#चलो_बुलावा_आया_है
#वैष्णवीदेवी_प्रवासवर्णन #भाग_तीन
खिडकीतुन एक गोंडस तिकीट बाहेर आलं.ते पाहुन #अनुरागलाही खुप आश्चर्य वाटलं!आणि मी आनंदाने ,उत्साहाने त्याच्या पोटावर जोरदार बुक्की मारण्याच्या पवित्र्यत उद्गारलो,''चलो बुलावा आया है माताने बुलाया है''!कारण तो सतत म्हणत होता की तुझं जाणं अशक्य आहे टिकिटच मिळणार नाहीये!आणि मीहि ते मनोमन स्वीकारलं होतं!
दिवसभर उत्साहात दिल्ली फिरलो. अक्षरधाम मंदीराला जाउन आलो.
रस्त्यात 'खेलग्राम' लागलं. तेव्हा सुरेशकलमाडींचे कांड आणि नंतर त्यांचा गझनीतील आमिर खान झालेला आठवला.
रात्री मात्र रोमांचाने..अति विचाराने..हुरहुरीमुळे..
थोड्याश्या भितीमुळे झोप येईना. विश्वास बसत नव्हता खरंच मी हिमालयाच्या जवळ जातोय..कारण तोवर मी नाशिकच्या पलीकडे कधी उत्तरेकडे गेलो नव्हतो.
संपुर्ण हिमालय फिरणे,
कैलासपर्वत बघणे,
मानस सरोवराच्या काठी पौर्णिमेची रात्र घालवणे आणि इजिप्तचे पिरॅमिड्स बघणे ह्या माझ्या लहानपणापासुनच्या स्वप्नांपैकी एका स्वप्नाच्या मी काहीसा जवळ जातोय याच आनंदात होतो!
सकाळपासून काहीशा अस्वस्थतेतच उठल्यावर चलसंगणकावर (laptop)जम्मूच्या प्रसिद्ध 'रघुनाथ मंदिराची माहिती काढू लागलो असतानाच त्यावर आतापर्यंत त्या मंदिरावर झालेले आतंकी हल्ल्यांची त्यात मेलेल्या लोकांची माहिती दिसली!
हा कशाचा संकेत होता?
मनावरचा ताण आणखीनच वाढला.
बॅगेत गरजेपुरतेच नेमके कपडे कोंबले पण अनुरागमुळे शेवटी मला निघायला उशीर झालाच!
गाडी सुटेल की काय या ताणात 50 किमी दूर जुन्या दिल्ली स्टेशनाकडे निघालो मेट्रोमधून निघालो.
देव भलं करो बाप्पा त्या
मेट्रो वाल्यांचं!
''मत रो जब है मेट्रो'' हा किताब मी
''मेट्रोच्या नावानं चांग भलं'' म्हणत वाहिला.
अत्यंत वेगाने मी जुन्या दिल्लीच्या गर्दी गोंधळात #धक्का(बुक्की नाही)देत आपल्या फलाटाकडे धावू लागलो.
कारण मी जर धक्काबुक्की केली असती तर त्या दिल्लीच्या आडमुठ्या लोकांनी मला तिथेच उताणा पाडुन मला लाथा बुक्क्यांनी तुडवला असता.
खाली फलाटावर ' शालीमारएक्सप्रेस' नुकतीच स्नान करून शुचिर्भूतावस्थेत उभी होती.
आणि मी हुश्श केलं.
मी पुन्हा एकदा आनंदात माझ्या बोगीचं माप ओलांडलं. बहुतेक मी वेळेत पोहचल्याचं पाहुन गाडीने एक जोरदार सुस्कारा टाकला आणि दुपारी ३:५०ला प्रस्थानाचा भोंगा वाजवला.
लवकरच खिडकीबाहेर अनेक घरं..घरा बाहेर खाट टाकलेली..गाई म्हशी..भिंतींवर शेणाच्या गोवऱ्या थापलेल्या..हुक्का ओढत बसलेले माणसं..बायकांचे ठराविक कपडे दिसताच #हरियाणातून चाललोय हे कळायला वेळ लागला नाही!
रात्री कधीतरी गुंगीत पठाणकोट आल्याचं ऐकु आलं.1965 च्या युद्धात सर्वात जास्त झळ बसलेलं हे शहर म्हणुन आठवण झाली.
रात्रभर मी वरच्या बर्थवर मोठी बॅग सांभाळत देहाचं मटकुळं करून थंडीत कुडकुडत झोपण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत होतो.
बऱ्याच उशीरा रात्री कधीतरी झोप लागली होती.
पहाटे सव्वा़पाचला "जम्मु आँ गया।"ची लोकांची बांग ऐकू आली! आणि मी रोमांचित झालो! तरिही काहीशा गुंगीतच जड डोक्याने उठलो.
पहाटेच्या काळोखात जम्मूच्या स्टेशनाबाहेर येताच 'कट्रा..कट्रा..' गाडीवाल्यांचे शब्द कानी पडताच माझ्यात उत्साह संचारला.
आणि 'तावी' नदीचे उगवत्या सूर्यासोबत दर्शन घेत गाडी पूर्ण भरल्यावरच एकदाची जम्मूबाहेर पडू लागली.
आयुष्यात पहिल्यांदाच NH1 वरून जात होतो. मध्येच श्रीनगर..लेह ची पाटी दिसताच काळजात एक नाजुक कळ उमटली.
थोड्या वेळाने हायवे सोडून गाडी डावीकडे कट्राला जाणाऱ्या कच्च्या घाटाच्या नागमोडी रस्त्यावरून जाउ लागली.
रस्त्यात असंख्य लाल तोंडाची माकडं रस्त्यावर दिसलीत.
आणि एक गोष्ट विलक्षण जाणवली की काही लोकं अगदी त्या गाडीचा कंडक्टरसुद्धा पाव,ब्रेड रस्ताभर माकडांसाठी टाकत होते.
माकडांनाही याचा सराव असावा. कारण तेही प्रत्येक गाडीच्या खिडक्यांकडे आशाळभुत नजरेने पाहायचे.दोन पायावर मध्येच उभे राहुन चालायचे.
मला त्या लोकांची ही गोष्ट फार आवडली.
त्यांच्या या कृतीमुळे माकडांचं गावात येण्यापासुन काही प्रमाणात तरी नक्कीच कमी होत असावं शिवाय त्यांना त्या निर्मनुष्य ठिकाणी अन्नही मिळत होतं.
मीही वापस जाताना माकडांसाठी ब्रेड घ्यायचं ठरवलं.
कटऱ्याला साडे नऊला पोहोंचलो.
एका मोठ्या राजघराण्यात आपली स्वत:ची स्वतंत्र ओळख घालवण्यापेक्षा घराण्यातुन बाहेर पडुन कोणी छोटंसं का होइना स्वत:चं राज्य स्थापन करावं,स्वत:चं नाव, ओळख निर्माण करावी तसा #हिमालयाचाच मुळचा कुटुंबीय असलेला #त्रिकुटपर्वत आपल्या उंच रांगासहित समोर ताठ बाण्याने उभा होता.
ते दृश्य पाहताच मला प्रचंड आनंद झाला.
मी त्याला नीट बघत होतोच तर पन्हाळ्याला सिद्दीजौहरने घातलेल्या पक्क्या वेढ्याप्रमाणे माझ्या अवतीभोवती हॉटेलच्या एजंट्सचा वेढा पडला!
बस्स…
आता वैष्णो देवी आणि माझ्यामध्ये तो प्रसिद्ध १५ किमीचा रस्ता आणि हा माझ्याभोवती पडलेला हा सिद्दी जौहरांचा वेढाच तेवढा होता.
देवीने मला अडथळे दूर करत इथपर्यंत आणलं होतं. त्यामुळे मी सुद्धा दर्शनासंबंधी एक कडक संकल्प केला.
पण पुढे लोकांचं बोलणं ऐकून माझा 'तो' संकल्प मी पूर्ण करू शकेन की नाही ही दाट शंका दाटून आली.
-Abhijeet panse

No comments:
Post a Comment