ब
सने जवाहर बोगदा पार केला आणि आम्ही काश्मीर खोऱ्यात प्रवेशते झालो. सहा तासांपासून असलेला घाटरस्ता संपून सरळ रस्ता सुरु झाला. पोटातील स्नायूंचा वळणदार व्यायाम संपला एकदाचा! या व्यायामामुळे अनेक यात्रेकरूंनी प्रवासात 'उलट' उत्सर्जन कर्म केले होते.
पुढे एक गाव लागलं ,इथून बसेसचे रस्ते वेगळे झालेत. आमची बस पहलगामला जाणार होती तर बाकी काही बसेस बालतालला जाणार होत्या.
बालतालला जाताना श्रीनगरहुन जावं लागतं तर
पहलगामला जाताना अनंतनाग पार करावं लागतं.
त्या गावापासून अनंतनागकडे जायचा फाटा फुटतो. आमच्या आणि काही बसेसने उजवीकडे वळण घेतलं आणि अनंतनागकडे आमचा छोटा ताफा धावू लागलो.
सामान्य ज्ञानात अगदीच सर्वसामान्य असलेल्या व्यक्तीलाही अनंतनागबद्दल ,तेथील आतंकवादी चकमकींबद्दल माहिती असतं, कारण वर्तमानपत्रात काश्मीरमधील नकारात्मक बातम्या काही असतील तर त्यात अनंतनाग जिल्हा बरेचदा आढळतोच .
अनंतनाग हे दक्षिण काश्मीरातील एक स्फोटक, विघटनवाद्याचा खूप जास्त प्रभाव असलेलं शहर आहे.
यावर्षी अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर हल्ला झाला ; ज्यात काही यात्रेकरू 'शहीद' झालेत, तो हल्ला अनंतनागजवळच याच फाट्यावर झाला होता.
मी यात्रेकरूंना 'शहीद' म्हटलं कारण अमरनाथ ही यात्रा धार्मिक न राहता राष्ट्रीय यात्रा हळूहळू व्हायला लागते. आणि शेवटी ती फक्त सर्वसामान्य भारतीय माणसाची देशविघातक प्रवृत्तींविरोधी, राष्ट्रीय यात्रा होते. सैनिक शस्त्रानिशी तिथे झुंजत असतातच पण दरवर्षी आतंकवादी कारवायांना न जुमानता, धमक्यांना न घाबरता 'आपल्या' देशातील जमीनीवर जाऊन शंकराच्या पिंडीचे दर्शन घेणारा सामान्य माणूस, भारतीयही एक जिगरबाज निःशस्त्र सैनिक होऊन जातो.
या अमरनाथ यात्रेमुळे दरवर्षी हजारो लोक त्या विघटनवादी भागात जाऊन बम बम भोले ची आरोळी देतात यामुळे भावनीकरित्या नकळतपणे तो भाग देशाशी पक्का जोडला जातो. कारण फक्त भारतीय सैन्य आणि तिरंगा फडकत ठेऊन तो भाग कागदावरजरी भारतातील असला तरी जोवर कन्याकुमारी, कांचीपुरम ,म्हैसूर ते मुंबईपासून देशभरातील सर्वसामान्य भारतीय नागरिक काश्मिरात जात नाही तोवर तो शेवटचा भाग भारतात असल्याचे मनाला भासत नाही. म्हणून ही यात्रा नकारात्मकतेविरुद्ध, हिंसेविरुद्ध, द्वेषाविरुद्ध आहे आणि प्रत्येक यात्रेकरू हा त्यातील एक सैनिक असतो. म्हणून आजवर अमरनाथ यात्रेकरूंवर अनेक हल्ले झालेत , त्यात मृत्यमुखी पडलेले सर्व यात्रेकरू हे सैनिकाप्रमाणे 'शहीद' ठरतात.
बस अनंतनागमध्ये शिरली . पहलगामच्या दिशेने शहरातून बाहेर पडत धावू लागली. अनंतनाग शहर मोठं, आणि स्वच्छ दिसत होतं. मी तिसऱ्यांदा इथे आलो होतो . पण यावेळी मला जे दिसलं ते भयप्रद होतं, धक्का होता बसमधील प्रत्येक यात्रेकरूंना!
जवळपास पाच एक ठिकाणी घरावर, चौकातील भिंतीवर लिहिलेलं होतं ," बुऱ्हान वाणी इज अवर नॅशनल हिरो!"
"इंडिया गो बॅक"
"हिंदुस्तान मुरदाबाद"!
ज्या ज्या यात्रेकरूंनी बसच्या खिडकीतुन हे बघितलं त्यांनी इतरांना ते दाखवलं, कुजबुज सुरू झाली.
8 जुलै 2016 साली लष्करे तोयबाचा प्रमुख बुऱ्हाण वाणीचा खातमा भारतीय लष्कराने केला होता. त्यावेळीही अमरनाथ यात्रा सुरू होती. त्या क्षणापासून काश्मीर खोऱ्यात संचारबंदी , चकमकी झाल्या होत्या . जवळपास दोन महिने तेथे संचारबंदी, हिंसा सुरू होती. त्यावेळी अमरनाथ यात्रा रद्द झाली होती पण त्यानंतर खोऱ्यातून बाहेर पडेपर्यंत जे यात्रेकरूंचे हाल झाले ते ऐकून थरकाप उडतो. हजारो यात्रेकरू बालतालच्या छोट्या कॅम्पमध्ये अडकले होते. सर्व सुविधा, परिवहन ठप्प झाले होते. असो तो वेगळा विषय आहे. त्यावर पुढे कधीतरी.
पण तरीही यावर्षीही यात्रेकरू न डगमगता , आतंकवादी धमक्यांना न घाबरता यात्रेला आले होतेच. म्हणूनच ते 'सैनिक' वाटतात.
8 जुलैला बुऱ्हाण वाणीच्या मृत्यूला एक वर्ष होणार होतं. त्यामुळे पुन्हा काहीतरी गडबड होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.
पण ते भारताविरुद्धची जाहिरातबाजी, फलक बघून अमरनाथ यात्रेची दुसरी बाजू लक्षात आली. सगळेजण तोवर प्रवासाची मजा घेत होते पण आपण नक्की कुठे आलो आहोत , येथील धोके काय आहेत हे आता सगळ्यांच्या लक्षात आले होते.
अनंतनागच्या बाहेर येताच ,पहलगामच्या रस्त्यावर येताच निसर्गाचे रूप पालटले, सुंदर हिरवा निसर्ग, मोठमोठे पर्वत दिसू लागले.
दोन्ही बाजूंना अत्यन्त सुंदर शेती होती. लाकडी बांधकाम जास्त असलेली घरं होती. धिप्पाड चिनार वृक्ष उभे होते आणि इथून दिसू लागली एक उनाड अवखळ , चैतन्याने भारलेली एक सखी, लिडर नदी.
अत्यन्त वेगवान प्रवाहात ती वाहत होती. पाणी शुभ्र , निळसर, आणि अत्यन्त फेसाळत होतं कारण वेग प्रचंड होता. ही लिडर नदी मैत्रीण संपूर्ण यात्रेमध्ये सोबत असणार होती.
बस पहलगाम बेस कॅम्पला थाम्बली.
आजूबाजूला प्रचंड सैनिकी संरक्षण.
अमरनाथ यात्रेचा सगळ्यात मोठा बेस कॅम्प हा पहलगाम बेस कॅम्प असतो.
जम्मू बेस कॅम्पमधून महत्वाचा टप्पा पहलगाम बेसकॅम्पमध्ये आलो होतो. आजूबाजूला खूप तंबू होते. दुसऱ्या दिवसापासून खरी पायी यात्रा सुरू होणार होती. फक्त एक रात्र या बेसकॅम्पमध्ये तंबूत घालवायची होती. आणि एक सुंदर अनुभव घ्यायचा होता.http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5061818157954376371&title=Amarnath%20Yatra%20%E2%80%93%20Part%209&SectionId=1002&SectionName=Be%20Positive&TagName=Amarnath%20trek

No comments:
Post a Comment