25 जुलै 2017
द मास्टर हू सोल्ड हिज फरारी
The Master who sold his Ferrari
उच्च पदावर पोहचलेल्या,लोकांचे आर्दश असलेल्या सेलिब्रिटिंच्या वागण्यातुन, कृतीतुन संदेश दिला जातो ज्याचा प्रभाव समाजावर वा त्यांना #follow करणाऱ्यांवर काही प्रमाणात तरी नक्कीच होतो.
पण बरेचदा लोक आपल्या आवडत्या आर्दशांना त्यांच्या क्षेत्रापुरतीच मर्यादीत न ठेवता मुळ आयुष्यात वा सर्वच व्यासपीठावर त्याला देवत्व बहाल करत सिंहासनावर बसवुन त्याच्या पादुका आपल्या डोईवर वाहु लागतात.
मग बऱ्याचवेळा हे लादलेलं देवत्व त्या सिंहासनाधिष्ठीताला पेलवत नाही.
महान खेळाडुचं 'मैदानावरील' देवत्व मैदानापुरतीच न राहता आउट आॅफ द स्टेडियम,आॅफ द ग्राउंडही त्याला दैवत्व बहाल केलं जातं.बऱ्याचदा हे देवत्व त्या सिंहासनाधिष्ठीताला पेलवत नाही. हेच भारतरत्न सचीन तेंडुलकरसोबत आता आणि यापुर्वीही झालेलं आहे.
सचिन तेंडुलकरने मित्राच्या अनधिकृत बांधकामासाठी संरक्षण मंत्र्यांकडे वशिला लावला.त्यात त्याचा; त्याच्या म्हणण्याप्रमाणे आर्थीक संबंध नसेलही पण #भारतरत्न मिळालेल्या व्यक्तीने मैत्रीसाठीहे करावं का!
सचिन तेंडुलकरने यापुर्वी कॅप्टन असताना आपल्या मैत्रीखातर विनोद कांबळीसारख्या सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह टेंडंसी असलेल्या नमुन्याला परत खेळण्यासाठी मदत केली,अजित आगरकरला टीममध्ये आणले,कॅप्टन नसतानाही रोमेश पवारलाही संधी मिळवण्यासाठी मदत केली.हरभजन सिंगला मंकी गेट प्रकरणात आउट आॅफ द वे हेल्प केली.याबद्दल कोणालाही चुकीचं वाटलं नाही कारण हे सर्व टीम संबंधीत आॅन द ग्राउंड होतं.
पण आॅफ द ग्राउंड सचिन यापुर्वीही एक भारतीय म्हणुन चुकीचा वागला आहे आणि त्याच्या फॅन्सने त्यावर टीका केली आहे.
2011 मध्ये पनवेल भागात वन बीएच के फ्लॅट घेण्यासाठी त्याने 25 लाखाचं कर्ज घेतलं होतं.मुळ कारण होतं इन्कम टॅक्स मध्ये सुट मिळावी म्हणुन.
त्याच्या काळातील सर्वात जास्त कमवत्या खेळाडुने असं वागणं चुकीचा संदेश देतं.
त्यापुर्वीही त्याने जाहिरातींतुन कमावलेल्या पैश्यात टॅक्समधुन सुट मिळावी असा अर्ज केला होता कारण दिले होते की ते पैसे त्याने खेळाडु म्हणुन नाही तर 'अभिनेता' म्हणुन कमावले आहेत.असले "चिकि सिंगल्स" सचिनने आॅफ द ग्राउंड घ्यावेत का?
2009 मध्ये त्याच्या आर्थिक सल्लागाराने ने त्याला इन्कम टॅक्समधुन सुट मिळावी 30,000चं कर्ज काढायला सांगितलं होतं.ती बातमी तत्कालीन स्टार माझावर दिवसभर होती पण त्यानंतर काढुन टाकण्यात आली होती.
श्वास मराठी सिनेमा आॅस्करसाठी नाॅमिनेट झाल्यावर त्याला मदत म्हणुन त्याने आपल्या बॅट्सचा लिलाव करत ते पैसे श्वास टीमला दिले होते.तेव्हाही त्याच्यावर टीका झाली की बॅट्स विकुन पैसे दान दिल्यापेक्षा तो ते स्वत:च्या पैश्यातुनही करू शकला असता.
डाॅन ब्रॅडमनच्या 29 शतकांशी बरोबरी केल्यावर मायकल शुमॅकरने सचिनला #फेरारी गिफ्ट केली होती.तेव्हाही ती भारतात आणताना इंम्पोर्ट ड्युटी माफ व्हावी अशी इच्छा व्यक्त केली होती.शेवटी त्याची इम्पोर्ट ड्युटी रक्कम फियाट इंडिया कंपनीने दिली होती.
पुढे काही वर्षांनी ती फेरारी त्याने सुरतच्या एका व्यापाऱ्याला विकुनही टाकली.
हे म्हणजे वाणात,लग्नात वगैरे मिळालेल्या साड्या, ब्लाउज पिसेस, पंचा, नारळं दुकानात जाउन विकणे!!!
सामान्य व्यक्तीही ''सप्रेम भेटी'' दुकानात विकणार नाही!!मग आदर्श देवाने असं करावं? Master who Sold his Ferrari
काही वर्षांपुर्वी सचिनने Mumbai belong to everyone'' म्हटल्यावर #बाळसाहेब_ठाकरेंनी त्याच्यावर 'सचिन लेफ्ट हिज क्रीज' 'म्हणत टीका केली होती.
भारतरत्न सचीनने आता मित्राच्या अनधिकृत बांधकाम वाचवण्यासाठी वशिला लावल्यावर बाळसाहेब ठाकरेंचे शब्द पुन्हा म्हणावेशे वाटताय सचिन लेफ्ट हिज क्रीज अगेन.
-अभिजित पानसे

No comments:
Post a Comment