Thursday, 21 December 2017

"द नागराज मंजुळे"

'श्वास' नंतर मराठी सिनेसृष्टीने 'श्वास' घेतला खरा पण  मराठी सिनेमे दहापैकी फक्त एक दोन बघण्यासारखे असतात. बाकी आठ हे स्वप्नील जोशी आणि अंकुश चौधरी प्रकार असतात.

त्या एक दोन सिनेमांपैकी फक्त उमेश कुलकर्णी आणि नंतर राजेश मापुस्कर दिग्दर्शित बघायचो.
बाकी संजय जाधव सारखे ; यश चोप्रा ने, बॉलीवूडने खाऊन चावून चोथा केलेले दोन हिरोईन एक हिरो लव ट्रँगल करणारे नमुने दिग्दर्शक,
 चित्रपट खूप जड, थंड, समजण्यास कठीण आणि प्रत्यक्षात कंटाळवाणा केला म्हणजे खूप चांगला "समांतर किंवा 'कलात्मक' चित्रपट होतो असे आधीच ठरवून pre meditated स्विप 'शॉट' खेळणारा आणि असले प्रि मेडिटेटेड शॉट मारताना तोंडावर नेहमी बॉल बसणारा गजेंद्र अहिरे! हे वासरात लंगडे बैल होते.

पण दगडाकडूनही अभिनय करून घेऊ शकण्याचं कसब, आणि त्यासाठी लागणारा संयम असलेला  नागराज मंजुळे मुळे मराठी चित्रपटांना देशात ग्लॅमर मिळालं!

नागराज मंजुळेने समांतर चित्रपटांचीच वाट धुंडाळली आणि त्याच्या क्लास ला तीच योग्य होती. पण समांतर सिनेमाला म्युजिकल टच देऊन कमर्शिअली हिट करून दाखवला.

आणि आता तर मराठी सिनेसृष्टीतील या #शहनशहा बरोबर साक्षात अमिताभ बच्चन सोबत काम करतोय! यावरून त्याची 'उंची' आणि चित्रपटाच्या ज्ञानाची ,कलेची खोली आणि ताकद कळते.

सैराट हा चित्रपट पुर्णपणे एक स्वतंत्र गाईड आहे चित्रपट अभ्यासू किंवा त्या संबंधित काम करणाऱ्यांसाठी! त्यात नागराज मंजुळे चं निरीक्षण शक्ती, सर्वांगीण अभ्यास , सगळे दिसतं.
त्याच्या चित्रपटातील कथा ही आपल्या आजूबाजूचीच असते, त्यात काही नावीन्य नसतं पण त्याला असतो तो "नागराज टच"! आणि हेच त्या चित्रपट, कलाकृतीचं 'USP' असतं.

हा माणूस कोणाकडूनही अभिनय करवून घेऊ शकतो.

इतक्यातच नागराज मंजुळे ने त्याच्या रेशन कार्डातुन त्याचं नाव काढून टाकावं म्हणजे गरजूंना धान्य मिळू शकेल म्हणून अर्ज केला आहे.

संपूर्णपणे सेल्फ मेड मॅन, फिनिक्स पक्ष्याचं जिवंत सिम्बल म्हणजे नागराज मंजुळे!

नागराज मंजुळे च्या वाढदिवसादिवशी.

- नागराज मंजुळेच्या चित्रपट संबंधित कलेचा ऑफिशियल फॅन

Article by Abhijeet Panse

No comments:

Post a Comment