"अस्सल मराठी फराळ ,दिवाळी अंकांचे हे 107 वे वर्ष!"
भारतात प्रादेशीक साहित्यात बंगाली साहित्य हे क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये सर्वोत्तम मानलं जातं. बंगाली माणूस दर महिन्यातला मिळकतीतला काही भाग पुस्तके विकत घेण्यासाठी काढून ठेवतोअसे म्हणतात.
पण दिवाळी अंक हा वाचन
मेजवानी प्रकार फक्त महाराष्ट्रात आहे.
दिवाळीत कपडे ,नव्या वस्तू रोषणाई ,फराळ यांची धूम संपूर्ण भारतात आणि जगातही असतेच पण अस्सल मराठी मनाचा फराळ पूर्ण होतो तो दिवाळी अंकामुळे!
कुठलंही स्वतंत्र दिवाळी अंक मंडळ व संघटना नसूनही दिवाळी अंकाची ही सरिता 1909 पासून उगम पाऊन आजवर अविरतपणे समृद्ध होम वाहते आहे.
"मनोरंजन" नावाचा पहिला दिवाळी अंक 1909 मध्ये छापला गेला.
वेगवेगळ्या विचारसरणीप्रमाणे ,दृष्टिकोणामुळे समाजातील घटकांचा सण,उत्सव याबद्दलची वैचारिक विसंगती आढळते.पण दिवाळी अंक मात्र सगळयांना सामावून घेतात.मनोरंजन,सामाजिक जाणिव,अस्सल साहित्य,कथा,कविता, सगळं काही दिवाळी अंकांच्या विविधतेत प्रत्येकाला आपल्या आवडीनुसार मिळतंच.
दिवाळी अंकाशिवाय दिवाळी मी स्वप्नातही कल्पना करू शकत नाही.दिवाळी अंकाची शॉपिंग, विंडो शॉपिंग पहिले हमखास ठरली राहायची.
टेबलावर मांडलेले शेकडो विविध दिवाळी अंक पाहताना,चाळताना जो आनंद मिळतो तो शब्दात सांगणे अशक्य!मग भरपूर विंडोशॉपिंग केल्यावर दोनेक आवडीचे अंक घेणे म्हणजे खरा दिवाळीचा आनंद माझ्यासाठी!
धनंजय हा माझा कित्येक वर्षांपासुन सगळयात आवडता दिवाळी अंक!!
दिवाळी अंकाशिवाय दिवाळी सण अपुर्णच!!!
- Abhijeet Panse
No comments:
Post a Comment