ताकदीचा कलावंत कधी कधी छोटी भूमिका स्वीकारूनही संपूर्ण कलाकृतीवर आपली छाप सोडतो. तसं “जाने जा ढुंढता फिर रहा...मैं यहा से वहा.." हे गाणं किशोर कुमारचं आहे. यात आशा भोसले यांनी आलाप देऊन साथ दिली आहे. एकंच कडवं गायलंय. हे गाणं आशा भोसलेंचं एक विशेष गाणं वाटतं. या गाण्यात त्यांनी वेगळा आवाज.. आलाप लावलाय, वेगळा खर्ज लावलाय. खर्जात्मक आवाजाने 'हमिंग' चा फील येतो. ज्यामुळे तो नेजल खर्ज भासतो. मुळात नेजल नाही.
खर्ज आणि नेजल व्हॉइस या दोन ध्रुवावरील दोन गोष्टी.
किशोर कुमारने नेहमीप्रमाणे गाणं सहज गायलं आहेच पण वेगळ्या खर्जातील साथ आशा भोसलेंनी देऊन संपूर्ण गाणं वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलंय.
आशा भोसलेंनी , VIBGYOR , सर्व प्रकारची गाणी गायली आहेत. पण हे जुनं गाणं मला वेगळं वाटतं.
- Abhijeet Panse
No comments:
Post a Comment