*विवाहित स्त्रीची मन की बात*
मे 2017, लोकप्रभा
डायरी ही प्रत्येकाची वैयक्तिक गोष्ट असते. म्हणजे एकेकाळी होती. डायरीत स्वतःच्या मनातील प्रामाणिक भाव, विचार, संकल्प, मूळ स्वभाव सर्व उतरत असतो. डायरी ही जणू आपल्या दाटलेल्या भावनांचं ,विचारांचं 'व्हेन्ट' असतं. नकारात्मक भावनांचं प्रदूषण बाहेर काढणारी मनःरुपी घराची चिमणी असते. मानस शास्त्रीय एक सिद्धांत वा एक अनुभव असा आहे की मनातील भावना ,विचार एकदा कागदावर उतरवले की पुन्हा ते मनात प्रकट होत नाहीत.त्यामुळे मनोरोगतज्ञ , सायकोलॉजिस्ट सांगतात की नको असलेल्या विचारांचा खूप त्रास होत असल्यास , त्यांचा बंदोबस्त करावयाचा असल्यास ते विचार कागदावर ..डायरीत लिहून काढा म्हणजे ते पुनः मनात येत नाहीत. आणि हा अनुभव, प्रयोग करून बघितल्यास नकीच हा मानसशास्त्रीय प्रमेय सप्रमाण पटेल. जणू आपले वैचारिक प्रदूषण , भाव भावनांचं वादळ डायरीचा कागद शोषून घेतो.सगळं बाहेर पडतं. पुन्हा आत शिरत नाही. यामूळे एक फायदा होतो की आपल्या मनात ज्या नात्याविषयी , व्यक्तीविषयी काही अश्या भावना असल्यास ज्या आपण त्या व्यक्तीला सांगू शकत नाही कारण त्यामुळे नातं बिघडू शकतं पण मनात ठेवल्यास आपलेच मानसिक स्वास्थ्य बिघडू शकतं अशी परिस्थिती असल्यास डायरीत लिहिणे हा सर्वोत्तम उपाय असतो.
नातं ही टिकून राहतं.आणि व्यक्तीच्या मनातील भार ही हलका होतो. कारण आपल्या मनातील भाव, विचार कोणाला तरी सांगणे , 'जज' न करता संकल्पना न बनवता कोणी आपलं ऐकून घेणे ही प्रत्येकाची मूळ मानसिक गरज असते. व्यक्ती नसल्यास डायरीत लिहिल्या जातं. डायरी जणू मन कि बात असते.
पण आता डायरी ची जागा सोशिअल मीडियाने घेतल्याने सगळेच बहि:मुख् झाल्याने आपल्या गोष्टी ही सोशिअल साईट्स रुपी डायरीत लिहिली जाते.
आणि एकेकाळी कोणी आपली डायरी वाचली की चिडून "माझी डायरीला माझ्या परवानगीशिवाय कोणी हात लावला?" असे विचारणारे आज सोशिअल मीडियावर "किती लोकांनी आपलं वयक्तिक माहिती ,लिखाण वाचावं म्हणूं आर्जवं करतात आणि 'लाईक्स चे अंगठे " मोजतात.
कालाय तस्मै नमः!
पण मुद्दा हाच की डायरीची जागा कागदापासून , सोशिअल मीडिया पर्यंत गेली आहे ते स्वतः स्टेज वर लोकांना आपल्या वैयक्तिक गोष्टी विनोदी ढंगाने सांगून स्टॅन्ड अप कॉमेडी करणे ही झाली आहे.
तेव्हा डायरी ही "मन की बात" असते. प्रत्येकाला आपल्या मन की कोणाला तरी सांगायची असते. विवाहित स्त्रीला तर मग बरेच सांगायचं असू शकतं ना!!
तर अशीच आहे ही एका वैवाहिक स्त्रीची मन की बात, "मॅरीड वूमन्स डायरी" !
डायरी या विषयावरील प्रस्तावना जरा गंभीर झाली पण ही स्त्रीच्या दिल की बात ची वेब सीरिज मात्र बिलकुलही गंभीर किंवा जड नाही.खूप टवटवीत , विनोदी ढंगात्मक, हलकीफुलकीच आहे.
हातात माईक घेऊन समोर प्रेक्षक आहेत असे गृहीत धरून वा दाखवून शाब्दिक विनोदात, कोट्यात आयुष्यातील घडामोडी सांगणे अश्या प्रकारे काही इंग्लिश कार्यक्रम पूर्वी झालेले आहेत.या ढंगावरच ही वेब सीरिज आहे.
श्वेता नावाची सुंदर ,तरुण स्टॅन्ड अप कोमेडीयन असलेली बायको आपल्या नवऱ्याबद्दल , त्यांच्यातील रोजचे प्रसंग, घडामोडी , तिच्या मनातील त्याच्याविषयीचा भाव , कधी गंमतीचा राग , कंटाळा, सासू च्या गोष्टी, संसाराबद्दल च्या गोष्टी ती काल्पनिक प्रेक्षकांसमोर सांगताना दाखवली आहे. सोबत मागून रेकॉर्डेड लाफ्टर जोडीला असतंच.
तिचा नवरा ऋषी हा अल्लड , खूप जबाबदारी ना घेणारा असा, नेहमीच रोमँटिक मूड मध्ये असलेला आणि कधी आपल्या प्रेमामुळे तिला भंडावून सोडणाराअसतो.
असेच छोटे छोटे भाग या सीरिज चे आहेत.
अंडेश , टूथब्रश , सिक्रेट अफेअर , लेझी स्पर्म हे काही मजेदार नेटिसोड या सिरीमध्ये आहेत.
श्वेता करिअरला महत्व देणारी आधुनिक स्त्री असते तर ऋषीला कुटुंब वाढवायच असतंम्हणून तो तिच्या मागे लागतो तो भाग मस्त आहे.त्याला टाळायला श्वेता एक युक्ती करते.ती त्याला अजून तो वडिलांची जबाबदारी पेलण्यास तयार नाही हे त्याला पटवून देण्याचा प्रयत्न करते तेही मस्त झालंय आणि तरीही तो मागे लागल्यावर त्याला एक अंडं देते आणि त्या अंड्याला बाळ म्हणून एक आठवडा वागवण्याचं चॅलेंज देते. जर तो यशस्वी झाला तरच आपण कुटुंब वाढवू अशी शर्थ ठेऊन ती तात्पुरता मार्ग काढते.
तेव्हापासून तो त्या अंड्याची बाळासारखी काळजी घेऊ लागतो. आणि त्याचं नाव ठेवतो 'अंडेश' ! हा वेबिसोड खूप विनोदी जमलंय.
या सीरिज ची खरी जान, कणा आहे ती श्वेता म्हणजे सुझाना मुखर्जी. यात जेव्हा सुझाना मुखर्जी या अभिनेत्रीला बघितलं तेव्हा खूप आश्चर्यचकित झालो कारण तिला यापुर्वी काही सिनेमांमध्ये बघितलं होतं. तेव्हा तिच्यात इतका सहज भाव अभिनय आणि विनोदबुद्धी असेल याची पुसटशीही कल्पना नव्हती. ती एम टीव्ही रोडीज मध्येही काही भागांसाठी स्पर्धक म्हणून होती. पण 'मॅरिड वूमन्स डायरी " ही सीरिज जणू तीचासाठीच बनली आहे असं वाटतं.
दिसायला अत्यंत सुंदर ,आकर्षक , मादक नितळ कांतीचा चेहरा , आणि तितकाच अचूक भाव दाखवणारा भावदर्शी चेहरा आणि अभिनय .उत्स्फूर्त आणि योग्य संवादफेक .आणि या साऱ्यास अगदी चेरी ऑन द केक अशी विनोदबुद्धी. यामुळे ती अगदी या सीरिजला स्वतःच्या खांद्यावर एकटी पेलते. सुझाना मुखर्जीला बघणे म्हणजे डोळयांना मेजवानी आहे हे ही सीरिज बघताना हमखास पटेल.
जन्माने ती अर्धी युक्रेनिअन आणि अर्धी बंगाली आहे. दोन्ही तत्वांतील जणू सर्वोत्तम घेऊन ती बनली आहे असं वाटतं. नितळ चमकदार कांती आणि चेहऱ्याची बंगाली ठेवण याचा सर्वोत्तम मेळ तिच्यात आहे.
ही सीरिज बघताना तिच्यासारखी अभिनेत्री सिनेसृष्टीत अजून चमकली कशी नाही आश्चर्यही वाटतं.
अर्धी विदेशी असून तिची हिंदीवरची कमांड अप्रतिम आहे.तिची कतरीना कैफ झालेली नाही.
ही वेब सिरीज एका 'निरोध' तयार करणाऱ्या कंपनीने स्पॉन्सर केली आहे.त्यामुळे हलकीशी बोल्ड वाटु शकते.
सम्पूर्ण सीरिज ही आधुनिकरित्या मांडलेली आहे.
यातील गंमतीजमती काही नविन नाही या विषयावर बरंच बघितल्या गेलं आहे. पण या सिरीजची ट्रीटमेंट अगदी टवटवीत आहे. आणि सर्वोत्तम गोष्ट म्हणजे यात सुझाना मुखर्जी आहे.
एक हलकी फुलकी ,मनोरंजन करणारी थोडी पाश्चिमात्य धाटणीची ही विवाहित स्त्रीची मन कि बात असलेली वेब सीरिज आवर्जुन बघायला हरकत नाही.

No comments:
Post a Comment