Sunday, 3 December 2017

शेतकरी आणि दत्त

त्रिमुर्ती गुरूदेवदत्तांमधील 'ब्रम्हा' हा विश्वाची निर्मिती करतो;(GOD OF CREATION)
विष्णु हा विश्वाचं पालन-रक्षण करतो (GOD OF MAINTAINANCE)
तर शिव हा सृष्टीचा संहार करतो (GOD OF DESTRUCTION)
अश्या प्रकारे सृष्टीचा खेळ सुरू राहतो.
असा विश्वास आहे.

मुळ ईश्वरी उर्जेचं सगुण साकार रूप म्हणजे श्रीगुरूदेवदत्त.

पण मला दत्तगुरूंचं जिवंत रूप म्हणजे एक 'शेतकरी' वाटतो.

शेतकरऱ्याचं जग हे त्याची शेती असते.

शेतकरी हा शेताची नांगरणी करतो.पेरणी करतो.
तेव्हा तो 'ब्रम्हा' असतो.GOD OF CREATION

पेरलेल्या शेतीची तो निगा राखतो.खत पाणी देतो.अंकुरीत रोपट्यांपासुन पीक तयार होइपर्यंत रक्षण करतो.
पोषण करतो.
तेव्हा तो 'विष्णु' GOD OF NURTURING असतो.

हाच शेतकरी योग्यवेळी पीकाची कापणी करतो.हंगाम संपला की स्वत:च पेरलेल्या,पोषण, रक्षियेल्या रोपट्यांना नष्ट करतो.
गव्हाचे पेर,धांडे,तण उपटुन काढतो.पुर्वीच्या पिकांचे सर्व अवशेष नष्ट करतो.
पुढील उत्पादनासाठी संपुर्ण शेत स्वच्छ करतो.
तेव्हा तो 'रूद्ररूप' (GOD OF DESTRUCTION)असतो.

 याचप्रकारे पुन्हा नांगरणी..पेरणी..पुन्हा पालन पोषण..रक्षण..मग पुन्हा नष्ट...

हे रहाटगाडगं असच सुरू राहतं.
शेतीचं आणि सृष्टीचंसुद्धा.

शेवटी शेतकरी हाच भूदेव.
 तोच प्रत्यक्ष पोषण करतो.

कारण भाकरी असो वा हँमबर्गर,
पोळी असो वा पिझ्झा;
यापैकी काहीही  आकाशातुन खाली येत नाही.


No comments:

Post a Comment