लोकप्रभा साप्ताहिक
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1314660051956221&id=100002367160839
*शेड्स ऑफ माईंड*
"ऑड मॅन ऑड वूमन ची जगात जगताना नेहमी परवड होत असते. पण वेगळ्या इच्छा असणं म्हणजे विकृती ठरवण्याचा अधिकार जगाला कोणी दिला?
'शृंगार' रस हा मानवी भाव भावनांमधील सप्तरसातील एक आहे. चार पुरुषार्थांमध्ये 'काम' हा सुद्धा एक पुरुषार्थ आहे.
वात्सयानाच्या कामसूत्रापासून पासून खजुराहो या उच्च कलाकृती , अभिव्यक्ती पर्यंत तर बस, रेल्वे स्टेशनवरील मिळणाऱ्या पिवळी पुस्तकं सगळ्यांनी आपापल्या परीने ,वैचारिक योग्यतेने या रसाचे वर्णन ,चित्रण केलं आहे. संपूर्ण विश्वात काम, शृंगार रसावर पुस्तके लिहिली गेली आहेत.चित्रपट , डॉक्युमेंटरीज तयार केले गेले आहेत. त्यातील काही 'क्लासिक' आहेत तर काही व्यवहारिक मसाला.
पण या शृंगार रसाला वेगवेगळ्या दृष्टीने, पैलूंने , दर्शवल्या वा शब्दबद्ध केले गेले आहेत. पण यात एक तर लेखक हा निरीक्षकाच्या भूमिकेत असतो वा ते पुरुषांच्या दृष्टीने त्याच्या इच्छा आकांक्षाचं प्रतिबिंब दर्शवलेलं असतं .
'फिफ्टी शेड्स ऑ ग्रे " या अत्यन्त सुप्रसिद्ध, हिट झालेल्या ट्रायलॉजी पुस्तकात मात्र पुरुषासोबत स्त्री च्याहीइच्छा , हिडन डिझायर्स , फँटन्सीज यांची बाजू दाखवली आहे.
मैत्रीच्या नात्यात दोघेही सारखे असतात त्यात वर्चस्व गाजवण्याची इच्छा नसते. पण दोन विरुद्धलिंगी ,प्रेम वा आकर्षण मग ते शारीरिक असो वा मानसिक या नात्यात एक 'एलिमेंट' असतो तो म्हणजे डोमिनेशन आणि सबमिशन . वर्चस्व आणि शरण जाणे. हेच गुप्तपणे तर कधी उघडपणे लैंगिक नात्यांमध्येही असतं.
'माया' या विक्रम भट च्या पहिल्या वेब सिरीजचा विषय हाच आहे.
नुकतीच विशेष फिल्म्सची ही सीरिज संपली आहे.
सोनिया ही तरुण , सुंदर अभिषेक या यशस्वी शस्त्रक्रियातज्ञाची बायको; एका राहुल नावाच्या माणसाला त्याच्या बंगल्याबाहेर हाका मारत भेटण्यासाठी ओरडत आर्जव करत असते . तो राहुल मात्र तिच्या समोरून तिच्याशी न बोलता निघून जातो. रात्री
सोनियाचा नवरा अभिषेक घरी येतो तेव्हा ती तंद्रीत गेलेली सैरभैर झालेली आढळते. तिला गेले सहा माहिन्यातील काहीही आठवत नसतं.
तिला हॉस्पिटल मध्ये नेल्यावर डॉक्टर सांगतात की सोनीया एक मनोरोगामुळे त्रस्त आहे त्यामुळे गेले सहा महिन्यांची तिची स्मरणशक्ती गेली आहे. ती कदाचित खूप मानसिक वेदनामधून गेली असावी.
नक्की काय झालंय हे समजण्यासाठी तिचा लॅपटॉप हा एक दुआ असतो.
पासवर्ड नसल्याने तिचा लॅपटॉप एका आयटी स्पेशालिस्ट कडून उघडतो .आणि सोनियाच्या आयुष्यात गेले सहा महिने नक्की काय झालं हे त्याला कळतं . त्याच्यासाठी ते भयंकर असतं .
हा या सीरिज चा पहिला भाग आहे.
मानवी मन हे खूप किचकट असतं .ठरवल्यास सोपं सरळ ही होतं सैल सोडल्यास विचित्र किचकट गुंतागुंतीचंही होतं.
सगळं काही जवळ असताना सुखी असताना उगाच मन दुःख शोधू लागतं. मग पोकळपणा वाढू लागतो आणि ती पोकळी भरायला इतरत्र धावू लागतं.
बिडीएसएम , बॉडी डॉमिनंस, सॅडीजम, मॅसोचिझम ,पेन ही लैंगिक भावनांची आणखी एक वेगळी बाजू. यावरच फिफ्टी शेड्स पुस्तक आधारित आहे आणि या पुस्तकावरूनच माया ही वेब सीरिज प्रेरित आहे.
रोजच्या आयुष्यात मानापमान सहन करताना , नोकरी करताना घर संसार संभाळताना जे मुळात मानसिकरित्या वर्चस्ववादी असतात त्यांच्या सुप्त मनात वर्चस्व गाजवण्याची सुप्त इच्छा कायम असते पण बाहेर व घरात ते ना गाजवता आल्यास ते लैंगिक गोष्टींमध्ये त्याचे प्रतिबिंब दिसते.
'बिडीएसएम 'हा याचाच एक भाग आहे. हाच विषय आहे माया सीरिज चा.
सोनिया आणि अभिषेक हे एक शहरी ,सर्व सुखसोयींनी परिपूर्ण, सुखी (?) असे वरवरून दिसणारे एक जोडपं .यात सोनिया मात्र आत सतत गुदमरत असते. तिला जे हवं असतं ते जगाच्या दृष्टीने विकृती असते. तिला लैंगिक संबंधतात शरणार्थी म्हणून भूमिका करायची असते. वेदना हव्याहव्याश्या वाटत असतात.
तर त्याच शहरात राहुल नावाचा एक इंजिनीअर आपल्या थंड आणि विक्षिप्त बायकोसोबत राहताना आणि अपमान करणाऱ्या सासऱ्या सोबत काम करताना सतत आतल्या आत कुढत असतो. वर्चस्व गाजवायची मूळ इच्छा त्याची अजून वाढत जाते.
कर्मधर्मसंयोगाने एका बिडीएसएम वेब साईट मुळ दोघांचीे भेट होते. दोघेही एकमेकांसाठी लैंगिकरित्या परिपूर्ण आणि कंप्याटिबल असतात.
दोघांचं हे जगाच्या दृष्टीने विचित्र इच्छा असलेलं नातं बहरत जातं. पण समाजात राहताना या गोष्टी सोप्या नसतात. पुढे अजून किचकट होतात.
या सिरीजचा विषय हा बोल्ड आहे. चित्रिकरण तितकं बोल्ड नाही.
कथेची मांडणी चांगली झाली आहे. पण एकंदरच सीरिज मनाला भिडत नाही.
ही वेब सीरिज विक्रम भटच्या इतर चित्रपटांप्रमाणे वाटते. एक चित्रपट बनवून त्याचे दहा भाग विभागून ती दाखवणे म्हणजे वेब सीरिज होत असेल तर हे मान्य नाही.
सोनियाच्या पात्राला शमा सिकंदर ने न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे.पण दहाही भागांमध्ये ती एकच भाव दाखवत सपाट चेहऱ्याने वावरली आहे.
विपुल गुप्ता म्हणजे राहुल याने आजवर अनेक टीव्ही मालिका केल्या आहेत. संपूर्ण कथा मुख्यत्वे या दोघांवरच आहे.
कथेचा चा शेवट हा या सीरिज ची जमेची बाजू. एक योग्य शेवट दाखवला आहे.
ऑड मॅन/ वूमन आऊट असलेल्या व्यक्तीची नेहमीच समाजात जगताना परवड होत असते.
काहींचे इच्छा , स्वप्न, विचार वेगळे असतात. पण वेगळे विचार इच्छा म्हणजे विकृती ठरवण्याचा अधिकार समाजाला कोणी दिला? आपलं आयुष्य आपल्यानुसार ,आपल्याला जुळणाऱ्या व्यक्तीसोबत घालवण्याचे प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असतंच. असायलाच हवं.https://m.facebook.com/story.php?story_fbid=1314660051956221&id=100002367160839
No comments:
Post a Comment