आज वासुदेवानंदसरस्वती महाराजांची जयंती.
जन्मगाव माणगाव प्रवास वर्णन.
कोल्हापुरातील त्या माणसाचा अनुभव.
ऑगस्ट 2013
भाग पहिला
तीन चार वर्षांपुर्वी मी एका ओळखिच्या व्यक्तीला भेटायला पुण्याला जाण्यासाठी संध्याकाळी निघालो.ऑगस्ट..श्रावण संपायला आला होता. घरून निघताना एका न्युज चँनलवर "आपला गाव आपला गणपती" असं कोणता तरी प्रो सुरू होता. त्यात कोल्हापूरच्या एक दशभुजा गणपती मंदीराची माहिती दाखवत होते.
मला पुरातन वास्तु मंदीर बघायला फार आवडतात म्हणुन विचार केेला की कधी कोल्हापुुरला गेलो की शोधु हे मंदीर.
दुसऱ्या दिवशी पुण्याला पोहचुन ; भेटुन रात्री परत निघालो.तेव्हा वाटलं की नृसिंह वाडीला दर्शन करून यावं. पास होताच.
तेव्हा कोल्हापुरला जाणाऱ्या जांभळ्या पांढऱ्या स्वच्छ आराम बस मध्ये बसलो.
वेळेचा अंदाज नीट न आल्याने रात्री २:३०AMला कोल्हापूर बस स्टँडला उतरलो. सर्वत्र सामसूम !!
बस स्थानकावर काही माणसं झोपली होती. पणआत समोरच एका खुर्चीवर एक पोलीस हवालदार बसले होते. तेही खुर्चीवर डुलक्या देत होते.माझी चाहुल लागल्याने त्यांनी माझ्याकडे पाहिलं. माझं निरिक्षण केलं. काहीच बोलले नाहीत. मी इकडे तिकडे थोडं घुटमळलो.चार्टवर वाडीला जाणाऱ्या आणि परत येणाऱ्या बसेसचा वेळ पाहिला.
ते हवालदार अधुन मधुन माझ्याकडे मान वळवुन पाहताय हे माझ्या लक्षात येत होतं.
उगाच त्यांना काही संशयास्पद वाटु नये म्हणुन शेवटी मी त्यांच्या पुढ्यात रिकाम्या सिमेंटच्या बाकड्यावर येउन बसलो.इतर बाकावर काही माणसं ; कोणी अंगावर नेटकी चादर घेउन कोणी तसेच झोपले होते. अधुन मधुन; चावणारे डास उडवायला त्यांची हाताची हालचाल होत होती.
आत आल्यापासुन माझ्या कानावर सतत दुरवरचा बोलण्याचा गाण्याचा आवाज पडत होता.नक्कीच कुठेतरी मोठ्या आवाजात टिव्ही सुरू होता.
मी समोर येउन बसल्याने म्हणा किंवा खुर्चीत अवघडुन बसुन डुलक्या देण्याचा कंटाळा आला म्हणा ते हवालदार आता जागे झाले होते.
त्यांना मंदिर कधी उघडतं वगैरे माहिती विचारली..
त्या आधीच्या वर्षीच नवरात्रात पहिल्यांदाच कोल्हापुरला आल्यावर पायीच शहर बघत मंदीरापर्यंत गेलो होतो आताही तसंच जावं ठरवलं आणि जाण्यास उठलो.
त्या पोलिसांनी ताबडतोब मला मागून आवाज दिला विचारलं "कुठं चाल्ले? मंदिरकडं?"
मी हो म्हटल्यावर त्यानी अगदी स्पष्ट सांगीतलं "आता इतक्या रात्री जाऊ नका शहर आता सुरक्षित राहीलं नाही! तुम्हाला रस्त्यात कोणी पकडन आणि लुटू शकतं!उजाडल्यावर जावा!
असा स्पष्ट इशारा दिल्यावर मला वास्तवाची जाणीव झाली
मी काही मिनिटं तिथंच बसलो. मग सहज समोरच्या मोकळ्या भागात फिरावं म्हणून गेलो तर इतक्या वेळचा तो आवाज कुठून येतोय ते कळलं समोर एक पान टपरी होती; तिथे मोठ्या आवाजत टीव्ही सुरु होता.
घशाला कोरडही पडली होती. त्याच्याकडे पाण्याची बॉटल मिळेल म्हणून तिथे गेलो.
मोठ्या आवाजात एक कुठलातरी सुमार तेलुगू पिक्चर सुरु होता. जोरजोरात नाटकी संवाद आणि अंगावर येणारे क्लोज अप्स शॉट्स बॉटलने पाणी पिताना मी पाहत होतो.
त्या ठेल्यावर तीन चार अजून माणसे होती. दारूचा तिव्र भपकारा येत होता.
माझ्या उजव्या बाजूला एक उंच आडदांड इसम उभा होता
अर्धी बॉटल पाणी पिऊन बॉटल सॅक ला मागे अडकवली. घड्याळात 2: 55 झाले होते.
त्या ठेल्या वाल्याला मंदीर कधी उघडतं रस्ता कुठे वगैर मी हिंदीत प्रथम विचारलं.
त्याने शुद्ध मराठीतुन मला सांगितलं.
कुठून आलात वगैरे त्याने विचारलं.
त्या तेवढ्याच टपरीवर माणसांचा काय तो वावर होता .पण आंबलेलं शरीर आणि त्या कर्कश तेलुगू डायलॉग आणि किंकाळ्या मात्र तिथे उभं राहु देत नव्हत्या.
म्हणुन थोडं समोर रस्त्यावर पाय मोकळे करावे म्हणुन चालत गेलो.सगळीकडे चिडीचुप्प होतं.
आजुबाजुला अंगावर येणारी शांतता असली की मन अनेक विचारांनी अशांत होउन उठतं.
तितक्यात मागुन एक माणुस आला म्हणला "चला मी अंबाबाईच्या मंदिरात सोडतो.."
मी नाही नको म्हटलं.तो म्हंटला "माझं घर त्याच रस्त्यावर आहे मी तुम्हाला सोडतो.."
मला आठवलं पानटपरीला माझ्या उजव्या बाजुला असलेला हाच तो माणुस. आता मी त्याला नीट पाहात होतो. सहा फुट वा त्याहुन थोडा नक्कीच उंच होता. डार्क रंग. दाट दाढी मिशी होती. शरीराने प्रचंड आडदांड..डोक्यावर एकही केस नाही.
मी त्याला नाही म्हटलं.पण तो मला पुन्हा म्हटला की त्याचं घर त्याच रस्त्यावर आहे.
मला एकदम थोड्याच वेळापुर्वी त्या पोलीसाने दिलेला इशारा आठवला की हे शहर हा भाग सुरक्षीत नाही कोणीतरी तुम्हाला गाठेन आणि लुटू किवा इजा करू शकतं..."
माझा हँम्लेट झाला काय करावं?जाउ की जाउ नये?!
पण माझं अगदी स्पष्ट एक प्रिन्सिपल आहे . मी पुढच्या व्यक्तीवर बिनदिक्कत विश्वास टाकतो.तो त्याने मोडला तर तो व्यक्ती त्याच्या कर्माने मी माझ्या कर्माने! लॉ ऑफ कर्मा नेव्हर फेल्स!
मी त्याला हो म्हटलं. कारण पहाटेच मंदिर उघडल्यावर दर्शन झालं की वाडीला जायला मला भरपुर वेळ मिळणार होता.तसंच कित्येक वर्षांपासुनची #ज्योतीबाला जायची इच्छाही पुर्ण होउ शकेल. .हे तिन्हींचं इक्वेशन पुर्ण होणार होतं.म्हणुन मी त्याला हो म्हटलं.पण मन साशंक होतं. त्याच्याकडे पाहुन कोणीही त्याला कृर म्हटलं असतं.
त्याने त्याची तिथेच असलेली बाइक आणली ; मी मागे बसलो. आणि आम्ही मंदिराकडे निघालो.
तो मला प्रश्न विचारून माहिती माझ्याबद्दल माहिती घेत होता..कधी कोल्हापुरला आले होते काय..कोणी इथे राहतं का वगैरे ..
हे सगळं शंकास्पद वाटल्याने मी मोघम उत्तर देत होतो. मुळात मी असं अनोळखी शहरात अनोळखी माणसासोबत उशीरा रात्री त्याच्यावर विश्वास टाकुन त्याच्या घरी जाण्याला कोणीही ऱ्याशनल व्यक्तीने मुर्खात काढलं असतं .
संपुर्ण रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं.हँलोजनच्या दिव्यांचा प्रकाशात रिकाम्या मेन रोडच्या आजुबाजुचे बंद दुकाने दिसत होती.
मी नकारात्मक विचार करत होतो की हा माणुस जास्तीत जास्त काय करीन मोबाईल व जवळचे पैसे लुटू शकेल...
तेवढ्यात त्याने रस्त्यावर गाडी थांबवली.माझ्या मनातील विचारांना दुजोरा मिळणारी ती कृती होती.
तो म्हणला "तुम्ही पहिले माझ्या घरी चला..! अंघोळ करा फ्रेश व्हा..मग मी तुम्हाला मंदिरात सोडतो.
मी हो म्हटलं.विश्वास टाकायचा ..बाकी लेट्स सी. हेच माझं प्रिन्सि.म्हणुन हो म्हटलं.पण मनावर नकारात्मक विचारांचं दडपण आलं होतं.
मी विचार करू लागलो हा काय करू शकतो.. मोबाईल वा जवळचे पैसे घेउ शकतो..बाकी वेळच आल्यास मी जीवावरती काही प्रसंग उद्भवल्यास मी याला प्रतिकार करत मारू शकतो का..वगैरे विचार करत होतो.
त्याने बाइक मेन रस्त्यावरून काढत छोट्या रस्त्यांवरून गल्लीतुन नेउ लागला.
तो भाग प्रमुख गावापासुन बाहेर आहे. एका घरापाशी थांबवली. तेच त्याचं घर तो बोलला.
घराच्या मागे अंधार असल्याने स्पष्ट दिसत नव्हत पण झाडी व शेत असं काहीतरी होतं.
मी शहरापासून दूर होतं हे नक्की.
आत सगळीकडे प्रचंड धूळ कचरा ..सिमेंट ..भग्न भिंती होत्या जागोजागी पांढरे कापड्यांनी वस्तू झाकल्या होत्या.
घरात इतर कोणीही नव्हतं.
मला ते विचित्र वाटलं.
तो म्हणाला घराचं रिनोवेशन सुरु आहे.
त्याने बसायला सांगीतलं आणि तो आत गेला.
मी पहिले रात्रीपासून मेलेला माझा सेल चार्जिंग ला लावला.
थोडयावेळाने तो बाहेर आला; त्याने माझ्यासाठी पाणी तापवून आणलं होतं
माझ्या मनावरचं आता दडपण नाहीस झालं होतं. अंघोळ आटोपून प्रवासातील कपडे बदलवले.फ्रेश वाटत होतं.
तो ही थोड्याचवेळात तयार झाला.
त्याचं आडनाव पवार होतं. पाहिलं नाव विसरलो.दोनेक वर्षांपासुन आठवतोय पण आजवर आठवलं नाही.
घरचे सर्वजण रिनोवेशनमुळे शेजारी दुसऱ्या घरात सध्या राहताहेत त्याने सांगितलं.
पावसाची एक छोटी सर आल्याने त्याने त्याची मोठी गाडी काढली आणि आम्ही महालक्ष्मी मंदिराकडे निघालो.
पहाटेचे पाच वाजले होते.
तो गाडीत सांगत होता की तुम्ही पानटपरीवर मंदिराबद्दल विचारतानाच मला इच्छा झाली की तुम्हाला मंदिरात सोडावं !
तुम्ही इतक्या दुरून आमच्या गावात आलात तेही फक्त दर्शनाला ..आम्ही इथल्या इथे असून जात नाही!
त्याने त्याची इतर माहिती सांगितली.
नृसिंहवाडी बद्दल विचारलं असता म्हंटला तुम्ही नशीबवान आहात काल संध्याकाळीच मंदिर मोकळं झालंय कृष्णेच पूर ओसरला!
तुम्ही जाऊन या तिथेही!
त्याने एका मंदिरापाशी गाडी थाम्बवली.
तो म्हणाला चला पहले गणपतीचं दर्शन करू!
हे आमच्या कोल्हापूरच महत्वाचं मंदिर आहे दशभुजा गणपती!
आत गेलो तर तीच मूर्ती! तेच मंदिर जे मी निघताना टीव्ही वर पाहिलं होतं! आणि विचार केला होता की कधी कोल्हापूर गेलो तर हे मंदिर शोधू!
माझ्या आनंदाला पारावर उरला नाही!
खरच काही गोष्टी.. ..संकेत ..संजोग हे #
'रॅशनली' समजत नाहीत.
तिथून महालक्ष्मी मंदिरात आलो .नुकतंच पाऊस पडून गेल्याने खाली जमीन ओली होती ..थोड्या साचलेल्या पाण्यात मंदिराचं थोडं प्रतिबिंब दिसत होतं.
सुखकारक गारवा जाणवत होता.
आत नुकतीच देवीची पूजा आटोपली होती.वातावरण एकदम प्रसन्न होतं. शेवटचा श्रावणी शुक्रवार म्हणून बायकांची गर्दी होत होती.
दर्शन आटोपलं.
पुजारी त्याच्या ओळखीचे होते.
तो म्हणाला तुम्हाला गाभाऱ्यात दर्शन घडवलं असतं पण सध्या त्याचा वाद सुरू आहे.
तिथून त्याने एका रेणुका आणि दत्त मंदिरात नेलं. कोल्हापुरात दत्त महाराज दुपारी भोजनाला येतात ही जी श्रद्धा आहे ती या मंदिरासंबंधी आहे हे कळलं.
शेवटी सकाळी ७:३०ला परत त्याने मला स्टँडवर त्याच पानटपरीपाशी सोडलं.त्याचा नंबर घेतला.मनापासून धन्यवाद म्हणून मी निरोप घेतला.
तिथून वाडील गेलो कृष्णामाईने दत्त महाराजांना स्नान घडवून ती परत वर्षभरासाठी आपल्या मार्गाने वाहण्यास गेली होती.
पलीकडच्या तीरावरील गावातील शंकराच्या मंदिरात जाऊन आलो येथीलच वेल तोडण्याची आणि चौसष्ठ योगिनिंची कथा गुरुचरित्र त सांगीतली आहे.
तेथील एका माणसाशी बोलताना तो म्हंटला की इथपर्यंत आला आहात तर टेम्ब्ये स्वामींच्या माणगाव ला जाऊन या नुकताच जयंती सोहळा आटोपला आहे तिथे!
मीही जायचं ठरवलं .
पण पुन्हा एकदा माणूसकीवर टाकलेला विश्वास ईश्वराने सार्थ ठरवला होता!
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणालाही त्याच्या बाह्य रुपावरून 'जज' करू नये हेही समजलं.
उस जरी डोंगा परी रस नव्हे डोंगा ही म्हण आणि त्या मुलाची गोष्ट आठवली.
मी माणगावला जाण्याची चौकशी करू लागलो.
(क्रमश:)

No comments:
Post a Comment