14 मे2017
* पेड यशोदा*
एका यशस्वी स्त्री ,पुरुषामागे मागे प्रकाशझोतात न आलेली एक व्यक्ती असते. तसेच आजच्या काळात करिअर करणाऱ्या आईच्या यशामागे बऱ्याचदा एक स्त्री असते. लग्नानंतरही करिअर करणाऱ्या स्ट्रॉंग स्त्रियांसाठी ही स्त्री एक पेड यशोदाच असते. जी मुलाची सर्व काळजी घेते. खाऊ घालते शी सु करून घेतल्यापासून इतर खेळ प्रगतिकारक ऍक्टिव्हिटीज करून घेते. ही स्त्री म्हणजे पाळणाघर, डे केअर चालवणारी स्त्री.
आजच्या काळातील सुसंगत बदल, वा काढलेला उत्तम मार्ग किंवा योग्य तडजोड म्हणजे पाळणाघर म्हणता येईल. यामुळे आजच्या आधुनिक आई ला पाळणाघरात आपलं मुल ठेऊन निर्धास्त होऊन बाहेर काम करता येतं.
प्रत्येकवेळी आजी आजोबांनीच नातवंडांना किंवा कोणी जवळच्या नातेवाईकांनी संभाळावं ही अपेक्षा का करावी! बरेचदा ते शक्य असतं व नसतं. त्याला इतर अनेक पैलू असतात.
म्हणून डे केअर हे सर्वोत्तम, सकारात्मक योग्य पर्याय असतो.
अनेक प्रोफेशनल डे केअर मध्ये तेथील सर्व कर्मचारी मावश्यांची नियमित वैद्यकीय चाचण्या करूनच त्याना घेतलं जातं. स्वच्छतेचे निकष पाळले जातात.
मुलांकडून अनेक चांगल्या गोष्टी करून घेतल्या जातात, शिकवल्या जातात.
इतर मुलांच्या सोबत राहताना लाजरे बुजरे मुलं धीट होतात. कित्येकदा तर आपल्या मुलांना वेवेगळ्या गोष्टी येतात बघून पालकही आश्चर्यचकित होतात. याचं श्रेय जातं पाळणाघराला. तिथे आईप्रमाणेच मुलांची काळजी घेतली जाते. यामुळे बरेचदा करिअर न करणारी आईसुद्धा आपल्या मुलाला चांगल्या डे केअर मध्ये सोडते.
पहिल्या दिवशी रडणारं मुल आणि क्वचित आईसुद्धा; पुढे तेच मुल डे केअरला आनंदाने जाऊ लागतं कारण तिथे नवीन मित्र झाले असतात.
समवयस्क सोबत खेळताना प्रगती होते.भाषा ज्ञान, शब्दसंग्रह वाढतो.
व्यक्तिपरत्वे वेगवेगळे सकारात्मक नकारात्मक अनुभव लोकांना येऊ शकतात.
पूर्वीची दाई मा आज डे केअर, पाळणाघर झालंय.
आजच्या काळातील आईसाठी, स्त्रीसाठी पाळणाघर हे अत्यन्त उपयोगी आहे.
जन्म देणारी देवकीच नाही तर ही पाळणाघरातील यशोदा ही तितकीच या मुलांसाठी महत्वाची असते त्यामुळे मातृदिनी यांच्यासाठीही कृतकृत्यभाव ठेवायला हवा.
आजच्या स्ट्रॉंग यशस्वी देवकीच्या मागे ही पेड यशोदा असते.
#मदर्सडे
- अभिजित पानसे

No comments:
Post a Comment