँन्ड बी रेडी टु टेक रिस्पाॅन्सिबिलिटीज आॅफ युअर ओन अॅक्शन्स!''

आम्हा चालतच होतो.ते आजोबा कुठेही न थांबता चालतच होते.समोर हिमाच्छदित पर्वत शिखरं चंद्राच्या प्रकाशात अस्पष्ट चमकत होती.नक्कीच  हिमालय असावा.खुप सुंदर दृश्य होतं.

 ते पुढे बोलु लागले,''मला तुमच्या पिढीवर पूर्ण विश्वास आहे!पण तुम्ही म्हणता मागचे वर्ष किती सहज निघुन गेले कळलेच नाही!
अरे कसं कळणार?
तुम्ही इतके सहज दिवस वाया घालवता!दिवसा दिवसांनीच वर्ष बनतं.दर वर्षी केलेले संकल्प सहज विसरता!पण काळ कधी थांबतो का!तुम्हाला कळतही नाही!मुठीतुन वाळु जशी अलगद निसटते, तसे दिवस जातात आणि शेवटी उरतात त्या कडु गोड आठवणी!

पण आम्हाला गेल्या वर्षाशी काही देणं घेणं नसतं उत्सुकता असते फक्त पुढील वर्षाच्या स्वागताची!
शेवटी मावळत्या सूर्याला कोण नमस्कार करतं?"

जवळुन एक अरूंद नदी खळखळाट करत वाहत होती.माझ्या डोक्यातही आता विचारांचा जबरदस्त प्रवाह वाहत होता.ते आजोबा नदीकडे बोट दाखवत म्हणाले,''आपणही या नदीसारखं वाहतं असावं!कारण जिथे पाणी साचतं तेथे शेवाळ साचतं!''

त्यांच्या प्रत्येक वाक्याने माझ्या मनात अनेक तरंग उमटत होते.प्रथमच मी एका योग्य दिशेने विचार करत होतो.

चंद्र पश्चिमेकडे कलत होता.एका छोट्या लाकडी पुलावरुन आम्ही नदी ओलांडुन पुढे गेलो होतो.कानावर खळखळाट अजुनही येत होता.बर्फाच्छदीत डोंगरंही आता  जवळ आली होती.

''मी त्या आजोबांना माझ्या दु:खाचं कारण सांगितलं.एका अत्यंत जवळच्या नातेवाईकाचा आणि काही जवळच्या नात्यांचा मृत्यु झालेल्याचं सांगितलं.

तेव्हा त्यांनी खाली गळुन पडलेल्या झाडांच्या पानांवरुन सृष्टीचा ''उत्पत्ती स्थिती आणि लय'' हा सिद्धांत समजाउन सांगितला.प्रत्येक  गोष्ट ही काळाच्या उदरात गडप होणारच! 'क्षणभंगुरत्व' एन्जाॅय करायला सांगितलं.वर्तमान क्षण हेच खरा जीवन असत सांगितलं.

पहाट आता संपत आली होती.तेजस्वी #शुक्रतारा पश्चिम क्षितीजाकडे कलला होता.

बऱ्याच वेळापासुन आम्ही एक शब्दही न बोलता चालत होतो.नदीचा खळखळाटहीआता ऐकु येत नव्हता.मी पुर्ण अंतर्मुख झालो होतो.डोक्यातील विचारांचे थैमान आता शांत होत होते.
त्या आजोबांच्या सोबतच्या प्रवासाच्या सुरवातीपासुन तर आतापर्यंत माझ्यात आमुलाग्र बदल होत होता.तारूण्याचा अवास्तवी अभिमान आणि इतर काही न्यूनगंड, पूर्वग्रह केव्हाच गळुन पडले होते.मला हे सगळं नवीन भासत होतं. त्या आजोबांबद्दल मला आता विलक्षण प्रेम वाटत होते.असं वाटत होतं हा प्रवास कधी संपुच नये.

समोर पुर्वेकडे एक विशाल दरी पसरली होती.
ते आजोबा अचानक त्या दिशेने चालु लागले.
माझी मुद्रा प्रश्नार्थक झाली.ते अगदी कड्याच्या टोकाजवळ उभे राहुन माझ्याकडे वळले व म्हणाले,
''बेटा आपला प्रवास येथपर्यंतच होता!तु आता परत जा!''

मला त्यांच्या विरहाची कल्पनाही सोसवत नव्हती आणि माझ्या भावनांचा बांध फुटला.अश्रुंचा प्रवाह पापण्यांचा अडसर झुगारत गालांवर ओघळला.

आणि मी माझ्या मनातील 'तो' प्रश्न त्यांना विचारला.

''आजोबा तुम्ही कोण आहात?''

त्यांनी मंद स्मित केलं व बोलले,''बेटा,तु अजुन मला ओळखलं नाहीस?
अरे मी आहे वर्ष 2016!आणि मला तर गेलच पाहिजे!
काही क्षणात सुर्योदय होणार आहे!नवीन वर्ष जन्माला येणार आहे!

हे सगळं अटळ असतानाही मी त्यांना ''न जाण्याबद्दल'' विनवु लागलो तेव्हा ते म्हणाले,''अरे मला विसरा..मी जातो आहे..पण मी तेव्हाही होतो आणि नंतरही राहील..!फक्त माझे  रूप आणि नाव बदलत राहतील..कारण मी तर अनादी..अनंत आहे..!
आणि बेटा,तुमच्या नवीन वर्षाच्या जल्लोषात मला आता जागा कुठे आहे? मी गेल्यावर माझी साधी आठवणही राहणार नाही.
म्हटलं ना सगळा काळाचा महिमा!

पण बेटा मला विसरा पण मी काय शिकवले ते विसरू नका..!

जा तु आता..तुम्हा सगळ्यांच्या सर्व कटु आठवणी मी घेउन जातोय!''

माझ्या डोळ्यातुन सतत अश्रु वाहत होते.मी त्यांना शेवटची एक विनंती केली त्यांना नमस्कार करू देण्याची!

त्यांच्या चरणांवर मी डोकं ठेवलं.त्यांनी माझ्या डोक्यावर वात्सल्याचा हात ठेवला.
मला आशिर्वाद मिळाला होता...प्रत्यक्ष काळाचा..!

क्षणभर सारं स्तब्ध वाटलं..

मी डोळे उघडले...
समोर कोणीच नव्हतं.
फक्त उरली होती जाणीव त्यांच्या स्पर्शाची!

मी पुन्हा गहिवरलो.
मला एकदम त्यांचे शब्द आठवले.
''आली जरी कष्ट दशा अपार
न टाकिसी धैर्य तथापि थोर
केला जरी पोत बळेच खाली
ज्वाळा तरी त्या वरती उफाळे''

 समोर दरीच्या मागे पर्वतापलिकडे केशरी लाल सूर्यबिंब उगवत होते...

माझ्या अश्रुंनी भरलेल्या डोळ्यातुन सोनेरी किरणे चमकत होती.

2017 चा सुर्योदय झाला होता....

_Abhijeet Panse


फ से फॅन्टम क से काँडम

"फ से फॅण्टम क से काँडम "

06 च्या सुरवातीला JNU आणि दिल्ली युनिव्हर्सिटी कॅम्पस मध्य दिल्ली एड्स कन्ट्रोल कमिटीने "काँडम वेंडींग मशीन" लावल्याने वर्षभर बराच गदारोळ झाला होता. कोणी त्यास पाठिंबा दिला कोणी चुकीचा संदेश जात असल्यचे सांगुन त्याला विरोध करत DACकमिशनर ला  ते कसं संस्कृती आणि वारसा परंपरा दृष्टीने चुकीचे हे सांगणारे पत्र लिहिले.

शोभा डे च्या एका पुस्तकात त्या त्यांच्या एका मैत्रिणीबद्दल लिहितात की त्यांची मैत्रीण म्हणते "मी तर माझ्य मुलाला स्पष्ट सांगते की घरातून बाहेर पडताना खिश्यात काँडमस ठेवत जा!हॅव सेफ सेक्स ऑलवेज!ही मुलं कुठे कुठे फिरतात कधी गरज पडेल सांगता येत नाही.नसती रिस्क नको! "
त्यांचा मुलगा टीन एजर असतो.

दहा एक वर्षांपूर्वी समुद्र किनाऱ्यावरील कंडोम ची जाहिरात गाजली होती "पता नही कब कहा जरूरत पड जाये!" त्या ऍड वरही वादंग माजल्याने तीला बॅन करण्यात आले होते.

07 पासून काही वर्षे कंडोम वरून काही फेमस जाहिरातींद्वारे भरपूर जनजागृती करण्यात आली.मजूर वर्ग ते अशिक्षित ते नियमित रेड लाईट एरियात जाणारे  पुरुष, सेक्स वर्कर्स यांना "कंडोम मस्ट" चं महत्व पटवून देण्यात आले.देण्यात येते.

पण आजही कोणत्याही शासकीय रुग्णालयात HIV + पेशन्टसच्या रांगाच रांगा असतात.
HIV ची लागण होण्यास  HIV + blood transfusion, बाधित व्यक्तीला टोचलेलं निडल वापर ही करणे ही असतात पण त्याचं प्रमाण फार नगण्य असतं. महत्वाचं कारण "असुरक्षित संबंध" हेच आहे.

दहा वर्षांपूर्वी शोभा डेंच्या मैत्रिणीचे शब्द आगाऊ वाटले होते.
पण आज परिस्थिती ,मानसिकता बदलेली आहे.

पूर्वी ब्लॅक आणि व्हाईट असे स्पष्ट वैचारिक, सैद्धांतिक रंग होते. आता ते एकमेकात मिसळून त्याचा 'ग्रे' रंग झाल आहे.

मल्टी पार्टनर्स सोबत शय्यासोबत हे चांगलं की वाईट यांतील पूर्वीची रेषा हि ब्लर, धूसर झाली आहे.
यात योग्य अयोग्य हा मुद्दा नाही.
मुळात कुठलीच गोष्ट ही पूर्णपणे फक्त चांगली किंवा फक्त वाईट  असं hardcore rigid equation नसतं.प्रत्येक गोष्ट ही व्यक्ती,परिस्थिती ,काळ सापेक्ष असते. म्हणून कुठलाच गोष्टींचा ,मताचा अट्टाहास नको.
पण फ्री सेक्स, फ्रेंड्स with बेनिफिट्स ,casual sex किंवा Heat of the moment मुळे एखादी चूक आजन्म महागात पडू शकते.

अजूनही काँडमकडे प्रमुख्याने  "गर्भ निरोधक" म्हणूनच पाहिले जाते.त्यामुळ काँडम न वापरता #क्लायमॅक्स पर्यंत काळजी घेण्याचाही एक मार्ग अवलम्बला जातो.

नुकत्याच झालेल्या ओळखीतून सेक्सशुअल रिलेशन्स तयार होतात तेव्हा काही वेळा त्या करस्पॉंडिंग व्यक्तीचा इतिहास माहिती नसतो.किंवा ती व्यक्ती बाधित असेल अशी जराही कल्पना नसते आणि फक्त गर्भधारणा नको हाच विचार ठेऊन म्हणून नाजूक वेळी काँडोम शिवाय संबंध केले जातात.आणि "एक गळती ..गलती की किंमत तुम क्या जानो.. "म्हणण्याची दोघांवरही येऊ शकते.

कित्येक शिक्षित ,अशिक्षीत पुरुषांमध्ये कॉन्डोम वापरल्याने "एन्जॉयमेन्ट' कमी मिळतं असा समज असतो.त्यामुळे ते टाळतात आणि STD (sexually transmitted diseases) चे बळी पडतात.

कित्येक शिक्षित लोकांचाही हा गैरसमज आहे की फक्त वीर्या मधेच HIV विषाणू असतात.पण संभोगापूर्वी होणारं स्त्री पुरुष दोघांच्याही सेक्रेशन मधेही HIV विषाणू असतात.

अगदी धक्कादायक गोष्ट म्हणजे काही मुलींनाही "काँडम फोबिया" असतो.त्या सुद्धा निरोधाला विरोध करतात.

या सर्व अक्षम्य हलगर्जीपणामुळे #एड्स ची लागण होऊ शकते.

काळ वेगाने बदलतोय मानसिकता,विचार बद्दलताहेत.Gadgets and social media,internet , technology do take their tolls on mentality n thought process.त्यामुळे काय वाईट काय योग्य हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे.पण बदलत्या काळानुसार काळजी म्हणून काँडम सहज  accessible असणं गरजेचं आहेच.आणि ते आहेत सुद्धा.फक्त वापरायला हवं.
त्यामुळे दहा वर्षांपूर्वी ज्या कंडोम वेण्डिंग मशीन मुळे गदारोळ माजला होता तो आता कदाचित होणार नाही.

गुरुचरित्र ग्रंथात चार युगाची एक  रुपकात्मक कथा संगीतली आहे.ज्यात सुरवातीचे तीन युग आपापल्या हातात सात्विक वस्तू घेऊन प्रकट होतात.शेवटी कलियुग हातात 'शिस्न' ,लिंग धरून प्रगट होतं. आणि याच्या जोरावर संपूर्ण जगाला मी नाचवेन म्हणतं. लैंगिक रोग,एड्सचे रुग्ण ,लैंगिक विकृती बघता ती रूपकात्मक कथा खरी वाटू लागते.त्यामुळे अशा वेळी आज precaution is the best measure" हेच खरं आहे.

उद्या चौकात वा कॉलेजमध्ये काँडम वेण्डिंग मशीन लावल्या गेलं आणि मिसरुड ही ना फुटलेला पोरगा त्यातून कंडोम घेतानाचे दृश्य दिसल्यास त्याला संस्कार आणि संयमाची अधोगती म्हणायचं की प्रॅक्टिकली घेतलेली काळजी हे ज्याचं त्यानी ठरवायचं.
कारण It is bad enough that people r dying of AIDS.but no one should die of ignorance.-Elizabeth Tailor

- Abhijeet Panse


Sunday 11 June 2017

बरं झालं पुलं तुम्ही गेलात!

 *बरं झालं पुलं तुम्ही लवकर गेलात *

 पु.लं.तुम्ही तुमच्या साहित्यात देवांपासुन संतांपर्यंत..नेत्यांपासुन शिवाजी महाराजांपर्यंत सर्वांवर #कोपरखळ्या,निखळ विनोद केलेत.
पण तुम्ही आज असे काही विनोद केले असते तर आम्ही ते सहन केले नसते!कारण आता आमच्या चित्तवृत्ती इतक्या अस्थिर,उतावीळ झाल्या आहेत..आम्ही आमच्या आर्दशांबद्दल,जातींबद्दल इतके पजेसिव्ह झालो आहोत की आम्ही तुमच्या नर्म विनोदाला न समजता आमच्या धार्मीक.. जातीय भावना दुखावल्यामुळे आम्ही तुमचे पुतळे जाळले असते.

सोशियल साइट्सवर ''पु.ल.देशपांडे हेटर्स'' पेजेस तयार केले असते. बरं झालं तुम्ही आधीच गेलात..

 तुम्हाला आज संगीत नाटकांवर प्रेम करणारे रावसाहेब भेटले नसते की इतिहास जगणारे हरीतात्या, चप्पल झिजेस्तोवर शिक्षण सेवा देणारे चितळे मास्तर भेटले नसतेच.
कारण ती जमात आता कालबाह्य; नव्हे नामशेष झाली आहेत.

आणि समजा आजच्या काळातल्या नारायणावर वा अंतु बर्व्यावर तुम्ही लिहीलं असतं तर तो म्हणला असता ''अरे आमच्यावर विनोद काय करतोस!!पहिले आमची रॉयल्टी दे''!!

त्यामुळे बरंच झालं तुम्ही फार आधीच जन्मलात!आणि मुख्य म्हणजे आज तुमचे विनोद..शब्दातील मर्म..जागा..ग्राफ्स समजणारी पिढी तयार होतेच कुठेय!

आम्हाला काॅमेडी कम चित्रपट प्रमोशन कार्यक्रमांची..लाउड विनोदांची आणि दर तीस सेकंदांनी कानठळ्या बसवणाऱ्या प्री रेकाॅर्डेड लाफ्टर आणि ताळ्या ऐकायचीच इतकी सवय झालीए की तुमच्या वाक्यांतील शब्दांचे अस्तर..खोली..आमच्यापर्यंत पोहचलीच नसती.त्यामुळे हसता हसता डोळ्यांच्या कडा ओलावणारे तुमचे शब्द..वाक्यातील अर्थ..विनोद आम्हाला आज कळणार नव्हताच.

आज तुम्ही असते तर कुठल्या टिव्ही चॅनलवर तुम्हाला; कृत्रीम हिडीस हसणाऱ्या एखाद्या बाईसोबत किंवा खोटं हसणाऱ्या, खुर्चीवरील बुजगावण्या सोबत तुम्हालाही जज बनवुन बसवलं असतं.तेव्हा उथळ कर्कश विनोद पाहुन ऐकुन घुसमट तुम्ही सहन करू शकला नसता..आणि आम्हिही तुम्हाला तसं पाहु शकलो नसतो.म्हणुन बरच झालं तुम्ही गेलात!

आज तुमच्या कथाकथनाला आम्ही आलो असतो तर आम्ही पहिले सोशियल साइट्सवर ''लिसनिंग टू पु.ल.देशपांडे;लाइव्ह.'' अपडेट्स टाकुन;
तुम्ही हरी तात्या,पेस्टन काका सांगत असताना आम्ही सर्व आमच्या माना खाली घालुन दर दोन मिनीटांनी वा आमचे मेसेजेस..पोस्ट्स..चेक राहीलो असतो...
आणि तुमच्यासोबत #सेल्फीज घेऊन सोशिअल मीडियावर टाकून उथळ प्रेम दाखवत राहिलो असतो.

मोबाइल चं कर्णपिशाच्च आमच्या मानगुटीवर बसण्यापुर्वीच..आणि त्या कर्णपिशाच्चाची फेसबुक,वाॅट्स अप आणि इतर पिलावळी जन्मण्यापुर्वीच तुम्ही गेलात तेच बरं झालं.

 पण शेवटी एकच म्हणतो देवाने आमचे जीवन समृद्ध करण्याकरिता तुम्ही व तुमचं साहित्य;दिलेल्या या मोलाच्या देणग्या!न मागता त्याने दिल्या पण तो त्या कधीही परत मात्र घेउ शकणार नाही.

-Abhijeet Panse


Saturday 10 June 2017

बाहुबली , ममाज बॉय की स्ट्रॉंग मॅन


बाहुबली की ममाज बॉय! ?

बाहुबलीमधील बाहुबली चं पात्र आवडलं कारण एक परीपूर्ण पुरुष कसा असावा हे त्याद्वारे दाखवलं आहे. तो लहानपणी पूर्ण विद्या ग्रहण करतो.मोठेपणी मुलींशी फ्लर्ट सुद्धा करतो (पहिला भाग).
मामाची टांग खेचतो. मैत्रीपूर्ण नातं निभावतो.
लहानपणीपासून, रॉयल घराण्यातील असुनही आपल्याहून लहान हुद्द्यावरील लोकांशी समानतेने वागतो त्यांच्यासोबत त्यांच्या थाळीत जेवतोही. पण याहूनही सगळ्यात जास्त गोष्ट मला आवडली ती म्हणजे
तो आईचा , शिवगामीचा 'आज्ञाधारक' असतो .आईवर प्रेम, रक्षण  करतो. पण तो 'ममाजबॉय' नसतो.

जेव्हा वेळ येते योग्य आणि अयोग्य यात निवडण्याची तेव्हा तो त्याच्यासाठी ईश्वराच्याही प्रथम असलेली आई, शिवगामीलाही तो , ती चूक करते आहे हे स्पष्ट शब्दात सांगतो. आणि बायकोच्या, स्त्री सन्मानासाठी शिवगामीला, राज्याला दूर सारतो.
 हा फरक असतो आज्ञाधारक मुलगा आणि ममाज बॉय मधला.

 देवसेना अत्यन्त तेजस्वी , स्वाभिमानी , स्ट्रॉंग स्त्री दाखवली आहे. आणि अश्या स्त्री ला एक परिपूर्ण पुरुषच न्याय देऊ शकतो.

तिचा विनयभंग करु पाहणाऱ्याचा ती हात छाटते आणि हे कळल्यावर बाहुबली त्याचं शीर धडावेगळं करतो. त्यावेळी देवसेनेच्या चेहऱ्यावरील कडवं हास्य बघण्यासारखं आहे.

युद्धच्या वेळी दोघे मिळून ते लढतात.

देवसेनेच्या प्रेमात बाहूबली पडतो तेही सर्वप्रथम तिला दरोडेखोरांशी 'युद्ध' करताना बघूनच.
एक खरा पुरुषच 'अश्या' खमक्या स्त्रीच्या प्रेमात पडू शकतो.

इतर मात्र अश्या तेजस्वी स्त्रीपुढे स्वतःला कमी असुरक्षित, कमी समजून पोकळ अहंकार दुखावलेले पोकळ पुरुष  अश्या स्ट्रॉंग , तेजस्वी स्त्रीला खाली दाबण्याचा, सप्रेस करण्याचा प्रयत्न करतील.

म्हणून माझा सगळ्यात आवडतं दृश्य आहे जेव्हा देवसेना बाहुबलीच्या खांद्यावरुन नावेत जाते. कारण एक मनाने , विचाराने स्ट्रॉंग 'पुरुष' च आपल्या प्रेयसी, स्त्री चे tantrums , (नखरे हा शब्द जरा नकारात्मक वाटतो.) , सकारात्मक हट्ट पूर्ण करतो. तिच्या (सकारात्मक) अहंकारालाही पूर्ण न्याय देऊ शकतो. इथे ना अंध पुरुष'वादी' ना उथळ स्त्री'वादी' विचारशैली असते.

एक मजबूत पुरुषच एका स्ट्रॉंग स्त्रीला पूर्ण न्याय देऊ शकतो. इतर फक्त अहंकार दुखावून कमकुवत मनाचे शरीरानेच असलेले पुरुष अश्या तेजस्वी, परिपूर्ण, खमक्या, स्वाभिमानी स्त्रीला आपल्या मागे रोखतात. तिची प्रगती रोखतात.

- अभिजित पानसे


Friday 9 June 2017

ती आहे राणी, ती आहे कंगना रानोत

तिचा पातळ, किनरा आवाज कधीच आवडला नाही.कित्येक वर्षे तिचा सायकोगिरी वाटणारा अभिनय कधीच आवडला नाही. 'आऊटसायडर' असल्याने इंडस्ट्रीत टिकण्यासाठी तिने आदित्य पांचोली ते अजय देवगण अनेकांची तिने सर्व प्रकारची मदत घेतली आणि बदल्यात तडजोड ही केली.पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम.

 मराठीतील एक श्रेष्ठ साहित्यकार ; स्वतःला "सुभाष घई" समजत चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची लहर आल्यामुळे , तिला साइन केल्यावर तिने त्यांच्यासोबत काम करून जे काही अतिसुमार अतिटुकार हास्यस्पद कलाकृती तयार केली तेव्हा तिची दया वाटली होती.आणि ऐंशीच्या दशकातील चित्रपटांमध्येच अडकलेल्या अपडेटेड नसलेल्या पण महान साहित्यकार असलेल्या त्या आदरणीय कादंबरीकार पण मूर्ख दिग्दर्शकावर हसू आले होते.

आता ती संपल्यात जमा झाली असे वाटले.तिने आता दक्षिणेकडे प्रस्थान करावे तेथील टुकार चित्रटांमध्ये बेबी डॉलच्या भूमिका कराव्यात असेही सल्ले तिला मिळू लागले.

पण ती कमकुवत नव्हती. तिच्यात अभिनयाचे गुण, आवाजात बेस काहीही नसताना ती प्रामाणिकपणे शिकत राहिली स्वतःवर  काम करत राहिली.आणि तिने तिच्या  नशिबाला राजयोग..राणीयोग लिहावयास भाग पाडले.तिला योग्य दिशा दर्शक ..दिगदर्शक लाभला.आणि 2014 मध्ये ती राणी.. 'क्वीन' झाली. राष्ट्रीय पुरस्कार मिळवला! योग्य दिगदर्शक मिळाल्यावर हे पहाडी सौंदर्य अभिनय ही ताकदीचा करू शकते हे क्वीन ,तनु वेड्स मनू नंतर आणि आता विशाल भारद्वाज च्या रंगून मुळे पुन्हा सिद्ध झाले.

खानदान कि इज्जत वगैरे असलेल्या पारंपरिक घरातून अभिनयासाठी विरोध झाल्यावर घरातून निघून स्वतःच्या भरवश्यावर आज तीने स्वतःच्या टर्म्सवर चित्रपट सृष्टीत जम बसवलाय.
करन जोहर सारख्या , बाहेरून येणाऱ्या लोकांचा तिरस्कार करणाऱ्या फक्त स्टार किड्स चा मेंटर असलेल्या "बिग फिश" विरुद्ध ती उभी राहते.
अवॉर्डस देण्यात पक्षपात होतो कळल्यावर तिने आमिर खान प्रमाणे अवॉर्डस फंक्शन वर बहिष्कार घातला आहे.  म्हणून ती आदरणीय वाटते. ह्रितिक रोशन पासून शेखर सुमन आणि त्याचं बाळ सर्वांविरुद्ध ती उभी राहिली.

काईट्स मध्ये बार्बरा मोरीवर जास्तीत जास्त लाईमलाईट ठेवण्यासाठी तिचं जास्तीत जास्त काम कट करून चित्रपट प्रदर्शित केल्यावर स्वतःचं करिअर डळमळीत असताना ती उघडपणे तेव्हा बोलली होती की ती पुन्हा अनुराग बासू सोबत काम करणार नाही.

सलमान ,शाहरुख, अक्षय कुमार या मोठ्या भिंतींचा सहारा घेत अनेक वेली वाढतात..बऱ्याचश्या पुढे खुंटतात..हे बीज मात्र इतर महा वृक्षांचा सहारा न घेता स्वतः बीजपासून मोठा वृक्ष होत गेलं.म्हणून आज ती सलमान खान समोरही स्वतःच्या अटी ठेवते, तेव्हाच काम करिन म्हणते.

बहिणीवर ऍसिड अटॅक झाल्यावर तिची प्लास्टिक सर्जरपासून सर्व मदत करत बहिणीच्या पाठीशी उभी राहिली.

ती चांगली अभिनेत्री आहे का, चांगली व्यक्ती आहे का हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न , दृष्टिकोन आहे.पण ती एक फायटर आहे हे नक्की. She is tough nut to cut!

आज ती एक यशस्वी अभिनेत्री आहे.
Its KanganaRanauts birthday!!

- Abhijeet Panse


Thursday 8 June 2017

रेल्वेतील 'ते'.

स्टेशनावर थांबलेली रेल्वे पुन्हा धावू लागते. गाडी तिचा धावण्याचा लयबद्ध ताल पकडत असते, त्यात प्रवाश्यांचा गोंगाट, अधून मधून जोड रूळ बदलवताना चा होणारा वेगळा आवाज आणि कंपन जाणवत असतं तेवढ्यात त्या गोंगाटातही विशिष्ट प्रकारच्या 'टाळ्यांचा' आवाज कानी पडतो.

मनावर थोडं दडपण आणणारा तो टाळयांचा आवाज येत असतानाच 'ते' दोन चार जणं टोळीत समोर अवतीर्ण होतात.
चेहऱ्यावर भडक मेक अपचे थर, ओंगळवाणी हालचाली करत टाळी वाजवत जवळ येत हात समोर करतात.

 लोक त्यांची थट्टा, हेटाळणी करतात, वाद घालतात.. शिव्या देतात..अश्लील बोलतात. 'ते' ही क्वचित अश्लील हालचाली करतात.

 'ते'....
शाळेत व्याकरणात शिकवलं होतं. 'तो' हे पुल्लिंगी, 'ती' स्त्रीलिंगी आणि 'ते' नपुंसकलिंगी.

मी रेल्वेतुन जेव्हा प्रवास करतो.आणि डब्यात अचानक 'ते' जेव्हा येतात; पैसे मागतात.. तेव्हा त्यांच्याशी एका शब्दानेही  वाद न घालता,त्यांना नाही नं म्हणता मी फक्त त्यांना एक कर्टियस स्माईल देत शांतपणे दहाची नोट वा पाच चं नाणं त्यांच्या हाती ठेवतो.
'ते' डोक्यावर हात ठेवत काहीतरी पॉझिटिव्ह वगैरे बोलतात मी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतो कारण माझ्यासाठी ते महत्वाचं नसतंच.

आजूबाजूचे लोक काही गरज नव्हती देण्याची..ते कसे वाईट असतात वगैरे सांगतात. मी चेहरा आणि मानेने फक्त ''चालतं काही हरकत नाही..''
 असं gesture करत त्यांच्याकडेही दुर्लक्ष करतो.आणि पुन्हा पुस्तकात डोकं घालतो.किंवा इअर प्लग्स पुन्हा कानात लावतो.

कारण त्या किन्नरांच्या हातावर दोन नाणी ठेवण्यामागे माझं एकच स्पष्ट #कारण असतं. आजवर ते मी माझ्या मित्र मैत्रिणींना कित्येकवेळा सांगितलेलं आहे.
तोच विचार "तेच कारण" माझ्या मनात तेव्हा पुन्हा घोळत असतं.

 दोन दिवसापूर्वी कॅबिनेटने 'ट्रान्सजेंडर' लोकांचे हक्क सुरक्षित आणि भरीव करण्याचं बिल पास केल्याचं वाचलं. ते वाचून आनंद वाटला.

 #किन्नरांच्या आयुष्याबद्दल अडचणींबद्दल त्यांच्या पिळवणुकीबद्दल अनेक पिक्चर्समधून,पुस्तकातून वाचत असतो.त्यामुळे त्यांच्या साठी वाईटही वाटतं.

या किन्नरांची एक दुसरी नकारात्मक बाजुही असते.
ते लोकांना त्रासही देतात.समुद्र किनाऱ्यावर बसलेल्या कपल्सना पीडतात.शिवाय कधी हिंसकही होतात.

पण या दोन्ही बाजूंच्या पलीकडे माझा एकच विचार असतो आणि त्यामुळेच त्यांच्या हातावर मी नाणं ठेवतो.
 ती म्हणजे ईश्वराप्रति निसर्गप्रति फक्त 'कृतज्ञाता '!!
त्याने मला एक" पूर्ण जेंडर " प्रदान केल्याबद्दल!!

कारण मी #पुरुष म्हणून जन्मलो यात माझा स्वतःचा काही #पुरुषार्थ नाही.I was only at the receiving end.

त्यामुळे मी मित्र मैत्रिणींना नेहमी म्हणतो की किन्नरांची थट्टा करण्यापूर्वी त्यांच्याशी वाद घालण्यापूर्वी फक्त एकच विचार करा आपण त्यांच्या जागी असतो तर??
ते तसे आहेत यात त्यांची काही चुकी नाही.आपण
पूर्ण पुरुष/ स्त्री आहोत यात आपला स्वतःचा काहीही पुरुषार्थ नाही!!
त्यामुळे त्यांना पैसे द्या अथवा नक देऊ पण यापुढे कधीही कुठेही किन्नर दिसला की फक्त ईश्वराला निसर्गाला मनापासून 'धन्यवाद' म्हणा स्वतःला कोणतंही एक पण स्पष्ट आणि पूर्ण लिंगत्व प्रदान केलयाबद्दल!!कारण at the end we all r only at the receiving end.

धावत्या ट्रेनमध्ये गाडीच्या आवाजात लोकांच्या गोंगाटातही मला त्या #टाळ्यांचा आवाज ऐकू आला कारण तो आरती वा भजनातील टाळ्यांपासून वेगळा होता. मी सरसावून बसलो.
'ते' येताच भसाड्या आवाजात बोलत हात समोर करताच मी आधीच काढून ठेवलेली दहाची नोट किंवा पाच चं नाणं एक courteous smile  देत त्यांचा हातावर ठेवली.ते धन्यवाद रूपात डोक्यावर हात ठेऊन निघुन गेलेत. पण खरं तर मुळात मीच तेव्हा हृदयापासून ईश्वराला फक्त धन्यवाद म्हणत होतो..म्हणत असतो.

*Side Lower Seat*

-अभिजित दिलीप पानसे



वट पौर्णिमा पेशल

सतत वटवट करणाऱ्या..करणारे,  'सुता'वरून स्वर्ग गाठणाऱ्या..गाठणारे
वडाची साल पिंपळाला गुंडाळणारे ..गुंडाळणाऱ्या..
बाहेर किती वट असली तरी घरात 'वटणी' वर आलेले ..
नवऱ्याचा किती ही वीट आला तरी त्याला वीट फेकून न मारणाऱ्या..
बाहेरील दगडापेक्षा घरची वीट मऊ म्हणून एकमेकांसोबत अडजस्टमेंट करणारे ..

शेवटी कितीही वटवट केली तरी काही अडचण आल्यास एकमेकांचा #आधारवड होणाऱ्यांसाठी
वट पौर्णिमा. (च्या शुभेच्छा??)
जाऊ दे सर्वपित्री अवसेच्या शुभेच्छा दिल्या जातात तिथे पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्याच तर काय बिघडलं.
एकमेकांप्रती इच्छा शुभ असल्या की झालं.

पुन्हा शेवटी

तो- "अगं माझी ती hole असलेली बनियन कुठे ठेवली आहे? दिसत नाहीये!!"

ती- "थांब रे पहिले holy banyan tree ला थ्रेड गुंडाळून येते. मग शोधुन देते !!"

-Abhijeet Panse

Tuesday 6 June 2017

छोटी छोटी सी बात

छोटी छोटी सी बात"

जून 2017, लोकप्रभा



नातं यशस्वी करायला खूप मोठमोठ्या गोष्टी कराव्या लागत नाहीत, आयुष्यात मोठमोठ्या गोष्टींमुळे फरक पडत नाही तर जगणं आनंदी हलकं फुलकं करायला लागतात त्या छोट्या छोट्या गोष्टी..नथिंग रिअली मॅटर्स बट लिटल थिंग्स...याचं अगदी सोप्या प्रकारात चित्रीकरण म्हणजे वेब सीरिज लिटल थिंग्स!.

 केमिस्ट्री' हा शब्द चित्रपटांमधील हिरो हिरोईन यांच्याविषयी नेहमी लिहिला, वाचला ,ऐकला जातो.या चित्रपटात यांची केमिस्ट्री चांगकी जमली त्या मुविमध्ये हिरो आणि हिरोईन मध्ये पडद्यावर केमिस्ट्रीच जुळली नाही वगैरे.. केमिस्ट्री म्हणजे दोन प्रमुख पात्रांचं एक्मेकांसोबत असलेलं ट्युनिंग, एकमेकांना दाद..कॉम्प्लिमेंट करणे..आणि ती पडद्यावर बघताना प्रेक्षकांना ती भावून त्यांच्याकडून दाद येणे. भारतीय हिंदी  चित्रपटातील इतिहासातील पाहिल्या सिनेमापासून ते आजच्या सिनेमापर्यंत ,आजवरच्या सर्व हिंदी , आणि प्रादेशिक सर्व टीव्ही मालिकांमध्ये आजवरची सर्वोत्तम , अप्रतिम, जबरदस्त, लाजवाब केमिस्ट्री बघायची असेल तर वेब सीरिज "लिटल थिंग्स" बघावी.

आजवर बघितलेल्या हजारो चित्रपटांमध्ये इतकी अप्रतिम केमिस्ट्री..ट्युनिंग बघितली नाही.

 एक मराठी मुलगी काव्या कुलकर्णी आणि दिल्लीचा मुलगा ध्रुव सेहगल हे युगुल सोबत राहत असतात. आणि रोजच्या हलक्या फुलक्या क्षणांची , वाद, राग, गंमती, प्रेम, उत्स्फूर्तता हे क्षण अनुभवत असतात.

आणि हो ते एकमेकांच्या प्रेमात असतात. एक परफेक्ट नाही पण अत्यन्त कंप्याटिबल कपल.

जगताना कुठेही कृत्रिमता नाही. सगळं अगदी सहज..

मुळात या वेब सीरिजला साचेबद्ध कथावस्तूच नाही..फक्त दृश्यांची ,जगण्याची , नात्यातील मर्मबंध अनुभण्याची ही दृश्य माला आहे. फक्त बघत राहावं आणि अनुभवत राहावी अशी. तरुण मनाचा कोणत्याही वयाचा  प्रेक्षक या दृष्यमालेशी सांगड घालेल.

प्रत्येक भाग मनाला शांत आनंद देणारा प्रफुल्लित करणारा आहे.

काव्या आणि ध्रुव हे प्रेक्षकांना आपले वाटू लागतात.

कुठलीही गोष्टी थोपण्याचा वा पुरस्कार करण्याचा अट्टाहास यात नाही. कारण नातं तयार होतंच मुळात छोट्या छोट्या गोष्टींपासून!

 नवरा,  बॉय फ्रेंड, पार्टनर कसा असावा , नातं कसं असावं..छोट्या छोट्या गोष्टी नातं किती टवटवीत ठेवतात या सिरीज मधून कळेल.

दोघे लिव्ह इन मध्ये राहताय की लग्न केलंय ते स्पष्ट नाही. आणि त्याची गरज आहेच कुठे? लग्न वा  प्रेमाचं नातं या टॅग खाली अडकण्यापेक्षा दोघांमध्ये ' कंप्याटिबिलिटी' असणं महत्वाचं असतं.

यातील काव्या प्रेमात पाडतेच पण या सीरिजचा खरा किंग आहे तो ध्रुव!

बॉय फ्रेंड, पार्टनर कसा असावा तो ध्रुव सारखा. तो तिला समजून घेतो पण उगाच जड, अति परिपक्व, बोअर नाही. मुळात दोघेही अल्लड आणि परिपक्व आहेत. तो तिच्या सर्व आधीच्या प्रेम प्रकरणावर तिच्याशी गंमतीने बोलतो..पूर्णतः कूल मुलगा आहे. पण कधी तो ही चिडतो. कुठेच कृतीमता नाही. जडता नाही. त्याची प्रत्येक अन प्रत्येक ऍक्शन, देहबोली ही अगदी कूल आहे. मोकळ्या मनाचा आहे. गणितात पीएचडी करतोय. आणि त्याच भाषेत तो तिला बरेचदा व्यावहारिक बौद्धिक देत असतो जे बिलकुलही समजायला ऐकायला जड नसतं.

मिथिला पालकर आता सगळयांनाच माहिती आहे. उत्स्फूर्तता हा तिच्या अभिनयातील स्पष्ट गुण आहे. आवाजावरील नियंत्रण, तिच्या अभिनयात आधुनिकता आहे. सुसंगत शब्दफेक, अत्यन्त भावदर्शी चेहरा या बळावर तिने ही वेब सीरिज आणि काव्या  जिवंत केलीये.

ध्रुव सेहगल यानेच या सिरीजचं लेखन केलय. या दोघांचे व्हिडीओज यापूर्वीच लोकप्रिय झाले आहेत.

"लिटल थिंग्स " या इंग्लिश वेब सिरीजचे पाच भाग आहेत ते ही अगदी पंधरा सोळा मिनिटांचेच. प्रत्येक भाग हा डोळ्यांना , मनाला ट्रीट आहे. प्रत्येक भाग संपताना चेहऱ्यावर एक स्मित उमटलं असतं , मनात प्रसन्नदायी आनंद उमटतो. सगळ्यात छान ट्रीट म्हणजे याचं टायटल सॉंग. एपीसोड संपताना ते कानावर पडत असतं.एक वेगळाच अप्रतिम आनंद मिळतो.

यातील एका भागात ,काव्याला तिच्या आधीच्या एका बॉय फ्रेंड चं लग्न ठरलंय हे कळल्यावर ती अस्वस्थ होते. तेव्हा ध्रुव तिला #गणिताच्या भाषेत ज्या प्रकारे समजावतो. तो संपूर्ण भाग , दृश्य, संवाद अगदी लाजवाब आहेत! संपूर्ण सिरीजमधला सर्वोत्तम हलकाफुलका भाग ! त्यात त्याची हलकी फुलकी बॉडी लँग्वेज, सहज बोलणं..आणि तिचा  मूड चांगला करणं..
कधी तो ही नाराज होतो तेव्हा ती त्याला हसवते. त्याचा मूड चांगला करते. खाणं आणि गेम ऑफ थ्रोन्स हा त्याचा वीक पॉईंट असतो.

कधी दोघांचाही दिवस वाईट जातो तेव्हा दोघेही एकमेकांना चिअर अप करतात. बरेचदा यात ध्रुव पहिले पाऊल उचलतो.

शेवटचा भाग हा अगदी अप्रतिम लाजवाब, जबरदस्त, मनाला स्पर्श करणारा आहे. The Bestesttt! शहारबाहेर तळ्याकाठी
दोघांचा संवाद ..त्यांची केमिस्ट्री! वाह!

इतकं अप्रतिम, हलकं फुलकं आजच्या भाषेत लिहून ते हृदयस्पर्शी करणं यासाठी ध्रुव सेहगलला हॅट्स ऑफ!

प्रत्येक एपिसोड संपताना आपल्या चेहऱ्यावर एक हलकं फुलकं प्रसन्न स्मित असेतं..आणि त्यावेळी बकग्राऊंडला टायटल सॉंग सुरू असत. ते तर अप्रतिम!!! क्लास!!!

प्रेमात पडणाऱ्या इच्छुकानी , प्रेमात पडलेल्यानी, नात्यात वाद होत असलेल्यांनी सगळ्यांनी ही सीरिज बघवीच! प्रेमाचे , नात्याचे नवे परिमाण गावसतील.

विशेषतः मुलांनी ही सिरीज नक्की बघावी. खुले मोकळे लवचिक विचार , हलकेफुलकेपणा महत्वाचा हे महत्त्वच कळेल.अनेक पारंपरिक मेंटल ब्लॉक्स यामुळे दूर होतील.
या सिरीजमधून सर्वोत्तम गोष्ट  एकच समजून येते ती म्हणजे नात्यात हलका फुलका संवाद हा "कि फॅक्टर" असतो.

आणि हे करण्यास काहीही मोठं करावं लागतं नाही तर फक्त छोट्या छोट्या गोष्टी कराव्या लागतात. म्हणूनच महत्वाची असते ती " छोटी छोटी सी बात" !! बिकॉज नथिंग रिअली मॅटर्स बट लिटिल थिंग्स...

लोकप्रभा 2 जून 2017.

- Abhijeet Panse


बट बॉईज प्लेड वेल

*बॉईज प्लेड वेल, पाकी टीमचे ठराविक वाक्य*

 पाकिस्तान टीमची नेहमी त्यांच्या इंग्लिश वरून , असोशिक असलेल्या सोशिअल मिडियावरून नेहमीच टर उडवली जाते की पाकी कॅप्टन आणि खेळाडूंना जिंकण्यापेक्षा जास्त टेंशन असतं ते पोस्ट मॅच सेरेमनीमध्ये इंग्लिश मध्ये कोण.. कसं बोलणार..यावरून नेहमी सोशिअल मिडियावरून जोक्स पसरतात. "बॉईज प्लेड वेल " या ठराविक वाक्यावरून, पाकिस्तानी खेळाडूंच्या शिक्षणावरून नेहमीच टर थट्टा केली जाते.

पण नव्वदच्या दशकाच्या शेवटच्या काळातील एक घटना याच्या विरुद्ध आणि वेगळी होती.

नव्वदच्या दशकात पाकी टीम भयंकर आक्रमक होती.वसीम अक्रम कॅप्टन होता . पाक टीमऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेली होती. ऑसी कॅप्टन मार्क टेलर होता कदाचित. तेव्हा काही ऑसी  खेळाडूंची आणि पाकिस्तानची " बा चा बा ची "सुरू झाली. पाकिस्तानच्या खेळाडूंना असंस्कृत  ,अशिक्षित बोललेत. तेव्हा चिडलेल्या वसीम अक्रमने ग्राउंड वर आणि खास प्रेस कॉन्फरन्समध्ये तसेच इंटरव्ह्यू देऊन संपूर्ण ऑस्ट्रेलिया टीमची ताई माई आक्का...बाप आजोबा पणजोबा एक केले होते.

 तो बोलला होता की आमच्या टीममधील खेळाडू हे ग्रॅज्युएट , पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. त्याने काही खेळाडूंच्या डिग्री आणि कोलेजसुद्धा सांगितले होते.
ऑस्ट्रेलिया टीम चे खेळाडू मात्र जंगली , कुठलीही संस्कृती नसलेले , इंग्रजांनी शिक्षा म्हणून या बेटावर आणलेल्या गुन्हेगारांचे वंशज आहेत. त्यांच्यात कुठलाही सभ्यपणा नाही. ऑस्ट्रेलिया टीममधील खेळाडू हे अशिक्षित , गावंढळ, शाळा कोलेजमध्येही न गेलेले अजूनही गुंडगिरी अंगात असलेले आहेत. असं बराच तावतावात बोलला होता.

तेव्हा ऑस्ट्रेलिया टीम आणि पाकी टीम मध्ये तणाव निर्माण झाला होता. पुढे काही वर्षांनी ऑसी अंपायर डॅरेल हार्परने , जो नेहमीच आशियाई टीम , खेळाडूंचा द्वेष करायचा असाच पाकी टीम ला त्रास दिला होता.तेव्हा संपूर्ण टीम इंझमाम उल हक ने ड्रेसिंग रूम मध्ये नेली होती.
तेव्हाची पाकी टीम खूप आक्रमक होती.

- अभिजित दिलीप पानसे

Monday 5 June 2017

जैसा ज्याचा खेळ तैसा फळ देतो रे अंपायर

पु.ल.देशपांडेंनी म्हटलय की ''रोजचा  दारावर येणारा  पोस्टमन जर साध्या कपड्यात बाहेर भेटला तर त्याला ओळखणं कठीण असतं!''

मला हे वाक्य क्रिकेट अंपायर साठी तंतोतंत लागु पडतं असं वाटतं.
क्रिकेट अंपायर्सना फक्त त्यांच्या पांढरा किंवा लाल शर्ट,काळी पँट,आणि त्यांची गोल टोपी यातच आपण बघत असतो.

एकवेळ इंग्लंडच्या राणीचे हात उघडे दिसतील!पण अंपायर बोडख्या डोक्याचा दिसणार नाही!यांचं डोकं आणि एलिजाबेथ राणी आज्जीचे हात नेहमीच झाकलेले असतात.

उद्या जर न्युझिलंडचा अंपायर बिली बाउडन बर्म्युडा आणि हुड टीशर्ट घालुन घालुन नागपुरात हल्दीराममधुन संत्रा बर्फी घ्यायला आला..किंवा मुंबईत चौपाटीवर बर्फ का गोला खायला आला.. तर त्याला कोणी ओळखु शकेल का?

अंपायरचं ग्राउंडवरील अस्तित्व हे बाथरूमधील गिझरसारखं असतं.जोवर ते नीट काम करेनसं होत नाही तोवर त्याची कोणी दखल घेत नाही असं शिरीष कणेकरांनी म्हटलंय.

पुर्वी विकेट किपींगला थँकलेस जाॅब म्हटलं जायचं.पण धोनी,गिलख्रिस्ट आदि विभुतींनी कॅप्टन झाल्यावर या कामाला जरा ग्लॅमर आणलं.पण युगानुयुगे अंपायरींग मात्र थँकलेस जाॅबच राहिलाय.

घरातील तरूण नातवंडांनी अंथरूण..बिछाना झोपोतुन तसाच अस्ताव्यस्त टाकावा आणि वृद्ध आजोबांनी वेळोवेळी तो व्यवस्थित करावा तसे हे बिच्चारे अंपायर्स सतत खेळाडुंनी स्थानभ्रष्ट केलेले स्टम्स-बेल्स नीट लावत असतात.

कंबरेचं,मणक्यांचं दुखणं लागायची पर्वा न करता तासनतास एका जागी उभे राहतात.

हे अंपायर्स म्हणजे भव्य दिव्य..ऐतिहासीक वास्तुच्या पायरीचे दगड असतात.ह्या बिचाऱ्यांकडे कोणाचही खास लक्ष जात नाही.

पण तरिही काही अंपायर्स मनावर छाप सोडुनच जातात!

1996 च्या वर्ल्ड कप पासुन बालवयात क्रिकेट खेळण्याची आणि पाहण्याची तिव्र बाधा झाली.तेव्हापासुन प्रथम आवडलेले अंपायर म्हणजे ' श्रीयुत डेवीड शेफर्ड'.

गुबगुबीत शरीर.मान,गळा,गाल,हनुवटी एकमेकात मिसळलेले..हे डेविड शेफर्ड म्हणजे एक टेडी बेअरच होते!

नेल्सन स्कोअर झाला( म्हणजे 111,222 ....)की एक पाय वर गुडघ्यात दुमडुन खालच्या पायाने तीन छोट्या उड्या मारायचे!
आम्ही मित्र ह्या टेडी बेअरच्या उड्या पाहायची उत्सुकतेने वाट बघत असु.कॅमेरामनही आठवणीने ते दाखवायचा!

''बिली डाक्ट्रोव्ह''; दक्षिणेकडे रेल्वेने जाताना  आंध्रा,तेलंगणाचे टीसी जसे असतात तसे हे दिसायचे.

पु.ल.देशपांडेंच्या 'म्हैस'मधील
 ''डायव्हर कोनेे?'' जड आवाजात विचारणारे हवालदार साहेब कसे दिसत असतील तर या बिली डाॅक्ट्रोव्हसारखे असं मला वाटतं..जड भावनाशुन्य चेहरा..काळ्या सावळ्या चेहऱ्यावर जाड मिशी.....

''स्टिव्ह बकनर'' तर जगप्रसिद्ध अंपायर.
एकवेळ जावेद मियांदादचा चेतन शर्माला मारलेला 'त्या' सिक्सरबद्दल त्याला जुने क्रिकेट प्रेमी माफ करतील,
आफ्रिदीने एशिया कप फायनलमध्ये अश्विनच्या शेवटच्या  बाॅल  सिक्सर मारून जिंकल्याचं आम्ही विसरू..!!
पण या थेरड्या स्टिव्ह बकनरला माफी नाहीच!!

आयुष्यातील सहस्त्रचंद्र दर्शनापर्यंत समंजस चांगला असलेला कोणी म्हातारा अचानक पत्रिकेतील बिघडलेल्या शुक्राची महादशा अंतर्दशा एकदम सुरू झाल्याप्रमाणे आचरट चाळे करायला लागावा तसा हा स्टिव्ह बकनर बरीच वर्षे  आदरणीय अंपायर होता पण कारकर्दिच्या शेवटच्या काही वर्षात याने प्रत्येक भारतीयाला..सचिनप्रेमींना दु:ख..वेदना दिल्यात.

त्याचा भारतीय टीमवर आणि विशेष तेंडुलकरवर राग उघडपणे दिसु लागला होता.त्याच्या चुकीच्या निर्णयामुळे सचिनचे कित्येक शतकं हुकलीत आणि भारताने मॅच हारल्यात.(त्या कुप्रसिद्ध 08 जानेवरातील 'मंकी प्रकरण' झालेली  सिडनी टेस्ट मॅच सहित)

ह्या स्टिव्ह बकनर आणि ट्युब लाईट मध्ये नेहमी मला एक साधर्म्य जाणवायचं.
बाॅलरने अपील केलं म्हणजे ह्या ट्युब लाईटचं बटण दाबलं गेलं की हा काही सेकंद शुन्य नजरेने समोर पाहत राही मग प्रथम स्टार्टर चा लाईट जसा चालुबंद होतो तसा 2..3 वेळा हा मान वरखाली होकारार्थी हलवायचा आणि मग त्यानंतर ट्युब पेटावी तसा हात वर नेउन तर्जनी उर्ध्व करायचा..

काही बाॅलर याचा स्टार्टर लाईट उघडझाप करू लागला म्हणजे मान डोलु लागल्याबरोबरच आउट केल्याचा आनंद साजरा करायला लागायचे तर्जनी वर जाण्यापुर्वीच.

 असा हा सहा फुटी मख्ख चेहऱ्याचा
 'ब्लॅक माम्बा' बक(वास)नर.

आॅस्ट्रेलियाचे ''सायमन टफेल''. एकदम जंटलमन माणुस!आदरणीय,विश्वसनीय, अचुक निर्णय देणारा,ICC द्वारे सर्वोत्तम अंपायर चे अवार्डस जिंकणारा अंपायर..माझा सर्वात आवडता अंपायर..हे फारच लवकर निवृत्त झाले.ह्यांना मी अजुनही मिस करतो.

आपण भारतीय सायमन टाॅफेल सोबत एक महत्वाचा बाँड शेअर करतो तो म्हणजे 2007 &2011 दोन्ही जिंकलेल्या वर्ल्ड कप फायनल मध्ये हेच अंपायर होते.

 अंपायरकडुन प्रामाणिकता,नि:पक्षताच अपेक्षित असते.तेच त्यांचं काम असतं.पण कुंपणच शेत खायला लागल्यावर विश्वास कोणावर टाकणार!
''असद राउफ'' हा पाकड्या असाच एक थर्ड क्लास अंपायर!
पैसे खाउन चुकीचे निर्णय देणारा..ह्याचे विडीओजही लिक झाले होते.2वर्षापुर्वी ह्याला भारतात अटक होणार कळताच IPLच्या एका मॅच नंतर रात्रीतुन त्याच्या पापस्थानात शेपुट खाली करून पळुन गेला!

चिटींग पाकिस्तानच्या रक्तातच आहे!मग ते कोणतंही ग्राउंड असो.क्रिकेट ग्राउंड असो की बॅटल ग्राउंड!

लता मंगेशकर एकदा पाकिस्तानच्या कॅप्टन झहीर अब्बासला म्हणल्या होत्या की आम्ही तर अकरा जणं खेळतो पण तुम्ही तुमच्या देशात तेरा जणं मिळुन खेळता!11+ 2 अंपायर.

पण पाकिस्तानची प्रतिमा सुधारणारे 'अलीम दार' हे अंपायर!अत्यंत चांगले,अचुक अंपायर.

भारताविरुद्ध late nineties मधे खेळलेल्या प्लेयर्स पैकी अॅलन डोनाल्ड,डिवीवियर्स नंतर सर्वात जास्त राग मला यायचा तो श्रीलंकेचा कुमार धर्मसेनाचा.
हा भारताला बाॅलिंगने आणि प्रसंगी त्याच्या बॅटिंगने नेहमी त्रस्त करायचा.
पण आज एक चांगला अंपायर म्हणुन ओळख निर्माण करतोय.

अंपायरींगमध्ये थोडीफार गंमत,प्रेक्षणीयता आणली ती न्युझिलंडच्या ''बिली बाउडने''!
चौका,सिक्सर देतानाची त्याची वेगळी शैली..आउट देताना कुत्र्याच्या शेपटाप्रमाणे नेहमीच वाकडं असणारं त्याचं बोट..असा हा दिलखुलास अंपायर!

 ''डॅरेल हार्पर'' आणि ''डॅरेल हेअर'' हे दोन आॅस्ट्रेलियन वागग्रस्त अंपायर! दोघेही भारतीय क्रिकेटद्वेषी.दोघांनिही वेळोवेळी तसे विधानंही केलीत.यातही डॅरेेल हेअर आशियाई टीम्सवर,बाॅलर्सवर जाम उखडलेला असायचा!
हरभजन सिंग,सकलेन मुश्ताक आणि द ग्रेट मुथ्थैया मुरलीधरनवर 'चकर्स' असल्याचा आरोप केला होता.

मुरलीधरनचा तर हा फार द्वेष करायचा!
मुरलीचे सलग 'नो बाॅल' देणारा हाच डॅरेल हेअर.ते प्रकरण इतकं पुढे गेलं होतं की श्रीलंकेतील ''तामिळी वाघांनी'' या हेअरला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

काही मॅचेस चुकीच्या  अंपायरींगमुळेही गाजल्या आहेत.त्यातलीच एक ''मार्क बेन्सन'' आणि ''स्टिव बक(वास)नर'' यांच्या चुकीच्या अंपायरींगमुळे गाजलेली कुप्रसिद्ध सिडनीची मंकीगेट टेस्ट.

गांगुली विरूद्ध ड्राॅप्ड कॅच चे अपील झाल्यावर या बेशरम बेन्सनने थर्ड अंपायरला विचारण्या ऐवजी विरूद्ध टीमच्या कॅप्टनला विचारलं होतं पाँटिंग पंटरने साहजिक आउट असलेलं सांगितलं.संपुर्ण टेस्टमध्ये 10 च्या वर चुकीचे निर्णय दिले गेले परिणामी ड्राॅ होणारी टेस्ट शेवटच्या तीन ओवर्समध्ये मायकल क्लार्क सारख्या पार्ट टाईम बाॅलरसमोर

''मेरे दो अनमोल रतन एक है बेन्सन तो एक बकनर''
म्हणत पंटर पाॅँटिगने जिंकली होती!

''वेंकटराघवन'' नंतर मात्र एकही प्रसिद्ध भारतीय अंपायर झाला नाही.

 काळ बदलत गेला.. क्रिकेट मध्ये अॅडवान्स टेक्नाॅलाॅजी येत गेली आणि अंपायर आता फक्त हाता पायाच्या कवायतीपुरतेच राहिलेत.

 पु.ल.म्हणतात पोस्टमन जर प्रत्येक पत्रातील मजकुरात गुंतायला लागला तर त्याला दिवसभरात तीन पत्रेही टाकणं कठीण होउन जाईल.

पोस्टमन जसा अलिप्ततेने पत्र टाकत जातो तसे हे अंपायरसुद्धा हजारो लोकांच्या उपस्थितीत,श्वास रोखुन धरणाऱ्या,ह्रदयगती वाढवणाऱ्या,बंद पाडणाऱ्या सामन्यातही शांतपणे अलिप्ततेने आपलं कर्म करीत राहतात.
जिंकलेली टीम जल्लोषात असते..हरलेली निराशेत पण हे अंपायर्स फक्त अलिप्ततेने 'शेक हॅँड' करून निघुन जातात.

पंढरपुरातील पांडुरंग ''कटीवरी हात विटेवरी उभा'' स्थितीत सर्व काही चांगलं वाईट..होणारे बदल बघत असतो तसा हा अंपायर ''कटीमागे हात यष्टीमागे उभा'' पोजमध्ये सर्व काही लक्षपुर्वक बघत असतो.

गीतेत श्रीकृष्णाने म्हटलय की तो व्यक्तीच्या कर्मक्षेत्रात ढवळाढवळ करत नाही.फक्त अलिप्त द्रष्ट्रा राहतो.पण चांगल्या वाईट कर्माचे फळ मात्र देतोच.
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर
त्याचप्रकारे
''जैसा ज्याचा खेळ तैसा स्कोअर देतो रे अंपायर..''

-Abhijeet Panse


Sunday 4 June 2017

जागतिक पर्यावरण दिन

छपरावरचं ओझोनचं आवरण टराटरा फाटतंय .आपापल्या वर्णांची काळजी करण्यापेक्षा पर्यावर्णाची काळजी घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पर्यावरणास..जीवनास दुसरा पर्याय आहे का?

जागतिकपर्यावरणदिन

प्रश्न 2 पॉइंट्सचा, भारत विरुद्ध पाकिस्तान, 1996 वर्ल्ड कप

जून 2017, चॅम्पियन्स ट्रॉफी

आज जर भारताने पाकिस्तानसोबत न खेळण्याचा निर्णय घेतला असता तर पाकिस्तानला दोन पॉइंट्स तर मिळाले असतेच शिवाय या मालिकेचं संपूर्ण चित्र बदललं असतं. असं 96 च्या वर्ल्डकप मध्ये घडलं होतं. नव्वदच्या दशकात श्रीलंकेत आतंकवाद माजला होता.

96 चा वर्ल्डकपचे यजमान भारत ,पाकिस्तान श्रीलंका होते. तेव्हा ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्याविरुद्धच्या 2 लीग मॅचेस श्रीलंकेत होत्या. पण कोणतीही टीम असुरक्षित वातावरण असलेल्या श्रीलंकेत जाऊन खेळायला तयार नव्हती. सुरक्षेचं कारण देऊन ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज टीम्स ने मॅच खेळण्यास नकार दिला.

शेवटी अत्यन्त महत्वाच्या ग्रुप मॅचेसचे विनर श्रीलंकेला घोषित करण्यात आले. त्यामुळे मालिकेचे चित्र बदलले.लंका सहज उपांत्यपूर्व सामन्यात पोहचली.
 पुढे श्रीलंका आणि भारताचा कोलकात्यात प्रसिद्ध -कुप्रसिद्ध सेमिफायनल सामना झाला.प्रेक्षकांनी स्टेडियममध्ये जाळपोळ केली सामना बंद पाडला..महान रिऍलिटी शो परफॉर्मर विनोदवीरकांबळीने मैदानात अश्रूपात केला. श्रीलंकेला विजयी घोषित करण्यात आले. हा तिसरा विजय होता जो श्रीलंकेला पूर्ण मॅच न खेळता आयता मिळाला होता.(हा सामना श्रीलंकाच जिंकणार होते.)
 पुढे श्रीलंकेने वर्ल्ड कप ही जिंकला.

पण मुद्दा हा आहे की जर वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाने मॅच न खेळण्याचा निर्णय रद्द केला असता तर कदाचित चित्र वेगळे असते. कदाचित भारत श्रीलंका सामना न होता वेस्ट इंडिज किंवा न्यूझीलंड विरुद्ध सेमिफायनलमध्ये सामना झाला असता.आणि हा पेपर भारतासाठी त्यामानाने नक्कीच सोपा होता.

त्यामुळे आज जर भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला असता तर पाकिस्तान दोन पॉईंट्स मिळाले असते शिवाय हरलेल्या टीमला जास्त संधी नसलेल्या या मिनिवर्ल्डकपमधून भारत कदाचित बाहेर पडला असता.आणि पाकिस्तानला फुकटमध्ये मोमेंटम गती मिळाली असती.

आणि सगळ्यात महत्त्वच हेच की आयसीसी असो व बीसीसीआय कोणालाही लोकांच्या भावनेचं महत्व नाही.बरोबर रविवारीच भारत पाक सामना ठेवण्यात आला यावरूनच चित्र स्पष्ट होतं.

-अभिजित पानसे

इंडिया विरुद्ध पाकिस्तान, चॅम्पियन्स ट्रॉफी 2017

99 मध्ये कारगिल युद्ध झाल्यावर भारताने पाकिस्तान सोबत क्रिकेट संबंध तोडलेत. जे अगदी बरोबर होतं. इथे क्रिकेट संबंध तोडलेत म्हणजे पाकिस्तान सोबत कुठलीच क्रिकेट मालिका 'आयोजित' केली नाही. त्यामागे भारतीयांच्या भावनिक संवेदनशील बाजू होती. त्यानंतर चार वर्षे भारत पाकिस्तानात क्रिकेट खेळले गेले नाही.

1 मार्च 2003ला  वर्ल्ड कप मध्ये अविस्मरणीय हाय होलटेज भारत पाकिस्तान सामना झाला. भारताने तो कठीण सामना जिंकला आणि त्या सामन्याला मिळालेला प्रतिसाद बघता पैश्यासाठी नेहमीच वखवखलेली व्यापारी क्रिकेट संघटना बीसीसीआयने भारत पाकिस्तान दौरा अयोजित केला.
 भारतीय " शॉर्ट टर्म मेमरी लॉस" पीडित असल्याने किंवा जे झाले ते गंगेत, सिंधूत, झेलमेत मिळाले असे म्हणून भारतियांनी त्या दौऱ्याला खूप प्रतिसाद दिला.
त्या दौऱ्यात सेहवागने ट्रिपल हंड्रेड हाणली..दोन्ही मालिका जिंकल्यात.

तिथून पुढे भारत पाकिस्तान क्रिकेट #समंध संबंध पुन्हा  सुरळीत झालेत. भारताने दोनदा पाकिस्तान दौरा केला, तत्कालीन पाक राष्ट्राध्यक्ष ने धोनीच्या #हेअरकट ची स्तुती केली वगैरे.. पाकिस्तान टीम ही भारतात येऊन मालिका खेळली.
 पण  नोव्हेंबर 2008 ला ताज अटॅक झाला, तिथून पुन्हा भारताने क्रिकेट संबंध तोडलेत. ते आजवर.

त्यानंतर 2013 मध्ये तीन सामने खेळले गेलेत त्यानंतर 015 मध्ये वर्ल्ड कप मध्ये आणि मागच्या वर्षी T 20 वर्ल्ड कप मध्येच भारत पाकिस्तान समोरासमोर आलेत. या सामन्यात भारताने पाकिस्ताचा धुवा उडवला होता.

 हे दोन सामने ICC च्या टुर्नमेंट मधील होते.ते भारताने खेळायलाच हवे होते आणि त्यात पाकिस्तान ला हरवण्याची मजा वेगळी असते. संपूर्ण क्रिकेट जगत यात हजर असतं.

#आजचा समनासुद्धा ICC tournament चा आहे. 019मध्ये इंग्लड मध्येच वर्ल्ड कप होतो आहे. सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेली चॅम्पिनस ट्रॉफी स्पर्धा हा "#मिनिवर्ल्डकप आहे.  संपूर्ण क्रिकेट जगत याला साक्षी असतं. त्यामुळे आजचा सामना बहिष्कृत करण्यात काहीच पॉईंट नाही.

पण एकीकडे नियमितरीत्या दहशतवादी कारवाया होत असताना , भारताने पाकिस्तान सोबत भारतात किंवा अन्य कुठे मालिका आयोजित केल्यास त्याला सर्वच भारतीयांनी नैतिकतेच्या , भावनिक आधारावर विरोध करावाच! बहिष्कार टाकावा!

कारण आज पाकिस्तान क्रिकेट डबघाईला आलेय.पाकिस्तानमध्ये 09 मध्ये श्रीलंका संघावर हल्ला झाल्यापासून क्रिकेट खेळलं गेलं नाही.
भारत हा क्रिकेटमधील अमेरिका असल्याने  सर्वानाच भारतात येऊन किंवा भारताला आपल्या दौऱ्यावर बोलावून खेळायचे असते यामागे स्पष्टपणे फक्त आर्थिक गणितच असतात.
त्यामुळे भारत पाकिस्तान क्रिकेट मालिकेचा विरोध कायम राहीलच.
 पण आयसीसी मालिकेत भारताने पाकिस्तानसोबत ..सोबत नाही विरुद्ध जरूर खेळावे.कारण तिथे त्याना हरवताना एक संदेश जातो , की तुमच्याशी आम्ही सर्व क्रिकेट संबंध तोडले आहेत पण कधी बाहेर समोरासमोर आलात तर सर्वांसमोर धुलाई करून दाखवू  की तुमचा बाप कोण आहे!

  All d best team India!! 👍👍💐💐
- Abhijeet Panse



Friday 2 June 2017

अभिनंदन

मागच्या आठवड्यात माझ्या एका मैत्रिणीने आणि फ्रेंड लिस्ट मधील एका आदरणीय स्त्रीने डोक्यावरील संपूर्ण केस पूर्ण कापून स्वतःचे तसे फोटो पोस्ट केलेत.

मला ही गोष्ट फार आवडली. खूप अभिनंदीय बाब आहे ही. हे करताना त्यांच्यात असलेला आत्मविश्वास दिसला पण याहून अत्यन्त महत्वाचं म्हणजे तेच ते पारंपरिक सौंदर्याचे पारंपरिक निकष आणि उथळ परिमाण , stereotype चौकट यांना मोडलं. त्यामुळे त्यांचं खास अभिनंदन.

" तिचे लांबसडक काळे/ तपकिरी कुरळे/ सरळ केस तिच्या सौंदर्याची खूण होती..."
तो तिच्या लांब केसात ...." वगैरे ..
हेच एकसुरी वर्णन कथा कादंबऱ्यात आजवर केलं जातं. त्यामुळे सौंदर्याचे हेच वरवरचे तकलादू निकष मनात घर करून राहिले आहेत.

जेव्हा कोणी कॅन्सरग्रस्त स्त्री केमोथेरपी घ्यायला लागते तेव्हा याच पारंपरिक बुरसटलेल्या निकषांवर इतरांकडून स्वतःला जोखलं जाइल यामुळे ती सगळ्यात जास्त निराश होते. आत्मविश्वास मोडून पडतो.

 खुरटे केस असलेली कृष्णवर्णीय निग्रो स्त्री सुद्धा अत्यन्त सुंदर दिसू शकते.

सौंदर्य हे शरीराच्या अवयवामुळे एक भागामुळे नसून व्यक्तिमत्वात असते, विचार प्रक्रियेत आणि स्वतःला जसे आहात तसे स्वीकारणे यात असते याची जाणीव हळूहळू होत जाईल तेव्हा हे लांब केस , कपाळावरील गंध, कुंकवाचे शिक्के हे निरर्थक निकष तुटून पडतील आणि मानसिकता बदलेल.

स्वतःचे फोटो टाकल्याबद्दल त्यांच्या आत्मविश्वसाचे त्यांचे विशेष अभिनंदन.

- Abhijeet Panse

Thursday 1 June 2017

1 जून 2006 ची ती थरारक पहाट

#1जुन_2006ची_ती_थरारक_पहाट''

     'पहाट' हा रात्रीच्या प्रहरातील शेवटचा आणि सर्वोत्तम प्रहर!निद्रादेवीचा परम्मोच्च आविष्कार या पहाटेच होतो.आबालवृद्धांपासुन प्राणी पक्षीही पहाटे साखरझोपेत असतात.
अगदी निद्रानाश असणाऱ्यांनाही ही पहाट आपली मोहिनी घालत त्यांना आपल्या कवेत घेत असते.

१जुन २००६ ची पहाट!!!!उन्हाळा निरोप घ्यायच्या मार्गी लागला होता.पावसाळा उंबरठ्यावर येउन ढगांचे दरवाजे ठोठावत होता.संपुर्ण

नागपुरकर महालवासी अशाच साखर  झोपेचा गोडवा चाखत होते.शाळा सुरू होणार म्हणुन काही मुलं हिरमुसलेली,तर काॅलेज सुरू होणार म्हणुन यंग पब्लिक आनंदात झोपली असावी..घरातील वृद्ध मंडळींचाही कदाचीत नुकताच डोळा लागलेला असणार!!

शुभ्र काॅलर लोकांसाठी रात्री जग संपुन जातं पण..पण काही काळ्या काळजाच्या नराधमांसाठी रात्रीचा काळा अंधारच त्यांच्या कुकर्मासाठी सर्वोत्तम पर्याय असतो.

अशा त्या 1 जुनच्या पहाटे सगळीकडे निरव शांतता असताना अचानक जोरदार आवाज करणाऱ्या फटाक्यांची सिरीज सुरू झाली!!त्या आवाजाने पहाटेच्या शांततेचा डोह ढवळला गेला...

'' मारो सालो को..! ''उधर से.....'' वहाॅ से कवर कर..!!''एक भी नही बचना चाहिए..!!''असे आवाज पाठोपाठ ऐकु येउ लागलेत..!!''

पुन्हा फटाक्यांचा प्रचंड आवाज!खाडकन् आम्ही सर्वच जागे झालो..कारण आवाज अगदी आमच्या घरासमोरून आणि अगदी जवळुन येत होता.
इतक्या रात्री असा भयकारक आवाज गोंधळ..धावपळ ऐकुन सर्वप्रथम सर्वच सुन्न!!
बरेचदा आयुष्यात अचानक अजाणतेपणी अनपेक्षित संकट,दु:ख वा आनंदाच्या परमोच्च बिंदुशी एकाएकी सामना झाला तर काही क्षण मनाला सुन्नावस्था प्राप्त होतेच!

सुन्नावस्थेतुन भानावर येण्याच्या संधीमार्गावर असतानाच आयुष्यात कधीही न ऐकलेली,उलट्या काळजाच्या माणसालाही मुळासकट हादरवुन टाकेल अशी आर्त,वेदनामय किंकाळी कानावर येउन आदळली!!!

 तोवर सारा अयाचीत मंदीरापासचा..नागपुर नाईट हायस्कुलजवळचा परिसर घरघरात जागा झाला होता.इकडे आमच्या सगळ्यांच्या मनात विचारांचे मोहोळ उठले होतं.

आणि तत्क्षणी 'ती' शंका माझ्या मनात डोकावली.

मी ट्युब लाईट लावायला उठलो.धावत जाउन बटन दाबुन नळी आणि विद्युतेतील अडथळा दुर केला.
क्षण दोन क्षणात ट्युब लाईट पेटला..आणि खरच माझ्या डोक्यातीलसुद्धा 'ट्युब लाईट' पेटली.
पुढे 'ती'च शंका खरी ठरली.

घड्याळाचे काटे 4:05 दाखवत होते.

पुन्हा लोखंडी बॅरॅकचे जोरजोरात आवाज..काचा फुटल्याचे..माणसांच्या ओरडण्याचे आवाज ऐकु येउ लागले!!

शेवटी मानवी मनच ते!बाहेर जे काही घडतय ते फार भयंकर आहे हे कळत असुनही मनात वेगळीच उत्कंठा मिश्रित भय अनुभवत होतो.मला बाहेरचं बघण्याची तिव्र इच्छा झाली!

आणि मी माझ्याच नकळत उठलो व समोरची खिडकी उघडुन बाहेर समोर चौकात चार रस्त्यावर बघु लागलो.

बाहेरील मिट्ट काळोखात हॅलोजनच्या दिव्याचा खांब स्थिर प्रकाश फेकत त्याच्या समोर घडत असलेल्या हिंसेचा साक्षिदार होता.बिचारा तोही त्याच्या ''उभ्या'' आयुष्यात  हे प्रथमच पाहात होता.

मला खिडकीतुन काहीच दिसलं नाही.पण मर्कट मनच ते!जुमानतं कुठे!खिडकीतुन काहीच दिसत नाहीए म्हणुन बाहेर जाउन पाहायचं ठरवलं.

क्षणार्धात दरवाजा उघडला.क्षणभर माझा 'हॅम्लेट' झाला.''बाहेर जाउ की नाही जाउ''??

पण उत्सुकतेचा भयावर विजय झाला.दिलीप काका रागवुन रोखण्यापुर्वीच मी बाहेर  पोर्चमध्ये आलो.
समोर काही दिसत नाही म्हणुन मान वळवुन बघण्याचा प्रयत्न केला..

आणि आयुष्यात कधीही यापुर्वी बघितलं नाही,कधीही विसरणार नाही असं काही दिसलं.

उजवीकडुन नागपुर नाईट हायस्कुलच्या गल्लीतुन एक पोलीस समोर धावत आला.घराला लागुनच शेजाऱ्यांची कार बाहेर होती.त्या कारच्या मागे लपला.एक क्षण जात नाही तर त्या पोलीसाच्या मागुन अचानक दोन तीन साध्या कपड्यातील रायफलधारी माणसं जोराने धावत आली.

आणि त्या लपलेल्या पोलीसाला अगदी जवळ जाउन त्यांनी त्यांच्या रायफलने गोळ्या घातल्या!!

ठिणग्या पाडत ते लोह बाहेर पडत होतं.
पुन्हा एकदा आर्त किंकाळी!!

माझे डोळे खोबणीतुन बाहेर येतील की काय जोरजोरात धडधडणारं ह्रदय छाती फोडुन बाहेर येतं की काय,अशी आमची अवस्था झाली!वरून पोर्चमधुन मला खालचं ते सारं दिसत होतं.

आणि तत्क्षणी साध्या कपड्यातल्या त्या रायफलधारी माणसांनी माझ्याकडे वर पाहिलं..आमची नजरानजर झाली.

''अंदर जाव!....दरवाजे खिडकिया बंद कर दो..!!कोइ भी बाहर मत ना निकलो..!!'' प्रचंड जरब असलेल्या अधिकारवाणीने ते ओरडले.कारण आता संपुर्ण परिसर जागा झाला होता.

वेगाने मी आत आलो.आत घाबरलेल्या आजीचं आणि Rohiniचं रामरक्षा म्हणणं सुरू होतं.आम्ही सगळेच खुप घाबरले होतो.

डोक्यात निरनिराळ्या विचारांचं थैमान माजलं होतं.मी विसरूच शकत नव्हतो की एका पोलीसाला काही माणसांनी मारलय..त्यावरून बाहेर परिस्थिती किती भयानक असेल..आणि हे सर्व मी पाहताना त्या माणसांनी मला पाहिलय..खुप भिती वाटत होती.कोणत्याही क्षणाला ते येतील आणि धाडकन दार फोडतील ..आणि आम्हालाही मारतील असं वाटत होतं.

ती पहाट पुर्ण वेगळी होती.भयप्रद होती.नकोशी होती.
एक तास जवळपास बाहेर आवाज येत राहीला.सर्व जण जीव मुठीत घेउन होते.

सगळ्यांचे लक्ष आता सूर्य उजाडण्याकडे लागलं होतं.पण प्रत्येक क्षण तासाप्रमाणे भासत होता.अखेर तासाने आकाशात गुलाबी सोनेरी प्रकाश दिसु लागला.लोकं आता घरातुन खिडक्या उघडुन पाहु लागले होते.हळुहळु लोकं बाहेर पडु लागले होते.

रस्त्यावर गोळ्यांचा सडा आणि रक्ताचं थारोळं होतं.घराच्या अगदी समोर एक सैनिकी वेषातील तरूण रक्ताच्या थारोळ्यात मरून पडला होता.खुप पोलीस जमले होते.अशा अनपेक्षीत गदारोळात कोणीही टिव्ही लावणं शक्यच नव्हतं पण काकांनी सहज टिव्ही लावला आणि तेव्हा...

 आणि तेव्हा आम्हाला नक्की काय झालय ते समजलं.माझी ''ती''च शंका खरी ठरली होती.

आज तक वर ब्रेकिंग न्युज होती,'' नागपुर मे संघ बिल्डिंग पे आतंकवादीयो का बडा हमला!!''
''लष्करे तोएबा या जैशे मोहम्मद आॅर्गनायजेशन का हाथ होने का अनुमान!''

आदल्या दिवशीच आईकडच्या एका नातेवाईकांकडे मी गेलो होतो.काकांचं म्हणजे ''श्री दिलीप अलोणी'' यांचं घर अगदी महालात संघ बिल्डींगच्या अगदी जवळ नागपुर नाईट हायस्कुलच्या अगदी समोर आहे.

आणि त्या बोळीतच दहशतवाद्यांविरूद्ध धुमश्चक्री झाली होती.संघ बिल्डिंगकडे जाणाऱ्या अत्यंत अरूंद गल्लीत आणखी दोन सैनिकी वेषातील तरूण मरून पडले होते.
एक कार रस्त्यात पोलीसांनी लावलेल्या बॅरेक्समध्ये अडकली होती.

आतापर्यंत प्रत्येकाला आतंकवाद्यांनी पोलीसांना मारले आहे असेच वाटत होते.नंतर हळुहळु माहिती मिळत गेली तेव्हा कळलं आतंकवादी पोलीसाच्या गणवेशात आले होते.आणि ठार झालेले तिघेही आतंकवादीच होते.शुर पोलीसांनी हल्ला निकामी केला होता.

झाले असे होते की दहशतवादी लाल दिव्याच्या कारमधुन दवळपास सहा किलो आरडीक्स, ग्रेनेड्स आणि एके56 रायफली घेउन बडकस चौकातुन संघ बिल्डिंगकडे जात असताना रात्र गस्तीच्या पोलीसांना दिसले.पण त्यांच्या एकंदर गाडी चालवण्यावरून पोलीसांना संशय आला.
पण लाल दिव्याची गाडी म्हणुन प्रथम काहीही न करता ते गती हळु ठेवत पाठलाग करत राहिले.

पाठलाग होतोय हे लक्षात येताच आतंकवाद्यांनी गाडी बडकस चौकाच्या समोरून जाणाऱ्या संघ बिल्डिंगकडे जाणाऱ्या अत्यंत अरूंद गल्लीत घातली.आणि पोलीसांचा संशय पक्का झाला.व त्यांना थांबण्यास सांगितले.
संघ बिल्डिंगजवळ येताच वळण्यासाठी दहशतगर्द्यांनी नागपुर नाइट हायस्कुलच्या अरूंद गल्लीत टाकली पण तिथे आधीपासुनच पोलीसांनी  बॅरॅक्स लावुन रस्त्याचे टोक बंद केले होते.

अडकलोय हे कळताच दहशतवाद्यांनी कारमधुनच गोळीबार सुरू केला व त्यातील एक आतंकवादी उतरून बॅरॅक्स काढु लागला.पण पोलीसांनी तुफान गोळीबार करत टिपले.

तर दुसरा पळुन नाईट हायस्कुल समोरील कारमागे लपला.पोलीसांनी त्यालाही जवळुन गोळ्या मारल्या व संपवला.हेच दृश्य मी पाहिले होते.

एका आतंकवाद्याने ग्रेनेड फेकण्यासाठी पीन तोंडाने काढतानाच त्याच्या गालातुन गोळी आरपार गेली.व सुदैवाने तो हॅण्डग्रेनेड फुटला नाही.शुर पोलीसांनी तीनही दहशतवाद्यांना संपवुन मोठी कामगिरी केली होती.
आरडीक्स चा साठा पाहता संघ बिल्डींगसकट आम्हीही त्या दिवशी जमीनदोस्त झालो असतो.

एव्हाना आमच्या घरासमोर लोकांचा पुर आला होता.त्यातल्या त्यात आमची गच्ची अगदी सगळं बघण्यासाठी योग्य असल्याने ओळखी अनोळखी लोकांनी गच्च भरली होती.
सगळ्यांसाठी मग चिवडा,चहा सुरू होता.सोबत संघबिल्डिंग हल्ल्यावरच्या गप्पा चवीला!

हाहा म्हणता बातमी दगभर पसरली.सकाळपासुन फोन खणखणत होता.आम्ही मुलं  Ajit..रोहिणी कधी बाहेर जाउन कधी गच्चीवरून,जिन्यातुन तर केव्हा घरात बसुनच टिव्हीवर घराबाहेरचं 'लाइव्ह' दृश्य बघत होतो.

आम्ही काही जणं मुद्दाम कॅमेरासमोर येण्याचा प्रयत्न करत होतो.एका वाहिनीवर आमची थोबाडं  झळकली होती.

पोलीसांचा गराडा,श्वान पथकं,बाॅम्ब निकामी पथकं,सगळे हजर होते.पोलीस प्रत्येक बुलेट,हातबाॅम्ब भोवती पांढऱ्या रंगाने गोल करत होते.चित्रपटात पाहिलेलं प्रत्यक्षात पहिल्यांदाच पाहत होतो.

आज 1जून आहे.वर्षे उलटलीत पण त्या आठवणी व तो थरार अजुनही आठवतो.फक्त आता त्यावर गंमती केल्या जातात इतकच.शेवटी मनुष्य स्वभावच तो.

(पूर्व प्रसिद्धी 1जून 2009, लोकसत्ता)

लोकमत

-Abhijeet Panse