.
INDIAS NEXT TOP MODEL
राज कुमार संतोषीच्या 'लज्जा' या मुवीमध्ये अनिलकपुर एक डायलॉग म्हणतो "हमारे देश मे लडका चाहे खुद काला कौवा क्यु ना हो लेकिन उसे बिवी गोरी ही चाहीए होती है!
या मानसिकतेमुळे कित्येक मुला मुलींचा आत्मविश्वास ढळतो.
स्मितापाटील यांना त्यांच्या सावळ्या रंगासाठी सुरवातीला तुच्छ लेखलं जायचं.अमिताभ बच्चनला त्यांच्या उंचीसाठी..पण पुढे त्याच गोष्टी त्यांचे USP बनलेत.
पण हा प्रवास खुप महत्वाचा असतो.सोपा तर नसतोच पण बहुतांशी एकलाच असतो.
लहानपणापासुन सुरवातीपासुन आजुबाजुचे लोक आत्मविश्वास कमी करणाऱ्या टिका ..टवाळी खिल्ली उडवत असतात.अशावेळी जो आपला हा प्रवास पुर्ण करतो ती व्यक्ती आणि त्यांचा तो प्रवास खरच आदरणीय वाटतो .अशावेळी "एन्ड रिजल्ट" महत्वाचा नसतो. 'प्रोसेस' महत्वाची.
Mtv वर 13 आठवड्यांपासुन सुरू असलेला IndiasNextTopModell चा सिजन नुकताच संपला.
यातील सर्व मुली स्पर्धकांमध्ये एक मुलगी मला पहिल्यापासुन फार आवडायची !सुरवातीपासुन प्रचंड लक्षणीय वाटली!
आसामची #जांती_हजारिका.
अत्यंत चार्मिंग पण इनोसंट चेहरा..तुकतुकीत त्वचा आकर्षक शॉर्ट हेअरस्टाइल,गोड हास्य पण रँम्पवर जाताच जबरदस्त अटिट्युड..फोटोशुटवेळी हवा असलेली किलिंग सेंशुयलिटी!
आणि कुठल्याही पेहरावात त्याच्याशी सात्म्य होत एलिंगंट दिसणारी ही आसामची मुलगी!!!
पण मॉडेलिंग इंडस्ट्रीमध्ये येण्याचा प्रवास तिचा हा बिलकुलही सोपा नव्हता.ती रंगाने डार्क सावळी असल्याने तिला तिच्या शाळा कॉलेजमध्ये अनेकजणं जंगली,कौवा, म्हणायचे..तिची मॉडेलिंगची इच्छा बघता मित्र ,नातेवाईक खिल्ली उडवायचे.तिच्या त्वचेच्या रंगावरून केसांवरून टर उडवायचे.ती मनाने पुर्ण खच्ची झालेली होती.#Depression मध्ये गेली होती .स्वत:चा अस्विकार केल्याने त्या काळात ती स्वत:लाच इजा पोहचवायची!
या रिअलिटी शो मध्ये आल्यावरसुद्धा तिच्यावरील टिका बंद झाली नााही.
तिचे आधीचे फोटोज बघताना कोणीही म्हणणार नाही की ही मुलगी कधी मॉडेल होउ शकेल!!
तिचा Top model मध्ये प्रवासही खडतर झाला. पण जसं जसं ती समोर जात गेली तसतसा विश्वास वाढत गेला.जांतीने सर्व राउंड्स हार्नेसफोटोशुट आउटडोअरफोटोशुट, बिकिनी राउंड्स शेवटी सर्वात महत्वाचा Lakme fashion week सर्व हळुहळु तिने जबरदस्त किलिंग पर्फॉर्मन्स दिलेत.
ते बघताना
Ohhh girl u r the besstt!! म्हणावसं वाटतं!!
एक रॉ टँलेंट मटेरिअल ते प्रोसेस्ड प्रोफेशनल मॉडेल हा प्रवास स्पष्ट दिसतो.
शेवटी तिन फायनलिस्टमध्ये आल्यावर मात्र ती स्पर्धा जिंकू शकली नाही #फर्स्ट_रनर_अप झाली. आर्मी बँकग्राउंड असलेली #प्रणति_प्रकाश ठरली.वडिल आर्मी ऑफिसर्स असलेल्या मुली यापुर्विही यशस्वी मॉडेल्स ,अँक्ट्रेसेस झाल्याहेत.कारण या मुलामुलींमध्ये पहिल्यापासुन जबरदस्त आत्मविश्वास ,बदल स्विकारण्याची वृत्ती, मोकळे विचार असतात.
पण जांतीहजारिका सारखी सर्वसामान्य मध्यमवर्गातुन आलेली #आत्मविश्वासाला आणि #आत्मसन्मानाला धक्के बसलेली काळ्या सावळ्या रंगाची मुलगी ठरावीक मानसिकता असलेल्या समाजात समोर येतेय !
PINK & DARK r colours of the #change now
Both goes hand in hand!!
Janteehazarika is #Indiasnextopmodel
LOVV u girl!!
No comments:
Post a Comment