निधीन धिन धिन धिन धा"
'लोकप्रभा'http://www.loksatta.com/vishesha-news/permanent-roommates-1387407/ ,एप्रिल 2017
काही महिन्यांपूर्वी माझ्या एका मैत्रीणीला मी "पर्मनंट रूममेट्स"चा पहिला भाग आज बघणार असं सांगितलं तेव्हा ती म्हणाली की तिने ती सीरिज बघितली आहे. त्यातला हिरो चांगला आहे पण हिरोईन नाही तिला आवडली.
मी तेव्हा पर्मनंट रूममेट्स बघायला सुरवात ही केली नव्हती. आणि त्याआधीच त्यातील जी कोणती ही प्रमुख अभिनेत्री होती ती काही चांगली नाही ही मनात कुठेतरी संकल्पना निर्माण झाली होती.
रात्री दहा वाजता सहज पंधरा वीस मिनिटं वेळ घालवावा म्हणून मी सीरिज बघणं सुरु केलं. जेव्हा मी लॅपटॉप बंद केला त्यावेळी पहाटेचे पाच वाजत होते. मी दोन्ही सिजन संमोहित झाल्याप्रमाणे बघून संपवले. इतके ते 'इररेजिस्टेबल' होते.आहेत. आणि पहाटेच त्या मैत्रिणीला तीन चार लाल रागीट चेहऱ्याचे इमोटिकॉन्स पाठवून मेसेज केला की पुन्हा असले चुकीचे अभिप्राय मला देऊ नकोस. तुला अभिनयाची ,कलेची जाण नाही!
रूममेंट्सच्या पहिल्या नेटीसोडच्या पहिल्याच दृश्यात एक अभिनेत्री आहे. पहिले दहा मिनिटं तिच्यात काहीही वेगळं वाटत नाही. इतर सर्व "गर्ल अॅट नेक्स्ट डोअर" अभिनेत्रीप्रमाणे तीसुद्धा वाटते. दिसायला काही विलक्षण सुंदर , वा ठराविक हिंदी चित्रपटातील हिरॉईन्सप्रमाणे साचेबद्ध ग्लॅम डॉल नाही. उलट काहीशी बेढब वाटते.
पण अकराव्या मिनिटाला ती प्रेमात पाडते! आणि मग सतत प्रेम करायलाच लावते . तिच्यातील अभिनय क्षमता , आवाजावरील नियंत्रण , भूमिका पूर्णपणे समजून समरस होणे , प्रचंड आत्मविश्वास या सर्व कौशल्यामुळे ती जबरदस्त छाप सोडते. तानिया नावाचं पात्र हे प्रचंड लोकप्रिय झालं ते या अभिनेत्रीमुळेच!
या अभिनेत्रीचं नाव काय आहे हे जाणून घेण्यास मी अधीर झालो होतो त्यामुळे मी दुसरा भाग बघत असतानाच मध्ये थांबून त्या अभिनेत्रीचं नाव काय हे बघितलं. आणि तेव्हा कळलं की तिचं नाव "निधी सिंग".
ही निधी सिंग प्राण आहे पर्मनंट रूममेट्स चा!
अगदीच सरासरी उंची, थोडे कुरळे केस , फुगीर गाल (चबी चिक्स) पण मस्त काळे डोळे, मादक ओठ. पंजाबी ,दिल्लीची छाप असलेला चेहरा .. दिसण्यात सुरवातीला सर्वसाधारण वाटते. पण जेव्हा ती अभिनय करू लागते तेव्हा तिचा सर्वोत्तम आविष्कार साकारतो. तिचा तिचा आत्मविश्वास तिची सर्वोत्तम बाजू आहे.
प.रु. मधील तानियाची भूमिका तिला मिळण्यापूर्वी तिने काही व्हिडीओज मध्ये काम केलं . "एव्हरी गर्ल इन डेल्ही" असे काही छोटे व्हिडीओज वायरल झालेत.
अहमदाबादला निधी सिंगचा जन्म झाला.तिथेच ती शिकली. पण अभिनयाचा रुपेरी किड्याने तिला मृदू दंश केलाच. परंतु एकदम अभिनय क्षेत्रात अंधपणे उडी मारून संघर्ष न करता तिने प्रथम जाहिरात क्षेत्रात काम केले. त्या कामात यश मिळवले. हळूहळू मॉडेलिंग करू लागली. कर्मधर्मसंयोगाने तीची "टीव्हीएफ" या वेब निर्मिती हाउसच्या कास्टिंग डायरेक्टर "निधी बिष्ट" सोबत झाली. जणू ते विधीलिखितच होतं.
कारण निधी बिष्ट ही हाडाची कास्टिंग डिरेक्टर आहे. त्या दिल्लीच्या निधीमुळे या अहमदाबादच्या निधीचा प्रवेश टीव्हीएफ मध्ये झाला.
तिथे प्रथम केआयडी या सीआयडी सिरीयलवरील विडंबन व्हिडीओ मध्ये तिने सहाय्यक भूमिका केली. मेन्स वर्ल्ड, पिचर्स या वेब सीरिजमध्ये अगदीच छोटया भूमिका केल्या. आणि त्यानंतर ऑडिशन्स दिल्यावर तिला मिळाली पर्मनंट रूममेट्स मधील तानियाची भूमिका!
सिंगच्या अभिनयात प्रचंड खोली आणि समृद्धता आहे.पण सगळ्यात सकारत्मक शक्तीकेंद्र म्हणजे तिचा 'आवाज' आणि त्यावरील तिचं नियंत्रण. तिच्या शब्दफेकीचं जे 'फिनिशिंग' आहे ते क्लास आहे! तिच्या आवाजाला जे दिल्लीचं टोन आहे आणि ज्या प्रकारे ती त्याचा उपयोग योग्यवेळी करते ते अगदी वाहह आहे!
पर्मनंट रूममेट्स मध्ये तिने या टोनिंग चा उपयोग अगदी मस्त केलाय! तिचा संवाद, शब्दफेक ऐकत राहावसं वाटतं.
रूममेट्स मधील पहिल्या सिजनमधील शेवटच्या भागातील सुरवातीचा रेस्टरंट मधील सिनमधला भूमिकेनुसार तिचा थकलेला स्ट्रेस्ड तेलकट चेहरा ,तिचा अभिनय, डोळ्यांची भाषा , चेहऱ्यावरील भाव, शब्दफेक , खर्जातील आवाज म्हणजे ट्रीट आहे! वाढदिवसाची कॅसेट पाहतानाचा सिन, दुसऱ्या सिजन मधील असरानी आणि सासूशी बोलतानाचा सिन, आणि दोन्ही सिजनच्या शेवटच्या भागातील तिचे संपूर्ण दृश्य हे मेजवानी आहे अभिनयाची !
तिचा खर्जातील आवाज काढण्याची हातोटी, आणि वेळ पडल्यास तितकाच विरुद्ध पातळ आवाजात ही ती शब्दफेक करते त्यावरून ती एक परिपूर्ण अभिनेत्री आहे हे निर्विवाद सत्य आहे.
ती गोपाल दत्तबरोबर हिंदी नाटकही करते आहे. तानियाच्या भूमीकेमुळे ती प्रचंड लोकप्रिय आणि प्रसिद्ध झाली त्यामुळे सध्या ती चित्रपटही करते आहे. फक्त त्यात तीने इतर बेबीडॉल भूमिका न करता चांगल्या भूमिका कराव्यात ही अपेक्षा आहे.
येत्या काळात निधी सिंग हे ताकदीच्या अभिनेत्रींनमधील एक नाव असेल यात शंका किंचितही नाही!!
निधी सिंग यु रॉक!!

No comments:
Post a Comment