मंदिरा बेदीने खूप मेहनत करून सूत्रसंचालन केले होते. पण तिच्या अँकरिंग पेक्षा तिच्या कपड्यांचीच चर्चा अधिक झाली होती. पहिल्या मॅच मध्ये 125 रन्स मध्ये ऑल आऊट होऊन शेवटी फायनलमध्ये मॅकग्रा च्या आखूड बॉल वर तेंडुलकरचं वाकडं पडलेलं पाउल..पूल..; दोन्ही वेळा फक्त ऑस्ट्रेलियाकडून हरलेल्या 03 च्या वर्ल्डकपमध्ये मंदिरा बेदी हे भारतीय प्रेक्षकांसाठी सरप्राईज पॅकेज होतं. तिच्याकडे अँकरिंग स्किल होतं पण क्रिकेट नॉलेज नव्हतं.
ती आली आणि ती गेलीही.
त्यानंतर रोशनी चोप्रा चारु शर्मासोबत नॅशनल क्रिकेट अँकरिंग करायची. पण ती फक्त "मला पहा अन फुलं वाहा " अँकर होती.
त्यानंतर आयपीएल मसाला क्रिकेट सुरू झाल्यावर पोली साजूक तुपातली "शिबानीदांडेकर" आली. पण ती फक्त ग्लॅम डॉल , "क्रिकेट आय क्यू! यु की ये कोन बोला?" प्रकारातच मोडते. स्पोर्ट्स नॉलेज शून्य.
फक्त स्पॉन्सर्स चे नावं घेण्याइतपत आणि मसाला क्रिकेटला शोभेल असं खिदळत टाईमपास इंटरव्यूज घेण्याचंच शिबानी दांडेकर चं काम असतं.
या सर्व महिला संचालक क्रिकेट सूत्रसंचालनाचं त्यांचं काम खूप चांगल्या प्रकारे करतात यात शंका नाहीच. पण त्या ग्लॅम डॉल, आय कँडी म्हणूनच मैदानावर वावरत असतात. चॅनल्स ने त्यासाठीच त्यांना काम दिलं असतं.
2013 मध्ये भारत दक्षिण आफ्रिका सिरीज दरम्यान सगळ्यात पहिल्यांदा एक वेगळ्या स्त्री अँकर ला बघितलं. तेव्हा तिचं नाव काय आहे हे ही बघण्यात रस नव्हता कारण फक्त एक आय कँडी म्हणून नवी अँकर चॅनलने आणली आहे वाटलं.
पण ती आली. टिकली. तिने पाहिलं..आणि ती शिकत गेली..
अत्यंत करिझ्म्याटिक , प्रभावित करणारं व्यक्तिमत्व, भाषेवर पकड, मादक अपारंपरिक सौंदर्य ,मुद्रा आणि याशिवाय एक अत्यन्त महत्वाची गोष्ट जी आधीच्या स्त्री सूत्रसंचालकांमध्ये नव्हती ती म्हणजे "स्पोर्ट्स आय क्यू" .
तिच्यातील स्पोर्ट्स इंटलीजंट कोशंट तिला इतर कचकड्या बाहुल्यांपासुन वेगळं करतं.
तिचं नाव मयंती लँगर.
पुढे ऑस्ट्रेलिया भारत सिरीज पासून ती स्टार स्पोर्ट्स वर नियमितपणे दिसू लागली. याच काळात स्टार स्पोर्ट्सनेही कात टाकली. स्टार चे खेळा संबंधी इतर चॅनल ही सुरू केलेत. त्यानंतर ती स्टार स्पोर्ट्स वरील नियमित अँकर झालीये
ती फक्त क्रिकेट अँकर नाही तर इतर स्पोर्टस चं ही बऱ्यापैकी ज्ञान आहे.
आज मयंती लँगर क्रिकेट ब्रॉडकास्टर असली तरी तिची सुरवात फुटबॉल पासून झाली.
दिल्लीपासून फुटबॉल खेळाशी जोडल्या गेली. सूत्रसंचालन, समालोचन केलं.
त्यानंतर बीच फुटबॉल टुर्नमेंटच सूत्रसंचालन केलं. त्यानंतर ती खऱ्या अर्थाने समोर आली. फिफा वर्ल्डकपचं सूत्रसंचालन, अगदी जाणकार पॅनल म्हणून ही काम केलं. त्याच वर्षात दिल्लीला झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्येही संचालन केलं.
सुरवातीला झी मीडिया हाउस सोबत काम केल्यावर नंतर टेन स्पोर्ट्स आणि आता स्पोर्ट्स मधील सगळ्यात मोठी "#स्टारफिश ,सगळ्या स्पोर्ट्स हाउस गिळंकृत करणारं जायंट स्टार स्पोर्ट्स शी आता जुळली आहे. नुकतंच स्टार स्पोर्ट्स ने आयपीएलचे हक्क विकत घेतले आहे. पुढच्या वर्षी आयपीएल सोनी मॅक्सवर दिसणार नाही.
तिचा नवरा स्टुवर्ट बिनी आणि सासरे रॉजर बिनी हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटर्स असुनही मयंती लँगरने स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
काही दिवसांपूर्वीच तिने तिच्या नवऱ्याचा स्टुव्हर्ट बिनीचा , #कर्नाटक_प्रीमिअर_लिग मध्ये बिनीने मोठी खेळी केल्याने तिने त्याचा इंटरव्यू केला. त्याच दिवशी त्यांच्या लग्नाचा वाढदिवसही होता . स्टूूवर्ट बिनीने आजचा दिवस खूप खास आहे म्हटल्यावर ती लाजत हसली.
दोनेक वर्षांपासून सुरवातीला ती सूत्रसंचालन करताना सपाट चेहऱ्याने वावरायची. कम्फर्टेबल वाटायची नाही. भाव प्लास्टिक वाटायचे. पण आता मात्र तिच्यात आमूलाग्र बदल झालाय. आता तिच्यात विनोदी बुद्धी आलीये, ती खूप रिलॅक्स्ड वाटते. पूर्णपणे समरस झालीये.
मयंती लँगरची एक मोठी कमकुवत बाजू म्हणजे क्रिकेट मेमरी. तिच्याकडे क्रिकेट मेमरी नाही.
हर्ष भोगले आणि आता नवा स्पोर्ट्स संचालक जतीन सप्रू यांच्याकडे क्रिकेट ज्ञान, आणि आठवणींचे भांडार आहे.
हर्ष भोगले तर एन्ससाक्लोपीडिया आहे. इथे तिला काम करावं लागेल.
आत्मविश्वासाने भरलेली, बुध्यांक असलेली ,करिझ्म्याटिक खणखणीत व्यक्तिमत्त्व असलेली मयंती लँगर एक अत्यन्त आकर्षक खेळ सूत्रसंचालक, ब्रॉडकास्टर, पत्रकार आणि मॉडेल खेळ विश्वात खास ओळख निर्माण करते आहे.
-अभिजित पानसे

No comments:
Post a Comment