Showing posts with label 70mm स्क्रीन. Show all posts
Showing posts with label 70mm स्क्रीन. Show all posts

Sunday, 29 July 2018

हा "हृषीकेश जोशी" नावाचा इसम कधी भेटला तर मला त्याला मिठी मारायची आहे. किती नितांत सुंदर काम करतो हा माणूस! मसाला मधील ‘तो’ सायकल मधील ‘हा’, दोन्ही टोकाच्या भूमिका डोंगरावरून अलगद झरा कोसळावा तसा अगदी सहज अभिनय करतो. खरंतर नाट्यभूमीचा कलाकार असल्याने त्याच्यासाठी या दोन्ही भूमिका करणे म्हणजे खायचं काम होतंच. पण तरिही सायकल मधील त्याचा वावर, अस्तित्व हेच डोळयांना मेजवानी वाटते. तो चित्रपट खाऊन टाकतो.

सायकल एक अगदी सहज, शांत, तरल चित्रपट.
एरवी ‘कोंकण’ पार्श्वभूमी असलेले चित्रपट बघताना ,  दिग्दर्शकावर ठराविक पद्ध्तीनेच, चाकोरीबद्ध कोंकण दाखवलं पाहिजे याचा ताण असतो का, ही शंका येत राहते.  कारण सर्वच “कोंकण चित्रपटात” पावसाळ्यातील हिरवाकंच निसर्ग, ठराविक पुस्तकी- सिनेमॅटोग्राफिक कोंकणच दाखवला जातो. प्रत्यक्षात एरवी तसा दिसणारसुद्धा नाही. पण सायकलमध्ये असं कुठलंही स्टिरिओटाईप न होता सहज कोंकण दर्शन दाखवलंय. ही गोष्ट विशेष आवडली.

प्रियदर्शन जाधव! याच्या लेखणीचा चाहता मी आधीपासूनच आहे. पण त्याचा अभिनयही तितकाच मस्त असतो.
प्रियदर्शन जाधवला खूप दिवसांनी मोठ्या पडद्यावर बघितल्याने छान वाटलं.

"दीप्ती लेले".  “मृण्मयी देशपांडेचं” लग्न झाल्यावर ठिकऱ्या ठिकऱ्या झालेल्या माझ्या हृदयाला ‘पुन्हा’ असेंम्बल करणारा आशेचा किरण दीप्ती लेलेच्या रुपात दिसतोय. खूप सुंदर बोलका चेहरा. इन्स्टाग्राम ही खूप ऍक्टिव्ह. तिनेही साजूक तुपातला अभिनय केलाय.

अँड देन ही कम्स! भाऊसाहेब  “ भालचंद्र कदम”! स्वतःच्या नुसत्या अस्तित्वानेच हसायला लावणारा हा नट. नेमक्या योग्य वेळी चेहऱ्यावर विनोदी  निरागस भाव, आपल्या खास (खर्जात?) आवाजात एखादं वाक्य, शब्द म्हणून दृश्यावर प्रभाव टाकणारा. यालाही मिठी मारायचीच आहे.

चित्रपटात काही छोट्या छोट्या दृश्यांनी सुंदर परिणामकारकता साधली गेलेली आहे.
प्रदीप वेलणकरांचं दृश्य खूप मस्त.

चित्रपटाच्या सुरवतीलाच लिहून येतं, की या सिनेमतील काळ, जेव्हा लोक साधी होती तेव्हाचा आहे. आणि तो काळ, तो भाव सम्पूर्ण चित्रपटात जाणवत राहतो.

सगळ्यात जास्त आवडलेलं वाक्य, “ आणि वस्तुंमध्ये किती काळ रमायचं ना!” हे. सिनेमाचा शेवट सुद्धा या वाक्याच्या अभिव्यक्तिवरच होतो.

नितांत सुंदर , गोड सिनेमा बघितल्याचा अनुभव मिळतो. आणि ते वाक्य आठवत राहतं ," वस्तूंमध्ये किती काळ रमायचं! " ......

- Abhijeet Panse

Saturday, 28 April 2018

प्राजक्ताचं फुल , ऑक्टोबर.

शास्त्रीय संगीत ऐकणे.. अनुभवणे यासाठीही कानसेन व्हावं लागतं. तो दर्जा हवा असतो. हळूहळू भिनत जातं ते संगीत मनात.. इथे इतर गाण्यांप्रमाणे श्रोत्यांचे लाड केले जात नाहीत. सहज सोपं श्रोत्यांना आवडेल ते दिलं जात नाही.

हेच समांतर चित्रपट आणि मसाला चित्रपटासंबंधी असतं. मसाला, व्यावसायिक चित्रपटांमध्ये प्रेक्षकांचे लाड केले जातात. त्यांना चमच्याने भरवलं जातं.
#ऑक्टोबर हा असाच शास्त्रीय संगीतासारखा सिनेमा आहे. हळुवार शांतपणे मुरत जाणारा..

सुजित सरकारचा मूव्ही बघणे म्हणजे एक अपरिहार्य गोष्ट असते. रोजच्या धांगडधिंगा चित्रपटांपेक्षा काहीतरी वेगळं , शांत, आर्त भावनांचं चलचित्र त्याच्यात बघायला मिळतं. बहुतेकवेळा ते सकारात्मक असतं.
हा सिनेमा ही संपूर्णपणे सकारात्मक.

एक छोटीशी कादंबरी, कुठलेही भावनक्षोभ करणारी आनंदपर्यवसायी तरल कलाकृती उलगडत जावी असा शांतपणे सिनेमा अलगडत जातो.

प्रेमात ‘पडल्यावर’ मग अडचणीत ‘पडणे’ , “गर्ल मिट्स ए बॉय” आणि व्हाइस वर्सा, यावरच आजवर सर्व प्रेम कहाण्यांचा रतीब घातला गेलाय. येथे मात्र पूर्णपणे वेगळा मामला आहे.
त्यामुळे पारंपरिक प्रेमकहाणी ही नाही.

एक कोणाचीही पत्रास न ठेवणारा, काळजी न करणारा सडाफटींग फक्त तिसऱ्या व्यक्तिमार्फत, मुलीने सहज त्याच्यासंबंधीत म्हटलेलं एक वाक्य ऐकतो. त्याचाच विचार करत राहतो. आणि हळुवारपणे प्रेमात पडत राहतो. ती प्रेमाची ऊर्जा तिच्या  मनापर्यंत ही पोहचते. आणि ती ही हळूहळू प्रेमात पडते. आणि ‘शांत’ होते.

“द अलकेमिस्ट”  मध्ये एक वाक्य आहे , व्यक्ती जेव्हा कुठली गोष्ट , धातू , वस्तू शुद्ध करण्याचा प्रयत्न करत जातो त्या दरम्यान त्या वस्तुबरोबर तो सुद्धा अंतर्बाह्य शुद्ध होत जातो. मानसिक दोष नष्ट होत जातात.
येथे या मुलाबरोबर  हेच होत जातं.

समांतर सिनेमा हा ‘मास’ला सुसह्य व्हावा यासाठी विनोदाची पेरणी गरजेनुसार करावी लागते. ती शुजित सरकारने केलीय. नाहीतर हा चित्रपट ‘जड’ झाला असता. पण कुठेकुठे विनोद पेरणीत तो थोडा वाहवत गेला हे ही खरं.

वरुण धवन ही डेव्हिड धवनने बॉलिवूडला दिलेली आजवरची सर्वोत्तम भेट आहे. ( तरीही जुडवा 2 साठी त्याला माफी नाहीच.) वरुण धवनला बघणे हीच मेजवानी असते. “एक था बदलापूर’ ते ‘ऑक्टोबर’ या दोन ध्रुवावरच्या भूमिका तो सहज करू शकतो.
ऑक्टोबरमधील भूमिका त्याच्यासाठी तशी “होम पिच”च म्हणावी लागेल.

नवी अभिनेत्री ..अभिनेत्री नाही म्हणता येणार, नव्या हिरोईन ला बघणंही डोळयांना मेजवानी आहे. विशेषतः तिचे ‘अधर’.

थोडे उघडलेले अधर हे मादक दिसतात, हे मान्य. पण आता ते ‘स्टीरिओटाइप’ झालंय. येथेही सरकार वाहवत गेलेय. त्यामुळे नंतर नंतर ते बघताना विनोदी वाटू लागतं.

शुजित सरकारच्या चित्रपटाचं संगीत, गाणी हे यूएसपी असतात. ऑक्टोबरमधीलही गाणे श्रवणीय आहेत.

एस सरकार बरेचदा नवे पण रंगमंचावरील सशक्त अभिनेत्यांना चित्रपटात घेतो. ‘कास्टिंग’ हे सुद्धा  त्याच्या चित्रपटाचं वैशिष्ट्य असतं.

मद्रास कॅफेमधून त्याने प्रकाश बिल्वडी या स्वतःची वेगळी शैली असलेल्या थिएटर अभिनेत्याला संधी दिली. त्यानंतर त्यांना इतर हिंदी चित्रपटात भूमिका मिळत गेल्यात. ऑक्टोबरमध्ये “गीतांजली राव” या हिंदी रंगभूमीवरील अभिनेत्रीला त्याने चित्रपटात आईची भूमिका दिली. ही अभिनेत्री पहिला चित्रपट करतेय अशी शंकाही येणार नाही. ही आहे हिंदी रंगभूमीची ताकद. हिंदी रंगभूमी खूप समृद्ध आहे. त्याला कारण “#पृथ्वीथियटर्स” सारख्या महत्वाच्या गोष्टी कारणीभूत आहेत. असो . तो एक स्वतंत्र विषय.

एस सरकारचा चित्रपट म्हटला की “बेंगॉली फॅक्टर” असतोच असतो. चित्रपटात कुठंतरी बंगालचं वर्णन किंवा पात्र असतंच. या सिनेमात पात्र दाक्षिणात्य आणि दिल्लीचे, कथावस्तू दिल्लीत..त्यामुळे इथे बेंगॉली फॅक्टरसाठी जागा नसताना, मुख्य अभिनेत्रीचे नाव बंगाली ठेवले. त्या नावाबद्दल दोन वाक्यही सिनेमात टाकलेत. हे मजेदार वाटलं.

सिनेमाचा शेवट आणि कथा मात्र एका मराठी चित्रपटावरून घेतलेली वाटते. त्या सिनेमाच्या निर्मात्याने तसा दावाही केला आहे म्हणतात.

रवींदर सिंगच्या “I too had a love story” या कादंबरीच्या शेवटाशी मिळता जुळता शेवट सिनेमाचा आहे.

सुजित  सरकारच्या चित्रपटात एक विशेष गोष्ट असते , चित्रपटाच्या सुरवातीला आणि बहूतेकवेळी चित्रपट संपताना अत्यन्त सुंदर वाद्य संगीत असतं. ‘पिकू’च्या सुरवातीला आणि शेवटी ‘सरोद’ होतं. यावेळी आर्त ‘व्हायोलिन’ आहे.

'पारीजातक' हे अत्यन्त सुंदर, सुगंधी, नाजूक आणि अल्पायुषी फुल. मनाचं ठाव घेणारं फुल. थंडीच्या दिवसात प्रातःकाळी प्राजक्ताच्या झाडाखाली  फुलांचा सडा पडलेला असतो . एखादं फुल झाडावर दवबिंदूने न्हाहून निघालेल्या पानावर पहुडलं असतं. सूर्यप्रकाशात ते पान, दवबिंदू चमकत असतात.  खुप सुंदर दृश्य असतं ते. या सिनेमातील हा सिनेमा मराठीत असता तर नक्कीच याचं नाव पारिजात असतं. यातील मुख्य पात्र प्राजक्ताच्या फुलाप्रमाणेच आहे.
सिनेमा ही तसाच छोटा, पण मनाचा ठाव घेणारा.

हा चित्रपट खरंतर एकट्याने बघावा. समूहासोबत जाऊन, पॉपकॉर्न खात , अधूनमधून बोलत बघण्याचा हा सिनेमा नाही. शास्त्रीय संगीताची, वा वाद्यांची, मैफिलीची नशा हळूहळू मनाची पकड घेत जाते. तो आनंद अनुभवण्यासाठी मनाची लवचिकता फार महत्वाची असते. सतत लक्ष विचलित होत गेल्यास मैफल कंटाळवाणी वाटू शकते. तेच या सिनेमाबाबतीतही लागू.

-अभिजित पानसे

Thursday, 22 March 2018

बडी छोटीसी मुला कात

श्रीदेवी असो वा माधुरी दीक्षित , यापैकी मला कोणीच  आवडलं नाही. कारण या अभिनेत्री जेव्हा पूर्ण जोमात होत्या तेव्हा मी मुव्हीबाज व्हायचो होतो. टीव्हीवरील ढिश्यूम ढिश्यूम् मुविज फक्त आवडायच्या. 
शाळेत पहिली हिरोईन आवडली ती जुही चावला. 
आवडत्या जुही चावलाने गुलाब गॅंगमध्ये माधुरी दीक्षितला खाऊन, गिळून टाकताना बघताना फार आनंद झाला होता. आपली जुही अजूनही मस्त अभिनय करते हे बघून.

लहानपणी व्हीसीयारवर मिस्टर इंडिया बघितला. तेव्हा तो सगळ्यात आवडता चित्रपट होता. पण त्यालाही कारण “जादूची घड्याळ” होती. भोळा सांब अनिल कपूर होता. आणि जादूगार के लाल हातात घालायचा तसा अंगठ्या घालणारा मोगॅम्बो होता. 

सलमान खानसोबतचा एक चित्रपट डीडी नॅशनलवर बघितला होता. ज्यात ती परी की काहीतरी असते. आणि छोट्या मुलाला मोठा सलमान  खान करते. तेव्हा तो या जादूगिरीमुळे सिनेमा आवडला होता.

लहानपणी यात्रेत “खुदा गवाह” बघितला. तेव्हा निळ्या कपड्यात “तू ना जा मेरे बादशहा…” म्हणणारी श्रीदेवी बघितली..त्यावेळी ती प्रथम आवडली. मागे हिमालय..आजूबाजूला शुष्क प्रदेश.. धिप्पाड  अमिताभ रुबाबात घोडा हाकतोय आणि श्रीदेवी उंचावरील ठिकाणावरून “एक वादे के लिये..एक वादा तोड दे..” 
वाहह ! 
त्यानंतर खुदा गवाह अनेकदा बघितला. मग श्रीदेवीचा अभिनय समजत गेला. एक दाक्षिणात्य मुलगी अफगाणी वाटलीय हेच सगळ्यात  महत्वाचे.. खुदा गवाहतील तिची एन्ट्री! अमिताभ सोबत तिची केमिस्ट्री ! तिचं स्ट्रॉंग कॅरॅक्टर! तू मुझे कबूल मैं तुझे…” हे लग्नाच्या रात्रीचं गाणं. तिचं नितळ सौंदर्य…

डबल रोल करताना दोन्हीही भूमिका अगदी वेगळ्या साकारल्याय..कुरळ्या केसांची अफगाणी..स्टेपकट मॉडर्न मुलगी.. त्यातील नागार्जुनसोबतचं '..तेरी वतन की कहानीया”  लाल शिफॉन साडीतील तिचं सौंदर्य… श्रीदेवीने  घोड्यावरील जे शॉट दिलेत, रुबाबदार ती जी दिसलीये त्याला तोड नाही. अमिताभला पूर्ण टक्कर दिलीये. शेवटच्या दृश्यात दोघे जेव्हा दोन घोड्यांवर जातात, तेव्हा जणू श्रीदेवी ही काही  हिरोला फक्त कॉम्प्लिमेंट  करणारी हिरोइन नाही तर स्वतन्त्र एक मोठी अभिनेत्री आहे. हेच जणू त्यातून तिने स्पष्टपणे सांगितलंय.

पुढे यशराज चोप्रा आणि  शिफॉन साडी हे समीकरण श्रीदेवीपासूनच तयार होत गेलं. चांदनीतील तिचं ऋषी कपूरसोबतचं लाल शिफॉन साडीतील एक गाणं..नितळ सौंदर्य काय असतं याचं मूर्तिमंत उदाहरण त्यातील श्रीदेवी.

हात पाठीमागे नेऊन दोन खांदयांची मूव्हमेंट ..ही नव्वदीच्या काळातील  हिंदी चित्रपटातील गाण्यातील खास ठरलेली कोरिओग्राफी, शैली श्रीदेवीनेच सुरू केली. दिव्या भारतीही ते हमखास करायचीच.

मिस्टर इंडिया पुढे अनेकदा बघितल्यावर ,” काटे नही कटते ये दिन..रात …” यातील ती जणू पिघळलेला नीलम, जलपरी ..!
तिचं फिरोजा  शिफॉन साडीतील ओलेतं आरस्पानी सौंदर्य बघितलं. चित्रपटात गर्ल अॅट नेक्स्ट डोअर भूमिका असतानाही त्या गाण्यात ती पूर्णपणे मादक , अस्सल जातिवंत स्त्री सौंदर्याची सम्राज्ञी दिसली. कुठेही व्हल्गर “वॉना बी”..वा अट्टाहास त्यात वाटला नाही.
ते गाणं श्रीदेवीने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय. 

फिरोज खानसोबत “हर किसिको नही मिलता..” कॅमिओ करताना ते गाणं ऑल टाईम हिट करून ठेवलंय.

“चालबाज” मध्ये तिने कुठेही “सीता और गीता”मधील हेमा मालिनीची आठवण येऊ दिली नाही. हे तर खरं शिव धनुष्य होतं. एका सुपरहिट चित्रपटाचा; सुपरहिट अभिनेत्रीने काम केलेल्या सिनेमाचा रिमेक..पण तिने हेही शिवधनुष्य पेलेलं. चालबाजमध्ये सनी देवल आणि रजनीकांत हे खरोखर सपोर्टिंग ऍक्टर्स वाटलेत.

हिरोंचे, व्हिलन्सचे डायलॉग्स , वन लायनर्स हिट होतात. पण चालबाजमधील श्रीदेवीने म्हटलेला ‘बलमा’ आजही प्रसिद्ध आहे.
'लाडला'मधील तिचा "यु अंडरस्टॅन्ड यु बेटर अंडरस्टँड" हा फेमस डायलॉग त्या काळात कित्येकांच्या तोंडी होता.

'नगीना' तिने आणि अमरीश पुरी दोघांनी मिळून हिट केला. 'निगाहे' ही लहानपणी आवडला होता.

त्यानंतर श्रीदेवी आवडली “आखरी रास्ता” या दाक्षिणात्य रिमेक चित्रपटात. त्यात तिचा नेहमीप्रमाणे गर्ल अॅट नेक्स्ट डोअर हाच रोल होता. पण त्यातील किडनॅप झाल्यानंतरचा तिचा अमिताभसोबतचा सीन आवडतो.
बऱ्याच वर्षांनी क्लिक झालं की आखरी रस्तामधील श्रीदेवीचा आवाज श्रीदेवीचा नसून 'रेखाचा' आहे.

त्या काळात श्रीदेवी की माधुरी या दोघींपैकी “#लेडी_अमिताभ” कोण? यावर नेहमी चर्चा व्हायची. 

नंतर श्रीदेवीने काही सुमार चित्रपटही केलेत. डाकू वगैरे बनण्याचा त्या काळात ट्रेंड होताच.
“रूप की रानी चोरो का राजा” चित्रपटातील तिचा चायनीज जादूगार.. चिंचपोकली..डोंगरी वडाला...सीन आणि रस्त्यावरील अनिल कपूरसोबतचा विनोदी सीन फार आवडले होते. पण तो चित्रपट वाईट आपटला. 

'सदमा' तिचा बघितला नाही. सदमा आणि "चौकट राजा" चित्रपट मी मुद्दाम लहानपणी बघितले नव्हते.  कारण त्यातील दुःखाचा परिणाम माझ्या मनावर व्हायचा. 

अनेक वर्षांनी श्रीदेवीला इंग्लिश विंग्लिशमध्ये  बघितलं . त्याबद्दल काहीच बोलण्याची गरजच नाही. गौरी शिंदेने श्रीदेवीला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. सेकंड इनिंगची सुरवात झकास झाली.
पण याच श्रीदेवीने 'पुली' नावाचा एक दक्षिणात्य चित्रपट एका नमुना दाक्षिणात्य ‘स्टार’ सोबत केला. श्रीदेवी आहे म्हणून बघायला गेलो होतो. पण इंग्लिश विंग्लिश करणारी हीच का ती श्रीदेवी असा प्रश्न तो थर्ड क्लास सिनेमा बघताना पडला. या वयात श्रीदेवी असा महामूर्खपणा करू शकते याचं आश्चर्य वाटलं . अर्ध्यातुन बाहेर आलो होतो.

पुढे 'मॉम' केला. त्यात नवाजुद्दीन आणि श्रीदेवीने मस्त काम केलं. चित्रपट 'लाऊड' न केल्याने आवडला.

लेडी अमिताभ कोण, यावर वाद करण्यात लोक गुंग असताना श्रीदेवी मात्र एकाहून एक भूमिका करत गेली.
शेवटी काय तर , ती आली..तिने बघितलं.. तिने शॉट दिला.. ती जिंकली..त्या सूत्रधार ’डायरेक्टर’ने “कट इट” म्हणून व्हेरी गूड शॉट म्हटलं..आणि तिने  “पॅक अप” केलं.

-Abhijeet Panse

Friday, 5 January 2018

बिष्ट प्लिज

वकील ते कास्टिंग डिरेक्टर - अभिजीत पानसे.
इन्ट्रो- वेब सीरिज च्या डिजिटल जगात आज निधी बिश्त हे महत्त्वाचं नाव बनलंय.

ते म्हणतात इंटरनेट इज फुल ऑफ इंटलीजन्ट पिपल स्टक इन डिफ्रंट जॉब!

थ्री इडीएट्स मध्येही बाबा रनछोडदासांनी आपली मूळ आवड ,आपले पॅशन आणि आपले करिअर यावर ज्ञानामृत दिले आहे.

पण प्रत्येकातच ही हिम्मत नसते.हातचं सरळ साधं करिअर, नोकरी सोडून आतल्या उर्मी ला बाहेर येऊ देऊन तिचा पाठलाग करत आपला रस्ता स्वतः तयार करणे हे चित्रपटात बघायला  छान वाटतं पण प्रत्यक्षात करताना मात्र पाय लटपटतात.

पण कधी नियती, तर कधी कितीही दमन केलं तरी उफाळून येणारी आतील उर्मी, कधी परिस्थिती ही त्या व्यक्तीला त्याच्या आवडीच्या क्षेत्रात आणते. आणि ती व्यक्ती त्या क्षेत्रात मोलाची भर टाकते.

अशीच गोष्ट आहे निधी बिष्तची!

वेब सीरिज या क्षेत्रात आज निधी बिश्त हे महत्वाचे नाव आहे.

पर्मनंट रूममेट्स, पिचर्स , उम्रीका यावेब सीरिजची कास्टिंग डिटेक्टर आणि त्यात काम कारणारी असलेली ही निधी बिश्त!

कास्टिंग डिटेक्टर चे काम म्हणजे एकप्रकारे थॅंकलेस जॉब असतो.त्यांचं काम प्रेक्षकांच्या लक्षातही येत नाही !पण कास्टिंग डिरेक्टर ने योग्य कास्टिंग केलं असेल तरच ती मालिका, चित्रपट आणि त्यातील पत्रे हृदयाला भिडतात.खरे वाटतात. महाभारत आणि रामायण हे एकेकाळीविक्रमी लोकप्रिय झालेले दुरदर्शनवरील कार्यक्रम ,यातील सर्वोत्तम गोष्ट म्हणजे या महामालिकांमधील कास्टिंग!यातील प्रत्येक पात्र हे जणू ती भूमिका साकारणारा एक वाटतो असे सर्व म्हणतात.हेच काम असतं कास्टिंग डायरेक्टरचं. निधी बिश्तने पर्मनंट रूममेट्स मध्ये निधी सिंग, आणि प्रफुल व्यासचे प्रमुख रोलसाठी कास्टिंग केले आणि आज ते पात्र त्यांची ओळख बनलंय. ' पिचर्स 'या उत्तम कलाकृती असलेल्या वेब सीरिजमधील प्रत्येक पात्र जणू त्या त्या अभिनेत्या अभिनेत्रीसाठीच तयार केले आहे असे वाटते.हे सर्व श्रेय जातं कास्टिंग डायरेक्टर निधी बिश्तला!

कास्टिंग डायरेक्टरकडे एक अंतःप्रेरणा हवी असते. निधीला जणू हे ईश्वरी वरदान लाभलेय. ती म्हणते मी जेव्हा संहिता वाचून काढते तेव्हा त्याक्षणी मला आतून प्रेरणा, इंस्टीनक्ट्स मिळतात की ही भुमिका कोण योग्य रीतीने करू शकेल!

पण पूर्वी ही मुलगी दिल्लीला वकिली पेशात होती.एक सर्वसामान्य शुभ्र कॉलर नोकरी,आयुष्य जगत होती.दिल्लीला वकिलीचे शिक्षण घेऊन एक वर्ष दिल्ली हायकोर्टात नोकरी करताना आतील अभिनयाची उर्मी मात्र तिला शांत बसू देत नव्हती.

वकिली करताना तिने अभिनयाचा एक सप्ताहाच्या शेवटी दोन दिवस असणारा कोर्स केला.आणि तिचे हिंदी नाट्यरंगमंचावर आगमन झाले. नाट्य प्रयोग करताना तिला तिचे सुप्तगुण समजू लागलेत. नवनव्या कल्पना तिला सुचू लागल्यात, त्यावर ती काम करू लागली.

नाट्यभूमीवर काम करताना तिला तिच्यातील अभिनेत्री गवसली.

आवाजावर ,शब्दांवर, संवादावर  प्रचंड नियंत्रण असलेल्या या मुलीला , तिची अभियानाचे प्रचंड आवड,प्रेम पाहून या क्षेत्रात येण्याचे सुचवलेही.

एक दिवस तिने निर्णय घेतला आणि सामान भरून मुंबईकडे प्रस्थान केले.रेल्वेच्या आवाजापेक्षा मनात चाललेल्या वैचारिक वादळाचा,आंदोलनाचा गदारोळ जास्त होता.

मुंबईला आल्यावर मात्र तिला सगळीकडे नकार मिळू लागला.तिचा चेहरा गोल प्रकारात मोडत असल्याचे कारण सांगून तिला प्रमुख अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी अपात्र ठरवू लागलेत.पण ती तग धरून राहिली.पुढे तिची ओळख "टीव्हीएफ या वेब सिरीज कंपनी चे संस्थापक 'अरुणाभ कुमार"शी झाली आणि तिथून ती टीव्हीएफ या वेब सिरीज निर्मिती मधील ब्रँड असलेल्या निर्मिती  चॅनलची प्रमुख घटक झाली.निधी बिश्त ने सुपरहिट सीरिज पर्मनंट रूममेट्स ,ट्रिपलिंग मध्ये काम ही केलं आहे. "माँ के हात की सिगारेट" , " कॉलर नैना" हे  विडंबनात्मक व्हिडीओज आणि तिची एकता कपूर ची भूमिका नेटिझन्सला प्रचंड आवडली आहे. आता अनुष्का शर्मा च्या फिलोरी या चित्रपटातही तिची भूमिका आहे. 

वेब सीरिज सारख्या डिजिटल , चित्रपटसारख्या व्यवहारी माध्यमांत काम करतानाही तिचे रंगभूमीवरील प्रेम कायम आहे.स्वतःची नाट्य कंपनी असावी त्यात नवोदित कलाकारांना संधी मिळावी हे तिचं स्वप्नही तिने पूर्ण केलंय.तिचे नाट्य रंगमंचावर मनापासून प्रेम असल्याने तिची आज स्वतःची "न्यू ब्रेन थिएटर वोक्स" ही कम्पनी सुरु केली आहे.आजच्या पिढीची स्वतःचा रस्ता स्वतः बनवणारी ही मुलगी निधी बिश्त सर्व तरुणांसाठी प्रेरणा आहे.

Sunday, 31 December 2017

*व्हेंटिलेटर*

बारा वर्षांपूर्वी कोमावस्थेत गेलेल्या मराठी चित्रपट सृष्टीने पुन्हा एकदा " 'श्वास' घेतला आणि जवळपास मृतावस्थेतुनच मराठी चित्रपटात चैतन्य आलं. जोवर 'नागराज मंजुळे', 'उमेश कुलकर्णी', 'राजेश मापुस्कर' सारखे दिग्दर्शक आहेत.तोवर पुन्हा मराठी चित्रपट सृष्टीला #व्हेंटिलेटर लागण्याची काळजी नाही.मराठी चित्रपट #सैराट करत राहतील!

व्हेंटिलेटर अप्रतिम चित्रपट!!! चित्रपटाचा शेवट ज्याप्रकारे केला तो अगदी क्लास दिग्दर्शकच करू शकतो!




Friday, 29 December 2017

"सिंग इज क्वीन"

निधीन धिन धिन धिन धा"


'लोकप्रभा'http://www.loksatta.com/vishesha-news/permanent-roommates-1387407/ ,एप्रिल 2017

काही महिन्यांपूर्वी माझ्या एका मैत्रीणीला मी "पर्मनंट रूममेट्स"चा पहिला भाग आज बघणार असं सांगितलं तेव्हा ती म्हणाली की तिने ती  सीरिज बघितली आहे. त्यातला हिरो चांगला आहे पण हिरोईन नाही तिला आवडली.
मी तेव्हा पर्मनंट रूममेट्स बघायला सुरवात ही केली नव्हती. आणि त्याआधीच त्यातील जी कोणती ही प्रमुख अभिनेत्री होती ती काही चांगली नाही ही मनात कुठेतरी संकल्पना निर्माण झाली होती.

रात्री दहा वाजता सहज पंधरा वीस मिनिटं वेळ घालवावा म्हणून मी सीरिज बघणं सुरु केलं. जेव्हा मी लॅपटॉप बंद केला त्यावेळी पहाटेचे पाच वाजत होते. मी दोन्ही सिजन संमोहित झाल्याप्रमाणे बघून संपवले. इतके ते 'इररेजिस्टेबल' होते.आहेत. आणि पहाटेच त्या मैत्रिणीला तीन चार लाल रागीट चेहऱ्याचे इमोटिकॉन्स पाठवून मेसेज केला की पुन्हा असले चुकीचे अभिप्राय मला देऊ नकोस. तुला अभिनयाची ,कलेची जाण नाही!

रूममेंट्सच्या पहिल्या नेटीसोडच्या पहिल्याच दृश्यात एक अभिनेत्री आहे. पहिले दहा मिनिटं तिच्यात काहीही वेगळं वाटत नाही. इतर सर्व "गर्ल अॅट नेक्स्ट डोअर" अभिनेत्रीप्रमाणे तीसुद्धा वाटते. दिसायला काही विलक्षण सुंदर , वा ठराविक हिंदी चित्रपटातील हिरॉईन्सप्रमाणे साचेबद्ध ग्लॅम डॉल नाही. उलट काहीशी बेढब वाटते.
पण अकराव्या मिनिटाला ती प्रेमात पाडते! आणि मग सतत प्रेम करायलाच लावते . तिच्यातील अभिनय क्षमता , आवाजावरील नियंत्रण , भूमिका पूर्णपणे समजून समरस होणे , प्रचंड आत्मविश्वास या सर्व कौशल्यामुळे ती जबरदस्त छाप सोडते. तानिया नावाचं पात्र हे प्रचंड लोकप्रिय झालं ते या अभिनेत्रीमुळेच!

या अभिनेत्रीचं नाव काय आहे हे जाणून घेण्यास मी अधीर झालो होतो त्यामुळे मी दुसरा भाग बघत असतानाच मध्ये थांबून त्या अभिनेत्रीचं नाव काय हे बघितलं. आणि तेव्हा कळलं की तिचं नाव  "निधी सिंग".

 ही निधी सिंग प्राण आहे पर्मनंट रूममेट्स चा!
अगदीच सरासरी उंची, थोडे कुरळे केस , फुगीर गाल (चबी चिक्स) पण मस्त काळे डोळे, मादक ओठ.  पंजाबी ,दिल्लीची छाप असलेला चेहरा .. दिसण्यात सुरवातीला सर्वसाधारण वाटते. पण जेव्हा ती अभिनय करू लागते तेव्हा तिचा सर्वोत्तम आविष्कार  साकारतो. तिचा तिचा आत्मविश्वास तिची सर्वोत्तम बाजू आहे.

प.रु. मधील तानियाची भूमिका तिला मिळण्यापूर्वी तिने काही व्हिडीओज मध्ये काम केलं . "एव्हरी गर्ल इन डेल्ही" असे काही छोटे व्हिडीओज वायरल झालेत.

अहमदाबादला निधी सिंगचा जन्म झाला.तिथेच ती शिकली. पण अभिनयाचा रुपेरी किड्याने तिला मृदू दंश केलाच. परंतु एकदम अभिनय क्षेत्रात अंधपणे उडी मारून संघर्ष न करता तिने प्रथम जाहिरात क्षेत्रात काम केले. त्या कामात यश मिळवले. हळूहळू मॉडेलिंग करू लागली. कर्मधर्मसंयोगाने तीची "टीव्हीएफ" या वेब निर्मिती हाउसच्या कास्टिंग डायरेक्टर "निधी बिष्ट" सोबत झाली. जणू ते विधीलिखितच होतं.
कारण निधी बिष्ट ही हाडाची कास्टिंग डिरेक्टर आहे. त्या दिल्लीच्या निधीमुळे या अहमदाबादच्या निधीचा प्रवेश टीव्हीएफ मध्ये झाला.

तिथे प्रथम केआयडी या सीआयडी सिरीयलवरील  विडंबन व्हिडीओ मध्ये तिने सहाय्यक भूमिका केली. मेन्स वर्ल्ड, पिचर्स या वेब सीरिजमध्ये अगदीच छोटया भूमिका केल्या. आणि त्यानंतर ऑडिशन्स दिल्यावर  तिला मिळाली पर्मनंट रूममेट्स मधील तानियाची भूमिका!
सिंगच्या अभिनयात प्रचंड खोली आणि समृद्धता आहे.पण सगळ्यात सकारत्मक शक्तीकेंद्र म्हणजे तिचा 'आवाज' आणि त्यावरील तिचं नियंत्रण. तिच्या शब्दफेकीचं जे 'फिनिशिंग' आहे ते क्लास आहे! तिच्या आवाजाला जे दिल्लीचं टोन आहे आणि ज्या प्रकारे ती त्याचा उपयोग योग्यवेळी करते ते अगदी वाहह आहे!
पर्मनंट रूममेट्स मध्ये तिने या टोनिंग चा उपयोग अगदी मस्त केलाय! तिचा संवाद, शब्दफेक ऐकत राहावसं वाटतं.

रूममेट्स मधील पहिल्या सिजनमधील शेवटच्या भागातील सुरवातीचा रेस्टरंट मधील सिनमधला भूमिकेनुसार तिचा थकलेला स्ट्रेस्ड  तेलकट चेहरा ,तिचा अभिनय, डोळ्यांची भाषा , चेहऱ्यावरील भाव, शब्दफेक , खर्जातील आवाज म्हणजे ट्रीट आहे! वाढदिवसाची कॅसेट पाहतानाचा सिन, दुसऱ्या सिजन मधील असरानी आणि सासूशी बोलतानाचा सिन, आणि दोन्ही सिजनच्या शेवटच्या भागातील तिचे  संपूर्ण दृश्य हे मेजवानी आहे अभिनयाची !

तिचा खर्जातील आवाज काढण्याची हातोटी, आणि वेळ पडल्यास तितकाच विरुद्ध पातळ आवाजात ही ती शब्दफेक करते त्यावरून ती एक परिपूर्ण अभिनेत्री आहे हे निर्विवाद सत्य आहे.
ती गोपाल दत्तबरोबर हिंदी नाटकही करते आहे. तानियाच्या भूमीकेमुळे ती प्रचंड लोकप्रिय आणि प्रसिद्ध झाली त्यामुळे सध्या ती चित्रपटही करते आहे. फक्त त्यात तीने इतर बेबीडॉल भूमिका न करता चांगल्या भूमिका कराव्यात ही अपेक्षा आहे.

येत्या काळात निधी सिंग हे ताकदीच्या अभिनेत्रींनमधील एक नाव असेल यात शंका किंचितही नाही!!

निधी सिंग यु रॉक!!

Wednesday, 27 December 2017

डिअर जिंदगी बोझ ना बन पाये

दक्षिणेतले भडक, बटबटीत मी मी मीच करणारे "एकपात्री" चित्रपट, ,खानावळीचे (आमीर खान सोडल्यास), अजय देवगण,अक्षय कुमार यांचे स्वनिर्मित नारसिसिस्ट, आणि डायलॉगबाजीचे चित्रपट यांपासून कोणी वाचवुन खऱ्या अर्थाने 'पडद्यावर' टीम वर्क असलेला चित्रपट तयार करून एक खऱ्या अर्थाने मुव्ही बघण्याचा आनंद देणारे दिग्दर्शक म्हणजे शुजीत सरकार, दिबाकर बॅनर्जी, आर बाल्की,  मेघना गुलजार, झोया अख्तर आणि गौरी शिंदे.

स्त्री दिग्दर्शक म्हटलं की फराह खान आणि दिव्या कुमार खोसला सारखे टुकार ,फालतू  'चित्रपटखोर'
दिग्दर्शकच डोळ्यासमोर येत नाही त्याचं कारण  गौरी शिंदे ,मेघना गुलजार आणि झोया अखतर यांसारख्या उच्च स्तरीय स्त्री दिग्दर्शक.

पण हिंदीत नाव करणाऱ्या सई परांजपें नंतर गौरी शिंदे हीच एकमेव मराठी पार्श्वभूमी असलेली दिग्दर्शक!

स्त्री च्या दृष्टीतून जग,तिच्या अडचणी,न्यूनगंड ,नैराश्य , विचार, तरल भाव अत्यन्त योग्य पद्धतीने मांडताना मूळ मुद्दा ,कहाणी वर हिरो व हिरोईन चा प्रभाव पडू नये याची ती नेहमी काळजी घेते.

"इंग्लिश विंग्लिश" हा मैलाचा दगड आहे."डिअर जिंदगी" अगदी तितका वरच्या ग्राफ चा नसला तरी गौरी शिंदे चा ग्राफच इतका उच्च आहे की तिचं कुठलंही काम इतर अवरेज दिग्दर्शकांपेक्षा वरच्या वर्गातील असतं.
 शाहरुख खान सारख्या फक्त आत्मकेंद्री 'हिरो' ला योग्य 'कंट्रोल' केल्यास तो 'ऍक्टर' ही होऊ शकतो आणि तो आवडू शकतो हे यापूर्वी आशुतोष गोवारीकरने 'स्वदेस' मधून दाखवलं होतं .तेच गौरी शिंदे ने पुन्हा शाहरुख खान मोकाट न सोडल्याने शारुख खान अत्यन्त genuine वाटला आहे.

स्वदेस नंतर पाहिल्यानंदा शारुख खान genuine 'नॉर्मल' ऍक्टर वाटला आहे.

कित्येक वर्षांच्या त्याच्या चिरक्या पातळ आवाजाला आता बेस आल्याने त्याचा आवाज आता खूप दमदार वाटतो.(सैफ अली खान प्रमाणेच)
सोबत दाढीचं कॉम्बो !जबरी!!

 आजवर शाहरुख खान इतका हँडसम,किलिंग, फुल ऑफ एक्स फॅक्टर दिसला नसेल तितका "डिअर जिंदगीत" दिसला आहे.
समुद्र किनारी आलिया भट सोबत चालतांनाचा सिन मध्ये जो किलिंग शाहरुख खान दिसला आहे तसा आजवर कधीही नाही!!too good!

आलीय भट हे बॉलिवूड ला पडलेलं सुंदर स्वप्न आहे.ती एक परिपूर्ण ऍक्टर आहे.हे मी तीन वर्षापासून कित्येक वेळा म्हटलंय.तिच्यात atitude,eligance, full tantrums,looks सर्व काही आहेत पण ते असतानाही ती फक्त पेज 3 टीपीकल, साचेबद्ध "बॉली ची डॉली" नाहीये.प्रचंड उच्च दर्जाची अभिनेत्री.आजची आधुनिक अभिनेत्री.जी मसाला आणि समांतर चित्रपटात तितकच क्लास काम करू शकते.अलिया भटमध्ये sensualityची कमतरता आहे पण काही वर्षांनी ती ही येईलच.

डिअर जिंदगीत आलीया भट शिवाय इतर कोणत्याही हिरॉईन चा विचार होऊच शकत नाही.हा रोल फक्त तिच्यासाठीच होता.आहे.
जिंदगीतली आलीया भट पाहताना तिच्या जागी "मिथिला पालकरच" एक पर्याय आठवत होता.आणि तिनेही परफेक्ट काम केलं असतं पण तिला अद्याप फेस वॅल्यु नाही.

चिकन खुराणा नंतर खूप दिवसांनी कुणाल कपूर दिसला!आणि तो तर अप टु द मार्क असतोच!
मुवि च्या शेवटी पुन्हा एक माझा आवडता 'कपूर' दिसल्याने एकदमच मस्त!!

 आलिया भट आणि शाहरुख खानची केमीस्ट्री अप्रतिम अप्रतिम जमलिये.मुळात सम्पूर्ण  रसायन च जमलंय कारण गौरी शिंदे ही रसशास्त्रज्ञ आहे.

नाटक हे ऍक्टर्स च साधन मानलं जातं तसं चित्रपट हे पूर्णपणे दिग्दर्शकाचं साधन असतं.आणि गौरी शिंदे जेव्हा ते साधन वापरते तेव्हा आपण पुन्हा "जिंदगीच्या प्रेमात" पडतो!!

-अभिजीत पानसे

व्हेंटिलेटर चित्रपट आणि जयललिता यांचे शेवटचे क्षण

5 डिसेंम्बर 016

एकजण- "जयललिता अनंतात विलीन!"
दुसरा-(आपले 'अपडेटत्व' दाखवत) अरे कसली घाई आहे!धीर धरा!अजून हॉस्पिटलकडून कन्फर्म व्हायचंय!चुकीच्या बातम्या पसरवू नका!"

तिसरा-(आपली पिंक टाकत)"अहो जाणारच उद्या पर्यंत!संपत्तीची विल्हेवाट लावण्याचं काम आटोपलं की काढतील व्हेंटिलेटर!
खरं तर आता काढायला हवाच!! उगाच लोकांना,न्युज चॅनेलवाल्याना आणि आम्हाला टांगणीवर!
तिकडे त्यांच्या अम्मावरच्या स्टोऱ्या ताटकळत असतील!तेही वाटच बघताहेत न्यूजची!!"

पहिला पुन्हा-"अहो संपत्तीचं कसलं काय घेउन बसलाय!अम्मा काय उठून सर्वाना सूचना देऊन पुन्हा कोमात जाणार का?
एकदा चेन्नईचा बंदोबस्त पूर्ण झाला की माझ्या मते व्हेंटिलेटर काढायला हरकत नाही.

दुसरा ,पाहिल्याची चूक पकडल्याच्या असुरी आनंद लपवत) "कोणि सांगितलं तुम्हाला जयललिता कोमात आहे म्हणून!
आणि माझी तर खात्री आहे ती ऑलरेडी ऑफ झालेली आहे!ते लोक फक्त कधी डिक्लिअर करायचं ठरवताहेत!!"

तिसरा -" बरं त्या काळया चष्म्यावाल्याची काही न्यूज!त्याची काय रिअक्शन? म्हाताऱ्याला रात्रीतून झोपेतून उचलला होता अम्मानं!
.............. .............. ................... ............ .......

एकंदर  'व्हेंटिलेटर' चित्रपट किती रिअलिस्टिक होता.हे पुन्हा दिसतंय.तामिळ राजकीय व्हेंटिलेटर व्हर्जन सुरु.

जयललिता अम्मा मात्र घेता येईल तितका श्वास घेत आता (तरी) मनाने या सर्वांच्या ,किंतु परंतुच्या पलीकडे असतील!!(असतील का??)

"मरणारा पाळतो दुसऱ्यांच्या वेळा;
दुःख राहते बाजूला उरतो तो सोहळा!"

-अभिजीत पानसे


विद्या बालनची "कहानी 2"

चेन्नईशी माझं वेगळं इमोशनल बॉण्डिंग आहे.तसं कोलकाता मला प्रचंड आवडतं कारण तिथे इतिहास,संस्कृती, साहित्य,ज्ञान,विज्ञान,तत्वज्ञान,कला सगळं काही आहे.
भारतातील एक प्रचंड विरोधाभास असलेलं शहर आहे.तेथील साहित्य आणि कला प्रचंड विकसित आहे."कौशिकी चक्रवर्ती " सारखी आजच्या काळातील उच्च स्तरीय शास्त्रीय गायिक तिथून तयार होते.तिथल्या हवेत, मातीत साहित्य आणि कलेचा सुगंध दरवळतो.
त्याचमुळेच कदाचित 'बंगाली' डिरेक्टर्सचे चित्रपट हे substantial ,उच्च प्रतीचे असतात.

शूजित सरकारचा "मद्रास कॅफे" आणि दीबाकर बॅनर्जी चा "डि.ब्योमकेश बक्षी "मी थिएटरमध्ये 2दा बघितला होता.आणि आजवर कित्येक वेळा बघितलेयत.

त्यामुळे सुजॉय घोष चा "कहानी2" तर मिस करणं शक्यच नव्हतं.

सध्या सुमार दाक्षिणात्य चित्रपटांच्या रिमेकची संसर्गजन्य साथ आटोक्यात आल्यामुळे चांगले चित्रपट बघायला मिळताहेत.

 (पहिला)कहानी हा खूप वेगळ्या उच्च स्तरावरचा,विषयाचा वेगवान थ्रिलर चित्रपट होता.कहानी 2 हा डोमेस्टिक विषयावरील आणि मानाने स्लो चित्रपट आहे.

आलिया भट आणि विद्या बालन हे अभिनयाचे दोन विरुद्ध पण उच्च स्तराचे दोन टोक आहेत.
विद्या बालन बद्दल क्रिकेट संदर्भातील एक वाक्य परफेक्ट सूट करतं.Form is temporary but class is permanent!"

सुजॉय घोष ,शूजित सरकार, दीबाकर बॅनर्जी , गौरी शिंदे, नागराज मंजुळे आदी जातिवंत उच्च स्तरीय दिग्दर्शकांच्या चित्रपटात बहुतेक दाक्षिणात्य चित्रपटांप्रमाणे बटबटीत एकपात्री प्रयोग नसल्याने यांच्या movies मध्ये प्रमुख हिरो आणि हिरोईन शिवाय इतर सहाय्यिक अभिनेतेही तितकेच जबरदस्त काम करणारे असतात.
तथापि हे दिग्दर्शक त्या सहाय्य अभिनेत्यांवर , स्क्रिप्टवरही तितकाच अभ्यास,मेहनत करतात.म्हणूनच एक परीपूर्ण टीमवर्क असलेला चित्रपट तयार होऊन तो बघताना विलक्षण कलाकृती बघण्याचा  मिळतो. कहाणी 2 म्हणूनच आवडतो.

 यातील लहान मुलीचं आणि तिच्या आजीचा रोल करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीचं काम प्रचंड अप्रतिम आहे.
रॉक ऑन 2 मधील अर्जुन रामपाल चा क्लास attitude बघितल्यावर काहनी2 चा अर्जुन रामपाल पूर्णपणे विरुद्ध आणि तितकाच genuine वाटला आहे.

"जुगल हंसराज" ने यापूर्वी शेवटचं चांगलं काम "लकडी की काठी ..काठी का घोडा.." करताना बाळ उर्मिला मातोंडकर ,नसीरुद्दीन शहा सोबतच केलं होतं.

कहाणी 2 एक चांगला चित्रपट बघितल्याच फील नक्की देतो.पहिल्या कहानिशी चुकूनही तुलना न केल्यास.

तळटीप लहान अपत्य असलेल्या सर्व पालकांनी चित्रपट बघावाच. लहान मुलाना लहानपणीपासूनच योग्य अयोग्य स्पर्शाबद्दल जाणीव करून देणे किती गरजेचं आहे हे कळतं.पालकांनीच love आणि abuse मधला फरक समजावून सांगावा.

-अभिजीत पानसे

Monday, 25 December 2017

ट्रॅप.

ट्रॅपड TRAPPED


घराचा प्रमुख दरवाजा हवं तेव्हा उघडता बंद करता येणे,प्रवेश करणे बाहेर जाणे या खूपच शुल्लक आणि नेहमीच्या गोष्टी आहेत आणि अति परिचयात गोष्टीचं महत्व नसते. कृतज्ञतेची भावना तर नसतेच. जेव्हा हे स्वातंत्र्यच अडचणीत येतं तेव्हा EXIT' फलकाचं महत्व कळतं.बाहेर पडायला प्रयत्न सुरु होतात कारण स्वातंत्र्य हे 'बेसिक इन्स्टीन्क्ट "आहे.

त्यातही जेव्हा आयुष्यवर घाला घालणारं पारतंत्र्य ओढवलं असल्यास मग जगण्यासाठी व्यक्ती त्यालाही परिचित नसलेल्या त्याच्या सर्व मर्यादा पार करू लागते.शक्य अशक्यतेचे परीघ लांघण्यास मुसंडी मारण्यास प्रवृत्त होऊ लागते.

मुंबई सारख्या कधीही न झोपणाऱ्या शहरातील, कोणीही राहात नसलेल्या, वीज, अन्न ,पाणी नसलेल्या तीस मजले उंच एका इमारतीत फ्लॅटमध्ये अडकलेल्या माणसाच्या बाहेर पडण्यासाठी , जगण्यासाठीच्या धडपडीची ही गोष्ट आहे.

स्वातंत्र्य , जीवन समोर डोळ्यांनी समोर दिसत असतं पण ते मिळवणं कुवतीच्या बाहेर गेलेलं असतं.हेच जास्त क्लेशकारक असतं. भर समुद्रात वा एकाकी बेटावर अडकल्यावर मनाला किमान कोणाची मदत मिळणार नाही ही स्पष्ट जाणीव असते.पण दृष्टीसमोर जगरहाटी दिसत असताना शक्य अशक्यतेचा, आशा निराशेचा हिंदळणारा लोलक मनाला विदीर्ण करत जातो.

विक्रमादित्य मोटवानीने 'उडान'आणि 'लुटेरा' हे क्लासिक्स दिलेत. ट्रॅप्ड द्वारे त्याची हॅट्रीक झाली आहे. समांतर आणि कमर्शिअल ची सांगड घालणारे जे शुजीत सरकार, सुजॉय घोष, दिबाकर बॅनर्जी इ.जे दिग्दर्शक आहेत त्यातील हा एक.

राजकुमार राव काय चीज आहे हे काही कोडं आता राहिलं नाही .ट्रॅप्डचा संपूर्ण भार त्याने एकट्याने पेलून अलिगढ, सिटीलाईट्स नंतर आणखी जबरदस्त अभिनयाची ट्रीट दिली आहे.
त्याची उंदरांची भीती, होणारे भास , भूक तहान यात तो एकटाच न अडकता प्रेक्षकाही सोबत ओढतो.
"सर्वायवल इन्स्टिक्ट' ची त्याची धडपड त्याची एकट्याची उरत नाही.
आणि प्रेक्षकाला वाटत राहतं हे जर माझ्यासोबत घडलं तर!आणि ते घडुही 'शकतं' हा अंतर्मनात हळूच शिरलेला विचार प्रेक्षकाला सतावतो, अस्वस्थ करतो, विचार कऱयाला लावतो..आणि शेवटी अतिपरिचयातील शुल्लक गोष्टीसाठी सतर्कता आणि कृतज्ञता बाळगायला लावतो हेच दिग्दर्शकाचं , अभिनेत्याचं आणि चित्रपटाचं यश आहे.

-अभिजित पानसे

Saturday, 23 December 2017

नाम शब्बो,

निरज पांडे या नावावर डोळे मिटून विश्वास टाकावा असा हा दिग्दर्शक . या पांडेजी चा मूवी म्हटला की डोळे मिटून चित्रपट गृहात जावं आणि  चित्रपट सुरु झाल्यावर डोळे भरून बघावा असं हे प्रकरण
बेबी सारखी उच्च कलाकृती बघितल्यावर त्याच्याच संबंधी तेच पात्र असलेला दुसरा भाग येतोय म्हटल्यावर नाम शबाना बघायची प्रचंड इच्छा होती.

चित्रपट सुरु होताना "directed by  shivam nair " आलं आणि मनात शंकेची पाल चुकचुकली. बोटं क्रॉस करून बसलो. टीव्ही बघत नसल्याने ट्रेलर बघितला नव्हता त्यामुळे हा चित्रपट निरंजन पांडे चा नाही हे माहिती नव्हतं.

खरं तर एक अतिउच्च कलाकृती बनल्यावर  त्यावर पुन्हा काम करू नये. तिचे जतन करून ठेवावे.
किमान दुसऱ्याला तरी देऊ नये. दुसऱ्या व्यक्तीलाआणखी काम करायला दिल्यावर ती खराब होताना बघताना त्रास होतो.

 पहिल्याच सिन पासून जो कचरा सुरु केला तो शेवट पर्यंत राहिला.

बंदूक अंगाला चिकवटुन व्हिलन ला बाजी पलटवण्याची संधी देण्याची जुनी परंपरा कायम ठेवली.

शेवटी एक सीन तर मूर्खपणाचा कळस! तापसी पन्नुला व्हिलन ला गुपचूप मारून हॉस्पिटलमधून पळायचं  (तो बेशुद्ध असल्याचा कयास असल्याने) हेच काम (आणि मुवि चा क्लायमॅक्स) असल्यावरही , व्हिलन तिच्यावर वरचढ होत असताना ती त्याला शॉक देऊन काही क्षणाकरिता बेशुद्ध पाडते .तो थोड्या वेळाने उठतॊ आणि पुन्हा तिला मारायला लागतो. आणि ही तिथेच तोवर शुंभासारखी उभी असते. शाळकरी मुलालाही हा हा मूर्खपणा पटणार नाही.

दिग्दर्शकाने '#प्रिेक्वेल' ला फारच सिरियसली घेतलंय .अगदी पार 80, 90 च्या दशकात हिरो किंवा व्हिलन प्लास्टिक सर्जरी करून चेहरा बदलायचा तसा इथेही प्लास्टिक सर्जरी करून चेहरा तर बदलतो सोबत सहा फुटपेक्षाही उंच माणूस मध्यम उंचीचा होतो. सोबत स्वरयंत्र बदल हे मुफ्त मुफ्त !मुफ्त !!

चित्रपट स्त्री प्रधान असताना सतत अक्षय कुमार येऊन तिला वाचवत राहतो!यावरून काय सांगायचंय!!

अक्षय कुमार ने केलेला आजवरचं खराब गेस्ट अपिअर्न्स!
मनोज बाजपेयी आणि इतर सर्व बेबी गेस्ट अपिअरन्सेस कोणीही चित्रपटात रस नसल्याप्रमाणे वागले आहेत. आणि ते साहजिकच आहे .

चित्रपटाची चांगली गोष्ट एकच ती म्हणजे बेबीचं ते खिळवून धरणारं पार्श्वसंगीत! आणि तापसी पन्नुचा शॉर्ट हेअर मधला लूक!

बाकी या नाम शाबनापेक्षा एखादा तेलुगू चित्रपट परवडला! एक तर तेलुगू मुवि लाऊड असतो ,हा चित्रपट अगदीच थंडगार असल्याने आणखीच रटाळ झाला आहे.दुसरं म्हणजे तेलुगू चित्रपटँकडून कुठलीही अपेक्षा नसते. शबाना कडून होती.

शेवटी एक नक्की बेबी वर काही बनवणे हे येरा गबाळ्याचे काम नाही त्यासी निरज पांडेची पाहिजे!!
फक्त आता 'Wednesday' प्रोड्युसर्स ने इतर कोणाला गुरुवार ,मंगळवार बनवायला देऊ नये!

कब्बी खुशी कब्बी गम ट्रॅजेडी

"कब्बी खुशी कब्बी गम" चित्रपटाला 16 वर्षे पूर्ण झालीत म्हणून फार उत्सव साजरा करणे सुरू आहे! पण मी अजून याच प्रश्नात अडकलोय की गोल चेहऱ्याचा, काळया डोळ्यांचा 'लड्डू ' , घाऱ्या डोळ्यांचा रोहन - रितीक रोशन कसा झाला!
आणि लहानपणीची घाऱ्या डोळ्यांची पूजा, मोठी झाल्यावर डार्क ब्लॅक-ब्राऊन डोळ्यांची "पू- करीना कपूर" कशी काय झाली!

दोघांच्याही "रम्य ते बालपण" आणि "पोस्ट पिंपल्स पिरेड" मध्ये काहीही साम्य नाही!

बरं रीतिक रोशन -रोहन कोणतीही प्रवेश परीक्षा ना देता, लंडनमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये एमबीए ऍडमिशन मिळवतो! बरं ते ही शक्य एक वेळेस म्हणा! शेवटी रायचंदस होते ते! मॅनेजमेंट कोट्यातून घेतली असेल ऍडमिशन! बक्कळ पैसा बापाकडं!

पण पंधरा वर्षे होऊनही, गलेलठ्ठ लड्डू चा हँडसम हंक रोहन होतो ,पण इतक्या काळात पुलाखालून थेम्स नदीचं पाणी वाहूनही राहुल्या शाहरूख जशाचा तसाच दिसतो!

इतक्या वर्षांनंतरही लड्डू रोहनला बूटांच्या लेसेस बांधता येत नसतील तर कॉलेजटीमकडून क्रिकेट खेळताना लड्डू रोशन काय टीममेट्सकडून किंवा अंपायरकडून बुटांच्या लेसेस बांधून घ्यायचा!!!

"चांदनी चौक मे चाचा ने चाची को ..चटणी चटाई" हे म्हटल्याबरोबर या एका कोडवर्ड्स ने पंधरा वर्षापूर्वीची पोरगी पुन्हा पटते हे कळल्यावर , मीसुद्धा चांदनी चाळ (आपल्याकडे चाळ असते म्हणून) चांदीचा चमचा, चाचा.. चटणी "कोड वर्ड" वापरून बघितला , तर ती पोरगी तिच्या 2 वर्षाच्या लहान बाळाला म्हणाली "बेटा मामाला बाय कर!"

अश्या असतात हिंदी मुविज!
येथे ओशाळतात दक्षिणात्य चित्रपटही

-अभिजीत पानसे

Friday, 22 December 2017

एकदाचा ट्यूब लाईट पेटला

चित्रपटाचं नाव अगदी योग्य आहे. #ट्युबलाईट .
कित्येक वर्षांपासून ट्युबलाईट हे विजेचे उपकरण काळाच्या मागे गेलय.  त्यानंतर सीएफएल ..आणि आता एलइडी बल्ब ही घराघरात आले आहेत. सरकार कडून कमी किमतीत ही मिळतात सध्या.
ट्यूबलाईट ,अगदी नावाप्रमाणेच मुव्ही ची थीम
आहे. आणि ट्रीटमेंट आहे.कालविपर्यस्त!

राजू हिराणी ला व्यावसायिक चित्रपटाची संपूर्ण जाण, बारकावे माहिती आहे. तो अगदी योग्य प्रकारे ह्युमर ,आणि समाजातील  विरोधाभास चा आधार घेऊन आपला विषय मांडतो आणि नवा विचार देतो.
"लगे रहो.." मध्ये अगदी अप्रतिम दिगदर्शनाद्वारे त्याने गांधीगिरी , gandhian thoughts लोकांना सांगितले.
 कबीर खाननेही पुन्हा गांधीगिरी ट्युबलाईट द्वारे पेरली आहे. पण पद्धत अतिशय रटाळ, मांडणी आणि चित्रपटाचं टायमिंग ही आजच्या काळाला अनुसरून नसल्याने मुव्ही अत्यन्त रटाळ, बोअर झालाय.

कबीर खान हा ; काबुल एक्सप्रेस मुळे , एकेकाळचा आवडता दिग्दर्शक आता सलमान प्रेमामुळे अत्यन्त प्रेडिक्टेबल आणि बोअर झालाय. काबुल एक्सप्रेस थिएटर मध्ये बघितला होता.मुव्ही अप्रतिम झाला कारण त्यात कोणीही 'स्टार' नव्हतं. विषयावर 'स्टार्स' चे अतिक्रमण झाले नव्हते.

पण न्यूयॉर्क नंतर सलमानसोबत त्याने काम सुरू केल्यावर "एक था टायगर" सारखा सर्वार्थाने अत्यन्त निकृष्ट चित्रपट देणं सुरू केले. आता तो राजू हिराणीची कॉपी करण्याचा प्रयत्न करतो. एक निरागस पात्र घेऊन त्याद्वारे विनोद निर्मितीकरून , इमोशन्स घालून चित्रपटात मग एक क्रांती वगैरे निर्माण ..
ट्युबलाईट मध्येही तेच केलंय.बजरंगी भाईजान मध्येही तोच प्रकार होता. यावेळी फक्त भारत पाकिस्तान न घेता भारत चीन विषय घेतला आहे.

पण चित्रपट एक क्षणालाही भिडत नाही. कारण मांडणीतच दम नाही.

चित्रपटात सलमान आणि शाहरुख खानचं एक मोठं दृश्य आहे. तोच एक बरा सिन आहे. आणि शाहरुख खान त्या दृश्यात मस्त दिसला आहे. करन अर्जुन , कुछ कुछ होता है नंतर पाहिल्यांदाच दोघे एक फ्रेममध्ये दिसलेत. त्या दृश्यात शाहरुख सलमानवर भारी वाटतो.

मुव्ही बघतानाच हा " माय नेम इज खान" प्रमाणे समोर जाईल वाटतं. दोघांचेही पात्रांमध्ये साम्य आहे. "माय नेम इज खान" हा क्लासिक ,एपिक चित्रपट आहे. शाहरुख खानचं सर्वोत्तम काम असलेला तो एक चित्रपट. पण सलमान खान चं हे पात्र मात्र अगदी सुमार!

सलमान खान अभिनय करतो ही अंधश्रद्धा बाळगणाऱ्यांचही ट्युबलाईट द्वारे अंधश्रद्धा निर्मूलन होईल.
इतकी ओव्हर एकटिंग काही दृश्यात केली आहे.

सलमान मुवीत असतात ते नेहमीचे अत्यन्त
बाळबोध विनोद यातही आहेत. यात ते जरा जास्तच बाळबोध आहे कारण सल्लूने बालबोधच पात्र साकारले आहे. जबरदस्तीने निरागस दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

चित्रपटात सलमान खानचा चेहरा वय झालेला दिसलाय.
तो ही आता फेसलिफ्टिंग करून पुढच्या मुव्हीत तरणाबांड दिसेल यात शंका नाही.
 फना मधला चेहऱ्यावर सुरकुत्या असलेला आमीर खान आणि पुढे तारे जमीन पर, थ्री एडिट्स मधला अमीर , कुर्बान मधला म्हातारा सैफ अली खान आणि पुढे दिसलेला सैफ..यामागे संतूर साबण ,मेन ब्युटी क्रीम नाही तर "फेस लिफ्टिंग"असतं. बोटॉक्स चे इंजेक्शन्स आता एक्सपायर्ड झालेलेत.

पण सलमान खान ची एक गोष्ट खूप कौतुकास्पद वाटते तो नेहमी आपल्या कुटुंबाला सोबत घेऊन असतो. भावांना संधी देतो. त्यांच्यासोबत काम करत असतो. त्याची निर्मिती असलेल्या चित्रपटाच्या सुरवातीला संपूर्ण खान कुटुंबाचा फोटो असतो.
या भावांची ही सोबत खरंच खूप कौतुकास्पद आहे. उलट जेव्हा जेव्हा सलमानने आपल्या भावासोबत काम केलंय त्याचा वीर आणि हलोब्रदर झालाय. नेहमी मुव्ही फ्लॉप होतोच. दबंगच्या यशामागे सलमान आणि अभिनव कश्यप होते.

मुव्ही आपटणार हे सुरवातीलाच वाटलं जेव्हा सलमान ची झकास एन्ट्री शुभ्र घोड्यावर होते! एरवी थिएटर टाळ्यानी , शिट्यांनी, टाळ्यानी, आवाजाने दणाणून उठलं असतं. ओह माय गॉड मुवीत सुरवातीला फक्त सलमान खान चं नाव दिसल्यावरही लोकांच्या शिट्या ऐकल्या आहेत.
पण यावेळी एकही शिटी ,आवाज झाला नाही कारण सलमान एकटा घोड्यावर नसतो सोबत "सोहेल खान" ही दुसऱ्या घोड्यावर असतो. तेव्हाच वाटलं मुव्ही आपटणार! "क्या तुममे यकीन है?" हा मुझे यकीन है ये मुव्ही फ्लॉप होगी!

सलमान खानचे एका गोष्टीसाठी अभिनंदन करावे लागेल त्याने पहिल्यांदा स्वतःसाठी नायिका नसलेला चित्रपट केलाय. नाहीतर एरवी तो खूप सेफ खेळत असतो.
चित्रपटाची मूळ थीम चांगलं असूनही दिग्ददर्शन न जमल्यामुळे एकंदरीतच रटाळ झालेला आहे.

ट्यूबलाईट तसाही जास्त वीज गिळून बिल वाढवतो. हा ट्युबलाईटही असाच आहे. यापेक्षा मल्टिप्लेक्समधील इतर स्क्रीनवरील सीएफएल, एलइडी घेणे केव्हाही चांगले!

-अभिजीत पानसे

Monday, 18 December 2017

गौर हरी दास्तान चित्रपट रिव्ह्यू, गांधी जयंती


1 ऑक्टोबर 2017
"आप तो काँग्रेसी थे ना पुरे जीवन भर फिर भी आपको ये सरकार क्यू परेशान कर रही है?"
त्यांचा मुलगा त्याना म्हणतो.

"..माफ किजिये सूनने मे अच्छा नही लगेगा लेकिन सच है अंग्रेजो
काल अच्छा था कम से कम तब दुष्मन कोन है ये तो पता  था!"
हे वाक्य एक अस्सल गांधीवादी ,भारतीय स्वातंत्र्यलढ्यात गांधींच्या विचारसरणीवर पूर्ण विश्वास असलेला 84 वर्षाचा स्वातंत्र्य सैनिक बोलतो.

अत्यन्त तगडी स्टारकास्ट असलेला हा गांधींच्या विचारसरणीवर विश्वास असलेल्या, स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांविरुद्ध लढलेल्या आणि स्वातंत्र्यानंतर  सरकारने स्वातंत्र्य सैनिक म्हणून ताम्रपत्र द्यावे म्हणून 30 वर्षांपासून लढणाऱ्या ओरिसातील गौरहरी दास नावाच्या स्वा. सै. स्वातंत्र्यानंतर मुंबई शहरातील संघर्षावर "गौर हरी दास्तान" चित्रपट आहे.

सम्पूर्णपणे ऑफ स्ट्रीम चित्रपट आहे. विनय पाठकने भावहीन शांत चेहऱ्याने जे भाव मांडले आहेत त्याला तोड नाही! या चित्रपटाचे एक विशेष की यातील प्रत्येक कलाकार हा मराठी, हिंदी नाट्यभूमिचा पाया असलेला आहे.
दीड तासाच्या या चित्रपटात अनेक सुंदर दृश्ये आहेत. अलझायमर्सची सुरवातीचे लक्षणे दिसत असताना एपीजे अब्दुल कलामांना पत्र लिहितात की स्वातंत्र्य या शब्दचा अर्थही मी विसरायच्या आधी मला माझं ताम्रपत्र द्या".
छोट्या मुलाला गांधीजी बघितलेल्या या 80 वर्षाच्या वृद्धाला भेटायचं असतं ते दृश्य.
शिवाय शेवटचं दृश्य खूप मस्त.
खूप कमी शब्दात अनेक गोष्टींना अलवार स्पर्श केलाय.

कोंकना सेन, रणवीर शौरी, विक्रम गोखले ,रजत कपूर
माझी आवडती अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी अशी मोठी स्टारकास्ट आहे. सिद्धार्थ जाधव ही एक दृश्यात आहे.
नेहा पेंडसे , विद्या माळवदे खूप सुंदर दिसली आहे.

अनंत महादेवन ने दिग्दर्शित केलेला हा "गौर हरि दास्तान" सिनेमा हा एकदा तरी बघावा असा आहे.

- Abhijeet Panse

बाहुबळी..आणि दाक्षिणात्य चित्रपट

हिमालयाच्या पायथ्याशी समुद्र असणे त्यातून हंसाच्या क्रुझ मधुन ट्रॅव्हल करत दुसऱ्या राज्यात जाता येणे..पर्वतावरील राजवाड्याच्या अंगणात पाण्याचा कालवा असणे , तो कालवा नदीत मग समुद्रात आणि वरून तो मोठ्या धबधब्यात खाली येणे.
अशी भूगोलाची "ताई माई आक्का , भाऊ बाप काका " फक्त दक्षिणात्य चित्रपटात होऊ शकतं.

समुद्रापातळीवरून पर्वताची उंची मोजतात पण असल्या अंधश्रद्धा दाक्षिणात्य चित्रपटात पाळल्या जात नाहीत.

"जेथे सागरा हिमालय 'भेटतो' तेथे बाहुबली बनतो!

                                        ***


बाहूबळी च्या काळात नारळाच्या झाडांची खोडं 'रबराची' होती. उंच झाडे पूर्ण वाकवताना मधून काडकन न तुटता शेंड्याचा जमिनीला स्पर्श होत असे.
अमरेंद्र बाहुबळी चे आजोबा #समरेंद्र_बाहुबळी नारळाच्या झाडाचंच धनुष्य म्हणून उपयोग करीत.

पुढे "ग्लोबल वॉर्मिंग"मुळे खोडं ठिसूळ होत गेलीत.


                                         ***

एक 'रिजनल' सिनेमा पहिल्याच दिवसात शंभर कोटी कमावतो. दोन वर्ष 'क्रेज' कायम ठेवतो संपूर्ण देशाला वेड लावतो ही खाण्याची गोष्ट नाही. आजवरचे सगळ्यात महाग टिकिट्स..सर्व रेकॉर्डस् ब्रेक करणारा असा हा बाहुबली आणि दिग्दर्शक राजमौली यांचं 'लोकप्रियेते' बाबत कौतुक करावे तितके कमी. शोले , माहेरची साडी या चित्रपटांच्या लोकप्रियतेबद्दल, तिकिटे मिळावण्यासाठीच्या घटना सांगितल्या जायच्या ।।लेख लिहिले जायचे तसेच बाहुबलीबद्दल ही होतील.

 जेव्हा एक प्रादेशिक सिनेमा देशभरात हिट होतो त्याचे इतर भाषेत वर्जन्स निघतात ही कौतुकाची गोष्ट आहे. दक्षिण चित्रपटसृष्टीचे हे अभिनंदनीय यश आहे.दक्षिणेकडील चित्रपटांचे रिमेक होत असतात हे त्या चित्रपटसृष्टीचे कौतुकास्पद यश आहे. कोणत्याही प्रादेशिक भाषेतील सिनेमा चा रिमेक होऊन तो मूळ प्रवाहात येतो हे त्या प्रादेशिक चित्रपटसृष्टीचे गौरवास्पद यश असते.
प्रादेशिक सिनेमा सैराटनेहीे असंच यश मिळवलं. त्याचेही दाक्षिणात्य भाषेत , हिंदीत प्रमुख स्रोतात रिमेक होताहेत.
अंकुश चौधरी सारखे मात्र "चलती का नाम गाडी या क्लासिक, नो एंट्री सारख्या खाऊन चावून चोथा झालेल्या मसाला चित्रपटांचे हास्यस्पद रिमेक करतात .तेव्हा तो मराठी प्रादेशिक चित्रपटसृष्टीचा अपमान असतो.

बाहुबली एक कलाकृती आणि राजमौली दिग्दर्शक म्हणून 'श्रेष्ठ' नसला आदर्श नसला तरी संपूर्ण देशाला आणि देशाबाहेरही एका प्रादेशिक सिनेमाला तुफान 'लोकप्रिय' करणारा वेड लावणारा आहे. हे अभिनंदनीय आहे.

-अभिजित पानसे

फॉल्ट इन अवर स्टार्स ..कल्पांत, सुहास शिरवळकर


The Fault in our Stars


कॅन्सर वर आधारित ऋषिकेश मुखर्जींचा 'आंनद' ही एक असामान्य कलाकृती आहे. त्यानंतर अनेक जणांनी इमोशनल टच देण्यासाठी काही टुकार प्रेम कहाण्या मध्ये जबरदस्तीने कॅन्सर घुसवायचा आणि भावनिक स्पर्श देण्याचा प्रयत्न करायचा. कंगना रनौत कट्टी बट्टी , करन जोहर, अनुष्का शर्माचा "ऐ दिल है मुश्किल" हे काही उदाहरणे.

अमृता खानविलकर, स्वनिल जोशींचा मूर्खपणाचा कळस असलेला आणखी एक चित्रपट "जिंदगी वेलकम"!

"द फॉल्ट इन अवर स्टार्स " हा मात्र एक तीन कॅन्सर पेशन्ट्सचा अत्यन्त चांगला चित्रपट आहे.
" द फॉल्ट इन अवर स्टार्स" ही एक कादंबरी आहे ज्यावर 014 मध्ये चित्रपट आला होता. फुफ्फुसांचा कॅन्सर असलेल्या सतरा वर्षाच्या हेझलला एका कॅन्सर समुपोदेशक  समूहात 'ऑगस्ट्स' हा कॅन्सरपीडित तरुण भेटतो. त्यांची ही ठराविक साच्यातील नसलेली गोष्ट आहे. यातील काही दृश्य विशेषतः शेवटचं दृश्य खूप सुंदर आहे. एक सकारत्मक चित्रपट आहे.

करन जोहरने याचे हक्क घेतल्यावर यात दीपिका पदुकोण आणि वरुण धवन असतील हे तीन वर्षांपूर्वी जाहीर केले होते.
वरून धवन असल्याने मला फार आनंद झाला होता . तो कुठलिही भूमिका सार्थकी लावू शकतो.
आता ऑगस्ट्सची भूमिका मात्र सुशांत सिंग राजपूत करतोय .सुशांत राजपूत नाम ही काफी है! हा त्या भूमिकेला वरच्या स्तरावर नेऊन सोडेल यात शंकाच नाही!

द फॉल्ट इन अवर स्टार " ही जगविख्यात कादंबरी आहे. जी 2012 मध्ये बाजारात आली.
पण एका लोकप्रिय मराठी लेखकाने कर्करोगावर एक कादंबरी लिहिली होती. ते लेखक, "सुहास शिरवळकर"!

सुहास शिरवळकरांचा प्रचंड चाहता वर्ग आजही आहे. अनेक जण सु.शिं चे त्यांना आवडलेल्या कथा, कादंबऱ्यांचे नाव सांगतात. पण आजवर 'कल्पांत' या कादंबरीचे नाव घेतलेलं मी तरी बघितलं नाही. ही कादंबरी बहुतेक लोकांना माहिती नाही याचं नेहमी आश्चर्य वाटतं.

सुहास शिरवळकरानी , फॉल्ट इन अवर स्टार्स ही कादंबरी येण्याच्या कित्येक वर्षांपूर्वी 'कल्पांत' ही दोन कॅन्सर पीडितांची प्रेमकहाणी, त्यांच्या  अवतीभोवती असलेल्या लोकांच्या भावभावना,क्रिया प्रतिक्रिया , संघर्ष दर्शवणारं अप्रतिम असं हे पुस्तक आहे. मुख्य म्हणजे fault in our stars मधील काही भाग 'कल्पांत' वरून प्रेरित वाटतो. हा नक्कीच फक्त योगायोग आहे. पण सुहास शिरवळकर या लेखकाची उंची त्यावरून कळून  येते.

कल्पांत मध्ये 'सुहृद' नावाच्या नायकाच्या तोंडी दोन पानांचं स्वगत आहे. मृत्यूवर!
मला आजवर आश्चर्य वाटत आलंय हा मोनोलॉग प्रसिद्ध कसा झाला नाही!
नटसम्राट मधील जे मोनोलॉग्स अत्यन्त प्रसिद्ध झालेयत त्या तोडीचं ते स्वगत मृत्यूवर भाष्य करणारं आहे!
हॅट्स ऑफ टू सुहास शिरवळकर!
कोणत्या तरी मुरलेल्या अभिनेत्याने तो मोनोलॉग म्हणावा हे मला खूप वर्षांपासून वाटत आलंय.

फॉल्ट इन अवर स्टार हा सिनेमा हेझल या प्रमुख पात्राची कहाणी आहे. त्या भूमीकेसाठी अभिनेत्री तितक्याच ताकदीची हवी. तरच तो रिमेक चांगला होईल.

- अभिजित पानसे

Saturday, 10 June 2017

बाहुबली , ममाज बॉय की स्ट्रॉंग मॅन


बाहुबली की ममाज बॉय! ?

बाहुबलीमधील बाहुबली चं पात्र आवडलं कारण एक परीपूर्ण पुरुष कसा असावा हे त्याद्वारे दाखवलं आहे. तो लहानपणी पूर्ण विद्या ग्रहण करतो.मोठेपणी मुलींशी फ्लर्ट सुद्धा करतो (पहिला भाग).
मामाची टांग खेचतो. मैत्रीपूर्ण नातं निभावतो.
लहानपणीपासून, रॉयल घराण्यातील असुनही आपल्याहून लहान हुद्द्यावरील लोकांशी समानतेने वागतो त्यांच्यासोबत त्यांच्या थाळीत जेवतोही. पण याहूनही सगळ्यात जास्त गोष्ट मला आवडली ती म्हणजे
तो आईचा , शिवगामीचा 'आज्ञाधारक' असतो .आईवर प्रेम, रक्षण  करतो. पण तो 'ममाजबॉय' नसतो.

जेव्हा वेळ येते योग्य आणि अयोग्य यात निवडण्याची तेव्हा तो त्याच्यासाठी ईश्वराच्याही प्रथम असलेली आई, शिवगामीलाही तो , ती चूक करते आहे हे स्पष्ट शब्दात सांगतो. आणि बायकोच्या, स्त्री सन्मानासाठी शिवगामीला, राज्याला दूर सारतो.
 हा फरक असतो आज्ञाधारक मुलगा आणि ममाज बॉय मधला.

 देवसेना अत्यन्त तेजस्वी , स्वाभिमानी , स्ट्रॉंग स्त्री दाखवली आहे. आणि अश्या स्त्री ला एक परिपूर्ण पुरुषच न्याय देऊ शकतो.

तिचा विनयभंग करु पाहणाऱ्याचा ती हात छाटते आणि हे कळल्यावर बाहुबली त्याचं शीर धडावेगळं करतो. त्यावेळी देवसेनेच्या चेहऱ्यावरील कडवं हास्य बघण्यासारखं आहे.

युद्धच्या वेळी दोघे मिळून ते लढतात.

देवसेनेच्या प्रेमात बाहूबली पडतो तेही सर्वप्रथम तिला दरोडेखोरांशी 'युद्ध' करताना बघूनच.
एक खरा पुरुषच 'अश्या' खमक्या स्त्रीच्या प्रेमात पडू शकतो.

इतर मात्र अश्या तेजस्वी स्त्रीपुढे स्वतःला कमी असुरक्षित, कमी समजून पोकळ अहंकार दुखावलेले पोकळ पुरुष  अश्या स्ट्रॉंग , तेजस्वी स्त्रीला खाली दाबण्याचा, सप्रेस करण्याचा प्रयत्न करतील.

म्हणून माझा सगळ्यात आवडतं दृश्य आहे जेव्हा देवसेना बाहुबलीच्या खांद्यावरुन नावेत जाते. कारण एक मनाने , विचाराने स्ट्रॉंग 'पुरुष' च आपल्या प्रेयसी, स्त्री चे tantrums , (नखरे हा शब्द जरा नकारात्मक वाटतो.) , सकारात्मक हट्ट पूर्ण करतो. तिच्या (सकारात्मक) अहंकारालाही पूर्ण न्याय देऊ शकतो. इथे ना अंध पुरुष'वादी' ना उथळ स्त्री'वादी' विचारशैली असते.

एक मजबूत पुरुषच एका स्ट्रॉंग स्त्रीला पूर्ण न्याय देऊ शकतो. इतर फक्त अहंकार दुखावून कमकुवत मनाचे शरीरानेच असलेले पुरुष अश्या तेजस्वी, परिपूर्ण, खमक्या, स्वाभिमानी स्त्रीला आपल्या मागे रोखतात. तिची प्रगती रोखतात.

- अभिजित पानसे


Sunday, 28 May 2017

यावर्षीचा शौर्य पुरस्कारासाठी छोटा चेतन भगत आणि एकता कपूरची निवड




तुम्ही हाफ म्याड आहात का?  कोण नसतं म्हणा. पण ते जगजाहीर करायची इच्छा आहे का? एक सोपा मार्ग आहे घरातून निघायचं आणि हाफ गर्ल फ्रेंड बघायला जायचं.
 प्रस्तुत लेखक आधीच जगजाहिररित्या म्याड आहेच. त्यामुळे आता काहीही फरक पडणार नाही.रेडा उन्हात कितीही फिरला तरी त्याची स्किन टॅन होत नाही.
ज्याने अब्बास मस्तान चा 'मशीन' थिएटर मध्ये जाऊन बघितला तो आता या सगळ्या चांगल्या वाईट हाफ वाईट सगळ्यांच्या पलीकडे गेला आहे समजावे.

तीन वर्षापूर्वीच लोकांनी नाकारलेल्या पुस्तकावर चित्रपट बनवायला जिगरा.. हिम्मत लागते! ते शौर्य दाखवले आहे सासू सुना उद्धारक क्..क्.. एकता कपुर आणि महान नृत्यज्ञानी नृत्यसमीक्षक नृत्य जजसाब , ट्विटरनिर्दालक साहित्यकार "छोटाचेतनभगत" यांनी!त्यामुळे राष्ट्रपतीहस्ते यावर्षीचा शौर्य पुरस्कार एकता कपूर आणि भगत यांना मिळण्याची शक्यता आहे.

हा चित्रपट चिंगम ..बूम बुम बुमर प्रमाणे पहिले दहा मिनिटे चांगला वाटतो नंतर बेचव रबर चावत बसावे लागतं.

भयंकर मूर्खपणाचा कळस म्हणजे ; लहान मुलीला आई बाबांनी गच्चीवर जायला मनाई केली म्हणून आई बाबांची सहज नजर चुकवुन गच्चीवर जावं अश्या प्रकारे या सिनेमात श्रद्धा कपूर म्हणजे रिया सहज फक्त एका सिक्युरिटी गार्ड ची नजर चुकवून #इंडियागेट च्या गच्चीवर जाऊन बसत असते. आणि तिच्या म्हणण्यानुसार, ती काय म्हणणार बिचारी तिचा वदविता छोटाचेतन भगत आहे ; ती नेहमीच इंडिया गेटच्या गच्चीवर जाऊन बसते. हे पाहिल्यावर ऐकल्यावर खुर्चीतून समोर कोसळायाचा बाकी होतो.
पण समोरच्या खुर्चीवरील जोडपं अंधारात चुंबन साधनेत मग्न असल्याने मी स्वतःला सावरलं.उगाच दुसऱ्यांच्या प्रणयाराधनेत अडथळा आणायला मी काय अँटी रोमिओ स्क्व्याडमध्ये थोडी आहे. मी फक्त दुःखी अंतःकरणाने डावीकडे माझ्या शेजारच्या रिकाम्या सीटकडे बघितलं आणि "गेले ते दिन राहिल्या त्या आठवणी" म्हणत पुन्हा हाफ गर्लफ्रेंड चा अत्याचार सहन करीत बसलो. सांगणार कोणाला!

 पुन्हा एक धक्का बाकीच होता. छोटा चेतनचा गेट्सशी काय राग आहे माहिती नाही इंडिया गेट प्रकरण बघितल्यावर तो "बिल गेट्स" या कुबेरावर वर घसरला आहे. एका सिन मध्ये बिल गेट्स बिहारमधील गावात येतो आणि अर्जुना रणतुंगा कपुर त्याच्यासमोर भाषण देतो.त्यात बिल गेट्स चा इतका वाईट फोटोशॉप केलाय की यापेक्षा तर इलेक्शनच्या टायमाला चांगले फोटोशॉप्स दिसतात! सतत बिल गेट्स चा फोटो शॉप्ड क्लोज अप दाखवलाय किमान दुरून तरी तो बसलेला दाखवला असता तर विश्वसनीय तरी वाटला असता.पण दिग्दर्शक मोहित सुरीने सुरी घेऊन प्रेक्षकांच्या मेंदूचा पार खिमा केलाय. इतका वर्षांचा भट कॅम्पचा(च) अनुभव असूनही मोहित सूरी अश्या हास्यस्पद चुका करत असेल तर यापेक्षा तर एकेकाळीचा धोनीचा पिठू बॉलर मोहित शर्मा चांगला मुवि बनवेल.

श्रद्धा कपूरचं बास्केटबॉल प्रेम हे फारच बॉलबोध दिसलंय. स्पोर्टमन असो वा स्पोर्टवुमन तो त्याच्या 'थाईज' वरून कळतो. इथे मात्र श्रद्धा कपूर दुरान्वये स्पोर्टगर्ल वाटत नाही. मात्र श्रद्धा कपूर #मादकेश्वरी दिसावी म्हणून खास डिझायनर शॉर्टस घालून  'मंडदर्शन' करीत दाखवली आहे. तेच काय ते जरा बरं .बाकी सिनेमा मात्र डोक्याची मंडई करतो.

मुविमध्ये शेवटी शेवटी अर्जुना रणतुंगा कपूर रियाला म्हणजे श्रद्धा क.ला शोधत असतो.तिच्या आठवणीत तळमळणाऱ्या अर्जुनाला बघून त्याचा मित्र त्याची ओळख मुद्दामून एका मुलीशी करून देतो ती असते #रियाचक्रवर्ती
ही ट्रिक ऐश्वर्या राय आणि त्याकाळी सद्विवेक हरवलेल्या विवेक ओबेरॉयच्या "क्यू हो गया ना (फ्लॉप)" मध्येही दाखवली होती. त्यात सदविवेक ओबेराय हा ऐश्वर्या राय म्हणजे त्या मुवितली 'दिया' साठी तळमळत असतो आणि
शेवटी "दिया मिर्झा" दाखवली होती.
दोन्ही मुवित कॉमन हे की दोन्ही फ्लॉप झालेत. म्हणजे हा होणार आहेच.

असो जुन्या आठवणी नको उगळाव्यात. राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन ला जोडणाऱ्या पुलाखालून बरंच पाणी गेलंय. ऐश्वर्या राय चा बच्चनाभिषेक झाला. ती पर्मनंट "कांस उत्सवातली" पाहुणी असल्याने सध्या ती बार्बी डॉल बनून डौलात वावरतेय.

अर्जुन कपूरने मात्र आता आपल्या एकेकाळचा मेंटर सळमान खानच्या वहिनीवर .."मलायका अरोरावर" लक्ष केंद्रित करावे. लवकरच ती "अरबाजमुक्त स्त्री" होणार आहे.

असो,अश्या प्रकारे दोन मूर्ख स्टारकिड्स ची एक अत्यंत मूर्ख मुवि बघून आलो. कुठे तो "टू स्टेट्स " कुठे ही हाफ म्याड मुवि.

तरीही काही फूलटू बघायचंच असेल तर किशोरकुमार  आणि मधुबालाचा ऑल टाइम हिट "हाफ तिकीट" बघा!!

-Abhijeet Panse

Saturday, 27 May 2017

बाहुबली , देवसेना चित्र

बाहुबली मधली सगळ्यात जास्त मला एक गोष्ट आवडली; ज्यांना ते लक्षात आलं नसेल त्यांनी पुन्हा पुढे कधी चित्रपट बघताना आठवणीने ते बघा. भल्लालदेव सर्वप्रथम देवसेनेचं चित्र बघतो आणि नंतर त्याच्या महालात तिचं तेच मोठं चित्र लावलेलं असतं , त्या चित्रात ती सिंहासनावर बसलेली आणि तिच्या हातात  'तलवार' असते.

 ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. Its a statement.
पूर्वी पुरुषांचे चित्र काढले जाई त्यात त्यांच्या हाती बंदूक, वा तलवार असे किंवा पायापाशी वाघ, किंवा मेलेल्या वाघावर पाय ठेऊन चित्र काढले जाई. आणि ते शौर्याचे प्रतीक म्हणून दिवानखान्यात लावले जात किंवा वधू संशोधनाला राजकन्येकडे पाठवले जात. आणि दुसरीकडे युवतींचे चित्र हातात पुष्प घेऊन वा वेली , वृक्षाभोवती..तळ्याकाठी विहार करतानाचं दाखवले जात.

इथे मात्र देवसेनेच्या हाती #तलवार दाखवली आहे. आणि हे दाखवताना तिला ;परिस्थितीमुळे वा पर्याय नसल्याने हाती तलवार घेतलेली पुरुषी पेहरावतील राजकन्या दाखवली नाही ; तर जात्याच शौर्यवान आणि सौंदर्यवान असे ते चित्र असते. ते 'लादलेलं' शौर्य नसून मुळातच असलेलं तेजस्वी  राजकन्येचं ,स्त्री चं ते चित्र असतं, इतर सर्व स्त्रीसुलभ भावना असलेली युवती. She is jus being a normal woman nothing is forced.
हि गोष्ट राजमौलिने दाखवल्याबद्दल खरंच त्याचं अभिनंदन करायला हवं.

तेजस्वी देवसेना विवाहाचा प्रस्ताव धुडकावून लावते तेव्हा माहिष्मती राज्याकडुन प्रस्ताव आणणारा तो माणूस देवसेनेच्या भावाला तुम्ही देवसेनेला समजावा म्हणतो , तेव्हा तीचा भाऊ तात्काळ उत्तर देतात की तो तिचा निर्णय आहे.
ही गोष्ट फार आवडली. यावरून पूर्वी मुळात व्यक्तिस्वातंत्र्य प्रत्येकाला , मुलीलाही होतं हे दाखवलं.
#स्वयंवर ही कल्पनासुद्धा मुळात स्त्री केंद्रित होती.ज्यात युवती निर्णय घायची की कोणासोबत विवाह करायचा.

बाहुबलीमधली आणखी एक गोष्ट मला फार आवडली ते '#शिवगामीचं' पात्र. (पहिल्या भागात) माहिष्मती साम्राज्यच्या सिंहासनावर बसलेली शिवगामीनी हे "स्त्रीवादाचं"  प्रतीक नाही तर 'योग्यतेचं' प्रतीक आहे.
नवरा शरीराने आणि मनाने तर नक्कीच पंगू , ना - लायक असल्यामुळे जी व्यक्ती त्या सिंहासनासाठी लायक, capable,  योग्य अशी ती स्वतः सिंहासनावर बसते. अश्या व्यक्तीचेच "वचन हे शासन" असतं.

इथे उथळ स्त्रीवाद, feminism नाही. तर 'योग्यतेची' गोष्ट आहे. त्यामुळेच पुढे भलालदेव आणि अमरेंद्र बाहुबलीमध्ये जो शौर्य , योग्यता , लायकी सिद्ध करेल तोच पुढे साम्राज्याचा अधिकारी जागी बसेल असे ती म्हणते.
येथे उथळ ,एकसुरी स्त्रीवाद वा स्त्रीप्रधान संस्कृती वा अंध पुरुषीवर्चस्व वा पुरुषप्रधान संस्कृती नाही तर लायकीचा प्रश्न आहे. जो लायक तोच शासक. त्याचे वचन हे शासन.

- अभिजित पानसे.


Tuesday, 16 May 2017

बुडत्या_रामुला_सरकारचा_आधार


बाहुबलीपेक्षा मी दोन चित्रपटांची वाट पहात होतो 'सरकार' आणि आयुष्यमान खुराणाचा "..बिंदू".
पहिला सरकार जी मुळातच गॉडफादरची कॉपी आहे; जबरदस्त सिनेमा होता. प्रत्येक पात्र योग्य, सिनेमाला वेग होता तरीही कलात्मक होता. खास रामू 'टच' होता.
पण या सरकारमध्ये सुरवातीपासूनच काहीतरी कमतरता जाणवू लागते. वर्षभर गजबलेली शाळा अनुभवल्यावर उन्हाळयाच्या सुट्टीत शाळेत गेल्यावर भकास वाटतं तसं काहीसं या सरकार मध्ये वाटत राहतं. सतत रिकामं रिकामं..
एकटा अमिताभ सिनेमाला सांभाळायचा प्रयत्न करतो. पण कथा , पात्र कशातच खोली नाही. चित्रपट बनवला नसून उरकून टाकलाय असं वाटतं.

राम गोपाल वर्मा इंडस्ट्रीत एकटा पडलाय हे चित्रपट बघताना स्पष्ट जाणवत राहतं. कोणीही मोठे कलाकार त्याच्यासोबत काम करायला तयार नाहीत. त्यामुळे एक अमिताभ सोडल्यास दुय्यम फळीतल्या कलाकारांची निवड करावी लागलीये.

सत्या, कंपनी, बनवणारा रामूची खरंच अधोगती झालीये हे दर्शवणारं एक दृश्य आहे गणपती विसर्जनाचं. आजवरच्या सुमारहून सुमार चित्रपटांमध्ये मुंबई गणपती विसर्जनाचं इतकं खराब दृश्य दाखवलेलं नसेल तितकं सरकार 3 मध्ये आहे. सेट वरील वीस तीस लोकांना घेऊन ते चित्रीकरण केलंय असं वाटतं. उरकून टाकणे याला म्हणतात.

हा चित्रपट बघण्याचं एक महत्त्वाचं कारण होतं "यामी गौतम".
आयुष्यमान खुरणामुळे विकी डोनर थिएटर मध्ये दोनदा बघितल्यावर नंतर मी यामी गौतमचा फॅन झालो होतो. पण त्यानंतर तिने सतत इरिटेटिंगली अर्थहीन भूमिका केल्यात. 
दिव्या कुमार खोसला, यारीया वाली या मूर्ख दिग्दर्शकाच्या सिनेमात काम केलं. अतुल अग्निहोत्रीच्या सिनेमात काम करण्याचा गुन्हा केला. अतुल अग्निहोत्री दिग्दर्शित चित्रपट!! May God save viewers n actors!!
पण या सरकार मध्ये तिला कामच नाही. संपूर्ण चित्रभरातील ती दहा मिनिटं दिसली असावी. पण यामी गौतम आजवर तिच्या करिअरमध्ये इतकी मादक, सेन्स्यूअस दिसली नसेल तितकी सरकार मध्ये! जबरदस्त लूक! लूक्स साठी टेन ऑन टेन!

एकेकाळी हॉलिवूडच्या ,  #RichardAttenborough च्या #गांधी चित्रपटात " बेन किंग्सले" सोबत काम करणारी रोहिणी हट्टंगडी , पुढे टुकार मराठी सिरियल्स मध्ये काम करताना बघून आलेली शिसारी सरकारमधील तिच्या दोन सीन्समुळे गेली.
'अग्निपथ ' नंतर पाहिल्यांदाच अमिताभ बच्चन आणि रोहिणी हट्टंगडी एका चित्रपटात काम करताय. पण यात दोघांचं एकही सोबत दृश्य नाही.

सरकारचा खरा फायदा करून घेतलाय तो अमित सधने! अमिताभ समोर हा अमित चांगला उभा ठाकलाय.
संपूर्ण चित्रपटात अमिताभ बच्चन चे दोनेक दृश्य , मनोज वाजपेयीचा पहिला सिन, आणि यामी गौतमचं दिसणं याखेरीज काहीही बघण्यासरखं नाही.

रामूचं स्टँडर्ड खरंच घसरलय असं वाटत राहतं.त्याच्यात तेलुगू दिग्दर्शक घुसल्याप्रमाणे बकवास क्लोज अप्स आणि जॅकी श्रॉफची जो मुख्य व्हिलन आहे त्याला तेलुगू चित्रपटातील एक भडक व्हिलन बनवुन हास्यस्पद करून टाकलाय.

पहिला सरकार अप्रतिम ,दुसरा सरासरी आणि तिसरा अत्यन्त सुमार अशी उतरंड रामुची झाली आहे.
त्यावरून रामगोपाल वर्मा संपला असा प्रश्न पडतो. पण हे प्रेक्षकांसाठी , चित्रपट सृष्टीसाठी योग्य नाही , करण जोहर , फराह खान, साजिद खान यांच्या चित्रपटांचे बळींसाठी रामू आणि त्याच्याच मुशीत तयार झालेला अनुराग कश्यप चे चित्रपट पर्वणी असते. 

26/11 च्या हल्ल्यानंतर हॉटेल ताजमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत एकेकाळी रुबाबाने जाणारा रामू आता मात्र त्याच्या कामामुळे बुडत चालला आहे असं वाटतं. आणि या बुडत्या रामुला सध्यातरी सरकारच्या आधाराचा काडीचाही काही उपयोग होणार नाही हे स्पष्ट.

*Abhijeet Panse*