दुसऱ्या दिवशी दहा वाजता नौहट्टा भागात जाण्यापूर्वी काही खाण्यासाठी लाल चौकात गेलो. ऑटोही तिथूनच मिळणार होते.
सकाळचं वातावरण आल्हाददायक होतं.दुकाने उघडली होती. वाहनांची रहदारी सुरु होती. छोट्या भडक रंगांनी रंगवलेल्या बसेस तुडुंब भरून नौगाम रेल्वे स्टेशन कडे जात होत्या. रस्त्यावर चहा , चिकन पकोडे, कबाब विकणाऱ्या गाड्या लागल्या होत्या. रस्त्याच्या कडेला स्वेटर्स , जॅकेट्स ,शालीचे ढीग लावून चिल्लर विक्रेते उभे होते. एटीएम समोर लाईन लागली होती.श्रीनगरमध्ये "एसबीआय" चे एटीएम बघून सुखद धक्का बसला. संपूर्ण चौक, शहर गजबजलं होतं.
या लाल चौकात " शुद्ध शाकाहारी वैष्णो ढाबा" म्हणून दोन सरदारांचं वरच्या मजल्यावर उपहार गृह आहे. ते 'गणपतीचे' दिवस होते त्यामुळे शुद्ध शाकाहारी खाण्यासाठी आदल्या दिवस प्रमाणे त्या वैष्णो ढाबा उपहार गृहात गेलो.
दोन मूली आलू के पराठे आणि मग भर चहा संपवून लाकडी जिना उतरून खाली आलो. काश्मिरी चहा अहाहा !अगदी चविष्ट आणि भरपूर चहा देतात. वरती एक ते दीड तास होतो.
खाली आल्यावर काही क्षण जाणवलं नाही की समोरचे दुकाने बंद झाली आहे. पण लवकरच एक गोष्ट लक्षात आली की तासापूर्वी असलेली गर्दी ,रहदारी आता नाही.
चौकात आलो तर दिसलं की सर्वच दुकाने बंद झाली आहेत.रस्त्यावरचे चिल्लर विक्रेते , खाण्याची दुकाने, गाड्या.. कोणीही, काहीही नव्हतं. सर्व रस्ते , संपूर्ण चौक रिकामा! सुनसान! केवळ ते एटीएम उघडं होतं.
एक दीड तासात हे कसं काय झालं आणि का झालं! प्रश्न पडला. अचानक ताण वाढला.
एक रिकामा ऑटो दिसला. जवळ जाउन त्याला नौहट्टा ,जामा मशीदला चलतोस का विचारलं.तो म्हणाला आज जाऊ नका! बीफबंदीमुळे आत्ता बंद पुकारला आहे. आणि डाऊन टाऊन भागात तर कधीही दगडफेक सूरू होईल !
मी आर्मीसदृश्य कार्गो पॅण्ट घातली होती. माझ्या पॅण्टकडे बोट दाखवत म्हणला गलती से भी ये पॅण्ट पहन के मत जावो! उन लोगो का कुछ भरोसा नही वो आप पर भी हमला कर देंगे!
ते ऐकून दडपण आलं.
रस्त्यात पोलीसांची गर्दी दिसली.लोखंडी आवरणे असलेल्या ,वरच्या थोड्या उघड्या भागातून एक सैनिक हातात शस्त्र घेऊन उभा असलेला गाड्या जमल्या होत्या.
शिरस्त्राण आणि शिल्ड ने स्व संरक्षणासाठी सुसज्ज पोलीस जागोजागी उभे होते.
मला त्या ऑटोवाल्याने जरा अतिशयोक्ती करून सांगितलं वाटत होतं म्हणून एका पोलिसाला जामा मशिदीला जाण्याबद्दल विचारल्यावर तो म्हणाला की आज बंद आहे वातवरण कधीही खूप बिघडू शकतं तेव्हा उद्या जा.आज मुळीच नको. पॅण्टबद्दल त्यानेही सूचना दिली. जेव्हा साक्षात पोलीसच हे म्हणतोय तेव्हा तिथल्या परिस्थितीची जाणीव झाली , जाण्याचं रद्द केलं. आणि परत हॉटेलला निघालो .
रस्त्यात एक पेपर विकणारा निघण्याच्या तयारीत होता त्याच्याकडे एकही इंग्लिश पेपर नव्हता सर्व उर्दू पेपरच होते. कमीत कमी फोटो बघू म्हणून चार रुपयांचा एक जास्तीत जास्त रंगीत फोटो असलेला पेपर घेतला आणि परत आलो.
पोहचेपर्यंत ताण खूप होता. रस्ते रिकामे होते. आयुष्यात पहिल्यांदा काश्मीरमधला बंद बघितला .गजबजलेलं शहर काही मिनिटात सुनसान होतं अनुभवलं!
हॉटेलमध्ये टीव्हीवरील जाहिरातींचा अनुभव मागे एका लेखात लिहिला आहेच.
दुपारी लाल चौकात "यासिन मलिक" निदर्शन करायला आला होता ,पोलिसांनी त्याला अटक केल्याचं हॉटेलला कळलं.
पोलीस आणि ऑटोवाल्याने लवकरात लवकर येथून निघण्याची सूचना आठवली आणि रात्रीच ठरवलं की शुक्रवारऐवजी दुसऱ्या दिवशीच म्हणजे गुरुवारी परत निघायचं.
इतक्या संवेदनशील भागात ताणतणावात एक वास्तू बघायला जाण्याची काय गरज आहे विचार आला. शिवाय संचारबंदी लागुन अडकलो तर काय होईल विचार ही करवत नव्हता.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठून विखुरलेले कपडे सॅकमध्ये कोंबले.परत निघण्याची सर्व तयारी झाली.
पण शेवटच्या क्षणी ठरवलं की तो भाग बघूनच येऊ!
पण एक मोठी अडचण होतीच. गिर्यारोहण कोर्सला जिन्सचं काहीच काम नसल्याने ट्रेक पॅण्टच आणले होते. जे महिनाभर माती ,चिखलाने भरल्याने वापरण्याजोगे नव्हते.जे दोन आर्मी कलर चे कार्गो पॅण्टस् होते त्याबद्दल धोक्याची सूचना आधीच ऑटोवाल्याने आणि पोलीसाने दिलेली होती. शॉर्ट बर्म्युडा घालावा तर तिथली 'तौहीन' केली समजून माझ्याच मांड्यांवर एखाद्याने काचेची बाटली वगैरे फोडली तर !!
शेवटी सॅक पुन्हा पलंगावर उलटी करून सर्व कपडे काढून बुडाशी टाकलेली एक काळी ट्रेक पॅण्ट, जिने महिनाभर पाणी, माती ,धूळ स्वतः मध्ये निमुटपणे शोषूनही आपला रंग काळाच ठेवला होता .म्हणून मला काळा रंग आवडतो. सर्व आळशींचा आवडता रंग .तिला परिधान करून वरती अगदी विरुद्ध रंगाचा आणि स्वच्छतेच्या बाबतीतही विरुद्ध असा स्वच्छ शुभ्र टी शर्ट घालून कॅमेरा आणि मोबाईल घेऊन बाहेर पडलो. पण डोक्यात एक विचार आला आणि दोन मिनिटासाठी पुन्हा परत आलो.
( शेवटचा भाग पुढे)
-अभिजित पानसे

No comments:
Post a Comment