*13 जुलै 1660 पावनखिंड युद्ध*
आज बाजीप्रभुदेशपांडे पुण्यतिथी
सावरकरांनी बाजीप्रभुंवर रचलेला पोवाडा
श्री बाजी विव्हळ पडला।
मागुति तत्क्षणी उठला । बेहोष वीर परि वदला।
तोफे आधी न मरे बाजी सांगा मृत्यूला।।
जखम कुठे रे असे फक्त मी तृषाकांत थोडा ।।
रिपुरक्ताने पितो घटघटा सोडा मज सोडा।।
होइल तोफ शिवबाची क्षणी दो क्षणिंची तोवरि साची खिंड लढवाचि ।
फेडाया ऋण या भू चे अजि उष्ण बिंदू रक्ताचे
द्या मुद्दल मोजुनि सत्वे व्याज तिला स्वातंत्र्य देउनी फेडा कर्जाला ।।
काय वाजले बाजीराया बार न गडि झाला ।।
शिला कोसळे,पान सळसळे,पक्षी ओरडला
लढा तरी मग वीर चला हो रणांत घुसलो
रक्ते मढवू लढवू खिंडिची तसू तसू भूमी ।।
शपथ तुम्हाला वृक्ष,पक्षि,जल,शिला,तेज,वारे
मरता आम्ही तोफेपुर्वी लढा तुम्ही सारे
देहबंध तो तुटला बाजीराय धरे पडला
वीरवराचा विव्हल आत्मा नयनाशी आला।।
तो बार धडधडे झाले प्राण परतले हास्य मुखी आले
हा पहिला बार शिवाचा हा दुसरा कर्तव्याचा
हा तिसरा भवानीचा हा चौथा महादेवाचा
बार पाचवा धडाधडा हर बोला ।।
श्री बाजींचे रक्त पेरिले खिंडीत त्या काळा
म्हणुनि रायगडि स्वातंत्र्याचा थोर वृक्ष झाला
(मूळ पोवाडा बराच मोठा आहे.मी माझ्या आवडीनुसार संकलन केलं आहे.)

No comments:
Post a Comment