ऑक्टोबर 2006 लोकसत्ता
* आई बाबा मला मारू नका *
आज पुन्हा उल्हासित सकाळ झाली !!आई बाबांनी मला गुडमॉर्निंग केल्याने मला जाग आली!सध्या माझ्या घरचे सगळेजण माझ्यामुळे खूप आनंदात उत्साहात आहेत!
बाबांना तर काय करू काय नाही असे झालेय!बाबा ऑफिसला जायच्या आधी माझा पापा घेतात.दिवसातून कित्येक वेळा फोन करून माझी चौकशी करतात!आत्त थोड्यावेळापूर्वीच आईबाबांनी माझ्याशी खूप लाडिवाळपणे गप्पा केल्या!
आई माझी दिवसभर काळजी घेत असते.
बाबांना तर काय करू काय नाही असं झालंय!आई बाबा रोज माझे खूप लाड करतात !मला जे हवं असतं ते मी त्यांना सांगण्यापूर्वीच ते मला खाऊ घालतात.
आई माझी दिवसभर खूप काळजी घेत असते!मला थोडाही धक्का लागू देत नाही!
ते माझ्यावर इतकं प्रेम करतात की माझी कोणतीही इच्छा त्यांना ना सांगताच कळून जाते!
परवा मला आइस्क्रीम खावेसे वाटले तर बाबांनी ताबडतोब माझी इच्छा पूर्ण केलीसुद्धा!
आणि काल तर मज्जाच आली! संध्याकाळी बाबांनी घरी येताना खुपसारी खेळणी माझ्यासाठी आणलीत!संपूर्ण घर खेळ णया नी भरलं!आईने म्हटलं "अहो कशाला....इतके सारे..?"
तेव्हा बाबानी आईकडे पाहून फक्त हसलेत व तिला शांत राहण्यास सांगितले...
खरंच कित्ती प्रेम करतात माझ्यावर!!
"अरे आजी आजोबा आलेत वाटतं!रोज सकाळी ते फिरायला जातात ना!फिरून आल्यावर माझ्याशी गप्पा करतात माझी काळजी चौकशी करतात!आजी आजोबांना तर आकाश ठेंगण झालंय सध्या!
माझी आजी तर आई आणि माझी दोघांचीही खूप काळजी घेते ,मला हवं नको ते बघते!
ती मला रामायणाच्या, शिवाजी महाराजांच्या छान छान गोष्टी ऐकवते!
आजोबा मला रामरक्षा म्हणून दाखवतात!
या सगळ्यांचं माझ्यावरचं प्रेम बघून मला खूप आनंद होतो मी कित्ती नशीबवान आहे
मला इतका छान कुटुंब लाभले !खरंच किती प्रेमळ आहेत माझे आई बाबा आजी आजोबा !सगळेजण..!
मी खूप खूप सुरक्षित आहे इथे!
पण..पण.. आता मला राहवतच नाहीये!असं वाटतं आत्ता ,अगदी आत्ताच टुमकन उडी मारून बाहेर यावं....आणि सगळयांना प्रेमाने बिलगावं!!सगळ्यनाशी खूप बोलावं!
मग नाही तर काय!
" मी अजून माझ्या आईच्या पोटातच आहे ना!
मी माझ्या आईच्या पोटातूनच बोलतेय तुमच्याशी!!
आईच्या प्रेमाची ऊब,बाबांची काळजी,अजीआजोबांचा उत्साह मला येथून जाणवतो! कारण मला सगळं कळतं!! मला सगळं कळतं!!
मी खूप सुरक्षित आहे इथे!इतके प्रेम करणारे व काळजी घेणारे आहेत जे माझ्याभोवती!!!
.............…......................................
आज पुन्हा सकाळ झाली....मला जग आली!!
पण हे काय..??कुठेतरी उदासीनता #जाणवतेय मला! रोज सकाळी बाबांच्या गुडमॉर्निंगने जागी होणारी मी,आज आईच्या हुंदक्यांमुळे जागी झाले!बाबा आईला काहीतरी कठोर शब्दात समजावून सांगत होते!
मी कान देऊन ऐकू लागले...!
"तू आजच डॉक्टरकडे जाऊन ये!
मला मुलगी नकोय!बरं झालं वेळच्या आत कळलं!...लवकरात लवकर सर्व आटोपायला हवं..मला मुलगी नकोय!!!!
माझ्यावर तर आभाळच कोसळले!!यांना.. यांना माझ्या येण्याचा काहीच आनंद झाला नाही का???मग माझ्या जन्मानंतर तरी मला हे स्वीकारतील का!मला कशी वागणूक देतील!माझा राग करतील का!!
आई हुंदके देऊन रडत होती.बाबा पुढे बोलू लागले..
"मला मुलगाच हवा आहे!माझ्या सर्व मित्रांना भावांना मुलंच आहेत!!
तू अबोर्शन करून घे!मी सर्व बंदोबस्त केलाय!!कोणाला काहीही कळणार नाही!!"
..............
आता मला भीषण परिस्थितीचा अंदाज आला आहे!!हेच का ते माझे आईबाबा जे माझ्यावर एवढं प्रेम करायचे! आणि मी मुलगी आहे कळल्यावर त्यांना माझा इतका तिटकारा यावा!!??
त्यांचे प्रेम क्षणात आटून तेथे तिरस्कार निर्माण व्हावा!आणि हे काय!!!!!
आजी आजोबा काय म्हणताहेत!!!!कमीत कमी ते तरी....!!!
"आम्हाला वंशाचा दिवा हवाय सुनबाई!" तू आजच गर्भपात करून घे!!आम्हला नातू हवाय नातू!!
आजी आजोबा ,बाबांनी मिळून सगळयांनी आईवर खूप दबाव आणला आणि शेवटी आईसुद्धा नाईलाजाने तयार झाली!..
माझ्या काळजात धस्स झाले!!आता मला वास्तव परिस्थितीची दाहक जाणीव झाली!
या लोकांना मी नकोच आहे तर!!
मी फक्त आवडली नाहीये तर ते मला मारूनच टाकणार आहेत!!आता मला बाबांच्या 'बंदोबस्त' शब्दाचा खरा अर्थ कळला!कालपर्यंत मला जीव की प्राण समजणारे आजच माझ्याच जीवावर उठले आहेत....!! केवळ मी मुलगी आहे म्हणून???
इतके दिवस स्वतःच्या पोटात काळजीने प्रेमाने मला वाढवणारी माझी आई जिच्या हृदयाशी मी जोडल्या गेलेय
तीच माझी आई स्वतःच्या पोटच्या गोळ्यालाच संपवणार आहे!!पण या सगळ्यात माझी काय चूक काय???
प्लिज आईबाबा मला मारू नका!!
तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय का??
तुम्हाला माहिती आहे का मला इथून सर्व कळतंय!!
प्लिज आईबाबा मी तुम्हला विनंती करतेय मला मारू नका!!!!
#मला_सगळं_कळतंय_तुमचं!!
कालपर्यंत मला माझे वाटणारे आज हे सगळे जण मला अनोळखी दृष्ट वाटताहेत!या सगळ्यांमध्ये मी खूप एकटी आहे!मला खूप भीती वाटतेय!!!!मी खुप असुरक्षित आहे इथे!!खरच मी किती दुर्दैवी की मला अशा कुटुंबात जन्म मिळावा!!
तुम्ही लोक "देवीचं नवरात्र" साजरं करताय आणि तिच्याच रुपाला मारून टाकता आहात!!
माझ्या काहीही चूक नसताना स्वतःच्या स्वार्थासाठी हे लोक माझा जीव घेणार आहेत मग नकळतपणे माझ्या हृदयातून निघणाऱ्या शपवाणीमुळे यांचे कधीतरी भले होऊ शकेल का!!???
10 ऑक्टोबर 2006
लोकसत्ता
-अभिजित दिलीप पानसे
No comments:
Post a Comment