माझी एक मैत्रीण आहे , ती बारावीत असतानापासून तिची एक महत्वकांक्षा होती की तिला तिचं स्वतःचं मासिक, अंक, मॅगझीन काढायचंय. मला फार अप्रूप वाटतं तिच्या या गोष्टीचं.
तिने पुढे पत्रकारितेचं शिक्षण घेतलं. पत्रकारितेची नोकरी केली. काही चांगले वाईट अनुभव घेतलेत. पुढे नोकरी सोडली.लग्न केलं. पण साहित्याचा व्हायरस आणि जुनी इच्छा काही मनातून जात जात नव्हतं.
ती लिहीत नाही. पण administrative गुण मात्र खूप आहेत! आणि व्याकरण , साहित्याचे बेसिक्स खूप चांगले आहेत. त्यासंबंधी ती काम करत असते.
विवाहानंतर मात्र तिच्या गोष्टी बदल्यात .तिचा नवरा अत्यन्त चांगला, आदर्श नवरा आहे.तिला प्रचंड साथ देणारा!
तिला शहरात यायला खूप दूर पडतं म्हणून ,निगडीच्या पुढे स्वतःचं घर असताना तिला त्रास होतो म्हणून भाड्याने एरंडवणेला राहू लागलेत. जिथे ते राहायला आलेत, त्याच बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या तिच्याहून वयाने मोठ्या स्त्रीशी ओळख झाली. त्याही साहित्य, पुस्तक प्रकाशन यात खूप आवड असलेल्या . त्यांची एकदम गट्टी जमली. ती त्यांना ताई म्हणते. पण ती माझी तिसरी आई आहे असे गंमतीने सांगते. एक तिची आई, एक 'सासूबाई आणि तिसऱ्या या ...ताई!
तेव्हा तिने ठरवलं की स्वतःचा दिवाळी अंक काढायचा!त्या दोघीनीही खूप मेहनत करून त्यांनी सलग चार वर्षे दिवाळी अंक काढला!
मुळात त्यांच्या अंकाचा विषय हा प्रकाशना संबंधित तांत्रिक बाजूवर असतो. त्यामुळे सर्वसामान्य वाचक ते एन्जॉय करणारनाही असं मी तिला नेहमी म्हणतो.पण तरीही तीने विषय बदलला नाही. कमर्शिअल झाली नाही.
मागच्या वर्षी तिला तिच्या अंकासाठी अवॉर्ड मिळालं.
यावर्षीची दिवाळी मात्र तिच्यासाठी खास आहे. यावर्षी अंक काढू शकू की नाही अशी धास्ती तिला वाटत होती. कारण ती गर्भवती आहे. त्यामुळे अंकाची धावपळ जमेल की नाही काळजी होती.
तिने पाचव्या , सहाव्या महिन्यात देखील जाहिरातींसाठी, अंकातील मुलाखतींसाठी लेखकांना भेटणे, आर्टिस्टकडून मुखपृष्ठ बनवून घेणे, मग घरी येऊन त्या दोघी मिळून आपापल्या लॅपटॉपवर प्रूफ रिडींग आणि इतर गोष्टींवर दिवसभर काम असा त्यांचा काही महिन्यांपासून दिनक्रम असायचा. रात्री नवऱ्या सोबत नियमितपणे चेक अप ला जायची.मग दोघे मिळून स्वयंपाक करायचे.
तिला तिच्या तब्येतीबद्दल सहज विचारलं तर ती फक्त दिवाळी अंकाबद्दल , त्याचे अपडेट्स सांगायची! ती म्हणायची पहिले डिलिव्हरी अंकाची मग माझी! तिच्या कामाकडे बघून कोणी म्हणणार नाही की ती प्रेग्नन्ट आहे. आणि ती ही पहिलीच वेळ!
आणि हे सगळं करताना ती उत्साही , गंमती मजा सगळं करत असते. एरवी चिडकी असल्याने तिची पंचाईत होतेय कारण डॉक्टरने शांत , आनंदी राहायला सांगितलं आहे. त्यामुळे तिची फार मजेदार परिस्थिती होते.
काम झाले नाही की फार संयम बाळगून न चिडण्याचा प्रयत्न करते.
पण एक दिवस भडका माझ्यावर निघाला! कारण दोन महिन्यांपासून तिने मला लेख 'द्यावाच' लागेल अशी धमकी दिली होती.आणि मी तिला प्रथम नाही म्हणून नंतर मुद्दाम "बघेन जमलं तर " म्हणालो होतो. यावरून नियमितपणे ती स्वतःवर फार नियंत्रण ठेऊन माझ्यावर रागवायची.
शेवटी अंक छापायला द्यायच्या काही दिवस आधी रात्री 10 वाजता तिचा फोन आला तिने फक्त निर्वाणीचा इशारा, धमकी दिली की उद्या मी सकाळी उठल्यावर तुझा लेख आलेला मला दिसला नाही तर यानंतर मी बोलणार नाही!
माझ्यासारख्या दगडाला असले पुश मिळाल्याशिवाय ते काही करत नसतात.
रात्री 2 वाजता बसून तिने सांगितलेल्या विषयावर जमेल तसा लेख सकाळी 6 वाजता तिला मेल केला.
त्यांचा सलग पाचव्या वर्षी दिवाळी अंक प्रदर्शित झाला.
आता ती प्रेग्नन्ट स्त्रीने घ्यावी तशी विश्रांती घेण्यास सुरुवात केली आहे.
तिचे सासू सासरे युएस ला दुसऱ्या मुलाकडे असताना तिने आणि तिच्या नवऱ्याने मिळून गणपती गौरी चं संपूर्ण केलं होतं.
माझ्याशी चित्रपट आणि पुस्तक , साहित्य यावरून सतत वाद करणारी ही व्यक्ती. कारण मी पूर्णपणे चित्रपट किडा तर ती जातिवंत साहित्याची अभ्यासू!
मी फेसबुकवर 'टाईमपास' लिहिण्याच्या सतत विरोधात असणाऱ्या दोन व्यक्तींपैकी ही एक.
जबरदस्तीने पुस्तकं वाचायला लावणारी ही एक व्यक्ती.
असे लोक असतात आजूबाजूला त्यामुळे एनर्जी मिळत राहते.
- अभिजित पानसे

No comments:
Post a Comment