14 फेब्रुवारी 2017
"सृष्टीची उलथापालथ तर नाही ना झाली! मुंग्यान मेरू पर्वत तर गिळला नाही! वडवानलाने समुद्र तर जाळला नाही ना
मग रा.... आम्हीच अशे का रे वॅलेनटाइन्स डे च्या दिवशी सिंगल कर्मदरिद्री...!!!"
"असा मी सिंगल आसामी" व्हॅलेंटाईन दिनी दीन मी!
किती कल्पना केली होती की आजच्या दिवशी एका गुडघ्यावर डगमगत तोल सांभाळत बसुन हाती गुलाबाची कळी घेऊन "आय लब्यु"ची महिनाभरापासून रेटलेली स्पीच खडानखडा तिच्यासमोर म्हणेन पण काही नाही..शेवटी अंगणात दोन्ही गुडघ्यात वाकून उकिडवे बसत 21 दुर्वा खुडून
"..लाटेमागुनी लाट धावते
परी किनारा भेटेना...
पाप धावते पुण्यक्षेत्री...
तरीही साठा संपेना...
काळ कावळा भरतो रांजण...
खड्यामागुनी पडे खडा...
पुण्यवान मी कसा राहिलो...
कसा भरेना अजुनी घडा...
हे पाप नको...ह
हे पाप नको हे पुण्य नको...
हा जीव नको जगणेच नको...
या सर्वातुनी मोक्ष मागतो करुनी अष्टांगाची घडी...
वाहतो ही दुर्वांची जुडी . . . !!🙏🙏👏👏
वॅलेन्टाईन्स डे ला तरी "व्हॅलेंटाईन दे "
रे देवा महाराजा! प्रार्थना केली.
-अभिजीत पानसे.
No comments:
Post a Comment