GoogleDONDoodle
त्यांना म्हातारवयात पत्रकाराने विचारलं असता, आजच्या काळात तुम्ही क्रिकेट खेळत असता तर काय सरासरी असती तुमची? म्हाताऱ्यानं उत्तर दिलं , चाळीस ते पंचेचाळीस.
पत्रकार आश्चर्यचकित होऊन म्हणाला, "इतकी कमी या काळात खेळला असतात तर! "
तो म्हातारा म्हणाला , वयाच्या सत्तरीत इतकी सरासरी नक्कीच वाईट नाही.
ज्या खेळाडूच्या बॅटिंग अॅवरेजच्या नंबर्सवरून ऑस्ट्रेलियाच्या एका रेडीओ वाहिनीची फ्रिक्वेन्सी ठेवण्यात आली.
तो आउट होत नाही म्हणून त्याला जखमी करण्यासाठी इंग्लंडच्या कॅप्टनने त्याच्या बॉलर्सला त्याच्या अंगावर बेछूट बॉलिंग करायला फर्मावलं. त्या काळात आजच्या काळातील बॅट्समनला गोंजारणारे कुठलेही नियम नव्हते. ती अंगावर लाल इंग्लिश बॉम्बगोळे टाकणारी मालिका “बॉडी लाईन” सिरीज म्हणून इतिहासात अजरामर झाली.
ज्याचा उजवा हात जखमी झाल्याने तो बॅटिंग करू शकणार नाही, हे माहिती असूनही ; ‘तो’ उजवा हात जखमी असताना , डाव्या हातात बॅट घेऊन मैदानात उतरून आपल्याला हरवेल या भीतीमुळे इंग्लिश कॅप्टन घाबरायचा.
जो आउट झाल्यावर इंग्लिश लोक त्याला ‘बास्टर्ड’ म्हणून राग करायचे.
त्या सगळ्या तिरस्कारात त्या माणसाला त्याच्या महानतेची पावती त्याला मिळत राहिली.
आज त्यांचा वाढदिवस. गूगल ने आज त्यांना मानवंदना म्हणून #गूगलडूडल ठेवलाय.
तो महामानव अतिमानव यतीमानव सर डॉनल्ड ब्रॅडमन!
यांच्यावर कितीही लिहिलं तरी कमीच आहे. इच्छुकांनी "श्री शिरीष कणेकर द ग्रेट" यांना फॉलो करावे. ही सगळी माहिती लहानपणी त्यांचे लेख वाचूनच आठवली आहे.
- Abhijeet Panse

No comments:
Post a Comment