13 नोव्हेंबर 2016
आज कार्तिक शुद्ध चतुर्दशी म्हणजे "हरीहर भेटीचा" दिवस. आज शंकर आणि विष्णू त्यांच्या रोजच्या डेली हेक्टिक शेड्युल, ऊप्स सध्या स्केड्युल म्हणण्याचं "फ्याशन" आहे; तर आपल्या ;प्रार्थनेच्या फायली रिसिव्ह करणं,त्या चेक करून काहींवर सह्या करून त्या स्यांक्शन करणं,काही स्टँड बाय ठेवणं,तर बऱ्याच रिजेक्ट करणं इ. 24/7 बिझी हेक्टिक स्केड्युल मधून आज वेळ काढून शंकर आणि विष्णू एकमेकास गळाभेट करतात!
त्यांच्या मैत्रीला आज इतकं इतकं उधाण येतं की आजच्या दिवशी शंकराला तुळस आणि विष्णूला "बेलपत्र" वाहिल्या जातं.
एकमेकास हॅंडशेक करू अवघे धरू सुपंथ !
आज नरेंद्र भाई मोदी द लॉयन आणि पवार साहेब ,द पावर हाऊस आज आपल्या याच मुहूर्तावर भेटलेत!😉😛
"मी शरदरावांकडून राजकारण शिकलो इति नरेंद्र भाई मोदी,प.पु.प्र.
"मोदींनी पाचशे आणि हजार च्या नोटा रद्द करून योग्य केलं.मोदी देशाकरिता चोवीस तास काम करतात!इति मोठे सायेब जाणता अजाणता राज्जा!!!
हे म्हणजे फेसबुकीय संप्रदायाप्रमाणे झालं,"एकमेकांस लाईक करू अवघे धरू सुपंथ"
"बराबर छे ना शरद भाय!आव एक सेल्फी आपडु छे!!"
"अगदी बरोबर नरेंद्र भौ!! बरं आपलं ते राष्ट्रपती पदाचं बघा की आता !"
(Tek it on the light "Pink NOTE"😛)
-अभिजित पानसे
No comments:
Post a Comment