आमचा हार्दिक पटेल जसा 'पाटीदार' समाजाचा प्रमुख आहे तसे भारतीय क्रिकेट टीममध्ये 'पाटादार' समाजाचे लोक आहेत. रोहित शर्मा पाटा पिचवरील जाफरानाबादी गाय शहाणी! उपखंडाबाहेर भाकड !
मुळातच तंत्र अचूक नाही. त्यात फक्त 'रेप्युटेशन' वर जाऊन अजिंक्य रहाणेला बसवून शर्माजीला घेतलं.
"गब्बर धवने" मिशिवाले, पाटा पिचवर मांड शड्डू ठोकणारे ! मिशीला पीळ वगैरे देणारे! बाहेर त्यांच्या तलवार मिशीचा बाक, पीळ जाऊन ती चायनीज मिशी..खाली लटकते.
यांच्यापेक्षा के एल राहुलला संधी मिळावी असं वाटतेय आता. राहुल चांगला फलंदाज आहे म्हणून नाही, तर शिखर धवनमध्ये ते विदेशात कसोटी सामन्यात लागणारं तंत्र आणि गांभीर्य नाही म्हणून त्याच्यापेक्षा राहुल बरा, किमान तो शंभर टक्के द्यायचा प्रयत्न करेन.
साबा करीम, समीर दिघे, (पार्थिव) छोटा पटेल यांच्या लायनीत बसणारे रिद्धीमान साहा. साहापेक्षा नयन मोंगिया चांगला फलंदाज होता हा प्रश्न पडावा अशी त्याची मुळात कमकुवत फलंदाजी.
"विजय भौ " भारतात इतके 'अॅक्रॉस' खेळत नाहीत, आफ्रिकेत येऊन प्रत्येक बॉल अॅक्रॉस, कैची खेळताय!
सामन्यात पाच ओव्हर्समध्ये तीनदा आऊट झालेत.
दोनदा आऊट दिल्यावर रिव्ह्यूज ने वाचवलं.
हे पाटादार लोक आपल्याच पाटा पिचवर बॅटा उंचावून प्रेक्षकांना दाखवतात आणि पिचवर थोडं ज्यूस, गवत असलं की पाट्या टाकत तंबूत परतात.
भारतीय टीमच्या नशिबाने 'स्टेनगन' (डेल स्टेन जखमी होऊन मैदानाबाहेर गेला) बंद पडली असताना जिंकण्याची सुवर्ण संधी गमावली.
पुनः नेहमीप्रमाणे इतिहास रचता रचता इति ऱ्हास झाला.
- चिडलेला आणि नाराज अभिजित पानसे
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका , कसोटी मालिका, आफ्रिका दौरा, 2018
8 जानेवारी, 2018
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका , कसोटी मालिका, आफ्रिका दौरा, 2018
8 जानेवारी, 2018
No comments:
Post a Comment