*(विमेन्सडेनिमित्त) "जावेत्याच्यावंशातेव्हाची...*
मे 2017 ,लोकप्रभा
स्त्रीच्या भाव विश्वाची ,व्यथेची सफर घडवून आणणारी ही वेब सीरिज जागतिक स्तरावर पोहचली आहे.
पलीकडील बाजूचे गवत नेहमीच हिरवे वाटते.ही आपली मानसिकता आहे.
पण " जावे त्याच्या वंशा तेव्हाची कळे".व्यक्तीला, जनसमूहाला ,समाजाला,किंवा स्त्री आणि पुरुष यांनाही स्वतःच्या आयुष्याबद्दल ,प्राप्त परिस्थितीबद्दल कधीतरी वैषम्य वाटतंच,इतरांचं आयुष्य सोपं असतं असं वाटतं. त्याबद्दल असूया वाटते.आणि कधितरी हा विचार मनात येतोच की जर ही स्थिती, हा समाज, हे जग जसे आहे असे नसून 'तसे' असते तर, जर मी त्यांच्याजागी असतो वा असती तर..
हे जग पुरुषप्रधान आहे, इथे पुरुषाचं वर्चस्व असतं. स्त्री ची पिळवणूक होते.एकट्या स्त्रीला जगण्यात नेहमीच अडचणी येतात.हा सर्वसामान्य स्त्रीचा दृष्टिकोन, मानसिकता असते.
पुरुषांना वाटतं या पुरुषप्रधान जगात स्त्रीयांना जास्त सवलती मिळतात, स्त्रीयांना जास्त मदत ,पाठिंबा मिळतो.सर्व जबाबदारी पुरुषांनाच घ्यावी लागते.मनात या तक्रारी निर्माण होत राहतात.
पण जावे त्याच्या वंशा तेव्हाची कळे. संबंधित व्यक्ती, वा समूहाच्या बुटांमध्ये स्वतः पाय घालुन बघितल्याशिवाय त्या त्या व्यक्ती, व्यक्ती समूहाच्या अडचणी, जाबाबदारी, व्यथा समजू शकत नाही.
कारण #पलीकडचे गवत नेहमीच हिरवे दिसते.
पण जर पलीकडे जाऊन ते गवत खरच 'हिरवं 'आहे का बघता आलं तर!तेव्हा कदाचित सत्य कळू शकेल.
आणि ते कळल्यावर तरी आपली मानसिकता बदलेल का!
यावर वाय फिल्म्स ची "मेन्स वर्ल्ड" ही वेब सीरिज जबरदस्त प्रभावशाली भाष्य करते.
पुरुष आणि स्त्री यांच्यातील लैंगिक भेदभावावर यापूर्वीही काही चांगले आणि सुमार चित्रपट येऊन गेलेत.(सुमार चित्रपट- अंतरा माळी, रामूज मुवि)
पण त्या सर्वांचा भर हा विनोद निर्मिती आणि मनोरंजन यावरच होता.त्या कलाकृतींना दिलेली ट्रीटमेंट ही वरवरचीच आणि उथळ होती.पण मेन्स वर्ल्ड ही वेब सीरिज उच्च दर्जाची आहे.विनोदी आवरण आहे पण खोल विचार आहे.विचार करायला लावणारी आहे.
किरण नावाचा एक तरुण मुलगा जो स्त्रियांनाना मिळणाऱ्या सवलती , ,कामाच्या जागी मिळणारी मदत,सूट प्रेफरन्सेस या एकसुरी विचार ,अर्धवट पूर्वग्रहदूषित दृष्टीमुळे तो त्रस्त होऊन एकदिवस दारूच्या नशेत मनापासून देवाला प्रार्थना करतो की हे जग यातील परंपरा, पद्धती,विचार प्रक्रिया पूर्णपणे उलट होऊ दे.त्याच्यानुसार तथाकथित पुरुषप्रधान जगात स्त्रियांना मिळणारी खास वागणूक बदलून हे जग "स्त्री प्रधान" व्हावं आणि पुरुषांना खास वेगळी वागणूक मिळावी ही इच्छा करतो.
पण ते म्हणतात ना "तुम्ही जी इच्छा करता ,मागता त्याबद्दल फार जागरूक राहा,कारण कोणास माहिती ती इच्छा पुर्ण होइलही."
आणि किरण ची मागणी पूर्ण होते.दुसऱ्या दिवशी तो उठतो तर हळूहळू त्याच्या लक्षात येत जातं की त्याची मागणी ,प्रार्थना मान्य झाली आहे.
"लडका है अपने औकात मे रहे!"
" आजसे तुम्हारा काम वाम सब बंद, बहार घुमना बंद अब बस तुम्हारी शादी होगी.. और वो भी मै जिस लडकी के साथ बोलुंगी उसिसे.."अश्या बोलण्यांचा भडिमार किरणवर होऊ लागतो.
बस मध्ये "फक्त पुरुषांसाठी" जागा आरक्षित असतात."मेन्स युनिव्हर्सिटी" दिसते.
मॅकडोनाल्ड च्या जागी 'मॅकडॉना' होते.जग हे स्त्री प्रधान झालं असतं.
किरणला या जगाचेही तोटे ,पुरुषांचे आणि स्त्रीयांचे प्रश्न अडचणी कळू लागतात.त्याला आता हे जग नकोसं वाटू लागतं. हळूहळू तो याच जगात रुळतो.कारण आता सुटका नसते.
शेवटी एकदा रात्री उशिरा एकट्या 'पुरुषाला' पाहून शोषण ,विनयभंग करणाऱ्या समाज कंटक मुली त्याला त्रास देतात ,पोलिसात ही त्याला दाद मिळत नाही.तिथेही त्याचं शोषण केलं जातं.तेव्हा त्या एकट्या पुरुषाला एक समंजस मुलगी वाचवते.तेव्हा किरण तिला सांगतो की या सर्व प्रकाराला तोच जबाबदार आहे.
हे दृश्य आणि संवाद छान जमलंय.
यावेळी ती किरणला जग आधीसारखं व्हावं म्हणून पुन्हा प्रार्थना करायला सांगते.आणि तो करतो.दुसऱ्या दिवशी सकाळी उठतो.त्याला जाणवतं की तो एका स्वप्नातून जागा झालाय.
या सीरिजचा जो शेवट केलाय तो अप्रतिम .पूर्ण पैकी पूर्ण गुण जातात ते लेखकाला आणि दिगदर्शक विक्रम गुप्ताला. या शेवटामुळे ही वेब सीरिज एक उच्च दर्जा गाठते.हिंदी मध्ये खूप चांगल्या वेब सीरिज तयार होताहेत.मेन्स वर्ल्ड ही त्यातील सर्वोत्तम पैकी एक! अतिशय गांभीर्याने विनोदाच्या साहाय्याने स्त्रीचे प्रश्न, अडचणी, जग दर्शवलंय.
युनायटेड नेशन्सने "#ग्लोबलगोल्स" ही संकल्पना "सुटेबल डेवलपमेंट" हे द्येय समोर ठेऊन पुरस्कारित केली आहे.यात पाच गोल्स आहेत त्यातील एक, लैंगिक भेदभाव दूर करून स्त्री पुरुषांना समसमान वागणूक व संधी उपलब्ध करून देणे हे होय.यशराज फिल्म्सने या गोल ला पाठिंबा दर्शवत ग्लोबल गोल्स या संस्थेसोबत मिळून चार भागांची " मेन्स वर्ल्ड ”या वेब सीरिजची निर्मिती केली.
वाय फिल्म्सची सीरिज असल्याने यातील कास्टिंग चांगलं आहेच.प्रमुख भूमिका गौरव पांडे या अभिनेत्याची आहे.आणि त्याने सम्पूर्ण न्याय आपल्या भूमीकेला दिला आहे.शिवाय यात परिणीती चोप्रा, कल्की कोचलिन, भूमी पेडणेकर , रिया चक्रवर्ती , या प्रमुख हिंदी चित्रपट अभिनेत्रींनीही काम केलंय.
त्यामुळेही या सीरिज चा दर्जा वधारला आहे.
या प्रकारच्या विषयावर इंग्रजी, मराठी ,हिंदी चित्रपट आले आहेतच.पण इतका तरल भाव दर्शवणारी ,खोल प्रभाव पाडणारी विचार करायला लावणारी प्रसंगी अंगावर शहारे आणणारी कलाकृती हीच प्रथम असावी.आहेच.वरवर विनोदी आवरण पण मुळीच उथळ नसलेली ही कलाकृती आहे.कुठलेही उपदेश ना देता नेमक्या गोष्टीवर भाष्य करणारी ,मनोरंजन करीत मनाला अस्वस्थ करणारी ही कलाकृती. सामाजिक संदेश देतानाही एकसुरी ,शब्दबंबाळ नसलेली ही नेट सिरीज ,स्त्रीयांच्या अडचणीचे ,भाव विश्वाची व्यथेची तंतोतंत दर्शन आणि अनुभव करून आणणारी ही कलाकृती "मस्ट वॉच " आहे.
"ये दुनिया हम औरतो की होकर भी हमारी नही है!बाप की बापता सबको दिखायी देती है लेकीन माँ की ममता किसिको नही. इमोशनल हो जाये तो सब केहते है बाप कि कसम कहते है माँ की कसम कोई नही कहता!
फादर इंडिया सुपर हिट हुई लेकीन मदर इंडिया कभी फिल्म बन ही नही सकती..."हे संवाद बदलेल्या स्त्री प्रधान जगातील एका स्त्री पात्राचे आहेत. यातून आपल्या मुळातच एकंदर मानसिकतेवर प्रकाश लेखकाने टाकला आहे.अत्यंत गांभीर्याने या विनोदी वेब सीरिजची निर्मिती केली गेली आहे हे प्रत्येक नेटिसोड बघताना जाणवतं. चार ही भाग अप्रतिम जमले आहेत.
What if women treated men the way men treat women
It is the story of walking a mile ,in their shoe,in that world.
ही टॅग लाईन असलेली मेन्स वर्ल्ड ही वेब सिरीज या #WOMEN's डे निमित्त नक्की समस्त स्त्री पुरुषांनी नक्की बघावीच अशी आहे.
-Abhijeet Panse
लोकसत्ता ,वेब सिरीज लेख.

No comments:
Post a Comment