"He was a first n one n only genuine vegetarian faster bowler I have ever seen!" हर्षभोगले हे ज्याच्याबद्दल म्हणायचा, म्हणतो तो म्हणजे "जवागलश्रीनाथ" !
क्रिकेट पाहणं आणि प्लास्टिक बँटने खेळणं सुरू केलं तेव्हापासुनचा मनापासुन आवडलेला एक खेळाडू.
तत्कालीन महान स्टार्सच्या तेज आणि चमकपुढे नेहमीच राहिलेला हा एक अनसंग हिरो!
भारतीय बॉलर्स नेहमीच मिडियम पेस्ड बॉलर्स असतात अशी खिल्ली उडवणाऱ्या काळात झिम्बॉब्वेचा कॅप्टन Aलिस्टर कँम्पबेलने म्हटलं होतं; अॅलन डोनाल्डपेक्षाही जवागल श्रीनाथने वेगवान बॉलिंग 97 च्या टूरमध्ये केली होती.157Kmph!
त्याच टूरमध्ये ग्रँटफ्लॉवरने म्हटलं होतं की श्रीनाथचा एक बॉल इतक्या वेगाने त्याच्या थाय पड ला लागला होता की त्याला वाटलं की त्याचं मांडीचं हाड मोडलं.
'दसरा' सण आला तरी कित्येक वर्ष आठवायचा.. अजुनही आठवतो तो जवागल श्रीनाथ अनिलकुंबळे ,बँगलोरची ऑस्ट्रेलियाविरूद्ध डे नाईट महत्वाची मॅचआणि त्याहुन वेगळी गोष्ट म्हणजे श्रीनाथ आणि अनिल कुंबळेच्या आईंची उपस्थिती!
सचिनने एकट्याने किल्ला लढवुन ९० रन्स काढुन आठव्या विकेटच्या रूपाने परत गेला.भारताचा पराभव अटळ आहे हे कोणीही तेव्हा स्पष्ट सांगितलं असतं.
म्हैसुरचा दसरा हा खुप रॉयल आणि वड्डियार राजवाड्यात रोषनाई करून जल्लोषात साजरा केला जातो.
पण म्हैसुर स्टेटमध्येच जन्मलेला श्रीनाथ आणि कुंबळे त्या दसऱ्याला रात्री बँगलोरच्या चिन्नास्वामीस्टेडियमवर होते. दोघांच्याही आई त्यावेळी सामना बघण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उपस्थित होत्या! त्यामुळे तिथेच मैदानावर दसरा साजरा करण्याचं दोघांनीही ठरवलं आणि त्यानंतर जे दोघांनी मिळुन अद्भुत पराक्रम केला तो शब्दातीत होता!52 रन्स ची नाबाद
पार्टनरशीप!
कॅमेरा सतत दोघांच्या आईंवर असायचा! त्यांची तगमग ..आनंद ..उत्साह सर्व अप्रतीम..कधीही न विसरणारा सामना..आणि त्यामुळे तो दसराही..
दोघांनी मिळुन देशाचं पराभवाच्या दाट छायेतुन सिमोल्लंघन केलं. भारत टायटन कपच्या फायनलला पोहचला..आणि पुढे फायनलमध्ये साउथ आफ्रिकेविरूद्ध इतिहास घडला तो सर्वांना माहिती आहे.सचिनतेंडुलकरच्या छोट्या आणि अपयशी कप्टनशीपमधलं हा टायटन कप चमकणारा हिरा आहे.
काही दिवसातच भारत सा. आफ्रिका टूरला गेल्यावर सपशेल हारला.ती टेस्ट सिरीज राहुलद्रविडच्या पहिल्या पहिल्या टेस्टसेंचुरीसाठी, डँरेल कलिनन ,अँलन डॉनल्डच्या आतंकवादासाठी ओळखली जाते..ती वनडे सिरीज गांगुलीच्या फ्लुएंट ऑफ ड्राइव्ह..सचिन आणि द्रविडला फायनलमध्ये अँलनडॉनल्डने केलेली शिवीगाळ मुळे आठवली ओळखली जाते
पण या दोन महिन्यात झालेल्या द.आफ्रिकेविरूद्ध भारतातील खेळलेल्या ६ टेस्टमँचेसमध्ये जवागलश्रीनाथने जो पराक्रम गाजवला तो कोणाच्या लक्षात राहत नाही.
भारतातील पहिल्या टेस्टमध्ये सा.आफ्रिकेविरूद्ध एक वेगळाच रेकॉर्ड श्रीनाथने केला.आफ्रिकेसमोर अगदी साधं 169 चं टारगेट असताना सहज जिंकतील वाटत असताना शेवटच्या स्पिन फ्रेंडली ट्र्याकवर वीस एक रन्स देउन सहा विकेट्स घेतल्या आणि मॅन ऑफ द मॅच झाला.
पण विशेष रेकॉर्ड हा की या सहा विकेट्स घेताना श्रीनाथला तीन वेळा हँट्रिक चान्स होता.सलग दोन बॉलवर दोन विकेट असं तीन वेळा केलं.
अनिल कुंबळेने पाकिस्तानविरूद्ध 9 विकेट्स घेतल्यावर स्पोर्टमनस्पिरिट नसलेल्या पाकी खेळाडुंनी ठरवलं होतं की दहावी विकेट स्वत:हुन दुसऱ्या बॉलरला फेकावी म्हणजे कुंबळेचा रेकॉर्ड होणार नाही.
म्हणुन श्रीनाथने विकेट मिळावी नाही म्हणुन सतत वाईड बॉल्स केलेत. कुंबळेनेही त्याच्या रेकॉर्डसाठी श्रीनाथला धन्यवाद म्हटलं होतं.
शाहीदआफ्रिदी स्वत:च रिटार्यमेंट घेतो पुन्हा पुन्हा परत येतो.पण श्रीनाथने 2003 वर्ल्डकप पुर्वी रिटायर्मेंट घेतल्यावर मध्ये गांगुलीने वर्ल्डकपसाठी त्याला पुन्हा बोलावलं होतं. पुर्ण वर्ल्डकपमध्ये श्रीनाथने जबरदस्त बॉलिंग केली भारत फायनल ला पोहचला.पण फायनलमध्ये पॉंटिंग पंटरचं वादळ आलं.त्या मँचनंतर श्रीनाथने ऑफिशियल निवृत्ती घेतली.
श्रीनाथने एकेकाळी वनडे मध्ये वन डाउनला येउन पिंच हिटरची भुमिका वठवत सा. आफ्रिकेविरूद्ध फिफ्टीही केली आहे. द्रविडसोबत टेस्ट मँचेसमध्ये मोठी पार्टनरशीपही केली.
जवागलश्रीनाथचं व्यक्तिमत्व काही विलक्षण नव्हतं ..त्याने मँच फिक्सिंग वगैरे केली नाही..वादग्रस्त विषयात अडकला नाही त्यामुळे त्याच्यावर कोणी पिक्चर काढणार नाही.वा त्याच्यावर स्टोरी होणार नाही.
पण जिथे भारतात फास्ट बॉलर म्हणजे फक्त स्पिनर्ससाठी बॉल जुना करणारा बॉलर ही संकल्पना रूढ होती तिथे कपिलदेव नंतर एक जेन्युअन फास्ट बॉलर होउन भारताला अनेक मँचेस जिंकुन दिल्यात.त्याला त्याच्या वाढदिवसाला मानाचा मुजरा!
-अभिजित दिलीप पानसे
No comments:
Post a Comment