6 ऑगस्ट 016
सायना नेहवालचं BADमिंटन होउ नये! बिंद्रा आणि नारंगने पुन्हा एकदा रायफलने बुल्स आय ठोकावा!
मागच्या लंडन ऑलिम्पिकसवेळी बालिश पण यावेळच्या परिपक्व दिपीका कुमारीने तिच्या तिराने अर्जुनाप्रमाणे माश्याचा डोळा छेदावा!
गीता फोगटची चुलत बहीण विशेन फोगाटने शत्रुची पाठ सहज जमिनीवर टेकवून दंगल माजवावी!
अगडबंब देहाच्या विकास गौडमध्ये थाळी फेकताना भीमशक्ती यावी!
भारताचा शाहिदआफ्रिदी जुनं खोड लियांडरपेसने मोडण्यापुर्वी पुन्हा एकदा सोनं लुटावं.
अंकित शर्माची उडी माकडउडी न ठरता हनुमानउडी व्हावी!
माझ्या हीना सिद्धूने माझ्या ह्रदयाचा ठाव तर तिने तिच्या लुक्स आणि attitude ने कित्येक वर्षांपुर्वीच घेतलाय तसा रिओ मध्ये पिस्तुलाने लक्षाचाही घ्यावा..
माझ्या आवडत्या अश्विनी पुन्नपाने; नेहमीच संतापाच्या 'ज्वालेत' असणाऱ्या गुट्टासोबत नीट गट्टी जमवून पदक मिळवावे!
इतर सर्व भारतीय ऑलिंपिक खेळाडूंनी रिओमध्ये दसरा समजुन तिथून भरपुर सोनं लुटावं आणि गेल्या सर्व ऑलिम्पिक स्पर्धेतील पदकांच्या
संख्येचं सीमोल्लंघन करून विजयादशमीचा महोत्सव करावा..
रिओ ऑलिंपिकसाठी आपल्या सर्व भारतीय खेळाडुंना शुभेच्छा!!
(किमान यावेळीतरी) सोनं..चांदी लुटा..
आधीच सोन्याचे भाव किती वाढलेय!!
Game is on!!
शुभेच्छुक-
हीनासिद्धु , कौशिकीचक्रवर्ती , मिथिला पालकर दीशापटानी च्या प्रेमात भिजलेला.. आकंठ बुडालेला
-अभिजीत पानसे
No comments:
Post a Comment