''निघाली टूर टूर''
(23 जानेवरी 2008, लोकसत्ता.)
हॅलो फ्रेंड्स!
नुकतच आॅटो एक्स्पो एक्जिबिशन संपलय,एक दोन 'नॅनुटल्या' बुक केल्यात की नाही!
आता लाख दिड लाखच्या बाईकवर टांग टाकण्यापेक्षा...नॅनोचचे सुकाणु हातात घेत इतरांना 'टाटा' म्हणत पिकनीकला जाणे सोयीस्कर!
शेवटी लाख मोलाचं 'रतन'..रत्न आहे ते!
आणि सध्या ट्रीप्स..टुर्सला जाण्याचा सिजनही सुरूच आहे!
हे फ्रेंड्स जानेवरी फेब्रुवारी म्हणजे शाळा..काॅलेजमध्ये ट्रिप्स..इंडस्ट्रियल टुर्सचा काळ असतो!!
शाळेत असताना ती टुमदार सहल असते,ज्युनिअर काॅलेजमध्ये ती ट्रीप..आणि प्रोफेशनल काॅलेजची पायरी ओलांडल्यावर इंडस्ट्रियल टुर होतो.
शाळेच्या सहलीत खिडकीतुन पळती झाडे पाहण्यात तर काॅलेज टुरमध्ये 'कोणती'मुलगी कुठे बसलीए हे पाहण्यात आणि त्यानुसार आपली सीट ठरवण्यात रस असतो.
या सर्व सहली..टुर्स आयुष्यभरासाठी गोड,तिखट,आंबट,चिंबट आठवणींचा खजीनाच असतो.
आई बाबांच्या कृपेने मी शाळा काॅलेजमधील कोणतीच सहल..टूर चुकवला नाही!
आठवीत सहलीमध्ये वेरूळच्या लेण्या पाहताना;प्रथमच बर्म्युडा घातलेले फाॅरेर्नसच्या दर्शनाचा योग आल्याने त्या अजब प्रेक्षणीय प्राण्यांकडे पाहत त्यांच्याशी मराठीतुन इंग्रजीत बोलता बोलता कधी इतरांपासुन दुर जात मी व माझा मित्र अनिकेत आम्ही लेण्यांच्या बाहेर येउन भरकटलो कळलेच नाही.दुर्दैवाने त्यावेळी 'मोजणी' न झाल्यामुळे आम्हाला तेथेच टाकुन बस निघुन गेली होती.नशिबाने नंतर लक्षात आल्याने गहाळ झालेलो आम्ही सुस्थितीत सापडलो.आजही हा आमचा पराक्रम दरवर्षी शाळेत सहलीपुर्वी,''सहलीत घेण्याची काळजी'' या सदरात सांगितला जातो.
काॅलेजमध्ये टुरची तारीख जशी जशी जवळ येउ लागते तसा हालचालींना वेळ येउ लागतो.खास ठेवणीतले कपडे,जॅकेट्स,विंटर वेअर्स, डिओज...मुलींना इंम्प्रेस करण्याच्या क्लुप्त्या,ट्रिक्स योजल्या जातात..आणि ट्रीप दुसऱ्या दिवसावर येउन ठेपते.
ओवरएक्साइटेंटमेटमुळे रात्री झोप लागल्या लागत नाहीच.अलार्म किंचाळायायच्या आधीच बिछाना त्यागला असतो.पहाटे अंधारात स्वत:ला लोकरीत गुंडाळुन डिओचे, अत्तराचे फवारे अंगावर उडवुन घमघमाटात काॅलेजला येउन पोहचतो.उगाचच त्यावेळी इतर अंथरूणात लोळत पडलेल्यांविषयी कुत्सितपणे दया वगैरे वाटते जणु काही आम्ही रोजच पहाटे फिरायला जातो.
कोणीतरी बसजवळ नारळ फोडतं..महाराज की जय होतं..आणि आमचा चार..सहा चाकी रथ धुराळा उडवत धावायला लागतो.
असो.ट्रीप म्हटली की,भसाड्या आवाजात गाणे आलेच,चटर फटर खाणे, धिंगामस्ती,शाॅपिंग या गोष्टी आल्याच..
पण..पण एका 'अटळ' गोष्टीचा आणि ट्रिप..टुर्सचा inevitable घनिष्ठ संबंध आहे..
होता..आणि राहील...!!!
या अटळ गोष्टीशिवाय जगातील कुठलीच सहल पुर्ण होउच शकत नाही!!
गेस वाॅट??
नाही कळलं??
ती न चुकवता येणारी गोष्ट म्हणजे '"उलट्या''...ओकाऱ्या..
VOMITING"!!!
या उलट्यां ओकाऱ्यांशिवाय कुठली सहल,टुर झाला असेल तर शपथ!!!!!
माझा पुर्वानुभव आणि समज असा होता की उलट्या,ओकाऱ्या हे कार्यक्षेत्र फक्त मुलींसाठीच राखीव!
आम्हा धडधाकट मुलांना असले त्रास नसतात म्हणुन त्याचा मला अवास्तवी अभिमान होता.
पण माझ्या या पुरूषी अभिमानाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या त्या दहावीतील चिखलदरा एकदिवसीय ट्रीपमध्ये!!
महाराष्ट्र मंडळ डेपोच्या ''स्वच्छ आणि सुगंधित'' बस ठरवुन आमची चिखलदऱ्याला सहल ठरली.
मी आणि माझा जिग्री दोस्त गौरव, आम्ही 'कंडक्टरची' सीट मिळवली!म्हणजे एकदम दाराजवळच!!
त्याची फार मोठी किंमत चुकवावी लागणार आहे याची आम्हा बापड्यांना कुठे कल्पना होती!
सकाळी सकाळी आम्ही उत्साहात चिखलदऱ्याकडे निघालो.ट्रीप म्हटलं की 'चिवडा' हा खाद्यपदार्थ येथे चोवीस तास विनामुल्य मिळेल अशी स्थिती असते.
मुली नाजुक गोड आवाजात तर मुलं घसा फाटेल की स्वरयंत्राचा स्फोट होइल की काय अशा आवाजात गाणी म्हणत होती.नाचणे वगैरे दणक्यात सुरू होतेच.
गाऊन,नाचुन शरीराला शीण जाणवला की पोटात 'चिवडा' ढकलायचा!
कोणी चुकुनही भुकेचे नाव घेतले की,त्याच्या तोंडात चिवडाच कोंबायचा!वर्षभर कधीही एक शब्दही न बोलणारी मुलगी ट्रीपमध्ये ''चिवडा हवा का? ''विचारतेच.
बसच्या समोरील सीटपासुन तर शेवटपर्यंत चिवड्याचे दळणवळण होत सर्वांचे खाणे सुरू होते.
खाउन खाउन थकलेले काही रवंथ करत होते.
घशापर्यंत पाणी प्यायल्याने पोटातील पोह्यांसोबतच सर्वांची पोटे टरारुन फुगलेली!
मला कळत नाही सहलीची हवा मानवली म्हणुन की आणखी काय पण सगळ्यांना भुका लागुन जेवणाची 'धडाडी' दाखवली!!
चिखलदऱ्यापासुन एका तासाच्या अंतरावर सर्वांनी एका शेतात आपापल्या डब्यातील(टिपीकल) उकडलेल्या बटाट्याच्या भाजीवर ताव मारत वनभोजनाचा आस्वाद घेतला.कोणाचे ''आलु के पराठे'' कोणाचा मसाले भात....
मला स्पष्ट आठवते मनीष मेहरे नावाच्या एका मुलाने जेवणानंतर ' शेंगदाणे खरमुरे' विकत घेतले होते आणि ते त्याने एकट्यानेच खाल्ले!
दुपारचे साडे बारा वाजलेले.सर्वजण आता पेंगायला लागलेले होते आणि आमच्या बसने चिखलदऱ्याचा घाट चढण्यास प्रारंभ केला.
सगळे गुंगीत,तंद्रीत डोळे मिटुन निद्रेचा आस्वाद घेत होते.
आणि कुठून तरी 'अ ते ज्ञ' या बाराखडीत न लिहीता येणारा ''ओए~~क'' असा काहीसा जोरदार आवाज माझ्या कानी पडला.
आवाज अगदी जवळुन आलेला वाटला!
म्हणुन मी डोळे किलकिले करुन प्रथम डावीकडे शेजारच्या गौरवकडे पाहिलं; तर तो त्याच्या अर्धवट उघड्या तोंडातुन ब्रम्हांड दिसेल अशा स्थितीत गाढ झोपला होता.
त्याचक्षणी माझं लक्ष समोर गेलं..
एक मुलगी दारात येउन मोठ्ठाले आवाजात 'ओकत' होती.
हळुहळु पुर्ण बसला जाग आली आणि तसा प्रत्येक जण दारात येउन,हत्ती सोंडेतुन पाण्याचा फवारा उडवतो तसे पोटातील अपचित द्रवपदार्थाचे फवारे उडवु लागले.तेही आमच्या अगदी निकट!
सरांनी भराभर सगळ्यांना 'उलटीच्या गोळ्या' आणि 'पाॅलिथीन्स प्लास्टिक चे पुडके' वाटप केले.
बस घाटाचा रस्ता जसजसा चढत होती तसतसे बसमध्ये आत आमच्या अगदी जवळ मानवी जठरातील द्रवपदार्थांचे फवारे उडत होते.
जो तो प्रत्येक जण, मुलगी मुलगा दारात येउन ''ओएक..ओए~~क...''असे आवाज करत स्वत:चे पोट 'साफ' करत होते.
आणि आम्ही त्या द्रवपदार्थांचे शिंतोडे आमच्या पायावर न उडवेत म्हणुन पाय सीटवरती जवळ घेउन हतबलपणे सारं काही पाहत होतो..ऐकत होतो..
एक दृश्य माझ्या डोळ्यासमोरून कधीच विस्मरणात जाणार नाही ते म्हणजे तो जाडा मनीष इतका एकसारखा उलट्या करत होता की त्याचं पातळ पाॅलिथिन बॅग काठोकाठ भरलं तरी त्याची रावणाच्या लघुशंकेसारखी ओकारी काही केल्या संपेचना!
शेवटी 'ओवरफ्लो' होउन त्या पित्तमिश्रित द्रवपदार्थांचं वजन न पेलुन त्याचं पाॅलिथिन फाटलं.आणि सर्वकाही त्याच्या मांडीवर........
मी आणि गौरव आमच्या 'फ्रंट सिटवरून' समोर..मागे वळुन कोणाकोणाची विकेट पडतेय..सर्व निरीक्षण करत होतो.
गेल्या दीड तासात संपुर्ण बस 'भरली' होती.
60 मुलांमध्ये फक्त मी,गौरव,सरआणि दोन मुली सोडुन सगळ्यांची पोटं 'साफ' झाली होती.
आमच्या इच्छित ठिकाणी पोहचायला काही मिनिटांचाच अवकाश होता.घाट संपत आला होता.त्यामुळे मी व गौरव एकमेकांचा 'विल पाॅवर' वाढवत होतो.कारण प्रत्येकाचा फवारा..आवेग..यांचे आम्ही डोळ्यांनी,नाकांनी,कानांनी फक्त एक दोन फुटाच्या अंतरावरुन साक्षिदार होतो.
अशातच गौरवचा विल पाॅवर डगमगु लागला.त्याला प्रचंड मळुमळु लागलं.
त्याने घाईघाईत सरांकडुन गोळी घेतलीं.
'आॅ ~' करुन तोंडात घातली.आणि पाणी पिउन तिला गिळणारच!
तोच त्याच्या घशातुन एक जोरदार लोंढा आला आणि त्या गोळीसकट बाहेर पडुन खाली सांडला..
ती बिचारी पांढरी गोळी तिच्या इच्छित स्थळी पोहचायच्याऐवजी खाली त्या रंगीबेरंगी चिखलात निपचीत पडुन होती.
माझा मित्र गौरवसुद्धा, किल्ल्याचा एक सरदार धारार्तिथी पडला.
आता मीच एकटा किल्ला प्राणपणाने लढवत होतो..
स्वत:ची हिंमत वाढवत होतो.
शेवटी एकदाचं आम्ही चिखलदऱ्याला येउन पोहोचलो.
आत्मस्तुतीचा दोष पत्करुन सांगतो की मी अगदी स्वच्छ कोरड्या अवस्थेत पोहोचलो..जिंकलो..
बसच्या दरवाज्यात..पायऱ्यांवर पित्तमय दुर्गंधी पिवळ्या हिरव्या पदार्थांचा चिखल झाला होता.
एका धाब्यावर बस थांबवुन सरांनी पाणी मागवुन सर्व मुलांना बस धुवायला लावली.त्यातुन फक्त ज्यांचा बस भरवण्यात वाटा नव्हता त्यांनाच सुट होती.आणि माझा त्यात खारीचाही वाटा नसल्याने मी मस्तपैकी बाहेर बसुन होतो.
आणि तेव्हा आत बस धुण्याऱ्या मुलांपैकी एक मुलगा ओरडला की त्याला आत बसमध्ये एक पुर्ण अख्खा 'शेंगदाणा' सापडला!!
मला एकदम 'मनीष' आठवला!!
(कृपया हा लेख जेवताना,वा जेवणाच्या एका तासापुर्वी व नंतर वाचु नका.)
आजही गौरव मी आम्ही जुने मित्र भेटतो तर या 'अविस्मरणीय' सहलीबद्दल आठवुन प्रचंड हसतो.आणि आजही आम्हाला एका गोष्टीचे प्रचंड कुतूहल..प्रश्न पडतो की त्या मनिष मेहरेच्या फाटलेल्या पाॅलिथीन बॅगेतुन ''संपुर्ण शेंगदाणा'' कसा काय निघाला??
फ्रेंड्स काॅलेज टुर ही अशी एकमेव गोष्ट आहे ज्यामध्ये रोज काॅलेजमध्ये मेकअप करून नटुन येणाऱ्या मुलींचं खरं रूपडं..तेलकट आंबलेले चेहरे..सुजलेले डोळे दिसुन येउ शकतं.
शिवाय प्रत्येकाच्या 'पचनशक्तीचा' अंदाजही कळतोच.
जिम मध्ये अॅब्स..बायसेप्स वगैरे बनवलेल्या मुलांचिही पचनसंस्था दुबळीअसु शकते हे ट्रिप्स..टुरमध्येच कळु शकतं.
रात्री पुर्णत: बंद ट्रॅवल गाडीत कोणाची तरी 'सनई'..'चौघडा'..कधी कोणी कितीही 'कंट्रोल' केलं तरी 'नगारा'ही वाजतो.
कोणाचे सायकलच्या चाकात पंपाने हवा भरल्यासारखे आवाज..
असाच कुठला ''हवा का झोका'' रात्री 'हवाबंद' बसचे 'हवामान' खराब करतं.
या काही अटळ कटुसत्य गोष्टी तर प्रत्येकाने काॅलेजची टुर एन्जाॅय करावी. आयुष्यभर या आठवणी सोबतीला राहतात.
आणि फक्त मित्रमैत्रिणिंसोबतच नाही तर आपल्या कुटुंबासोबतही,नातेवाईकांसोबतसुद्धा जमेल तेव्हा सहलीला जावेच.
पुर्वीपासुन प्रवासाचं महत्व 'चरैवति चरैवति..''करावे देशाटन..''सगळे सांगत आलेय.
एक नेहमी लक्षात ठेवावं फिरण्याने पायाचे स्नायुच नाही तर मनही मोकळं होतं.
म्हणुन ''चरैवति चरैवति..''
-अभिजित पानसे

No comments:
Post a Comment