23 सप्टेंबर 2016
क्रिकेटमध्ये Duckworth Lewis मेथड सोडल्यास सर्वच नियम हे पुर्णपणे योग्य आणि खेळासाठी पुरक आहेत.पण आज भारत न्युझिलंड टेस्टच्या दुसऱ्या दिवशी एक वेगळाच नियम कळला आणि जो खेळासाठी बिलकुलही योग्य वा सकारात्मक नाही.
आज लंचनंतर; जडेजाच्या एका बॉलवर ओपनर लेथमच्या बँटला बॉल लागुन उडालेल सहज catch क्लोज इन फिल्डर केएलराहुलने पकडला.कँच करताना बॉलचा स्पर्श त्याने घातलेल्या हेलमेटच्या कापडी पट्टीला हलकासा स्पर्श झाला. ग्राउंड आणि थर्ड अंपायरने बँटस्मनला नॉटआउट दिले.
कारण तसा नियमच आहे हे आजच कळलं.
सिलीपॉइंट वा फॉरवर्ड शॉर्त लेग इ.जवळचे फिल्डर्स हे आधीच बॉल लागण्याचा ताणात असतात.
(फक्त भारतीय क्रिकेट टीममध्येच)नव्या खेळाडुंनाच तिथे लावलं जातं.
यापुर्वी हेल्मेट न घातल्याने अपघात झाले आहेत.
#रमणलांबा हा भारतीय खेळाडु याच जागेवर फिल्डींग करताना बॉल लागल्याने मृत्युमुखी पडला होता.
#साबाकरिमला हेल्मेट न घालता किपींग करताना डोळ्याला बॉल लागल्यान त्याचे संपुर्ण करिअर संपलं होतं.
हेल्मेट अत्यंत गरजेचच असतं या जागी फिल्डिंग करताना!!
पण असे नियम असल्यास कँप्टन तिथे खेळाडु ठेवायला टाळेल.
किंवा विना हेल्मेट कोणता खेळाडू तिथे उभा राहील?
टेस्ट क्रिकेटची शान असतात close in fielders!
हा नियम नक्कीच चुकीचा आहे.
No comments:
Post a Comment