Tuesday 27 February 2018

मराठी दिन

*मराठीदिन*

Poetry is the spontaneous overflow of powerful emotions recollected at the time of tranquility-
"William Wordsworth".

 इंग्लिश कवी वर्डस्वर्थने सांगितलेली कवितेची ही व्याख्या जगविख्यात आणि प्रमाण आहे.
पण तुकाराम महाराजांनी त्यापूर्वीच हाच भावार्थ मांडणारे शब्द ..कविता कशी स्फुरली हे सांगीतले आहे.

"माझी मज झाली अनावर वाचा अंतरेची धावे स्वभावे बाहेर.."
-तुकाराम महाराज


मराठी दिन

'सत्तावन' म्हणजे सेवंटी वन का??''
असं विचारणाऱ्या मराठी लहान मुलांकडे आणि काही तरूण तरूणींकडे मी दयार्द्र दृष्टीने पाहुन हसण्यावर नेतो.

भारतीय शब्दांचा उच्चार करताना इंग्रजांची जीभ वळत नव्हती म्हणुन त्यांनी मद्रासचं चेन्नई, कोलकाताचं कलकत्ता वगैरे आणि इतर अनेक शब्दांचं त्यांच्या 'सोयीसाठी 'रुपांतर केलं.
पण साहेब गेल्यावरही त्यांनी मागे टाकलेलं त्यांचं उष्टं खरकटं चिवडताना; 'अजिंठा- वेरूळ' लेण्यांना साधं बोलतानाही सतत Ajanta& Ellora म्हणण्यात गर्व बाळगणाऱ्या अर्ध्या हळकंडाने पिवळे होणाऱ्यांची कीव येते.

पण गंगा नदीला Ganges ,ग्यांजेस म्हटल्यावर मात्र तळपायाची आग मस्तकात जाते.

आणि जेव्हा कोणी मराठी व्यक्ती मुंबईला '#बाॅम्बे' म्हणतं तेव्हा मात्र त्याचा मानसीक रोग आता मर्यादेच्या पलीकडे गेला असुन त्याला उपचाराची नाही तर प्रार्थनेची गरज आहे असं खुशाल समजावे आणि त्याला त्याच्या प्राप्त अवस्थेत तसेच सोडुन द्यावे.

(त.टी-ह्यात इतर कुठल्याही भाषेबद्दल वा भाषिकांबद्दल  आकस राग दुर दुर नाही.
हे फक्त उथळ मराठी लोकांसाठीच.)
इंग्रजी,हिंदीसहित सर्व भाषांचा चाहता,सर्वांच्या 'मातृभाषेचा' आदर करणारा आणि मराठीवर प्रेम करणारा

-अभिजित पानसे

Saturday 24 February 2018

देव कुठे आहे?

दिवसभर प्रचंड पाऊस सुरू होता. लोक दिवसभर तरीही येत होते.कोणी  व्हरांड्यात बसलेले , दाटीवाटीने बसलेले रात्र काढण्यासाठी तिथेच कोणी प्लास्टिक अंथरून पय जवळ घेऊन झोपपेले..पावसाचं पाणी तिथपर्यंत येत होतंच. मी विचार करत होतो का हे इकडे येतात? इतका त्रास सहन करत , जीव धोक्यात घालून का ,कशासाठी येतात, काय मिळतं यातून त्यांना! खरंच देवासाठी हे येतात तर देव काय फक्त हिमालयातच आहे का? शिव, शंकर महादेव हा फक्त घराबाहेरच उंच पर्वतावर, आत गुहेतच असतो का!

मग संत लोकांनी म्हटले की ईश्वर आपल्या  आतच असतो! म्हणजे काय!

गणपती अथर्वशीर्षात म्हटलंय " त्वम मूलाधारस्थितोसी नित्यम!" म्हणजे गणपती शरीराच्या आत मूलाधार , म्हणजे शेवटच्या मणक्यात स्थित असतो.
मग मंदिरात का जातात लोक!?

दरवर्षी लोक मरतात अमरनाथ यात्रेत, केदरनाथला शेकडो लोक मृत्युमुखी पडले होते. वैष्णोदेवी, हिमालयात दर्शनाला जाताना गाड्याना अपघात होतो,काही वर्षांपूर्वी सताऱ्याजवळील काळूबाईला लोक चेंगराचेंगरीत मेले होते. अश्यावेळी देव यांना वाचवत नाहीत का!
तरीही लोक कुटुंबापासून दूर शेकडो किमी अंतरावर का जातात!
मी तरी का आलो इथे! फक्त निसर्ग बघायला? अनुभव घ्यायला!

आणि शेवटी तो नेहमीचा प्रश्न , देव खरंच आहे का?

या प्रश्नांची उत्तरे व्यक्तीपरत्वे, काळ, वेळ परत्वे, दृष्टिकोनपरत्वे कदाचित असतात.

दुसऱ्या दिवशीचं पहाटे चार वाजताच्या बसचं आरक्षण मिळालं होतं.
सर्व जण आपापल्या कुटुंबियांसोबत, सहकाऱ्यांसोबत जागा राखून झोपले, बसले होते.
प्रचंड मोठे तीन मजल्यावर एकूण 10 सभागृह होते.आणि ते सर्व गच्च भरले होते. फोन चार्जिंगसाठी प्रत्येकाची कसरत सुरू होती.

जवळच्या एका हॉलमधून घोषणा झाली यात्रेकरुंनी जेवायला यावे. सतत उत्साहाने, प्रेमाने सतत एक व्यक्ती जेवण्यासंबंधी सूचना देत होती. मुसळधार पावसात शेडमध्ये सर्व जण रांगेत लागून हॉलमध्ये प्रवेश करत होते.अत्यन्त चविष्ट उत्तर भारतीय गरम जेवण, साजूक तुपातील गोड शिरा खाउन सर्वजण तृप्त होत होते.

दिवसभर सलग पाच मिनिटे ही न थांबता रात्रभरही मुसळधार पाऊस सुरू होता .लोकांमध्ये दुसऱ्या दिवशी पहाटे उठण्याच्या गोष्टी सुरू होत्या  पण मला कल्पना होती की उद्या बसेस निघणे अत्यन्त कठीण असणारे कारण राष्ट्रीय महामार्ग 1 अत्यन्त नाजूक आहे. दरडी कधीही कोसळतात.

पहाटे पाऊस थांबलेला होता.अंधारात आकाशाकडे बघता काहीही कळत नव्हतं.अंधारात तसेही सत्य कळत नाही. म्हणून प्रकाशाचं महत्व असतं.
पहाटे लोक तयार होऊन ,बॅग्स घेऊन खाली जमू लागले. मी गॅलरीतच बसून खाली चाललेली लोकांची धावपळ बघत होतो. आणि थोड्याच वेळात अपेक्षेप्रमाणे घोषणा झाली, काश्मीर खोऱ्याकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग दरडी कोसळल्यामुळे बंद झाला आहे.त्यामुळे आज बसेस, जथ्था जाणार नाही.

पाऊस बंद झालाय ही मनाला दिलासा देणारी एक गोष्ट होती त्यावरही पाणी पडलं. पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला. पहाटे साडे चारला शक्तिशाली हॅलोजन दिव्यांच्या प्रकाशात पुन्हा पावसाच्या जोरदार धारा स्पष्ट दिसू लागल्यात.

आकाशातील कृष्ण ढग आणि मनावर निराशेचे काळे ढग आणखी गडद होऊ लागलेत. मला कदाचित यात्रा रद्द करावं लागणार हे वाटू लागलं. कारण दोन दिवस उशिरा तारीख मिळाल्याने परतीचं आरक्षण अगदी तंतोतंत होतं, आणि शिवाय इथे आदल्या दिवशीचा एक दिवस वाया गेला होता, आणि पुन्हा त्या दिवशीही जथथा निघणार नाही घोषणा झाली होती. पाऊस थांबला नाही तर अजून किती दिवस इथे अडकून राहतील नक्की नव्हतं. तब्येत अस्वस्थ दिल्लीपासूनच झाली होती. पोटाने असहकार , 'अस्वीकार' मोहीम चालवली होती. सगळं काही 'झिडकारून' टाकत होतं. फोनमधील ऊर्जेचं चैतन्य संपल्याने तो बेशुद्ध झाला होता. लोक फोन चार्ज करायला संडास बाथरूममधील सॉकेट सुद्धा तपासून बघत होते. गर्दी अजून वाढतच होती.

यावर्षीही अमरनाथला जाणं इथे येऊन रद्द होतय खात्री होऊ लागली. खूप एकाकी निराश वाटू लागलं. पाऊस मुसळधार सुरूच होता.

सकाळी चे सहा वाजलेत. गडद काळ्या ढगांची चादर अंधुक उजेडात दिसू लागली. निराशेने मी आत डॉरमेट्रीमध्ये माझ्या जागी गेलो. माझी मिलिटरी प्रकारातील दहा किलोची अवाढव्य बॅग माझ्या बेडिंगवरती पहुडली होती. रात्रभर झोप न झाल्याने आणि मनात कुठेतरी नकळत आपोआप प्रार्थना सुरू होती की पाऊस थांबावा.

थोड्यावेळाने उठलो.बाहेर आलो बाल्कनीतून समोर बघितलं की आनंदाचा आशेचा 'किरण' दिसला.
 क्षितिजावर काळे ढग दूर होऊन निळसर पिवळं आकाश दिसत होतं.त्यातून प्रकाश येत होता. प्रकाशाचं असं असतं तो कधीच नष्ट होत नाही जिथून जागा मिळेल तिथून बाहेर येतो. चिवट असतो. सकारत्मक असतो.

 सकाळी नऊ वाजेपर्यंत छान ऊन पडलं. जम्मूला आल्यापासून सतत पाऊस ,दमट वातावरण अनुभवल्यावर चार दिवसानंतर आकाश जरा स्वच्छ होऊन सूर्यप्रकाश दिसत होता. आल्हाददायक आणि उत्साह दाटला. लोक खाली येऊ लागलेत. आजचा दिवस रिकामा होता. खलील सभागृहात कीर्तन, प्रवचन सुरू होत. तेथील भंडारात सकाळचा चहा, दुपार रात्रीचं जेवण मिळत होत. पण मी माझ्या पोटाच्या असहकार मोहिमेत भरडला जात होतो. दिवसभर मी काहीच खाल्लं नाही. रात्री संध्याकाळी स्टेजवर काही कलाकारांनी शंकर पार्वती वेशात सुंदर नृत्य सादर केले. दिवसभर न्यूज चॅनलचे पत्रकार येत होते.
पण अजून दुसऱ्या दिवशी बद्दल ही साशंकता होती.

रात्रीचे साडे आठ झाले मी गळून गेलो होतो. पण रात्री एक चक्कर मारायला खाली आलो.तेव्हा लाऊड स्पीकरवर घोषणा झाली की सगळ्या यात्रेकरूंनी तयार असावे आज रात्रीच अडीच वाजता बसेस पहलगाम, ला निघणार!

लोक उत्साहात बम बम भोले चा बोलू लागलेत!
 वातावरण उत्साहपूर्ण झालं मी ताबडतोब जिथे मिळेल तेथे मोबाईल चार्ज करण्यासाठी सॉकेट शोधू लागलो. लोक रात्री अकरा वाजतपासून अंघोळीला जाऊ लागलेत. बरेचजण जितका आराम करता येईल तितका घेण्यासाठी झोपलेत कारण हा जम्मू ते पहलगाम दहा अकरा तासांचा असणार होता.
मी एकटा असल्याने झोपण्याचा धोका पत्ककरणार नव्हतो.

रात्री पाऊण वाजताच मी तयार होऊन बाहेर पडलो. काही अंतरावर बसेस एक मोकळ्या मैदानात लागल्या होत्या. आपापल्याला पावतीवर दिलेल्या क्रमांकाच्या बसमध्येच आणि दिलेल्या सीट नंबरच बसायचं होतं.

जवळपास शंभर बसेस मैदानभर लागल्या होत्या. मी माझी बस शोधत होतो पाठीवर वजनदार सॅक उचलून मी संपूर्ण मैदान, पुन्हा पुन्हा सर्व बसेस बघितल्यात पण माझ्या क्रमांकाची बस काही दिसली नाही. दमट वातावरणात घामाने चिंब झालो होतो, शिवाय खूप थकलो ,अस्वस्थ वाटू लागलं. भीतीही दाटली की मला माझी बस दिसली नाही आणि संपूर्ण जथा निघाला तर! कारण लोक आता आपल्या बसेस मध्ये बसले होते. तेवढ्यात एक काश्मिरी माणूस हातात कागद घेऊन क्रमांक तपासून चालकसोबत बोलताना दिसला. शक्ती एकवटून त्याच्यापर्यंत जाऊन चौकशी केली.तेव्हा त्याने कागद बघून सांगितलं अजून त्या क्रमांकाची बस यायची आहे.
हुश्श मला खूप  हायसं वाटलं पण इतक्या लवकर येऊन इतकी मेहनत वाया गेली होती. शिवाय प्रचंड थकवा, घामामुळे बरं वाटत नव्हतंच.

पाच मिनिटात बस आली. नशिबाने विंडो सीट मिळाली. तोवर साडे तीन वाजले होते. आर्मी च्या गाड्या, खूप सैनिक, मोठ्या हुद्द्यावरचे ऑफिसर्स दिसत होते.
प्रत्येक बस ची कसून तपासणी झाली. बसचं इंजिन सुरू झाल्याचा आवाज आला ,समोर शस्त्रसज्ज सैनिकांची एक गाडी सर्वात पुढे  निघाली त्यामागे आमच्या बसेस निघाल्यात. आणि सर्वात शेवटी शस्त्रसज्ज जवानांची गाडी असा आमचा jathha निघाला. संपूर्ण परिसर बम बम भोले जयजयकराने निनादला!

सकाळी सूर्यप्रकाशात जे दिसलं ते रौद्र हिमालयाचे दर्शन होतं.
मोठ्या घराएवढे दगडं,पाषाण, दरडी रस्त्याच्या बाजूला लागले होते. प्रचंड चिखल, माती होती. स्पष्टपणे कळत होतं या दरडी परवाच्या पावसामुळे वरून कोसळल्या आहेत. आदल्या दिवशी
यात्रा रद्द करणे किती योग्य होतं हे कळलं.

Thursday 22 February 2018

चलो अमरनाथ

"मी त्याला बघितलं! तो मला स्पष्ट दिसला!हो मी त्याला बघितलं!" स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या काश्मीर यात्रेमध्ये अमरनाथाचे दर्शन घेतल्यावर भगिनी निवेदितांना म्हटलेले हे वाक्य मी त्यांच्यावर लिहिलेल्या एका चरित्रात्मक पुस्तकात , मी दहावीत असताना वाचले त्यातील काश्मीर निसर्ग वर्णन वाचून अमरनाथ या काहीही माहिती नसलेल्या 'गोष्टीबद्दल' आकर्षण निर्माण झाले. आणि स्वामी विवेकानंद त्या काळात खडतर यात्रा करून अमरनाथचे दर्शन घेऊ शकतात तर मग आज आधुनिक काळात आपण नक्कीच अमरनाथला एकदा जायचंच हे तेव्हा ठरवलं होतं.

 शालेय वयात जे वाचतो त्याचा मनावर प्रभावी ठसा उमटतो. त्याच काळात कैलास मानस सरोवरावरील एक पुस्तक वाचून कैलास मानस यात्रा करण्याचं ठरवलं होतं. सिंदबादच्या सफरी वाचताना मी ही, त्याच्यासोबत समुद्र पादाक्रांत करायचो. तेव्हा ज्या ज्या प्रवासासमबंधीत इच्छा निर्माण झाल्या त्यातील अमरनाथ यात्रा ही त्यातल्या त्यात सोपी आणि छोटी आहे आणि आवाक्यातील आहे हे पुढे कळल्यावर अमरनाथ यात्रा करायचीच हे ठरवलं होतं.

'यात्रा' या शब्दाचा अर्थ फार संकुचित वाटतो. एक ठिसूळ धार्मिक आवरण असतं या शब्दाला सतत. त्यामुळे हा यात्रा शब्द तरुण लोक एन्जॉय करत नाही.

शिवाय कोणी तरुण कोण्या 'यात्रेला' जायचं म्हणतो तर वयाने मोठ्या लोकांकडून म्हटलं जातं की यात्रा वगैरे हे म्हातारपणी करायच्या असतात.
पण मला ही गोष्ट कधीच पटत नाही. यात्रा असो वा व्यायाम, वा अभ्यास यासाठी शरीर आरोग्य महत्वाचे असते त्यामुळे या गोष्टी योग्य मेळ साधून तरुण वयातच करता येऊ शकतात. करायला हरकत नसते.

 त्यामुळे मी यात्रा या धार्मिक आवरणाखाली असलेल्या शब्दाला 'ट्रेक' संबोधतो. ट्रेक म्हटलं की एक एनर्जी मिळते, तरुण शब्द वाटतो, शिवाय शब्द 'सेक्युलर' वाटतो.

हिमालयाचं एक आकर्षण मला लहानपणापासून होतं. 2013 पासून मी अमरनाथला जाण्याचा प्रयत्न करत होतो. 2013 वेळी सर्व तयारी झाली होती. पण जुलै 2013 ला केदारनाथ प्रलय झाला , कुटुंबीयांनी स्पष्टपणे मला जाउ देण्यासाठी नकार दिला. 2014 मध्ये सर्व कागदी औपचारिकता पूर्ण झालेली, रेल्वे आरक्षण झाले. जाण्याच्या दोन दिवस आधी कधी नव्हे ती तब्येत खूप खराब झाली. त्यामुळे रद्द करावं लागलं.
2015 मध्ये नेपाळ मध्ये भूकंप झाला. हिमालय हादरला. त्याचे पडसाद उमटतातच सर्व पर्वतरागांमध्ये !तरीही जाण्याचे ठरवले पण जाण्याच्या तीन दिवस काही कारणांमुळे पुन्हा रद्द झाले. तेव्हा नाशिकमध्ये कुंभमेळा सुरू होता. खूप नाराज झालो.
पुन्हा घरुन कडक विरोध नेमीप्रमाणे झालाच.
 2016 मध्ये पुन्हा नेहमीप्रमाणे तारखेसंबंधीत सर्व कागदी औपचारिकता पार पाडली.आरक्षण झालं. सगळं ठरलं 11 जुलै हा निघण्याचा दिवस जवळ आला. आणि 8 जुलै ला "बुऱ्हाण वाणी" चा खातमा झाला. संपूर्ण काश्मीर खोरं पेटुन उठलं,

 संचारबंदी झाली. अमरनाथ यात्रा खोळंबली. मी आरक्षण रद्द केलं.
दरवर्षी मी अमरनाथ ला जातोय हे एक दोन महिन्यांपासून बऱ्याच जणांना सांगायचो. घरील मंडळी कायम विरोधी पक्षाप्रमाणे विरोधात असायची. 'एकट्याने ' जाण्याचा ठराव मंजूर करायची नाही.

सलग चार वर्षे जाण्यात अपयश आल्याने  यावर्षी 2107 मध्ये मी खूप उत्सुक नव्हतो. मीच स्वतः न जाण्याचा निर्णय घेतला. पण जसजसा मे महिना सरू लागला. पुन्हा नेहमीप्रमाणे इच्छा होऊ लागली. तरीही मी त्या उत्साहाला , इच्छेला दुर्लक्ष करीत गेलो. जून महिण्याचा एक आठवडा संपला आणि मी किमान नेहमीप्रमाणे औपचारिकता पूर्ण करून आपली बाजू सुरक्षित करून टाकावी म्हणून यावेळी प्रथम रेल्वे आरक्षण केले. मी नेहमी अमरनाथयात्र सुरू होते त्या पहिल्या दिवसासाठीच माझी नोंदणी करत होतो. यावेळी ही मला पहिल्या दिवशीच निघायचे होते. त्यामुळे यात्रेचा पहिला दिवस धरून त्याप्रमाणे चार दिवसाआधीचं आरक्षण केलं. आणि त्यानंतर काही दिवसांनी बँकेतील औपचारिकता, परवाना काढला. यावेळी अमरनाथ यात्रा 29 जून पासून सुरू होणार होती. आणि मला यावेळी प्रथम बँकेतूनच अडथळा आला, 29 ,30 जून तारखा भरल्या होत्या. 1 जून उपलब्ध होतं.मी यांत्रिकतेने होकार दिला. माझं रजिस्ट्रेशन 1 जून चं झालं. आणि आरक्षण झाले होते 28जून नुसार!
पण मी यावर्षीही जाण्याची शक्यता आणि उत्साह कमीच होता त्यामुळे मी जास्त विचार केला नाही.

यावेळी मी कोणालाही माझ्या जाण्याबद्दल बोललो नाही.महेंद्रसिंग धोनीसारखं अति आवाज उत्साह न प्रदर्शित करता शांतपणे खेळत शेवटपर्यंत सामना न्यायचा आणि मग 'अटॅक' करायचा ठरवलं.

25 जून तारीख चार दिवसांवर येऊन ठेपली तोवर सगळं ठीक होतं.आणि मी क्रीज सोडून पहिला अटॅक केला, घरी सांगितलं मी अमरनाथ ला जातोय. घरन काही विशेष विरोध झाला नाही उलट पाठिंबा मिळाला! बॉल सीमारेषेपलीकडे जाऊन पडला! सिक्सर! पूर्वी सेहवागप्रमाणे सुरवातीलाच अति आक्रमक खेळायचो आणि माझी विकेट जायची! यावेळी धोनीच्या टेक्निकप्रमाणे खेळलो! महेंद्रसिंग धोनी जिंदाबाद!

 पण मी स्वतः कुठलीही तयारी यावेळी केलेली नव्हती. दोन दिवसंपूर्वी कपडे, गरम कपडे , रक सॅक धुतली, आणि पाऊस सुरू झाला! कपडे वाळतील की नाही याचा ताण आला! यावेळी पावसामुळे मॅच हारतो की काय परिस्थिती निर्माण झाली! यात तर डकवर्थ लुईस सिस्टम सुद्धा मदतीला येत नाही!

पण सूर्यदेव यावेळी प्रसन्न झालेत. वरूण देव आणि सूर्य देवमध्ये मांडवली होऊन, वरूणाने आपली झड थांबवून , घट्ट जाड कापसासारखी ढगांची दुलई दूर सारून सुर्याला पुन्हा निळ्या आकाशात तळपू दिले.

 आदल्या दिवशी घरी पी
पोहचलो. दुसऱ्या दिवशी 25 तारखेला दिल्लीपर्यंतच रेल्वे चे आरक्षण होते. दिल्ली ते जम्मू  आरक्षण उशीर केल्याने मिळाले नव्हत

सव्वीस तारखेला सकाळी साडे नऊ वाजता पाठीवर रक सॅक सखीला उचलून इंद्रप्रस्थाच्या जमिनीवर पाऊल ठेवले.
मला गाडीतच कळले होते की घाईत मी मोबाईलचं चार्जर, पॉवर बँक चा बॉक्स घरीच विसरलोय.पुढील 8दिवस विना मोबाईल राहायचा मी निर्णय गाडीतच घेतला होता. पण काहीतरी आठवण म्हणून फोटोज हवेतच! शिवाय घरी आई बाबा आजीला कशाला ताणात ठेवायचं म्हणून मोबाईल चार्जर शोधू लागलो. पण आश्चर्य म्हणजे नवी दिल्ली रेल्वे स्टेशन आजूबाजूला कुठेही मोबाईलचे दुकाने नव्हती.

10 किलो वजन असलेली सॅक पाठीवरू घेऊन मी आजूबाजूला चालत चालत जुन्या दिल्ली स्टेशनला जाऊन पॊहचलो तरीही एकही दुकान सापडलं नाही. मला  आश्चर्य वाटत होतं .तिथून ऑटो करून काश्मिरी गेट ला पोहचलो. कारण बस तिथूनच मिळणार होती. बसचे पाच पट वाढून सांगितलेले भाव बघता "दिल्ली के ठग" ही संकल्पना एकदा पूर्ण पटली. पावणे साडेतीनला शालिमार एक्सप्रेस जम्मूसाठी होती. 3 वाजता एक मोठं दुकान मला दिसलं तिथून चार्जर घेतलं आणि वेगाने रेल्वे स्टेशनकडे ऑटो करून निघालो. पोहचलो तेव्हा पंधरा मिनिटं बाकी होते आणि तिकीट लाईन ची लांबी बघता गाडी मिळने कठीण वाटत होते. पावसाळ्यातील दमट वातावरणातील ऊन स्वास्थ्यासाठी घातक असतं. दिल्लीच्या विषम वातावरणातील ते ऊन आधीच जालीम!
मला ताप आल्याप्रमाणे अस्वस्थ वाटू लागलं. उगीचच मी खूप अतिमेहनत केली होती.
मी अस्वस्थतेमुळे तिथेच तिकीट रांगाजवळ खाली अर्धा तास बसून राहिलो. पाच वाजता ट्रॅव्हल बस कंपनीने

बस निघेन म्हणून सांगून रात्री साडे बाराला गाडी निघाली.दुसऱ्या दिवशी एक वाजता कटराला पोहचलो.माझ्याकडे दोन पर्याय होते ,1 तारखेला पहलगाम हुन निघायचे असल्याने 2 दिवस मला कुठेतरी घालवायचे होते. जम्मूहुनच पुढे काश्मीरमध्ये जाण्यासाठी गाड्या मिळणार होत्या पण जम्मूला यात्रेकरुंची प्रचंड गर्दी असणार म्हणून मी कटराला गेलो. समोर मोठा वैष्णो देवीचा पर्वत दिसत होता.

जम्मू आणि काश्मीर राज्यात आपले सिमकार्ड्स चालत नसल्याने फोन बंद झाला होता. पण एकदा सोशल मिडियाची चव लागली की व्यक्ती त्याशिवाय जास्त काळ राहू शकत नाही. मी आधी 10 दिवस फोन शिवाय राहण्याचे ठरवले होते पण न राहवून तेथील नवं सिमकार्ड घेतलं. आणि ते योग्यच झालं.दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सूरु झाला त्यामुळे एकाजागी बसून सोशल मीडियावर , फोन वर वेळ घालवला.
30 तारखेलाही सकाळपासून खूप पाऊस सुरू होता पण मला लवकरात काश्मीर खोऱ्यात जायचं होतं.मी जम्मूला पोहचलो पण मला कोणतीही लोकल सुमो गाड्या मिळाल्या नाहीत. नंतर कळलं की यात्रेच्या काळात गाड्या सहज मिळत नाहीत. ऑटोवाल्यानीही मला जम्मू प्रवासी केंद्र, अमरनाथ यात्रेकरूंच्या बेस कॅम्पलाच जायला सांगितले. शहराच्या बाहेर असलेल्या कॅम्पच्या 2 किमी बाहेर आवारात पोहचलो आणि इथून मला खऱ्या अर्थाने अमरनाथ यात्रा म्हणजे काय आणि ती खास याचा अंदाज येऊ लागला. जागोजागी यात्रेकरुंची ,बॅगेची तपासणी सुरू झाली.कॅम्पच्या आत प्रवेश करण्यापूर्वी पाच ठिकाणी माझी, बॅगेची, आणि राजिस्ट्रेशन कार्डची कसून तपासणी झाली.

पाऊस सुरूच होता.
इथून सुरू झाला एक वेगळा अनुभव.. सर्वार्थाने काहीसा वेगळा, विचार करायला लावणारा..माणुसकीचे, दातृत्वाचे प्रदर्शन करणारा..समृद्ध करणारा..

Wednesday 14 February 2018

हीच ती वेळ हाच तो क्षण"

त्यालाही ती आवडायची. ती ही त्याला हळूहळू लक्षात घ्यायला लागली. लवकरच तिलाही तो आवडायला लागला होता. शेवटी मागच्यावर्षी त्याने तिला औपचारिकरित्या प्रपोज केलंच. बरेच हिंदी चित्रपट बघितल्याने तिनेही गालावर दोन हात ठेवून सरप्राईजड झाल्यासारखं “ओह माय गॉड!” वाले भाव देऊन ‘हो’ म्हटलं होतं.
‘अशावेळी’ दोघांनाही किस करायचं होतं पण त्यांना प्रायव्हसी  मिळाली नव्हती.

आणि हेच त्याच्या महादुःखाचं कारण होतं. प्रायव्हसी न मिळणे!
वर्ष झालं पण दोघेही आपापल्या कामात, आणि मित्र आणि लोकांच्या गराड्यात !
 आजवर एकांत मिळाला नसल्याने दोघेही, विशेषतः तो वैतागला होता.

14 फेब्रुवारीला ती बऱ्याच महिन्यांसाठी शहराबाहेर जाणार होती. म्हणून दोघांनीही ठरवून तेरा फेब्रुवारीला व्हॅलेन्टाईन्स डे च्या आदल्या दिवशी सुटी घेऊन बाहेर भेटायचं ठरवलं.

 आज त्याने तिला ‘किस’ करण्याचा चंग बांधलाच होता! सोशिअल मीडिया अपडेट्सवरून आज “किस डे” आहे हे कळलं होतं.
वाह आज छान इंग्लिश मुहूर्तही आहे तर! तो स्वतःशीच खुष होता.
तिचीही ‘ना’ नसणारच होती.
“पण किस करणार कुठे?” हा प्रश्न त्याला नेहमीप्रमाणे सतावत होता.

संपूर्ण दिवस आज सोबत घालवायचा ठरवलं होतं.
त्याने क्लुप्ती लढवली, मुव्ही हॉलमध्ये तिला किस करता येईल म्हणून मुव्ही बघायचं ठरवलं! त्याने दुपारी तिला तिच्या बिल्डिंगखालून तिला पिक अप केलं. वर तिच्या मैत्रिणी फ्लॅटमेट्स असल्याने वर जाण्यात काहीच अर्थ नव्हता.

ती खाली आली. तीने नवा हेअरकट केला होता. कॅजुअल्समध्येही ती नेहमीप्रमाणे आकर्षक दिसत होती.
ते मॉलच्या पार्किंगमध्ये पोहचले. त्याने बाईक मुद्दाम बेसमेंटला पार्किंगच्या भागात अगदी शेवटी एका मोठ्या पिलरच्या मागे लावली. तो सतत संधीच्या शोधात होताच.
ती चेहऱ्यावरील स्कार्फ काढत असताना त्याने आजूबाजूला  सगळीकडे दृष्टी फिरवली. कोणीही दिसलं नाही. हीच ती वेळ हाच तो क्षण! तो तिच्या जवळ गेला. तिलाही ते अगदी अनपेक्षित होतं. तो तिला किस करणार तर …
“कौन है उधर पिछे! इतना टाईम क्यू लग रहा है पार्किंग मे!”

“हा बस चाबी गिर गयी थी! जा ही रहे है!”

तिथल्या सिक्युरिटीगार्ड ने त्याचं “मिशन चुंबन” काही पूर्ण होऊ दिलं नाही.
ती ही या सगळ्या मजेदार प्रकारामुळे हसत होती.

ते वरच्या मजल्यावर मुव्ही हॉलपाशी पोहचले. बस हीच ती जागा! जी अजरामर होणार आठवणीत! प्रथम चुंबन स्थळ!
कुठल्या तरी फ्लॉप मुव्हीचं तिकीट काढायचं त्याने ठरवलं होतंच.
पण सर्व चित्रपट याच आठवड्यात रिलीज झालेले.

“टू कॉर्नर सीट्स प्लिज !” त्याने काचेपलीकडील नेव्ही ब्ल्यू कॅप घातलेल्या मुलाला सांगितलं.
“सॉरी टॉपमोस्ट कॉर्नर सीट्स आर नॉट अवेलेबल!” ओन्ली एट मिडल सीट्स आर अवेलेबल!

अरेरे हे काय! ही संधीही जाते काय! बघू आत जाऊन तर!
पण काम-देवाचं नाव घेऊन त्याने उपलब्ध सीट्सपैकी दोन सीट्स बुक केल्यात.

आत संपूर्ण हॉल भरला होता. ते आपल्या सीट्स वर जाऊन बसलेत. हॉलमधील दिवे हळूहळू धूसर होत काळोखाची चादर पसरली. शेजारच्या आणि मागच्या जागेवर कोणीही नव्हतं. त्याला खूप आनंद झाला. तिलाही झाला. पण त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता, ती मात्र नॉर्मल होती.

 तितक्यात एक घोळका आला. एक मोठं कुटुंब आलं. त्यात काही वृद्ध बायका माणसेही होती. ते त्यांच्या मागे पुढे रिकाम्या आसनावर जाऊन बसलेत.
त्याचा पुन्हा हिरमोड झाला.

पण तिचं अगदी निकटचं सानिध्य अनुभवताना तो रोमांचित झाला होता. त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला. बस आता वाट बघायची होती नेमक्या क्षणाची!
लोक चित्रपट बघण्यात गुंग असताना ,हीच ती वेळ हाच तो क्षण , तो तिच्या अगदी निकट पोहचला. त्याने हळूच मागे वळून बघितलं तर मागे दोन म्हातारे भिंगाच्या चष्म्यातून एकटक समोर याच्याकडेच बघत होते.
तो एकदम शरमून बाजूला झाला.
संपूर्ण चित्रपट त्याने चरफडत त्या दोन मागच्या आजोबांसोबत आणि शेजारच्या सतत आवाज करणारया चिल्लर पार्टी मुलांसोबतच बघितला.

एकदाचा रटाळ चित्रपट सम्पला. दोघे बाहेर आलेत. मग मॉलमध्ये गप्पा, इकडे तिकडे फिरून झालं पण त्याला प्रायव्हसी काही केल्या मिळत नव्हती. त्याचं लक्ष बाकी कश्यातच नव्हतं. तिची घरी परत जायची वेळ आली.
सगळ्यात वरच्या मजल्यावरून खाली जाताना येताना त्याच्या डोक्यात एक अजून अनप्रॅक्टिकल आयडिया सुचली. कॅप्सूल लिफ्ट ऐवजी त्याने नॉर्मल लिफ्टने खाली जायचं ठरवलं.

आह वाह संपूर्ण लिफ्ट रिकामी! आत ते दोघेच!
त्याने ‘G’ च्या लाल बटणावर दाब दिला. लिफ्ट खाली जाऊ लागली.
“बस साठ सेकंदस है तुम्हारे पास , इस साठ सेकन्ड्स में अगर तुमने किस कर लिया तो ये साठ सेकंदस जिंदगी भर तुमहें याद रहेंगे! “तो स्वतःला मनातल्या मनात बजावू लागला. ती मात्र त्याच्या या क्लुप्तीपासून अनभिज्ञ होती.
हीच ती वेळ हाच...
 त्याने तिला हळूच जवळ घेण्याचा प्रयत्न केला . तिने सरळ त्याला दूर केलं. “अरे काहीही काय सीसीटीव्ही कॅमेरा असतो लिफ्टमध्ये! ती विराट कोहली आणि अनुष्का शर्माची जाहिरात आठवत नाही का!

 ”हम्म.. त्यांचं त्या जाहिरातपासून सेटिंग जमलं..पण आपलं सेटिंग कधी जमणार!”
तो चरफडत स्वतःशी बोलत दूर झाला.

ते बाईकवरून तिच्या बिल्डिंगजवळ पोहचले. तो प्रवासभर नाराज होता. खाली बिल्डींगपाशी अंधार होता. झाडे वृक्षांमुळे ते जरा आडोश्यात उभे राहिलेत. त्याला पुन्हा संधी मिळाल्याची, हाच तो क्षण हीच ती वेळ असल्याची भावना झाली. “वृक्षवल्ली खरंच सोयरे असतात तरुण लोकांचे नाही! !” त्याने कामदेवाचं स्मरण करून तिच्या जवळ गेला.
तेवढ्यात एक माणूस बाईक थांबवून तिथे फोन वर बोलत राहिला.

त्याची शेवटची आशाही धुळीस मिळाली.
“या देशात कोणी शांत चित्ताने एक किसही नाही करू शकत का!”

तिला तितक्यात एक फोन आला. तो नाराजीने तिला बाय म्हणत जाऊ लागला. त्याची नाराजी, दुःख तिला कळत होतं.
तिचं फोन वर एक मिनिट बोलणं झाल्यावर, चेहऱ्यावर आणि डोळ्यात खट्याळ भाव आणत म्हणाली, “आज फ्लॅटमेट्स बाहेर गेले आहेत ट्रिपला! आज रात्री कोणीही नसणार वर! तू आज रात्री राहू शकतोस! आत्ता तिचाच फोन होता!”

शेवटच्या क्षणाला मरणाऱ्याच्या तोंडी अमृत पडावं आणि तो पुन्हा टवटवीत व्हावा अशी त्याची अवस्था झाली.
त्याने हवेत जोरदार उडी मारली त्याने! उडी मारून हवेत मागे पायाला पाय लावण्याचा हिरोची स्टाईल मारण्याचा प्रयत्न केला . पण जमले नाही. पायात पाय अडकून आपटायचा राहिला. पण आता त्याची कसलीच तक्रार नव्हती.
मिशन चुंबन आज शांतपणे, पूर्ण प्रायव्हसीमध्ये पूर्ण होणार होतं.

त्याला हॉलमध्ये बसवून ती तिच्या खोलीत गेली. आता त्याला घाईगडबड नव्हती संपूर्ण रात्र त्यांचीच होती! ती काही वेळाने बाहेर आली.
तिने गुडघ्यापर्यंत वन पिस घातलं होतं. केस ओलसर होते. हलकंसं लिपस्टिक लावलं होतं.
ती अत्यंत मादक दिसत होती.
त्याने तिला जवळ ओढलं. तिच्या मानेजवळील परफ्युमचा सुगंध त्याच्या गात्रा गात्रांना, संपूर्ण संवेदनांना पुलकित..जागृत करून गेला.

तो आणखी  तिच्या जवळ गेला. तिचा चेहरा त्याने दोन्ही हाताने हलकंसा धरून तिला किस करण्यासाठी सावधान झाला! हो हो हीच ती वेळ हाच तो क्षण!

तिने त्याला दूर केलं.
“ यु गॉट प्रोटेक्षन नो?”

“भुकेला मागतो एक किस आणि देव देतो..” अशी त्याची मनातल्या मनात अवस्था झाली.

तो अगदी चेहऱ्यावर स्वतःबद्दल अभिमानाचे भाव आणून तिच्या दोन्ही खांद्याना दोन हाताने पकडत म्हणाला,
“ तु माझा हा मोबाईल बघितलास?  सहा महिने झालेत अजून त्याचं स्क्रीनकव्हर मी काढलं नाही! मी कधी हेल्मेटशिवाय गाडी चालवताना तुला दिसलो का?  नवी बाईक घेतली तेव्हा कित्येक दिवस तिचं कव्हर काढलं नव्हतं! मित्र त्याला काँडम कव्हर म्हणायचे..बाईकला व्हर्जिन बाईक म्हणायचे!  अगं प्रोटेक्शनशिवाय तर मी काहीच करत नाही! प्रोटेक्शन इज मस्ट!
रुबाबात पॅन्टच्या खिशातून त्याने प्रोटेक्शनचं पाकीट काढलं! तिला दाखवलं!

“ओह्हो”! ‘क्या बात है!”
तिनेच त्याला ओढून आपल्या खोलीत घेऊन गेली. त्याला बेडवर ढकललं. ती त्याच्या संपूर्णपणे जवळ आली..पुन्हा एकदा त्याच्या संवेदना जागृत झाल्यात..जोरदार उफाळून आल्यात..त्याला किस करण्यासाठी ती त्याच्या अगदी निकट आली.. बस्स हीच ती वेळ हाच तो क्षण!
ती त्याला किस करणार तितक्यात..
त्याने तिला थांबवलं..
“एक मिनिट! तू आज मला दुपारी भेटायच्या आधी काय खाल्लं होतं? तू जेवली होतीस का?”

“किती रे काळजी करतो माझी!
हो मी तेव्हा घरून फिश आणि चिकन करी खाऊन आले होते! आय एम फुल नाव!
त्याच्या ओठांवर बोट ठेऊन म्हणाली ,
“नाव डोन्ट टॉक ..जस्ट एन्जॉय धिस मोमेंट! वि हॅव ओन्ली वन नाईट फॉर अ लॉंग टाईम!”

त्याला किस करण्यासाठी त्याच्या चेहरा घट्ट तिने पकडला..कोणत्याही क्षणी त्याच्या आयुष्यातील त्याचं पाहिलं किस होणार होतं. दुष्काळ संपला होता. घनन घनन घन गिर जाये बदरा..पार्श्वसंगीत सुरू होतं.
आणि त्याने तिला त्याच क्षणी बाजूला केले . तो उठून बसला.

“काय तू आज चिकन खाल्लंस!
आज महाशिवरात्रीचा मला उपास आहे! मी तुला किस नाही करू शकत! माझा उपास मोडेल ना!
जातो मी! जय शंभो! महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!
बाय!

आणि तो तडक निघून गेला. तीला काही कळेनासं होऊन ती बघत राहिली!
 आज दुसऱ्यांदा शंकराने कामदेवाला भस्म केलं होतं.

समाप्त.

#किसडे #महाशिवरात्रीपेशल.
१३ फेब्रुवारी 018

-Abhijeet Panse

Monday 12 February 2018

किस डे

हग डे किस डे, वगैरे थेरं हे सोशिअल मिडीयामुळे बळावलेत , यावर बाहेर कोणाशी तरी वाद घालून वैतागुन गुरुजी वर्गात आलेत.
“पोरांनो हे किस डे वगैरे आजचे थिल्लर चाळे आहेत, तुम्ही याच्या नादी लागून बिघडू नका!

एक विद्यार्थी उठून, “ नाही गुर्जी चुंबन दिन यापूर्वी खूप वर्षांपूर्वी साजरा झालाय! तेव्हा चुंबन दिन कदाचित शुक्रवारी साजरा व्हायचा!
'अमिताभ बच्चन आजोबांनी  किमी काटकर काकूसोबत चुंबनदिन साजरा केला होता गुर्जी "!

"किमी काटकर मावशी आपल्या प्रॉमिसवर कायम राहत नव्हत्या म्हणून टायगर अमिताभ
त्यासाठी तिला दिल्या घेतल्या वचनांची ,चुम्बनांची शपथ तुला आहे,  जाणीव करून दिली.

दुसरं पोरगं उठून उभं राहत जोरात ओरडलं, “ अरी ओ जानेमन ! बाहर निकल
तू तर म्हटली होतीस
पिछले जुम्मे को
अगले जुम्मे को चुम्मा दुंगी
तो आज जुम्मा है
जुम्मा चुम्मा दे दे

एक पोरगी मध्येच चिरकली “गुर्जी तेव्हाही असे #ऱ्हाईमिंग शब्दात नावं ठेवले जायचे , जुम्मा चुम्मा !
जुम्मा चुम्मा दे!
आपल्या वर्गातही बबन आहे गुर्जी!
त्याची मैत्रीण त्याला म्हणते,” बबन चुंबन दे!”
अपर्णाला तिचा मित्र म्हणतो
"अप्पी पप्पी दे"!

गुर्जी चाट पडले!

दुसरं एक पोरगं आणखी मध्येच बोलू लागलं ,
गुर्जी त्यानंतर विरारच्या एका उडाणटप्पू पोराने शिल्पा शेट्टी आंटीकडे चुम्बनांची याचना केली. त्या उडाणटप्पू गोविंदा काकांकडे
 तेव्हा शेट्टी काकीला व्हॅलेंटाइन्स डेचं गिफ्ट द्यायला पैसे नव्हते म्हणून त्याने उधारी सुरू केली.

“एक चुम्मा तू मुझको उधार दै दे!
और बदले मे युपी बिहार लै ले!

गोविंदा काकांच्या या वागण्याने भैय्या लोकांच्या भावना दुखावल्यात गुर्जी ! त्याने चक्क उत्तर प्रदेश, बिहारला तारण म्हणून तेलुगू शेट्टी काकूकडे ठेवलं.
भैय्या लोक कित्ती काम करतात माहिती!

तेव्हा एक पोरगी चिरकली, " हो सर हे भैय्ये लोक कित्ती काम करतात! सक्काळी उठून माझ्यासाठी दूध आणतात! आमचे कपडे इस्त्री करतात! मला चना जोर गरम खूप आवडतं गुर्जी!”

पुन्हा आधीचं पोरगं बोलू लागलं “ गोविंद काकांचे सततच्या एक चुम्मा तू मुझको उधार दै दे या "चुंबन उधारी"मुळे कंटाळून शिल्पा काकीने “उधारी बंद” “आज नगद कल उधार!” “उधार मागून आम्हाला लाजवू नका!” असे बोर्ड लावलेत!

आणखी एक पोरगं बोलू लागलं, "पण पूढे काही वर्षांनी याच शिल्पा शेट्टी काकीने खिलजीप्रमाणे उत्तर प्रदेश बिहारवर स्वारी केली!
"दिलवालो के दिल का करार लुटने मैं आयी हु युपी बिहार लुटने!” पण त्या काळात लालूप्रसाद आजोबांनी मध्यस्थी करून ती डील रोखली.

बघीतलंत गुर्जी #आंतरराष्ट्रीयकिसडे खूप आधीपासूनच साजरा होतो आहे !

गुर्जी शब्दातीत!

पोट्टे रॉक्स गुर्जी इन शॉक!
या वाक्याशिवाय पूर्णाहुती होत नसते. म्हणून हे.

-Abhijeet Panse