Friday 28 July 2017

एक था काळवीट

काल माझ्या ; जेष्ठ समाजसेवक "बिईंग भलामाणुस" असलेले श्रीयुत सलमान खान यांच्यावरील लेखामुळे अनेक सलमान बांधवांच्या भावना दुखवल्या गेल्याने मी तो लेख बिनशर्त मागे घेत आहे.
सशर्त दिला जातो तो पाठिंबा आणि जामिन!
बिनशर्त मागे घेतला जातो तो लेख आणि मागितली जाते ती माफी.

हे बिनशर्त लेख मागे घेण्याचे कसब आम्ही एक्स्प्रेससत्तेचेे खजिनदार;लॉर्ड ऑफ वेल्थ श्रीमद्कुबेरांकडुन शिकलोय.

आज पहाटे आम्ही खोल ध्यानावस्थेत गेलो असता आम्हास सत्य काय ते उमगले.साक्षात चलचित्रच दिसले.

द्वापार की त्रेता युगात उंच हिमालयातील जंगलात एक गंधर्व आपल्या राण्यांसोबत क्लोरिनेटेड वॉटर तळ्यात जलक्रिडा करण्यात मग्न होता.
जवळुन एक वृद्ध मुनी जात असताना गंधर्वाने आपल्या मस्तीत त्यांच्या अंगावर ते क्लोरिनेटेड पाणी उडवले.

मुनी कर्टसी न दाखवता वरुन अपमान केल्यामुळे त्यांनी चिडुन त्याला शाप दिला.
ज्या मस्तीत तु आमच्यावर पाणी उडवलंस तुला मी शाप देतो की तु पाण्याची कमी असलेल्या मरू भुमीत अनेक युगं एक  काळवीट  होउन राहशील!
चल काळं कर तोंड इथुन!

मुनींच्या शापामुळे भानावर आलेला गंधर्व माफी मागत म्हटला "मुनीवर या शापावर काही उतारा असेल ना!"

मुनीवर  त्याच्याकडे पाहत उच्चारले "प्रथम तर शापावर उतारा नसतो उ:शाप असतो!!"

मग उ:शापावर बरंच बार्गेनिंग झाल्यावर शेवटी शापाची सिविएरिटी कमी करत ते बोलले "ज्या प्रकारे कृष्णाने बैलासुराचा..बगळासुराचा अंत करत त्यांना मुक्ती प्रदान केली.त्याचप्रकारे एक साक्षात #प्रेममुर्ती.. स्त्रीवर्गाला #मदनाचा_पुतळा भासत असलले ..पुरूष वर्गाचे बंधू द्याट इज #भाई ;स्त्रीयांचा अतीव आदर करणारे; ज्यांचे #ब्रम्हचर्य वादातीत आहे अशा प्रेममुर्तीकडुन तुला मुक्ती मिळेल.

अनेक वर्षांनंतर मरू भुमीतील जंगलात एक प्रेममुर्ती आपल्या शिष्या #नीलमणी, महाराष्ट्र देशीची कन्या आणि तत्कालीन #चवळीची_शेंग सोनाली बेंद्रे
;कुठलाही taboo नसलेली तब्बु  सोबत ती प्रेममुर्ती ..भाई सलमाण निसर्गाचा आस्वाद घेत असत ; " यत्र नार्एस्तु पुज्यन्ते तत्र रमन्ते देवत:".."स्त्री शिकली प्रगती झाली..जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जग उद्धारी..असे नवनवीन वाक्प्रचार प्रथमच सांगत ते "स्त्री सशक्तीकरणावर" प्रबोधन करत असतानाच एक खुंखार काळवीट ..चिंकारा त्या बालीकांवर आपले शिंग उगारत धावुन आला!

"#त्राहिमाम्_सलमान.. त्राहिमाम् सलमान.."
म्हणत काळवीटापासुन वाचवण्यासाठी बालीकांनी हंबरडा फोडला.

प्रेममुर्तीने चिंकाऱ्याकडे बघुन स्मित केले..त्यांनी ओळखले होते यांस मुक्ती देणे ही तर श्रींची इच्छा!
तो समय येउन ठेपलाय!

काळवीट आता जवळ आले .संत सलमान यांनी आपले दुनळीचे ऑंग्ल शस्त्र उचलत नेम धरला आणि "#ठो" केले. काळवीट मरून पडले.त्याजागी एक तरूण तेजस्वी पुरूष प्रकटला.आणि मुक्ती दिल्याबद्दल थँक्स म्हणुन परत आपल्या राज्यात परतला.

पण इकडे कलियुगीन मानवी कायद्यानुसार संत सलमान यांस अटक आणि त्यांच्यावर केस झाली.आणि संत सलमान तर बिइंग ग्रेट माणुस होत.त्यांनी सत्य कोणासही प्रकट केले नाही.बदनामी सहन केलीत.

शेवटी १८ वर्षानंतर ते काळवीट स्वत: जजसाहेब आणि वकिल साहेबांच्या स्वप्नात जाउन त्यांस सारी सच्चाई बयाँ की!
न्यायाधीशांना भडभडुन आले आणि त्यांनी तमाम सबुतो और दस्तुरखुद काळवीट के बयानों को मद्दे नजर रखते हुए प्रेममुर्तींना निर्दोष सोडले.

हे सत्य आम्हास उमगल्यामुळे आम्ही संत सलमान यांच्यावरील टिकास्पद लेख..कुबेर काकांप्रमाणे परत घेतो आहे.

आता या माफीनाम्यामुळे कोणाच्या भावना पुन्हा दुखावल्या गेल्यास माफ करावे.आम्ही काही #शाहीदआफ्रिदी नव्हे परत परत निवृत्ती वापस घ्यायला!आता परत परत आम्ही हा लेख परत घेणार नाही.

-Abhijeet panse

माना मानव वा परमेश्वर


माना मानव वा परमेश्वर

कृष्ण म्हटला की फक्त अल्लड,चोऱ्या करणारा,गोपींचे वस्त्र लपवणारा,खोटे बोलणारा किंवा कृष्णाला १६००० बायका असू शकतात तर आम्हाला...अशे अनेक कृष्णासंबंधीत लैंगिकतेवर मूर्खानी  पाचकळ जोक्स करून; इतकच त्याला मर्यादीत ठेवलं आहे.

राम जसा उच्चारायला सोपा तसं चरित्रही समजायला सरळ सोपं पण कृष्ण म्हणायलाही कठीण समजायला तर अथांग  गुंतागुंतीचं..

 सुधीरफडकेंनी कृष्णावर म्हटलेलं माझं एक खुप आवडतं गाणं आहे."माना मानव वा परमेश्वर...
यात सोळा हजार स्त्रीयांबद्दल एक अगदी योग्य ओळ आहे. त्यातील एक शब्द अमला हा आहे.पहिल्यांदा जेव्हा मी हे  गाणं  काही वर्षांपुर्वी ऐकलं तेव्हा तो शब्द "अमला" नसुन अबला असावा असं वाटुन गेलं होतं.पण नंतर "अमला" या शब्दाचा नीट अर्थ एका व्यक्तीने समजावुन सांगितला. आणि "अबला" ऐवजी "अमला" हे किती योग्य आहे हे कळल्यावर आणि त्या गाण्यातील खोली कळत गेल्यावर वाहहह...असं आतुन मनापासुन निघालं.

तरिही वरितो सहस्त्र सोळा कन्या मी अमला पराधीन ना समर्थ घेण्या वार कलंकाचा भोगी म्हणुनी उपहासा मी योगी कर्माचा........

नरकासुराच्या वधानंतर त्याच्या बंदीतील सोळा हजार स्त्रीयांची सुटका केल्यावरही मात्र त्यांना समाज कसा  स्विकारणार म्हणुन कृष्णाने त्यांना आपले नाव दिले!आणि हे करताना त्याने त्या नरकासुराच्या जनानखान्यातुन सुटका केलेल्या स्त्रियांना लाचार "अबला न म्हणता "अमला" म्हटलं आहे.म्हणजे मलिन नसलेल्या..
आणि आपण अजुनही शारिरीक वर्जिनिटी आणि तत्सम उथळ गोष्टीत अडकुन आहोत.
नवरीमुलगी वर्जिन आहे की नाही ह्याची टेस्ट करायला पहिल्या रात्री गादीवर पांढरी चादर टाकली जाते .बाहेर गावातील #पंचायतखोर माणसं आणि तसलेच खोर बढेबूढे टेस्टच्या निकालाची वाट बघत उभे असतात.
आणि चादरीवर रक्ताचे डाग  नसल्यास मुलीचाअपमान करून घटस्फोट दिला जातो.

#वर्जिनिटी ही शारिरीक नसुन मानसिक असते हे अजुनही आपल्याला समजले नाही.

यावरून कृष्ण हा किती समजसुधारक द्रष्टा होता हे दिसतं विधवा पुनर्विवाह याची सुरुवात प्रथम कृष्णाने केली असं म्हणता येईल.

गोप मित्रांसोबत सर्वांचे डबे एकत्र करून गोपालकाला  करताना वर्णभेद जातिभेदाभेद दूर करून सर्वांनी एकत्र एकीने राहावं हे कृतीतून दाखवलं.

इंद्रासारख्या अहंकारी राजाची व्यक्तीपूजा न करता जो #पर्वत जी #जमीन आपल्याला जगवते तिची पूजा करून निसर्गपूजा, निसर्गरक्षण करण्याचा स्पष्ट संदेश दिला.

गोकुळातील बालकांनी दही लोणी आहार घेऊन कुस्ती व्यायाम करावा हे त्याने स्वतः करून दाखवलं. श्रीकृष्ण आणि बलराम दोघेही मल्ल होते!

हाच मूळ हिंदू धर्म ही मूळ संस्कृतीआहे!
वर्णभेद, जातीभेद कुठेही मूळ धर्मात नाही.
स्त्री ला कुठेही अबला लाचार म्हणून वागणूक दिलेली नाही.
हे सगळं तण नंतर चुकीच्या लोकांमुळे निर्माण झालं.

आपल्या संपूर्ण आयुष्यात कृष्णाने मागे वळून पाहिलं नाही.एकदा वृंदावन गोकुळ सोडून मथुरेला आला तेव्हा पुन्हा शेवटपर्यंत कृष्ण कधीच वृंदावनाला गेला नाही.
मथुरा सोडून #द्वारकेला गेला त्यांनतर पुन्हा कधीही मथुरेला परत गेला नाही.

दहि लोणी चोरणारा..गोपींचे वस्त्र लपवणारा रास खेळणारा..अल्लड ,बाळ.. किशोर..कृष्णानेच पुढे कर्मकठोर #गीता सांगितली आणि खलप्रवृत्ती नष्ट करण्यसाठी अर्जुनाला अपल्याच कुटुंबियांवर बाण चालवायला सांगीतले!

सर्व काही अथांग खोल!

श्रीकृष्ण मला नेहमी समुद्रसारखा वाटतो प्रत्येकाला याचं प्रचंड आकर्षण वाटतं!
सागर किनारी बसून प्रत्येकाला काही न काही विचार सुचतात श्रीकृष्णवरही कित्येकाने वेगवेगळ्य पैलूंवर लिहिलंय
प्रत्येकाला तो आपला वाटतो
समुद्रासारखाच श्यामल वर्णीय
सागरासरखच अथांग

समुद्र जसा शेकडो हजारो प्रवाह नद्यानं स्वतःत सामावून घेत त्यांना आपलं नाव देतो ..#गंगेसी_मिळता_लेंड_ओहळ..
कागविष्ठेचे झाले पिंपळ तयासी निंद्य कोण म्हणी...

तसा हा श्यामल सागर प्रत्येकाला स्वतःत सामावून घेतो..

-अभिजीत पानसे