वकील ते कास्टिंग डिरेक्टर - अभिजीत पानसे.
इन्ट्रो- वेब सीरिज च्या डिजिटल जगात आज निधी बिश्त हे महत्त्वाचं नाव बनलंय.
ते म्हणतात इंटरनेट इज फुल ऑफ इंटलीजन्ट पिपल स्टक इन डिफ्रंट जॉब!
थ्री इडीएट्स मध्येही बाबा रनछोडदासांनी आपली मूळ आवड ,आपले पॅशन आणि आपले करिअर यावर ज्ञानामृत दिले आहे.
पण प्रत्येकातच ही हिम्मत नसते.हातचं सरळ साधं करिअर, नोकरी सोडून आतल्या उर्मी ला बाहेर येऊ देऊन तिचा पाठलाग करत आपला रस्ता स्वतः तयार करणे हे चित्रपटात बघायला छान वाटतं पण प्रत्यक्षात करताना मात्र पाय लटपटतात.
पण कधी नियती, तर कधी कितीही दमन केलं तरी उफाळून येणारी आतील उर्मी, कधी परिस्थिती ही त्या व्यक्तीला त्याच्या आवडीच्या क्षेत्रात आणते. आणि ती व्यक्ती त्या क्षेत्रात मोलाची भर टाकते.
अशीच गोष्ट आहे निधी बिष्तची!
वेब सीरिज या क्षेत्रात आज निधी बिश्त हे महत्वाचे नाव आहे.
पर्मनंट रूममेट्स, पिचर्स , उम्रीका यावेब सीरिजची कास्टिंग डिटेक्टर आणि त्यात काम कारणारी असलेली ही निधी बिश्त!
कास्टिंग डिटेक्टर चे काम म्हणजे एकप्रकारे थॅंकलेस जॉब असतो.त्यांचं काम प्रेक्षकांच्या लक्षातही येत नाही !पण कास्टिंग डिरेक्टर ने योग्य कास्टिंग केलं असेल तरच ती मालिका, चित्रपट आणि त्यातील पत्रे हृदयाला भिडतात.खरे वाटतात. महाभारत आणि रामायण हे एकेकाळीविक्रमी लोकप्रिय झालेले दुरदर्शनवरील कार्यक्रम ,यातील सर्वोत्तम गोष्ट म्हणजे या महामालिकांमधील कास्टिंग!यातील प्रत्येक पात्र हे जणू ती भूमिका साकारणारा एक वाटतो असे सर्व म्हणतात.हेच काम असतं कास्टिंग डायरेक्टरचं. निधी बिश्तने पर्मनंट रूममेट्स मध्ये निधी सिंग, आणि प्रफुल व्यासचे प्रमुख रोलसाठी कास्टिंग केले आणि आज ते पात्र त्यांची ओळख बनलंय. ' पिचर्स 'या उत्तम कलाकृती असलेल्या वेब सीरिजमधील प्रत्येक पात्र जणू त्या त्या अभिनेत्या अभिनेत्रीसाठीच तयार केले आहे असे वाटते.हे सर्व श्रेय जातं कास्टिंग डायरेक्टर निधी बिश्तला!
कास्टिंग डायरेक्टरकडे एक अंतःप्रेरणा हवी असते. निधीला जणू हे ईश्वरी वरदान लाभलेय. ती म्हणते मी जेव्हा संहिता वाचून काढते तेव्हा त्याक्षणी मला आतून प्रेरणा, इंस्टीनक्ट्स मिळतात की ही भुमिका कोण योग्य रीतीने करू शकेल!
पण पूर्वी ही मुलगी दिल्लीला वकिली पेशात होती.एक सर्वसामान्य शुभ्र कॉलर नोकरी,आयुष्य जगत होती.दिल्लीला वकिलीचे शिक्षण घेऊन एक वर्ष दिल्ली हायकोर्टात नोकरी करताना आतील अभिनयाची उर्मी मात्र तिला शांत बसू देत नव्हती.
वकिली करताना तिने अभिनयाचा एक सप्ताहाच्या शेवटी दोन दिवस असणारा कोर्स केला.आणि तिचे हिंदी नाट्यरंगमंचावर आगमन झाले. नाट्य प्रयोग करताना तिला तिचे सुप्तगुण समजू लागलेत. नवनव्या कल्पना तिला सुचू लागल्यात, त्यावर ती काम करू लागली.
नाट्यभूमीवर काम करताना तिला तिच्यातील अभिनेत्री गवसली.
आवाजावर ,शब्दांवर, संवादावर प्रचंड नियंत्रण असलेल्या या मुलीला , तिची अभियानाचे प्रचंड आवड,प्रेम पाहून या क्षेत्रात येण्याचे सुचवलेही.
एक दिवस तिने निर्णय घेतला आणि सामान भरून मुंबईकडे प्रस्थान केले.रेल्वेच्या आवाजापेक्षा मनात चाललेल्या वैचारिक वादळाचा,आंदोलनाचा गदारोळ जास्त होता.
मुंबईला आल्यावर मात्र तिला सगळीकडे नकार मिळू लागला.तिचा चेहरा गोल प्रकारात मोडत असल्याचे कारण सांगून तिला प्रमुख अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी अपात्र ठरवू लागलेत.पण ती तग धरून राहिली.पुढे तिची ओळख "टीव्हीएफ या वेब सिरीज कंपनी चे संस्थापक 'अरुणाभ कुमार"शी झाली आणि तिथून ती टीव्हीएफ या वेब सिरीज निर्मिती मधील ब्रँड असलेल्या निर्मिती चॅनलची प्रमुख घटक झाली.निधी बिश्त ने सुपरहिट सीरिज पर्मनंट रूममेट्स ,ट्रिपलिंग मध्ये काम ही केलं आहे. "माँ के हात की सिगारेट" , " कॉलर नैना" हे विडंबनात्मक व्हिडीओज आणि तिची एकता कपूर ची भूमिका नेटिझन्सला प्रचंड आवडली आहे. आता अनुष्का शर्मा च्या फिलोरी या चित्रपटातही तिची भूमिका आहे.
वेब सीरिज सारख्या डिजिटल , चित्रपटसारख्या व्यवहारी माध्यमांत काम करतानाही तिचे रंगभूमीवरील प्रेम कायम आहे.स्वतःची नाट्य कंपनी असावी त्यात नवोदित कलाकारांना संधी मिळावी हे तिचं स्वप्नही तिने पूर्ण केलंय.तिचे नाट्य रंगमंचावर मनापासून प्रेम असल्याने तिची आज स्वतःची "न्यू ब्रेन थिएटर वोक्स" ही कम्पनी सुरु केली आहे.आजच्या पिढीची स्वतःचा रस्ता स्वतः बनवणारी ही मुलगी निधी बिश्त सर्व तरुणांसाठी प्रेरणा आहे.
No comments:
Post a Comment