World Health Day /आंतरराष्ट्रीय स्वास्थ्य दिन
"अल्पायुषी भव "
"आयुष्यमान भवं" हा आशीर्वाद ज्येष्ठांना नमस्कार केला की त्यांच्याकडून उत्स्फूर्तपणे दिला जातो. दीर्घायु होणे हे जणू आशीर्वाद , एक सकारत्मक गोष्ट आहे हे अंतर्मनात पक्के बसलेय.
पण हाच आशीर्वाद शाप ठरू पाहत असेल तर? किंवा आधीच हा आता आशीर्वाद न राहता शाप झाला असेल तर..
दीर्घायु असणे वेगळं आणि 'स्वस्थ 'असणे वेगळी गोष्ट. जर दीर्घायु होऊन शरीररूपी यंत्रच जर कुचकामी , कमकुवत, बिघडलेले असेल तर 'आयुष्यमान' होणे हा तर शापच ठरणार!
आणि आज तीच परिस्थिती होते आहे.
बरेचदा लोक म्हणतात आमचे पणजोबा ,आजोबा , वडील ..आजी यांना कधी चष्मा लागला नाही , शेवटपर्यंत त्यांचे दात चांगले होते..ते वरचेवर आजारी पडत नसत!!
पण आज तसे दृश्य दिसत नाही. त्या आधीच्या लोकांचे शरीर काही वेगळे नव्हते. फक्त तेव्हा परिस्थिती वेगळी होती.
पूर्वी लोकांना स्वच्छ प्राणवायू मिळायचा. शारीरिक हालचाली जास्त करत. भाजीपाला रसायनयुक्त नसत.दूधात भेसळ नसायची. इंटरनेट , गॅजेट्स , सोशिअल साईट्स च्या ते आहारी गेले नव्हते. त्यामुळे डोळे आणि मन दोन्ही तंदुरुस्त असत. त्यामुळे चष्मा लागायचा नाही. मन आनंदी असे.
आता मात्र तिशीत गुडघेदुखी सुरु होतेय. भाजीपाल्यासोबत कीटकनाशके ही तोंडीस लावला जातो.तेही नियमितपणे.
डॉक्टर जर फळे खायला सांगत असतील , किंवा उपवासाला फळे खात असतील तर फळ कुठे आता शुद्ध राहिलीत! कार्बोईड युक्त फळे पोटात ढाकलली जातात. केळाची चव पूर्वीसारखी राहिली नाही. पण तरीही रसायनाद्वारे पिकवलेली ती फळे खातो.
फेसबुक , वॉट्स अप आणि मोबाईल गॅजेट्स मुळे प्रत्येकाची दिनचर्या पूर्णपणे अबनॉर्मली नकारात्मकरित्या बदलली आहे. रात्री झोपी जाण्याची वेळ दोन ते तीन तासानी उशिरा झाली आहे.नीट आत्मनिरीक्षण केल्यास कळेल रात्रीची झोप आता गाढ लागत नाही. रात्री बेरात्री जाग येते ..आणि मग पुन्हा शेजारिच असलेला मोबाईल बघितला जातो. परिणामी हळूहळू श्यूगर, रक्तदाब , निद्रानाश चा त्रास कमी वयातच सुरु होतोय. चिडचिडेपणा , मानसिक अस्वास्थ्य , नैराश्य वाढतंय.
पण आता यापासून सुटका नाही. कारण एकदा सोशिअल साईट्स, इंटरनेट ची सवय लागली की या चक्रातून सुटका नसते.
भेसळयुक्त अन्न ,धान्य, भाजीपाला,फळे , गॅजेट्स चा अतिउपयोग यामुळे मृत्यू येत नाही पण शरीररूपी यंत्र मात्र आतल्या आत खंगत जातं. टेक्नॉलॉजीच्या आहारी गेल्याने ती आपला 'टोल' स्वास्थ्यावर हळूहळू घेते आहे.
मागच्या वर्षी ब्रेड मध्ये घातक घटक मिळाले होते. तूप अशुद्ध मिळतं .म्हणजे ब्रेड आणि बटर सुद्धा आज भेसळयुक्त झालंय.
त्याआधी आबालवृद्धांचे आवडत्या मॅगी मध्ये शिसेचं प्रमाण 'जास्त' मिळालं होतं.म्हणजे मुळातच शरीराला घातक असलेले शिसे आम्ही जिभेच्या चोचल्यांसाठी खातो हे स्वीकारले होतेच पण 'प्रमाण 'जास्त वाढल्यामुळे मॅगीवर बंदी आली होती.
आज अश्या लवकर कमकुवत होत असलेल्या ,वेअर अँड टिअर होत असलेल्या शरीराने ' दीर्घायु 'होऊन बिछान्यावर खिळून मृत्यूची वाट बघत राहणे ही खरी तर शिक्षाच म्हणावी लागेल. "आयुष्यमान भव " हा शाप होऊ पाहतोय.
त्यामुळे वेळीच सावरलं नाही कटाक्षाने आपली दिनचर्या सकारात्मकरित्या सुधारली नाही तर आज विडंबन वाटत असलेले "अल्पायुषी भव " हे वाक्य उद्या खरंच ज्येष्ठ लोक आपल्या प्रिय लोकांना आशीर्वाद म्हणून देतील. कारण येत्या काळात आपल्या बिघडलेल्या दिनचर्येनुसार बिघडत्या शारीरिक मानसिक स्वास्थ्यामुळे "आयुष्यमान भव"हा शाप ठरु पाहू शकतो. तेव्हा वेळीच प्रत्येकाने सुधारायला हवं नाहीतर वाढदिवसाला ओवाळताना ,नमस्कार करताना प्रिय लोक "अल्पायुषी भव" हाच ' 'आशीर्वाद' दिला जाईल.
- अभिजीत पानसे.

No comments:
Post a Comment