Sunday 25 March 2018

ध्यानी मनी नसताना गोंदवले दर्शन

चार पाच वर्षांपूर्वी एकदा साताऱ्यावरून बीडला एसटीने जात होतो. दुपारी उशिरा सातारावरून निघालो होतो. संध्याकाळी बस एका गावी रोडवर थांबली होती. जवळपासच्या लोकांकडून ‘गोंदवले’ असं ऐकू आलं. खिडकीतून बाहेच्या व्यक्तीला कोणतं गाव आहे विचारल्यावर  “महाराजांचं गोंदवलं” असं म्हणाला.

मला तरीही त्याच्या उत्तरावरून कळत नव्हतं की मी ज्या गोंदवलेबद्दल ऐकलं होतं ते हेच का.

म्हणून मी “गोंदवलेकर महाराजांचे गोंदवले हेच गाव का?” असा प्रश्न केला. पण माझ्या मूर्खपणाच्या विचित्र बोलण्यामुळे मीच ओशाळत हसलो. त्या माणसानेही हो हो तेच हे गोंदवले!” माझ्या बोलण्यावर हसत म्हणाला.

गाडी सुरू व्हायला एक मिनिटांचा अवकाश होता. त्या मिनिटात  मला आजवर ऐकलेलं गोंदवले, के. वि. बेलसरे यांनी लिहिलेलं गोंदवलेकर महारांजांचं चरित्र वाचलेलं आठवलं.

काय करावं काय करावं..बसल्या बसल्या उजवा गुढघा जागच्या जागी भरभर हलू लागला. चार दिवसांची एसटीची पास काढली होती. त्यामुळे तिकीटाचा प्रश्न नव्हता.  ड्रायव्हरने आत येऊन गाडी स्टार्ट केली.

जाऊ दे बघू काय होईल ते..विचार करून जय श्रीराम म्हंटलं आणि मी पटकन दरवाज्याकडे गेलो. कंडक्टर दार लावतच असताना मी त्यांना थांबवून बाहेर पडलो.

संध्याकाळ झाली होती. अंधार बऱ्यापैकी झालेला होता. पावसाळा नुकताच संपलेला.  आकाश स्वच्छ होतं. मी मंदिर विचारत विचारत गेलो.

आवारात खूप गर्दी होती. सगळीकडे लोक होते. मला तेथील काहीही माहिती नव्हतं. राहता येईल की नाही, व्यवस्था नसेल तर परत जायला पुन्हा बस मिळेल का..काहीही कळत नव्हतं.

तिथे एकाने चौकशी केंद्रात चौकशी करायला सांगितलं. राहायला खोली मिळेलही सांगितलं.

चौकशी केंद्रातील एका वृद्ध व्यक्तीने प्रेमाने विचारलं   “ “पोर्णिमेसाठी आलात का?”

मी , नाही सहज आलोय सांगितल्यावर ते म्हणाले , “आज पौर्णिमा आहे! इथे पौर्णिमेचं महत्व आहे. खास पौर्णिमेसाठी लोक दुरून येतात इथे! त्यामुळे आज गर्दी आहे.. म्हणून तुम्हाला खोली मिळणार नाही..पण कॉमन हॉलमध्ये  राहण्याची व्यवस्था होईल. रात्री महाप्रसाद घ्या..”

पावती घेऊन मी विचारत हॉलकडे निघालो. पहिले आकाशाकडे बघितलं , काळ्या आकाशात चंद्र पूर्ण कलांनी मस्तपैकी चमकत होता.

ओह खरंच पौर्णिमा आहे तर!

फार खुश झालो. मूड फ्रेश झाला. सूर्योदयाचं उगवतं केशरी बिंब, पौर्णिमेचा पूर्व क्षितिजावरून हळूहळू आकाशात वरती जाणारा संपूर्ण चंद्र मला  नेहमी खूप आवडतो.

राहण्याची सोयीचही टेन्शन गेलं होतं.

हॉलमध्ये बरेच लोक होते. बिनधास्तपणे सॅक हॉलमध्ये भिंतीला टेकवून बाहेर आलो.

समाधी मंदिरात गेलो.  सभागृह संपूर्ण भरलेलं होतं.  शुभ्र कुर्ता घातलेले बरेच लोक होते. सगळेजण शिस्तबद्ध बसलेले. कुठेही धावपळ , आवाज धक्काबुक्की नाही. मीही शेवटी जाऊन बसलो.

समोर कृष्णाची मूर्ती होती.

त्यांची रात्रीची उपासना सुरू होती.

त्यांनतर रात्रीची आरती झाली. आरतीनंतर खाली आत जाऊन समाधीचं दर्शन झालं.

कपूर, आणि धुपाचा सुगंध आत दरवळत होता. समई तेवत होती. तोवर फक्त फोटोत बघितलेलं मंदिर, काळ्या रंगाचं पादुका असलेलं स्थान,  त्यावरील हार, जवळ माळ, हे प्रत्यक्षात बघत होतो.

संपूर्ण वातावरणात एक स्पष्टपणे जाणवणारी सात्विकता भरली होती.

काही वेळ बाहेर थांबून रात्रीचा महाप्रसाद घ्यायला गेलो.

तिथेही खूप शिस्त दिसली.

शेवयाची खीर, मसाले भात, आमटी , भाजी पोळी असा  चविष्ट प्रसाद होता. जेवणानंतर आपापले ताट भांडी सूचनेनुसार त्या त्या पात्रातच टाकण्याची शिस्त होती.

जेवून बाहेर आलो तर घरून फोन आला. गोंदवलेला उतरून गेलो म्हणून सांगितलं.  राहण्याची व्यवस्था हॉलमध्ये झाली सांगितल्यावर बॅग कुठे आहे हे विचारल्यावर, तेव्हा माझ्या डोक्यात रकसॅकचा विचार आला.  मी म्हटलं हॉलमध्येच बाहेर ठेवली आहे. जागेवर आहे का कोणी नेली तर प्रश्नांची सरबत्ती झाल्यावर मी नेहमीप्रमाणे बोललो की मी लोकांवर विश्वास टाकतो. त्यांनी तो निभवायचा का हा त्यांचा प्रश्न. मी माझ्या कर्माने. लोक त्यांच्या.

मी ताबडतोब हॉलकडे गेलो. माझी रकसॅक जागच्या जागी भिंतीला टेकून विश्रांती घेत होती.

मी ही थकलो होतो. त्या दिवशी सकाळी सज्जनगडला श्रीरामाचे दर्शन झालं होतं संध्याकाळी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महारांजाचं. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून थोरले, धाकटे श्रीराम मंदिरात जाऊन आलो. तोवर फक्त के. वि. बेलसरेंच्या गोंदवलेकर महारांजाचं चरित्र पुस्तकातच  या सर्व जागांबद्दल वाचलं, फोटोज बघितले होते. कित्येकदा त्यांतील प्रसंग वाचताना, विशेषतः राम नवमीला तुकामाई चैतन्य त्यांच्या गुरूंनी गोंदवलेकर महाराजांना अशोक वनात दुपारी बारा वाजता दिलेला दीक्षा प्रसंग..अनेकवेळा अश्रूपात व्हायचा.

सकाळी आजूबाजूचा परिसर बघितला आणि आठ वाजता परत निघालो. काहीही कल्पना नसताना, ठरवलेलं नसताना अचानक गोंदवलेचं हे दर्शन कायम लक्षात राहिलं.

-अभिजित पानसे

Thursday 22 March 2018

महिला क्रिकेट टीम

काही महिन्यांपूर्वी महिला क्रिकेट वर्ल्डकप झाला. भारतीय महिला टीमने फायनलपर्यन्त जबरदस्त मजल मारली होती. वर्ल्डकप जिंकू शकल्या नाहीत. पण  तिथून भारतीय महिला क्रिकेटसंबंधित गोष्टी योग्य प्रकारे बदल्यात. महिला क्रिकेटला लोक गांभीर्याने घेऊ लागलेत. बघू लागलेत.
आणि काल दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय महिला संघाने वनडे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांची मालिका जिंकली. हा एक फार मोठा पराक्रम आहे.

नवोदित कॅप्टन हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली ही मालिका खेळली गेली.
गेल्या वर्ल्डकपमध्ये मिथाली राज ही कर्णधार होती.
मिथाली राज ही भारताची स्टार आणि अनुभवी खेळाडू आहे. त्यामुळे अनुभव आणि नवोदित खेळाडूंचा उत्साह, जोश यांचं मिश्रण भारतीय टीममध्ये सध्या आहे.
हरमनप्रित कौर ही पंजाबी अँग्री यंग लेडी, किती जबरदस्त खेळाडू आहे हे गेल्या वर्ल्डकपमध्ये जगाने बघितलं. ती टीममधील स्ट्रोक प्लेयर आहे.
वर्ल्डकपमध्ये सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियासारख्या मोठ्या टीम्विरुद्ध तिने एकशे सत्तरच्या वर धावा केल्या होत्या.

शिखा पांडे ही भारतीय वायुसेनामध्ये  काम करते. ती फास्ट बॉलर आहे. तिनेही चांगली कामगिरी केली.
वेदा कृष्णमूर्ती ही मधली फळी सांभाळते.
पण या सगळ्यात एक नवोदित खेळाडू , फमिमा रॉड्रिक्स ही भारताचं भविष्य होऊ शकतं. ती फक्त सतरा वर्षांची आहे. चांगली फलंदाज आहे. तितकीच चाणाक्ष क्षेत्ररक्षकसुद्धा आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटच्या सामन्यात तिने अप्रतिम कामगिरी केली. सीमारेषेजवळ एक उंच झेल पकडताना तिने तिच्यातील अॅथलिटचं प्रदर्शन केलं.

पूनम यादव ही खऱ्या अर्थाने धैर्यवान लेग स्पिनर आहे. तसेही लेग स्पिनर म्हटलं की आधी हिम्मत असणे, सिंहाचं..सिंहिणीचं काळीज असणं गरजेचं असतं. कारण फलंदाज लेग स्पिनर्सला आपलं लक्ष करण्याची शक्यता असते. लेग स्पिनरला बॉलला ‘फ्लाईट’ देण्याची हिंमत असणं खुप महत्वाचं असतं. फ्लाईटशिवाय लेगस्पिनर म्हणजे दात नसलेला वाघ. पण पूनम यादव ही खूप हिंमतवाली लेग स्पिनर आहे.  ती शेवटच्या षटकांमध्येही बॉलला फ्लाईट देते. तिच्याकडेही आता अनुभव आहे. ती वर्ल्डकप खेळली आहे.

स्म्रिती मंधाना, हे नाव तर आता जगभरात पोहचलंय. सांगलीची ही मुलगी डावखरी फलंदाज आहे. ती भारतीय ओपनरसुद्धा आहे. तिच्याकडे आहे ते ‘टायमिंग’चं वरदान ! ‘नजाकत’ असलेले स्ट्रोक्स ती खेळते. शिवाय ती उंच असल्याने सीमारेषेवर ती योग्य  क्षेत्ररक्षण करते.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या सामन्यात तिने तिच्या फिल्डिंगची चमक दाखवली आहे.
त्यामुळे एकंदर भारतीय महिला क्रिकेटचं भविष्य छान आहे .

यावर्षी भारतीय महिला टीम इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. शिवाय नोव्हेंबरमध्ये ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांचा वर्ल्डकप आहे. प्रतिकूल परिस्थितीत  भारतीय टीमचा कस या वर्षी लागणार आहे. पण ज्या प्रकारे भारतीय महिला सध्या क्रिकेट खेळताय त्यावरून येता काळ भारतीय महिला क्रिकेटसाठी चांगला आहे हे नक्की.

एकमेकां सहाय्य करू

सध्या वेगळेच वारे वाहताय. एकाच पेशातील मोठे लोक एकमेकांचं कौतुक करत एकमेकांसोबत काम करताहेत. तैमुर जननी करीना क. एका साबणाच्या जाहिरातीत दिपूडीचं कौतुक करतेय.
दिपूडी आलियाचं कौतुक करतेय. तिघी सोबत मिळून साबणा विकताहेत..

दुसऱ्या एका पुरुष सौंदर्यपोषक लेपाच्या जाहिरातीत जॉन अब्राहम आणि बिबळ्या श्रॉफ एकाच जाहिरातीत काम करताय.

तिकडे  उ. प्र. मु. मं. योगी नॉर्थ ईस्टच्या निवडुकांसाठी प्रचाराला  गेले होते.

हवापाणी बदल रहा है!

भाजपा आणि शाहरुख

भाजपा सध्या नव्वदीतल्या शाहरूख खानसारखी झालीये, हिरॉईनचं लग्न हिरोसोबत लागणारच असायचं तर हा खान फ्रॉम द एपिक गोटीज , नेमका पोहचायचा आणि हिरोईनला गटवायचा.
कुछ कुछ होता है मध्ये काजोल आणि सलमान खानचं लग्न लागतच असतं तर हा तिथे येतो आणि काजोल सलमानला "#केन्फ्युजन केन्फ्युजन" मध्ये टाकून टाकून “नाम तो सुना ही होगा” कडे पळते.

दिल तो पागल है मध्ये माधुरी चांगला समजूतदार जुना मित्र अक्की कुमारसोबत नांदा सौख्य भरे करणारच असते तर तिथेही शेवटच्या क्षणी व्यासपीठावरच शाहरुखकडे पळते.

बाजीगरमध्ये पहिल्यांदा, प्लास्टिक सर्जरीपूर्वीच्या तत्कालीन चपट्या नाकाच्या शिल्पा शेट्टीला तिच्या मित्रापासून पळवतो नंतर जॉईंट आयब्रोजवाल्या काजोलला तिच्या फौजदार मित्रापासून. बिचारा फ्रेंडझोन्ड फौजदार  मग दुःखात “ छुपाना भी नही आता जताना भी नही आता..” गात अखख्या फ्रेंडझोन्ड दुःखी पोरांसाठी गाणं देऊन गेला.

आता मेघालयाततरी काँग्रेस सत्ता स्थापन करणार असं सगळ्यांना वाटत असतानाच बीजेपी…. असो.

#गोवामेघालय

-Abhijeet Panse

सोशिअल मीडियावरील लिखाण चोरी

लहानपणी मुलं पळवुन नेणारी टोळीवरून नेहमी भीती वाटायची. बऱ्याच जुन्या चित्रपटांमध्ये लहानपणी मुलांना कोणीतरी पळवून, चोरून नेत, मग संपूर्ण चित्रपटात हरवले ते गवसले का सुरू व्हायचं.

अगदी अपत्य समोर आलं तरी त्याची ओळख करणे कठीण व्हायचं..मग कुठेतरी कुंभमेळ्यात हातावर, पायावर काहीतरी गोंदवलेली खूण दिसायची..आणि हरवलेलं अपत्य गवसायचं..

सगळ्यात वाईट दुःख म्हणजे आपलं अपत्य समोर दिसतंय, पण कोणी त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीये..याहून वाईट म्हणजे आपल्या अपत्याला कोणी गुंड, एखाद्या ‘बस्ती’ का दादा पळवून आणलेल्या अपत्याला आपलंच अपत्य सांगून सरळ त्याच्यावर स्वतःचाच हक्क दाखवायचा.

किती वाईट वाटत असेल चित्रपटातील बिचाऱ्या त्या पालकांना!

च्या मारी असंच फिलिंग येतं जेव्हा कोणी तुमचं #पोस्टापत्य कॉपी पेस्टरूपी चौर्यकर्म करून त्यावर खऱ्याखुर्र्या पोस्टकर्त्याचं..पालकाचं नाव कट करून सगळीकडे पाठवतात.

कुठेतरी हॅशटॅगचं गोंदण सापडतं. आणि हरवलेल्या पोस्टापत्याचा पत्ता लागतो.

किँवा बहुतेकवेळा काही सदवृत्तीचे लोक चोरीचा माल लक्षात आणून देतात.

पण कुठल्या तरी ‘पेज’ ‘ग्रुप’ च्या बस्ती, झोपडपट्टीचा दादाने ते पळवलं असतं. तो त्यावर आपला हक्क सांगत असतो. स्वतःचं नाव दिलेलं असतं.

कुठे वॉट्सपअप रुपी खिडक्यांमधून त्याला राउंड अँड राउंड अँड राउंड  फिरवलं जातं.

काहीजण, अचानक अनपेक्षितपणे बाळ सापडलं   म्हणून बाहुबलीला पाळणाऱ्या पालकांप्रमाणे आपलं नाव देतात. कोणी प्रामाणिकपणे हे आमचं बाळ नव्हे आम्हाला ते नदीकाठी, जंगलात, दारात मिळालं असं प्रामाणिकपणे “ Copied & pasted” “Forwarded as received” सांगतात.

कॉपीराईट © चं कितीही राक्षणात्मक कवच दिलं तरीही पोस्टमार ती चोरतातच.

शेवटी या पोस्टापत्यचोर टोळीपासून सावधान राहण्यासाठी एक अत्यन्त संरक्षणात्मक असं ब्लॉगघर देणंच श्रेयस्कर राहील असं वाटतं.

हे आकाशातील जिझसा यांना माफ करू नकोस कारण त्याना माहिती आहे ते काय करताय..

पालकाचे नाव काढून ते पोस्टापत्य व्हायरल करणाऱ्याला व्हायरल फिवर होऊ दे रे जिझस महाराजा!

फेसबुकवर फेसबुकच्याच , लाईक्स, पोस्ट्स,  कमेंट्स, सेलेब्स, कंटेटच्या रडक्या गोष्टी करून कधीही इश्यू न करणारा

Abhijeet Panse

हे म्हणजे मेहनत करे मुर्गा अंडा खाये काफिर!

सोशील मीडिया लिखाण चोरी

बांग्लादेश नागीन डान्स.. तमाशा

“क्रिकेट इज जेंटलमॅन्स गेम” हे टुकार वाक्य मला कधीच आवडलं नाही. आणि यावरही विश्वास ही नाही. क्रिकेट इज नॉट जेंटलमॅन्स गेम अँड शुड नॉट बी. इट्स स्पोर्ट्समन्स गेम!”

खेळाडू रोबोट्स नाहीत.

परवा बांगलादेश ने जी जिगर दाखवली, आणि न्याय्य  तमाशा केला . कोब्रा डान्स केला.. त्याने मन जिंकलं. क्रिकेट पंडिट्स कितीही नियमांच्या , नम्रतेच्या चाऊन चाऊन चोथा केलेल्या गोष्टी सांगोत, बांगलादेशची यथेच्छ निंदा करो..पण बांगलादेश क्रिकेट टीमने जबरदस्त फायटिंग स्पिरिट, आणि खेळ दाखवलाय.

श्रीलंकेला सलग दोन मॅचेसमध्ये , तेही पूर्वी इतिहासात कधी टीमने इतकं मोठं टार्गेट यशस्वी ‘चेज’ केलं नसताना, ते करून दाखवलं  आणि दुसऱ्या मॅचमध्य े वाईट अंपायरिंग असतानाही थरारकरित्या मॅच जिंकली, हे एका ‘मिनोज’ साठी खाण्याचं काम नाही.

बांगलादेश टीम ही मिनोजमधील ही ऑस्ट्रेलियन  अॅटिट्यूड टीम आहे. संपूर्ण जोशाने ते खेळतात. जिं कण्यासाठी काहीही करतात.

शेवटच्या लिग मॅचमध्ये झालेला संपूर्ण तमाशाला बांगलादेशी टीम नाही तर ‘अँपायर्स’ कारणीभूत आहेत.

मुळात या सिरीजमधील अँपायर्स अत्यन्त #गां* आहेत.

बांग्लादेश आणि श्रीलंकेमधील पहिला चुरशीच्या सामन्यात मुशफिकुर रहीमचा रुद्रावतावर अँपायर वर निघाला. अठराव्या ओव्हर च्या शेवटी बांग्लादेश टीम फुल मोमेंटममध्ये बॅटिंग करत असताना, लंका टीमने मुद्दाम मोमेंटम ‘ब्रेक’ करण्यासाठी ओव्हर संपायच्या आत ड्रिंक्स मागवले. त्यामुळे मुशफीकुर अँपायरवर चिडला. अँपायर्सची ती पूर्णपणे चूक होती.

आयसीसीने अँपायर्स ला जे देव बनवून ठेवलंय, त्यांनी काहीही चुकीचे निर्णय दिलेत तरी काही कारवाई केल्या जात नाही. अँपायर्सशी थोडाही वाद केला तरी शिक्षा ठरलेली. या पार्श्वभूमीवर न घाबरता न्यायाने रहीमने अँपायरवर काढलेला राग विचारलेला जाब प्रचंड आवडला.

शेवटी मॅच त्याने एकट्याने जिंकून दिली, एकट्याने कोब्रा डान्स केला, आणि चुक अँपायरिंगचा एपिसोड झाकोळला गेला.

पण शेवटच्या लिग मॅचमध्ये, एकप्रकारे सेमीफायनलमध्ये पुन्हा अँपायर्सने मूर्खपणाचा कळस गाठला. शेवटच्या थरारक क्षणात लंका बॉलरने सलग दोन बाउन्सर्स टाकले असताना , मुळात ते नो बॉल असताना , लेग अँपायरने हात दाखवून नो बॉल दिल्यावर दुसऱ्या अंपायरने तो नो बॉल ठरवला नाही. या गोंधळात बांग्लादेशची रन आऊट विकेट गेली.

आणि त्यांनतर जो तमाशा झाला…

खूप काळानंतर रॉ, थरारक जिगरी खेळाडू बघायला मिळलेत.

कॅप्टन शकीब हसनने दोन्ही बॅट्समन्सला परत बोलावले. ग्राऊंडवर वेगळा गोंधळ रेषेबाहेर बांगला कॅप्टनचा  रुद्रावतार.. जो अगदी बरोबर न्याय्य होता.

पण त्या दिवशी त्यांनी तो सामना सोडला असता तर आयसीसीला त्यात पडावं लागलं असतं. बांगला टीमचं भवितव्य धोक्यात होतं.

त्या दिवशी खरा स्टार होता मेहम्हूदुल्हा! कॅप्टन टीमला मॅच सोडायला सांगत असताना तो मात्र खेळण्याच्या बाजूने होता. आणि त्याने एकट्याने अशक्य मॅच जिंकून दिली.

त्यानंतर झाला संपूर्ण टीमचा कोब्रा डान्स!

पहिल्या मॅचमध्ये मुशफीकुरचा नागोबा डोलला होता..शेवटच्या मॅचमध्ये संपूर्ण टिमने नागोबा नाच केला.

पण बांगलादेश टीमने ड्रेसिंग रूमची तोडफोड केली असेल तर त्यांना अद्दल घडवण्यासाठी, चड्डीत राहायला सांगण्यासाठी मोठी शिक्षा झालीच पाहिजे. पण हीच या टीमची खासियत आहे, की ते मिनोज असूनही त्यांच्या चड्डीत राहत नाही.

त्यामुळे बांगलादेश टीम कितीही फोटोशॉप टीम असली, वाहवत जाणारी टीम असली तरी खूपदा मन जिंकून घेते. कारण त्यांच्या मागे असतात त्यांच्या देशवासियांच्या शुभेच्छा, भावना.

दोन दिवसांपूर्वी झालेला तमाशा , थरारक मॅचमध्ये बांग्लादेश जिंकल्यावर त्यांचे पाठीराखे प्रेक्षक घळाघळा रडत होते.

शकीब हसन! वॉट अ प्लेयर! संपूर्ण सिरीजमध्ये टीममध्ये नव्हता. शेवटच्या लिग मॅचसाठी टीम मध्ये आला, कॅप्टन तोच, टॉस जिंकून बॉलिंग घेतली, पहिली विकेट त्यानेच काढली..चुकीचं अँपायरिंग बघता चिडून तमाशा...आणि मॅच जिंकल्यावर उघड्या अंगाने ग्राउंडमध्ये गेला.

अत्यन्त टुकार आणि अबसेन्ट माइंडेड ‘कमेन्टेटेर’ कपिल देवने , लोर्ड्स च्या बाल्कनीत सौरव गांगुली ने शर्ट काढल्यावरून कित्येकवेळा गांगुलीवर टीका केली होती. पण कॅप्टन असाच असावा लागतो.

असो बांगलादेशने या सिरीजमध्ये जबरदस्त खेळ केला आहे. ते फायनलमध्ये आले आहेत. हॅटस ऑफ टू बांगलादेश टीम!

पण आता या बांगलादेशी कोब्राला रोहित, धवन, चाहल आपल्या पुंगीवर नाचावताना बघायचंय!

बांगला कोब्राचा गांडूळ आज भारतीय टीम करणारच !

#ग्रेटफायटरबांग्लादेश #बटनावइट्सब्लीडब्लू

-  Abhijeet panse

सनी डेज

सनीडेज

अमिताभ बच्चन या वयातही काम करतात यावरून त्यांचं कौतुक केलं जातं. ते साहजिकच आहे.  पण अशीच एक आणखी व्यक्ती आहे, जी त्यांच्या कामाबद्दल काहीसे अनसंग हिरो वाटते. त्यांच्या बॅटींगमुळे ते सुपरस्टार, जगविख्यात आहेत पण ते समालोचक म्हणून किती महान आहेत हे बरेचदा झाकोळलं जातं.

ते द ग्रेट सुनील मनोहर गावस्कर.

किती काम करतो हा माणूस! कोणतीही मालिका असो कुठेही दौरा असो, सुनील गावस्कर तिथे असतातच. चॅनल्सला ते हवे असतातच.

मागच्या वर्षी भारतात झालेल्या सर्व ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड मालिकांमध्ये ते स्टार स्पोर्ट्सवर समालोचन करत होते. नंतर अडीच महिने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर होते. तेथे सोनी टेन साठी  समालोचन करत होते. त्यानंतर निदहास ट्रॉफीसाठी श्रीलंकेत नवोदित “डी स्पोर्ट्स” चॅनलसाठी समालोचन केलं. आता इंडियन लीग साठीही करतील. जुलैमध्ये अडीच महिन्यांचा इंग्लंड दौरा, डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचे दीर्घ दौरे..नंतर इंग्लंडमध्ये वर्ल्डकपचा कुंभमेळा..हुश्श..

कोणीही कमेंरेटर हो..अननुभवी, तरुण, समवयस्क अनुभवी, सगळ्यांसोबत ते सुरेख मेळ साधतात.
भारतीय टीम इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना वसीम अक्रमसोबत समालोचन करतात.

एरवी हुशार हर्षभोगले, अचूक परीक्षक समीक्षक संजय मांजरेकर, दिलखुलास मनाचा हसमुख व्ही व्ही एस लक्ष्मण , गोडबोल्या आकाश चोप्रा, मेन स्ट्रीम क्रिकेट मधून काहीसा बाहेर पडलेला अजय जडेजासोबत इरिटेटिंग नार्सिसिस्ट वीरेंद्र सेहवाग सोबत सगळ्यांशी जमवून आपल्या विनोदी शैलीत ,
पण गांभीर्याने समालोचन करतात.

टोनी ग्रेग, इयन चॅपल , जेफ्री बॉयकोट या, बोलताना कोणाचीही तमा न बाळगणाऱ्या त्रयीसोबत सुनील गावस्कर यांनी समालोचन केलंय.
वेळोवेळी भारताची बाजू मांडली, टीकाही केली.

ते एन्सयक्लोपिडिया आहेत क्रिकेटचे. कोणत्या मॅचमध्ये काय घडलं होतं, प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीची, खेळाची माहिती.

समालोचन करताना स्वतः एकेकाळचे सर्वोत्तम बॅट्समन होते हे ते विसरून जातात, त्याचा कुठलाही अहंकार वा त्याची कुठलीही झलक ते त्यांच्या समालोचनात दिसू देत नाही.

साठ ओव्हर्स वनडे मॅचमध्ये ओपनिंगला येऊन तीसेक रन्स काढून नॉट आऊट राहणे या त्यांच्या एक मजेदार आणि टिकास्पद रेकॉर्डवरून तेच स्वतःची थट्टा उडवतात..त्यामुळे कोणी त्यांच्यावर टीका करू शकत नाही.

पिच रिपोर्ट बघावं तर सुनील गावस्कर यांचं. “पिच डॉक्टर” आहेत ते. पिचचा एक्सरे असतो त्यांच्याकडे.

एक 09/010 मधील ऑस्ट्रेलिया सिरीजमध्ये हैदराबाद ला वनडे मॅच असताना पिच रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितलं होतं की या पिचवर मलाही बॅटिंग करायची इच्छा होते आहे. किमान पन्नास रन्स मी आजही काढू शकेल. पिचमध्ये भरपूर रन्स आहेत.

त्या मॅचमध्ये सातशेच्यावर रन्स निघालेत. सचिन तेंडुलकर ने दुसऱ्या इनिंगमध्ये 175 रन्स काढले. पण रवींद्र जडेजाच्या अत्यन्त मूर्ख अपरिपक्वतेमुळे तो स्वतः रन आऊट झाला. भारत अगदी तीन ते चार रन्सने मॅच हरला. त्यावेळी जडेजा आऊट झाल्यावर कमेंट्री करताना गावस्कर जसे चिडले होते तसं नंतर फार क्वचित दिसलेत. जडेजा त्याच्या चुकीमुळे रन आऊट होण्यापूर्वीच गावस्कर त्याच्या धावण्याच्या पद्धतीवरून टीका करत होते. पुढच्या क्षणाला तो तसाच आऊट झाला.

ती मॅच एक न विसरल्या जाणाऱ्या भारतीय क्रिकेट निगडित दुःखी आठवणींपैकी आहे. प्रचंड मोठया टार्गेटचा पाठलाग करताना थोडक्यात भारत हरला होता.

सुनील गावस्कर कधी कटू शब्दात “ऑन एअर” कान उघडणी करतात. खरंतर करायचे.  पण आता तो जमाना गेला. बीसीसीआयच्या दबावाखाली आता सर्वच समालोचक गुळमुळीत बोलतात. सर्वजण बीसीसीआयचे खालमाने चाकर आहेत. सुनील गावस्करसुद्धा त्याला आता पूर्णपणे अपवाद नाहीत हे खेदाने म्हणावे लागतं. पण किमान ते त्यांच्या कॉलम्समधून थोडीफार टीका करतात.
हेही नसे थोडके.

2016 च्या वर्ल्डकपमधील भारत बांग्लादेश मॅच दरम्यान बांग्लादेशींची स्तुती केल्यामुळे आणि भारतीय टीमवर काहीशी टीका केल्याने हर्ष भोगलेसरख्या अनुभवी निष्णात अँकरला स्टार स्पोर्टसने, बीसीसीआयचा छुपा पाठिंबा असल्यानेच चहातील माशी काढून टाकावी तसं त्याला काढून टाकले. #अमिताभबच्चनने काही गरज नसताना हर्ष भोगलेचं नाव न घेता टीका करत ट्विटरवरून टीवटीव केली होती.
असो तो एक स्वतंत्र वेगळा विषय आहे.

पण त्यामुळे एकंदरीतच आता गुळगुळीत , हातचं राखून ,  पाठ खाजवून देणारं समालोचन करण्याचा जमाना आहे.

टोनी ग्रेग, इयन चॅपल, जेफ्री बॉयकोट आणि तत्कालीन सुनिल गावस्कर तिखट आणि बेधडक समालोचकांचा काळ गेला.

सचिन तेंडुलकरला नियमितपणे त्याच्या चांगल्या वाईट काळात त्याची पाठराखण करून त्याला प्रोत्साहन देणाऱ्या सुनील गावस्करांनी इंग्लंड आणि न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट मॅचेसमध्ये मायदेशात फास्ट बॉलरविरुद्ध सचिन तेंडुलकर ‘बोल्ड’ होताना बघितल्यावर सचिन आता जुना सचिन राहिला नाही. आता त्याने निवृत्तीचा विचार करायला हरकत नसावी. हे ऐकल्यावर प्रचंड धक्का बसला होता. एरवीही तेंडुलकर त्याच्या कारकिर्दीत मायदेशात फास्ट बॉलवर आऊट व्हायचा. पण तेव्हाचं बोल्ड होणं आणि नंतरचं यातील फरक गावस्करांनी सांगितला होता.

त्यानंतर काही महिन्यांनी सचिनने प्रथम वनडे आणि नंतर टेस्टमधून निवृत्ती घेतली.

“मृत्यच्या काही क्षणापूर्वी मला धोनीचा वर्ल्डकप फायनलमध्ये मारलेला विनिंग सिक्सर बघायला आवडेल!” हे गावस्करांनी म्हटलेलं वाक्य प्रसिद्ध आहे.
पण त्यामागेही थोडी वेगळी पार्श्वभूमी आहे. असो.

सुनील गावस्कर यांच्या कमेंट्रीमुळे वाद फार उदभवले नाहीत. पण 98च्या काळात एका डे नाईट मॅचमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना कॅप्टन #मोहम्मदअजहरुद्दीन लवकर  आऊट झाल्यावर परत येताना “देअर इज नो टूमारो…” असे गावस्कर बोलले. हे अजहरुद्दीनच्या कानी पडले. ( कसं ऐकू आलं याचं आश्चर्य वाटतं.) पण त्या वाक्यचा अजहरने अर्थ काढला की देअर इज नो टूमॉरो फॉर अजहरुद्दीन, म्हणजे अजहरला आता भविष्य नाही असं गावस्करांचं म्हणणं आहे.
त्यावरून अजहरुद्दीनने फार आकांड तांडव केला होता.

नंतर गावस्करांनी स्पष्ट केले की त्यांनी देअर इज नो टूमॉरो म्हणजे ती मॅच हरल्यावरभारत एक दिवसांनंतर होणाऱ्या फायनलमध्ये पोहचू शकणार नव्हता. त्यामुळे आता भारतीय टीमला या सिरीजमध्ये भविष्य नाही असे म्हणायाचे होते.

सुनील गावस्करांचे क्रिकेट खेळताना विनोदबुद्धीचे किस्से प्रसिध्द आहेतच. पण समालोचन करतानाही ते या वयातही ते गंमतीदार शब्द तयार करतात.

हिंदी कमेंट्री करताना “डॉट बॉल”ला “#बिंदी_बॉल” म्हणतात. खराब टीमला ते मुंबईच्या भाषेतील ‘#पोपटवाडी’ टीम म्हणतात.

गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी भयंकर पिचवर भारतीय टीमने बॉलचे वार अंगावर झेलल्यावर दुसऱ्या दिवशी तीच खेळपट्टी पूर्णपणे झोपली होती. शांत झाली होती. तेव्हा लंचनंतर सुनील गावस्करांनी पिचजवळ जाऊन पूर्णपणे पालथे झोपून खेळपट्टीशी काहीतरी गमतीदार कुबुजले. ते एक फार गंमतीदार दृश्य होतं. पण सुनील गावस्करांनी ‘#मंतर’ मारल्याने झोपलेली पिच जागी झाली.

भारताने विजय मिळवला. अश्याप्रकारे याही वयात ते समालोचनाला अत्यन्त रसपूर्ण बनवतात.

पण सध्या गावस्करांचं वय झालंय हे कळतं. शेवटच्या टेस्ट मॅचमध्ये शेवटच्या विकेट्स राहिल्यावर टी ब्रेक झाल्यावर ते म्हणाले होते की आता परत मी शंभर पायऱ्या चढून वर कमेंट्री बॉक्समध्ये जाणार नाही. कारण मॅच जिंकल्यावर पुन्हा इथे यावं लागेल. टी ब्रेक होऊन शेवटचे दोन विकेट्स जाईपर्यंत ते सीमारेषेबाहेर राहिलेत. त्यानंतर पुन्हा त्यांनी विजयानंतरचं एक्स्पर्ट ओपिनिअनचं सेगमेंट ग्राउंडमध्ये पूर्ण केलं.

भारतीय टीमचा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा दौरा असताना पहाटे चार वाजता टीव्ही लावून, थंडीत ब्लॅंकेटमध्ये स्वतःला गुंडाळून डोळे मिटून अर्धवट झोपेत सुनील गावस्करांची कमेंट्री ऐकत राहणे ही एक मेजवानी असते.

या वयातही ते अत्यन्त रॉयल, हँडसम, गोड दिसतात. कधी आसामी टोपी घालून, कधी गंमतीदार पेहराव करून ते स्वतः समालोचन एन्जॉय करतात.
 #कानपूरला मॅच असेल तर गावस्करांची इतर कमेन्टेटर्स खेचायचा प्रयत्न करतात. कारण सुनील गावस्करांचं ते सासर आहे. "कानपूरके दामाद" आहेत ते. पण तिथेही ते सगळयांवर भारी पडतात. स्वतःच त्यावरून गंमती करतात. कानपुरला कुठलं प्रसिध्द पानाचं दुकान, कुठे चांगली कचोरी समोसा मिळतं हे सांगतातच.

समालोचन करताना अनेकांची मिमिक्री करतात.
परवा बांग्लादेशला हरवल्यावर त्यांनीही “नागीन डान्स" केला.

सुनील गावस्कर यांना दीर्घायुष्य लाभून त्यांची कमेंट्री अनेक वर्षे ऐकायला मिळावी आणि हे "सनी डेज" असेच कायम राहावेत ही मनापासून इच्छा आहे.

हॅट्स ऑफ टू लिटल मास्टर सुनील मनोहर गावस्कर!

Take a bow great man!!

- अभिजीत पानसे

निदहास..

'निदाहास'! सर्वप्रथम शब्द ऐकला..वाचला तर जरा विचित्र ..वेगळा वाटला.. म्हणून माहिती काढली. “निदाहास ट्रॉफी” सध्या श्रीलंकेत भारत श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यात खेळली जातेय.
निदहास हा 'सिंहली' भाषेतील शब्द आहे. निदहास म्हणजे 'स्वातंत्र्य'. आझादी..

श्रीलंकेला स्वातंत्र्य’ मिळून सत्तर वर्षे पूर्ण झालेत . त्यानिमित्ताने ही निदहास सिरीज खेळली जातेय.

याआधीही 1998 मध्ये श्रीलंकेत भारत, पाकिस्तान श्रीलंका या आशियाई देशांत निदहास कप खेळला गेला होता.

मी त्या काळात नुकताच क्रिकेट बघायला सुरवात केली होती.

लहान मुलांचे लैंगिक शोषण झाल्याने ते करणाऱ्या माणसाबद्दल कायम प्रचंड भीती मनात घर करून राहावी. तसं माझं मानसिक शोषण लहानपणी #अॅलनडोनाल्ड या गोऱ्या आफ्रिकनने केलं होतं. त्याशिवाय #सनथजयसूर्या हा दुसरा शोषण करणारा!
माझं  बाल्य नासवणारे हे दोन नराधम!

त्याकाळात जयसूर्या तुफान होता. जग्गुदादा श्रीनाथ, व्येंकी परश्याचा फडशा पाडणे हे त्याच्या "डाव्या हाताचं" काम होतं.

त्यापूर्वी 1997 च्या उन्हाळ्यात, भारताला स्वातंत्र्य मिळून पन्नास वर्षे पूर्ण झालेत म्हणून भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि दूरवरचा न्यूझीलंड यांच्यात सिरीज खेळली गेली होती.

त्याचवर्षी कदाचित, काही महिने उणे अधिक,
बांग्लादेशला स्वतंत्र होऊन 25 वर्ष झालीत म्हणून भारत, पाकी, लंका बांग्लादेश यांच्यात एक सिल्वर ज्यूबली सिरीज खेळली गेली होती.
(या सिरीजचं फायनल, अंतिम सामना आजवरचा एक अत्यंत चित्तथरारक सामना , असो तो  एक सामना संपूर्ण वेगळा विषय आहे.)

अश्याप्रकारे आजवर भारत बांग्लादेश आणि श्रीलंकेमध्ये निदहास..फ्रीडम ट्रॉफी खेळली गेली आहे, त्या त्या देशाला इंडपेंडन्स मिळाल्याबद्दल.

पण एक अजब योगायोग या सिरीज आणि विजेत्याबद्दल आहे.
आजवर ज्या एशियन देशाने अशी स्वतंत्रतेला 25, पन्नास वर्षे झालेत म्हणून सिरीज खेळवली ती त्या देशाने मात्र जिंकली नाही.

1998 मध्ये स्वातंत्र्याला 50 वर्षे झालीत म्हणून श्रीलंकेने #निदाहास ट्रॉफी खेळवली. त्यात भारत विजेता होता.

भारताने 1997 मध्ये चार देशांत सिरीज खेळवली, ती ट्रॉफी श्रीलंकेने जिंकली.
यातील भारत आणि पाकिस्तानमधील सामना तर अजूनही आठवतो..एक दुःखी आठवण म्हणून..

सईद अनवरने काढलेले 194 रन्स सोळा वर्षे अस्पर्शीत राहिलेत. या सामन्यात राहुल द्रविडने पहिलं वन डे शतक केलं होतं. पण भारत मॅच हरला. फायनलला पोहचू शकला नव्हता.

आणि त्यानंतर आला, बांग्लादेशचा सिल्वर ज्युबिली कप..स्वतंत्र होऊन 25 वर्षे झाल्यानिमित्त..एक अत्यंत सुखद आठवण!
यात अंतिम सामना रंगला पाकिस्तान आणि भारतामध्ये..

शेवटच्या क्षणी सकलेन मुश्ताकला #ऋषिकेशकानिकटरने चौका मारून तो अत्यन्त थाररक सामना जिंकून दिला होता. त्या एक बाऊंडरीच्या भरवशावर तो पुढे काही मॅचेस खेळला.

बांग्लादेशने स्वतंत्रतेचा उत्सव म्हणून खेळवलेली सिरीज भारताने जिंकली होती. Destiny served it right, म्हणायला हरकत नाही. बांग्लादेशला स्वातंत्र्यही भारतानेच मिळवून दिलं ना! पण त्या *** त्याची किंमत नाही. ते भारतीय टीमचा फार द्वेष करतात. आठवा 2015 वर्ल्डकपचे फोटोशॉप्स!

असो. गेल्या महिन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये द. आफ्रिकेत "फ्रिडम सिरीज" झाली आहे.
च्या मारी या इंग्रजांनी , जिथे गेले तिथे 'चहा' आणि क्रिकेटचं व्यसन लावलं.

सध्या सत्तर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त निदाहास ट्रॉफी लंकेत सुरू आहे.

आजवरचा या ट्रॉफीचा इतिहास बघता , श्रीलंकेची जिंकण्याची शक्यता कमी आहे असं म्हणता येईल.

बाकी 'निदहास' हा शब्द गोड आणि छान अर्थपूर्ण शब्द मला फार आवडला!

हमे चाहीये निदहासी ! निदहासी! निदहासी!

-    Abhijeet Panse

  8 मार्च 2018

मोहना चितळे

#Women's-day-week.

 मला व्याख्यान आणि प्रवचने दोन्ही लहानपणापासून ऐकायला खूप आवडतात. त्यातून अनुक्रमे बौद्धिक आणि मानसिक आनंद मिळतो.
एकदा डिसेंम्बर 2014 ला एका मित्राला शनिवार पेठेतील “पे अँड स्टडी” रूममध्ये भेटायला गेलो असता, त्याला अर्धा तास वेळ असल्याने , जवळच असलेल्या प्रसिद्ध ओंकारेश्वर मंदिरात गेलो. तेव्हा दत्त जयंतीचं वातावरण होतं. तेथे गुरुचरित्र सप्ताह सुरू होता.

समोरील मोकळ्या भागात सतरंज्या टाकल्या टाकल्या होत्या. थोडे लोक बसले होते. मी आत जाऊन बाहेर आलो तेव्हा एक पन्नाशी साठीतील स्त्री, ताठ मांडी घालून व्यासपीठावर माईकसमोर बसलेल्या होत्या. मध्यम उंची, पिकलेले केस, शिडशिडीत पण तरतरीत व्यक्तीमत्व.
 तेवढ्यात त्यांनी गीता आणि त्या संबंधित गोष्टींवर प्रवचन सुरू केले.

खणखणीत भाषा, शब्दांवर हुकूमत..कुठेही अं ..अं नाही, बोलण्यात कंप नाही..एका लयीत त्या बोलत होत्या. मी 15 मिनिटे वेळ घालवायला ओंकारेश्वरला गेलो होतो. थोड्यावेळ बसावं म्हणून बसलो. पण पुढील दोन तास सलग खिळून बसलो.
मित्राला मेसेज करून फोन बंद केला. प्रवचन आटोपलं तेव्हा बघितलं संपूर्ण आवार श्रोत्यांनी भरलेला होता.

त्यांचं नाव काय होतं माहिती नव्हतं. जाताना बाहेर बोर्डावर दिसलं, दत्त जयंतीपर्यन्त सलग सात दिवस ....या विषयावर “मोहना चितळे” यांचं प्रवचन.
तेव्हा त्यांचं नाव मोहना चितळे आहे हे कळलं.

त्यानंतर मी ठरवून काही दिवस संध्याकाळी त्यांचं प्रवचन ऐकायला गेलो. नंतर जमलं नाही याची खंत वाटायची. पण दत्त जयंतीला खास ठरवून गेलो. उशीर झाला . शेवटचे काही मिनिटं ऐकायला मिळालं त्यांना. खूप गर्दी होती. सगळ्यात मागे उभा होतो. त्यादिवशी त्यांच्या प्रवाचनातील शेवटचे पंधरा मिनिटे सेलमध्ये रेकॉर्ड केलेत. आजवर ऐकतो.

फक्त त्यांचं बोलणं ऐकायला इतक्या दूर जायचो.
त्यानंतर पुन्हा कधी त्यांना बघितलं नाही..ऐकलं नाही.
पण एक अप्रतिम ओजस्वी वाणीचा वक्ता ऐकल्याचा आनंद मिळाला.

जागतिक महिला दिनानिमित्ताने हे त्यांना समर्पित.

Abhijeet Panse

बडी छोटीसी मुला कात

श्रीदेवी असो वा माधुरी दीक्षित , यापैकी मला कोणीच  आवडलं नाही. कारण या अभिनेत्री जेव्हा पूर्ण जोमात होत्या तेव्हा मी मुव्हीबाज व्हायचो होतो. टीव्हीवरील ढिश्यूम ढिश्यूम् मुविज फक्त आवडायच्या. 
शाळेत पहिली हिरोईन आवडली ती जुही चावला. 
आवडत्या जुही चावलाने गुलाब गॅंगमध्ये माधुरी दीक्षितला खाऊन, गिळून टाकताना बघताना फार आनंद झाला होता. आपली जुही अजूनही मस्त अभिनय करते हे बघून.

लहानपणी व्हीसीयारवर मिस्टर इंडिया बघितला. तेव्हा तो सगळ्यात आवडता चित्रपट होता. पण त्यालाही कारण “जादूची घड्याळ” होती. भोळा सांब अनिल कपूर होता. आणि जादूगार के लाल हातात घालायचा तसा अंगठ्या घालणारा मोगॅम्बो होता. 

सलमान खानसोबतचा एक चित्रपट डीडी नॅशनलवर बघितला होता. ज्यात ती परी की काहीतरी असते. आणि छोट्या मुलाला मोठा सलमान  खान करते. तेव्हा तो या जादूगिरीमुळे सिनेमा आवडला होता.

लहानपणी यात्रेत “खुदा गवाह” बघितला. तेव्हा निळ्या कपड्यात “तू ना जा मेरे बादशहा…” म्हणणारी श्रीदेवी बघितली..त्यावेळी ती प्रथम आवडली. मागे हिमालय..आजूबाजूला शुष्क प्रदेश.. धिप्पाड  अमिताभ रुबाबात घोडा हाकतोय आणि श्रीदेवी उंचावरील ठिकाणावरून “एक वादे के लिये..एक वादा तोड दे..” 
वाहह ! 
त्यानंतर खुदा गवाह अनेकदा बघितला. मग श्रीदेवीचा अभिनय समजत गेला. एक दाक्षिणात्य मुलगी अफगाणी वाटलीय हेच सगळ्यात  महत्वाचे.. खुदा गवाहतील तिची एन्ट्री! अमिताभ सोबत तिची केमिस्ट्री ! तिचं स्ट्रॉंग कॅरॅक्टर! तू मुझे कबूल मैं तुझे…” हे लग्नाच्या रात्रीचं गाणं. तिचं नितळ सौंदर्य…

डबल रोल करताना दोन्हीही भूमिका अगदी वेगळ्या साकारल्याय..कुरळ्या केसांची अफगाणी..स्टेपकट मॉडर्न मुलगी.. त्यातील नागार्जुनसोबतचं '..तेरी वतन की कहानीया”  लाल शिफॉन साडीतील तिचं सौंदर्य… श्रीदेवीने  घोड्यावरील जे शॉट दिलेत, रुबाबदार ती जी दिसलीये त्याला तोड नाही. अमिताभला पूर्ण टक्कर दिलीये. शेवटच्या दृश्यात दोघे जेव्हा दोन घोड्यांवर जातात, तेव्हा जणू श्रीदेवी ही काही  हिरोला फक्त कॉम्प्लिमेंट  करणारी हिरोइन नाही तर स्वतन्त्र एक मोठी अभिनेत्री आहे. हेच जणू त्यातून तिने स्पष्टपणे सांगितलंय.

पुढे यशराज चोप्रा आणि  शिफॉन साडी हे समीकरण श्रीदेवीपासूनच तयार होत गेलं. चांदनीतील तिचं ऋषी कपूरसोबतचं लाल शिफॉन साडीतील एक गाणं..नितळ सौंदर्य काय असतं याचं मूर्तिमंत उदाहरण त्यातील श्रीदेवी.

हात पाठीमागे नेऊन दोन खांदयांची मूव्हमेंट ..ही नव्वदीच्या काळातील  हिंदी चित्रपटातील गाण्यातील खास ठरलेली कोरिओग्राफी, शैली श्रीदेवीनेच सुरू केली. दिव्या भारतीही ते हमखास करायचीच.

मिस्टर इंडिया पुढे अनेकदा बघितल्यावर ,” काटे नही कटते ये दिन..रात …” यातील ती जणू पिघळलेला नीलम, जलपरी ..!
तिचं फिरोजा  शिफॉन साडीतील ओलेतं आरस्पानी सौंदर्य बघितलं. चित्रपटात गर्ल अॅट नेक्स्ट डोअर भूमिका असतानाही त्या गाण्यात ती पूर्णपणे मादक , अस्सल जातिवंत स्त्री सौंदर्याची सम्राज्ञी दिसली. कुठेही व्हल्गर “वॉना बी”..वा अट्टाहास त्यात वाटला नाही.
ते गाणं श्रीदेवीने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय. 

फिरोज खानसोबत “हर किसिको नही मिलता..” कॅमिओ करताना ते गाणं ऑल टाईम हिट करून ठेवलंय.

“चालबाज” मध्ये तिने कुठेही “सीता और गीता”मधील हेमा मालिनीची आठवण येऊ दिली नाही. हे तर खरं शिव धनुष्य होतं. एका सुपरहिट चित्रपटाचा; सुपरहिट अभिनेत्रीने काम केलेल्या सिनेमाचा रिमेक..पण तिने हेही शिवधनुष्य पेलेलं. चालबाजमध्ये सनी देवल आणि रजनीकांत हे खरोखर सपोर्टिंग ऍक्टर्स वाटलेत.

हिरोंचे, व्हिलन्सचे डायलॉग्स , वन लायनर्स हिट होतात. पण चालबाजमधील श्रीदेवीने म्हटलेला ‘बलमा’ आजही प्रसिद्ध आहे.
'लाडला'मधील तिचा "यु अंडरस्टॅन्ड यु बेटर अंडरस्टँड" हा फेमस डायलॉग त्या काळात कित्येकांच्या तोंडी होता.

'नगीना' तिने आणि अमरीश पुरी दोघांनी मिळून हिट केला. 'निगाहे' ही लहानपणी आवडला होता.

त्यानंतर श्रीदेवी आवडली “आखरी रास्ता” या दाक्षिणात्य रिमेक चित्रपटात. त्यात तिचा नेहमीप्रमाणे गर्ल अॅट नेक्स्ट डोअर हाच रोल होता. पण त्यातील किडनॅप झाल्यानंतरचा तिचा अमिताभसोबतचा सीन आवडतो.
बऱ्याच वर्षांनी क्लिक झालं की आखरी रस्तामधील श्रीदेवीचा आवाज श्रीदेवीचा नसून 'रेखाचा' आहे.

त्या काळात श्रीदेवी की माधुरी या दोघींपैकी “#लेडी_अमिताभ” कोण? यावर नेहमी चर्चा व्हायची. 

नंतर श्रीदेवीने काही सुमार चित्रपटही केलेत. डाकू वगैरे बनण्याचा त्या काळात ट्रेंड होताच.
“रूप की रानी चोरो का राजा” चित्रपटातील तिचा चायनीज जादूगार.. चिंचपोकली..डोंगरी वडाला...सीन आणि रस्त्यावरील अनिल कपूरसोबतचा विनोदी सीन फार आवडले होते. पण तो चित्रपट वाईट आपटला. 

'सदमा' तिचा बघितला नाही. सदमा आणि "चौकट राजा" चित्रपट मी मुद्दाम लहानपणी बघितले नव्हते.  कारण त्यातील दुःखाचा परिणाम माझ्या मनावर व्हायचा. 

अनेक वर्षांनी श्रीदेवीला इंग्लिश विंग्लिशमध्ये  बघितलं . त्याबद्दल काहीच बोलण्याची गरजच नाही. गौरी शिंदेने श्रीदेवीला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. सेकंड इनिंगची सुरवात झकास झाली.
पण याच श्रीदेवीने 'पुली' नावाचा एक दक्षिणात्य चित्रपट एका नमुना दाक्षिणात्य ‘स्टार’ सोबत केला. श्रीदेवी आहे म्हणून बघायला गेलो होतो. पण इंग्लिश विंग्लिश करणारी हीच का ती श्रीदेवी असा प्रश्न तो थर्ड क्लास सिनेमा बघताना पडला. या वयात श्रीदेवी असा महामूर्खपणा करू शकते याचं आश्चर्य वाटलं . अर्ध्यातुन बाहेर आलो होतो.

पुढे 'मॉम' केला. त्यात नवाजुद्दीन आणि श्रीदेवीने मस्त काम केलं. चित्रपट 'लाऊड' न केल्याने आवडला.

लेडी अमिताभ कोण, यावर वाद करण्यात लोक गुंग असताना श्रीदेवी मात्र एकाहून एक भूमिका करत गेली.
शेवटी काय तर , ती आली..तिने बघितलं.. तिने शॉट दिला.. ती जिंकली..त्या सूत्रधार ’डायरेक्टर’ने “कट इट” म्हणून व्हेरी गूड शॉट म्हटलं..आणि तिने  “पॅक अप” केलं.

-Abhijeet Panse

हीच ती वेळ हाच तो क्षण

'हीच ती वेळ हाच तो क्षण"

त्यालाही ती आवडायची. लवकरच तिलाही तो आवडु लागला होता. शेवटी मागच्यावर्षी त्याने तिला औपचारिकरित्या प्रपोज केलंच.
बरेच हिंदी चित्रपट बघितल्याने तिनेही गालावर दोन हात ठेवून सरप्राईजड झाल्यासारखं “ओह माय गॉड!” वाले भाव देऊन ‘हो’ म्हटलं होतं.
‘अशावेळी’ दोघांनाही किस करायचं होतं पण त्यांना प्रायव्हसी  मिळाली नव्हती.

आणि हेच त्याच्या महादुःखाचं कारण होतं. प्रायव्हसी न मिळणे!
वर्ष झालं पण दोघेही आपापल्या कामात, आणि मित्र आणि लोकांच्या गराड्यात !
 आजवर एकांत मिळाला नसल्याने दोघेही, विशेषतः तो फार वैतागला होता.

14 फेब्रुवारीलाच ती बऱ्याच महिन्यांसाठी शहराबाहेर जाणार होती. म्हणून दोघांनीही ठरवून तेरा फेब्रुवारीला व्हॅलेन्टाईन्स डे च्या आदल्या दिवशी सुटी घेऊन बाहेर भेटायचं ठरवलं.

 आज त्याने तिला ‘किस’ करण्याचा चंग बांधलाच होता! सोशिअल मीडिया अपडेट्सवरून आज “किस डे” आहे हे कळलं होतं.
वाह आज छान इंग्लिश मुहूर्तही आहे तर! तो स्वतःशीच खुष होता.
तिचीही ‘ना’ नसणारच होती.
“पण किस करणार कुठे?” हा प्रश्न त्याला नेहमीप्रमाणे सतावत होता.

संपूर्ण दिवस आज सोबत घालवायचा ठरवलं होतं.
त्याने क्लुप्ती लढवली, मुव्ही हॉलमध्ये तिला किस करता येईल म्हणून मुव्ही 'ऐकायचा' ठरवलं! त्याने दुपारी तिला तिच्या बिल्डिंगखालून तिला पिक अप केलं. वर फ्लॅटमध्ये तिच्या मैत्रिणी, फ्लॅटमेट्स असल्याने वर जाण्यात काहीच अर्थ नव्हता.

ती खाली आली. तीने नवा हेअरकट केला होता. कॅजुअल्समध्येही ती नेहमीप्रमाणे आकर्षक दिसत होती.
ते मॉलच्या पार्किंगमध्ये पोहचले. त्याने बाईक मुद्दाम बेसमेंटला पार्किंग भागात अगदी शेवटी एका मोठ्या पिलरच्या मागे लावली. तो सतत संधीच्या शोधात होताच.
ती चेहऱ्यावरील स्कार्फ काढत असताना त्याने आजूबाजूला  सगळीकडे दृष्टी फिरवली. कोणीही दिसलं नाही. हीच ती वेळ हाच तो क्षण! तो तिच्या जवळ गेला. तिलाही ते अगदी अनपेक्षित होतं. तो तिला किस करणार तर …
“कौन है उधर पिछे! इतना टाईम क्यू लग रहा है पार्किंग मे!”

“हा बस चाबी गिर गयी थी! जा ही रहे है!”

तिथल्या सिक्युरिटीगार्ड ने त्याचं “#मिशनचुंबन” काही पूर्ण होऊ दिलं नाही.
ती ही या सगळ्या मजेदार प्रकारामुळे हसत होती.

ते वरच्या मजल्यावर मुव्ही हॉलपाशी पोहचले. "हो हीच ती जागा! जी अजरामर होणार आठवणीत! प्रथम चुंबन स्थळ!"
कुठल्या तरी फ्लॉप मुव्हीचं तिकीट काढायचं त्याने ठरवलं होतंच.
पण सर्व चित्रपट याच आठवड्यात रिलीज झालेले.

“टू कॉर्नर सीट्स प्लिज !” त्याने काचेपलीकडील नेव्ही ब्ल्यू कॅप घातलेल्या मुलाला सांगितलं.
“सॉरी टॉपमोस्ट कॉर्नर सीट्स आर नॉट अवेलेबल!” ओन्ली एट मिडल सीट्स आर अवेलेबल!

अरेरे हे काय! ही संधीही जाते काय! बघू आत जाऊन तर!
पण काम-देवाचं नाव घेऊन त्याने उपलब्ध सीट्सपैकी दोन सीट्स बुक केल्यात.

आत संपूर्ण हॉल भरला होता. ते आपल्या सीट्स वर जाऊन बसलेत. हॉलमधील दिवे हळूहळू धूसर होत काळोखाची चादर पसरली. शेजारच्या आणि मागच्या जागेवर कोणीही नव्हतं. त्यामुळे त्याला खूप आनंद झाला. तिलाही झाला. पण त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता, ती मात्र नॉर्मल होती.

 तितक्यात एक घोळका आला. एक मोठं कुटुंब आलं. त्यात काही वृद्ध बायका माणसेही होती. ते त्यांच्या मागे पुढे रिकाम्या आसनावर जाऊन बसलेत.
त्याचा पुन्हा हिरमोड झाला.

पण तिचं अगदी निकटचं सानिध्य अनुभवताना तो रोमांचित झाला होता. त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला. बस आता वाट बघायची होती नेमक्या क्षणाची!
लोक चित्रपट बघण्यात गुंग असताना , हीच ती वेळ हाच तो क्षण , तो तिच्या अगदी निकट पोहचला. त्याने हळूच मागे वळून बघितलं तर मागे दोन म्हातारे भिंगाच्या चष्म्यातून एकटक समोर याच्याकडेच बघत होते.
तो एकदम शरमून बाजूला झाला.
संपूर्ण चित्रपट त्याने चरफडत त्या दोन मागच्या आजोबांसोबत आणि शेजारच्या सतत आवाज करणारया चिल्लर पार्टी मुलांसोबतच बघितला.

एकदाचा रटाळ चित्रपट सम्पला. दोघे बाहेर आलेत. मग मॉलमध्ये गप्पा, इकडे तिकडे फिरून झालं पण त्याला एकांत काही केल्या मिळत नव्हती. त्याचं लक्ष बाकी कश्यातच नव्हतं. तिची घरी परत जायची वेळ आली.
सगळ्यात वरच्या मजल्यावरून खाली जाताना येताना त्याच्या डोक्यात एक अजून अनप्रॅक्टिकल आयडिया सुचली. कॅप्सूल लिफ्ट ऐवजी त्याने नॉर्मल लिफ्टने खाली जायचं ठरवलं.

आह वाह संपूर्ण लिफ्ट रिकामी! आत ते दोघेच!
त्याने ‘G’ च्या लाल बटणावर दाब दिला. लिफ्ट खाली जाऊ लागली.

“बस साठ सेकंदस है तुम्हारे पास , इस साठ सेकन्ड्स में अगर तुमने किस कर लिया तो ये साठ सेकंदस जिंदगी भर तुमहें याद रहेंगे! “तो स्वतःला मनातल्या मनात बजावू लागला. ती मात्र त्याच्या या क्लुप्तीपासून अनभिज्ञ होती.
हीच ती वेळ हाच...
 त्याने तिला हळूच जवळ घेण्याचा प्रयत्न केला . तिने सरळ त्याला दूर केलं. “अरे काहीही काय सीसीटीव्ही कॅमेरा असतो लिफ्टमध्ये! ती विराट कोहली आणि अनुष्का शर्माची जाहिरात आठवत नाही का!

 ”हम्म.. त्यांचं त्या जाहिरातपासून सेटिंग जमलं ना..पण आपलं सेटिंग कधी जमणार!”
तो चरफडत स्वतःशीच बोलत दूर झाला.

ते बाईकवरून तिच्या बिल्डिंगजवळ पोहचले. तो प्रवासभर नाराज होता. खाली बिल्डींगपाशी अंधार होता. झाडे वृक्षांमुळे ते जरा आडोश्यात उभे राहिलेत. त्याला पुन्हा संधी मिळाल्याची, पुन्हा एकदा हाच तो क्षण हीच ती वेळ असल्याची भावना झाली. “वृक्षवल्ली खरंच सोयरे असतात तरुण लोकांचे नाही! !” त्याने कामदेवाचं स्मरण करून तिच्या जवळ गेला.
तेवढ्यात एक माणूस बाईक थांबवून तिथे फोन वर बोलत राहिला.

त्याची शेवटची आशाही धुळीस मिळाली.
“या देशात कोणी शांत चित्ताने एक किसही नाही करू शकत का!”

तिला तितक्यात एक फोन आला. तो नाराजीने तिला बाय म्हणत जाऊ लागला. त्याची नाराजी, दुःख तिला कळत होतं.
तिचं फोन वर एक मिनिट बोलणं झाल्यावर, चेहऱ्यावर आणि डोळ्यात खट्याळ भाव आणत म्हणाली, “आज फ्लॅटमेट्स बाहेर गेले आहेत ट्रिपला! आज रात्री कोणीही नसणार वर! तू आज रात्री राहू शकतोस! आत्ता मैत्रिणीचाच फोन होता!”

शेवटच्या क्षणाला मरणाऱ्याच्या तोंडी अमृत पडावं आणि तो पुन्हा टवटवीत व्हावा अशी त्याची अवस्था झाली.
त्याने हवेत जोरदार उडी मारली त्याने! उडी मारून हवेत मागे पायाला पाय लावण्याचा, स्टाईल मारण्याचा प्रयत्न केला . पण जमले नाही. पायात पाय अडकून आपटायचा राहिला. पण आता त्याची कसलीच तक्रार नव्हती.
"मिशन चुंबन" आज शांतपणे, पूर्ण प्रायव्हसीमध्ये पूर्ण होणार होतं.

त्याला हॉलमध्ये बसवून ती तिच्या खोलीत गेली. आता त्याला घाईगडबड नव्हती संपूर्ण रात्र त्यांचीच होती! ती काही वेळाने बाहेर आली.
तिने गुडघ्यापर्यंत वन पिस घातलं होतं. केस ओलसर होते. हलकंसं लिपस्टिक लावलं होतं.
ती अत्यंत मादक दिसत होती.
त्याने तिला जवळ ओढलं. तिच्या मानेजवळील परफ्युमचा सुगंध त्याच्या गात्रा गात्रांना, संपूर्ण संवेदनांना पुलकित..जागृत करून गेला.

तो आणखी  तिच्या जवळ गेला. तिचा चेहरा त्याने दोन्ही हाताने हलकंसा धरून तिला किस करण्यासाठी सावधान झाला! हो हो हीच ती वेळ हाच तो क्षण!

तिने त्याला दूर केलं.
“ यु गॉट प्रोटेक्शन नो?”

“भुकेला मागतो एक किस आणि देव देतो..” अशी त्याची मनातल्या मनात अवस्था झाली.

तो अगदी चेहऱ्यावर स्वतःबद्दल अभिमानाचे भाव आणून तिच्या दोन्ही खांद्याना दोन हाताने पकडत म्हणाला,
“ तु माझा हा मोबाईल बघितलास?  सहा महिने झालेत अजून त्याचं स्क्रीनकव्हर मी काढलं नाही! मी कधी हेल्मेटशिवाय गाडी चालवताना तुला दिसलो का?  नवी बाईक घेतली तेव्हा कित्येक दिवस तिचं कव्हर काढलं नव्हतं! मित्र त्याला काँडम कव्हर म्हणायचे..बाईकला व्हर्जिन बाईक म्हणायचे!  अगं प्रोटेक्शनशिवाय तर मी काहीच करत नाही! प्रोटेक्शन इज मस्ट!
रुबाबात पॅन्टच्या खिशातून त्याने प्रोटेक्शनचं पाकीट काढलं! तिला दाखवलं!

“ओह्हो”! ‘क्या बात है!”
तिनेच त्याला ओढून आपल्या खोलीत घेऊन गेली. त्याला बेडवर ढकललं. ती त्याच्या संपूर्णपणे जवळ आली..पुन्हा एकदा त्याच्या संवेदना जागृत झाल्यात..जोरदार उफाळून आल्यात..त्याला किस करण्यासाठी ती त्याच्या अगदी निकट आली.. बस्स हीच ती वेळ हाच तो क्षण!
ती त्याला किस करणार तितक्यात..
त्याने तिला थांबवलं..

“एक मिनिट! तू आज मला दुपारी भेटायच्या आधी काय खाल्लं होतं? तू जेवली होतीस का?”

“किती रे काळजी करतो माझी!
हो मी तेव्हा घरून फिश आणि चिकन करी खाऊन आले होते! आय एम फुल नाव!
त्याच्या ओठांवर बोट ठेऊन म्हणाली ,
“नाव डोन्ट टॉक ..जस्ट एन्जॉय धिस मोमेंट! वि हॅव ओन्ली वन नाईट फॉर अ लॉंग टाईम!”

त्याला किस करण्यासाठी त्याच्या चेहरा घट्ट तिने पकडला..कोणत्याही क्षणी त्याच्या आयुष्यातील त्याचं पाहिलं किस होणार होतं. दुष्काळ संपला होता. घनन घनन घन गिर जाये बदरा..पार्श्वसंगीत सुरू होतं.
आणि त्याने तिला त्याच क्षणी बाजूला केले . तो उठून बसला.

“काय तू आज चिकन खाल्लंस!
आज महाशिवरात्रीचा उपास आहे मला! मी तुला किस नाही करू शकत! माझा उपास मोडेल ना!
जातो मी! जय शंभो! महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!
बाय!

आणि तो तडक निघून गेला. तीला काही कळेनासं होऊन ती बघत राहिली!
 आज दुसऱ्यांदा शंकराने कामदेवाला भस्म केलं होतं.

समाप्त.

#किसडे #महाशिवरात्रीपेशल.
१३ फेब्रुवारी 018

-Abhijeet Panse

Wednesday 21 March 2018

रात्री उशिरा आलेला प्रीती संदेश

तीन दिवसांपूर्वी रविवारी रात्री 12 च्या जवळपास ‘तिचा’ मेसेज आला!
माझ्या हृदयात लाडू फुटलेत.
“तुला एक विचारायचंय..माझा खूप गोंधळ होतोय. काही कळेनासं झालंय मला..शेवटी न राहवून तुलाच विचारावंसं वाटलं म्हणून इतक्या रात्री मेसेज करतेय! “

माझं हृदय बगीचा बगीचा झालं…
मनातल्या मनात मी “अगं हो प्रेमॉलॉजीच्या पहिल्या धड्यात प्रेमीरुग्णाचा प्रथम पायरीवर मानसिक गोंधळ उडतो हेच लक्षण सांगितलंय!
आहहा! फायनली, वो घडी आ गयी आ गयी!
फ्रेंझोन्ड च्या दुष्टचक्रातुन सुटका होऊन माझी गुढीपाडवा ‘लवशीप’ बम्पर लॉटरी लागली तर!

“अब हमे ये दोस्ती रिश्तेदारी में बदल देनी चाहीये!” हा विचार शेवटी ती करायला लागली तर!!!!
या सर्व विचारांच्या मैफिलीत,  वसंत ऋतूतील आंब्याच्या झाडाप्रमाणे मी ही मोहरून गेलो..

“हा! विचार ना!”
मी अगदी भावनांच्या आवेगावर पूर्णपणे संयम राखत मी त्या गावचाच नाही दाखवत इतकंच विचारलं.

“तू प्लिज हसण्यावारी लाईटली घेऊ नकोस..प्लिज कोणाला सांगू नको आपल्या बोलण्याबद्दल! मी खूप सिरीयस आहे याबाबत..खूप विचार केल्यावरही काही कळेना म्हणून तुला विचारतेय..! ”

“अगं गोडूले मीही खूप सिरिअस आहे अगदी आयसीयूत आहे. “आय सी यु एव्हरी डे!”
मनातल्या मनात असं कारंजं उचंबळून येत,
“हो हो विचार तू बिनधास्त!” मी फक्त असा एक वाक्यात रिप्लाय केला.

काही क्षण शांतता. “typing.. असं काही क्षण दिसत राहिलं.. त्यासोबत तीन डॉट्स नागमोडी लयीत खालून वर वरून खाली एकाच जागी जात होते..
इकडे माझ्या हृदयाचा भावनांचा ईसीजीचा ग्राफही तसाच वरखाली होत होता.
आहह जणू माझी पहिली प्रेम कहाणी नियती ‘Typing’ करत होती..

काही क्षण वाट बघून तिचा मेसेज आला. मी शरीराचे मोराप्रमाणे सहस्त्र नयन करून तो वाचला…आयुष्यातील पहिला “प्रीती संदेश” समजून..

“मला सांग आज फायनल मॅचमध्ये विजय शंकर 19.5 व्या म्हणजे लास्ट बट वन बॉलवर आऊट झाला ना! मग त्याच्या जागी नवा येणारा बॅट्समन का स्ट्राईक वर आला नाही , दिनेश कार्तिक कसा काय आला? तो तर विजय शंकर बॅटिंग करताना दुसऱ्या एंडला, नॉन स्ट्राईकला होता! मग शेवटचा बॉल ,दिनेश कार्तिक कसा काय खेळला?”

कोणीतरी निर्दयीपणे हृदयाचा झालेला हिरवागार बगीचा रपारप उपटून काढतंय असं मला झालं.

साला उगाच क्रिकेटवर अति लिहितोय!

शहर बचाते बचाते मोहल्ला जला डाला!

मरो ते क्रिकेट !

पण आता काय करणार होतो .
आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी!
तिने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं होतं.
तिला क्रिकेटमधील एक नियम माहिती नव्हता.
तो एक महत्त्वाचा  नियम तिला समजावून सांगितला.

जेव्हा बॅट्समन कॅच आऊट होतो, तेव्हा बॉल हवेत असताना , कॅच पकडायच्या आत जर
दोन्ही बॅट्समन म्हणजे शॉट मारणारा  आणि नॉन स्ट्राईकवरील बॅट्समन एकमेकांनी खेळपट्टीच्यामध्ये क्रॉस केलं असेल किंवा नॉन स्ट्रायकर बॅट्समनने अर्धी खेळपट्टी पार केली असेल  तर तो नॉन स्ट्राईकला असणारा बॅट्समन स्ट्राईक येतो.
नवा येणारा बॅट्समन आऊट झालेल्या बॅट्समनच्या जागी स्ट्राईकला न खेळता नॉन स्ट्राईकला  जातो.

त्यामुळे आज विजय शंकरने उंच शॉट खेळून तो बाऊंडरीवर कॅच आऊट झाला खरा पण कॅच फिल्डरने पकडण्याच्या आत कार्तिकला अर्धी पिच क्रॉस करता आली. म्हणून दिनेश कार्तिक शेवटचा बॉल खेळू शकला!”

“ ओहहह असं होय का!
म्हणजे आज जर विजय शंकर किपरच्या हाती किंवा जवळच्या फिल्डरच्या हाती  कॅच देऊन आऊट झाला असता तर त्यावेळात दिनेश कार्तिकला पिचचा मध्य क्रॉस करताच नसता आला. मग शेवटचा बॉल नवा बॅट्समन खेळला असता! दिनेश कार्तिक खेळलाच नसता! आणि आपण फायनल जिंकलीच नसती! काय सांगतोस काय?!!!!
बरं झालं देवा त्याने आऊट होता होता दिनेश कार्तिकला स्ट्राईक मिळवून दिली!”

“हां किती हुश्शार गं ती बयो! बरोबर बोललीस! फक्त प्रेमॉलॉजीमध्ये ढ राहिलीस!” मी मनातल्या मनात चरफडत म्हणालो.
“जा कर आता पीएचडी त्या क्रिकेटमध्ये!”
मात्र माझं हे नैराश्य मनातल्या मनातच.

“बरं चल थंक्यु हं! झोपते मी आता! मला माझं उत्तर मिळालं!  नवीन वर्षाच्या शुभेच्छा! बाय! गुड नाईट स्वीट ड्रिम्स!”
पोरगी ऑफ लाईन गेलीसुद्धा.

इकडे नाझी अवस्था मात्र बांग्लादेश क्रिकेट टीमसारखीच झाली होती.
शेवटच्या क्षणापर्यंत मी अति आनंदात अतिआत्मविश्वासात नागीन डान्स करत होतो.
🐍 फूस…$$ फुस्स $$$ 🐍 फूस्स् फुसस फुसस $$$🐍  

पण शेवटी फुस्सस्सस्सस्सस्सस्ससस~~~~~~~~~नागोबा झोपला.

ओमफस स्वाहा!

-अभिजीत पानसे

Monday 12 March 2018

सौंदर्याची मांदियाळी

चीनमधील लोकांच्या चेहऱ्याची एक ठराविक ठेवण , मुद्रा ,Countenance असतं.
युरोपियन विविध देशातील लोकांच्या चेहऱ्याचीही विशिष्ट ठेवण असते. पण ही सर्व विविधता ही त्या त्या देशानुसार असते. एक भारतच असा देश आहे..असावा की जेथे राज्यांतर्गत स्त्री सौंदर्यात विविधता आढळते.

#केरळी स्त्री:- सावली सलोनी तेरी..तरतरीत कांती..शिडशिडीत बांधा..खोल डोहासारखे पण पाणीदार काळे डोळे बहुतेकवेळा..डोळ्यांत काजळ नसलेली केरळी मुलगी सहसा दिसणार नाही..सौष्ठव मादक..भरीव ओठ..

चुणचुणीत, हुशार  आणि मादक सौंदर्य..

द्राक्षांपासून, फळांपासून बनलेली मदिरा काळानुसार जसजशी तेज, झिंग चढवणावरी, हळूहळू मादक होत जाते तसं हे केरळी दाक्षिणात्य सौंदर्य हळूहळू मादक होत जातं..मुरत जातं..

#दिल्लीकीलडकी:- तोफ! तडका! न्यूक्लिअर बॉम्ब! ज्याच्यावर पडेल तो बेचिराख! गौर..गव्हाळ वर्ण.

कमालीची आक्रमक..दर दोन वाक्यानंतर फकफकाटाचा उच्चार!

दिल्लीची मुलगी ही मुंबईच्या मुलीबद्दल ‘बिचिंग’ करतेच, असे म्हणतात. मुद्दा हाच की फॅशन प्रथम दिल्लीतून मुंबईकडे आणि देशभरात पसरते की प्रथम मुंबई नंतर दिल्ली मग देशभर..

कोणतीही मूळची ‘हॅपनिंग’ दिल्लीची मुलगी सतत फॅशन प्रथम मुंबईत नाही तर दिल्लीतच जन्म घेते हेच म्हणत राहील.

चेहऱ्यावर तोडू अॅटिट्युड..प्रचंड ट्रेंडी, फॅशन कॉन्शस..

आत्मविश्वासाने सिगारेट , काळी जाडी सिगार ओढताना सहज दिसेल. दारूचा नियमित क्वचित ड्रग्सचाही स्पर्श झालेली असते.

#तमिळ_मुलगी..स्त्री:- सावली सी एक लडकी..धडकन जैसे दिल की…बुद्धीने हुशार! ब्रेनी ब्लॅक ब्युटी!

पिवळ्या रंगाची प्रचंड आवड..संपूर्ण तामिळनाडू विशेषतः चेन्नईत पिवळ्या रंगाचं प्रभुत्व आढळतं..

चेहऱ्यावर हळदीचा रंग स्पष्ट दिसतो.

पौगंडावस्थेतील मुलगी ते तरुण मुलगी ते मध्यमवयीन स्त्री ते वृद्ध स्त्री असो, हळदीचा पिवळा रंग चेहऱ्यावर आढळतोच.

चेन्नईला वा तामिळनाडूला भारतातील दुबई म्हणावंसं वाटतं मला ..

गळ्यात, हातात, बोटात सोनं चमकत असतंच.. “ऑल ग्लिटर्स ..” “सर्वच चमकणारं सोनं नसतं” ही म्हण तामीळ स्त्रियांसाठी लागू नाही होत..इथे अंगावरील सर्वच चमकणारं सोनंच असतं..लोकल ट्रेन्स वा बसमधील गर्दी असो सोनं अंगावर ,गळ्यात बिंधास्तपणे हिंदळत असतं..बोटात घट्ट बसलेलं असतं..

कपड्यांसंबंधित फॅशनबाबत जरा उदास वृत्तीच आढळते. हां ती मुलगी स्त्री कोडमबक्कमची असेल तर तिथे फॅशन सेन्स असलेली, आखूड कपड्यात आढळू शकते.

#गुजराती_मुलगी:-  नाजूकनार , नितळ त्वचा..कोणत्याही प्रकारचे कपडे ‘कॅरी’ करू शकते..फॅशनेबल, ट्रेंडी असतेच असते.. पण फाफडा ढोकळा मुळे सतत तूप, वनस्पती तुपाची, तेलाची आहूती पोटात टाकत असल्याने गुजराती स्त्री मध्यमवयात बहुतेकवेळा पातळ ठेपल्यापासून स्पंजी ढोकळा बनते..

#बंगाली_स्त्री:- आहाह! बॉंग्स! गौरवर्णीय..श्यामलवर्णीय सुद्धा..

...डोळे निर्मात्यानेच काजळ लावून पृथ्वीवर पाठवलेत असे अमावस्येच्या काळ्या रात्रीसारखे काळेशार डोळे ..तर कुठे डोळ्यांतून रात्री पोर्णिमेचं चांदणं शिंपडत जाईल असे पिंगट पण पाणीदार डोळे..

आयुष्यात एकदातरी बंगाली गर्लफ्रेंड असावीच..त्याची लज्जत काय ती “बंगाली जादू” अनुभणाराच जाणू शकतो.

दहापैकी नऊ बंगाली घरात संगीताचे सूर आळवताना ऐकू येतील. साहित्य..संगीत..अभिनय..कलाभिव्यक्ती बंगाली सहसा असतेच. वैचारिकरित्या आधुनिकता , बोल्डनेस हे बंगाली मुलीचे गुण..

पण एक नकारात्मक गोष्ट बंगाली स्त्रीमध्ये बहुतांशवेळी आढळते ती म्हणजे अस्वच्छता..गचाळ राहणे..स्वतःला जितकं नीटनेटके ठेवतात, तो नीटनेटकेपणा घरात आढळेलच असे नाही.

गोल चेहरा, चौकोनी , षट्कोनी चेहरा सर्व विविधता..

सततच्या संदेश, रोशोगुला खाऊन शरीराने गुबगुबीत होतातच..

बंगाली स्त्री म्हणजे नितळ कांतीची मासोळीच! मासोळीशिवाय या जल बिन मच्छी अवस्था होतेच.

#हरियाणवीस्त्री:- उंच..काटक..कामात वाघीण पण वैचारिकरित्या बरेचदा काहीशी जुन्या विचारांची..

चेहऱ्यावर वाढत्या वयात एक प्रकारचा करारीपणा, काहीसा पुरुषीपणा येत जातो..

सर्व परंपरा..चालीरीती पळणारी..गाई म्हशीचं दूध काढणारी..शेणाच्या चपट्या मोठ्या गौऱ्या घराच्या भिंतीवर थापणारी..मध्यमवयीन वा सुरकुत्यांचं जाळं चेहऱ्यावर असलेली वृद्ध स्त्री अंगणात खाटेवर बसून किंवा उंबरठ्यावर बसून हुक्का ओढताना सहज दिसेल.

हरियाणवी मुलगी जर दिल्लीला गेली..मग तिचं उफाड्या बांध्याचं सौंदर्य..व्यक्तीमत्व एक दोन वर्षात असं उफाळून येतं की बघणारा थक्क होईल.

#तेलुगू स्त्री: दिल्लीवरून कधी सेंट्रल रेल्वेने दक्षिणेकडे गेलं की जनरल बोगी सोडल्यास कोणत्याही डब्यात हलक्या..दाट होत चाललेल्या सावळ्या  सौंदर्याची उधळण दिसेल. यात जास्तीत जास्त तेलुगू किंवा तामिळ सौंदर्य असतं. दक्षिणेकडे जाणाऱ्या सेंट्रल रेल्वेचा रस्ता बहुतांश भाग आंध्र आणि तेलंगणातुन जातो. त्यामुळे तेलुगू मुलगी यात असतातच.

हातात कुठलंतरी पुस्तक ..चेतन भगतचं, रविंदर सिंगचं “कॅन लव्ह हॅपन ट्वाइस”..” आय टू हॅड लव स्टोरी” यासारखं एखादं पुस्तक वाचत राहील..

मग यात तामिळ की तेलुगू मुलगी कशी ओळखायची?

“चाय चाय..” म्हणत चहा विचारणाऱ्याकडून पॅन्ट्रीवाल्याकडून सहज चहा मिळाला तर जी चहा घेते कॉफी असेल तर कॉफी विकत घेते ती “तेलुगु कन्या”..

पण जी चहाविकणाऱ्याला ‘काफ्फी’ विचारते आणि त्याच्याकडे कॉफी नसेल तर त्याला सरळ ‘इल्ले’..’ना’ म्हणून कॉफीवाल्याची वाट बघते..आणि मग हातात काफ्फी आल्यावर तअमृततुल्य समजून पृष्ठयाच्या कपातून कॉफीचा घुट घेते..आणि ती पाणचट कॉफी..काळं पाणी पिऊन तोंड नाक मुरडत, सोबत कोणी असल्यास ‘इल्ले ..काहीतरी न कळणाऱ्या भाषेत ‘कॉफीबद्दल’ नाराजी व्यक्त करणारी ‘तामिळ’ मुलगी असते.

तेलुगू मुलगी विजयवाड्याची असेल तर ती इतर तेलुगू लोकांच्या भाषेतील चूका काढते.

विजयवाड्याची तेलुगू प्रमाण, शुद्ध तेलुगू मानली जाते.

#उत्तरप्रदेशची_मुलगी:- मांग भरो सजनाला अगदीच गांभीर्याने घेणारी, कपाळापासून सुरू होऊन, डोक्याच्या मध्यभागातून केसांतून जाणाऱ्या अरुंद पायवाटेवर शेंदुराचा..कुंकवाचा सडा टाकलेली स्त्री..

डोक्यावर पदर..कुंकू कपाळावर..ठाशठशीत मंगळसूत्र ..आणि सतत बडबड...पूर्व उत्तर प्रदेशी लोक आणि पश्चिम उत्तर प्रदेशी यांच्यातही थोडा फरक असतोच..पण तो राहणीमान..खानपानात..कृष्ण राधा भक्त पूर्व युपीमध्ये तर शंकर भक्त स्त्रिया पश्चिम युपीकडे बहुतेक दिसतात..बोलण्यातही त्या अनुषंगाने शब्द येतात.

#ओरिसातील स्त्री:- ‘रोशोगुल्ला’ या मधुर सुखाची निर्मिती प्रथम पश्चिम बंगालात झाली की ओरिसात हा वाद दोन्ही राज्यांच्या लोकांमध्ये, हलवायांमध्ये वर्षांनुवर्षे सुरू आहे. त्याला अंत नाही. तसेच उडिया मुलगी सुंदर की बंगाली हाही प्रश्न पडावा कदाचित..

चेहऱ्यापेक्षाही इतर शरीरसौष्ठव सर्वांगाने परिपूर्ण..प्रमाणबद्ध ..हवे तिथे योग्य प्रमाणात मोठे

उभार..कमनीय बांधा..हत्तीणीची चाल..

#कन्नडस्त्री: सावळा वर्ण..पण  मांजरीच्या काळ्या पिल्लात अचानक एक  वेगळं शुभ्र पिल्लू जन्मावं..तसं एखादी गौर वर्णीय कन्नड मुलगी..स्त्री..दृष्टीस पडते.

मुंबईहुन दक्षिणेकडे जाणाऱ्या , वेस्टर्न रेल्वेत कानडी सौंदर्य हमखास बसलं असतं.

केसांत गजरा माळनारी मुलगी , स्त्री महाराष्ट्रात दिसणे आता कालबाह्य ..पण बंगलोर स्टेशनपासून , शहरात, गावांत अजूनही मोगऱ्याचा, वेगळ्या श्वेत पुष्पांचा गजरा माळताना ती दिसेल.

केसांत..वेणीत गुलाबाचं फुल माळणारी एखाद दुसरी उत्साही वृद्ध स्त्री महाराष्ट्रात, पुण्यात दिसेल. पण कर्नाटकात महाविद्यालयीन कुमारी ते सर्वच वयोगटातील स्त्रिया वेणीत गुलाबाचं फुल माळलेली दिसते.

कपाळावर काहीसं काळपट लाल कुंकू लावलेली स्त्री..त्याखाली पांढऱ्या भुकटीचा एक ठिपका..

मुलगी कपाळावर छोटी ते जाडी काळी टिकली…

भुवयांखाली पांढरा ठिपका असतो.

#काश्मिरी स्त्री:- भारतातील ज्या भागातील स्त्री सौंदर्याची सगळ्यात जास्त गोडवे गायले गेले आहेत ते म्हणजे काश्मिरी सौंदर्य..

युरोपियन Countenance , लांब उभा चेहरा..आणि विषववृत्तापासून दूर असल्याने  फक्त गौरवर्णीय..कुठे गुलाबी तर कुठे निस्तेज पिवळसर पांढरी फटक त्वचा..

जॉ लाईन अगदी शार्प..चिक बोन्स स्पष्टपणे दिसतात.

पण तरीही काहीसं एकसुरी सौंदर्य..

कदाचित तेथील कडवी पुरुषप्रधान संस्कृतीमुळे.. ताणामुळे छोट्या बालवयातील मुली सोडल्यास मनमुराद हसताना, खिदळताना काश्मिरी तरुण मुली सहसा दिसत नाही. म्हणूनच त्या तितक्या सुंदर वाटत नाही.

जम्मू भागात असतं पहाडी डोगरा सौंदर्य..प्रकृती..

एकवेळ इंग्लंडच्या राणीचे हात उघडे दिसतील पण तरुण काश्मिरी मुलीचे केस सार्वजनिक स्थळी दिसणे अशक्य.

चष्मा लावलेली काश्मिरी मुलगी दाखवा आणि बक्षीस मिळवा. मासे खाल्ल्याने डोळे चांगले राहतात याला साफ खोटं पाडतात काश्मिरी कन्या!
आहारात मासे फार कमी असतात , चिकन मटण जास्ती.

सारं सौंदर्य काळ्या, पांढऱ्या पडद्याआड.

पण हीच काश्मिरी मुलगी जेव्हा दिल्लीत जाते किंवा विदेशात जाते..तिच्या व्यक्तिमत्वाला वेस्टर्न टच मिळतो, तेव्हा हे काश्मिरी सौंदर्य, आषाढात सतत ढगाआड असलेला चंद्र, पौर्णिमेला अचानक रात्री काही वेळासाठी ढग दूर होऊन लक्ख चमकायला लागतो तसं हे काश्मिरी तारुण्य मग रसरशीत होतं.

#सिंधी गर्ल:- सिंधी मुली फार हॉट! बोल्ड! आधुनिक! हुशार ही असतात.
फक्त प्रॉब्लेम हा की काही काळाने सर्वच सिंधी स्त्रिया , रोजच्या खाण्यापिण्याच्या पद्यतीमुळे जाड होतात शिवाय काही वर्षांनंतर एक ठराविक लुक यांच्यात दिसतो.

#त्रिपुरातील_त्रिपुरसुंदरी- या ईशान्य राज्यात बंगालीच जास्त असल्याने येथील स्त्रिया बंगाली स्त्रियांसारख्याच…

मोठा चेहरा....कपाळ..रुपयायेवढ रक्तलाल कुंकू..साडीत भारदस्त दिसतात.

#राजस्थानी स्त्री:- येथे फार विरोधाभास आढळतो. शहरी भागातील राजस्थानी स्त्रिया, मुली आधुनिक विचारसरणी..कपड्यात वावरतात.
पण तेच गावांतील, वाळवंटातील स्त्री, मुलगी मात्र अजूनही बाल विवाह, घुंगट प्रथेत अडकली आहे.
राजस्थानी सौंदर्य हे नाजूक ,  आणि काटक असतं. वळवंटातील आदिवासी राजस्थानी स्त्री पाण्याच्या अत्यन्त निकडीत कशी राहते हे माहिती असेल तर यांच्याबद्दल फार आदर वाढतो.

#अरुणाचली:- आयडंटिटी क्राययसिसमध्ये अडकलेल्या काहीश्या..चीन म्हणतं अरुणाचल आमचा..
कागदावर नॅशनल आयडंटिटी भारतीय..
पण देशात ज्या मुखकमलावर प्रथम सूर्याची किरणं पडतात, गोल, छोट्या डोळ्यांचा, नाजूक चेहरा प्रथम उजळून निघतो त्या अरुणाचली मुली...
मंगोलियन contenance..

#बिहारी स्त्री: - पश्चिम उत्तर प्रदेशी स्त्री आणि बिहारी स्त्रीमध्ये खुपसा फरक नसतो. ठराविक भारतीय चेहरा.

केसांतून मधोमध जाणाऱ्या पायवाट केशरी..लाल रंगाने भरलेली असते. मुली ,बायका खाण्यापिण्यात कसली गय करत नाही. डायटिंग, फॅशन्स वगैरे त्यांच्यासाठी नसतं जणू. एखादीच माझी आवडती “नेहा शर्मा “😍 यांच्यात निघते.

गंगेच्या खोऱ्यात भरपूर पिकतं. सगळं काही खातात.

आणि सतत बडबड करतात.

#हिमाचल_उत्तराखंडीय_स्त्री:  काश्मीरला लागून असूनही चेहऱ्याची ठेवण अगदी वेगळी.

रंग खूप काही गौरवर्णीय असेलच असेही नाही. पण तंदुरुस्त बायका. पहाडी प्रकृती.. सौंदर्य.

#मध्यप्रदेश :- लावण्यवती..कुठेही ,कसेही एकरूप होणारी मुलगी.. नाजूकनार ते मजबूत प्रकृती सगळं काही इथे..

शिवपुरीपासून संपूर्ण मध्यप्रदेशात हिंदी स्त्रीच्या.. भाषेच्या सौंदर्यात चिंब भिजता येतं.

#नागालँड_मणिपूर_मेघालय_मिझोरम :- नागालँड, मणिपूर , मिझो यातील स्त्रिया मंगोलिन countenance , मुद्रेकडे स्पष्टपणे वळलेले दिसतात.

छोटे डोळे बसकं नाक..काहीसा गोल चौकोनी चेहरा..

पण हे ईशान्येकडील पहाडी, जांगल सौंदर्य जबराट असतं.. स्वावलंबन, आधुनिकता मनात असते. ती बाहेर येते जेव्हा ईशान्य पहाडी सौंदर्य दिल्लीत येतं. मिनी स्कर्टस , शॉर्टस सगळं काही सहज कॅरी करतात. चेहऱ्यावर माज नसतो पण आत्मविश्वास असतो. पण दिल्लीतील काही नीच लोक यांना त्रास देतात. त्यांना भारतीय समजत नाही. त्यामुळे कुठेतरी यांच्या मनात राग असतो. बारीक डोळे..गुलाबी ओठ..शरीर सौष्ठव आग लावणारं…विरघळवणारं...

#पंजाबी_मुलगी:- ओहह डिअर! आहह ! विस्तव! आतून धगधगता लावा..ज्वालामुखी… जाळ..निखारे..धूर मात्र इतरांचा काढतात..

लहानपणी प्रत्येकाने काढलेलं चित्र, दोन मोठ्या टेकड्यातुन निघालेला सूर्य..मधून वाहणारी निमुळती नागमोडी नदी….याचं मानवी रूप म्हणजे सुर्यमुखी पंजाबी मुलगी...स्त्री..

उफाडा बांधा..गौरवर्ण...धडधाकट प्रकृती..आक्रमकता आणि बोल्डनेस.. ट्रेंडी..फॅशन कॉन्शस..

बंगाली मुलगी आणि पंजाबी मुलगी दोघीही बोल्ड असतात..पण बंगाली मुलीत, स्त्रीमध्ये चिंतनातून बहुतेकवेळा लिबरल विचारांचा प्रभाव, साहित्य कला यांच्यातुन आलेला कलात्मक बोल्डनेस, उत्तानता असते.

तर पंजाबी मुलीत धसमुसळेपणा , जास्त विचार न करण्याची वृत्ती..लाऊडनेसमधून आलेला बोल्डनेस असतो.

पण जेवणात रोजचं तूप, परोठे , तेल , मैदा मुबलक असण्यामुळे काही काळानंतर याही जाड होतात.

#गोवन_पोर :- लवली ब्रेनी गर्ल्स! येथे कोंकणी..पोर्तुगीज..मराठी सर्वांचं मिश्रण दिसतं.

कुठे स्वतंत्र बाणा तर कुठे दत्त, मंगेश भक्ती..बुद्धीने

हुशार असतात.

मूळची गोवन कन्या आयुष्यभर स्लिम ट्रिमच राहते.

#जयजयमहाराष्ट्रमाझा:- जशी संपूर्ण देशात सौंदर्यात विविधता आढळते तशी महाराष्ट्रातसुद्धा.

वैदर्भीय सौंदर्य विविध कथा , ग्रंथात वर्णलेलं आहे.
नागपुरी पोरी! वाहह! त्यातही पश्चिम नागपूरच्या मुली! नागपूरी सौंदर्य आणि बुद्धिमत्ता खरंतर नीट महाराष्ट्रात पोहचलं नाही..कुठल्यातरी टुकार सिरियलमधून काहीतरी असत्य दाखवत राहतात.

#पश्चिमनागपूरची गर्लफ्रेंड पटवणे जगातील काही अत्यन्त कठीण कामांपैकी एक! चेहऱ्यावर यं अॅटिट्युड! डोक्याने जबरी हुश्शार! जगाच्या पाठीवर कुठेही फिट होतील!

 सोलापूर भागात गेल्यास आंध्र सौंदर्याचा स्पर्श होत गेलेला जाणवतो. गौरवर्ण ते सावली सलोनी सगळंच या भागात…

हिमालयातील उंच देवदार वृक्ष दिसण्यापूर्वी वरवर जाताना समुद्रसपाटीवरील जाड गलेलठ्ठ वृक्ष हळूहळू उंच होत जातात, मधल्या संक्रमण अवस्थेतील वृक्षांवर समुद्रसपाटीवरील आणि उंचावरील देवदार दोन्हींच्या छटा दिसतात, तश्या  मिरजेकडे गेल्यास मराठी आणि कन्नड यांचं सुरेख मिश्रण दिसतं. चटपटीतपणा जाणवतो.

‘सातार’कडे सहयाद्रीच्या डोंगर दऱ्यात हुंदडणाऱ्या क्लिकी मुली... चेहऱ्यावर स्ट्रीट स्मार्टनेस..चुणचुणीत असतात. सहज कोणालाही प्रेमात पाडतात.

रत्नागिरी कोंकणकन्या: गौरवर्णी..श्यामवर्णी..येथे सौंदर्याची मांदियाळी…

पिंगट डोळे..कुठे निळेशार नयन ही दृष्टीस पडतात. त्या निळ्या तळ्यात हरवून जायला होतं.

जरा ‘कंजूषपणा’ कमी केलात तर आणखी प्रेमात पाडतील या..😝

मुंबई गर्ल्स:- हुश्श! या अगदी हॅपनिंग! हा स्वतंत्र मोठा विषय..
येथे  मिसळ आढळते.

मी #पुण्यातील सौंदर्य बघण्याचा प्रयत्न खूप केला  खरा पण मला इथे #ISIS ‘इसिस’ चा फील आला. काश्मीरमध्ये मुलीचे केस दिसत नाही पण चेहरा कमीतकमी कुठेतरी दिसतो. पण पुण्यात स्त्रीवादी “पडदा पद्दत” आहे. पामर पीडित पुरुषांनी याविरोधात संघर्ष करायला हवा!
त्यामुळे मी काही यावर भाष्य करू शकणार नाही.

पण काही पुणेरी मैत्रिणींचं म्हणणं आहे की पुणेरी मुली सुंदरच! #Class_apart! “पुण्यातल्या मुलींबद्दल चांगलंच लिही, नाहीतर परिणाम गंभीर होतील!” अश्या धमक्यांचे फोन सतत मला येताहेत. म्हणून त्या अविश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार , डोक्याला बंदूक लावलेली आहे म्हणून म्हणतो , “पुण्यातल्या मुली सुंदर!”

महाराष्टट्रीय मुलगी काहीही कॅरी करू शकते. पाश्चिमात्य कपड्यात ती तितकीच ‘हॅपनिंग’ दिसते..साडीत, नऊवारीत जातिवंत सौंदर्यवती ही दिसते. भारताबाहेर गेल्यास तिथेही सहज एकरूप होऊ शकते.  मराठीपणाही जपते.

पुरणपोळी ते पिझ्झा ..वरणभात ते पास्ता ..ते हॉट बिर्यानी सर्व ‘लुक्स’ पैलू महाराष्ट्रीयन स्त्रीत असतात.

अश्या प्रकारे विविध रूपाने नटलेल्या सौंदर्यावान देशाचा मला अभिमान आहे..त्या विविध सौंदर्याचे  रूपरस ग्रहण करण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव...जाऊ दे पुढे नको काही लिहायला. वेगळाच अर्थ निघायचा.

पण सर्व स्त्री सौंदर्य , व्यक्तिमत्त्व विविधतेत एक साम्य आहे ते म्हणजे सर्व इंडियन ब्युटी आहेत. ( 'गॉसिपिंग'  हे साम्य लिहिण्याचं टाळलं.)

#जागतिकमहिलादिन

- © Abhijeet Panse

Thursday 8 March 2018

*फिरुनी नवे जन्मेन मी*

          *फिरुनी नवे जन्मेन मी*

27 मार्च 2016ला केरळ एक्सप्रेसमध्ये दिल्लीहून सकाळी अकरा वाजता बसलो. आवडती साईड लोवर विंडो सीट मिळाली होती. गाडी झांशी शहराबाहेर काही मिनिटांसाठी थांबली. समोर उंचावर झांशीचा किल्ला खिडकीतून दृष्टीसमोर होता. खिडकीच्या बाहेर रुळांजवळ छोटंसं तळं होतं. सूर्यास्त व्हायला पाऊण एक तास बाकी असेल. सूर्य झांशीच्या किल्ल्याच्या मागे दडत होता. त्या पिवळ्या केशरी प्रकाशात, चमकणाऱ्या पाण्याच्या मागे किल्ला अंधारात राकट काळा दिसत होता.

त्या दिवशी वर्ल्डकपमधील सेमी फायनल , भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया डू ऑर डाय मॅच होती.
एरवी मी मॅचचे अपडेट्स घेत बसलो असतो. पण माझ्या डोक्यात तेव्हा वेगळे विचार सुरू होते.

इतर कोणत्याही दिवशी समोर किल्ला दिसत असता तर  मी मनाने, कल्पनेने राणी लक्ष्मीबाईने किल्ल्यावरून कशी अश्वउडी घेतली असेल याची कल्पना मी करत राहिलो असतो. पण त्या दिवशी झांशीच्या किल्ल्याकडे बघताना एका वेगळ्याच ‘व्यक्तीची’ आठवण मला येत होती. त्याच व्यक्तिबद्दल माझ्या मनात आदल्या दिवशीपासून विचार सुरू होते. मित्राला 'त्या' व्यक्तीबद्दल एक वाक्य ही बोललो होतो..आणि काय आश्चर्य डोळ्यासमोर तेव्हा झांशीचा किल्ला होता. गाडी थांबलेलीच होती.

डोळ्यासमोर व्यक्ती येत होती ती “अरुणिमा सिन्हा”.

23 वर्षाची ही नॅशनल व्हॉलीबॉल खेळाडू मुलगी 12 एप्रिल 2011ला घरून दिल्लीला नोकरीच्या मुलखतीसाठी निघाली. सगळ्यांच्या शुभेच्छा घेऊन घरातून निघताना तिच्या घरच्यांना किंवा तिलाही कल्पना नव्हती नियतीने तिच्यापुढे काय वाढून ठेवलंय.

लखनऊहुन ती पद्मावती एक्सप्रेसमध्ये जनरल डब्यात चढली. रात्री डब्यात काही तरुण हातात चाकू घेऊन डब्यात घुसले. सगळयांना धमकावून जे मिळेल ते लुटू लागले. कोणत्याही प्रवाशाने विरोध केला नाही.

तिच्या गळ्यात सोन्याची चेन होती.
ते दरोडेखोर तिच्याजवळ आलेत. एकाने तिला चेन देण्यासाठी दरडावले. दुसरा तिच्या गळ्यापाशी हात नेऊ लागला.

तीने विरोध केला. ती म्हणाली ,”मैं अपनी चेन नही दुंगी!”

ती विरोध करू लागली. एकाने तिच्या पोटावर लाथ मारली. तिच्या गळ्यातील चेन ओढून घेतली. पण ते पिसाळले होते. कोणीही विरोध करत नसताना एक मुलगी आपल्याला विरोध करतेय हे त्यांना पचलं नाही. ट्रेन भरधाव सुरू होती. त्या नीच उलट्या काळजाच्या लोकांनी तिला ओढत दरवाज्यापाशी नेले आणि भरधाव वेगातील रेल्वेतुन बाहेर ढकलून दिले.

रात्रीची वेळ..ती जोराने आदळली. कंबरेपासून पायाचे  हाड मोडलेत. चेहऱ्यावर जखमा..ती जिथे आदळली त्याला लागून दुसरा रेल्वेमार्ग होता. दुसऱ्या ट्रॅकवरील रुळांवर तिचा पाय होता. तिने उठायचा प्रयत्न केला. पण ती उठू शकली नाही. पाय हलत नव्हता. समोरून एक रेल्वे त्याच ट्रॅकवरून येत होती. ती तिच्यापायांवरून गेली. रात्रभर रेल्वे येत जात होत्या. रुळांखालील उंदीर तिचे पाय, केस कुरतडत होते. रेल्वेतील मलमूत्र तिच्या चेहऱ्यावर, अंगावर पडत होतं. बऱ्याच वेळानंतर तिची शुद्ध हरपली.

एका प्राथमिक आरोग्य केंद्रात तिला भरती करण्यात आलं आहे. हे तिला जाणवलं. सकाळी कोणालातरी ती ट्रॅकवर पडलेली, भेसूर अवस्था झालेली दिसली.

तिचा पाय कापण्याचा निर्णय झाला. तिच्या समोर तिचं व्हॉलीबॉल करिअर संपताना तिला दिसत होतं.

“सर अपने पास क्लोरोफॉम नही है!” तिच्या कानी कोणाचेतरी शब्द पडलेत. लवकरात लवकर, विष पूढे जाण्यापूर्वी पाय कापणं गरजेचं होतं. तिने डॉक्टरांना स्वतः सांगितलं “मी रात्रभर इतक्या वेदना सहन केल्या आहेत की आता मी हे सुद्धा सहन करू शकते. तुम्ही क्लोरोफॉर्मशिवाय माझा पाय कापा..!”

तिचा पाय कापण्यात आला. क्लोरोफॉमशिवाय.त्याही वेदना सहन केल्या तिने. काय मानसिक अवस्था झाली असेल तिची त्या वेळी! शारीरिक वेदना तर सहन करण्यापलीकडे होत्या.

त्यानंतर तिला दिल्लीत एम्स हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. या काळात मीडियाने अत्यंत नीच आरोप करत तिलाच दोषी ठरवू लागले. “अरुणिमाकडे तिकीट नव्हतं म्हणून तिनेच बाहेर उडी मारली” अश्या बातम्या वर्तमानपत्रात, न्यूज चॅनल्सवर आल्यात.

ती आतून तुटत होती..मरत होती. त्यावेळी तिने एम्स हॉस्पिटलमध्ये स्वतःपुढे एक विलक्षण एम ठेवलं.  आयुष्यातील सगळ्यात मोठी खेळी खेळण्याचं ठरवलं!

तिने ठरवलं “माउंट एव्हरेस्ट” सर करण्याचं!

सगळयांनी तिला मूर्खात काढलं. अरुणिमा या अपघातामुळे ठार वेडी झालीये लोक म्हणू लागले.

सामान्य लोकांना, हिशोबी, सुरक्षित जगणाऱ्यांना हे माहिती नसतं की वेडे लोकच इतिहास घडवतात. क्रांती घडवतात. वेगळी पाऊलवाट तयार करतात.

अरुणिमा सिन्हाला कृत्रिम पाय लावण्यात आला.
ती हॉस्पिटलमधून भावासोबत मच्छीन्द्र पाल यांना बिहारमध्ये भेटायला गेली. “मच्छीन्द्र पाल” या प्रथम भारतीय स्त्री माउंट एव्हरेस्टवीर आहेत.

त्यांनीही तिला प्रथम विरोध केला. पण अरुणिमाची जिद्द बघून त्या म्हणाल्या ,” तू आधीच तुझ्या मनात एव्हरेस्ट सर केलंय! आता फक्त लोकांना ते दाखवायचं शिल्लक आहे!

त्यांनी तिला पूर्ण पाठिंबा दिला. पण कर्म तर तिचं तिलाच करायचं होतं.

भारतात एकूण चार केंद्र सरकार आणि संरक्षण मांत्रालयाखाली येणारे पर्वतारोहन केंद्रे आहेत.

येथील प्रशिक्षण किती कडक आहे हे ट्रेकिंग ग्रुप्स सोबत मजा मस्ती करायला, सेल्फी काढायला जाणाऱ्या लोकांना कळू शकणार नाही.

या चारमध्येही सगळयात कडक आणि कठीण दोन केंद्रे, दार्जिलिंगचं आणि उत्तरकाशीचं जवाहरलाल नेहरू पर्वतारोहन केंद्र .

अरुणिमाची रवानगी उत्तर काशीच्या केंद्रात झाली. अत्यन्त कठीण ,कडक प्रशिक्षण सुरू झालं. चालताना ती सगळ्यांच्या मागे राहायची कारण मध्येच पाय मांडीतून निघून जायचा. तिला खूप उशीर होऊ लागला. ती तीन ते चार तास उशीर व्हायचा.  पायातून रक्त यायचं.

या केंद्रात एक नियम असतो, संध्याकाळी प्रशिक्षण आटोपल्यावर प्रत्येकाला स्वतःच्या पायाचे निरीक्षण करायला सांगितलं जातं. कारण पायाला बारीक फोड ज्यांना ‘ब्लिस्टर्स’ म्हणतात, ते आले असतील तर प्रशिक्षण बंद करायला सांगतात. कारण ते खूप धोक्याचं , सेप्टिक होण्याचा धोका आणि वेदनादायी असतं.
मी हा कोर्स केला असल्याने मला याची संपूर्ण जाणीव आहे.

अरुणीमा सिन्हाच्या पायातून तर रक्त येत होतं. ती सतत मांडीतून कृत्रिम पाय काढायची ,रक्त पुसून पुढे चालायची.

तिने दुसऱ्या दिवसापासून ठरवून टाकलं की काहीही होवो आता पाय काढून बघायचा नाही.
वेदना सहन करत चालत, हळूहळू तिची प्रगती होऊ लागली. जबरदस्त इच्छाशक्तीच्या बळावर ती प्रथम येऊ लागली. सगळेजण थक्क झालेत तिच्या इच्छाशक्तीपुढे.

“अरुणिमा तुम क्या खाती हो?” विचारू लागलेत.

अरुणिमाचं एक महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण झालं. परीक्षा A ग्रेडने पास झाली.
आता लक्ष होतं ‘एव्हरेस्ट’. या पृथ्वीवरील सगळ्यात उंच जागा! टॉप ऑफ द वर्ल्ड!

“टाटा स्टील”कडून तिला प्रायोजकत्व मिळाले. आणि अरुणिमा निघाली नेपाळकडे.

काठमांडुला पशुपतीनाथाचं दर्शन घेऊन दुसऱ्या  दिवसापासून तिची चढाई सुरू झाली. शेर्पा तिच्या मदतीला होता. पण जेव्हा त्याला अरुणिमाच्या पायाबद्दल कळलं, त्याने एका अपंग मुलीसोबत जाण्यास नकार दिला. अरुणिमाने विनवण्या करून शेर्पाला राजी केले. ती म्हणाली तुम्हाला कुठेही जाणवणार नाही की तुम्ही एका अपंग मुलीसोबत चाललाय.

काही दिवसांच्या चालण्यानंतर , संकटं झेलत ,मृत्यूच्या दाढेतुन वाचत ती शिखरापासून काही मिनिटांवर येऊन पोहचली. रस्त्यात अनेक प्रेते दिसलीत. तेव्हा तिच्या समोर एक जर्मन पर्वतारोही पाय घासून मरताना दिसला.

एका ठिकाणी बर्फावर रक्त सांडलेलं दिसलं. पुनः काही प्रेते दिसलीत.
त्या सर्व प्रेतांना ओलांडून ती समोर गेली.
आणि शेवटी एव्हरेस्ट शिखर सर केलं..

एप्रिल 2011ला तिचा अपघात झाला आणि 21 मे 2013ला सकाळी 10 वाजून 55 मिनिटांनी ती पृथ्वीवरील सर्वात उंच जागेवर उभी होती. शी वॉज अॅक्च्युअली ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड.

पण…

पण अजूनही एक फार मोठं संकट बाकी होतं. तिचा प्राणवायू संपत आला होता. तिला जाणीव झाली होती की  ती जिवंत परत जाऊ शकणार नाही.

म्हणून किमान जगाला आपला व्हिडीओ दिसावा म्हणून  तिने शेर्पाला कॅमेराने तिला चित्रित करायला सांगितलं.

शेर्पा तिच्यावर प्रचंड चिडला. आणि मला तुझ्यासोबत मरायचं नाहीये असं म्हणाला. कारण परिस्थिती खूप बिकट होती. शिखरावर भयानक वेगाने वारे वाहत होते. लवकरच वादळ येणार होतं. आणि सगळ्यात मोठं संकट म्हणजे प्राणवायू संपत होता. पण तिची जिद्द बघून तो शेर्पाही नतमस्तक झाला. तो म्हणाला, “अरुणिमा आता मी मेलो तरीही चालेल पण तुला एकटं सोडणार नाही! तुला जिवंत परत खाली घेऊन जाईन!”

वेगाने ते परतीला निघालेत. पण तिचा कृत्रिम पाय सतत मांडीतून निखळत होता. त्यामुळे तिला चालताना खूप त्रास होत होता. पण तिची शर्यत लागली होती मृत्यूबरोबर! तोही वेगाने तिच्या मागे येत होता. तिला बाद करण्यासाठी. झडप घालण्यासाठी.

तिच्या डोळ्यातुन अश्रू येत होते..उंच ठिकाणी चालताना तोंडात लाळ निर्माण होत असते. तिच्या तोंडातील लाळ खाली पडताना ‘टक’ असा आवाज येई, कारण खाली पडेपर्यंत त्याचा बर्फ होत होता. अश्रूही खाली ओघळताना बर्फ होत होते.

तिचा हात काळा निळा पडला होता. फ्रॉस्ट बाईट, बर्फ बाधा म्हणतात. हातसुद्धा कापावा लागणार होता. पण ती जिवंत राहिली तर..
चालता येत नव्हतंच.

शेवटी तिने एक भयंकर निर्णय घेतला, तिने पाय काढून टाकला..आणि तशीच स्वतःला घासत चालू लागली. एका हातात स्वतःचा एक पाय..काय दृश्य असेल ते!

देव जगात असेल तर तो ही इतक्या उंचावर ,’जवळून’ तिला बघत असेल तर त्यानेही तोंडात बोट घातलं असेल!

एव्हरेस्ट मोहिमे दरम्यान सगळ्यात जास्त मृत्यु हे  परत येताना होत असतात.
त्या क्षणी अरुणिमाकडे फक्त पाच मिनिटांचा प्राणवायू शिल्लक होता. दोघांनाही माहिती होतं आता तिचा मृत्यू अटळ.

आणि नेमका तेव्हा एक ब्रिटिश पर्वतवीर जास्तीचा प्राणवायू सिलेंडरसोबत दिसला. त्याला त्या सिलेंडरचं वजन होत असल्याने त्याने तो सिलेंडर तिथेच टाकून दिला. शेर्पा धावत तिथे गेला, सिलेंडर अर्ध भरलं होतं. त्याने ते प्राणवायूचं सिलेंडर आणून अरुणिमाच्या पाईपला जोडलं. अरुणिमाला पुनर्जीवन मिळाले.

अरुनिमा सिन्हाला 2015 मध्ये ‘पद्मश्री’ने गौरविण्यात आले.

मी आदल्या रात्री एका कार्यक्रमात प्रत्यक्ष अरुणिमा सिन्हाला ऐकून, बघून आलो होतो. तेव्हा मी मित्राला ओरडून म्हणालो , “ही आजच्या काळातील झाशीची राणी आहे!”

त्यावेळी संध्याकाळी मी झाशीच्या किल्ल्यासमोर होतो. खिडकीतून बघत होतो. पण डोळ्यासमोर राणी लक्ष्मीबाई येत नव्हती. दिसत होती ती आजच्या काळातील झाशीची राणी, एव्हरेस्टवीर, पद्मश्री अरुणिमा सिन्हा!

त्या काळात मी खूप नैराश्याने ग्रासलो होतो.
करिअरपासून सगळीकडेच नकारत्मक वाटत होतं.
पण अरुनिमा सिन्हाला ऐकल्यावर माझ्यात उत्साह संचारला. मी दररोज व्यायाम, सूर्यनमस्कार, आणि धावण्यास सुरवात केली. भीती दूर पळत गेली. इतकं कोणासोबत वाईट घडल्यावरही त्यातून एक व्यक्ती इतक्या पूढे जाऊ शकते तर मी तर धडधाकट आहे. कारण तिच्या इतक्या शारीरिक आणि मानसिक वेदना सहन केलेली मी तरी कोणी व्यक्ती आजवर बघितली नाही.

अरुणिमा सिन्हा हे जिवंत उदाहरण आहे सकारात्मकतेचं..जिद्दीचं..विलक्षण इच्छा शक्तीचं..

वाईट लोकांनी तिला अपंग केलं. तिने भारतातील कृत्रिम पायाने एव्हरेस्ट सर केलेली प्रथम व्यक्ती, हा इतिहास, रेकॉर्ड करून दाखवला.
या दिव्य स्त्री आजच्या जागतिक महिला दिनी साष्टांग नमस्कार! दंडवत! टेक अ बाव लेडी!

मी या जन्मात आधुनिक झांशीच्या राणीला बघितलं आहे. जेव्हा जेव्हा वेदना होतात मनाला तर अरुनिमा सिन्हा आठवते. कारण तिच्या मानसिक आणि शारीरिक वेदनांपुढे माझ्या वेदना मला तृणवत वाटू लागतात.

-Abhijeet Panse

सौंदर्याची मांदियाळी

चीनमधील लोकांच्या चेहऱ्याची एक ठराविक ठेवण , मुद्रा ,Countenance असतं.
युरोपियन विविध देशातील लोकांच्या चेहऱ्याचीही विशिष्ट ठेवण असते. पण ही सर्व विविधता ही त्या त्या देशानुसार असते. एक भारतच असा देश आहे..असावा की जेथे राज्यांतर्गत स्त्री सौंदर्यात विविधता आढळते.

#केरळी स्त्री:- सावली सलोनी तेरी..तरतरीत कांती..शिडशिडीत बांधा..खोल डोहासारखे पण पाणीदार काळे डोळे बहुतेकवेळा..डोळ्यांत काजळ नसलेली केरळी मुलगी सहसा दिसणार नाही..सौष्ठव मादक..भरीव ओठ..

चुणचुणीत, हुशार  आणि मादक सौंदर्य..

द्राक्षांपासून, फळांपासून बनलेली मदिरा काळानुसार जसजशी तेज, झिंग चढवणावरी, हळूहळू मादक होत जाते तसं हे केरळी दाक्षिणात्य सौंदर्य हळूहळू मादक होत जातं..मुरत जातं..

#दिल्लीकीलडकी:- तोफ! तडका! न्यूक्लिअर बॉम्ब! ज्याच्यावर पडेल तो बेचिराख! गौर..गव्हाळ वर्ण.

कमालीची आक्रमक..दर दोन वाक्यानंतर फकफकाटाचा उच्चार!

दिल्लीची मुलगी ही मुंबईच्या मुलीबद्दल ‘बिचिंग’ करतेच, असे म्हणतात. मुद्दा हाच की फॅशन प्रथम दिल्लीतून मुंबईकडे आणि देशभरात पसरते की प्रथम मुंबई नंतर दिल्ली मग देशभर..

कोणतीही मूळची ‘हॅपनिंग’ दिल्लीची मुलगी सतत फॅशन प्रथम मुंबईत नाही तर दिल्लीतच जन्म घेते हेच म्हणत राहील.

चेहऱ्यावर तोडू अॅटिट्युड..प्रचंड ट्रेंडी, फॅशन कॉन्शस..

आत्मविश्वासाने सिगारेट , काळी जाडी सिगार ओढताना सहज दिसेल. दारूचा नियमित क्वचित ड्रग्सचाही स्पर्श झालेली असते.

#तमिळ_मुलगी..स्त्री:- सावली सी एक लडकी..धडकन जैसे दिल की…बुद्धीने हुशार! ब्रेनी ब्लॅक ब्युटी!

पिवळ्या रंगाची प्रचंड आवड..संपूर्ण तामिळनाडू विशेषतः चेन्नईत पिवळ्या रंगाचं प्रभुत्व आढळतं..

चेहऱ्यावर हळदीचा रंग स्पष्ट दिसतो.

पौगंडावस्थेतील मुलगी ते तरुण मुलगी ते मध्यमवयीन स्त्री ते वृद्ध स्त्री असो, हळदीचा पिवळा रंग चेहऱ्यावर आढळतोच.

चेन्नईला वा तामिळनाडूला भारतातील दुबई म्हणावंसं वाटतं मला ..

गळ्यात, हातात, बोटात सोनं चमकत असतंच.. “ऑल ग्लिटर्स ..” “सर्वच चमकणारं सोनं नसतं” ही म्हण तामीळ स्त्रियांसाठी लागू नाही होत..इथे अंगावरील सर्वच चमकणारं सोनंच असतं..लोकल ट्रेन्स वा बसमधील गर्दी असो सोनं अंगावर ,गळ्यात बिंधास्तपणे हिंदळत असतं..बोटात घट्ट बसलेलं असतं..

कपड्यांसंबंधित फॅशनबाबत जरा उदास वृत्तीच आढळते. हां ती मुलगी स्त्री कोडमबक्कमची असेल तर तिथे फॅशन सेन्स असलेली, आखूड कपड्यात आढळू शकते.

#गुजराती_मुलगी:-  नाजूकनार , नितळ त्वचा..कोणत्याही प्रकारचे कपडे ‘कॅरी’ करू शकते..फॅशनेबल, ट्रेंडी असतेच असते.. पण फाफडा ढोकळा मुळे सतत तूप, वनस्पती तुपाची, तेलाची आहूती पोटात टाकत असल्याने गुजराती स्त्री मध्यमवयात बहुतेकवेळा पातळ ठेपल्यापासून स्पंजी ढोकळा बनते..

#बंगाली_स्त्री:- आहाह! बॉंग्स! गौरवर्णीय..श्यामलवर्णीय सुद्धा..

...डोळे निर्मात्यानेच काजळ लावून पृथ्वीवर पाठवलेत असे अमावस्येच्या काळ्या रात्रीसारखे काळेशार डोळे ..तर कुठे डोळ्यांतून रात्री पोर्णिमेचं चांदणं शिंपडत जाईल असे पिंगट पण पाणीदार डोळे..

आयुष्यात एकदातरी बंगाली गर्लफ्रेंड असावीच..त्याची लज्जत काय ती “बंगाली जादू” अनुभणाराच जाणू शकतो.

दहापैकी नऊ बंगाली घरात संगीताचे सूर आळवताना ऐकू येतील. साहित्य..संगीत..अभिनय..कलाभिव्यक्ती बंगाली सहसा असतेच. वैचारिकरित्या आधुनिकता , बोल्डनेस हे बंगाली मुलीचे गुण..

पण एक नकारात्मक गोष्ट बंगाली स्त्रीमध्ये बहुतांशवेळी आढळते ती म्हणजे अस्वच्छता..गचाळ राहणे..स्वतःला जितकं नीटनेटके ठेवतात, तो नीटनेटकेपणा घरात आढळेलच असे नाही.

गोल चेहरा, चौकोनी , षट्कोनी चेहरा सर्व विविधता..

सततच्या संदेश, रोशोगुला खाऊन शरीराने गुबगुबीत होतातच..

बंगाली स्त्री म्हणजे नितळ कांतीची मासोळीच! मासोळीशिवाय या जल बिन मच्छी अवस्था होतेच.

#हरियाणवीस्त्री:- उंच..काटक..कामात वाघीण पण वैचारिकरित्या बरेचदा काहीशी जुन्या विचारांची..

चेहऱ्यावर वाढत्या वयात एक प्रकारचा करारीपणा, काहीसा पुरुषीपणा येत जातो..

सर्व परंपरा..चालीरीती पळणारी..गाई म्हशीचं दूध काढणारी..शेणाच्या चपट्या मोठ्या गौऱ्या घराच्या भिंतीवर थापणारी..मध्यमवयीन वा सुरकुत्यांचं जाळं चेहऱ्यावर असलेली वृद्ध स्त्री अंगणात खाटेवर बसून किंवा उंबरठ्यावर बसून हुक्का ओढताना सहज दिसेल.

हरियाणवी मुलगी जर दिल्लीला गेली..मग तिचं उफाड्या बांध्याचं सौंदर्य..व्यक्तीमत्व एक दोन वर्षात असं उफाळून येतं की बघणारा थक्क होईल.

#तेलुगू स्त्री: दिल्लीवरून कधी सेंट्रल रेल्वेने दक्षिणेकडे गेलं की जनरल बोगी सोडल्यास कोणत्याही डब्यात हलक्या..दाट होत चाललेल्या सावळ्या  सौंदर्याची उधळण दिसेल. यात जास्तीत जास्त तेलुगू किंवा तामिळ सौंदर्य असतं. दक्षिणेकडे जाणाऱ्या सेंट्रल रेल्वेचा रस्ता बहुतांश भाग आंध्र आणि तेलंगणातुन जातो. त्यामुळे तेलुगू मुलगी यात असतातच.

हातात कुठलंतरी पुस्तक ..चेतन भगतचं, रविंदर सिंगचं “कॅन लव्ह हॅपन ट्वाइस”..” आय टू हॅड लव स्टोरी” यासारखं एखादं पुस्तक वाचत राहील..

मग यात तामिळ की तेलुगू मुलगी कशी ओळखायची?

“चाय चाय..” म्हणत चहा विचारणाऱ्याकडून पॅन्ट्रीवाल्याकडून सहज चहा मिळाला तर जी चहा घेते कॉफी असेल तर कॉफी विकत घेते ती “तेलुगु कन्या”..

पण जी चहाविकणाऱ्याला ‘काफ्फी’ विचारते आणि त्याच्याकडे कॉफी नसेल तर त्याला सरळ ‘इल्ले’..’ना’ म्हणून कॉफीवाल्याची वाट बघते..आणि मग हातात काफ्फी आल्यावर तअमृततुल्य समजून पृष्ठयाच्या कपातून कॉफीचा घुट घेते..आणि ती पाणचट कॉफी..काळं पाणी पिऊन तोंड नाक मुरडत, सोबत कोणी असल्यास ‘इल्ले ..काहीतरी न कळणाऱ्या भाषेत ‘कॉफीबद्दल’ नाराजी व्यक्त करणारी ‘तामिळ’ मुलगी असते.

तेलुगू मुलगी विजयवाड्याची असेल तर ती इतर तेलुगू लोकांच्या भाषेतील चूका काढते.

विजयवाड्याची तेलुगू प्रमाण, शुद्ध तेलुगू मानली जाते.

#उत्तरप्रदेशची_मुलगी:- मांग भरो सजनाला अगदीच गांभीर्याने घेणारी, कपाळापासून सुरू होऊन, डोक्याच्या मध्यभागातून केसांतून जाणाऱ्या अरुंद पायवाटेवर शेंदुराचा..कुंकवाचा सडा टाकलेली स्त्री..

डोक्यावर पदर..कुंकू कपाळावर..ठाशठशीत मंगळसूत्र ..आणि सतत बडबड...पूर्व उत्तर प्रदेशी लोक आणि पश्चिम उत्तर प्रदेशी यांच्यातही थोडा फरक असतोच..पण तो राहणीमान..खानपानात..कृष्ण राधा भक्त पूर्व युपीमध्ये तर शंकर भक्त स्त्रिया पश्चिम युपीकडे बहुतेक दिसतात..बोलण्यातही त्या अनुषंगाने शब्द येतात.

#ओरिसातील स्त्री:- ‘रोशोगुल्ला’ या मधुर सुखाची निर्मिती प्रथम पश्चिम बंगालात झाली की ओरिसात हा वाद दोन्ही राज्यांच्या लोकांमध्ये, हलवायांमध्ये वर्षांनुवर्षे सुरू आहे. त्याला अंत नाही. तसेच उडिया मुलगी सुंदर की बंगाली हाही प्रश्न पडावा कदाचित..

चेहऱ्यापेक्षाही इतर शरीरसौष्ठव सर्वांगाने परिपूर्ण..प्रमाणबद्ध ..हवे तिथे योग्य प्रमाणात मोठे

उभार..कमनीय बांधा..हत्तीणीची चाल..

#कन्नडस्त्री: सावळा वर्ण..पण  मांजरीच्या काळ्या पिल्लात अचानक एक  वेगळं शुभ्र पिल्लू जन्मावं..तसं एखादी गौर वर्णीय कन्नड मुलगी..स्त्री..दृष्टीस पडते.

मुंबईहुन दक्षिणेकडे जाणाऱ्या , वेस्टर्न रेल्वेत कानडी सौंदर्य हमखास बसलं असतं.

केसांत गजरा माळनारी मुलगी , स्त्री महाराष्ट्रात दिसणे आता कालबाह्य ..पण बंगलोर स्टेशनपासून , शहरात, गावांत अजूनही मोगऱ्याचा, वेगळ्या श्वेत पुष्पांचा गजरा माळताना ती दिसेल.

केसांत..वेणीत गुलाबाचं फुल माळणारी एखाद दुसरी उत्साही वृद्ध स्त्री महाराष्ट्रात, पुण्यात दिसेल. पण कर्नाटकात महाविद्यालयीन कुमारी ते सर्वच वयोगटातील स्त्रिया वेणीत गुलाबाचं फुल माळलेली दिसते.

कपाळावर काहीसं काळपट लाल कुंकू लावलेली स्त्री..त्याखाली पांढऱ्या भुकटीचा एक ठिपका..

मुलगी कपाळावर छोटी ते जाडी काळी टिकली…

भुवयांखाली पांढरा ठिपका असतो.

#काश्मिरी स्त्री:- भारतातील ज्या भागातील स्त्री सौंदर्याची सगळ्यात जास्त गोडवे गायले गेले आहेत ते म्हणजे काश्मिरी सौंदर्य..

युरोपियन Countenance , लांब उभा चेहरा..आणि विषववृत्तापासून दूर असल्याने  फक्त गौरवर्णीय..कुठे गुलाबी तर कुठे निस्तेज पिवळसर पांढरी फटक त्वचा..

जॉ लाईन अगदी शार्प..चिक बोन्स स्पष्टपणे दिसतात.

पण तरीही काहीसं एकसुरी सौंदर्य..

कदाचित तेथील कडवी पुरुषप्रधान संस्कृतीमुळे.. ताणामुळे छोट्या बालवयातील मुली सोडल्यास मनमुराद हसताना, खिदळताना काश्मिरी तरुण मुली सहसा दिसत नाही. म्हणूनच त्या तितक्या सुंदर वाटत नाही.

जम्मू भागात असतं पहाडी डोगरा सौंदर्य..प्रकृती..

एकवेळ इंग्लंडच्या राणीचे हात उघडे दिसतील पण तरुण काश्मिरी मुलीचे केस सार्वजनिक स्थळी दिसणे अशक्य.

सारं सौंदर्य काळ्या, पांढऱ्या पडद्याआड.

पण हीच काश्मिरी मुलगी जेव्हा दिल्लीत जाते किंवा विदेशात जाते..तिच्या व्यक्तिमत्वाला वेस्टर्न टच मिळतो, तेव्हा हे काश्मिरी सौंदर्य, आषाढात सतत ढगाआड असलेला चंद्र, पौर्णिमेला अचानक रात्री काही वेळासाठी ढग दूर होऊन लक्ख चमकायला लागतो तसं हे काश्मिरी तारुण्य मग रसरशीत होतं.

#त्रिपुरातील_त्रिपुरसुंदरी- या ईशान्य राज्यात बंगालीच जास्त असल्याने येथील स्त्रिया बंगाली स्त्रियांसारख्याच…

मोठा चेहरा....कपाळ..रुपयायेवढ रक्तलाल कुंकू..साडीत भारदस्त दिसतात.

#बिहारी स्त्री: - पश्चिम उत्तर प्रदेशी स्त्री आणि बिहारी स्त्रीमध्ये खुपसा फरक नसतो. ठराविक भारतीय चेहरा.

केसांतून मधोमध जाणाऱ्या पायवाट केशरी..लाल रंगाने भरलेली असते. मुली ,बायका खाण्यापिण्यात कसली गय करत नाही. डायटिंग, फॅशन्स वगैरे त्यांच्यासाठी नसतं जणू. एखादीच माझी आवडती “नेहा शर्मा “😍 यांच्यात निघते.

गंगेच्या खोऱ्यात भरपूर पिकतं. सगळं काही खातात.

आणि सतत बडबड करतात.

#हिमाचल_उत्तराखंडीय_स्त्री:  काश्मीरला लागून असूनही चेहऱ्याची ठेवण अगदी वेगळी.

रंग खूप काही गौरवर्णीय असेलच असेही नाही. पण तंदुरुस्त बायका. पहाडी प्रकृती.. सौंदर्य.

#मध्यप्रदेश :- लावण्यवती..कुठेही ,कसेही एकरूप होणारी मुलगी.. नाजूकनार ते मजबूत प्रकृती सगळं काही इथे..

शिवपुरीपासून संपूर्ण मध्यप्रदेशात हिंदी स्त्रीच्या.. भाषेच्या सौंदर्यात चिंब भिजता येतं.

#नागालँड_मणिपूर_मेघालय_मिझोरम :- नागालँड, मणिपूर , मिझो यातील स्त्रिया मंगोलिन countenance , मुद्रेकडे स्पष्टपणे वळलेले दिसतात.

छोटे डोळे बसकं नाक..काहीसा गोल चौकोनी चेहरा..

पण हे ईशान्येकडील पहाडी, जांगल सौंदर्य जबराट असतं.. स्वावलंबन, आधुनिकता मनात असते. ती बाहेर येते जेव्हा ईशान्य पहाडी सौंदर्य दिल्लीत येतं. मिनी स्कर्टस , शॉर्टस सगळं काही सहज कॅरी करतात. चेहऱ्यावर माज नसतो पण आत्मविश्वास असतो. पण दिल्लीतील काही नीच लोक यांना त्रास देतात. त्यांना भारतीय समजत नाही. त्यामुळे कुठेतरी यांच्या मनात राग असतो. बारीक डोळे..गुलाबी ओठ..शरीर सौष्ठव आग लावणारं…विरघळवणारं...

#पंजाबी_मुलगी:- ओहह डिअर! आहह ! विस्तव! आतून धगधगता लावा..ज्वालामुखी… जाळ..निखारे..धूर मात्र इतरांचा काढतात..

लहानपणी प्रत्येकाने काढलेलं चित्र, दोन मोठ्या टेकड्यातुन निघालेला सूर्य..मधून वाहणारी निमुळती नागमोडी नदी….याचं मानवी रूप म्हणजे सुर्यमुखी पंजाबी मुलगी...स्त्री..

उफाडा बांधा..गौरवर्ण...धडधाकट प्रकृती..आक्रमकता आणि बोल्डनेस.. ट्रेंडी..फॅशन कॉन्शस..

बंगाली मुलगी आणि पंजाबी मुलगी दोघीही बोल्ड असतात..पण बंगाली मुलीत, स्त्रीमध्ये चिंतनातून बहुतेकवेळा लिबरल विचारांचा प्रभाव, साहित्य कला यांच्यातुन आलेला कलात्मक बोल्डनेस, उत्तानता असते.

तर पंजाबी मुलीत धसमुसळेपणा , जास्त विचार न करण्याची वृत्ती..लाऊडनेसमधून आलेला बोल्डनेस असतो.

पण जेवणात रोजचं तूप, परोठे , तेल , मैदा मुबलक असण्यामुळे काही काळानंतर याही जाड होतात.

#गोवन_पोर :- लवली ब्रेनी गर्ल्स! येथे कोंकणी..पोर्तुगीज..मराठी सर्वांचं मिश्रण दिसतं.

कुठे स्वतंत्र बाणा तर कुठे दत्त, मंगेश भक्ती..बुद्धीने

हुशार असतात.

मूळची गोवन कन्या आयुष्यभर स्लिम ट्रिमच राहते.

#जयजयमहाराष्ट्रमाझा:- जशी संपूर्ण देशात सौंदर्यात विविधता आढळते तशी महाराष्ट्रातसुद्धा.

वैदर्भीय सौंदर्य विविध कथा , ग्रंथात वर्णलेलं आहे. सोलापूर भागात गेल्यास आंध्र सौंदर्याचा स्पर्श होत गेलेला जाणवतो. गौरवर्ण ते सावली सलोनी सगळंच या भागात…

हिमालयातील उंच देवदार वृक्ष दिसण्यापूर्वी वरवर जाताना समुद्रसपाटीवरील जाड गलेलठ्ठ वृक्ष हळूहळू उंच होत जातात, मधल्या संक्रमण अवस्थेतील वृक्षांवर समुद्रसपाटीवरील आणि उंचावरील देवदार दोन्हींच्या छटा दिसतात, तश्या  मिरजेकडे गेल्यास मराठी आणि कन्नड यांचं सुरेख मिश्रण दिसतं. चटपटीतपणा जाणवतो.

‘सातार’कडे सहयाद्रीच्या डोंगर दऱ्यात हुंदडणाऱ्या क्लिकी मुली... चेहऱ्यावर स्ट्रीट स्मार्टनेस..चुणचुणीत असतात. सहज कोणालाही प्रेमात पाडतात.

रत्नागिरी कोंकणकन्या: गौरवर्णी..श्यामवर्णी..येथे सौंदर्याची मांदियाळी…

पिंगट डोळे..कुठे निळेशार नयन ही दृष्टीस पडतात. त्या निळ्या तळ्यात हरवून जायला होतं.

जरा ‘कंजूषपणा’ कमी केलात तर आणखी प्रेमात पाडतील या..😝

मुंबई गर्ल्स:- हुश्श! या अगदी हॅपनिंग!

येथे  मिसळ आढळते.

पुणेरी मुलगी सौंदर्यवतीच.

जागतिकमहिलादिन

-Abhijeet Panse