गणेश चतुर्थी
सप्टेंबर 09
सगुण आणि निर्गुण यात काय श्रेष्ठ ..सगुण भक्ती निर्गुण ईश्वर यावर कोणी वाद करत, प्रतिवाद, वितंडवाद करतं. गणपती या देवतेची मातीची मूर्ती स्थापन करून पूजा करताना सगुण उपासना केली जाते. चराचरात व्यापून उरलेलं गणेश'तत्वा'ची पूजा ही मूर्ती'द्वारे' केली जाते. पण गणेश 'तत्व' हे निर्गुण आहे.
गणपती ही बुद्धीची, ज्ञानाची देवता मानली जाते.
पण ईश्वरी तत्व , संज्ञा जेव्हा आजच्या काळाशी, सुसंगत साद घालतात तेव्हा हे ईश्वरी तत्व जास्त '#रिलेटेबल' वाटू लागतात.
आजचा काळात "माहिती तंत्रज्ञानाचं " ही ज्ञान या नाण्याची एक महत्वाची बाजू.
माहिती तंत्रज्ञानाचं मुळ हे इंटरनेट, आंतरजाल. .आणि साधन कम्प्युटर.
इंटरनेटचं हे गणपतीचं एक निर्गुण रूप वाटतं.
संपूर्ण माहितीचं आगार, कोष, भंडार हे इटंरनेट असतं.
आणि 'कम्प्युटर' हे त्याचं 'सगुण' रूप वाटतं. जसा ज्ञान रुपी निर्गुण गणपती आणि मूर्ती सगुण रूप.
बस एक 'क्लीक' करायची गरज.
गणपतीचं वाहन मूषक. कम्प्युटरचं वाहन ही 'माउस'. हातात 'माउस' धरून हवं तिथे क्लिक केलं की त्या त्याबद्दलची माहिती , ज्ञान मिळत जातं.
ईश्वर..निसर्ग..ऊर्जा मुळात मार्ग दाखवत असते असं म्हणतात. बाकी प्रयत्न व्यक्तीला करावे लागतात. इथेही कंप्युटर फक्त मार्ग दाखवतो, अनेक मार्ग, माहिती पुरवतो. त्या महितीचा पाठपुरावा मात्र अभ्यासकाला करावा लागतो. माहिती आणि ज्ञानाचा पाठपुरावा व्यक्तीलाच करावा लागतो.
गणांचा ईश, गणांसोबत राहणारा गणपती, '#संगणक_गणेश".
अश्या या आजच्या काळातील गणेश रुपी ज्ञान रुपी निर्गुण तत्वाची सगुण रुपी संगणकाद्वारे आराधना प्रत्येक जण रोज करत असतो.
-Abhijeet Panse
1 सप्टेंबर, 2007
लोकसत्ता.
(sweet .. innocent memories.)
No comments:
Post a Comment