मी याची देही याची डोळा सई ताम्हणकर आणि उर्वशी ढोलकियाला न्यूज चॅनलमध्ये "क्रिकेट स्पेशलिस्ट" म्हणून वर्ल्डकप मॅचेसमध्ये भारतीय टीमने कसे खेळावे , टॉस जिंकल्यावर काय करावे हे बोलताना पाहिलं आहे.😳
तेव्हाही मला तो प्रश्न पडला.
संपूर्ण करिअरमध्ये दहा टेस्ट मॅचेस खेळलेल्या आणि दोन फिफ्टीज केलेल्या , 20 चा अव्हरेज असलेल्या आकाश चोप्राला 'स्टुडिओत' हाती बॅट घेऊन सचिन तेंडुलकर ने, विराट कोहली ने कसं स्ट्रेट ड्राइव्ह , पूल मारावा हे सांगतानाही याची देही याची डोळा बघितलं आहे.😳
तेव्हाही मला प्रश्न तोच प्रश्न पडला!
पण ज्यांच्याकडे अजून स्वतःचा #पासपोर्टसुद्धा नाही, किंवा अजून जे भारताबाहेर भूटानलासुद्धा गेले नाहीत, किंवा "विदेश यात्रा" म्हणून 'नेपाळला' जाऊन तिथून कुकरी आणणारे आणि नाग, शिवलिंगाचे साच्यातून प्रतिमा काढलेले रुद्राक्ष आणून ते नातेवाईकांना ,मित्रांना खरेखुरे जागृत रुद्राक्ष सांगून विकणारे जेव्हा नरेंद्र मोदींच्या (फक्त) "विदेश वाऱ्यांवरून" त्यांना "हिंड केसरी" म्हणत निरर्थक टीका करतात तेव्हाही मला तोच प्रश्न पडतो आणि न राहवून विचारावं लागतं की
इतका आत्मविश्वास हे आणतात कुठून!?? 😳😳
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
- अभिजित पानसे
No comments:
Post a Comment