काल वेस्ट इंडिजने वर्ल्ड कप जिंकला तेव्हा जणु भारत जिंकला अश्या प्रकारे सर्व जण खुश होते.
दोन दिवसापुर्वी आपल्याला ह्याच टीमने हरवुन बाहेर केलंय याचा रोषही मनात नव्हता उलट सर्व भारतीयांचीच मनापासुन इच्छा वेस्ट इंडिजने कप जिंकावा हीच होती.
हाच फरक आहे आपल्यात आणि आपल्या शेजारच्या वायव्य आणि पुर्वेकडील 'त्या' दोन देशांच्या टीम्समध्ये!देशांमध्ये!
तीन दिवसापुर्वीच बांग्लादेशचा खेळाडु मुश्कफिर रहीमने भारत ''हारल्याबद्दल'' आनंदाचा 'टिवटिवाट' व्यक्त केला होता.
एशिया कप फायनल आधीचे पोस्टर प्रकरण..मागल्या वर्षीचे रोहित शर्माला टाकलेल्या नो बाॅल वरून केलेलं रडगाणं..आकांडतांडव..त्यामुळे ह्या नकारात्मक वृत्तीमुळे बांग्लादेशी कितीही चांगले खेळलेत..आणि त्यांना सपोर्ट करावा वाटलं तरी त्यांना तो मान मिळत नाही.आणि ते त्या लायकीचेही नाही हे तेच दाखवुन देतात.
तिकडे आपला वायव्येकडील शेजारी देश ज्याचं मुळ अस्तित्वच..विचार भारत द्वेष आहे ते भारत हरला की खुष होतात.पण त्यामुळेच त्यांना कुठेही मान सन्मान मिळत नाही.
ज्यांचं अस्तित्वच दुसऱ्यांच्या विरोधात..द्वेषात..इर्षेत आहे असे कधीच,काहीच.. मग ती व्यक्ती असो वा वस्तु..राष्ट्र असो,धर्म असो त्यांच्या अस्तित्वालाच..मताला..विचारांना काहीच अर्थ उरत नाही.
असे व्यक्ती,समुह..समाज.. आजुबाजुला फक्त नकारात्मताच पसरवतात.
जी विचार प्रक्रिया दुसऱ्याला विरोध करण्यासाठीच,जळफळाटातुन,इर्षा द्वेषातुनच जन्माला आलेली आहे त्यातुन सकारात्मक productive रचनात्मक काहीच निघु शकत नाही.फक्त नकारात्मकता,अशांतीच निर्माण हते.
आणि शेवटी हे कधीच लांब घोडदौड करू शकत नाही.
सध्या श्रुती हसनची लाॅइड टिव्हीची एक जाहिरात दिसते.A sheer ridiculous add!!
त्यात सॅमसंग,सोनी टिव्ही ला कमी दर्जाचं दाखवुन स्वत:च्या ब्रॅँडची स्तुती केलीए.
मला स्वत:ला या वृत्तीचा प्रचंड तिटकारा येतो.
ज्या प्राॅडक्टचं श्रेष्ठत्व पटवण्यासाठी दुसऱ्या उत्पादनाची टर उडवली जाते
ते प्राॅडक्ट कधीच ''लाॅँग रन'' मध्ये तग धरू शकत नाही.
बऱ्याच वर्षापुर्वी; 'कुछ कुछ होता है' मुव्ही आल्यानंतर पेप्सीची, ''येह दिल मांगे मोर'' टॅग लाईन सोबत अॅड यायची!ज्यात कोवळ्या वयातला शाहिद कपुर.काजोल,रानी मुखर्जी,शाहरूख खान होता.
तेव्हा एका कोल्ड्रिंकने अगदी तशीच उपहासात्मक जाहीरात केली होती
पुढे कोक, थम्स अपच्या जाहीरातींची काॅपी करून त्यात त्यांची टिंगल करून स्वत:च्या ब्रॅॅँडचे उत्तमत्व सादर करण्याचा डिसगस्टिंग स्वस्त प्रयत्न त्या कोल्ड्रिंक कंपनीने केला होता.
आज ते कोल्ड्रिंक मार्केट रेस मध्ये खुप मागे पडलय.
उपहास करणं वाईट नाही ते बघताना गंमत वाटतेच पण ज्या वस्तुच्या..विचार प्रक्रियेच्या मुळ सादरीकरणासाठीच तथापी मुळ अस्तित्वासाठीच दुसऱ्यावर द्वेषामुळे अवलंबुन राहावं लागतं..स्वत:ची स्वतंत्र ओळख,भुमिकाच नाही अश्या नकारात्मक व्यक्ति..समुह..यांचा मला तिटकारा येते.मी कधीच 'सेवन अप' प्यायलो नाही. अशा बाबतीत फार मनस्वी आहे.
अशा मानसिकतेच्या लोकांपासुन नेहमीच दुर राहतो.
2010 मध्य एका श्रीलंकेविरूद्धच्या टेस्ट मॅचच्या चौथ्या दिवशीच मॅच 'ड्राॅ' होणार हे स्पष्ट झालं होतं.
तेंडुलकर 90s मध्ये होता.फक्त मॅन्डेटरी ओवर्स पुर्ण करण्याची औपचारिकता बाकी होती.
पण फक्त तेंडुलकरची सेन्चुरी होउ नये म्हणुन कॅप्टन संगाकाराने बाॅलर्सना मुद्दामुन नकारात्मक बाॅलिंग करायला लावुन स्वत:तील अखिलाडुवृत्तीचं..स्वस्त विचारांचं प्रदर्शन केलं होतं.सर्व बाॅल आॅफ स्टंपच्या भरपुर बाहेर वाईड टाकायला लावुन 9 ही खेळाडु आॅफ साईडला लावले होते.
त्यानंतर काही दिवसांनीच 'वन डे' मॅच मध्ये सेहवाग सेंचुरीच्या अगदी उंबरठ्यावर असताना भारताला जिंकायला एक रन हवा होता.पण सेहवागची सेंचुरी होउ नये म्हणुन संगाकारा आणि दिलशानने सुरज... या स्पिनरला मुद्दामुन 'नो बाॅल' टाकायला लावला.त्यामुळे सेहवागने त्या बाॅलवर सिक्सर मारूनही त्याला ते सहा रन मिळाले नव्हते.आणि त्याची सेंचुरी झाली नाही.
आज तो स्पिनर इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये नाही.
सचिन तेंडुलकरला ग्राउंडवर त्रास देणारे बरेच होउन गेलेत..झिम्बाॅबेचा हिथ स्ट्रीक, हेन्री ओलंगा..2003 वर्ल्ड कप मॅच मध्ये आई वरून शिव्या देणारे पाकिस्तानी खेळाडु..आज यांचं नाव ही कोणाला आठवत नाही!पण सचिन तेंडुलकर महान झाला कारण तो जिंकण्यासाठी खेळायचा दुसऱ्याला हरवण्यासाठी नाही!
हा निसर्गाचा न्यायच असावा..आहेच.
नकारात्मक..जळफळाट..द्वेष..अप्रगल्भ उथळ आणि अत्यंत संकुचित विचारांचाच पाया असलेले, दुसऱ्यांचे पाय ओढण्याची 'कर्कट वृत्ती' असलेले व्यक्ती..वस्तु..विचार.. देश..धर्म कधीच लाॅँग रन मध्ये टिकत नाही.तात्पुरता (आसुरी)आनंद,यश मिळतं..पण ते स्थायी राहत नाही.
-अभिजित पानसे

No comments:
Post a Comment