Tuesday 31 July 2018

रोहतांग पास बोगदा , पाऊल पडते पुढे

#रोहतांगपासबोगदा

मागच्या वर्षी अमरनाथवेळी पहलगामला तंबूत डोळे मिटून विश्रांती घेत पडलो असताना शेजारी बरेचसे गोरखपूरचे लोक होते. ते तेथील माओवाद, नेपाळमध्ये भारतीयांचा काय रोल असतो यावरही बोलत होते. जीएसटीला, नोटबंदीला कोणी चांगलं म्हणत होतं तर कोणी चुकीचं. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विषय त्यांच्यात निघाला.  एकंदर सगळ्यांच्या तोंडी एक वाक्य बरेचदा ऐकू येत  होतं “मोदी बहोत जोशीला बंदा है!”

चंदीगडचा एक माणूसही तंबूत होता. तो एकटा आला होता. तोही त्यात बोलण्यात सामील झाला. स्लिम, कमी उंचीचा , फ्रेंच कट एकंदर व्यक्तिमत्वावरून , बोलण्यावरून तो शहरी आणि आधुनिक वाटत होता. तो सांगत होता “सच में मोदी बहोत जोशीला बंदा है! अभि अगले साल दो साल मे चायना और पाकिस्तान की बहोत जलाने वाला है! मनाली से लेह जाने के लिये सुरंग बन रही है! मैं जादा अभि इस बारे मे नही बता सकता ..लेकीन दो तीन सालो मे साल भर रोड से लेह, आर्मी के ट्रक्स  सियाचीन ग्लेशियर के ओर जा पायेंगे! " त्याला लोकांनी विचारल्यावर म्हणाला की तो स्वतः त्या टीमचा भाग आहे.

त्याने तेव्हा सांगितलेल्या एका बोगद्याबद्दल काल न्यूज चॅनलवर बघितलं. रोहतांग पास बोगदा.
मनाली ते लाहोल स्पिती वॅलीत जायलाच रोड ने सहा तास लागतात. शिवाय रोहतांग पास वर्षातुन तीन ते चार महिनेच उघडा असतो. वर्षभर बर्फामुळे , वादळामुळे तो बंद असतो. त्यामुळे लेहला नोव्हेंबर ते जुलै पर्यंत फक्त विमान मार्गानेच जाता येतं. एकप्रकारे आठ ते नऊ महिने एक महत्वाचा भाग देशापासून तुटला असतो. तेथील स्थानिक लोक,  मेंढीपाळ लोकांनाही कुठेही जाता येत नाहीत. आठ , नऊ महिन्याची खाद्यसामुग्री जमा करून ठेवावी लागते. त्यांना खूप अडचणी येतात.

पण आता जवळपास पूर्ण तयार झालेला हा नवा बोगदा देशाची , वाहतुकीची समीकरणे बदलवणार आहे. बातम्यात दाखवल्याप्रमाणे हा बोगदा विशेष आहे . आजवरचा वेगळा आहे. कारण या बोगद्यात दोन मजले आहेत. साडे आठ किमीच्या पीर पंजाल हिमालयाच्या उत्तर पूर्व भागातील,  मनाली आणि स्पिती वॅलीला जोडणाऱ्या या बोगद्यामुळे जिथे सहा तास लागतात तिथे आता फक्त एक तास लागणार आहे. शिवाय अपघात होण्याची शक्यता पूर्णपणे कमी. त्याशिवाय वर्षभर रोडप्रवास सुरु असेल.

वरच्या मजल्यातून लोकांना पायी जाता येईल. यात मेंढीपाळ लोक शेळ्या मेंढ्यांसकट तेथून जाऊ शकतील. तर खालून वाहने जाऊ शकतील. हिमाचल प्रदेशला आणि स्पिती वॅलीला , लडाखला जोडणारा हा विलक्षण बोगदा नागरी संस्कृतीसाठी खूप लाभकारक होणार आहे.

पण याखेरीज आणखी सगळ्यात मोठा फायदा म्हणजे सियाचीनकडे जाणारा हा मार्ग कायम खुला राहील. अक्साई चीनकडे जाणारा हा मार्ग, या बोगद्यामुळे वाहतूक खूप सुलभ झाल्याने चीनचा चडफड होणार. कारण युद्धजन्य परिस्थितीत शस्त्रसामुग्री , खाद्यसामुग्री पोहचणेच सगळ्यात महत्वाचे असते. चीनने तिबेट, पाकिस्तानमध्ये सीमारेषेजवळपास सैन्याला सहज वाहतूक करता यावी म्हणूनच रस्त्यांवर निवेश केला आहे.

1999च्या कारगिल युद्धात लेहला जोडणारा एकमेव हायवेवर पाकिस्तानने नियंत्रण मिळवण्यासाठी संपूर्ण प्रयत्न केले होते. पण भारतीय सैनिकांनी शौर्याने हायवे राखला होता. त्यामुळे लेहचा संपर्क आणि तो भाग देशात राहिला. असे महत्व आहे या दोन हायवेंचे.

थोडक्यात सोपी शब्दात सांगायचे तर भारतातून लडाख, सियाचीनला दोन मार्गाने जाता येतं. हिमाचल प्रदेश-मनालीतून ‘रोहतांग’ पास ओलांडून आणि काश्मीर सोनमर्गने- ‘झोझिला’ पासमार्गे. पण या दोन्ही दैत्य पासमार्गे त्यांच्या परवानगीने जाणं सोपी नसतं. कारण तेथे कायम अपघाताची , ट्राफिक जॅमची, वादळाची हिमवर्षावाची भीती असते. पण येत्या वर्षापासून मनालीमार्गे लेहला जाताना रोहतांग पासमार्गे न जाता या बोगद्यातून सहज जाता येईल. सहा तास वाचतील.

शिवाय या रोहतांग बोगद्याशिवाय आता “झोझिला पासला” बायपास करणारा बोगदाही तयार होतो आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने लेह आता वर्षभर जोडलं जाणार आहे. यामुळे नागरी आणि सरंक्षणसंबंधित अनेक समीकरणे बदलतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महेंद्रसिंग धोनीसारखा ‘#फिनिशर’ चा रोल निभावताय. ओपनरने सुरू केलेलं काम धोनी फिनिश करतो तसे आधीच्या सरकारने सुरू केलेले काम नरेंद्र मोदी तडीस नेताय. 2010 मध्ये या बोगद्याचं काम सुरू झालं होतं. यापूर्वी मागच्या वर्षी “नाशरी बोगद्याचं” मोदींनी उद्घाटन केलं. त्याचाही शिलान्यास युपीए गव्हर्नमेंटने केला होता.

या नाशरी बोगद्यातून मी गेलो आहे. काश्मीर खोऱ्याला जोडणारा हा भारतातील सगळ्यात लांब हा बोगदा आहे. आतून दर पाचशे मीटरवर टेलिफोन व्यवस्था, फर्स्ट एड व्यवस्था, शिवाय संपूर्ण बोगद्यात स्वच्छ शुद्ध हवा आत येत राहील याची व्यवस्था केली आहे. मागच्या वर्षी हा बोगदा सुरू होण्यापूर्वी , काश्मीर खोऱ्याला जोडणारा जुना #जवाहरबोगदा होता. हा बोगदा खूप अरुंद, आत प्रकाश व्यवस्था नसलेला, शिवाय आत हवा येण्याची व्यवस्था नसलेला आहे. या बोगद्यातून जाताना काही वयस्कर, वृद्ध प्रवाश्यांना श्वासाचा त्रास , छातीवर दडपण , घाबरल्याची अवस्था झाली होती. कारण बोगदा खूप लांब आहे.
त्यामुळे नवे बोगदे तयार होणे खूप आवश्यक आहे.

त्या माणसाने सांगितल्यानुसार , मोदी यांनी स्वतःच्या सरकारात काही स्वतः लडाखला जोडणाऱ्या, चीनच्या अगदी जवळून जाणाऱ्या तीन मोठ्या बोगद्याची हायवे , प्रकल्पाची सुरवात केली आहे. ज्यामुळे चीनची चरफड होणार आहे.. अनेक अभियंते, शेकडो कामगार दिवसरात्र रस्ते आणि बोगदे बनवण्यासाठी राबताहेत. प्रवासात हे स्पष्टपणे दिसून येतं.

“मोदी बहोत जोशीला बंदा है पाकिस्तान और चायना के पाससे वो और बडे रस्ते बना रहा है! हे त्या माणसाचं वाक्य होतं. हे जर खरं असेल तर नक्कीच येत्या काही वर्षांत खूप समीकरणे बदतील.

आणि हे किती सकारात्मक आहे की आज मोदी सरकार वाहतूकीसंबंधित, संरक्षणसंबंधित नवे देशहितकारक प्रकल्प सुरू करताय, काही वर्षांनी दुसरे कोणते सरकार ते पूर्ण करतील. देश असाच पूढे जात राहील.

“सरकारे आते रहेगी जाती रहेगी , लेकीन देश रहना चाहीये….! “

Abhijeet Panse

भारतीय क्रिकेटमधील 'नारायण'

इंडियन क्रिकेटमधील ‘नारायण’

पु लं नी त्यांच्या 'नारायणाचं' वर्णन केलंय, कोणतंही काम असो ते करायला नारायण कायम तयार असतो. असेच भारतीय क्रिकेटमधील दोन नारायण आहेत, रवी शास्त्री आणि दिनेश कार्तिक.

कमेंट्री करायला “इट वेन्ट लाईक ए बुलेट” म्हणायला रवी शास्त्री असतो. मॅनेजर म्हणून गरज पडल्यास शास्त्री बुवाला हांक मारली जाते. वर्ल्डकप वाईटरित्या हारून आलेत की पार्ट टाइम मॅनेजर आणि कोच म्हणून शास्त्री बुआला कामाला लावलं जातं.
मेंटर म्हणून शास्त्री. निवेदक म्हणून रवी शास्त्री. असा हाबीसीसीआयचा एक नारायण.

दुसरा एक दिवट्या नारायण म्हणजे दिनेश कार्तिक. हासुद्धा कायम ड्युटीवर असतो.  ‘महेंद्रोदय’ होण्यापूर्वीपासून दिनेश कार्तिक बीसीसीआयच्या घरी कामाला आहे.

विकेट किपर म्हणून दिनेश कार्तिक. विदेशी कठीण दौऱ्यावर, ओपनरचा अनुभव नसला तरीही ओपनर म्हणून दिनेश कार्तिकला . रेग्युलर ओपनर फ्लॉप झाले की  मिडल ऑर्डरमधील कार्तिकला वरती कोऱ्या लाल चेंडूच्या तोंडी ..तोफी दिलं जायचं. चालू दौऱ्यात कोणता खेळाडू जखमी झाला की दौऱ्यावर ऐनवेळी स्वामींना बोलवलं जाई. अजूनही बोलवलं जातं.

काही खुट्ट झालं की अरे  "दिन्या ये रे जरा मदतीला.." अशी अवस्था एक दशक होती.

कधी किपर कधी स्लिप(र). आजवर पहिल्या ते सात नंबर पैकी सगळीकडे हा खेळला असावा .
पण तरीही कायम निराश करणारा खेळाडू. जवळपास पंधरा वर्षांपासून खेळत असलेला पण कधीही विश्वसनीय न वाटणारा, कायम अपरिपक्व भासणारा हा खेळाडू राहिला.

एकदा सचिन तेंडुलकरला हँडरेड करायला चार रन्स हवे होते आणि जिंकायला पाच ते सहा ,  कितीतरी बॉल्स शिल्लक असताना , काहीही गरज नसताना कार्तिकने समोर येऊन सिक्सर मारला. तेंडुलकरचं शतक हुकलं.
त्याच सिरीजमध्ये श्रीलंकन बॉलरने मुद्दाम नो बॉल टाकून सेहवागचं शतक होऊ दिलं नव्हतं.

टीममधील सरकारं बदलत राहो, कॅप्टन कोणीही असो “पहली पसंद” दिनेश कार्तिकच असायचा. गांगुली, द्रविड मग कुंबळे. अनिल कुंबळेनेही त्याला कायम संधी दिली. त्याचं अर्धशतक होत असेल तर इनिंग घोषित करायला थांबायचा.
पण कार्तिक कायम संधीचा संधीवात करायचा. कायम वात आणायचा.

सतत आत बाहेर केल्यावर, संधीची माती करीत गेल्यावर मोठ्या काळासाठी बाहेर गेल्यावर
013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्याला पुन्हा बोलावलं. पण त्यानंतरही कधीही विश्वसनीय कामगिरी केली नाही.
कायम या #डीकेने  “बोसडीके” कामगिरी केली.

पण 2018 वर्षात दिनेश कार्तिकचा मेक ओव्हर झालाय. शेवटच्या बॉलवर सिक्सर मारून फायनल जिंकून दिल्यावर तो अधिक विश्वसनिय वाटू लागलाय. कार्तिकची देहबोली आता बदलली आहे.

यावेळी टेस्टमध्ये दिनेश कार्तिक असणार आहे. त्यामुळे लोवर मिडल ऑर्डर थोडी बळकट होईल. सद्यस्थितीत भारतातील सर्वोत्तम विकेट किपर रिद्धीमानसहा आहे.
पण तो बॅट्समन म्हणून अजून पक्का नाही. यावेळी तो जखमी असल्याने तसाही टीममध्ये नाही.
'छोटारिचार्ज' पार्थिव पटेल चा 'टाटाडोकोमो' झाला.

दिनेश कार्तिक मात्र त्याच्या आजवरच्या लांब कारकिर्दीत बेस्ट फॉर्ममध्ये आहे. त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. यावेळी त्याच्याकडुन चांगल्या बॅटिंगची अपेक्षा आहे.
पण कार्तिक टीममध्ये असला की किमान एक दोन कॅचेस सुटतील अशी आधीच मनाची तयारी करावी लागते. विकेट किपर म्हणून तो सुमार दर्जाच्या आहे. त्यामुळे ऋषभ पंत की पंत कार्तिक स्वामी असा प्रश्न टीमपुढे राहील. तरीही दिनेश कार्तिकलाच पहिल्या दोन टेस्ट्मध्ये संधी मिळणार हे पक्कं आहे.

दिनेश कार्तिककडून कधी नव्हे ती चांगल्या कामगिरीची आशा आहे. गरज आहे. क्यूकी इसबार दुष्मन को हराने का अच्छा मौका है! यावेळी त्याचा बोसडीके न होता,

कार्तिक स्वामीने टीमला यावेळी म्हणायलाच हवं "भिऊ नकोस मी तुमच्या लोवर मिडल ऑर्डरमध्ये आहे!"

- Abhijeet Panse

#ILoveTestCricket

Sunday 29 July 2018

हा "हृषीकेश जोशी" नावाचा इसम कधी भेटला तर मला त्याला मिठी मारायची आहे. किती नितांत सुंदर काम करतो हा माणूस! मसाला मधील ‘तो’ सायकल मधील ‘हा’, दोन्ही टोकाच्या भूमिका डोंगरावरून अलगद झरा कोसळावा तसा अगदी सहज अभिनय करतो. खरंतर नाट्यभूमीचा कलाकार असल्याने त्याच्यासाठी या दोन्ही भूमिका करणे म्हणजे खायचं काम होतंच. पण तरिही सायकल मधील त्याचा वावर, अस्तित्व हेच डोळयांना मेजवानी वाटते. तो चित्रपट खाऊन टाकतो.

सायकल एक अगदी सहज, शांत, तरल चित्रपट.
एरवी ‘कोंकण’ पार्श्वभूमी असलेले चित्रपट बघताना ,  दिग्दर्शकावर ठराविक पद्ध्तीनेच, चाकोरीबद्ध कोंकण दाखवलं पाहिजे याचा ताण असतो का, ही शंका येत राहते.  कारण सर्वच “कोंकण चित्रपटात” पावसाळ्यातील हिरवाकंच निसर्ग, ठराविक पुस्तकी- सिनेमॅटोग्राफिक कोंकणच दाखवला जातो. प्रत्यक्षात एरवी तसा दिसणारसुद्धा नाही. पण सायकलमध्ये असं कुठलंही स्टिरिओटाईप न होता सहज कोंकण दर्शन दाखवलंय. ही गोष्ट विशेष आवडली.

प्रियदर्शन जाधव! याच्या लेखणीचा चाहता मी आधीपासूनच आहे. पण त्याचा अभिनयही तितकाच मस्त असतो.
प्रियदर्शन जाधवला खूप दिवसांनी मोठ्या पडद्यावर बघितल्याने छान वाटलं.

"दीप्ती लेले".  “मृण्मयी देशपांडेचं” लग्न झाल्यावर ठिकऱ्या ठिकऱ्या झालेल्या माझ्या हृदयाला ‘पुन्हा’ असेंम्बल करणारा आशेचा किरण दीप्ती लेलेच्या रुपात दिसतोय. खूप सुंदर बोलका चेहरा. इन्स्टाग्राम ही खूप ऍक्टिव्ह. तिनेही साजूक तुपातला अभिनय केलाय.

अँड देन ही कम्स! भाऊसाहेब  “ भालचंद्र कदम”! स्वतःच्या नुसत्या अस्तित्वानेच हसायला लावणारा हा नट. नेमक्या योग्य वेळी चेहऱ्यावर विनोदी  निरागस भाव, आपल्या खास (खर्जात?) आवाजात एखादं वाक्य, शब्द म्हणून दृश्यावर प्रभाव टाकणारा. यालाही मिठी मारायचीच आहे.

चित्रपटात काही छोट्या छोट्या दृश्यांनी सुंदर परिणामकारकता साधली गेलेली आहे.
प्रदीप वेलणकरांचं दृश्य खूप मस्त.

चित्रपटाच्या सुरवतीलाच लिहून येतं, की या सिनेमतील काळ, जेव्हा लोक साधी होती तेव्हाचा आहे. आणि तो काळ, तो भाव सम्पूर्ण चित्रपटात जाणवत राहतो.

सगळ्यात जास्त आवडलेलं वाक्य, “ आणि वस्तुंमध्ये किती काळ रमायचं ना!” हे. सिनेमाचा शेवट सुद्धा या वाक्याच्या अभिव्यक्तिवरच होतो.

नितांत सुंदर , गोड सिनेमा बघितल्याचा अनुभव मिळतो. आणि ते वाक्य आठवत राहतं ," वस्तूंमध्ये किती काळ रमायचं! " ......

- Abhijeet Panse

अजिंक्य रहाणे

भारतीय चित्रपटसृष्टीत पडद्यावर दोन प्रकारचे कलाकार असतात. स्टार किड्स,  हिरॉइझम असलेले स्टार्स तर दुसरे ‘एनएसडी’ किंवा फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटची पार्श्वभूमी असलेले. दुर्दैवाने भारतासारख्या ‘लाऊड’ देशात सर्वसाधारणपणे पहिल्या प्रकारातील लोक..अभिनेते (?) दुसऱ्या प्रकारातील ‘अभिनेत्यांवर’ कुरघोडी करतात. इथे नाव आणि हिरॉइझम फक्त तांत्रिकरित्या सक्षम असलेल्या अभिनेत्यांना झाकोळून टाकतं. एनएसडीतुन आलेले कलाकार ,कोणाचाही वशिला, गॉडफादर नसलेले ‘अभिनेते’ मग सतत संधीच्या शोधात असतात, मिळेल त्या छोट्या छोट्या, सह कलाकाराच्या भूमिका करून स्वतःची छाप सोडत जातात. कधी कोणाची ऐनवेळी रिप्लेसमेंट म्हणून त्यांना घेतलं जातं. कधीतरी मग त्यांच्या कलेला न्याय मिळतं. त्यानंतर काही नशीबवान कलाकारांना हळूहळू ते मिळतं ज्याच्यासाठी ते पात्र असतात.

भारतीय टीममध्ये नेहमीच असे काही , कोणाचाही अवास्तव , “आऊट ऑफ द वे” पाठिंबा नसलेले, “एक्स फॅक्टर” नसलेले पण तांत्रिकदृष्ट्या बऱ्यापैकी भक्कम, खणखणीत नाणं असलेले खेळाडू होते, आहेत. जे छोट्या छोट्या भूमिका..तात्पुरती रिप्लेसमेंट्स म्हणून आलेत.. आणि स्वतःच्या खेळीने सतत बीसीसीआयच्य दरवाजा ठोठावत , “दार उघड बुआ दार उघड” करत  स्वतःच्या भरवशावर स्वतःचा प्रवेश करते झाले. त्यातील एक नाव, अजिंक्य रहाणे.

अजिंक्य रहाणेला भारतीय टीममध्ये संधी नशिबानेच मिळाली म्हणावी लागेल. याचा अर्थ त्याच्यात कौशल्य नव्हतं वा तो त्यासाठी योग्य नव्हता असं नव्हतं. पण तो काही कॅप्टन धोनीज स्टार किड्स , सुरेश रैना, रवींद्र जडेजा वा तत्कालीन कॅप्टनस किड अंबाटी रायडू नव्हता, ज्यांच्यावर कॅप्टन धोनीची पूर्ण मर्जी बहाल होती. दरवेळी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये केशरी कॅप होल्डरच्या स्पर्धेत असणारा, मिळवणारा अजिंक्य राहाणेकडे बँकेत देशांतर्गत क्रिकेटमधील रन्स होते. पण त्याला भारताकडून खेळण्याची संधी मिळत नव्हती.

2013 चा भारतीय क्रिकेटचा भारतातील मौसम सुरू झाला तो प्रसिद्ध  ऑस्ट्रेलिया दौऱ्याने. पहिलीच मॅच खेळत असलेल्या शिखर धवनने खणखणीत शतक हाणलं. पण पुढील मॅचसाठी तो तंदुरुस्त राहिला नाही. त्याच्यजागी आलेल्या गौतम गंभीरला ऐनवेळी कावीळ झाली. त्यामुळे शेवटच्या क्षणी अजिंक्य रहाणेला कसोटी सामन्यासाठी संघात समाविष्ट करण्यात आले. पहिल्या कसोटीत तो अपयशी ठरला.

आपल्याकडे बॅट्समनला विदेशी दौऱ्यांवर कसोटी कारकिर्दीची सुरवात करायला कधीही आवडत नसते. कारण इथे अपयशी ठरल्यास, ज्याची शक्यता हमखास असतेच, पुन्हा संधी मिळणे कठीण असते. “डेब्यु नको पण विदेशी दौरा आवर” अशी नवफलंदाजांची अवस्था असते.  अजिंक्य राहणेची कारकीर्दच अशी प्रवाहाच्या विरुद्ध झाली. पहिल्या टेस्टमध्ये अपयशी झाल्यावर त्याची निवड अतिखडतर अश्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात झाली. तिथे त्याने अत्यन्त कठीण परिस्थितीत रन्स काढलेत पण पहिल्या वहिल्या शतकापासून तीन ते चार रन्सने वंचित राहिला. त्या इनिंगमध्ये आऊट होणारा तो शेवटचा बॅट्समन होता.

त्यानंतर लगेच न्यूझीलंड दौऱ्यात त्याची निवड झाली. मध्यंतरी श्री श्री सचिन तेंडुलकर निवृत्त झाल्यामुळे अजिंक्य राहणेची संघात निवड होण्याची शक्यता वाढत गेली. गॉडफादर कॅप्टन धोनीचे लाडोबा रोहित शर्माचे लाड करूनही ते कसोटीत अपयशी ‘ठरल्यामुळे(च) राहणेला संधी मिळत गेली. न्यूझीलंडमध्ये कठीण परिस्थितीत अजिंक्य रहाणेने  टेस्ट शतक ठोकले.

आणि त्यानंतर सुरू झाला इंग्लंड दौरा! लॉर्ड्सचं मैदान! लॉर्ड्स टेस्ट मॅच!

फक्त पिचवरच इंग्लंडच्या धष्टपुष्ट गायी

आणि वळू सोडले असते तरी कसोटीचे पाच दिवसही ते मस्त चरले असते .  इतकं खेळपट्टीवर हिरवं गवत होतं. मैदान आणि खेळपट्टीत फरक कळत नव्हता. फुटबॉलचं मैदान झालं होतं.

असं हिरवेगार मैदान दिसलं की नागपूरला टेस्ट सुरू व्हायच्या दोन तासांपूर्वी जखमी असल्याचे कारण सांगून मॅच न खेळणारा #कॅप्टनसौरवगांगुली आठवतो.

या घटनेची मॅथ्यू हेडनने त्याच्या आत्मचरित्रात टर उडवली आहे. असो.

दुष्काळात तेरावा महिना तसा त्या लोर्ड्सच्या ग्रीन टॉप खेळपट्टीवर भारत टॉस हरला.

क्रूक अॅलिस्टर कूकने LOL करत भारताला प्रथम फलंदाजी दिली. त्यावेळी तो नक्कीच आसुरी आनंदाने खदखदत हसला असावा. भारतीय टीम शंभर रन्सच्या आत आऊट होईल हे सर्वांना वाटले.

पहिल्याच ओव्हरमध्ये जिमी अँडरसनने शब्दशः अशक्य बॉल टाकला. सत्तरच्या कोनात इनस्विंग होऊन डावखोऱ्या शिखर धवनला काही कळायच्या आत तो आऊट झालाही होता.

विराट कोहलीचा अॅवरेज त्या दौऱ्यात 13 चा होता. तो फक्त ‘मम’ म्हणून बॅटिंग करायला यायचा. आणि परत जायचा.

भारतीय टीमची अवस्था अत्यन्त बिकट झाली. तेव्हा अजिंक्य राहाणेने भुवनेश्वर कुमारसोबत भागीदारी करत स्वतःचे अविस्मरणीय , अशक्य, अफलातून शतक पूर्ण केले. तेही द लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर. खरंतर त्याने त्या दिवशी शतक केलं नाही तर शतक हाणलं.

लोर्ड्सच्या प्रसिद्ध बाल्कनीतून संपूर्ण भारतीय टीमने अजिंक्य रहाणेचे अभिवादन केले. अजिंक्य रहाणे लॉर्ड्स मैदानावर शतक करणारा दुसरा मराठी क्रिकेटर ठरला. पहिलं नाव जास्त आश्चर्यकारक आहे.

लॉर्ड्सच्या  मैदानात त्या दिवशी राहणेहसोबत भुवनेश्वर कुमारनेही अत्यन्त महत्त्वाचे तिशीत रन्स काढलेत. हा माणूस प्रत्येक दौऱ्यात बॉलिंग आणि बॅटिंगमध्ये महत्त्वाचे योगदान देतो. पण तरीही महापौर ..ऑलउंडर आमचाच  ! हार्दिक पंड्याच!

जी मॅच भारत वाईटरित्या हरणार अशी मॅचच्या सुरवातीलाच सगळ्यांना खात्री होती; भारतीय समर्थकांसकट, ती मॅच भारताने जिंकली. लॉर्ड्सवर विजय साकारला. त्याचा शिल्पकार होता अजिंक्य रहाणे. लोर्ड्सवर LOL करण्याची वेळ भारताची होती.

पूढे 014- 015 ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याने पुन्हा शतक केलं. त्यानंतर श्रीलंका दौऱ्यावर श्रीलंकेत शतक केलं. अश्याप्रकारे त्याने त्याची प्रथम चार शतकं भारताबाहेर कठीण परिस्थितीत काढली.  हाही एक विक्रम आहे.

पण पुढे त्याचा फॉर्म चांगला वाईट होत राहिला. आणि मुळात तो रोहित शर्मासारखा , सुरेश रैना, सर (इथे हास्य मुद्रा) जडेजा सारखा स्टार कीड नसल्याने , ज्याच्यासाठी खास कमबॅक करायला खास भारतीय खेळपट्टीवर लॉंचिंग केल्या जाईल , सतत संधींवर संधी मिळत जाईल अशी परिस्थिती नव्हती. त्यामुळे राहणे 015 नंतर सतत आत बाहेर होत राहिला.

गेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही कोहलीने अजिंक्य रहाणेला डावलून (तथाकथित) एक्स फॅक्टर असलेल्या, मोठं नाव, हिरॉइझम असलेल्या कसोटीतील टुकार बॅट्समन रोहित शर्माला संधी दिली. नेहमीप्रमाणे त्याने माती केली. शेवटच्या टेस्टमध्ये राहणेला संधी दिली. त्याने महत्वाचे योगदान दिले.

आता सध्या भारतीय टीमचा  तो उपकर्णधार आहे. ती संधी त्याला इतर मोठी नावे अपयशी ठरल्यामुळे मिळाली. पण तरीही त्याचं स्थान पक्कं असतंच असं नाही. कोणीतरी रोहित शर्मा , हार्दिक पंड्या प्रीमिअर लीगमध्ये , घरच्या मैदानावर रन्स काढतात आणि विदेशात कसोटीत राहणेच्या जागी त्यांना घेतलं जातं. लाऊड भारत देशात हिरो हा अभिनेत्यावर भारी पडतो.

मध्यंतरी धोनी कॅप्टन असताना अजिंक्य रहाणेला टीममधून वगळण्याचं अजब कारण सांगितलं होतं की तो सिंगल्स काढून स्ट्राईक बदलू शकत नाही.

त्यापूर्वी रैना, अंबाती रायडूची जागा पक्की करण्यासाठी रहाणेला प्लेयिंग इलेव्हनमधून सतत डावललं जाई. भारतीय उपखंडात क्रिकेटमध्ये कॅप्टन्स, पावर असलेले लोक आपल्या दोस्ता मित्रांना असेच फेवर करत असतात. मग ते क्रिकेट असो, राजकारण की आणखी कुठलं सेक्टर.

अश्याप्रकारे एक बऱ्यापैकी तंत्रशुद्ध फलंदाज , एक्स फॅक्टर नसल्याने मोठ्या नावांखाली नेहमी झाकोळल्या गेला.

अजिंक्य रहाणे सम्पूर्णतः तांत्रिकदृष्टया उत्तम फलंदाज नाही. इतर भारतीय बॅट्समनसची जिथे आऊटस्विंगवर भंबेरी उडते तेथे हा इनस्विंगवर , ऑफकटर

वर बरेचदा एलबीडब्ल्यू, बोल्ड होतो. राहुल द्रविडला करिअरच्या उत्तरार्धात हा त्रास झाला होता तो अजिंक्य रहाणेला सुरवातीपासून आहे. चेतेश्वर पुजाराचाही हाच प्रॉब्लेम.

#अजितआगरकर सहा बॉलमध्ये एक बॉल विकेट घेणारा टाकायचा बाकी पाच वाईट. तसा अजिंक्य रहाणे छान खेळत असताना गरज नसताना अचानक आक्रमक फटका, चुकीचा शॉट खेळून विकेट देऊन जातो.

अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या कसोटी सामन्यात तो कॅप्टन आहे. त्यापूर्वी विराट कोहली तंदूरस्त नसल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध धर्मशाला येथील टेस्टमध्ये त्याने कॅप्टन्सी केलेली होती. त्या मॅचमध्ये त्याने कुलदीप यादवला संधी दिली होती. त्या मॅचमध्ये तो हुकूमचा एक्का ठरला होता.

नेहमी इतरांना संधी मिळाल्यावर ते अपयशी झाल्यावर संधी मिळणारा हा शंभर टक्के प्रयत्न करणारा क्रिकेटर. मागच्या टूरवेळी लॉर्ड्स गाजवणारा या खेळाडूला  आता येत्या इंग्लिश टूरमध्ये जास्तीत जास्त संधी मिळायला हवी. कारण लॉर्ड्सचं आणि लीड्सचं घोडामैदान आता फक्त दीड महिन्यावर आहे.

#AjinkyaRahanesbirthday

- Abhijeet Panse

Lets football

काही दिवसांपूर्वी डेव्हिड बेकहॅमचा एक व्हिडिओ वायरल झालेला बघितला. समुद्रकिनाऱ्यावर  बेकहॅम हातात शीतपेयाचा कॅन घेतलेला. दूरवर तीन बाजूला तीन कचरा पेटी ठेवलेल्या असतात. डेव्हिडचा मित्र त्याला विचारतो , की तू इथून तीन फुटबॉल्स त्या तीन कचरपेटीत टाकू शकतोस का.  डेव्हिड बेकहॅम शरथ मंजूर है..हो म्हणतो. आणि सहज तीन फुटबॉल्स तीन किक्समध्ये त्या तीन कॅन्स टाकतो. तेव्हा त्याच्या मित्राचा आवाज ऐकण्यासारखा आहे.
तेव्हा कळतं, रस्सी पुरानी हो गयी पर बल नही गया..निवृत्त झाला पण अचूकता कायम अजूनही..
ही आहे साधना. सर्वोत्तम होण्याची.

फुटबॉल म्हटलं की डोळ्यासमोर येतो जोश, आवेग, थरार. पण फक्त इतक्यापुरताच हा खेळ मर्यादित नाही. ते तर त्याचं बाह्य शोकेस आवरण. पण फूटबॉलमध्ये त अचूकता, समयसूचकता आणि ती मिळवण्यासाठी प्रचंड मेहनतही आवश्यक. हे कळतं.

आजपासून संपूर्ण जग तगड्या, मजबूत पायांची किमया, पदलालित्य बघणार आहे. आजपासून फिफा, द फेडरेशन इंटरनॅशनल फूटबॉल असोसिएशन वर्ल्डकप सुरू होतो आहे. मायकल जॅक्सनच्या मून वॉकसाठी त्याचे चाहते वेडे होते. तसेच मेस्सी, रोनाल्डोच्या पायांची नजाकत, रग, ताकद बघण्यासाठी अक्खं जग वेडं होतं.

रशियात बत्तीस फुटबॉल देशांचा कुंभमेळा सूरु होतोय.
संपूर्ण विश्व “लेट्स फूटबॉल” करणार आहे. क्रिकेट हा एकमेव आपला लाडका बाकी सावत्र खेळ मानणाऱ्या बहुतेक भारतीयांना फूटबॉलप्रेमी देशात फूटबॉलवर्ल्डकपवेळी पसरणाऱ्या फूटबॉलज्वराबद्दल जास्त जाणीव नसते.

क्रिकेट हा सभ्य पुरुषांचा खेळ म्हणतात.  टेनिस, बॅडमिंटन हे काहीसे तांत्रिक खेळ आहेत. टेबल टेनिस हा इनडोअर तांत्रिक खेळ. गॉल्फ हा  खेळ तर उच्चभ्रू खेळ मानला जातो. त्या खेळाचा ऑराच अगदी उच्चभ्रू. त्यात जोश कमी क्लास जास्त जाणवतो.  पण फुटबॉल .. हा जेंटलमन्स गेम नाही. हा खेळ भावनाशून्य चेहरा करून खेळण्याचा, बघण्याचा नाही. हा आहे अस्सल मर्दानी, जोश से भरपूर, रांगडा खेळ.

दहा मिनिटं धावल्यावर छातीचा भाता होणाऱ्या तरुण मुलांत आणि एका व्यावसायिक फुटबॉल खेळाडूमध्ये प्रकाश वर्षाचं अंतर असतं. फुटबॉलमध्ये पणास लागतो तो इंडयुरंस, स्टॅमिना..

फूटबॉलपटूंचा मैदानावरील जल्लोषही आवेगात असतो. क्रिकेटमधील मैदानावरील ‘सेलिब्रेशन्स’ हे कित्येकदा फूटबॉलमधून आलेलं वाटतं. अंगातील टीशर्ट काढून मैदानावर धावणे, सहखेळाडूच्या छातीवर छाती आपटणे..

चाहत्यांच्या मनावर फूटबॉलचा मनावर इतका प्रचंड प्रभाव असतो की त्यांचंही जल्लोष मर्यादेपलीकडे जातो. चित्रविचित्रप्रकारे ते विजय, किंवा क्षण साजरा करतात. कित्येकदा युरोपियन देशात फूटबॉल मॅच सुरू असताना युवक किंवा युवती कधी मध्यमवयीन माणूस अंगावरील संपुर्ण कपडे काढून नग्नावस्थेत मैदानावर चालू मॅचमध्ये धावत येतात. फूटबॉल ही नशा असते त्यांच्यासाठी. मनावर प्रचंड प्रभाव पाडणारा , काहीही करायला लावणारा हा खेळ. लोक रडतात, ओरडतात, जल्लोष करतात. राग , शत्रुत्व विसरून एकमेकांना मिठ्या मारतात तर कधी जीवावर उठतात.  भर मैदानात कित्येकदा भांडणं, एकमेकांना जखमी करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटना झालेल्या आहेत.

जवळपास दोनशे दहा देशांत खेळला जाणारा हा खेळ संपूर्ण जगाला वर्ल्डकपच्या काळात जोडतो. भावनिकरित्या लोक जोडल्या जातात.
फूटबॉलप्रेमी वेडे असतात फूटबॉलसाठी. हे वेड कधी मर्यादा पार करतं. विरुद्ध टीम्सच्या समर्थकांमध्ये, चाहत्यांमध्ये मारामाऱ्या होतात.
युरोपियन देशांत, आफ्रिकन देशांत फूटबॉल हा जीव की प्राण आहे.

आमच्या शाळेत तर शारीरिक शिक्षणाचे गुरूजी मुलांसाठी मिळालेला फूटबॉल कपाटात ठेवतात. कारण पोरं फूटबॉलला पोरं लाथा मारून त्यातील हवा काढून टाकतील म्हणून. काही मुली आणि मुलंही फूटबॉल मिळाला तर टेनिस, रबरी बॉलप्रमाणे त्याचे “टप्पे टप्पे” #नवरंग खेळतात, कॅच कॅच खेळतात. कसे होणार भारतीय खेळाडू फूटबॉलपटू. “चिंता करितो भारतीय फूटबॉलची.”

आम्ही तर समुद्रकिनारी गेल्यावर तिथून लाल , पिवळा मोठा आकाराचा बॉल घेतो आणि तेवढयापुरतं कोणी पेले, डेव्हिड बेकहॅम, कोणी रोनाल्डो, मेस्सी होतं.

क्रिकेट हाच एकमेव खेळ माहिती असणाऱ्या एका मित्राला रोनाल्डोबद्दल सांगत असताना, रोनाल्डो म्हणजे रोनॅल्ड पेन कंपनीचा मालक काय रे? असे प्रश्नही काही अजाण निरागस मनुष्य विचारताना बघितले आहेत.

“मोहन बगान”ला गार्डन, पार्क समजणारे महाबागवान याची देही याची डोळा बघितले आहेत.

पण भारतात खऱ्या अर्थाने फूटबॉलप्रेमी दिसतात ते पश्चिम बंगालमध्ये. फूटबॉल न आवडणारा बंगाली होऊच शकत नाही असंही म्हटलं जातं. “
यत्र यत्र बंगालीबाबू तत्र तत्र फूटबॉलप्रेमी!”

मोहन बगान हा फूटबॉल क्लब कोलकाताची शान आहे. 1889मध्ये भुपेंद्रनाथ बोस यांनी स्थापन केलेला हा फूटबॉल क्लब भारतातील सगळ्यात जुना, आणि आशिया खंडातील सगळ्यात जुना आणि मानाच्या क्लबमधील एक आहे.

पण आता भारतात फूटबॉलबद्दलची आस्था , प्रेम वाढतंय. गेल्या ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सतरा वर्षांखालील विश्वकप स्पर्धेवेळी लोकांची उपस्थिती अबब म्हणणारी होती. शिवाय अंबानी सम्राज्ञी स्पोर्ट्स उद्धारक शो ऑफ राणी नीता अंबानीसुद्धा फूटबॉलला बढती देण्याचं काम करताय. रणबीर कपूर, अभिषेक बच्चन सारेच भारतात फूटबॉलप्रति प्रेम वाढवण्याचं काम करत असतातच.

जून जुलै महिना सुरू झाला की सूर्य आपलं कर्क संक्रमण करतो. देशभरात शेतकरी शेतीची पेरणीची कामे सुरू करतो. आषाढीच्या वारीचे वेध लागतात. वारकरी  पाऊले चालती पंढरपूरची वाट..पण दर चार वर्षांनी जून जुलैमध्येमध्ये जगभरात वारे वाहू लागतात ते फूटबॉलचे. “पाऊले चालती फूटबॉल टर्फीची वाट..”

जून जुलै महिन्यात फूटबॉल वर्ल्डकप होत असतो. जगभरात फूटबॉलज्वर पसरतो. भारतात  फूटबॉलप्रेमी पर्जन्याच्या कोसळत्या धारात मैदानात फूटबॉल खेळू लागतात.
फूटबॉल वर्ल्डकप हा आर्थिक घडामोडींचा, आपापल्या उत्पादनाच्या प्रमोशन्सचा एक व्यासपीठ बनतो.

2010चा फूटबॉल वर्ल्डकप म्हटलं की स्पेन आणि अर्जेंटिनाचा अंतिम सामना आठवतो. संभाव्य विजेता ब्राझीलची गच्छंती आठवते पण एक विशेष जगविख्यात ‘ ज्योतिषी’ आठवतो तो म्हणजे ‘#पॉल_बाबा_महाराज ‘#ऑक्टोपस’. हा ऑक्टोपस दर सामन्यात विजेता कोण होणार हे सुचवायचा. आणि योगायोग म्हणजे ते अचूक निघायचंसुद्धा. त्यावरून फार मनोरंजन झालं होतं.

2010 चा फूटबॉल वर्ल्डकप हा आफ्रिकेत झाला होता. तेव्हा शकिरा या पॉप सिंगरने सगळ्यांना “#वाका वाका..” म्हणत फूटबॉलसमोर वाकायला लावलं होतं. शकिरा शकू तशीही गुडघ्यात ‘विक’ करतेच म्हणा.

क्रिकेटमध्ये जसा ऑस्ट्रेलिया तसा फूटबॉलमध्ये ब्राझील! फूटबॉलमधील बाप माणूस! जगातील सगळ्यात जास्त काँडम्सची आयात करणारा देश म्हणून ओळखला जाणारा हा देश खऱ्या अर्थाने ओळखला जातो तो फूटबॉलसाठी! फूटबॉल प्रेमी! ब्राझील टॅणा टॅणा ना ना न ना..ब्राझील… हे गाणं अजूनही  कुळाचाराप्रमाणे पार्ट्यांमध्ये वाजवलं जाणारं गाणं, त्यामागेही फूटबॉलची थोडी पार्श्वभूमी आहे.

ब्राझील जर फूटबॉलमध्ये हरला तर राष्ट्रीय दुखवटा होतो . ब्राझील फूटबॉल टीमच्या जिंकण्यावर हरण्यावर तेथील राजकीय गणितेही अवलंबून असतात. वर्ल्डकपच्या काळात एक महिना अघोषित सुट्टीच असते तिथे. सामन्यानुसार कार्यालयांच्या वेळा बदलल्या जातात. ब्राझीलने आजवर झालेल्या  वीस वर्ल्डकप्सपैकी पाच वेळा आपले नाव फूटबॉल वर्ल्डकप ट्रॉफीवर नाव कोरले आहे.

मागील विश्वविजेता जर्मनी यावेळी जगज्जेतेपद राखण्याचे पूर्ण प्रयत्न करणार. अर्जेंटिना, 2006चा  विजेता पिझ्झा पास्तावाला इटलीही नक्की मुसंडी मारणार. अमेरिका जगात सगळीकडेच नाक खुपसत असतोच. फूटबॉलमध्येही तो मागे नाही.

पोर्तुगाल आणि स्पेन हे तर क्रिकेटमधील भारत पाकिस्तान, पारंपरिक प्रतिस्पर्धी. ते यावेळी एकाच ग्रुपमध्ये आहेत. एकाच ग्रुपमध्ये पारंपरिक प्रतिस्पर्पध्यांना ठेवून रग्गड टीआरपी, लोकप्रियता मिळवायची हे गणितच आहे. क्रिकेट वर्ल्डकपमध्येही भारत पाकिस्तान म्हणूनच बहुतेकवेळा एकाच ग्रुपमध्ये असतात.

लिओनेल मेस्सी हा पाचवेळा जगातला सर्वोत्तम फूटबॉलपटू म्हणून गौरवल्या गेला पण त्याने ‘वर्ल्डकप’ अजून मिळवून दिला नाही. पोर्तुगालचा स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोबाबतसुद्धा हीच गोष्ट.

चार वर्षांपूर्वी विश्वकप अंतिम सामन्यात  जर्मनीने ब्राझीलला हरवून विश्वविजेतेपद मिळवलं. याचे उट्टे काढण्यास ब्राझीलकरांचे पाय मांड्या शिवशिवत असतील. मांड्यांचे स्नायू स्फुरण पावत असतील.

2010च्या वर्ल्डकप अंतिम सामन्यात ऑक्टोपस बाबाने सूचित केल्याप्रमाणे जिंकलेला स्पेन सध्या तितका ताकदवान राहिला नाही. कालाय तस्मै नमः!
अर्जेंटिना यावेळी 'किक’ देणार हे नक्की.

पेले पेले ओ मेरे राजा पेले पेले ओ मेरे जानी , “#ब्लॅकपर्ल” म्हणून ओळखला जाणारे, फूटबॉल इतिहासातील एक सर्वोत्तम फूटबॉलपटू ते  लिओनेल मेस्सी, डिएगो मॅराडोना, रोनाल्डो, पर्यंत अनेक मोठमोठे फुटबॉलपटू स्टार या खेळाने दिलेत.

भारतात सुनील गावस्कर सुनील शेट्टी सगळयांना माहिती असतात. अगदी सुनील पॉल सुनील ग्रोव्हर सुद्धा माहिती असतो. पण  #सुनीलछेत्री किती जणांना माहिती ?

सुनील छेत्री हा भारतातील उत्कृष्ट फूटबॉलपटू. भारतीय फूटबॉलटीम चा कर्णधार. त्याने लिओनेल मेस्सी या जगविख्यात फूटबॉलपटूचा 64 गोल्सच्या रेकॉर्डची नुकतीच बरोबरी केली. मेस्सीपेक्षा कमी मॅचेस तो खेळलाय. नुकताच सुनील छेत्रीने भावनिक आवाहन केलं होतं की किमान आम्हाला दूषणं देण्यासाठी, टीका करण्यासाठीतरी भारतीय फूटबॉलटीमचा सामना असताना मैदानात येऊन बघत जा. तेव्हापासून फूटबॉलची लोकप्रियता आणि मैदानात उपस्थिती भारतात आणखी वाढली आहे.

तो दिवस लवकर यावा जेव्हा भारतीय फूटबॉल टीम वर्ल्डकपमध्ये जून जुलै या महिन्यात खेळताना दिसावी.

आयुष्यात प्रत्येकाने एक कला, किंवा एक खेळ तरी जीव तोडून ओतून खेळावा. फूटबॉल तर अगदी सोपी , साधा कुठलेही जास्त साहित्य नसलेला खेळ. एक बॉल त्याच्या मागे बावीस जण.

#पावसात मैदानात फूटबॉल जो खेळला त्याने आयुष्याचा मजा घेतला समजायचं.

प्रत्येक खेळ हा मानवी आयुष्यालाच शोकेस करत असतो. पडायचं , हारायचं, उठायचं आणि जिद्द कायम ठेवून पुन्हा खेळायचं आणि जिंकायचं. सतत मन वर्तमानात ठेवून काळजी घेत योग्य वेळी किक मारून आपला गोल करावा. हेच हा खेळ सांगतो.

लेट्स फूटबॉल

- Abhijeet Panse

- लोकमत , ऑक्सिजन.
14 जून 2018

Blue eyed boy


"बिघडा हुआ शेहजादा..ए ब्ल्यु आइड बॉय"

चित्रपटातील एक पात्र; बडे बाप की बिघडी हुई औलाद.. इतरांना तुच्छ लेखत आपल्याच तोऱ्यात राहणारा, मस्तावलेला , नुकताच विशीतला, जवानी का जोश असलेला , मग्रूर असा एक बिघडलेला नौजवान .. मात्र टक्केटोणपे खात काही काळाने हळूहळू परिपक्व होत खणखणीत नाणं बनत जातो.. हे वर्णन स्टुअर्ट ख्रिस ब्रॉड या इंग्लिश खेळाडूला अगदी लागू पडतं.

स्टुअर्ट ब्रॉड हा भारतीयांना खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे. त्याचं कारण युवराज सिंग.

युवीने सलग 6 सिक्सर्स ज्याच्या बॉलिंगवर हाणलेत तो हा स्टुअर्ट ब्रॉड. पूर्व पश्चिम नैऋत्य ईशान्य वायव्य साऱ्याच दिशेने, दिसेल त्या दिशेने युवराज सिंगने त्याला फोडला होता.  त्यावेळी झालेला त्याचा हेल्पलेस, क्ल्युलेस चेहरा कोणी भारतीय क्रिकेट शौकीन, अशौकीन विसरणार नाहीत.

इंग्लिश खेळाडू ख्रिस ब्रॉड हे आयसीसीचे मॅच रेफ्री-सामनाधीकारी, त्यांचा मुलगा स्टुअर्ट ब्रॉड. निळ्या डोळ्यात कायम कनिंग भाव, लबाड हास्य. शिडशिडीत , जबरदस्त उंची, लहान पणापासून हातात क्रिकेटमधील पारंपरिक इंग्लिश सेक्सी #लालचेरी , ड्युक्स बॉल , त्यामुळे इंग्लिश वातावरणात ‘बॉलर’ होण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले नसतील.

2010 मध्ये एका मॅचमध्ये स्टुअर्ट ब्रॉड मैदानावर बॉलला जोड्यांचे खिळे रुतवत असताना दिसला. पण सामनाधिकारी ख्रिस ब्रॉडचा मुलगा म्हणून त्या सामन्यातील सामनाधिकाऱ्याने त्याला काहीही दंड वा शिक्षा न करता सोडून दिलं. असा मीडियाचा सूर होता.

2011 च्या वर्ल्ड कप नंतर त्याच्यात परिपक्वता येत गेली. भारताने 2011 चा वर्ल्डकप जिंकला, त्यानंतर जून जुलैमध्ये इंग्लिश दौरा सुरू झाला. विश्वविजेत्या भारतीय टीमचे त्या दौऱ्यात अतिशय हाल झालेत. सर्व टेस्ट मॅचेस भारत हरला. त्यातही स्टुअर्ट ब्रॉडने महत्वाची भूमिका बजावली.

त्यानंतर 2014 जुलै ऑगस्ट दौऱ्यात एका मॅचमध्ये वरुण अॅरनच्या वेगवान  बाऊन्सरवर शॉट मारताना, स्टुअर्ट ब्रॉडच्या हेल्मेटची ग्रिल तोडून नाकावर बॉल आदळला. नाकाचं हाड मोडलं.  मॅच सोडून त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. तेव्हा त्याचा फोटो घाबरवणारा होता. भारत ती टेस्ट मॅच हरला. मॅन ऑफ द मॅच हॉस्पिटलमध्ये भरती असलेला स्टुअर्ट ब्रॉडला गौरवण्यात आलं. कारण पहिल्या इंनिंगमध्ये त्याने सहा विकेटस घेतल्या होत्या. इतकंच नाही तर सर्जरीनंतर त्याने ट्विट केलं की रेडी फॉर फायनल मॅच. पुढची मॅच  तो खेळला. चेहऱ्यावर जखमांचे निशाण  दिसत होते.

टेस्टमध्ये तो फक्त बॉलनेच नाही तर बॅटनेही कायम भारताला त्रस्त करतो हा इतिहास आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अँड्र्यू सायमंड कायम भारताला त्रस्त करायचा. भारतीय टीमचं लक्ष विरुद्ध टीमच्या मोठ्या नावांवर असताना तो नेमका मोठी अडचण निर्माण करायचा तसाच स्टुअर्ट ब्रॉड भारतीय टीमसमोर अडचणी निर्माण करतो. भारताने विकेटस घेऊन पकड मजबूत करण्याच्या प्रयत्नात असताना तो चांगली बॅटिंग करत भारतीय टीमच्या आशेवर पाणी फिरवतो. बिग फिश जिमी अँडरसनवर भारतीय बॅट्समन्सचं लक्ष असताना ब्रॉड  विकेटस घेऊन जातो.

स्टुअर्ट ब्रॉडला भारतीय टीम मार देताना बघताना फार आनंद होतो. काही दिवसात इंग्लंड सोबत मॅचेस सुरू होताय. तेव्हा स्टुअर्ट ब्रॉडला #कोहलीअँडगॅंगने चांगलं ठोकावा ही इच्छा आहे.

लेकीन इस छोकरे में दम है! एक माजलेला , अपरिपक्व , ब्ल्यू आइड बॉय, बिघडा हुआ शहजादा ते  इंग्लंड टीमचं एक प्रमुख अस्त्र हा प्रवास नक्कीच स्तुत्य आहे.

#StuartBroadBirthday

- Abhijeet Panse

ओ वुमनिया

“कोण जिंकतंय?”
“मी फक्त भारत पाकिस्तान च्या मॅचेस बघते!”

“मला फक्त वर्ल्डकप बघायला आवडतो!”

“वर्षभर सतत काय ते क्रिकेट टीव्हीवर सुरू असतंच!”

“सचिन रिटायर झाला आणि आम्ही क्रिकेट बघणं सोडलं!’

“धोनी कित्ती हँडसम आणि क्युट आहे!”

“ मी फक्त विराट आणि धोनीसाठी मॅच बघते!”

अश्या प्रतिक्रिया , असं बोलणं बहुतेकवेळी स्त्रियांकडून, मुलींकडून क्रिकेट संदर्भात ऐकायला मिळतं.

अगदीच क्रीडा पत्रकार मुली आणि काही अपवाद सोडता,  सामान्यतः सगळ्या मुली, स्त्रिया क्रिकेट संदर्भात ‘अपडेटेड’ असतातच किंवा त्यांना तितका रस असतोच असे नाही.
सर्वसामान्य कुटुंबात एरव्ही मुलांनाच खेळांसाठी प्रोत्साहन कमी मिळतं तिथं मुलींचा ओढा क्रिकेटकडे कमीच असतो.
एरवी मुली  व्हॉलीबॉल , रनिंग, जिमनास्ट यांत शाळा कॉलेजपासून भाग घेतात पण क्रिकेटमध्ये सर्वसामान्यपणे कमीच.

परिणामी एकूणच महिला क्रिकेटला कित्येक वर्षे ‘ग्लॅमर’ नव्हतं. शिवाय पुरुष क्रिकेटकडे संपूर्ण ओढा, ग्लॅमर, स्टारडम असल्यामुळेही महिला क्रिकेटकडे लोकांचा विशेषतः भारतात प्रेक्षकांचा रस कमी होता.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियातील अॅशेस पहाटे उठून बघतात, वेळ पडल्यास रिकाम्या स्टेडियममधील पीएसएल बघून पाकिस्तानमधील स्थानिक क्रिकेटर्सचे नावे कळतील पण भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट टीममधील महिला क्रिकेटर्सचे नावेही प्रेक्षकांना माहिती नसतात. किंबहुना नसायचेत. पुरुष क्रिकेट टीमकडेच माध्यमांचा ओढा असायचा. आणि ते साहजिकही होतं. पुरुष क्रिकेटला ग्लॅमर, जाहीराती, टीआरपी जास्त असल्याने तांत्रिक गोष्टींचा विचार करता पुरुष क्रिकेट हेच भारतात प्रमुख मानलं जातं. शिवाय वेळोवेळी पुरुष क्रिकेट संघामध्ये , सुनील गावस्कर, कपिल देव, सचिन तेंडुलकर, विराट कोहली सारखे स्टार्स मिळत गेलेत त्यामुळेही महिला क्रिकेट झाकोळलं गेलं.
पण आता तसं नाही.

नुकत्याच आटोपलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय महिला खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली. दक्षिण आफ्रिका दौरा हा क्रिकेटमधील एक कठीण दौरा मानला जातो. तिथे भारतीय महिला क्रिकेट टीमने दक्षिण आफ्रिकेला दक्षिण आफ्रिकेत वनडे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेट मालिकेत यश मिळवले. हा दक्षिण आफ्रिका दौरा भारतीय क्रिकेट इतिहासातील एक सुवर्णपान ठरणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेची दाणादाण उडवली.

काही महिन्यांपूर्वी झालेल्या महिला वनडे क्रिकेट वर्ल्डकपपासून महिला क्रिकेट टीमसंबंधित गोष्टी बदल्यात.
कपिल देवच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमध्ये झालेला 1983चा वर्ल्डकप भारताने जिंकल्यावर भारतात क्रिकेट लोकप्रिय खेळ बनला. खेळात पैसा आला. तश्याच प्रकारे 2017च्या इंग्लंडमधील वर्ल्डकपनंतर  महिला क्रिकेट मॅचेसही चॅनेल्स आता नियमितपणे दाखवू लागलेत.
आजवर मिथाली राज, झुलन गोस्वामी , अंजुम चोप्रा याच खेळाडू त्यांनी चांगली कामगिरी केल्यामुळेच लोकांना माहिती होत्या . अंजुम चोप्रा निवृत्त होऊन काळ लोटला. मिथाली राज आणि झुलन गोस्वामी शेवटच्या टप्प्यात आहेत. पण आता मात्र  महिला क्रिकेट टीमला चांगले दिवस आले आहेत.
देर आये दुरुस्त आये!
स्मृती मंधाना , जेनिमा रोड्रिक्स ह्या आता स्टार खेळाडू आहेत. त्यांना मीडियाद्वारे लोक ओळखायला लागले आहेत.

महिला क्रिकेट इतिहाचा विचार केल्यास क्रिकेटमधील बॉल थेट सतराव्या शतकात इंग्लंड येथील ससेक्स गावात जाऊन पडतो. महिला क्रिकेटचा प्रथम सामना
तेथे खेळला गेला. अर्थातच इंग्लंड हा क्रिकेटचा जन्मदाता असल्याने  महिला क्रिकेटही तेथेच जन्माला आलं.
स्कर्ट्स परिधान करून तत्कालीन महिला प्रथम क्रिकेट सामना खेळल्या होत्या.

इंग्रजांनी जगात जेथे जेथे राज्य स्थापन केले तेथे क्रिकेट आणि चहाचं व्यसन लागत गेलं. इंग्रज गेलेत पण क्रिकेट आणि चहा मागे ठेवून गेलेत. पुढे देशोदेशी क्रिकेट बहरत गेलं. स्त्री पुरुष भेदाच्या पलीकडे गेलं.
1934  साली प्रथम महिला कसोटी सामना खेळला गेला. तो सामना झाला ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड महिला संघा दरम्यान.

1973मध्ये भारतात वुमन्स क्रिकेट असोसिएशन स्थापन झालं. या सार्वभौम संस्थेखाली 1976 साली वेस्ट इंडिजविरुद्ध प्रथम भारतीय महिला कसोटी क्रिकेट सामना खेळला गेला.
भारतीय महिला क्रिकेट संघाने आपला पहिला कसोटी विजय वेस्ट इंडिजविरुद्ध नोव्हेंबर 1978 मध्ये मिळवला. तेव्हा भारतीय महिला संघाचे नेतृत्व करत होत्या शांता रंगस्वामी.
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या पहिल्या कर्णधार डायना एडूलजी या होत्या.

1978च्या महिला क्रिकेट विश्वकपमध्ये भारतीय महिला संघाने आपला प्रथम एक दिवसीय सामना खेळला. तो विश्वकप भारतातच खेळला गेला होता.
तिथून महिला क्रिकेट देशात खेळले गेले पण हवे तसे रुजले नाही. किंबहुना सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहचले नाही.
2005 नंतर वूमन्स क्रिकेट असोसिएशन हे आयसीसीमध्ये एकरूप झाले आणि तिथून महिला क्रिकेटची प्रगती वेगाने होऊ लागली.
पुढे मिथाली राज ही स्टार खेळाडू भारतीय महिला संघाची कर्णधार बनली. ती पहिली महिला क्रिकेट ग्लॅमरस खेळाडू म्हणता येईल.
मिथाली राज ही महिला क्रिकेट जगतातील सगळ्यात  जास्त वनडे रन्स केलेली महिला खेळाडू आहे. ती सगळ्यात यशस्वी भारतीय महिला कर्णधारसुद्धा आहे. सगळ्यात जास्त विजय तिच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने मिळवले आहेत.

आजवर तेरा महिला भारतीय क्रिकेट टीमच्या कर्णधार झाल्यात. डायना एडूलजी , शांता रंगस्वामी ते आजच्या मिथाली राज, हरमनप्रीत कौर पर्यंत.
सध्या वनडे आणि कसोटी संघाचं नेतृत्व मिथाली राज तर ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेट संघाचं नेतृत्व हरमनप्रीत कौर करते.
डायना एडुलजी यांनी भारतीय महिला क्रिकेटसाठी खूप मेहनत घेतली. त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.
डायना एडुलजी यांनी पुढाकार घेतल्याने, त्यांच्या नेतृत्वाखाली महिला क्रिकेटमध्ये खूप सकारात्मक बदल घडलेत. महिला क्रिकेट बीसीसीआयमध्ये सामील झाल्यावर त्यांनी खूप त्यांनी महिला क्रिकेटसाठी खूप काम केलं. त्यामुळे आता महिला क्रिकेटपटूला पेंशन मिळू लागलीये. शिवाय महिला क्रिकेटपटूला एक हाती रक्कम मिळू लागली. त्यांना नुकताच सी. के. नायडू पुरस्कार देण्यात आला. पण काही तांत्रिक कारणामुळे त्यांनी तो परत केला.

संगीता कामत या सुद्धा एक लढाऊ अष्टपैलू मराठी क्रिकेटपटू होत्या. त्यांच्या दोन्ही गुडघ्यावर शस्त्रक्रिया होऊन देखील योग्य शारीरिक व्यायामामुळे, फिटनेसमुळे
त्या पुढे आणखी तीन वर्षे खेळल्यात.

भारतीय महिला संघाने आजवर वर्ल्डकप जिंकला नाही. पण  दोनदा वर्ल्डकप फायनलमध्ये पोहचले आहेत. मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्डकपमध्ये भारतीय टीम फायनलमध्ये पोहचली होती. अंतिम सामना यजमान इंग्लंड संघाविरुद्ध झाला. पण अगदी हातातोंडाशी आलेला विजय निसटला. त्या सामन्यात शेवटचा बॉल पडला आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे  काही वेळापूर्वी पाऊस पडून सामना रद्द झाला असता तर तो सामना दुसऱ्या दिवशी पुन्हा दुसऱ्या दिवशी खेळला गेला असता. वर्ल्डकप अंतिम सामन्यात डकवर्ड लुईस सिस्टीम अवलंबल्या जाणार नव्हती.

भारत अंतिम सामना हरला मात्र
तिथून महिला संघासाठी गणिते योग्यप्रकारे बदलीत. महिला संघाचे माध्यमांद्वारे कधी नव्हे इतके कौतुक झाले. भारतीय महिला संघाची कामगिरी आणि खेळाडू लोकांपर्यंत पोहचलेत.
झुलन गोस्वामी ही भारतीय ज्येष्ठ खेळाडू आहे. ती जगातील सर्वश्रेष्ठ वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. नुकताच तिने  आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोनशे बळी घेणारी प्रथम गोलंदाज म्हणून विक्रम केला आहे.

पुरुष क्रिकेट आणि महिला क्रिकेटमध्ये काही तांत्रिक फरक आहेत. महिला  क्रिकेट सामन्यात सीमारेषा ही पुरुष क्रिकेट सामन्यात असलेल्या सीमारेषेपेक्षा छोटी असते. महिला क्रिकेटमध्ये वापरला जाणारा बॉल हा वजनाने पुरुषांच्या क्रिकेट सामन्यातील बॉलपेक्षा हलका असतो. यामागे शारीरिक शक्ती संबंधित कारणे आहेत.


महिला क्रिकेट निवड समिती ही तीन सदस्यीय आहे. माजी क्रिकेटर हेमलता काला या अध्यक्ष असून लोपामुद्रा बॅनर्जी आणि शशी गुप्ता हे इतर दोन सदस्य आहेत.

सध्या भारतीय महिला संघाची स्टार खेळाडू आहे ती सांगलीची स्म्रिती मंधाना. ही डावखोरी सलामीवीर आहे. ‘नजाकत’ असलेले क्रिकेटमधील सर्व शॉट्स खेळते. ऑन साईड, ऑफ साईड दोन्हीबाजू तिचे बलस्थाने आहेत. हूक पूल , ड्राइव्ज सर्व शॉट्स तिच्याकडे आहेत. शिवाय ती आक्रमक फलंदाजी करते. एक अत्यन्त नम्र, हसमुख , जमिनीवर पाय असलेली ती फलंदाज ती आहे. तिच्या मुलाखती दरम्यानही तिची देहबोली अगदी नम्र , आणि क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटणारी खेळाडू प्रमाणे असते.
नुकताच तिने ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक करण्याचा मान मिळवला आहे. ती एक चांगली क्षेत्ररक्षकसुद्धा आहे.
शारीरिक उंची लाभल्यामुळे ती सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करते. नुकताच आटोपलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात सीमारेषेवर स्म्रिती मंधानाने अप्रतिम झेल पकडलेत आणि सुरेख क्षेत्ररक्षण केले होते.
भारतीय महिला संघाची स्म्रिती मंधाना ही भविष्य आहे. पुढील कर्णधार तीच असणार आहे.

जेनिमा रॉड्रिक्स ही एक अत्यंत गुणवान सतरा वर्षाची अस्सल मुंबैया खेळाडू. घरघुती सामन्यात द्विशतक केल्याने ती चर्चेत आली . आणि भारतीय संघात तिला स्थान मिळाले. क्षेत्ररक्षक म्हणूनही ती फार चपळ आहे.

शिखा पांडे ही भारतीय वायुसेनेत काम करते. ती वेगवान गोलंदाज आहे. इंग्लंडमध्ये  वर्ल्डकपमध्ये तिने चांगली कामगिरी केली होती.

पूनम यादव ही भारतीय संघातील लेग स्पिनर आहे. लेग स्पिन हे क्रिकेटमधील विशेष कौशल्य असते. जे जास्त वेळ दुर्लक्षिल्या जाऊ शकत नाही. पण लेग स्पिनरकडे एक महत्त्वाची गोष्ट असावी लागते ती म्हणजे हिंमत.. धैर्य. लेग स्पिनर खेळाडू नेहमी प्रतिस्पर्धी संघाची विकेट मिळवून देणारा आक्रमक गोलंदाज असतो. तिथे घाबरून जाऊन ‘सुरक्षित’ गोलंदाजी करणे हा ऑफ स्पिनरकडे असलेला पर्यायच उपलब्ध नसतो. “आर या पार” हेच नेहमी लेग स्पिनर करत असतो. कारण बरेचदा लेग स्पिनरला प्रतिस्पर्धी फलंदाज आपलं लक्ष करतो. लेग स्पिनरची खरी शक्ती असते ती बॉल देण्यात येणाऱ्या ‘फ्लाईट’ मध्ये. फ्लाईट..उंची शिवाय लेगस्पिनर म्हणजे दात, नखे नसलेला वाघ होतो. भारताची पूनम यादव ही सर्वगुणसंपन्न अशी लेग स्पिनर आहे. तिच्यात प्रचंड हिंमत , धैर्य आहे. अगदी शेवटच्या हाणामारीच्या षटकांतसुद्धा ती बॉलला उंची देते.
अनुजा पाटील ही आणखी एक मराठी खेळाडू भारतीय संघात आहे. ती अष्टपैलू खेळाडू आहे. फलंदाज आणि ऑफ स्पिन गोलंदाजी ती करते.
पूजा वस्त्रकार या मराठी खेळाडू सोबत तिचा मराठीतील बोलणं स्टंपमाईकमधून ऐकू येत राहतं.

वेदा कृष्णमूर्ती ही आघाडीची फलंदाज आहे. तिचाही खेळ वर्ल्डकप आणि नुकत्याच आटोपलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात बहरला होता.
हरमनप्रीत कौर! ही पंजाबी कुडी टीममधील अँग्री यंग वुमन आहे. ती अत्यंत आक्रमक फलंदाज आहे. वर्ल्डकपमधील तिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमिफायनलमध्ये काढलेले शतक प्रसिध्द आहे.  हरमनप्रीत कौर ही ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटमध्ये भारतीय संघाची कर्णधार आहे.

भारतीय महिला संघाची घोडदौड वेगाने सुरू आहे.
स्म्रिती मंधाना आता जाहीरातीमध्येही  दिसायला लागली आहे. प्रेक्षक आणि टीव्ही ब्रॉडकास्टर्स आता महिला क्रिकेटला गांभीर्याने घेताहेत. ऑगस्टमध्ये भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट संघाचा खडतर असा इंग्लंड आणि डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौरा आहे. महिला आणि पुरुष क्रिकेट संघ आता बरोबरीने क्रिकेट खेळायला लागले आहेत. ज्या प्रकारे भारतीय महिला संघ कामगिरी करतो आहे त्यावरून भारतीय महिला क्रिकेटचे अच्छे दिन आता सुरू झाले आहे असे म्हणायला हरकत नाही.

Saturday 28 July 2018

या अली या अली मेरा नाम मोईन अली

“या अली या अली मेरा नाम मोईन अली”

भारतीय क्रिकेट टीम बद्दल म्हटलं जातं की ते फॉर्ममध्ये नसलेल्या बॅट्समनना फॉर्ममध्ये आणून देतात. पण याहून एक महान काम भारतीय क्रिकेट संघ करत आले आहेत, ते म्हणजे विरुद्ध संघातील पार्ट टाइम बॉलिंगचा जॉब करणाऱ्या बॅट्समन्सला मोठा बॉलर बनवणे. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असलेल्या बॉलर एम्प्लॉयीला पर्मनंट बॉलर बनवणे.
कामचलाऊ बॉलर्सला  नियमित बॉलर बनवण्यात भारतीय टीमची हातोटी असते.

नियमितपणे भारतीय टीमने क्रिकेट जगताला असे बॉलर्स मिळवून दिले आहेत.
त्यातील एक सगळ्यात मोठं नाव , “#मोईनअली”.

2014 च्या जुलैपर्यंत ज्याचं कुठेही बॉलर म्हणून नाव नव्हतं, पण भारतीय क्रिकेट संघाने ‘सुपारी’ उचलली मोईन अलीला मोठा स्पिनर बनवण्याची. सगळे कामाला लागलेत. त्यामुळे जिथे अँडरसन - ब्रॉड हे काळ ठरतील वाटत होतं तिथे भारतीय टीमने ब्रॉड माईंडेड होऊन मोईन अलीला सिरीजमध्ये 20 विकेटस भेट दिल्यात. ते ही इंग्लंडमध्ये.
जिथे स्विंग आणि सिम होणंच बॉलच्या अंगवळणी पडलं असतं. ‘स्पिन’ होऊन ‘वळण्यास’ तो आळशीपणा करतो.

पण मोईन खानने त्या भारतीय क्रिकेटटीम विरुद्ध 20 विकेटस काढल्यात , ज्या देशाच्या टीमबद्दल बोललं जातं की झोपेत जरी अकराव्या नंबरवर खेळणाऱ्या भारतीय बॅट्समनच्या 'पायावर' बॉल टाकला तरीही ते सहज डीप मिडऑनला खेळतील आणि स्पिनर्स ला खेळूनच भारतीय बॅट्समन मोठे होतात, भारतीय खेळाडू स्पिनर्स खेळण्यात सर्वोत्तम असतात.

पण याच स्पिनर्सला सहज खेळू शकण्याची ख्याती असलेल्या टीमविरुद्ध , मोईन अलीने त्याच्या स्पिन #ग्रेनेडची पिन काढून तो भारतीय टीमविरुद्ध डागला. अँड ही रिअली हॅड पन.. फन.

अलिस्टर कूकने अँडरसन आणि ब्रॉडला विश्रांती द्यायला  014 च्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये मोईन अली या बॅट्समनला बॉलिंग दिली. आणि पूढे इतिहास घडला. दिलदार भारतीय टीमने ने विकेटस लुटवल्यात आणि यजमान इंग्लंड संघाला मोईन खान नावाचा ‘प्रमुख’ नियमित गोलंदाज ‘गिफ्ट’ केला.

भारतीय टीमने यापूर्वी मायकल क्लार्कला मोठा बॉलर बनवला. 2008च्या सोपी सिडनी टेस्टमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये #बकवासनर बकनरला आणि बेंसनला  सतत तर्जनी वर करायला लावली होती.
कधी अँड्र्यू सायमन्ड्सला मोठा बॉलर बनवलं.

2000च्या काळात झिम्बाब्वेचा एक “ रे प्राईस” नावाचा नियमित पण सामान्य बॉलर होता. झिम्बाब्वे टीम भारतात आली आणि भारतीय संघाने रे प्राईसची ‘प्राईस’ मोठी वाढवून दिली.

इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत ‘मोईन अली’ पुन्हा महत्वाचा घटक ठरण्याची शक्यता आहे. ते त्याने वनडे सिरीजमध्येही दाखवून दिलं. चार वर्षात मोईन अली आता परिपक्व आणि आणि नियमित प्रमुख बॉलर झाला आहे.

मोईन अलीविरुद्ध भारतीय टीम यावेळी रन्सचे मौन व्रत तोडणार ही अपेक्षा आहे आणि मोईन अलीला विकेट्सच्या बाबतीत मौन बाळगायला लावावे ही अपेक्षा आहे.

एकंदर हा “#इंग्लिशसमर” मोईन अली ,रशीद अली साठी आणि रवी अश्विन , कुलदीप , जडेजासाठी चांगला जाण्याची शक्यता आहे.

#ILoveWhiteClothesCricket
#RedcherryCricket

- Abhijeet Panse

Friday 27 July 2018

कर माझे जुळती

चार एक वर्षांपूर्वी मी आणि एक मित्र पहिल्यांदाच जम्मूला फिरायला गेलो होतो. तावी नदीच्या पलीकडे अखनूर किल्ला, अमर महल बघायला जात असताना एका चौकात एक सैनिक वेशातील पुतळा दिसला. खाली नाव बघितलं “कॅप्टन विक्रम बत्रा” लिहिलं होतं. चौकाचं नाव होतं कॅप्टन विक्रम बात्रा चौक. तेव्हा मित्रानेच सांगितलं की हे कारगिल युद्धात शहीद झाले होते. कारगिल युद्ध आणि त्यातील एकेक गोष्टी सांगितल्या. आणि विक्रम बत्रा यांनी म्हटलेलं वाक्य “ये दिल मांगे मोर” हे तेव्हा कळलं.

1999च्या उन्हाळ्याच्या शेवटी एकीकडे वर्ल्डकप सुरू असताना देशभरात वर्ल्डकप, क्रिकेटचा ‘माहोल’ होता. दुसरीकडे कारगिल घुसखोरीच्या बातम्या येत होत्या. पण कोणाला सुरुवातीला देणंघेणं नव्हतं.
जो तो फक्त वर्ल्डकपमध्ये बुडाला होता. पाकिस्तानविरुद्धच्या युद्धापेक्षा भारताने पाकिस्तानला क्रिकेट मॅच मध्ये कसं हरवलं यातच मग्न होते.

जूनच्या शेवटी वर्ल्डकप संपला तेव्हा लोकांनी कारगिल युद्ध, पाकिस्तान या गोष्टींना गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली.
तोवर “कारगिल घुसखोरी” पासून  “कारगिल युद्ध” असा बातम्यांतही बदल झालेला होता. मग सगळ्यांना त्यातील गांभीर्य कळले.

शाळेत असताना तेव्हा काहीही संबंधही नव्हता या गोष्टींशी, यातील गांभीर्य कळलं नव्हतं. कसलं कारगिल, कुठे आहे ते नक्की. मुळात ‘घुसखोरी’ म्हणजे काय नक्की, हेच मला कळत नव्हतं, हे आठवतं.

नंतर देशभरात आवाहन सुरू झाले सैनिकांना मदतीसाठी आर्थिक  मदत करण्यासाठी.

जुलैमध्ये शाळा सुरू झाल्यावर  मित्र सुट्टी संपल्यावर परत शाळेत भेटल्यावर काही दिवसांपूर्वी भारत कोणाच्या चुकीने झिम्बाब्वेविरुद्ध हरला, वर्ल्डकपमधून बाहेर कसा गेला,  पाकिस्तानला काय हरवलं याच गप्पा होत होत्या.

शाळाशाळांमधून सैनिक मदतीसाठी मुलांना पाच रुपये, दहा रुपये ओळखीच्या लोकांकडून जमवायला सांगितलं होतं. आम्हीही मित्र हातात कागद पेन आणि  डबा घेऊन फिरलो होतो. आवडीने नाही तर शिक्षकांनी सांगितल्यामुळे. कोणी एक रुपया, दोन रूपये. पाच रूपये कोणी दिलेत तर फार आनंद व्हायचा. आम्हाला तेव्हा इतकंच कळत होतं की पाकिस्तानसोबत कारगिलला युद्ध, जे दूर कुठेतरी हिमालयात सुरू आहे, त्यासाठी सैनिकांना मदत म्हणून पैसे जमवायला सांगितले आहे.

कित्येक वर्षांनी जेव्हा कारगील युद्ध म्हणजे नक्की काय..कळलं तेव्हा त्यातील भयाण गांभीर्य आणि भारतीय सैनिकांनी केलेला प्राणत्याग आणि गाजवलेला पराक्रम याची जाणीव झाली. देशाला जोडणारा एकमेव राष्ट्रीय हायवेवर नियंत्रण राहिलं. पुन्हा काश्मीरचा काही भाग 1947 प्रमाणे पाकिस्तानकडे गेला नाही. देश अबाधित राहिला.
आज लेह लडाखला काश्मीरमधून जाता येतंय.
#पेंगॉंग लेकजवळ फोटो काढता येतंय. थ्री एडियट्सचा क्लायमॅक्स शूट करता येतोय.

तेव्हा मित्रासोबत कॅप्टन विक्रम बत्रा यांचा पुतळा, त्यांच्या नावाचा चौक, जम्मू शहरात त्यांच्या नावाने हॉस्पिटल बघून फार आनंद झाला.
तेव्हाही म्हटलं होतं की देशभरात त्याच त्या ठराविक नावांचे रोड, चौक नकोत. कारगिल युद्धात शहीद झालेल्या सैनिकांचेही नाव सार्वजनिक स्थळांना, रस्त्यांना द्यायला हवेत.

पुण्यात #मेजरताथवडे उद्यान आहे. मला या उद्यानाचं नाव विशेष आवडतं. कारण त्याला शहीद सैनिकांचं नाव दिलेलं आहे.
मेजर प्रदीप ताथवडे हे 2000 मध्येआतंकवादयांविरुद्ध चकमकीत शहीद झाले होते.

बहुतेकवेळी राजकारण्यांचेच नाव देण्याऐवजी जास्तीत जास्त शहिद सैनिकांचे वा युद्धात पराक्रम गाजवलेल्या भारतीय योद्ध्यांचेही नावं द्यायला हवीत. असं वाटतं. कॅप्टन विक्रम बत्रांच्याच शब्दांत सांगायचे तर “ये दिल मांगे मोर!"

#कारगिलविजयदिवस

- Abhijeet Panse

Tuesday 24 July 2018

लंबू शर्मा

"इशांत शर्मा" नावाचं वेगळंच रसायन ,  नमुना भारतीय संघात दिसत राहिलाय. कॅप्टन महेंद्रसिंग धोनीची मर्जी नसलेल्या काही खेळाडूंचं करिअर एकतर संपलं तर काहींचं बहरलंच नाही. इशांत शर्मा हे अगदी विरुद्ध खास उदाहरण आहे. धोनीच्या अतीलाडामुळे ज्याचं करीअर संपण्याच्या मार्गावर आलं असा हा दिल्लीकर इशांत शर्मा.

2009 , 10 च्या काळात अनेक क्रिकेट पंडित;  इशांत शर्माचं करिअर संपवूनच धोनी थांबेल का , इशांत शर्माला जरा त्याने ब्रेक द्यावा नाहीतर तो कायमसाठी वनडे क्रिकेटमधून बाहेर जाईल म्हणत होते. शेवटी तेच झालं.  09, 010च्या काळात संगकारा, दिलशान ने इशांत शर्माचे लख्तरं सीमारेशषेवर टांगले होते. पण तरीही धोनी त्याला सतत खेळवत राहिला.

जबरदस्त उंची, शिडशिडीत देहयष्टी यामुळे तो , प्रभावी वेगवान बॉलर होईल असं सारे 2006च्या काळात वर्तवत होते. 07च्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर निवड झाल्यावर , निघण्याची तयारी झाल्यावर ऐनवेळी त्याला न पाठवण्याचा निर्णय घेतला गेला. अश्या वागणुकीमुळे एका अठरा वर्षाच्या नवोदित बॉलरच्या मनावर, करिअरवर परिणाम होऊ शकतो यावरून निवड समिती आणि कॅप्टन राहुल द्रविडवरही टीका झाली होती.

पुढे राहुल द्रविड , अनिल कुंबळेच्या नेतृत्वात खेळून त्याला त्याचा गॉडफादर मिळाला, महेंद्रसिंग धोनी.
तिथून तो काही वर्षे कायम संघात राहिला. पण वाईट मार खात राहिला.

ताडमाड उंची , चांगला वेग, किचकट बॉलिंग ऍक्शन नसल्याने तो भारदार, धारदार बॉलर होईल वाटले होते. पण गेल्या दशकापासून भारतीय वेगवान बॉलर्सचा एक मानसिक प्रॉब्लेम झालाय. लहानपणी ज्या गोष्टीबद्दल फार कौतुक बघितलं असेल, धमाकेदार काही बघितलं असेल तर पुढे ती गोष्ट करण्याची इच्छा होते.
 कदाचित #वेस्टइंडिजची बघितलेली, ऐकलेली “शॉर्ट बॉलिंग” , बाऊन्सर्सचा अतीच परिणाम भारतीय बॉलर्सवर झालाय. हार्दिक पांड्या हे याचं सर्वोत्तम उदाहरण.

अंथरून पाहून पाय पसरावे आणि आपला वेग बघून बाऊन्सर टाकावे हे सध्या भारतीय बॉलर्सना कळत नाही. त्यामुळे इशांत शर्मा कायम आखूड टप्प्याची बॉलिंग करतो. आणि यामुळेच तो संपत गेला.

 करिअरच्या सुरवातीला नेहमी “गुड लेंग्थ” , “बॅक ऑफ द गुड लेंग्थ” बॉलिंग करणारा लंबू शर्मा, धोनीने कॅप्टन म्हणून जम , (कंट्रोल) मिळवल्यावर त्याला जास्तीत जास्त शॉर्ट बॉलिंग करायला सांगितले. तेव्हापासून तो शॉर्ट बॉलिंगच्या चक्रात अडकला तो आजवर. पण आता इंग्लंड दौऱ्यावर मात्र तो ‘पुढे’ “आगे बॉल डालने की” शक्यता आहे. त्यामागे विशेष कारण तसंच आहे.

पण याच शॉर्ट बॉलिंगने इशांत शर्माला काही प्रसिद्ध मॅचेसमध्ये स्टार बनवले, हरलेल्या मॅचेस जिंकून दिल्यात. 013 ची इंग्लंडमध्ये  इंग्लंडविरुद्ध मिनीवर्ल्डकप- चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल, अशक्यप्राय विजय शेवटच्या क्षणाला खेचला होता. “शॉर्ट बॉलिंग’” वर इंग्लंडने विकेटस फेकल्या. पुढील काम स्पिनर्सने केले होते.

2014च्या प्रसिद्ध लॉर्ड्स टेस्टमध्ये हिरव्या कुरणावर अजिंक्य राहाणेने शतक ठोकल्यावर शेवटच्या इनिंगमध्ये शॉर्ट बॉलिंगवरच इशांत शर्माने सात विकेटस घेतल्या भारताला टेस्ट मॅच जिंकून दिली आणि लॉर्ड्स गॅलरीत आपले नाव कायमसाठी नोंदवले. लॉर्ड्सवर शतक किंवा बॉलरने पाचपेक्षा जास्त विकेटस घेतल्या तर त्याचं लॉर्ड्स गॅलमध्ये नाव लिहिण्याचा मान मिळतो.

#इशांतशर्माचा_एक_खास_प्रसंग

#ऑर_एक_ओव्हर_करेगा_क्या

इशांत शर्माची सगळ्यात मोठी आणि टेस्ट्स मध्ये अतिमहत्वाची  खासियत आहे ती त्याची लांब स्पेल टाकण्याची क्षमता.

टेस्ट्समध्ये स्पिनर्सचं एक काम असतं की एका एन्डने सलग सकाळपासून संध्याकाळपर्यंत बॉलिंग करत राहणे. फास्ट बॉलर्स असे करू शकत नाही. कोणताही फास्ट बॉलर पहिला स्पेल टाकून झाल्यावर नंतर पाच ओवर्सहुन जास्त ओव्हर्सचा स्पेल करत नाही.

शर्माजी इथे #श्रमजीवी ठरतात. तो सहा ते सात कधी सलग आठ ते नऊ ओव्हर्सही त्याने केले आहेत. आणि तेही जास्त रन्स न देता. म्हणून तो टेस्ट टीममध्ये असायला हवा वाटतो.

त्याच्या याच श्रमजीवी क्षमतेमुळे 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक खास प्रसंग घडला होता.

ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलिया विरुद्ध इशांत शर्मा डोळ्यांचे पारणे फिटवणारी बॉलिंग करत होता. त्याच्या बॉलिंगवर रिकी पॉंटिंगला दिवसा तारे दिसत होते. पण सलग सहा सात जबरे ओव्हर्स टाकल्यामुळे #कॅप्टनअनिलकुंबळे  इशांत शर्माला विश्रांती देणार होता. तेव्हा वीरेंद्र सेहवाग अनिल कुंबळेजवळ गेला आणि म्हणाला की दिल्ली टीममध्ये माझ्या कॅप्टन्सीमध्ये इशांत शर्मा खेळतो . त्यामुळे मला माहितीय की हा मोठे स्पेल टाकू शकतो. पॉंटिंग स्ट्राईक पे हैं! उसको और एक ओव्हर दो!

अनिल कुंबळेने इशांत शर्माला विचारलं “और एक ओव्हर करेगा?”

आधीच सेहवागने  कौतुक केल्याने उत्साह आल्याने लंबूने म्हटलं “ हा करुंगा!”

 ओव्हरच्या पहिल्या की दुसऱ्या बॉलवरच , “बॅक ऑफ द गुड लेंग्थ” बॉलवर पॉंटिंगच्या बॅटची कड घेऊन कॅच पहिल्या स्लिपमधील राहुल द्रविडच्या सुरक्षित हातांमध्ये विसावला. इशांत शर्मा जल्लोषात सेहवागकडे धावत गेला आणि त्याला मिठी मारली.

08 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इतर टीमचे दात घश्यात घालणारा लंबू शर्मा  त्यानंतर अनेक वर्षे लांब टप्प्याची बॉलिंग न करता आखूड टप्प्याची ,शॉर्ट बॉलिंग करून त्याने स्वतःची “विकेट टेकिंग अॅबिलिटी” पूर्णपणे कमी केली. बॉलिंगमधील स्विंग गेला. त्याचा बॉल सीम कधी व्हायचा तसाही नाहीच.
 त्याच्या मागून येऊन भुवनेश्वर कुमारने बॉलिंगमध्ये स्वतःबद्दल विश्वास दिला. बुमराहलातर त्याच्या आधी टेस्टमध्ये पसंती मिळू लागली आहे. पण कॅप्टन धोनीमुळे त्याचा #इरफानपठाण झाला नाही. इरफान पठणचा स्विंग आणि सीम संपल्यावर आणि विशेषतः #ग्रेगचॅपल ची गच्छंती झाल्यावर इरफान पठाणचा कोणी वाली राहिला नव्हता. तो कायमस्वरूपी बाहेर गेला.
इशांत शर्मावर मात्र धोनीवरदहस्त होता.

पण यावर्षी एक महत्वाची गोष्ट घडली. इंग्लंड दौर्यापूर्वी इशांत शर्मा इंग्लंडमध्ये पहिल्यांदा #काऊंटीक्रिकेट खेळला. काउन्टी क्रिकेटचं महत्व काय असतं हा एक स्वतंत्र विषय आहे. आयपीएलचा बाजार सुरू होण्याआधी भारतीय क्रिकेटपटू दरवेळी उन्हाळ्यात ते जून पर्यंत इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळत.

या काऊंटी क्रिकेटमध्ये ससेक्सकडून खेळताना त्याने शॉर्ट बॉलिंग न करता ‘पुढे’ बॉलिंग केली. “आगे बॉल डाला”. जे तो करीअरच्या अगदी सुरवातीला करायचा. आणि प्रभावी वाटायचा.

त्यामुळे या इंग्लंड दौऱ्यात भुवनेश्वर कुमार नसताना, जी एक फार वाईट गोष्ट झालेली आहे,  बूमराह नसताना सगळ्यात जास्त अनुभवी बॉलर पण कधीही प्रभावी नेतृत्व न करु शकलेला इशांत शर्मा याने कायम गुड लेंग्थ आसपास बॉलिंगकरून इंग्लंडमध्ये भारताच्या बॉलिंगची बाजू सांभाळावी. अशी अपेक्षा आहे.

इशांत शर्माच्या बॉलिंगमधून ‘स्विंग’ हरवलाय. भेदकता फार कमी झालीये. पण तरीही टेस्ट टीममध्ये एक एन्ड सांभाळत बॉलिंग करत बघताना  तो डोळयांना छान वाटतो.

विराट कोहली कॅप्टन झाल्यापासून सर्वच खेळाडू ‘स्लेजिंग’ करत आक्रमक झालेले आहेत. जी चांगली गोष्ट आहे. अगदी गरीब गाय चेतेश्वर पूजाराही बडबडायला लागलाय. त्यामुळे कायम शांत, आणि हसमुख असलेला इशांत शर्माही आता ‘एक्सप्रेसिव्ह’ झालाय. बॉल आणि शब्दांनीच नाही तर ‘चेहऱ्याने’ सुद्धा.
त्याचा  ‘ओव्हरएक्सप्रेसिव्हनेस’ मागच्या वर्षी  #स्टीव्हस्मिथने बघितला आहे.

इशांत शर्माची बॅटिंग हा एक स्वतंत्र विषय आहे. यावर एकदा लिहिलं होतं.

एक ऑगस्टपासून अनुभवी , श्रमजीवी लंबू #रणवीरसिंग लुक अलाईक इशांत शर्मा बॉलिंगमध्ये नेतृत्व करून , जुनं शॉर्ट बॉलिंगचं मेंटल प्रोग्रॅमिंग बदलून ‘पुढे’ बॉलिंग करणार अशी अपेक्षा आहे. काऊंटी क्रिकेट खेळल्याचा फायदा त्याने दर्शवायला हवा.

#WhiteClothesCricketLover

#RedcherryCricket

- Abhijeet Panse

Sunday 22 July 2018

दिवे घाट आणि तो

* दिवेघाटातील सगळ्यात कठीण दिवस , नैसर्गिकरित्या तयार झालेली #चंद्रकोर आणि #रमजानमहिना! *

वारीचा आजचा तिसरा दिवस, संपूर्ण प्रवासातील सगळयात कठीण दिवस..मोठे अंतर.. घाटाचा प्रवास..एकादशीचा उपास..
पुण्याहून निघालेली माऊलींची पालखी दुसऱ्या दिवशी सासवडला बंधूंचे दर्शन घेणार असते.

पण उपाशी पोटी घाटाची चढण कसोटी बघणारी असते..
नवखा तरुण वारकरी ताणात असतो..
शरीरानेच वृद्ध अनुभवी वारकरी नवख्या तरुणाला #माऊलींवर विश्वास टाक म्हणतो, म्हातारा लहान नातीला खांद्यावर बसवून चालू लागतो, म्हाताऱ्या डोक्यावर तुळसी वृंदावन डोक्यावर घेऊन सगळ्यात समोर गेलेल्याही असतात..

तरुण नवखा वारकरी हे बघून ओशाळतो..फक्त #स्पिरिचुअलट्रेकिंग म्हणूनच आणि सोशल मीडियावर सतत चेक इन करणारा तो फोटोज टाकण्यासाठीच आलेला असतो..भक्ती वगैरे काही नसते..

लूक योग्य साजेसा यावा मिळावा म्हणून कपाळावर उभं गंध लावतो, कानात इअरफोन्स घालून मोठया आवाज वाढवून गाणे ऐकत अधून मधून मोबाईलने फोटो काढत, शूट करत चालू  लागतो..
स्वतःचं आधुनिकत्व दाखवत , इतर वारकर्यांनमध्ये मनाने  मिसळत नाही..तोंडाने माऊलीचं नाव घ्यायला लाज वाटत असते.

सूर्य ढगात लपंडाव करत असतो..घामाच्या धारा लागलेल्या असताना अचानक आभाळातून पर्जन्य धारा बरसू लागतात..

दिवेघाटात पालखी येते..शिस्तीने रस्त्याच्या एका बाजूने वारी जाऊ लागते..रस्त्यावरची पुण्याहून निघालेली, पुण्याकडे जाणारी वाहनातील लोकही कौतुकाने भक्तीने नमस्कार करतात..

घराच्या मागील गल्लीत जाण्यासाठीही गाडी काढणाऱ्या तरुणाची घाटात छाती फुलू लागते..
म्हातारे म्हातारी नाम घोषात, आजूबाजूची सृष्टी ..वारकरी नामघोषात मग्न असतात..

तरुण वारकऱ्याच्या तोंडीही नकळत नाम येऊ लागतं.
कानातील एअर प्लग्स काढून ठेवतो..
आजूबाजुला सृष्टी हिरवीगार झालेली असते..मोबाईलने अधून मधून वारीचेफोटो काढत , सुरकुत्यांचं जाळं पसरलेल्या एखादया जख्ख म्हाताऱ्या वारकऱ्या सोबत   सेल्फी काढत सोशल मीडियावर टाकत राहतो..
घाटात एकाठिकाणी सहज वरती जाऊन अंमळ  विश्रांती घ्यायला आणि "बेटर व्यू" साठी नुकत्याच घेतलेल्या डीएसएलआर ने फोटो काढायला जातो..

वरून जे दृश्य दिसतं त्यामुळे त्याच्या अंगावर शहारे येतात..वरून अंतरावरून बघतांना मानवी चंद्रकोर झालेली असते..वर #ताऱ्याप्रमाणे तळ्याचं टिम्ब ही दिसतं..मुलगा निसर्गाच्या, निर्गुण निराकार ईश्वराच्या दर्शनामुळे चाट पडतो..अष्टसात्विक भाव उचंबळून येतात..

सेल खिश्यात टाकतो आणि नाम गजरात स्वतःला हरवू  लागतो..
पांडुरंग..पांडुरंग..विठ्ठल विठ्ठल...

पालखी सासवडला पोहचते..तोवर तो वेगळा न राहता मनाने सर्व वरकाऱ्यांपैकी एक झालेला असतो.

-Abhijeet Panse

Tuesday 17 July 2018

इमोजी मुद्रा दिन

मला वाटतं इमोटीकॉन्समध्येही स्त्रियांचा राखीव कोटा आहे.

यातील खास दोन इमोटीकॉन्स हे स्त्रियांकडुनच जास्त वापरले जातात.

एक दात विचकणारी मुद्रा.  गेले  दोन वर्षे तिचं फार मार्केट होतं. मला कधी कळलं नाही, अजूनही कळत नाही,  प्रत्येक वाक्यानंतर मुली त्या दात विचकणाऱ्या चेहऱ्याच्या इमोटीचं ‘संपूट’ का लावतात!

मला पूर्वी वाटायचं फक्त भारतीय मुलीनाच ही भीतीदायक दात विचकणाऱ्या स्मायलीची (?) बाधा झालीये का!

पण नाही तसे.

एक आयर्लंडची जुनी मैत्रीण, तिने दोन वर्षांपूर्वी फक्त माझ्या सांगण्यावरून तात्पुरतं वॉट्स अॅप डाउनलोड केलं होतं. आणि ही दात विचकणारी विकट हास्यमुद्रा मार्केटमध्ये तेव्हा आली . तेव्हा तीसुद्धा प्रत्येक वाक्यानंतर ती दातांवर दात ठेवलेली स्मायली पाठवू लागली. तेव्हा मी आश्चर्यचकित झालो. कानामागून आली आणि दात विचकट तिखट झाली.

आता मात्र कोणी मला ते दात दाखवणारी मुद्रा पाठवली की म्हणतो , “गूड असेच दात रोज घासत जा!

लहान मुले ‘ई’ केल्यावर तसे दात दाखवतात बा!

पण दीड दोन वर्षे तिचं मार्केट चाललं पण त्यानंतर ‘ती’ आली तिने डोळे ‘वर’ करून बघितलं आणि ती जिंकली.

स्त्री वर्गात सगळ्यात तुफान चालणारी मुद्रा, इमोटीकॉन वर डोळे करणारी ‘#चेटकीण’ स्मायली. दिवस रात्रीस खेळ चाले हिचा.

दररोज ठराविक संख्येत डोळे वर केलेली ती चेटकीण स्मायली पाठवण्याचं काही मुलींचं व्रतच असतं बहुतेक. बुबुळे वर केलेली ती भयप्रद स्मायली वापरताना काय आनंद मिळतो कोण जाणे.

स्मायलींच्या दुकानात आता शेकडो भावमुद्रा आल्यात. मी मात्र सलमान खान , बाबी देवल प्रमाणे फक्त बेसिक दोनच मुद्रा वापरतो. वापरू शकतो. एकतर आनंदी चेहऱ्याचा स्मायली  नाहीतर रक्त-लाल संतापी चेहऱ्याचा #संतापली  .
एकतर उत्तर ध्रुव नाहीतर दक्षिण ध्रुव. बाकी इमोटीकॉन्सचे माईंड गेम्स मजला जमत नाही. इमोतीकॉन्सचे ते गेम्स कॉन्स लोकांनाच  जमतात बरें . ते सेक्रेड ईमोजी गेम्स अस्सल प्लेयर्सनाच जमू शकतात. असो तिकडे सेक्रेड गेम्सची वांधे झाले आहेत. कोर्टाने त्याला नाहीचा इमोजी दाखवलाय.

😒-😏 या दोन इमोटी राण्यांची जोडीची बाय डिफॉल्ट सेटिंग असते कित्येक जणांकडे.

आजकाल सगळयांना मान द्यावा लागतो. कनेक्टिव्हिटीला थ्रीजी, फोरजी , बिस्किटला पार्लेजी. स्पॉट ला जी- स्पॉट,म्हणून इमोटीकॉन्सला ‘#इमोजी’.

पण मला एक कळत नाही;  सर्व मिनरल वॉटर बॉटल्सला बिसलेरी म्हटल्या जातं तसं सर्व इमोटीकॉन्सना ‘स्मायली’ का म्हणतात!

अश्रूपात करणाऱ्या, दुःखी मुद्रा करणाऱ्या इमोजीना ‘#क्रायली’ का म्हणत नाही!!??

#EmoticonsDay

- Abhijeet Panse

Thursday 12 July 2018

Rain iz falling chhamacham

Rain iz falling chha
macham

पावसाळा सुरू झाला आहे तेव्हा आमच्या आजवरच्या पावसाळ्यांच्या स्वानुभवांवरुन खालील विशेष काळजी प्रत्येकाने घ्यावी.

(1) पावसाळ्यात संडास बाथरूमच्या दरवाज्यांना सुज येते..ते फुगल्यामुळे नीट बंद होत नाहीत.तेव्हा आतमध्ये हिशेब चुकता करत बसले असताना जोरात नळ सुरू ठेवणे.नाहीतर फजितीचा बाका प्रसंग 'गुदरू' शकतो.
ही काळजी मुख्यत्वे  होस्टेलाईट्स जीवांसाठी.

(2) GF किंवा BF धारकांनी भर पावसात दुर कुठे एकांतात फिरायला जाणं टाळा.ओलेत्या वातावरणात #पाय_घसरण्याचा' संभव असतो.

 (3) उन्हाळ्यात कितीही पाणी प्यायले तरी काही प्रश्न नसतो पण पावसाळ्यात थोडेही पाणी प्यायल्यास रात्री बेरात्री झोप मोड होउन सतत विसर्जनासाठी जावं लागतं.तेव्हा योग्य प्रमाणात (आणि गरम करून पाणी पिणे.ही एक टिपीकल पावसाळी काळजी असते.)

(4) उन्हाळ्यात देवदर्शनाला वगैरे बाहेर गेले असाल.तिथे तीर्थ प्रसाद हातावर घेतला की पुसला हात डोक्याला!!
ही सवय आता टाळा.पावसाळी कुंद हवेत केस वाळत नाहीत त्यामुळे तुमच्या चिकट केसांना मुंग्या,मुंगळे लागतील.

(5) बालकनी,किचन ते हाॅलपर्यंत कितिही दोऱ्या बांधुन कपड्यांचे तोरणं बांधली तरिही कुंद आर्द हवेत कपडे वाळत नाही.त्यातल्या त्यात सर्वसाधारण वरचे कपडे थोडा भाव खाउन निमुटपणे काही तासाने वाळतात तरी.पण ती शिष्ठ अंतर्वस्त्रे मात्र अशावेळी फार अॅटिट्युड दाखवतात.लवकर वाळत नाही.अशावेळी कोण्या बहाद्दराने तेच ओलसर अंर्तवस्त्र परिधान करून गेल्यास मग मात्र त्याची काही खाज....खैर नाही!!

(6) ''...खेलेंगे प्रेम गेम आॅन द रूफ इन द रेन''ही असली 'मीतगिरी' टिव्हीवरच बरी दिसते तुम्ही असली '#मस्ती' करायला गेलात तर रूफवरुन खाली पडुन तुमचं मणका मोडु शकतं.

(7) (पुन्हा एकदा) GF आणि BF धारकांनी पावसाळ्यात बागेत वा शहराबाहेर कुठे झाडा झुुडपांमागे कुठल्याही प्रकारच्या क्रीडेसाठी जाउ नये.बिळात पाणी गेल्याने साप,इंगळ्या, विंचु बाहेर अालेले असतात.त्यामुळे तुम्ही चंबाचुंबीत मग्न असताना एखादा सरपटणारा वा नांगीधारक जीव तुमच्या पायाचे 'चुंबन' नक्की घेउ शकतो.

(8) हेसुद्धा GF/BF धारकांसाठीच!
पावसाळी कुंद हवेत जिवाणु विषाणुंची संख्या आधीच वाढली असते.त्यामुळ कदाचीत दोघंही सर्दी पडश्याने त्रस्त असु शकाल.तेव्हा प्रणयक्रिडेत दोघांची मुखे एकमेकांजवळ आलेली असतानाच; शत्रुसोबत पण न होवो  असं पण नेमकी त्याक्षणी तिच्या किंवा त्याच्या फुफ्फुसात उदान वायुचा क्षोभ होउन तिला/त्याला जोरदार शिंक आलीच!तेव्हा भरलेल्या नाकातुन वायु त्याचा मार्ग काढणारच!शेवटी वायुच तो !उर्ध्वगत वा 'अधोगत';वायु आपल्या मार्गाने बाहेर पडतोच!
त्यामुळे  येथे उदान वायु जोराने उर्ध्वगत होउन सोबत नाकातील सर्व द्रवमय..सेमीसाॅलीड पदार्थ आपल्यासोबत वाहुन नेणारच! तेव्हा ''अशा चिंब वेळी तुझा हात हाती हवा''!
 म्हणण्याचा ऐवजी ''#अशा_चिंब_वेळी_नाकास_तुझ्या_रूमाल_हवा!!'' म्हणावं लागेल.
त्यामुळे अशी जीवघेणे खजिल करणारे पेचप्रसंग टाळण्यासाठी पावसाळ्यात प्रणय टाळावा.

(9) पावसाळ्यातील अत्यंत मोहक व फसव्या महत्वाच्या गोष्टीची काळजी घेणं म्हणजे ते पावसात #मिर्ची_भजी वा तत्सम बेसनाचे तळलेले पदार्थ फक्त फेसबुकवर फोटो टाकण्या पुरतेच आणि ''हॅपीनेस इज पावसात गरम मिर्ची भजी! वाह!!''
हे असले स्टेटसे फक्त लिहिण्या वाचण्यातच मजा असते.

 प्रत्यक्षात  पावसाळ्यात पचनसंस्था कमकुवत झाली असल्याने '#ढगाळ' वातावरणात मिर्ची भजे वगैरे खाल्ले असता '#ढाळ' लागुन विचारगृहाकडे सतत धाव घ्यावी लागते.आणि मग आत #ढर्रर्रर्रर्र.....#पर्रर्रर्र.......

असो.पावसाळ्यातील काळजी; ही ढगाळ वातावरण.. ढाळ ते..ढर्रर्र..पर्यंत येउन पोहचल्याने आता यावर आणखी काही बोलावं वाटत नाही.

''सो गप्पी मासे पाळा हिवताप टाळा हॅपी पावसाळा!!''

-Abhijeet Panse

Monday 9 July 2018

क्लिवेज

क्लिवेज

स्त्री सौंदर्य हे अनंत काळापासून कवितेत, साहित्यात वर्णिलेलं. ते कलेचं कलाकृतीचं एक प्रमुख माध्यम आणि गंतव्यही.
सौंदर्य हे विचारात असतं. सौंदर्य हे निखळ हास्यातही असतं;  हे सगळं खरं , पण शेवटी शरीर हे व्यक्तीची प्रथम अभिव्यक्ती असते. आजवर वातस्यायनापासून तर सर्व भाषांतील नव्या जुन्या लेखकांनी स्त्री सौंदर्याचे शरीरानुसार वर्णन केलंय.
शरीराचे चढाव उतार, गोलाई, वळणं यावरच त्याचा अथ आणि इति होतो.

ऊन सावलीचा खेळ मजेदार असतो. “दिव्याखाली अंधार “ यातील शब्दशः अर्थ घेतल्यास तो शारीरिक सौंदर्यासाठी पूरक असतो. उंच आणि प्रक्षेपित गोष्टींवर प्रथम प्रकाश पडतो. भौतिक शास्त्राच्या नियमाप्रमाणे साहजिकच उंच भागावर प्रथम प्रकाश पडल्याने अंधार..सावली त्याच्या खाली पडते. हे छायाचित्रणासाठी कार पूरक असतंच. शिवाय प्रत्यक्षात ही सौंदर्य वाढवतं.
“मदन घळ” म्हणूनच आकर्षक वाटते.

लेखक, कवींनी स्त्रीच्या उभारांच्या वर्णनात लेखणी खूप उगाळली. पण दोन उभारांच्या सुरवातीची घळ..मादकता स्त्रीच्या सौंदर्याला वाढवणारी दोन उभारांमधील ती निमुळती वाट ..क्लिवेज सगळ्यात जास्त सौंदर्य वाढवते.

चित्रकारांनी , मूर्तिकारांनी नग्न कलाकृती निर्माण करून वाहवा मिळवली. अनावृत्त देह हा शेवटचा पाडाव असतो. त्याच्या पुढे काही नसतं. ते नैराश्य देऊ शकतं. पण अनावृत्त देहरूपी शेवटच्या ठिकाणी पोहचून पुढे डेड एंडला पोहचण्याऐवजी उभारांमधील मदनघळीचा प्रवास जास्त रंजक..उत्तेजित करणारा ..कल्पना शक्ती वाढवणारा..हृदयगती तेज करणारा हुरहूर वाढवणारा असतो. निमुळत्या  घाटाचा प्रवास असतोच थ्रिल वाढवणारा.. रंजक..

मदन घळ ..क्लिवेजमुळे दिशा मिळते ..भावनांचा कल्लोळ उठतो. तर नग्न कलाकृतीत शेवटी रिक्तता हाती लागते. कारण पुढे काय हीच जाणीव ..भाव मनाला विषणना करतो.
काही मिळण्याचं  सुख, भावना ती हुरहूर प्रत्यक्षात गोष्ट मिळण्यापेक्षा सुख प्रदान करते. कारण त्याला शेवट नसतो. सुखलोलुपता अश्यावेळी प्रत्यक्ष सुखावर विजय मिळवतं.
डेड एन्ड पेक्षा न संपणारा पथ जास्त भुलवतो.

खळी ही चेहऱ्यावरचं सौंदर्य खुलवते. पण खळी हे निसर्गाचे देणं.  नशीबवानालाच प्राप्त होतं. पण मदनघळ ही प्राप्य असते. थोड्याश्या समायोजनाने ती प्राप्य होते.
गालावरची खळी आणि गळ्याखालील मदनघळ दोन्ही सौंदर्यकारक.
गालावरील खळी ही चेहऱ्यावर मोहकता आणते तर मदनघळ सौंदर्यात मादकता भरते.

पण क्लिवेज हे दुहेरी अस्त्र आहे. अस्सल जातीवंत स्त्रीलाच ते योग्य प्रकारे ‘कॅरी’ करता येते. कुठे थांबायचं कुठपर्यंत घळीला जाऊ द्यायचं हे नीट कळलं पाहिजे.
त्यामुळे सेंशु्युअस आणि “वाॅना बी” मधील फरक टिकून राहतो.

पण गोष्टी, फॅशन, वस्त्रे परिधान ही आजूबाजूच्या परिस्थिती , मानसिकता, संस्कृती, याला सापेक्ष असते. त्यामुळे कुठे कधी मदनघळ प्रकट करावी याला सारासार बुद्धी विवेक , कॉमन सेन्सही हवा. नाहीतर इतकं मादक अस्त्र बुमरँगही ठरू शकतं.

निसर्गाने प्रदान केलेलं हे सौंदर्याचं लेणं नीट योग्य वेळी हाताळलं  तर हे कोणत्याही स्त्रीचं सौंदर्य, व्यक्तिमत्त्व अत्यंत सुंदर, आकर्षक बनवू शकतं.
पण अॅज दे से कंडिशन्स आर अपलाईड.

  • Abhijeet panse
*क्लिवेज*

स्त्री सौंदर्य हे अनंत काळापासून कवितेत, साहित्यात वर्णिलेलं. ते कलेचं कलाकृतीचं एक प्रमुख माध्यम आणि गंतव्यही.
सौंदर्य हे विचारात असतं. सौंदर्य हे निखळ हास्यातही असतं;  हे सगळं खरं , पण शेवटी शरीर हे व्यक्तीची प्रथम अभिव्यक्ती असते. आजवर वातस्यायनापासून तर सर्व भाषांतील नव्या जुन्या लेखकांनी स्त्री सौंदर्याचे शरीरानुसार वर्णन केलंय.
शरीराचे चढाव उतार, गोलाई, वळणं यावरच त्याचा अथ आणि इति होतो.

ऊन सावलीचा खेळ मजेदार असतो. “दिव्याखाली अंधार “ यातील शब्दशः अर्थ घेतल्यास तो शारीरिक सौंदर्यासाठी पूरक असतो. उंच आणि प्रक्षेपित गोष्टींवर प्रथम प्रकाश पडतो. भौतिक शास्त्राच्या नियमाप्रमाणे साहजिकच उंच भागावर प्रथम प्रकाश पडल्याने अंधार..सावली त्याच्या खाली पडते. हे छायाचित्रणासाठी कार पूरक असतंच. शिवाय प्रत्यक्षात ही सौंदर्य वाढवतं.
“मदन घळ” म्हणूनच आकर्षक वाटते.

लेखक, कवींनी स्त्रीच्या उभारांच्या वर्णनात लेखणी खूप उगाळली. पण दोन उभारांच्या सुरवातीची घळ..मादकता स्त्रीच्या सौंदर्याला वाढवणारी दोन उभारांमधील ती निमुळती वाट ..क्लिवेज सगळ्यात जास्त सौंदर्य वाढवते.

चित्रकारांनी , मूर्तिकारांनी नग्न कलाकृती निर्माण करून वाहवा मिळवली. अनावृत्त देह हा शेवटचा पाडाव असतो. त्याच्या पुढे काही नसतं. ते नैराश्य देऊ शकतं. पण अनावृत्त देहरूपी शेवटच्या ठिकाणी पोहचून पुढे डेड एंडला पोहचण्याऐवजी उभारांमधील मदनघळीचा प्रवास जास्त रंजक..उत्तेजित करणारा ..कल्पना शक्ती वाढवणारा..हृदयगती तेज करणारा हुरहूर वाढवणारा असतो. निमुळत्या  घाटाचा प्रवास असतोच थ्रिल वाढवणारा.. रंजक..

मदन घळ ..क्लिवेजमुळे दिशा मिळते ..भावनांचा कल्लोळ उठतो. तर नग्न कलाकृतीत शेवटी रिक्तता हाती लागते. कारण पुढे काय हीच जाणीव ..भाव मनाला विषणना करतो.
काही मिळण्याचं  सुख, भावना ती हुरहूर प्रत्यक्षात गोष्ट मिळण्यापेक्षा सुख प्रदान करते. कारण त्याला शेवट नसतो. सुखलोलुपता अश्यावेळी प्रत्यक्ष सुखावर विजय मिळवतं.
डेड एन्ड पेक्षा न संपणारा पथ जास्त भुलवतो.

खळी ही चेहऱ्यावरचं सौंदर्य खुलवते. पण खळी हे निसर्गाचे देणं.  नशीबवानालाच प्राप्त होतं. पण मदनघळ ही प्राप्य असते. थोड्याश्या समायोजनाने ती प्राप्य होते.
गालावरची खळी आणि गळ्याखालील मदनघळ दोन्ही सौंदर्यकारक.
गालावरील खळी ही चेहऱ्यावर मोहकता आणते तर मदनघळ सौंदर्यात मादकता भरते.

पण क्लिवेज हे दुहेरी अस्त्र आहे. अस्सल जातीवंत स्त्रीलाच ते योग्य प्रकारे ‘कॅरी’ करता येते. कुठे थांबायचं कुठपर्यंत घळीला जाऊ द्यायचं हे नीट कळलं पाहिजे.
त्यामुळे सेंशु्युअस आणि “वाॅना बी” मधील फरक टिकून राहतो.

पण गोष्टी, फॅशन, वस्त्रे परिधान ही आजूबाजूच्या परिस्थिती , मानसिकता, संस्कृती, याला सापेक्ष असते. त्यामुळे कुठे कधी मदनघळ प्रकट करावी याला सारासार बुद्धी विवेक , कॉमन सेन्सही हवा. नाहीतर इतकं मादक अस्त्र बुमरँगही ठरू शकतं.

निसर्गाने प्रदान केलेलं हे सौंदर्याचं लेणं नीट योग्य वेळी हाताळलं  तर हे कोणत्याही स्त्रीचं सौंदर्य, व्यक्तिमत्त्व अत्यंत सुंदर, आकर्षक बनवू शकतं.
पण अॅज दे से कंडिशन्स आर अपलाईड.

  • - अभिजीत पानसे