Saturday 23 December 2017

एप्रिल फूल

*एप्रिल फूल*

1 एप्रिल 017

रोज डे ला ज्या गुलबकावलीवर मी गुलाबाची फुलं उधळलीत,कालपर्यंत जिने माझ्याशी प्रेमाच्या गुलुगुलू गप्पा केल्यात  तिने आज मला सरळ फ्रेंडझोन करून 'वी आर ओन्ली गुड फ्रेंड्स म्हणून मला पूर्णपणे  'फूल' बनवलं.
किमान 'वी आर जस्ट गुड फ्रेंड्स " असं "नरो वा कुंजरो वा .." सारखं निसरडं ,लवचिक वाक्य तरी म्हणायला हवं होतं ,एक चटोर आशा तरी जिवंत राहिली असती.

अच्छा सिला दिया तुने मेरे फुल का यार ने ही बना दिया ब्लडीफूल यार!!

एक फ्रेंन्झोन्ड 'फूल'



              ***


इथे (म्हणजे प्रत्यक्ष जगात) प्रत्येक जण दुसऱ्यास फूल बनवत असतो.  फूल बनवणाऱ्यालाही "फुलास सव्वाफुल" भेटून त्याचाही फूल होतो
फूल बनलेल्यासाठीही दयास्पद भाव ठेवायची गरज नाही .जो फूल बनला तो " Karma will serve him/her right.. " वगेरे कर्म सिद्धांतांच्या फुंकर स्वतःच्या जखमांवर घालून स्वतःलाच फुल बनवत असतो ,आणि तो स्वतःच दुसऱ्याला फूल बनवण्याच्या फूल शिकारीवर निघतो. फुल बनलेला तो दुसऱ्याला फूल बनवतो. तेव्हा तो स्वतःच्या जखमांवर घातलेली फुंकर विसरून गेला असतो.

"एकमेकांस फूल बनवू अवघे बनु मूर्ख" हे 'फूलांचे' रहाटगाडगे या जगण्याच्या राहाटगाडग्यासोबत पूर्वीही असेच सुरु होते. सुरु राहणार.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

- Abhijeet Panse

No comments:

Post a Comment