मागच्या वर्षी लोकप्रभामधील लेख वाचून मुंबईतील एका मुलाचा फोन आला होता. त्याने सांगितलं लोकप्रभा ऑफिसमध्ये फोन करून माझा नंबर घेतला. त्याने सांगितलं की त्याने एक शॉर्ट फिल्म तयार केली आहे. तिला कुठलातरी अवॉर्डही मिळाला आहे. ती शॉर्टफिल्म, LGBT ग्रुपमधून त्याने फेस्टिव्हलला पाठवली होती. शॉर्ट फिल्म समलैंगिकता या विषयावर केली आहे.
तो स्वतः LGBT ग्रुपमध्ये येतो.
सुरवातीला मला हा मित्राचा प्रॅंक वाटला. म्हणून तत्कालीन उपसंपादक चैताली जोशीला विचारून पक्कं केलं की खरंच त्याने फोन करून माझा नंबर घेतला होता.
त्याच्याशी बोलून खूप छान वाटलं होतं. सगळ्यात विशेष गोष्ट ही होती की त्याच्या आईने स्वतः त्याला ही शॉर्ट फिल्म तयार करण्यात खूप मदत केली. शिवाय त्याच्या आईनेही त्यात काम करून एक बाजू मांडली आहे.
त्याचं नाव आठवत नाही. त्याचा नंबरही आता नाही. पण आज समलैंगिकता हा अपराध नाही हे 377 कलम सुप्रीम कोर्टाने रद्द करून ‘नैसर्गिक’ LGBTना खूप दिलासा दिला आहे. त्यामुळे आज त्याची आठवण झाली.
तो जिथे कुठे असेल त्याच्यासहित
सर्व नैसर्गिक लेस्बियन्स, गे, बायदेक्शुअल, ट्रान्सजेंडर्स लोकांचे अभिनंदन.
आता त्यांना अटक होण्याची भीती राहणार नाही. .ते उघडपणे समाजात वावरू शकतील शिवाय आपले नाते उघडपणे सांगू शकतील. फक्त याचा दुरुपयोग लैंगिक शोषणात होऊ नये ही आशा. कोर्टाने शिशुंसोबत आणि प्राण्यांसोबत केलेले लैंगिक व्यवहार हे अपराध ठरवले आहेत. हे अत्यंत योग्य.
सुप्रीम कोर्टाने एक ऐतिहासिक जजमेंट दिलंय. प्रोग्रेसिव्ह, पुरोगामी भारताचा एक सकारात्मक अभिनंदनीय पुरोगामी निर्णय.
- Abhijeet Panse
No comments:
Post a Comment