बांग्लादेशचा सुलेमानी रेहमानी किडा
015 वर्ल्ड कपमधील रोहित शर्माचं नो बॉल प्रकरण झाल्यावर जून महिन्यात भारत बांगलादेश दौऱ्यावर गेला असता , आत 'सुलेमानीकिडा' असलेला मुश्ताफिझुर रहमान हा बॉलर सुरवातीच्याच ओव्हरमध्ये रोहीत शर्माने बॉल मिडऑफला खेळल्यावर रन घेताना बॉलिंग एन्डकडे जात असताना , मुष्टफिझुर रेहमानने हलकेच मान कलून डोळयांच्या कडेतून धावत येणाऱ्या रोहित शर्माकडे पाहिलं आणि मुद्दामून रोहितच्या मध्ये आला.
रोहित शर्माने त्याला वळसा घालून क्रीजमध्ये येण्याच्या प्रयत्नात दोघे एकमेकांवर हलकेच आदळले. बॉलरला ही तेच हवे होते कारण शर्माला वळसा घालून पोहचताना उशीर लागणार होता त्यामुळे तो रन आऊट होऊ शकला असता. तोवर फिल्डर चा थ्रो आला होता पण शर्मा रन आऊट होताना बचावला. रोहित शर्माने तात्काळ नाराजीने आणि रागावून त्याला तंबी दिली. अँपायर ही मध्ये पडले.
पण पुढे याच मिषतफिजूर रहमान ने पुन्हा किडे..काडी केली.
पण यावेळी त्याने चुकीच्या खेळाडूला निवडले. चुकीच्या प्लेयरसोबत पंगा घेतला.
तो खेळाडू होता महेंद्रसिंग धोनी.
पुढे काही ओव्हर्स झाल्यावर महेंद्रसिंग धोनी बॅटिंग करताना अगदी याच पद्धतीने पुन्हा मुद्दामून मुष्टफिझुर रहमानचा किडा वळवळला .धोनीने ऑफ साईडला बॉल खेळला, बॉलिंग एन्ड कडे जात असताना आधिप्रमाणेच रेहमानने हलकेच डोळयांच्या कडेने धोनी कुठून धावत येतोय पाहून घेतलं ,फिल्डरकडून थ्रो येत होता म्हणून मुद्दामून धोनीला रन आऊट करता यावं म्हणून बेकायदेशीररित्या धोनीच्या रस्त्यात आला...
त्याला वाटले शांत समंजस धोनी त्याला वळसा घालून जाईल.
पण इथे तो चुकला..इथे रोहित शर्मा नव्हता, वेल बिल्ट ,शक्तिशाली महेंद्रसिंग धोनी होता. ज्याने पाकिस्तानविरुद्ध पहिली सेंच्युरी हाणल्यावर त्याच्या दूध पिण्याचे खरे खोटे किस्से प्रसिद्ध झाले होते. मुष्तफिझुर ला कळले नाही कोणासमोर किती वस्त्रात राहायचे. त्याने धोनीचा रस्ता अडवला. त्याला वाटले धोनी त्याला वळसा घालून जाईल त्यामुळे जास्तीचा वेळ लागून तो रन आऊट होऊ शकेल. कारण फिल्डरचा थ्रो आलेला होता.
धोनीने वळसा घातला नाही.
त्याने रिफ्लेक्स ऍक्शनने मुद्दामून मध्ये आलेल्या रेहमानला कोपराने धक्का दिला. त्या हलक्याश्या धक्क्याने रेहमान पाच एक फूट दूर गेला. वरून धोनीने ताबडतोब अंपायरकडे त्याची तक्रारही केली. धोनीनेही एकप्रकारे नियमाचे उल्लंघन केले असल्यामुळे त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता होती. पण सुलेमानी किडा असलेल्या रेहमानने याआधी काही ओव्हर्सपूर्वी रोहित शर्मा सोबतही हेच केल्याने धोनीला काहीही दोष देण्यात आला नाही.
पण खरी मजा पुढे होती. महेंद्रसिंग धोनीचा तो हलकासा धक्का ..'कोपरखळीचा' धक्का इतका जबरदस्त बसला की मुशतफिझुर रेहमान आपल्या पोटाची एक बाजू धरून बसला. तो पुढचा बॉल ही टाकू शकला नाही आणि फिजिओ येऊन त्याला ग्राउंड मधून आत घेऊन गेला. त्याचा उरलेला ओव्हर दुसऱ्या बॉलरने पूर्ण केला.काही वेळ उपचार घेतल्यानंतरच तो परत आला.
इसिलीये धोनीसे बचके रहीयो!
"मध्ये आला त्याला तुडवला"
- अभिजित पानसे

No comments:
Post a Comment