काही महिन्यांपूर्वी महिला क्रिकेट वर्ल्डकप झाला. भारतीय महिला टीमने फायनलपर्यन्त जबरदस्त मजल मारली होती. वर्ल्डकप जिंकू शकल्या नाहीत. पण तिथून भारतीय महिला क्रिकेटसंबंधित गोष्टी योग्य प्रकारे बदल्यात. महिला क्रिकेटला लोक गांभीर्याने घेऊ लागलेत. बघू लागलेत.
आणि काल दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय महिला संघाने वनडे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांची मालिका जिंकली. हा एक फार मोठा पराक्रम आहे.
नवोदित कॅप्टन हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली ही मालिका खेळली गेली.
गेल्या वर्ल्डकपमध्ये मिथाली राज ही कर्णधार होती.
मिथाली राज ही भारताची स्टार आणि अनुभवी खेळाडू आहे. त्यामुळे अनुभव आणि नवोदित खेळाडूंचा उत्साह, जोश यांचं मिश्रण भारतीय टीममध्ये सध्या आहे.
हरमनप्रित कौर ही पंजाबी अँग्री यंग लेडी, किती जबरदस्त खेळाडू आहे हे गेल्या वर्ल्डकपमध्ये जगाने बघितलं. ती टीममधील स्ट्रोक प्लेयर आहे.
वर्ल्डकपमध्ये सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियासारख्या मोठ्या टीम्विरुद्ध तिने एकशे सत्तरच्या वर धावा केल्या होत्या.
शिखा पांडे ही भारतीय वायुसेनामध्ये काम करते. ती फास्ट बॉलर आहे. तिनेही चांगली कामगिरी केली.
वेदा कृष्णमूर्ती ही मधली फळी सांभाळते.
पण या सगळ्यात एक नवोदित खेळाडू , फमिमा रॉड्रिक्स ही भारताचं भविष्य होऊ शकतं. ती फक्त सतरा वर्षांची आहे. चांगली फलंदाज आहे. तितकीच चाणाक्ष क्षेत्ररक्षकसुद्धा आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटच्या सामन्यात तिने अप्रतिम कामगिरी केली. सीमारेषेजवळ एक उंच झेल पकडताना तिने तिच्यातील अॅथलिटचं प्रदर्शन केलं.
पूनम यादव ही खऱ्या अर्थाने धैर्यवान लेग स्पिनर आहे. तसेही लेग स्पिनर म्हटलं की आधी हिम्मत असणे, सिंहाचं..सिंहिणीचं काळीज असणं गरजेचं असतं. कारण फलंदाज लेग स्पिनर्सला आपलं लक्ष करण्याची शक्यता असते. लेग स्पिनरला बॉलला ‘फ्लाईट’ देण्याची हिंमत असणं खुप महत्वाचं असतं. फ्लाईटशिवाय लेगस्पिनर म्हणजे दात नसलेला वाघ. पण पूनम यादव ही खूप हिंमतवाली लेग स्पिनर आहे. ती शेवटच्या षटकांमध्येही बॉलला फ्लाईट देते. तिच्याकडेही आता अनुभव आहे. ती वर्ल्डकप खेळली आहे.
स्म्रिती मंधाना, हे नाव तर आता जगभरात पोहचलंय. सांगलीची ही मुलगी डावखरी फलंदाज आहे. ती भारतीय ओपनरसुद्धा आहे. तिच्याकडे आहे ते ‘टायमिंग’चं वरदान ! ‘नजाकत’ असलेले स्ट्रोक्स ती खेळते. शिवाय ती उंच असल्याने सीमारेषेवर ती योग्य क्षेत्ररक्षण करते.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या सामन्यात तिने तिच्या फिल्डिंगची चमक दाखवली आहे.
त्यामुळे एकंदर भारतीय महिला क्रिकेटचं भविष्य छान आहे .
यावर्षी भारतीय महिला टीम इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. शिवाय नोव्हेंबरमध्ये ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांचा वर्ल्डकप आहे. प्रतिकूल परिस्थितीत भारतीय टीमचा कस या वर्षी लागणार आहे. पण ज्या प्रकारे भारतीय महिला सध्या क्रिकेट खेळताय त्यावरून येता काळ भारतीय महिला क्रिकेटसाठी चांगला आहे हे नक्की.
No comments:
Post a Comment