Wednesday 31 May 2017

"Cinderella, a girl in yellow boots"

*सिंड्रेला ,ए गर्ल इन गोल्डन शुज*

ती दिसायला अतिशय आकर्षक आहे..स्लिम, उंच, मादक गौरवर्णीय ..शुभ्र कुर्ती, सोनेरी पिवळा रंगाची लेगइन ,नेहमी सोनेरी रंगाची हाय हिल्स ती घालते. काही वर्षांपासून ती सतत माझ्यावर तिचा मोहपाश टाकायचा प्रयतन करायची. मला woo करायची. तिचं गौरवर्ण, नाजूक शरीरयष्टी कोणाला हि भुरळ पाडेल.

ती गौरांगी तारुण्याने मुसमुसलेली नजरेने घायाळ करणारी ,दिसायला एलिगंट ,स्पर्श नाजूक पण आतून जबरदस्त हॉट! आत जणू निर्मात्याने दारुगोळा ठासून भरलेला..ज्याला जवळ घेईल त्याला आपल्या चुंबनाने धूआँ धूआँ करून टाकेल.
अशी ती काही दिवसांपासून माझ्या मागे लागलेली ..

पण मी कोणालातरी प्रॉमिस केल्यामुळे माझा संयम ढळू दिला नव्हता.
मित्र सगळे तिला 'हो' म्हण म्हणून मागे लागलेले..
"कोणीतरी..काहीतरी हवं रे आपलं म्हणून ..एकटेपण सहन नाही होत !
आता नाही करशील तर कधी? साल्या हेच वय आहे करण्याचं..सगळेच करतात..कोणीतरी पाहिजे यार जवळ, एकांत सहन नाही होत! आता नाही करशील तर कधी करशील! मोठ्या मोठ्या लोकांनी साधू पुरुषांनी केलंय ..यात काही वाईट नाही !
तू कशाला उगाच तिला नाही म्हणतोस..!"

सगळेच मला सतत कंविन्स करू पाहत..
त्यांच्या अश्या सततच्या बोलण्याने मी ही काही क्षण डळमळीत व्हायचो..

  तिच्या दीर्घ चुंबनाने कानाच्या पाळ्या गरम होत.. आतून शरीर  गरम होऊन जणू धूर बाहेर पडतोय का असा भास व्हायचा..ती होतीच ..आहेच इतकी इररेस्टिस्टेबल!सिंड्रेला ,किलिंग ब्युटी !!!!!!

 सर्व मित्र आपापल्या 'तिला' घेऊन यायचे. आपल्याकडे सार्वजनिक स्थळी कसे 'वागावे' याचे काही नियम आहेत पण आजकाल सवंग वागणारी आमची पिढी हे पाळत नाहीत. संयम नसलेले काही मित्र तर सार्वजनिक ठिकाणीही लपून पार्टनर्सचे दीर्घ चुंबन घेतात. समुद्रकिनाऱ्यावर , रात्री वॉक घेताना ही हलकेच तिला जवळ घेतात., प्रवासात, काही तर चित्रपट बघायला जाऊन कॉर्नर सीट वर ही...

मी मात्र फार अवघडतो अश्यावेळी. पण त्याना रोखण्याचा मला कोणता अधिकार म्हणून जरा दूर जाऊन बसतो.पण तरीही त्यांचे उसासे ऐकू येत असतातच.
मी शक्य तितकं दुर्लक्ष करायचो.

पण...
पण आता मात्र सर्वच मागे लागलेले..तिला हो म्हण..सतत ती सिंड्रेला ही माझ्याकडे मधाळ नजरेने बघायची.

मी मित्राला सांगायचो की मी नाही  तिला हो म्हणणार , मी घरच्यांना प्रॉमिस केलंय मी नाही असं काही चुकीच्या गोष्टी करणार..आणि एकदा तिला 'जवळ' घेतलं आणि मी तिच्या नादी लागलो तर..ती मला काय मीच तिला सोडणार नाही मग..मी काही मित्रांना नादी लागलेलं बघितलंय ..ते सतत तिच्या स्पर्शासाठी तळमळायचे..दीर्घ चुंबनात मग्न असायचे..त्यांचे उसासे..सगळं कळायचं..
म्हणून नकोच सध्या त्या मार्गावर..

पण त्यांच्या सततच्या कंविन्स करण्याने माझा संयम तुटला..मी तिला हो म्हणायचं ठरवलं..

पण त्यापुर्वी मी सिंड्रेलाची जरा माहिती काढली. मित्रांकडून तिची बरीच माहिती मिळवली.
ती स्वतंत्र , मोकळ्या विचारांच्या कुटुंबातील आहे. तिच्या घरच्यांचे फोटो बघिलेत. जाड डौलदार  शरीराचे तिचे आजोबा मुघलांकडे मोठ्या हुद्द्यावर होते.वडील आकर्षक पण तीच्याहून विरुद्ध वर्णीय, कृष्णवर्णीय , इंग्रजांकडे नोकरीस होते. स्वातंत्र्यानंतर ही त्यांनी काही काळ काम केलेत पण ऎब  रॉयल, खानदानी इंग्रजीच होता.

भाऊ तिचा बऱ्यापैकी जाडा आणि रंगात वडिलांवरच गेला होता. दुसरा मोठा भाऊ मात्र बैरागी निघाला. लहानपणापासून संत, साधू पुरुषांचा सहवास लाभल्याने तो कधी घरात, संसारात रमला नाही. संसारिक भोग त्यागून तो ब्रम्हानंद प्राप्तीसाठी हिमालयात , पर्वतांमध्ये साधू लोकांच्या आश्रयास गेला. क्वचित तो कधीतरी घरी येतो.
पण या सगळ्यात जरा कमनशिबी ठरली ती तिची थोरली बहीण. ती गरीब घरात पडली. रंगाने सावळी..समाजात मान नाही.
शेवटी रंग आणि अर्थ यांना नमस्कार करणारा आपला समाज. असो.
सिंड्रेलाच्या कुटुंबियांची तिच्या पूर्वजांची माहिती तर मिळाली होती.

               ........

'त्या' दिवशी मी मित्रांच्या दबावाला आणि तिच्या मोहपाशाला बळी पडून तिला हो म्हटलं. आमची ' डेट ' ठरली.

सकाळपासून माझं हृदय धडधडत होतं..कसं करायचं काय करायचं ..' जमेल' का ..विचारांनी दडपण आलं..
कसं 'करायचं' किती वेळा...केव्हा..'अनुभवी' मित्रांना विचारलं तर ते टर उडवु लागले. " अरे मर्द आहेस लेका काय घाबरतोस! हेच वय आहे करण्याचं सर्व..तरुण आहेस कितीही वेळा करू शकशील.. सकाळी , रात्री झोपण्यापूर्वी, पहाटे जाग आल्यावर..याला काही वेळकाळ थोडी बघतात.. घे तिला जवळ ..आणि लॉंग किस कर..

                ..........

ठरल्या वेळेप्रमाणे ती आली..तिने शुभ्र पांढरा फ्रॉक घातला होता. पायात नेहमीचे सोनेरी बूट होते. she was looking dam smoking hot!

मुद्दामुन एकांत मिळावा म्हणून मित्र सर्व बाहेर गेले होते. मी कोणी आजुबाजुला बघत कोणाचे लक्ष नाही ना याची खात्री करून घराचे दार बंद केले.

मित्रांनी सांगितल्याप्रमाणे सर्व सोपस्कार केले आणि त्या गौरांगी, शुभ्रा ला जवळ घेत त्या महाश्वेताचे दीर्घ चुंबन घेतले ..आणि ..पुढच्या क्षणाला

जो जोरदार ठसका लागला...
फोरप्ले ..'फोरस्क्वेअर' चा दीर्घ कश घेतला..तसा तो तंबाखूचा कटू तीक्ष्ण धूर छातीत गेला आणि मी जोरदार उबळ येऊन खोकू लागलो. नाका तोंडातून धूर येउ लागला. आणि ही  महाश्वेता " सिगारेट "अपने बस की बात नही हे समजून पुन्हा तिच्याकडे बघायचं नाही या सिंड्रेलाला स्पर्श करायचा नाही हा जन्मभरासाठी निश्चय केला! आयुष्यात कधी स्मोकिंग, धूम्रपान, सिगारेट , बिडी ओढायचं नाही ठरवलं.
 मेरी सेहत ही है मेरी ताकद!

आज जागतिक तंबाखु, धूम्रपान विरोध दिन.

सिंड्रेला महाश्वेता चे कुटुंबीय :-
मुघलांकडे हुद्द्यावर असलेले डॉलदार आजोबा-
 'हुक्का'

इंग्रजी डौल असलेले वडील - 'पाईप'

जाडा भाऊ - 'सिगार '

साधूंकडे गेलेला बैरागी भाऊ- "चिलीम , चिरुट"

गरीब घराण्यातील बहीण -' बिडी'

सिंड्रेला म्हणजे सिगारेटचे मूळ पूर्वज - "तेंदू पत्ता "

- अभिजीत पानसे

सिंड्रेला, अ गर्ल इन यलो बूट्स

*सिंड्रेला, ए गर्ल इन गोल्डन शुज*

ती दिसायला अतिशय आकर्षक आहे..स्लिम, उंच, मादक गौरवर्णीय ..शुभ्र कुर्ती, सोनेरी पिवळा रंगाची लेगइन ,नेहमी सोनेरी रंगाची हाय हिल्स ती घालते. काही वर्षांपासून ती सतत माझ्यावर तिचा मोहपाश टाकायचा प्रयतन करायची. मला woo करायची. तिचं गौरवर्ण, नाजूक शरीरयष्टी कोणाला हि भुरळ पाडेल.

ती गौरांगी तारुण्याने मुसमुसलेली नजरेने घायाळ करणारी ,दिसायला एलिगंट ,स्पर्श नाजूक पण आतून जबरदस्त हॉट! आत जणू निर्मात्याने दारुगोळा ठासून भरलेला..ज्याला जवळ घेईल त्याला आपल्या चुंबनाने धूआँ धूआँ करून टाकेल.
अशी ती काही दिवसांपासून माझ्या मागे लागलेली ..

पण मी कोणालातरी प्रॉमिस केल्यामुळे माझा संयम ढळू दिला नव्हता.
मित्र सगळे तिला 'हो' म्हण म्हणून मागे लागलेले..
"कोणीतरी..काहीतरी हवं रे आपलं म्हणून ..एकटेपण सहन नाही होत !
आता नाही करशील तर कधी? साल्या हेच वय आहे करण्याचं..सगळेच करतात..कोणीतरी पाहिजे यार जवळ, एकांत सहन नाही होत! आता नाही करशील तर कधी करशील! मोठ्या मोठ्या लोकांनी साधू पुरुषांनी केलंय ..यात काही वाईट नाही !
तू कशाला उगाच तिला नाही म्हणतोस..!"

सगळेच मला सतत कंविन्स करू पाहत..
त्यांच्या अश्या सततच्या बोलण्याने मी ही काही क्षण डळमळीत व्हायचो..

  तिच्या दीर्घ चुंबनाने कानाच्या पाळ्या गरम होत.. आतून शरीर  गरम होऊन जणू धूर बाहेर पडतोय का असा भास व्हायचा..ती होतीच ..आहेच इतकी इररेस्टिस्टेबल!सिंड्रेला ,किलिंग ब्युटी !!!!!!

 सर्व मित्र आपापल्या 'तिला' घेऊन यायचे. आपल्याकडे सार्वजनिक स्थळी कसे 'वागावे' याचे काही नियम आहेत पण आजकाल सवंग वागणारी आमची पिढी हे पाळत नाहीत. संयम नसलेले काही मित्र तर सार्वजनिक ठिकाणीही लपून पार्टनर्सचे दीर्घ चुंबन घेतात. समुद्रकिनाऱ्यावर , रात्री वॉक घेताना ही हलकेच तिला जवळ घेतात., प्रवासात, काही तर चित्रपट बघायला जाऊन कॉर्नर सीट वर ही...

मी मात्र फार अवघडतो अश्यावेळी. पण त्याना रोखण्याचा मला कोणता अधिकार म्हणून जरा दूर जाऊन बसतो.पण तरीही त्यांचे उसासे ऐकू येत असतातच.
मी शक्य तितकं दुर्लक्ष करायचो.

पण...
पण आता मात्र सर्वच मागे लागलेले..तिला हो म्हण..सतत ती सिंड्रेला ही माझ्याकडे मधाळ नजरेने बघायची.

मी मित्राला सांगायचो की मी नाही  तिला हो म्हणणार , मी घरच्यांना प्रॉमिस केलंय मी नाही असं काही चुकीच्या गोष्टी करणार..आणि एकदा तिला 'जवळ' घेतलं आणि मी तिच्या नादी लागलो तर..ती मला काय मीच तिला सोडणार नाही मग..मी काही मित्रांना नादी लागलेलं बघितलंय ..ते सतत तिच्या स्पर्शासाठी तळमळायचे..दीर्घ चुंबनात मग्न असायचे..त्यांचे उसासे..सगळं कळायचं..
म्हणून नकोच सध्या त्या मार्गावर..

पण त्यांच्या सततच्या कंविन्स करण्याने माझा संयम तुटला..मी तिला हो म्हणायचं ठरवलं..

पण त्यापुर्वी मी सिंड्रेलाची जरा माहिती काढली. मित्रांकडून तिची बरीच माहिती मिळवली.
ती स्वतंत्र , मोकळ्या विचारांच्या कुटुंबातील आहे. तिच्या घरच्यांचे फोटो बघिलेत. जाड डौलदार  शरीराचे तिचे आजोबा मुघलांकडे मोठ्या हुद्द्यावर होते.वडील आकर्षक पण तीच्याहून विरुद्ध वर्णीय, कृष्णवर्णीय , इंग्रजांकडे नोकरीस होते. स्वातंत्र्यानंतर ही त्यांनी काही काळ काम केलेत पण ऎब  रॉयल, खानदानी इंग्रजीच होता.

भाऊ तिचा बऱ्यापैकी जाडा आणि रंगात वडिलांवरच गेला होता. दुसरा मोठा भाऊ मात्र बैरागी निघाला. लहानपणापासून संत, साधू पुरुषांचा सहवास लाभल्याने तो कधी घरात, संसारात रमला नाही. संसारिक भोग त्यागून तो ब्रम्हानंद प्राप्तीसाठी हिमालयात , पर्वतांमध्ये साधू लोकांच्या आश्रयास गेला. क्वचित तो कधीतरी घरी येतो.
पण या सगळ्यात जरा कमनशिबी ठरली ती तिची थोरली बहीण. ती गरीब घरात पडली. रंगाने सावळी..समाजात मान नाही.
शेवटी रंग आणि अर्थ यांना नमस्कार करणारा आपला समाज. असो.
सिंड्रेलाच्या कुटुंबियांची तिच्या पूर्वजांची माहिती तर मिळाली होती.

               ........

'त्या' दिवशी मी मित्रांच्या दबावाला आणि तिच्या मोहपाशाला बळी पडून तिला हो म्हटलं. आमची ' डेट ' ठरली.

सकाळपासून माझं हृदय धडधडत होतं..कसं करायचं काय करायचं ..' जमेल' का ..विचारांनी दडपण आलं..
कसं 'करायचं' किती वेळा...केव्हा..'अनुभवी' मित्रांना विचारलं तर ते टर उडवु लागले. " अरे मर्द आहेस लेका काय घाबरतोस! हेच वय आहे करण्याचं सर्व..तरुण आहेस कितीही वेळा करू शकशील.. सकाळी , रात्री झोपण्यापूर्वी, पहाटे जाग आल्यावर..याला काही वेळकाळ थोडी बघतात.. घे तिला जवळ ..आणि लॉंग किस कर..

                ..........

ठरल्या वेळेप्रमाणे ती आली..तिने शुभ्र पांढरा फ्रॉक घातला होता. पायात नेहमीचे सोनेरी बूट होते. she was looking dam smoking hot!

मुद्दामुन एकांत मिळावा म्हणून मित्र सर्व बाहेर गेले होते. मी कोणी आजुबाजुला बघत कोणाचे लक्ष नाही ना याची खात्री करून घराचे दार बंद केले.

मित्रांनी सांगितल्याप्रमाणे सर्व सोपस्कार केले आणि त्या गौरांगी, शुभ्रा ला जवळ घेत त्या महाश्वेताचे दीर्घ चुंबन घेतले ..आणि ..पुढच्या क्षणाला

जो जोरदार ठसका लागला...
फोरप्ले ..'फोरस्क्वेअर' चा दीर्घ कश घेतला..तसा तो तंबाखूचा कटू तीक्ष्ण धूर छातीत गेला आणि मी जोरदार उबळ येऊन खोकू लागलो. नाका तोंडातून धूर येउ लागला. आणि ही  महाश्वेता " सिगारेट "अपने बस की बात नही हे समजून पुन्हा तिच्याकडे बघायचं नाही या सिंड्रेलाला स्पर्श करायचा नाही हा जन्मभरासाठी निश्चय केला! आयुष्यात कधी स्मोकिंग, धूम्रपान, सिगारेट , बिडी ओढायचं नाही ठरवलं.
 मेरी सेहत ही है मेरी ताकद!

आज जागतिक तंबाखु, धूम्रपान विरोध दिन.

सिंड्रेला महाश्वेता चे कुटुंबीय :-
मुघलांकडे हुद्द्यावर असलेले डॉलदार आजोबा-
 'हुक्का'

इंग्रजी डौल असलेले वडील - 'पाईप'

जाडा भाऊ - 'सिगार '

साधूंकडे गेलेला बैरागी भाऊ- "चिलीम , चिरुट"

गरीब घराण्यातील बहीण -' बिडी'

सिंड्रेला म्हणजे सिगारेटचे मूळ पूर्वज - "तेंदू पत्ता "

- अभिजीत पानसे

Tuesday 30 May 2017

काय होईल जर पुरुष स्त्री...

*(विमेन्सडेनिमित्त) "जावेत्याच्यावंशातेव्हाची...*

 मे 2017 ,लोकप्रभा

   स्त्रीच्या भाव विश्वाची ,व्यथेची सफर घडवून आणणारी ही वेब सीरिज जागतिक स्तरावर पोहचली आहे.

पलीकडील बाजूचे गवत नेहमीच हिरवे वाटते.ही आपली मानसिकता आहे.
पण " जावे त्याच्या वंशा तेव्हाची कळे".व्यक्तीला, जनसमूहाला ,समाजाला,किंवा स्त्री आणि पुरुष यांनाही स्वतःच्या आयुष्याबद्दल ,प्राप्त परिस्थितीबद्दल कधीतरी वैषम्य वाटतंच,इतरांचं आयुष्य सोपं असतं असं वाटतं. त्याबद्दल असूया वाटते.आणि कधितरी हा विचार मनात येतोच की जर ही स्थिती, हा समाज, हे जग जसे आहे असे नसून 'तसे' असते तर, जर मी त्यांच्याजागी असतो वा असती तर..

हे जग पुरुषप्रधान आहे, इथे पुरुषाचं वर्चस्व असतं. स्त्री ची पिळवणूक होते.एकट्या स्त्रीला जगण्यात नेहमीच अडचणी येतात.हा सर्वसामान्य स्त्रीचा दृष्टिकोन, मानसिकता असते.

पुरुषांना वाटतं या पुरुषप्रधान जगात स्त्रीयांना जास्त सवलती मिळतात, स्त्रीयांना जास्त मदत ,पाठिंबा मिळतो.सर्व जबाबदारी पुरुषांनाच घ्यावी लागते.मनात या तक्रारी निर्माण होत राहतात.

पण जावे त्याच्या वंशा तेव्हाची कळे. संबंधित व्यक्ती, वा समूहाच्या बुटांमध्ये स्वतः पाय घालुन बघितल्याशिवाय त्या त्या व्यक्ती, व्यक्ती समूहाच्या अडचणी, जाबाबदारी, व्यथा समजू शकत नाही.
कारण #पलीकडचे गवत नेहमीच हिरवे दिसते.

पण जर पलीकडे जाऊन ते गवत खरच 'हिरवं 'आहे का बघता आलं तर!तेव्हा कदाचित सत्य कळू शकेल.
आणि ते कळल्यावर तरी आपली  मानसिकता बदलेल का!

यावर वाय फिल्म्स ची "मेन्स वर्ल्ड" ही वेब सीरिज जबरदस्त प्रभावशाली भाष्य करते.
पुरुष आणि स्त्री यांच्यातील लैंगिक भेदभावावर यापूर्वीही काही चांगले आणि सुमार चित्रपट येऊन गेलेत.(सुमार चित्रपट- अंतरा माळी, रामूज मुवि)
 पण त्या सर्वांचा भर हा विनोद निर्मिती आणि मनोरंजन यावरच होता.त्या कलाकृतींना दिलेली ट्रीटमेंट ही वरवरचीच आणि उथळ होती.पण मेन्स वर्ल्ड ही वेब सीरिज उच्च दर्जाची आहे.विनोदी आवरण आहे पण खोल विचार आहे.विचार करायला लावणारी आहे.

किरण नावाचा एक तरुण मुलगा जो स्त्रियांनाना मिळणाऱ्या सवलती , ,कामाच्या जागी मिळणारी मदत,सूट प्रेफरन्सेस या एकसुरी विचार ,अर्धवट पूर्वग्रहदूषित दृष्टीमुळे  तो त्रस्त होऊन एकदिवस दारूच्या नशेत मनापासून देवाला प्रार्थना करतो की हे जग यातील परंपरा, पद्धती,विचार प्रक्रिया पूर्णपणे उलट होऊ दे.त्याच्यानुसार तथाकथित पुरुषप्रधान जगात स्त्रियांना मिळणारी खास वागणूक बदलून हे जग "स्त्री प्रधान" व्हावं आणि  पुरुषांना खास वेगळी वागणूक मिळावी ही इच्छा करतो.
पण ते म्हणतात ना "तुम्ही जी इच्छा करता ,मागता त्याबद्दल फार जागरूक राहा,कारण कोणास माहिती ती इच्छा पुर्ण होइलही."

आणि किरण ची मागणी पूर्ण होते.दुसऱ्या दिवशी तो उठतो तर हळूहळू त्याच्या लक्षात येत जातं की त्याची मागणी ,प्रार्थना मान्य झाली आहे.

"लडका है अपने औकात मे रहे!"
" आजसे तुम्हारा काम वाम सब बंद, बहार घुमना बंद अब बस तुम्हारी शादी होगी.. और वो भी मै जिस लडकी के साथ बोलुंगी उसिसे.."अश्या बोलण्यांचा भडिमार किरणवर होऊ लागतो.

बस मध्ये "फक्त पुरुषांसाठी" जागा आरक्षित असतात."मेन्स युनिव्हर्सिटी" दिसते.
मॅकडोनाल्ड च्या जागी 'मॅकडॉना' होते.जग हे स्त्री प्रधान झालं असतं.

 किरणला या जगाचेही तोटे ,पुरुषांचे आणि स्त्रीयांचे प्रश्न अडचणी कळू लागतात.त्याला आता हे जग नकोसं वाटू लागतं. हळूहळू तो याच जगात रुळतो.कारण आता सुटका नसते.
शेवटी एकदा रात्री उशिरा एकट्या 'पुरुषाला' पाहून शोषण ,विनयभंग करणाऱ्या समाज कंटक मुली त्याला त्रास देतात ,पोलिसात ही  त्याला दाद मिळत नाही.तिथेही त्याचं शोषण केलं जातं.तेव्हा त्या एकट्या पुरुषाला एक समंजस मुलगी वाचवते.तेव्हा किरण तिला सांगतो की या सर्व प्रकाराला तोच जबाबदार आहे.
हे दृश्य आणि संवाद छान जमलंय.
यावेळी ती किरणला जग आधीसारखं व्हावं म्हणून पुन्हा प्रार्थना करायला सांगते.आणि तो करतो.दुसऱ्या दिवशी सकाळी उठतो.त्याला जाणवतं की तो एका स्वप्नातून जागा झालाय.

या सीरिजचा जो शेवट केलाय तो अप्रतिम .पूर्ण पैकी पूर्ण गुण जातात ते लेखकाला आणि दिगदर्शक विक्रम गुप्ताला. या शेवटामुळे ही वेब सीरिज एक उच्च दर्जा गाठते.हिंदी मध्ये खूप चांगल्या वेब सीरिज तयार होताहेत.मेन्स वर्ल्ड ही त्यातील सर्वोत्तम पैकी एक! अतिशय गांभीर्याने विनोदाच्या साहाय्याने स्त्रीचे प्रश्न, अडचणी, जग दर्शवलंय.

युनायटेड नेशन्सने "#ग्लोबलगोल्स" ही संकल्पना "सुटेबल डेवलपमेंट" हे द्येय समोर ठेऊन पुरस्कारित केली आहे.यात पाच गोल्स आहेत त्यातील एक, लैंगिक भेदभाव दूर करून स्त्री पुरुषांना समसमान वागणूक  व संधी उपलब्ध करून देणे हे होय.यशराज फिल्म्सने या गोल ला पाठिंबा दर्शवत ग्लोबल गोल्स या संस्थेसोबत मिळून चार भागांची " मेन्स वर्ल्ड ”या वेब सीरिजची निर्मिती केली.
वाय फिल्म्सची सीरिज असल्याने यातील कास्टिंग चांगलं आहेच.प्रमुख भूमिका गौरव पांडे या अभिनेत्याची आहे.आणि त्याने सम्पूर्ण न्याय आपल्या भूमीकेला दिला आहे.शिवाय यात परिणीती चोप्रा, कल्की कोचलिन, भूमी पेडणेकर , रिया चक्रवर्ती , या प्रमुख हिंदी चित्रपट अभिनेत्रींनीही काम केलंय.
त्यामुळेही या सीरिज चा दर्जा वधारला आहे.

या प्रकारच्या विषयावर इंग्रजी, मराठी ,हिंदी चित्रपट आले आहेतच.पण इतका तरल भाव दर्शवणारी ,खोल प्रभाव पाडणारी विचार करायला लावणारी प्रसंगी अंगावर शहारे आणणारी कलाकृती हीच प्रथम असावी.आहेच.वरवर विनोदी आवरण पण मुळीच उथळ नसलेली ही कलाकृती आहे.कुठलेही उपदेश ना देता नेमक्या गोष्टीवर भाष्य करणारी ,मनोरंजन करीत मनाला अस्वस्थ करणारी ही कलाकृती. सामाजिक संदेश देतानाही एकसुरी ,शब्दबंबाळ नसलेली ही नेट सिरीज ,स्त्रीयांच्या अडचणीचे ,भाव विश्वाची व्यथेची तंतोतंत दर्शन आणि अनुभव करून आणणारी ही कलाकृती "मस्ट वॉच " आहे.

"ये दुनिया हम औरतो की होकर भी हमारी नही है!बाप की बापता सबको दिखायी देती है लेकीन माँ की ममता किसिको नही. इमोशनल हो जाये तो सब केहते है बाप कि कसम कहते है माँ की कसम कोई नही कहता!
फादर इंडिया सुपर हिट हुई लेकीन मदर इंडिया कभी फिल्म बन ही नही सकती..."हे संवाद बदलेल्या स्त्री प्रधान जगातील एका स्त्री पात्राचे आहेत. यातून आपल्या मुळातच एकंदर मानसिकतेवर प्रकाश लेखकाने टाकला आहे.अत्यंत गांभीर्याने या विनोदी वेब सीरिजची निर्मिती केली गेली आहे हे प्रत्येक नेटिसोड बघताना  जाणवतं. चार ही भाग अप्रतिम जमले आहेत.

What if women treated men the way men treat women
It is the story of walking a mile ,in their shoe,in that world.
 ही टॅग लाईन असलेली मेन्स वर्ल्ड ही वेब सिरीज या  #WOMEN's डे निमित्त नक्की समस्त स्त्री पुरुषांनी नक्की बघावीच अशी आहे.

-Abhijeet Panse

लोकसत्ता ,वेब सिरीज लेख.


Sunday 28 May 2017

यावर्षीचा शौर्य पुरस्कारासाठी छोटा चेतन भगत आणि एकता कपूरची निवड




तुम्ही हाफ म्याड आहात का?  कोण नसतं म्हणा. पण ते जगजाहीर करायची इच्छा आहे का? एक सोपा मार्ग आहे घरातून निघायचं आणि हाफ गर्ल फ्रेंड बघायला जायचं.
 प्रस्तुत लेखक आधीच जगजाहिररित्या म्याड आहेच. त्यामुळे आता काहीही फरक पडणार नाही.रेडा उन्हात कितीही फिरला तरी त्याची स्किन टॅन होत नाही.
ज्याने अब्बास मस्तान चा 'मशीन' थिएटर मध्ये जाऊन बघितला तो आता या सगळ्या चांगल्या वाईट हाफ वाईट सगळ्यांच्या पलीकडे गेला आहे समजावे.

तीन वर्षापूर्वीच लोकांनी नाकारलेल्या पुस्तकावर चित्रपट बनवायला जिगरा.. हिम्मत लागते! ते शौर्य दाखवले आहे सासू सुना उद्धारक क्..क्.. एकता कपुर आणि महान नृत्यज्ञानी नृत्यसमीक्षक नृत्य जजसाब , ट्विटरनिर्दालक साहित्यकार "छोटाचेतनभगत" यांनी!त्यामुळे राष्ट्रपतीहस्ते यावर्षीचा शौर्य पुरस्कार एकता कपूर आणि भगत यांना मिळण्याची शक्यता आहे.

हा चित्रपट चिंगम ..बूम बुम बुमर प्रमाणे पहिले दहा मिनिटे चांगला वाटतो नंतर बेचव रबर चावत बसावे लागतं.

भयंकर मूर्खपणाचा कळस म्हणजे ; लहान मुलीला आई बाबांनी गच्चीवर जायला मनाई केली म्हणून आई बाबांची सहज नजर चुकवुन गच्चीवर जावं अश्या प्रकारे या सिनेमात श्रद्धा कपूर म्हणजे रिया सहज फक्त एका सिक्युरिटी गार्ड ची नजर चुकवून #इंडियागेट च्या गच्चीवर जाऊन बसत असते. आणि तिच्या म्हणण्यानुसार, ती काय म्हणणार बिचारी तिचा वदविता छोटाचेतन भगत आहे ; ती नेहमीच इंडिया गेटच्या गच्चीवर जाऊन बसते. हे पाहिल्यावर ऐकल्यावर खुर्चीतून समोर कोसळायाचा बाकी होतो.
पण समोरच्या खुर्चीवरील जोडपं अंधारात चुंबन साधनेत मग्न असल्याने मी स्वतःला सावरलं.उगाच दुसऱ्यांच्या प्रणयाराधनेत अडथळा आणायला मी काय अँटी रोमिओ स्क्व्याडमध्ये थोडी आहे. मी फक्त दुःखी अंतःकरणाने डावीकडे माझ्या शेजारच्या रिकाम्या सीटकडे बघितलं आणि "गेले ते दिन राहिल्या त्या आठवणी" म्हणत पुन्हा हाफ गर्लफ्रेंड चा अत्याचार सहन करीत बसलो. सांगणार कोणाला!

 पुन्हा एक धक्का बाकीच होता. छोटा चेतनचा गेट्सशी काय राग आहे माहिती नाही इंडिया गेट प्रकरण बघितल्यावर तो "बिल गेट्स" या कुबेरावर वर घसरला आहे. एका सिन मध्ये बिल गेट्स बिहारमधील गावात येतो आणि अर्जुना रणतुंगा कपुर त्याच्यासमोर भाषण देतो.त्यात बिल गेट्स चा इतका वाईट फोटोशॉप केलाय की यापेक्षा तर इलेक्शनच्या टायमाला चांगले फोटोशॉप्स दिसतात! सतत बिल गेट्स चा फोटो शॉप्ड क्लोज अप दाखवलाय किमान दुरून तरी तो बसलेला दाखवला असता तर विश्वसनीय तरी वाटला असता.पण दिग्दर्शक मोहित सुरीने सुरी घेऊन प्रेक्षकांच्या मेंदूचा पार खिमा केलाय. इतका वर्षांचा भट कॅम्पचा(च) अनुभव असूनही मोहित सूरी अश्या हास्यस्पद चुका करत असेल तर यापेक्षा तर एकेकाळीचा धोनीचा पिठू बॉलर मोहित शर्मा चांगला मुवि बनवेल.

श्रद्धा कपूरचं बास्केटबॉल प्रेम हे फारच बॉलबोध दिसलंय. स्पोर्टमन असो वा स्पोर्टवुमन तो त्याच्या 'थाईज' वरून कळतो. इथे मात्र श्रद्धा कपूर दुरान्वये स्पोर्टगर्ल वाटत नाही. मात्र श्रद्धा कपूर #मादकेश्वरी दिसावी म्हणून खास डिझायनर शॉर्टस घालून  'मंडदर्शन' करीत दाखवली आहे. तेच काय ते जरा बरं .बाकी सिनेमा मात्र डोक्याची मंडई करतो.

मुविमध्ये शेवटी शेवटी अर्जुना रणतुंगा कपूर रियाला म्हणजे श्रद्धा क.ला शोधत असतो.तिच्या आठवणीत तळमळणाऱ्या अर्जुनाला बघून त्याचा मित्र त्याची ओळख मुद्दामून एका मुलीशी करून देतो ती असते #रियाचक्रवर्ती
ही ट्रिक ऐश्वर्या राय आणि त्याकाळी सद्विवेक हरवलेल्या विवेक ओबेरॉयच्या "क्यू हो गया ना (फ्लॉप)" मध्येही दाखवली होती. त्यात सदविवेक ओबेराय हा ऐश्वर्या राय म्हणजे त्या मुवितली 'दिया' साठी तळमळत असतो आणि
शेवटी "दिया मिर्झा" दाखवली होती.
दोन्ही मुवित कॉमन हे की दोन्ही फ्लॉप झालेत. म्हणजे हा होणार आहेच.

असो जुन्या आठवणी नको उगळाव्यात. राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन ला जोडणाऱ्या पुलाखालून बरंच पाणी गेलंय. ऐश्वर्या राय चा बच्चनाभिषेक झाला. ती पर्मनंट "कांस उत्सवातली" पाहुणी असल्याने सध्या ती बार्बी डॉल बनून डौलात वावरतेय.

अर्जुन कपूरने मात्र आता आपल्या एकेकाळचा मेंटर सळमान खानच्या वहिनीवर .."मलायका अरोरावर" लक्ष केंद्रित करावे. लवकरच ती "अरबाजमुक्त स्त्री" होणार आहे.

असो,अश्या प्रकारे दोन मूर्ख स्टारकिड्स ची एक अत्यंत मूर्ख मुवि बघून आलो. कुठे तो "टू स्टेट्स " कुठे ही हाफ म्याड मुवि.

तरीही काही फूलटू बघायचंच असेल तर किशोरकुमार  आणि मधुबालाचा ऑल टाइम हिट "हाफ तिकीट" बघा!!

-Abhijeet Panse

Saturday 27 May 2017

शिवाजी महाराज आणि विनायक सावरकर

शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यात नेहमी काही बाबतीत एक साधर्म्य आणि त्या संबंधित एक महत्वाचा फरक जाणवतो.
शिवाजी महाराज प्रतिकूल परिस्थितीत स्वातंत्र्यासाठी लढले.सावरकरही स्वातंत्र्यासाठी खऱ्या अर्थाने लढलेत.

महारांजांची "आग्र्याहून सुटका" ही बुद्धी,धैर्य, दक्षतेने परिपूर्ण होती तशीच सावरकरांची बोटीतून सुटका ,"मार्सेलिसची उडी" ही त्याच गुणांनी परिपूर्ण!

शिवाजी महाराजांनी तत्कालीन फारसी, तुर्की, अरबी शब्दांनी भेसळ झालेली मराठी भाषा शुद्ध केली.रघुनाथ हणमंते यांच्याकडून भाषा शुद्ध करून राज्यभाषा व्यवहार कोष निर्माण करून घेतला.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनीही आंग्ल भाषेची सरमिसळ झालेली तत्कालीन मराठी भाषा शुद्ध करण्यासाठी पर्यायी मराठी शब्द दिलेत.'प्राचार्य' , अध्यापक, प्रपाठक, इ. मराठी शब्द सुचवलेत.

दोघेही महान द्रष्टे होते.शिवाजी महाराजांनी टोपीकरांबद्दल(इंग्रजांबद्दल) आधीच दक्षतेचा इशारा दिला होता.
सावरकरांनीही मुस्लिम लीग ची निर्मिती झाल्यावर तिचा मूळ उद्देश आणि परिणामाबद्दल सतर्क राहण्यास संगीतले होते.

पण या दोन्ही स्वातंत्र्यवीरांमध्ये फरक होता की शिवाजी महाराजांना नियती अनुकूल होती.खऱ्या अर्थाने त्यांचं यश ही श्रींची इच्छा होती.पण सावरकराना मात्र दैव सतत प्रतिकूलच राहिले.महाराजांकडे मनुष्यबळ होते प्रामाणिक साथीदार होते. सावरकराना मात्र दु:स्वासच अनुभवावा लागला.

महाराजांची आग्र्याहून सुटका यशस्वी झाली पण सावरकरांनी बोटीतून सुटका करून घेऊनही नियतीची साथ नसल्याने त्याना काही वेळातच पुन्हा अटक झाली.

खऱ्या अर्थाने सावरकरांना शिवाजी महाराज समजले होते म्हणूनच सावरकरांनी "हे हिंदुशक्तीसंभूत दिप्तीतम तेजा हे हिंदूनृसिंहाप्रभो शिवाजी राजा .."शिवाजी महाराजांबद्दल लिहिलं.

शिवाजी महाराजांचे कर्तृत्व ,संघर्ष, यश यांना समाजाकडून ,देशाकडून स्वीकार्यता प्राप्त झाली आहे.सावरकर मात्र इथेही दुर्दैवी ठरलेत.आजही त्यांचा फक्त राजकीय कारणासाठी ,पूर्वग्रह दूषित ठेऊन, त्यांच्यावर फक्त अन्यायच केला गेलाय.त्यांचं चरित्र अजूनही समाजाकडुन "काळ्या पाण्याची" शिक्षा अनुभवत आहे.





-अभिजित पानसे

बाहुबली , देवसेना चित्र

बाहुबली मधली सगळ्यात जास्त मला एक गोष्ट आवडली; ज्यांना ते लक्षात आलं नसेल त्यांनी पुन्हा पुढे कधी चित्रपट बघताना आठवणीने ते बघा. भल्लालदेव सर्वप्रथम देवसेनेचं चित्र बघतो आणि नंतर त्याच्या महालात तिचं तेच मोठं चित्र लावलेलं असतं , त्या चित्रात ती सिंहासनावर बसलेली आणि तिच्या हातात  'तलवार' असते.

 ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. Its a statement.
पूर्वी पुरुषांचे चित्र काढले जाई त्यात त्यांच्या हाती बंदूक, वा तलवार असे किंवा पायापाशी वाघ, किंवा मेलेल्या वाघावर पाय ठेऊन चित्र काढले जाई. आणि ते शौर्याचे प्रतीक म्हणून दिवानखान्यात लावले जात किंवा वधू संशोधनाला राजकन्येकडे पाठवले जात. आणि दुसरीकडे युवतींचे चित्र हातात पुष्प घेऊन वा वेली , वृक्षाभोवती..तळ्याकाठी विहार करतानाचं दाखवले जात.

इथे मात्र देवसेनेच्या हाती #तलवार दाखवली आहे. आणि हे दाखवताना तिला ;परिस्थितीमुळे वा पर्याय नसल्याने हाती तलवार घेतलेली पुरुषी पेहरावतील राजकन्या दाखवली नाही ; तर जात्याच शौर्यवान आणि सौंदर्यवान असे ते चित्र असते. ते 'लादलेलं' शौर्य नसून मुळातच असलेलं तेजस्वी  राजकन्येचं ,स्त्री चं ते चित्र असतं, इतर सर्व स्त्रीसुलभ भावना असलेली युवती. She is jus being a normal woman nothing is forced.
हि गोष्ट राजमौलिने दाखवल्याबद्दल खरंच त्याचं अभिनंदन करायला हवं.

तेजस्वी देवसेना विवाहाचा प्रस्ताव धुडकावून लावते तेव्हा माहिष्मती राज्याकडुन प्रस्ताव आणणारा तो माणूस देवसेनेच्या भावाला तुम्ही देवसेनेला समजावा म्हणतो , तेव्हा तीचा भाऊ तात्काळ उत्तर देतात की तो तिचा निर्णय आहे.
ही गोष्ट फार आवडली. यावरून पूर्वी मुळात व्यक्तिस्वातंत्र्य प्रत्येकाला , मुलीलाही होतं हे दाखवलं.
#स्वयंवर ही कल्पनासुद्धा मुळात स्त्री केंद्रित होती.ज्यात युवती निर्णय घायची की कोणासोबत विवाह करायचा.

बाहुबलीमधली आणखी एक गोष्ट मला फार आवडली ते '#शिवगामीचं' पात्र. (पहिल्या भागात) माहिष्मती साम्राज्यच्या सिंहासनावर बसलेली शिवगामीनी हे "स्त्रीवादाचं"  प्रतीक नाही तर 'योग्यतेचं' प्रतीक आहे.
नवरा शरीराने आणि मनाने तर नक्कीच पंगू , ना - लायक असल्यामुळे जी व्यक्ती त्या सिंहासनासाठी लायक, capable,  योग्य अशी ती स्वतः सिंहासनावर बसते. अश्या व्यक्तीचेच "वचन हे शासन" असतं.

इथे उथळ स्त्रीवाद, feminism नाही. तर 'योग्यतेची' गोष्ट आहे. त्यामुळेच पुढे भलालदेव आणि अमरेंद्र बाहुबलीमध्ये जो शौर्य , योग्यता , लायकी सिद्ध करेल तोच पुढे साम्राज्याचा अधिकारी जागी बसेल असे ती म्हणते.
येथे उथळ ,एकसुरी स्त्रीवाद वा स्त्रीप्रधान संस्कृती वा अंध पुरुषीवर्चस्व वा पुरुषप्रधान संस्कृती नाही तर लायकीचा प्रश्न आहे. जो लायक तोच शासक. त्याचे वचन हे शासन.

- अभिजित पानसे.


Thursday 25 May 2017

शनीची अवास्तव भीती



 आज शनि अमावस्या.सकाळपासून शनिमंदीरात (शनीच्या दहशतीत असलेल्या) भक्तांची हातात तेलाचं पुडकं..काळे तीळ घेउन झुंबड उडालीए!

कारण अनेक गैरसमजांमुळे आणि टिव्ही वरील बिनडोक उथळ ज्योतिषी कार्यक्रमांमुळे शनिला खलनायक गब्बरसिंग..दहशतवादी..खुनी लुटैरा बनवलंय.

पण मुळात शनि हा अत्यंत कर्मवादी निष्ठुर न्यायाधीश आहे आणि आपल्यासाठी Blessing आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा 'भावनांचा' कारक,चंचल,भावनीक ओलावा..Unhealthy emotional attachments..wordly desires निर्माण करणारा..भावनीक गुंतागुंत निर्माण करणारा..व्यक्तीला मायेत फसवणारा,स्वप्नाळु बनवणारा.. तर शनि चंद्राच्या पुर्ण विरूद्ध!स्थिर,संथ,कठोर आणि रूक्ष!!

''तेलकट भांड्याचा चिकटा पाण्याने निघत नाही त्यासाठी नारळाची रुक्ष सालच लागते''
नंतर ते भांडं पुन्हा लखलखायला लागतं.

मनरूपी भांड्यावर चंद्रामुळे निर्माण झालेला भावनांचा चिकटा,मोह,UNHEALTHY ATACHMENTS शनि दुर करतात.

चंद्र पत्रिकेत ज्या राशीत असतो तीच आपली जन्मरास असते!त्यामुळेच शनिची साडेसाती चंद्र स्थानातील राशीला i.e.जन्मराशीला आणि चंद्राच्या मागच्या व पुढच्या राशीला लागते.

साडेसाती ही आपल्या प्रत्येकासाठी मुळात ''वरदान'' आहे.

भावनांपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ ही practical शिकवण साडेसातीत देउन जीवाला शिवाच्या भेटीच्या मार्गी लावतात.

मी, माझं, माझे मित्र, माझे नातेवाइक, माझे प्रेयस यातच गुरफुटलेल्या व्यक्तीच्या डोळ्यात ''वास्तवाचं'' झणझणीत अंजन घालुन  त्याला धाडकन वास्तवात जमिनीवर आणतात.म्हणुन साडेसाती हा अत्यंत महत्वाचा कालावधी असतो.जीवनाचे खरे कठोर पैलु..कंगोरे..लक्षात येतात.
चुकीचे unhealthy भावनीक गोग्गोड समज  prejudices दुर होतात.

दारूच्या नशेत झिंगलेल्या अवस्थेत पडलेला माणुस मनात मनोरे निर्माण करत स्वत:ला राजवाड्यात झोपलेला समजतो पण वास्तवात तो गटारात लोळत असतो.
शनी ही नशा..झिंग दुर करतात.

अडचणी आल्यामुळे..आजुबाजुच्या लोकांचे बुरखे फाटल्यामुळे होणाऱ्या वेदनांसाठी शनीला दोष देण्यापेक्षा त्याने  'सत्य' दाखवले यासाठी धन्यवाद म्हणायला हवं.
शेवटी  ''सत्यं शिवम् सुंदरम्''!

चंचल,वैचारीकरित्या..भावनीकरित्या अपरिपक्व..उथळ व्यक्ती साडेसातीनंतर एक पुर्णत: मानसिक स्तरावर एक वेगळा Changed for better व्यक्ती होते.

अडचणी..(दिवा)स्वप्नभंग..ज्यांना आपण आपले समजत असतो त्यांचे मुळ चेहरे दाखवुन शनी व्यक्तीला जीवनातील वास्तवात आणतो.

अडचणींच्या..कर्माच्या भट्टीत व्यक्तीला तापवुन त्याच्यातील दोष..अहंकार नष्ट करून खणखणीत वास्तवात आणतो.

फक्त कर्तव्य आणि परिश्रमातुन निर्माण झालेली कर्मफुलेच शनिदेवाला वाहिली तर ते प्रसन्न राहतात.त्यासाठी शनिच्या कुठल्याही Shallow..superficial कर्मकांडाची गरज नाही.

कर्मकांडापेक्षा कर्मच श्रेष्ठ हेच शनिचं म्हणणं असतं.

मला स्वत:ला हे फार उशीरा कळले.कदाचीत यानंतर नेहमीसाठी लक्षात राहील.

- अभिजित पानसे

"बाधीत"


माझ्या ओळखीच्या व्यक्तीच्या पुढील गूढ घटनेमुळे, अनुभवामुळे कोणाच्याही व्याधीसंबंधित वा अतींद्रिय अदृश्य शक्तीच्या अस्तित्वाबद्दल असलेल्या विश्वास / अविश्वासासंबंधित वा अनुभवांसंबंधित भावना दुखवल्यास तसा माझा उद्देश नव्हता असे समजावे..फक्त सोशिअल अवेरन्स साठी मी हा स्वतः अनुभवलेला अनुभव, घटना सांगतो आहे. घटना थोडी मोठी आहे.


'#अस्तू' चित्रपटात मोहन आगाशे तंद्रीत घर सोडून निघून जातात, त्याच प्रमाणे गेल्या काही दिवसांपासून माझी एक मैत्रीण सतत तंद्रीत राहायची तिच्या घरच्यांना प्रथम हे लक्षात आलं नाही.पण दोन दिवसांपूर्वी घरातून दुपारी ती अचानक गायब झाली.सगळीकडे शोधाशोध सुरु झाली पण ती दिसली नाही. तिचा फोन घरीच होता.पोलिसात तक्रार करण्याचंही ठरवलं पण तरुण मुलीचं नाव खराब होऊ शकेल म्हणून काही तास वाट बघण्याचं ठरवलं.


घरच्यांनी तिच्या सर्व मित्रमैत्रिणींना फोन करणं सुरु केलं. आम्हाला कळल्यावर मी आणि माझा मित्र सुद्धा तिला शोधू लागलो. पण ती न सापडल्याने नक्की काय झालं जाणून घ्यायला काळजीत तिच्या घरी गेलो.


तिच्या घरच्यांनी जी माहिती सांगितली त्यावरून आम्ही विचारात पडलो. गेल्या काही दिवसांपासून ती सतत तंद्रीत जायची. जेवताना , टीव्ही ,लॅपटॉप कडे बघत स्वतःशीच हसायची. तिचं बोलण्यात काही विचित्र , अनाकलनीय शब्द यायचे. भाषा कळायची नाही. मला आठवलं की फोन वर आणि प्रत्यक्षातही ती असेच मधूनच काही विचित्र शब्द बोलायची. पण तिच्या आईने पुढे जी सहज माहिती सांगितली ती किती महत्वाची याची कल्पना नव्हती.


तिच्या आईने सांगितलं की ती वीसेक दिवसांपूर्वी दिवसभर शहराबाहेर पिकनिक आणि चित्रपट बघायला जातेय म्हणून गेली होती आणि रात्री नऊ वाजता घरी आली. तेव्हापासून ती विचित्र वागु ,असंबद्ध बोलू लागली सांगितलं.


काही जागा 'बाधित' असतात असे वृद्ध, अनुभवी लोक सांगतात ..पण माझा कधी विश्वास बसला नाही. मी तिच्या मैत्रिणीला फोन केला आणि त्या दिवशी नक्की काय झालं होतं विचारलं. ती सांगू लागली , ते सर्व जण 28 एप्रिलला भर कडकडीत माध्यान्ही शहराबाहेरील तलावाकाठी पोहचले. तिथे खाणं झालं आणि संध्याकाळी चित्रपट बघून प्रत्येकजण आपापल्या घरी परत गेले.


मी तिला पुन्हा विचारलं नक्की आठवून सांग 'ती' सतत

तुमच्यासोबतच होती का..त्या दिवशी काही वेगळं घडलं होतं का!

तिच्या मैत्रिणीने आठवुन तपशीलपूर्वक सांगितलं की 'तिला' दुपारी एक फोन आला होता आणि आम्ही सर्व बसून गप्पा करत खात असताना ती फोन वर बोलत चालत तलावाकडे गेली. तिकडे झाडी होती .त्या निर्मनुष्य भागात त्या बाजुने एक पडकी इमारत होती. जवळ कठडा नसलेली विहीर होती.पण फोनवर बोलत ती त्या बाजूनं गेल्याने दृष्टीआड होऊन आम्हाला दिसू शकली नाही.


पंधरा मिनिटाने ती परत आली.मग आम्ही ग्रुप्स फोटोज , सेल्फीज काढलेत आणि परत निघालो. तिचं मात्र कशातच लक्ष नव्हतं. परत येताना आम्ही चित्रपट पहिला आणि घरी पोहचलो.

हे ऐकून मी विचारात पडलो.खरंच लोक म्हणतात की पडक्या इमारती, काही जागा या नकरात्मक शक्तीने भारीत असतात. हे सत्य असेल का?

एकंदर एक गोष्ट नक्की की जे काही तिच्यासोबत झालं होतं ते 'त्या ' दिवशी त्या पिकनिक मुळे झालं होतं.

तिच्या घरचे काळजीत होते.त्यांचे सतत फोन करणे सुरु होते. आम्ही दोघे पुन्हा तिला शोधायला बाहेर पडलो.


आम्ही जिना उतरत होतो तेव्हा माझ्या डोक्यात अचानक विजेसारखा एक विचार चमकून गेला. बरेचदा अंतर्मनातून एक साद येते आणि ती अचूक निघते हा अनुभव खूपदा येतो. मी पुन्हा वेगाने वर तिच्या घरात गेलो. तिच्या घरच्यांना विचारलं की तिचा लॅपटॉप कुठे आहे. आम्ही तिच्या खोलीत गेलो. आत गेल्या गेल्या मला जरा वेगळं काहीतरी जाणवलं. तिचा लॅपटॉप उघडला. नशीब त्याला पासवर्ड नव्हता!

आणि मला धक्का बसला. तिच्या लॅपटॉप मध्ये जे व्हिडीओज होते ते पाहून मला प्रचंड धक्का बसला. माझ्या डोळ्यांवर माझा विश्वास बसत नव्हता. ते सर्व व्हिडीओज गेल्या वीसेक दिवसात तिने डाउनलोड केले होते.


"ब्लु व्हेल" गेमबद्दल ऐकलं होतं पण तो इथपर्यंत पोहोचेल माहिती नव्हतं. मला थोडी शंका या ब्लु व्हेल गेमची होती की कदाचित ती या विळख्यात तर अडकली नव्हती ना!

पण नाही तसं काहीही नव्हतं. तिच्या लॅपटॉपमधील ते व्हिडीओज आणि बरेच फोटोज बघून मला धक्का बसला! त्याक्षणी मला एक नैसर्गिक इन्स्टिक्ट दाटून आलं. मी काही आडाखे मनाशी बांधू लागलो.

आणि तत्क्षणी घाईत मित्राला घेऊन बाहेर पडलो. कदाचित माझा अंदाज खरा होता. जे काही झालं ते त्या दिवशी घडलं होतं.

कदाचीत मला अंदाज होता ती तेव्हा कुठे असावी!


...


मला ती जागा दिसली. तिथे भव्य इमारत होती. आजवर फक्त पडक्या इमारती, निर्मनुष्य भागातील विहिरी, निर्मनुष्य जागा नकारत्मक शक्तींनी भारित असतात सांगितले, वाचले होते. पण मोठ्या शहरात आजूबाजूला लोकवस्ती,रहदारी अश्या गजबलेल्या ठिकाणीही काही जागा बाधित असू शकतात , लोकांना बाधा होऊ शकते याची तिळमात्र कल्पना त्या दिवसापर्यंत नव्हती. त्या दिवशीपर्यंत कितीतरी वेळा 'त्या' इमारतीजवळून गेलो होतो.बघितली होती. पण आज पाहिल्यांदा 'त्या' इमारतीकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलला होता. मनावर दडपण होते.

खरंच आत्मा, भूतबाधा या गोष्टी अस्तित्वात आहे का यांचं उत्तर मिळालं नव्हतं. पण त्या दिवशी पाहिल्यांदा तो अनुभव ,उत्तर मिळणार होतं.


आम्ही घाईत गाडी पार्क करून वेगाने त्या बिल्डिंगच्या आत शिरलो. वरच्या मजल्यावर गेलो. 'तो' दरवाजा फक्त लोटला होता. एक लांब श्वास घेऊन हिंमतीने , निग्रहाने आत शिरलो. आत अंधार होता. भर उन्हाळ्यातही त्या अंधारामुळे , दडपणामुळे , अनामिक भीतीमुळे आत शिरल्या थंड लहर अंगावरून गेली.


मोबाईलचा टॉर्च लावून तिला आम्ही शोधू लागलो. माझं अंतर्मन सांगत होतं की ती इथेच भेटणार. आणि त्याक्षणी माझं लक्ष वर गेलं..


तिथे 'ती 'बसली होती.


दृष्टी माझ्याकडे होती. चेहऱ्यावर जणू भक्ष मिळाल्याचं स्मित झळकत होतं. तिला बघून आनंद झाला. आम्ही तिच्याजवळ गेलो. आणि तोवर जी गोष्ट माझ्या लक्षात आली नव्हती ती तेव्हा कळली. तिची दृष्टी माझ्यावर रोखलेली नव्हती तर समोर होती.मी तिच्या शेजारी उभा राहिलो माझ्या जवळ मित्र उभा . तरी तिचं लक्ष नव्हतं. मी हळूच तिच्या खांद्याला हलवलं, नाव घेऊन बोललो ".... तू इथे एकटी काय करतेयेस!'आम्ही किती शोधतोय तुला!




ती तरीही स्थिर. दृष्टी समोर.

मी पुन्हा तिला थोडं हलवलं.

तिने गर्रकन माझ्याकडे मान फिरवली. मागून अधून मधून येणाऱ्या अस्पष्ट प्रकाशात तिचा चेहरा मी बघितला. एक क्षण तिच्या नजरेत काहीही भाव नव्हते. आणि दुसऱ्याच क्षणाला तिच्या नजरेत अंगार होता..जणू तिच्या आनंदात मी अडथळा आणला होता. पुढे जे घडलं ते मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही.


ती माझ्या अंगावर त्वेषाने उसळून आली !माझा गळा दाबू लागली ! आणि जोरदार किंचाळून बोलली,

"भल्लालदेव मी तुला मारून टाकेन! माझ्या बाहुबलीला धोक्याने मारलंस! माझा महेंद्र बाहुबली येईल! मी तुला संपवणार ! मी तुला आता सोडणार नाही!"


हे तिचं रूप बघून मी गार पडलो! तिला तिच्या नावाने हाक मारू लागलो तशी ती ओरडली " मी ... नाही! मी देवसेना आहे! कुंतल राज्यची राजकन्या! अमरेंद्र बाहुबलीची बायको!" पुन्हा माझा गळा जोराने दाबू लागली!

माझा मित्र हे तिचं भयंकर रूप बघून घाबरून काही पावलं मागे सरला! तसं तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं.

मला सोडून त्याच्याकडे उसळत ओरडली " सेतुपती!! तू जिवंत कसा! मी तुझे बोटं कापलीत ! माझ्या अमरेंद्र बाहुबलीने तुझा गळा चिरला! तरीही तू जिवंत! ठार मारतेच तुला आज!" आणि एका बाजूला बघत कोणाला तरी हाक मारून बोलावू लागली " कटप्पा! कटप्पा!! लवकर ये! आणि तेलुगूत काहीतरी बोलू लागली "


आम्ही दोघेही तिचे ते रुप बघून थरथर कापू लागलो. तेवढ्यात कोणीतरी ओरडला. मला वाटलं ती ज्या कोण्या कटप्पाला बोलावतेय तो आला की काय!!

" ये बाहर जा के झगडा करो यार! हमको तो पिच्चर देखने दो! साला ब्लॅक मे तिकिटे खरिद के बाहुबली देखने आये है! "


आमच्यामुळे इतरांना बाहुबली सिनेमा बघताना अडचण होतेय, सगळे लोक आमच्याकडेच बघताहेत हे बघून मी ओशाळुन तिला जबरदस्तीने पण तिला सांभाळत सिनेमा हॉल च्या बाहेर घेऊन आलो. तिचं मात्र " मी देवसेना आहे मला सोड ,भल्लाळ सोड मला भल्लाळदेव! मी देवसेना आहे! मी तुला मारेन! "आणि पुन्हा पुन्हा कटप्पा कटप्पा म्हणत कोणाला तरी हाक मारत होती!


बाहेरच्या व्हरांड्यात आल्यावर तिला खांदे धरून हलवू लागलो ..शेवटी बॉटलच्या पाण्याने तिच्या चेहऱ्यावर हबकारे मारले. तशी ती थोडी भानावर आली. मी तिच्या दोन्ही कानात जोरजोराने फुंकर मारली ! "बाहुबली फट स्वाहा! " ती तरीही अस्वस्थ होतीच.

" बस बस झालं ..गेलं गेलं ..जे काही होतं ते गेलं..बस शांत हो ... आता! काही नाही ..काही नाही झालं!"

तिच्या पाठीला थोपटू लागलो.


ऑटोमध्ये बसवून तिला तिच्या घरी आणलं. रस्त्यात कुठेही तिला बाहुबलीचं पोस्टर दिसू नये म्हणून काळजी घेतली.


तिच्या लॅपटॉपमध्ये 'प्रभास' चे सर्व व्हिडीओज, इंटरव्युज, त्याचे सर्व जुने चित्रपट , बाहुबली संबंधित डाऊनलोड केलेले व्हिडीओज विडिओज बघितल्यावरच मला संशय आला होता. '#कॅप्शन' नसलेले तेलुगु , तामिळ सर्व व्हिडीओज ती काही दिवसांपासून बघत होती 29 एप्रिल ला शनिवारी ते पिकनिक ला गेले होते.बाहुबली 28 एप्रिल ला रिलीज झाला होता. त्यामुळे माझा संशय बळावला होता.


त्या दिवशी पिकनिकहुन आल्यावर बाहुबली त्यांनी बघितला आणि तिथूनच तिला '#प्रभासची ' बाधा झाली. सर्व चित्रपटगृहे सध्या प्रभास बाधित आहेत. बाहुबलीच्या भुताने पछाडलेले आहेत.

म्हणूनच घराजवळील एखाद्या मल्टिप्लेक्समध्ये ती सापडेल माझा कयास होता. असो कुठल्या भागात, पडक्या इमारतीत, विहिरीत काही भुतं खेत नसतं ! असेल तरी ते बाहूबलीच्या या भुतासमोर काही नाही हे कळलय. सध्या घरातील पोरी बळींची काळजी घेणे गरजेचे आहे.

मला ओरडून विचारावं वाटत होतं त्या प्रभासला अरे अजून किती पोरींना आपल्या नादी लावशील रे!


असो सध्या तिला घरी ठेवलय. दरवाजे खिडक्या बंद ठेवल्या आहेत. टीव्हीवर वा कुठेही बाहुबली वा प्रभास दिसू नये याची काळजी घेतली जातेय.


आणि हो एक सांगायचं राहिलं जे मी तिच्या घरच्यांना सांगितलं नाही, की त्या दिवशी ती पिकनिकला गेली असताना माझाच तिला फोन आला होता. माझ्याशीच बोलत ती तिकडे चालत गेली होती.



-अभिजीत पानसे.

Tuesday 16 May 2017

बुडत्या_रामुला_सरकारचा_आधार


बाहुबलीपेक्षा मी दोन चित्रपटांची वाट पहात होतो 'सरकार' आणि आयुष्यमान खुराणाचा "..बिंदू".
पहिला सरकार जी मुळातच गॉडफादरची कॉपी आहे; जबरदस्त सिनेमा होता. प्रत्येक पात्र योग्य, सिनेमाला वेग होता तरीही कलात्मक होता. खास रामू 'टच' होता.
पण या सरकारमध्ये सुरवातीपासूनच काहीतरी कमतरता जाणवू लागते. वर्षभर गजबलेली शाळा अनुभवल्यावर उन्हाळयाच्या सुट्टीत शाळेत गेल्यावर भकास वाटतं तसं काहीसं या सरकार मध्ये वाटत राहतं. सतत रिकामं रिकामं..
एकटा अमिताभ सिनेमाला सांभाळायचा प्रयत्न करतो. पण कथा , पात्र कशातच खोली नाही. चित्रपट बनवला नसून उरकून टाकलाय असं वाटतं.

राम गोपाल वर्मा इंडस्ट्रीत एकटा पडलाय हे चित्रपट बघताना स्पष्ट जाणवत राहतं. कोणीही मोठे कलाकार त्याच्यासोबत काम करायला तयार नाहीत. त्यामुळे एक अमिताभ सोडल्यास दुय्यम फळीतल्या कलाकारांची निवड करावी लागलीये.

सत्या, कंपनी, बनवणारा रामूची खरंच अधोगती झालीये हे दर्शवणारं एक दृश्य आहे गणपती विसर्जनाचं. आजवरच्या सुमारहून सुमार चित्रपटांमध्ये मुंबई गणपती विसर्जनाचं इतकं खराब दृश्य दाखवलेलं नसेल तितकं सरकार 3 मध्ये आहे. सेट वरील वीस तीस लोकांना घेऊन ते चित्रीकरण केलंय असं वाटतं. उरकून टाकणे याला म्हणतात.

हा चित्रपट बघण्याचं एक महत्त्वाचं कारण होतं "यामी गौतम".
आयुष्यमान खुरणामुळे विकी डोनर थिएटर मध्ये दोनदा बघितल्यावर नंतर मी यामी गौतमचा फॅन झालो होतो. पण त्यानंतर तिने सतत इरिटेटिंगली अर्थहीन भूमिका केल्यात. 
दिव्या कुमार खोसला, यारीया वाली या मूर्ख दिग्दर्शकाच्या सिनेमात काम केलं. अतुल अग्निहोत्रीच्या सिनेमात काम करण्याचा गुन्हा केला. अतुल अग्निहोत्री दिग्दर्शित चित्रपट!! May God save viewers n actors!!
पण या सरकार मध्ये तिला कामच नाही. संपूर्ण चित्रभरातील ती दहा मिनिटं दिसली असावी. पण यामी गौतम आजवर तिच्या करिअरमध्ये इतकी मादक, सेन्स्यूअस दिसली नसेल तितकी सरकार मध्ये! जबरदस्त लूक! लूक्स साठी टेन ऑन टेन!

एकेकाळी हॉलिवूडच्या ,  #RichardAttenborough च्या #गांधी चित्रपटात " बेन किंग्सले" सोबत काम करणारी रोहिणी हट्टंगडी , पुढे टुकार मराठी सिरियल्स मध्ये काम करताना बघून आलेली शिसारी सरकारमधील तिच्या दोन सीन्समुळे गेली.
'अग्निपथ ' नंतर पाहिल्यांदाच अमिताभ बच्चन आणि रोहिणी हट्टंगडी एका चित्रपटात काम करताय. पण यात दोघांचं एकही सोबत दृश्य नाही.

सरकारचा खरा फायदा करून घेतलाय तो अमित सधने! अमिताभ समोर हा अमित चांगला उभा ठाकलाय.
संपूर्ण चित्रपटात अमिताभ बच्चन चे दोनेक दृश्य , मनोज वाजपेयीचा पहिला सिन, आणि यामी गौतमचं दिसणं याखेरीज काहीही बघण्यासरखं नाही.

रामूचं स्टँडर्ड खरंच घसरलय असं वाटत राहतं.त्याच्यात तेलुगू दिग्दर्शक घुसल्याप्रमाणे बकवास क्लोज अप्स आणि जॅकी श्रॉफची जो मुख्य व्हिलन आहे त्याला तेलुगू चित्रपटातील एक भडक व्हिलन बनवुन हास्यस्पद करून टाकलाय.

पहिला सरकार अप्रतिम ,दुसरा सरासरी आणि तिसरा अत्यन्त सुमार अशी उतरंड रामुची झाली आहे.
त्यावरून रामगोपाल वर्मा संपला असा प्रश्न पडतो. पण हे प्रेक्षकांसाठी , चित्रपट सृष्टीसाठी योग्य नाही , करण जोहर , फराह खान, साजिद खान यांच्या चित्रपटांचे बळींसाठी रामू आणि त्याच्याच मुशीत तयार झालेला अनुराग कश्यप चे चित्रपट पर्वणी असते. 

26/11 च्या हल्ल्यानंतर हॉटेल ताजमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत एकेकाळी रुबाबाने जाणारा रामू आता मात्र त्याच्या कामामुळे बुडत चालला आहे असं वाटतं. आणि या बुडत्या रामुला सध्यातरी सरकारच्या आधाराचा काडीचाही काही उपयोग होणार नाही हे स्पष्ट.

*Abhijeet Panse*