"सोनम" हे काही फक्त कोण्या हिंग लावुन न विचारणाऱ्या पेज थ्री अभिनेत्रीचंच नाव असू शकतं असं नाही,
ते एका सर्वसामान्य घरातील मुलीचही नाव असू शकतं. असणारच.
'गुप्ता' आडनावाचे देशभरात सर्व सामान्य लोक ही असू शकतात!महाराष्ट्रातही!!आहेच.
मुळात "सोनम गुप्ता" नावाच्या मुली, स्त्रीयाही असू शकतात.असणारच!
अश्यावेळी सतत त्या नावावरून थिल्लर जोक्स करून ते व्हायरल करणं ही सामाजिक आणि नैतिक विकृती आहे.
कोण व्यक्ती कसल्या स्वभावाचे असू शकतं याची कोणाला कल्पना नसते. मृदू , हळव्या स्वभावाची मुलगी स्त्रीच्या किंवा तिच्या कुटुंबियांच्या मनावर या सर्व थिल्लर विनोदाचा किती वेगळा वाईट परिणाम होऊ शकतं याची कोणाला कल्पना केली आहे का? ज्या प्रकारे यावर जोक्स सुरु आहेत हे असंच सुरु राहिलं तर पुढे 'या नावाच्या " व्यक्तींना घरातून बाहेर पडणं कठिण होऊन जाईल!
दुसऱ्याच्या जखमांवर खिल्लीच्या चोचा मारणारे #गिधाडं हजारो लाखोंनी अवतीभवती असतातच.ते लोक "या नावाच्या " मुलींचं जगणं दुष्कर करतील.
एरवी गंमती, विनोद,खिल्लीउडवणे,शाब्दिक चिमटे घेणे घ्यायला पब्लिक फिगर्स,राजकारणी, सेलेब्स, आजूबाजुची परिस्थिती, होणारे बदल आपल्यासाठी आहेच.कारण त्यांच्यावर यांचा काहीही परिणाम होणार नसतो.
पण ज्या नावाच्या मुलींना ,स्त्रीयांना बघितलही नाही.त्यांच्यांवर असले जोक्स पसरवुन त्यांची "बदनामी "करणे सामाजिक नैतिक गुन्हाच आहे.
आणि याला "सेन्स ऑफ ह्यूमर" समजणाऱ्यांसाठी त्याच्या नावावर खपवणाऱ्या लोकांना फक्त दया भाव दाखवायला हवा!
आता तर कोण्या विकृताने "सोनम गुप्ते" या मराठी नावाचं फेक अकौंट सुरु करून एका खऱ्याखुऱ्या स्त्री चा फोटो ही अपलोड केलेलाय!
मुलींच्या नावांनी फेक अकौंट उघडून त्यावर स्त्री,मुलीचा फोटो ठेवणे म्हणजे पूर्णपणे विकृतीच वाटते!हे लोक मानसिकरित्या नपुंसक असतात!
विचार करा आज सोनम गुप्ता नावाने जोक्स सुरु आहेत .उद्या तुमच्या आपल्या आई,बहीण मैत्रिणींचे नाव असलेले जोक्स होतील.तेव्हा परिस्थिती फक्त हसत असेल.
सोशिअल मीडिया द्वारे आधीच बरीच विषारी भावना पसरवल्या जाताहेत त्यात अश्या थिल्लर विनोदामुळे कोण्या अनोळखी मुलींची आणि तिच्या घरच्यांची बदनामी करायला नको!
शाकाहारी ,मांसाहारी जोक्स, विनोदांसाठी हजारो आजूबाजूला 'विषय'आहेत. विनोद करणे टर उडवणे ही नैसर्गिक प्रवुत्ती. पण कोणाची चुकी नसताना अशी बदनामी नको! एरवी स्त्री दक्षिण्याच्या गप्पा आणि आता असली विकृती!
नाहीतर उद्या या दुधारी तलवारीची आतील धार ती तलवार चुकीच्या पद्दतीने वापरणाऱ्या व्यक्तीचा गळा चिरल्याशिवाय राहणार नाही.
सामाजिक आणि नैतिक जाणीव ठेऊन सर्वांनी हे जोक्स व्हायरल करणं, लाईक करणं आता बंद करायला हवं. हा संदेश जास्तीत जास्त पसरायला हवा!
-अभिजीत पानसे.

No comments:
Post a Comment